शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

आर. आर. आबा यांच्याविषयी माहिती नसलेली गोष्ट…

आर आर आबांची एक सवय होती. ते कोणत्याही भागात गेले तर त्यांच्या गावची अंजनीची सासुरवासिन त्या गावाच्या आसपास असेल तर आबा हमखास जायचे आपल्या बहिणीच्या भेटीला. अगदी ते जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हापासून ते आमदार, मंत्री झाल्यावरही ते आपल्या गावच्या लेकीची भेट घ्यायची चुकवत नसत. अनेकदा असं व्हायचं आबा त्या गावाला अगोदर येवून गेलेले असायचे.
कधी तेच सांगायचे अमुक गावात मारुतीच्या देवळासमोर चला. तिथ जायचं आहे माझ्या बहिणीकड. त्यांची स्मरणशक्ती पाहून थक्क होणार्या सोबत्यांना ते सांगायचे ,”स्कूटरवरून आलो होतो बाबा म्हणून रस्ता लक्षात आहे” हा दौरा अचानक असायचा. आले आबांच्या मना तिथे कोणाचे चालेना, असा प्रकार असायचा. आमच्या गावच्या बबूमावशी गिरीगोसावी यांच्या घरी आले होते आबा असेच एकदा.
Aaba in village
आबांनी राज्यातल्या गोरगरीब जनतेवर प्रेम केलच पण आपल्या गावच्या बहिणींना आयुष्यभर माहेरच प्रेम आणि माहेरचा आहेर दयायला कधीही विसरले नाहीत आबा. सत्तेच्या कवचकुंडलातून क्षणात बाहेर पडून आपल्या बहिणीशी हितगोष्टी करणारा आबा अंजनीच्या माहेरवासिनीनी पाहिला आहे.
आभाळाला गवसणी घालणारा भाऊ दारात आल्यावर त्यांना होणारा आनंद किती उच्च कोटीतला असेल हो? अनेक मोठी पद सांभाळणार्या आबांनी भाऊ हे पद किती हळवेपणाने सांभाळले होते हे अनेकांना माहित नाही.
-संपत मोरे (9422742925)






by - http://khaasre.com/unknown-story-about-the-r-r-patil/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल