गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

लि-चिंग युएन....... २५६ वर्ष जगले



लि-चिंग युएन....२५६ वर्ष


एखाद्या माणसाचं वयोमान जास्तीत जास्त किती असू शकतं तुम्हाला कल्पना आहे का? कुणी म्हणेल ७५ ते ८५ कुणी म्हणेल १०० वर्षे.. पण आज आम्ही तुम्हाला या बातमीतून सांगतोय २५६ वर्षे जगलेल्या माणसाची गोष्ट. वाचून आश्चर्य वाटेल पण चीनच्या ली-चिंग यूएन या माणसाचा मृत्यू वयाच्या २५६ व्या वर्षी झाला. ही गोष्ट कोणतीही परिकथा नाही तर वास्तव आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं या ली चिंग यूएन यांच्या १५० व्या वाढदिवसासंबंधीचा एक लेख १९३० मध्ये प्रकाशित केला होता. चेंगाडू विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक वू- चुंग- चियाह यांनी ली-चिंग यूएन यांना १५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा १८२७ मध्ये दिल्या होत्या आणि ते १५० वर्षे कसे जगले यासंदर्भातला लेख लिहीला होता, जो १९३० मध्ये पुन्हा छापण्यात आला होता.




आपल्या १० वर्षे ते ४० वर्षांच्या वयात ली चिंग यांनी कान्सू, शन्सी, तिबेट, अनाम, सिआम आणि मंचुरिया इथल्या पर्वतरांगा पालथ्या घातल्या होत्या आणि तिथल्या वनऔषधींची त्यांना खडान् खडा माहिती होती. ली चिंग यांना मार्शल आर्टचीही माहिती होती. त्यांनी जवळपास २५ पिढ्या आपल्या डोळ्यासमोर मोठ्या होताना पाहिल्या आहेत. ली चिंग यूएन यांच्याबाबत हा लेख ‘स्टीव्हन बॅनक्राझ’ यांनी लिहीला आहे आणि ‘स्पिरिट अँड मेटा फिजिक्स’ या संस्थेनं हा लेख प्रकाशित केला आहे.




मन शांत ठेवा, कबुतराप्रमाणे चाला, कासवासारखं बसा आणि कुत्र्यासारखं झोपा तुमचं आयुष्य वाढेल असं ली चिंग मृत्यू शय्येवर असताना म्हटले होते. आहाराची काटेकोर पथ्य पाळणं हेदेखील माझ्या दीर्घ आयुष्याचं रहस्य आहे असंही ली यांनी म्हटलं आहे. मी या जगात जन्माला आलो आणि मला हवं ते सगळं केलं असंही ली यांनी आपल्या शेवटच्या क्षणी म्हटलं होतं.





ली चिंग यूएन यांची संपूर्ण माहिती विकिपीडियावरही उपलब्ध आहे. १९०८ मध्ये या दीर्घायुषी माणसावर एक पुस्तकही लिहीलं गेलं. मार्शल आर्ट ही कला त्यांनी ज्या ज्या शिष्यांना शिकवली ते कायम निरोगी राहिले. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकदाही अॅलोपथी औषध घेतलं नाही, दारू, तंबाखू किंवा इतर व्यसनांना स्पर्शही केला नाही. तसंच आहारावर कायम नियंत्रणही ठेवलं असंही ली चिंग यूएन यांनी म्हटलं आहे. एखाद्या माणसाचं वयोमान हा चर्चेचा विषय नसतो. मात्र ली चिंग यूएन यांचं २५६ वर्षांचं वय हेच आता चर्चेचा विषय ठरलं आहे.







By - इंटरनेट 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल