शुक्रवार, २९ डिसेंबर, २०१७

“हमाल ते बस कंडक्टर ते सुपरस्टार” प्रवास करणाऱ्या रजनीकांतविषयी २५ अपरिचीत गोष्टी.

जिजाबाईंचा शिवाजी उर्फ रजनीकांत…!
आपल्या अभिनयाच्या एक वेगळ्या स्टाईल आणि जबरदस्त संवादफेकीने चित्रपटाला गर्दी खेचुन आणण्यात नेहमी यशस्वी होणारा सुपरस्टार रजनीकांत याच्याबद्दल आपणास माहिती नसणाऱ्या या २५ गोष्टी…
१) रजनीकांतचे मुळ नाव शिवाजी गायकवाड असुन त्याचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बंगळुर येथे मराठा हेंद्रे पाटील कुटुंबात झाला.
२) रजनीकांतचे चाहते त्याचा जन्मदिवस १२ डिसेंबर जागतिक स्टाईल दिन म्हणुन साजरा करतात.
३) रजनीकांतचे पुर्वज पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कोयाळी येथील असल्याचे सांगितले जाते. जेजुरीचा खंडेराया हे रजनीकांतचे कुलदैवत आहे.
४) रजनीकांत हा छत्रपती शिवाजी महाराजांचा खुप मोठा चाहता असुन महाराजांचे भले मोठे पेंटिंग त्याच्या घरात लावलेले आहे.
५) हॉलीवुड अभिनेता जॅकी चॅन नंतर आशिया खंडातील सर्वाधिक मानधन (२६ कोटी – शिवाजी द बॉस) घेणारा तो अभिनेता आहे.
६) जगातील सर्वात जास्त चाहता वर्ग असणारा अभिनेता म्हणुन गिनीज बुकात त्याची नोंद झाली आहे. दक्षिण भारतात त्याच्या नावावर सर्वाधिक यशस्वी चित्रपट आहेत.
७) रजनीकांतने ट्विटरवर अकाऊंट उघडल्यावर २४ तासातच तब्बल २१ लाख लोकांनी त्याला फॉलोव केले होते.
८) रजनीकांतने सुरुवातीच्या काळात खुप हालअपेष्टा सोसुन कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मदत केली. त्याने मद्रासमध्ये काही काळ सुतारकाम केले. बंगळुरमध्येही कुली काम करत करत तो ७५०रु. पगारावर बस कंडक्टर म्हणुन नोकरीला लागला.
९) बसमध्ये बोटांवरुन चिल्लर फिरवण्याच्या करामती, प्रवाशांना ऍक्शनमध्ये तिकीट देऊन झाल्यावर शिट्टी वाजवण्याची वेगळीच शैली, सिगरेट पेटवण्याची हटके स्टाईल यामुळे रजनीकांत लवकरच प्रसिद्ध झाला.
१०) रजनीकांतने कन्नड, तेलगु, तमिळ, मल्याळम, बंगाली, हिंदी, इंग्रजी चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत मराठी असुन त्याने एकदाही मराठी चित्रपटात काम केले नाही हे विशेष.
११) रजनीकांतचे वडील रामोजी गायकवाड पोलीस हे कॉन्स्टेबल होते तर आई जिजाबाई या गृहिणी होत्या. रजनीकांत पाच वर्षांचा असताना त्याची आई वारली.
१२) रजनीकांतला दोन मोठे भाऊ व एक बहीण आहे. रजनीकांतच्या पत्नीचे नाव लता असुन त्याला सौंदर्या व ऐश्वर्या या दोन मुली आहेत. ऐश्वर्या ही दाक्षिणात्य अभिनेता धनुषची पत्नी आहे.
१३) रजनीकांतचे प्राथमिक शिक्षण आचार्य पाठशाळा बंगळुर येथे तर उच्चशिक्षण बंगळुरच्या रामकृष्ण मिशनच्या कॉलेजमध्ये झाले. त्याने मद्रास फिल्म इन्स्टिट्युटमध्ये अभिनयाचा डिप्लोमा कोर्स केला.
१४) रजनीकांतला रजनी, थलैवा, सुपरस्टार, बॉस अशा नावांनी ओळखले जाते.
१५) चेन्नईमध्ये रजनीकांतचा स्वतःचा राघवेंद्र मंडपम हा प्रसिद्ध मॅरेज हॉल आहे.
१६) रजनीकांतचा २००२ मधील बाबा आणि २००८ मधील कुसेलन हे चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर त्याने स्वतःच्या खिशातुन डिस्ट्रिब्युटर्सला नुकसानभरपाई दिली होती.
१७) रजनीकांत वेळेबाबत खुप शिस्तीचा असुन पहाटे पाचला उठुन योगा करतो. शुटिंगच्या अगोदर तो नेहमी हजर होतो. संध्याकाळी तासभर चालण्याचा व्यायाम करतो आणि रात्री ९ नंतर तो कुणालाही भेटत नाही.
१८) रजनीकांत १९९५ पासुन त्याचा प्रत्येक चित्रपट झाला की काही दिवस हिमालयात जातो. तिकडे गेल्यानंतर हृषिकेश येथील एका हॉटेलमध्ये तो नेहमीच्या ठरलेल्या एकाच खोलीवर मुक्कामाला असतो.
१९) भारत सरकारने रजनीकांतला २००० मध्ये पद्मभुषण आणि २०१६ मध्ये पद्मविभुषण पुरस्काराने गौरविले आहे. त्याचबरोबर जर्मनीतील सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार, जपानचा एमटीव्ही सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझीनमध्ये जगातील प्रभावशाली १०० व्यक्तींमध्ये स्थान असे विविध सन्मान त्याला मिळाले आहेत.
२०) १९७५ मध्ये तमिळ अपुर्वा रागणगल या पहिल्या चित्रपटातील खलनायकाच्या छोट्या भुमिकेपासुन त्याने कारकिर्दीला सुरुवात केली. १९८८ मध्ये Bloodstone या एकमेव इंग्रजी चित्रपटात त्याने काम केले. अंधा कानुन हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट आहे. त्याने आजपर्यंत पावणेदोनशेच्या आसपास चित्रपटात काम केले आहे.
२१) धोतर कुर्ता हा त्याचा आवडता पोशाख आहे. मसाला डोसा हा खाद्यपदार्थ त्याला आवडतो. रजनीकांतला फार्महाऊसवर राहायला आवडते. तो त्याच्या चेन्नईतील आलिशान अशा Poes Garden या बंगल्यावर क्वचितच असतो.
२२) रजनीकांतचा रोबो २ हा चित्रपट पुर्णतः मेक इन इंडिया चित्रपट ठरला आहे.
२३) योगाचार्य सच्चिदानंद स्वामी यांच्यावर त्याची श्रद्धा आहे. रजनीकांत त्याची अर्धी कमाई सार्वजनिक आणि धार्मिक कार्यात खर्च करतो.
२४) रजनीकांत आज जगातील कोणतीही वस्तु विकत घेण्यास सक्षम असला तरी अजुनही आपल्या जुन्या वस्तुच वापरतो. जसे की कपडे, जुनी चित्रे, त्याची जुनी गाडी.
२५) सर्वात शेवटी रजनीकांत हा त्याच्या चाहत्यांमध्ये एका वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे रजनीकांत जोक्स. जगात त्याच्याइतके जोक कुठल्याही व्यक्तीवर झाले नसतील. रजनीकांतला काहीच अशक्य नाही म्हणुनच कदाचित आज वयाच्या ६७व्या वर्षीही त्याच्याइतकी कमाई करणारा सुपरस्टार जगाच्या पाठीवर सापडत नाही.







by - http://khaasre.com/superstar-rajinikanth-turns-67/

हा विश्वासू इंग्रज नसता तर 2 ऐवजी 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता भारत…

भारताला स्वातंत्र्य सहजासहजी नाही मिळाले. यासाठी हजारो निष्पाप लोकांचा जीव गेला, शेकडो शहिदांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. परंतु यानंतर भारताला फाळणीच्या समस्येला तोंड द्यावे लागले. आज खासरेवर आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी नसती तर भारत आज 2 ऐवजी चक्क 565 तुकड्यामध्ये वाटला गेला असता.
स्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या नजरा जोधपूर रियासातवर होत्या. त्यावेळी तिथले राजा हनुमंत सिंह पाकिस्तान मध्ये समाविष्ट होऊ इच्छित होते. परंतु त्यावेळी तिथे असे काही घडले ज्यामुळे जोधपूर रियासात पाकीस्तान मध्ये समाविष्ट होऊ नाही शकली. स्वातंत्र्य मिळण्याच्या एक हप्ता अगोदरच जोधपूर रियासातचे राजा हनुमंत सिंह यांनी जोधपूर भारतात समाविष्ट होणार नाही अशी घोषणा केली होती. तुमच्या माहीतीसाठी सांगतो की जर जोधपूर पाकिस्तान मध्ये समाविष्ट झाले असते तर भारताचा राजस्थान सोबत संपर्क तुटला असता. एवढेच नाही तर जोधपूर पाकिस्तान मध्ये समाविष्ट झाल्याने हनुमंत सिंह यांच्या नातेवाईकांच्या रियासात असलेले जैसलमेर आणि बिकानेर सुद्धा पाकिस्तान मध्ये समाविष्ट झाले असते. विचार करा जर असे झाले असते तर आज भारताची स्थिती कशी असती.
या गोष्टीची माहिती मिळताच महात्मा गांधी यांना खूप शॉक बसला. त्यांना माहिती होते की असे झाल्यास भारताची हालत काय होईल. त्यामुळे त्यांनी तात्काळ सरदार पटेल याना बोलावले. सरदार पटेल जेव्हा गांधीजींना भेटायला पोहचले तेव्हा त्यांनी सरदार पटेल यांना पहिला प्रश्न तोच विचारला की तुम्ही जोधपूर च्या राजांसोबत बोलणं का नाही करत. महात्मा गांधी यांना परेशान बघून सरदार पटेल यांनी गांधीजींना सांगितले की हनुमंत सिंह यांनी त्यांना भारतात समाविष्ट राहायचे सांगितले आहे. परंतू पाकिस्तान जोधपूरला खूप कमी देत होता. पाकिस्तान ने जोधपूर च्या राजांना कराची पोर्ट जोधपूर मध्ये देण्याचा विश्वास दिलाझ त्यामुळे ते कदाचित भारतात समाविष्ट नाही होणार.
पाकिस्तान मध्ये समाविष्ट होण्याचं बोलणं करण्यासाठी जोधपूरचे राजा त्या वेळचे वायसराय माउंट बेंटन याना भेटायला गेले. माउंट बेंटन यांनी जोधपूरच्या राजांची भेट घेतली आणि समजावले की जोधपूरचे भविष्य पाकिस्तान सोबत नाही तर भारतात खूप चांगले राहील. बोलले जाते की वायसराय यांच्या समजावण्याचा हनुमंत सिंह यांच्यावर एवढा परिणाम झाला की त्यांनी पाकिस्तान मध्ये जायचा त्यांचा निर्णयच बदलला. वायसराय माउंट बेंटन यांच्यामुळेच आज जोधपूर भारताचा हिस्सा आहे.






by - http://khaasre.com/history-of-jodhpur-riyasat-1947/

आर. आर. आबा यांच्याविषयी माहिती नसलेली गोष्ट…

आर आर आबांची एक सवय होती. ते कोणत्याही भागात गेले तर त्यांच्या गावची अंजनीची सासुरवासिन त्या गावाच्या आसपास असेल तर आबा हमखास जायचे आपल्या बहिणीच्या भेटीला. अगदी ते जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हापासून ते आमदार, मंत्री झाल्यावरही ते आपल्या गावच्या लेकीची भेट घ्यायची चुकवत नसत. अनेकदा असं व्हायचं आबा त्या गावाला अगोदर येवून गेलेले असायचे.
कधी तेच सांगायचे अमुक गावात मारुतीच्या देवळासमोर चला. तिथ जायचं आहे माझ्या बहिणीकड. त्यांची स्मरणशक्ती पाहून थक्क होणार्या सोबत्यांना ते सांगायचे ,”स्कूटरवरून आलो होतो बाबा म्हणून रस्ता लक्षात आहे” हा दौरा अचानक असायचा. आले आबांच्या मना तिथे कोणाचे चालेना, असा प्रकार असायचा. आमच्या गावच्या बबूमावशी गिरीगोसावी यांच्या घरी आले होते आबा असेच एकदा.
Aaba in village
आबांनी राज्यातल्या गोरगरीब जनतेवर प्रेम केलच पण आपल्या गावच्या बहिणींना आयुष्यभर माहेरच प्रेम आणि माहेरचा आहेर दयायला कधीही विसरले नाहीत आबा. सत्तेच्या कवचकुंडलातून क्षणात बाहेर पडून आपल्या बहिणीशी हितगोष्टी करणारा आबा अंजनीच्या माहेरवासिनीनी पाहिला आहे.
आभाळाला गवसणी घालणारा भाऊ दारात आल्यावर त्यांना होणारा आनंद किती उच्च कोटीतला असेल हो? अनेक मोठी पद सांभाळणार्या आबांनी भाऊ हे पद किती हळवेपणाने सांभाळले होते हे अनेकांना माहित नाही.
-संपत मोरे (9422742925)






by - http://khaasre.com/unknown-story-about-the-r-r-patil/

स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी आर. आर. पाटील (आबा)



लोक प्रेमाने त्यांना आबा म्हनत, त्याचे पुर्ण नाव रावसाहेब रामराव पाटील यांचा जन्म १६ आॅगस्ट १९५७ अजनी,ता.तासगाव जि. सांगली महाराष्ट्र



घरची परिस्थीती बेताची होती त्यामुळे आबांनी त्याचे शिक्षण कमवा आणि शिका या योजनेखाली शांतिनिकेतन महाविद्यालय सांगली येथे पुर्ण केले.

शाळकरी वयात आबांना प्राचार्य पी बी पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.



शांतिनिकेतन महाविद्यालयातुन बि.ए. झाले पुढे त्यांनी एल.एल.बी. पुर्ण केले.

राजकीय पाश्र्वभुमि नसताना त्याची भाषण शैली, प्रश्न सोडवण्याची पध्दत व स्वच्छ प्रतिमा हे गुण वसंतदादा पाटलांनी हेरले व त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली.

१९७९ ते १९९० सावळज गणातुन जिल्हा परीषद सदस्य होते.

त्यानंतर तासगाव मतदारसंघातुन १९९०,१९९५,१९९९,२००४,२००५ व २०१४ सलग ६ पंचवार्षिक आमदार म्हनुन नेतृत्व केले.



१९९० व १९९५ साली काॅग्रेस पक्षाच्या तिकीटावर आबा निवडुन आले त्यानंतर शरद पवार साहेबा सोबत आबांनी काॅग्रेस सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला.

सुरवातीला तासगाव व नंतर कवठेमहांकाळ मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले.

आमदारकी सोबत त्यांनी मंत्रीपदाचा कार्यकाळही सांभाळला.

सुरवातीला ग्रामविकास मंत्रीपदाची जवाबदारी देण्यात आली या काळात गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियाण यशस्विपणे राबवुन त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा राज्यात निर्माण केला.

१ नोव्हेंबर २००४ ला महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारला. महाराष्ट्र राज्याचे सर्वाेत्कृष्ट गृहमंत्री म्हनुन आजही त्यांचे नाव घेण्यात येते.

गडचिरोली जिल्ह्याचा पालकमंत्री पदभार स्विकारल्या नंतर आज पर्यत सर्वाधिक नक्सली आत्मसमर्पण आबांच्या काळात झाले.



डान्सबार बंदिचा निर्णय घेऊन त्यांनी अनेक संसार उध्वस्त होण्यापासुन वाचविले. निर्णयाला भयंकर विरोध होऊनही आबा ठाम राहीले.

घरात सत्ता आलेकी नातेवाईकांना सुध्दा गुर्मि येते परंतु आबांचे कुटूंब अतिशय साधे पत्नि सुमन,मुलगा रोहीत,मुलगी स्मिता व आई भगिरथी हे आजही एकदम साधे आयुष्य जगतात.



आबांच्या मुलांनी जिल्हा परीषद शाळेत शिक्षण पुर्ण केले व आबाची आई ,पत्नि ते मंत्रि असताना सुध्दा शेतीत काम करायच्या..

आबा म्हणजे यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाचील,शरद पवार यांच्या विचारांनी भरलेला एक युवा पिढीचा प्रतिनिधीच होते.

त्याच्या कडुन महाराष्ट्राला अनेक अपेक्षा होत्या परंतु कैन्सर मुळे १६ फेब्रुवारी २०१५ ला आबांची प्राणज्योत मालवली.



अनेक जानकार सांगतात आबांना कर्करोगांची चाहुल लागली होती परंतु त्यांनी कामामुळे प्रकृतीकडे दुर्लक्ष केले…

आबाचा कधिही आबासाहेब नाही झाला यावरुन त्यांचा स्वभाव आपल्या ध्यानात येईल.

आबाला सलाम…..











by - http://khaasre.com/unknown-facts-r-r-patil/




बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चनविषयी काही अपरिचीत गोष्टी



अमिताभ बच्चन हे बॉलीवूड चे सर्वात लोकप्रिय अभिनेते आहेत. अमिताभ यांनी सत्तर च्या दशकात आपल्या अभिनयाद्वारे लोकप्रियता मिळवली, तेव्हापासून ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक प्रमुख व्यक्तीमत्व बनून आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत, ज्यामध्ये 3 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 12 फिल्मफेअर पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांच्या नावावर सर्वाधिक वेळा सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा फिल्मफेअर जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. अभिनया व्यतिरिक्त अमिताभ यांनी पार्श्वगायन, चित्रपक्त निर्मिती आणि कार्यक्रमात अंकरिंग च्या पण भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी अँकरिंग केलेला कौन बनेगा करोडपती हा शो सुपरहिट झाला. बच्चन यांचा विवाह जया भादुरी यांच्याशी झाला. अमिताभ यांचा जन्म उत्तर प्रदेशातील इलहाबद येथे झाला. अमिताभ यांचे वडील डॉ. हरिवंश राय बच्चन सुप्रसिद्ध हिंदी कवी होते. त्यांची आई तेजी बच्चन या कराचीच्या होत्या.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या बद्दल च्या या काही गोष्टी ज्या तुम्ही वाचल्याच पाहिजेत:-


१) या महानायकाला एअरफोर्स मध्ये जायचं होत. त्यांची उंची वगैरे बघता त्यांचा हा अगदी योग्य निर्णय होता पण काही कारणास्तव ते जाऊ नाही शकले.



२) मिस्टर इंडिया मूवी हि फक्त अमिताभ बच्चन याना डोळ्यासमोर ठेऊन लिहिली होती पण ती नंतर अनिल कपूर याना मिळाली .



३) अमिताभ बच्चन यांना एक दुर्मिळ आजार आहे ज्याचं नाव आहे ‘म्यॅस्थेशिया ग्रॅव्हिस’.



४) जगातील प्रसिद्ध मिस वर्ल्ड स्पर्धेचे ते १९९५ साली जज होते.

५) सुरुवातीच्या स्ट्रगल च्या काळात त्यांनी कित्तेक रात्री ह्या मॅरीन ड्राइव्ह च्या एक बेंच वर झोपून काढल्या आहेत .



६) Madame Tussauds Museum मध्ये मेणाचा पुतळा असणारे ते पहिले भारतिय आहेत.



७) अमिताभ यांच नाव त्यांच्या वडिलांनी इन्कलाब अस ठेवलं होतं पण त्यांच्या आईला आवडलं नाही म्हणून त्यांनी ते बदलून अमिताभ ठेवलं.



८) आज त्यांच्या ज्या आवाजामुळे ते आपल्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत त्याच आवाजामुळे त्यांना ऑल इंडिया रेडिओ ने रिजेक्ट केलं होतं.

९) आज पर्यंत बच्चन यांनी फक्त एका अभिनेत्रीच्या सौन्दर्याचे उघडपणे कौतुक केलं आहे त्या म्हणजे वाहिदा रहमान.



१०) अमिताभ याचं व्यक्तिमत्व तसं खूप वादग्रस्त राहीलं आहे. बऱ्याच विवादात त्याचं नाव ऐकायला मिळाले आहे













by - http://khaasre.com/amitabh-bachchan-biography/

महाराष्ट्राचे उगवते नेतृत्व पंकजा मुंडे यांच्याविषयी माहिती नसलेल्या खासरे गोष्टी…



पंकजा मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील परळी येथे झाला. त्यांचे शिक्षण बी.एस.सी. एमबीए(3 सेमिस्टर) झालेले आहे पंकजा मुंडे भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. संघर्ष आणि गोपीनाथ मुंडे असे समीकरण महाराष्ट्राला मागील अनेक वर्षांपासून ज्ञात आहे. त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत कन्या पंकजा मुंडे याही अतिशय संघर्ष करत यशाकडे वाटचाल करताना दिसत आहेत.




गोपीनाथराव आणि पत्नी प्रज्ञा यांच्या पंकजा या जेष्ठ कन्या. पंकजांचा जन्म 26 जुलै 1979 रोजी परळी वैजीनाथ येथे झाला. गोपीनाथराव आणि पत्नी प्रज्ञा यांना मुलगा झाल्यास त्याचे नाव पंकज आणि मुलगी झाल्यास पंकजा ठेवू असे मामा प्रमोद महाजन यांनी फार पूर्वीच ठरवले होते. हे नाव ठेवण्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे त्यावेळेस भाजपाला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्यानुसार गोपीनाथरावांना मुलगी झाली व तिचे नाव पंकजा ठेवण्यात आले.



पंकजा या जेष्ठ दिवंगत भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्या भाची आहेत. पंकजा यांचे मार्च 1999 मध्ये डॉ चारुदत्त उर्फ अमित पालवे यांच्याशी लग्न झाले. डॉ अमित यांचे कुटुंबीय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहे पण तर पुढे पुण्यात स्थायिक झालेले आहेत. पंकजा आणि अमित यांना एक मुलगा आहे. पंकजा यांच्या मुलाचे नाव आर्यमान असून तो 13 वर्षाचा आहे. पंकजा यांच्या परिवारामध्ये त्यांच्या 2 छोट्या बहिणी व आई आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंकजा यांचे चुलत भाऊ आहेत.

शिक्षण



पंकजा यांचे शिक्षण बी.एस.सी. एमबीए झालेले आहे. पण त्यांनी एमबीए च्या तिसऱ्या सेमिस्टर पर्यंतच आपले शिक्षण पूर्ण केले आहे. पंकजा यांचे प्राथमिक शिक्षण परळी येथेच झाले. सहाव्या वर्गापर्यंत पंकजा आपल्या मैत्रीणीबरोबर रिक्षाने शाळेत ये जा करत होत्या. पुढे त्यांनी हट्ट करून वडील गोपीनाथरावांना सायकल मागितली. सायकल मिळाल्यानंतर मग त्यानी सायकलवर शाळेत जाण्यास सुरुवात केली.



पुढे चालून त्यांना औरंगाबाद येथे उच्च शिक्षणासाठी पाठवण्यात आले. पण तिथे काही त्यांचे मन रमले नाही. औरंगाबाद ला आल्यानंतर पंकजा 2 महिने एका वसतिगृहात राहिल्या. 2 महिन्यातच पंकजा औरंगाबाद सोडून परळीला परतल्या व त्यांनी तिथेच पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला व आपले पुढील शिक्षण पूर्ण केले.

राजकिय कारकीर्द



पंकजा पालवेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरवात इ.स. 2009 साली झाली. पंकजा यांनी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून आपल्या राजकिय कारकिर्दीला सुरुवात केली. पंकजा 2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. पंकजा यांचा राजकारणातील प्रवास तसा खूप खडतर राहिला आहे. त्यांनी नेहमीच संघर्ष करत आपली वाटचाल केली आहे. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे दिवंगत नेते व त्यांचे वडील गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांच्या प्रचारासाठी पंकजा निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यावेळी त्यांनी जवळपास 300 गावांमध्ये सभा आणि 400 गावांना भेटी दिल्या होत्या.



दुष्काळी परिस्थितीत आघाडी सरकारने बीड चे दुष्काळी जिल्ह्यात समावेश केला नाही म्हणून खासदार गोपीनाथ मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. पेट्रोलचे दर लिटरमागे साडेसात रुपये वाढवल्याच्या निषेधार्थ परळी शहरात आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी बैलगाडीतून तहसील कार्यालयात मोर्चा नेला होता. पुढे पंकजा यांना परभणी महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची धुरा ही देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी नेहमी मराठवाड्याच्या विविध प्रश्नावर विधिमंडळात आवाज उठवला आहे. आज पंकजा भाजप सरकारमध्ये एक महत्वाच्या मंत्री आहेत. सोबतच त्या एक पॉवरफुल नेत्या म्हणून उदयाला आल्या आहेत. त्यांची ताकद वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना पक्षातूनच विरोध होतोय असे वक्तव्य त्यांचे मामा व भाजपशी संबंधित प्रकाश महाजन यांनी नुकताच केला आहे. पंकजा यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावाही केला होता.



पंकजा यांची राजकीय कार्यकिर्द बऱ्याच वादानीही चर्चेत राहिली. पंकजा यांनी शाळाकरिता खरेदी केलेली चिक्की आरोग्याला घातक असल्याचं सिद्ध झाले होते. त्यांनी चिक्कीचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या मार्जितल्या संस्थांना दिल्याचा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला होता. दुष्काळग्रस्त लातूर शहरात रेल्वेदारे पाणी पोहचल्यावर लगेच पंकजा यांनी तिथे चाललेल्या कालव्याच्या कामाजवळ जाऊन सेल्फी काढला होता. यावर जनतेतून तीव्र रोष जाहीर झाला होता. पंकजानी जलयुक्त शिवार या महाराष्ट्र सरकारच्या योजनेच्या यशाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून जलसंवर्धन व रोजगार हमी योजना या खात्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यांच्याकडे त्यांनतर महिला आणि बालकल्याण या एकाच खात्याचा भार ठेवण्यात आला.



सामाजिक कार्य



पंकजा या राजकीय कामाव्यतिरिक्त सामाजिक कार्यामध्ये ही अग्रेसर असतात. त्यांनी वैद्यनाथ सर्वांगीण विकास संस्थेमार्फत विविध शाळा महाविद्यालये औद्योगिक शिक्षण संस्था अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले आहेत. महिलांच्या आर्थिक उन्नतीकरिता बचत गट स्थापन करून त्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगार व अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले आहे. भटक्या विमुक्त व इतर मागास समाजातील तसेच आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना सतत साहाय्य त्या करत असतात. बीड जिल्ह्यामध्ये उसतोड कामगारांचे प्रमाण खूप जास्त आहे. उसतोड कामगारांच्या उन्नतीसाठीही त्या नेहेमीच प्रयत्नशील असतात.



स्त्रीभ्रूण हत्याला आळा घालवण्यासाठी व मुलींचा जन्मदर वाढवा यासाठी त्या समाजात नेहमी प्रबोधन करत असतात. स्त्रीभ्रूण हत्येस पायबंद बसवण्यासाठी आमदार पंकजा मुंडे यांनी लेक वाचवा राष्ट्र वाचवा या योजनेला सुरुवात केली आहे. मराठवाड्यातील स्त्री जन्माचे गुणोत्तर प्रमाण कमी झाले आहे, त्यासाठी आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी मराठवाड्यात माझी कन्या भाग्यश्री ही योजना वैद्यनाथ सर्वांगीण विकास संस्थेच्या माध्यमातून सुरू केली आहे. त्यासोबतच त्यांनी मराठवाड्यातील मंदीरांमध्ये स्त्रीभ्रूण हत्येविरोधात जागर मोहीम ही राबवली आहे.



भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारस म्हणून त्यांची जेष्ठ कन्या तथा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव घेतले जाते. त्यांनी ते सार्थही केले आहे. राजकारणात हार-जित होतंच असते. पण आज पंकजा मुंडे राज्यातील बहुजन नेत्यातील सर्वात पावरफुल नेत्या म्हणून उदयाला आल्या आहेत. त्यांना मानणारा वर्ग सर्व भागात असून ओबीसी व दलित समाजाला त्या आपल्या नेत्या वाटतात.














by -http://khaasre.com/minister-pankaja-munde-biography/

तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?



१.बच्चू कडू यांचा जन्म बेलोरा,ता.चांदूर बाजार जिल्हा-अमरावती येथे ५ जुलै १९७० रोजी शेतकरी कुटूंबात झाला.


२.इयत्ता नववीत असताना गावात याञेत होणारा तमाशा बंद पाडून त्यांनी गावातील तरूम पिढी बरबाद होण्यापासून वाचवली.



३.मिञाला रक्तदान करताना वजन कमी पडत असल्यामुळे खिशात दगड ठेऊन त्यांनी रक्तदान करून मिञाचा जिव वाचवला.

४.रक्तदानाचे शतक पूर्ण करणारा एकमेव आमदार बच्चू कडू आहे.



५.त्याच्या प्रहार संघटने मार्फत आजपर्यत लाखाच्या वर रक्त पिशव्या दान करण्यात आल्या आहे.

६.बाळासाहेबांच्या भाषणांचा त्यांच्यावर प्रभाव होता,ते शिवसेनेकडून चांदूर बाजार समितीचे सभापती होते.

७.सभापती असताना त्यांनी संडास घोटाळा उघडकीस आणला, अपंगाना सायकल वाटपाचा निधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यासोबत वाद झाल्याने त्यांनी शिवसेना सोडली.



८.त्यांनी 1999 साली पहीली आमदारकीची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, त्यात त्यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव झाला.

९.बच्चू कडूच्या पहिल्या निवडनुकीत प्रचारा करिता पैसा नसल्याने त्याच्या बर्याच मित्रांनी घरातील दागिने मोडली , पत्नीचे मंगळसूत्र सुध्दा गहाण ठेवले. आजही बच्चू कडू त्या मित्राचा अभिमानाने उल्लेख करतात.



१०.लोकांना न्याय हक्क मिळून देण्या करिता स्वतःला जमिनीत गाडून घेणारा हा पहिलाच आमदार असेल.

११.बच्चू कडू यांनी लग्न महत्मा गांधी जयंतीला राष्ट्रगीताच्या चालीवर केले व लग्नाचा खर्च टाळून अपंगांना साहित्य वाटप करण्यात आले.



१२.शासकीय अधिकारी काम करत नसल्याचे पाहून त्यांनी या अधिकार्यांच्या कॅबिनमध्ये साप सोडणे,कार्यालयात सुतळी बाॅम्ब फोडणे अशी आंदोलने केली, त्यांचे विरूगिरी हे आंदोलन खुप गाजले.

१३.2004 साली त्यांनी परत अपक्ष म्हणून आमदारकी लढवली आणि ते निवडून आले, आज सलग तीन वेळा ते अपक्ष आमदार आहेत.

१४.बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत 18 लाख रूग्णांना मोफत रूग्णसेवा दिली आहे.



१५.तीन वेळा आमदार असणाऱ्या बच्चू कडू यांचे आजही स्वःताचे घर नाही,भाड्याच्या घरात ते राहतात. त्यांची पत्नी शिक्षिका आहे.

१६.बच्चू कडू हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत ज्यांनी आमदारांच्या पगारवाढीला विरोध केला.



१७.बच्चू कडू हे सर्पमिञ आहेत, त्यांना खेळाची आवड आहे, घोडेस्वारी त्यांना आवडते.



१८.सामान्य माणसांप्रमाणे लोकात राहण्याची त्यांची शैली प्रभावशाली आहे.

१९.लोकमतने त्यांना यंदाचा ‘महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित केले. हा पुरस्कार मिळविणारे बच्च्चू कडू पहिले अपक्ष आमदार आहे.



२०.अपंगांकरिता २५,००० लोकांचा दिल्ली येथे मोर्चा नेणारे बच्चू कडू पहिले अपक्ष आमदार व त्याची फलश्रुती एका दिवसात ११ शासन निर्णय केंद्राने पारित केले.



२१.बच्चू कडूचे आंदोलन विशेष असतात व निर्णय लागो पर्यंत ते आंदोलन सुरु ठेवतात. त्याचे उपोषण २१ दिवसापर्यत चाललेले आहे.













by - http://khaasre.com/bacchu-kadu-things-you-dontt-know/

सलग ११ वेळा विधानसभेत निवडून येऊन गिनीज बुक मध्ये नोंद असलेले महाराष्ट्रातील एकमेव राजकारणी



भारत हा लोकशाही देश आहे. इथे जनता राजा आहे आणि या लोकशाहीस आदर्श असणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे गणपतराव देशमुख हे आहे.पांढरा शर्ट, हातात बॅग जुन्या काळातील गुरुजीशी साधर्म्य असलेले गणपतराव देशमुख आहे. विधानसभेतील सर्वात जेष्ठ आमदार म्हणजे गणपतराव देशमुख. वयाच्या ९१ व्या वर्षी तोच कामाचा जोश तरुणांना देखील लाजवेल. एकच झेंडा एक पक्ष आणि एक मतदारसंघ सतत चार पिढ्याचे नेतृत्व करीत विधानसभेमध्ये ११ वेळेस जाणारे गणपतराव देशमुख यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले आमदार गणपतराव देशमुख सर्वाना माहिती आहे आज त्यांच्या विषयी काही खासरे गोष्टी बघूया…




गणपतराव देशमुख यांचा जन्म स्वतंत्रपूर्व काळातील १० ऑगस्ट १९२६ साली सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे झाला. गणपतरावांचा स्वभावच चळवळीतला त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाकडे ते वळले आणि आजही त्यांच्या सोबत आहे. पहिल्या वेळेस १९६२ साली वयाच्या ३४व्या वर्षी ते आमदार म्हणून निवडून आले. आणि तेव्हापासून सतत ११ वेळेस गणपतराव देशमुख सांगोल्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. या वर्षी त्यांनी ५५ वर्षापेक्षा अधिक विधानसभेत कारकीर्द गाजवली या करिता त्यांचा सन्मान करण्यात आला. या अगोदर सलग १० निवडणुका निवडून येणारे तामिळनाडूचे एम. करुणानिधी यांची बरोबरी त्यांनी २००९ साली केली होती आणि २०१४ मध्ये त्यांनी ११ वी निवडणूक जिंकून हा विक्रम मोडला.



गणपतराव तसे मुल मोहोळचे पेणूर तालुक्यातील हे गाव परंतु वकिली व्यवसायामुळे ते सांगोल्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यावेळेस जोरात होती. त्यांनी यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. त्याकाळात संपूर्ण सांगोला तालुक्यात कॉंग्रेसचे वर्चस्व होते कोणीही उभे राहायला तयार नव्हते. परंतु वयाच्या ३४व्या वर्षी गणपतराव देशमुख यांनी १९६२ साली बाहेरच्या तालुक्यातील असून विजय मिळवला व विधानसभेत प्रवेश केला.

गणपतराव हे विधीमंडळाचा चालता फिरता इतिहास आहे. १९७८ मध्ये पुलोद व १९९९ मध्ये आघाडी सरकारमध्ये काही वर्ष मंत्रीपद वगळता ते नेहमी विरोधी बाकावर बसत आलेले आहे. त्यांना पराभव फक्त १९७२ व १९९५ मध्ये पत्करावा लागला. परंतु या काळात खचून न जाता त्यांनी जनसंपर्क वाढविला आणि आपले स्थान अधिक मजबूत केले.



विशेष म्हणजे आजपर्यंत त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही आहे. एवढेच काय तर ते ज्या सूतगिरणीचे संचालक आहे त्याकरिता स्वतः घरून डब्बा घेऊन जातात. जेव्हा संपूर्ण सहकार पडत्या काळात होते तेव्हा सांगोल्या सारख्या दुष्काळी पट्ट्यात त्यांनी आदर्श सूतगिरणीचे उदाहरण सर्वापुढे ठेवले. आशिया खंडातील नंबर एकची सूतगिरणी म्हणून सांगोल्याच्या सूतगिरणीची ओळख आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस सर्वाचे (जोशी व राणे वगळता) कामकाज पाहणारे एकमेव आमदार म्हणजे गणपतराव देशमुख हे आहे. या वर्षी झालेले नागपूरचे हिवाळी अधिवेशन त्यांच्या करिता ५३वे हिवाळी अधिवेशन होते.



गणपतराव देशमुख इतके साधे जीवन जगतात की अनेकांना त्यांच्याबाबत माहितीच नसते. असाच एक अनुभव त्यांना आला होता. साताऱ्याहून पुण्याला येण्यासाठी एसटी बसमध्ये बसले. कंडक्टरने तिकिट मागितल्यावर आमदार आहे म्हणून सांगितले. कंडक्टरला विश्वास बसेना. कारण त्याच्या कारकीर्दीत आमदाराला एसटीत बसलेले त्याने पाहिले नव्हते. त्याने आगार व्यवस्थापकांना बोलावून आणले मग पुढचा प्रसंग टळला.

आ. गणपतराव देशमुख साहेबांची खुर्ची जिने तब्बल 50 पेक्षा जास्त वर्षे त्यांची साथ दिली आहे. घरात साध्या पत्र्याच्या तीन कॉट तीन गाद्या आणि एक किचनचे घर हेच त्यांचे निवास आणि कार्यालय आहे. अत्यंत साधी राहणी मुलांना आणि नातवंडांना माझे नाव न सांगता स्वतःच्या कष्टावर नाव कमावण्याचा सल्ला आणि दंडक घालून देणारे हेच ते भारतातील एकमेव आमदार म्हणजे गणपतराव देशमुख आहे.



थोर राजकारणी, राज्याचा चौफेर अभ्यास असणारे चालते बोलते विद्यापीठ, लोकशाहीच्या इतिहासाने दखल घेतलेले लोकप्रतिनिधी, पुरोगामित्वाचा आवाज बुलंद करणारे, सभागृहातील पेचप्रसंगाची कोंडी फोडणारे, आयुष्याला चळवळ समजून जगणारे, नव्वदीतही तरुणाला लाजविणारे अभ्यासपूर्ण नेतृत्व करत सभागृहाला स्तब्ध करणारे एकमेव आमदार गणपतराव देशमुख वयाच्या 91 व्या वर्षीही फिट अॅंड फाईन आहेत. निष्ठा, चारित्र्य, सचोटी या बाबी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच परंतु मतदारांवरही त्याचे संस्कार केले. म्हणूनच मतदारसंघातील तिसरी पिढी त्यांना मतदान करते आहे.






by - http://khaasre.com/ganpatrao-deshmukh-biography/

अंबेजोगाई ते दिल्ली प्रमोदजी महाजन यांचा प्रेरणादायी प्रवास…



अंबेजोगाई ते दिल्ली हा प्रवास इतका सोपा नाहीये आणि नव्हता, पण स्वकर्तुत्वाने ह्या माणसाने देशांच्या राजकारणात भावी पंतप्रधान म्हणून नाव कमावले होते. हे नाव होते प्रमोद महाजन आज त्यांची जयंती तर आज खासरे वर बघूया प्रमोद महाजन विषयी काही खासरे माहिती…

डावा हात वर करून भाषण करायची त्यांची लकब वेगळीच होती. नुसती विरोधकांवर टीका करणारी भाषणे न करता, विरोधकांच्या मर्मावर घाला घालणारी आणि लोकांना सोप्या भाषेत स्वतःचे म्हणणे पटवून देणारी भाषणे देणारा नेता म्हणजे प्रमोद महाजन हे आहे. महाराष्ट्रातील सेना भाजप युतीचे ते शिल्पकार होते. भाजपचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते तर प्रमोद्जीना भावी पंतप्रधान ह्या स्वरुपात पाहत असत.



प्रमोद हे व्यंकटेश देवीदास महाजन आणि प्रभादेवी यांचे द्वितीय चिरंजीव होते. त्यांचा जन्म मेहबूबनगर (आंध्र प्रदेश) येथे झाला. महाजन कुटुंब त्यांच्या महाजन गल्ली उस्मानाबाद येथून अंबाजोगाईला मंगळवार पेठेत भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले. त्यांचे बालपण अंबाजोगाईत गेले. २१ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे शिक्षण योगेश्वरी विद्यालय आणि महाविद्यालय आणि रानडे पत्रकारिता या संस्थांत झाले. त्यांनी भौतिकशास्त्र आणि पत्रकारितेमध्ये पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. नाटकांच्या सामायिक आवडीमुळे परिचय झालेल्या रेखा हमीने यांच्याशी ११ मार्च, इ.स. १९७२ रोजी त्यांचे लग्न झाले.




खोलेश्वर महाविद्यालयात इंग्लिशच्या अध्यापनाचे काम इ.स. १९७१ पासून १९७४ पर्यंत केले. आणीबाणीच्या काळात प्रमोद महाजन सक्रिय राजकारणात उतरले. प्रमोद महाजन यांनी इ.स. १९९६ मधील १३ दिवसांच्या वाजपेयी शासनामध्ये संरक्षणमंत्रिपद सांभाळले. १९९८ साली परत सत्ता आल्यावर ते प्रधानमंत्र्याचे सल्लागार तसेच केंद्रीय मंत्री होते.



प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे-महाजन या जोडगोळीने केले. २१मे १९७८ रोजी गोपीनाथ मुंडे यांनी प्रमोदजी यांची बहीण प्रज्ञा महाजन सोबत लग्न केले आणि मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले.



लाल कृष्ण अडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा या रथयात्रेचे सारथी तेच होते त्यांची हि कल्पना होती. तसेच मुरली मनोहर जोशी यांची एकता यात्रा त्याचे प्रमुख प्रमोद महाजन होते. अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रमोद महाजन विषयी सांगितले होते कि, “जरी प्रमोद महाजन बीजेपीमध्ये नसते तरीहि ते, भारतातील असंख्य सामान्य युवकांना प्रेरणास्थान राहिले असते.”
प्रमोद महाजन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन













by - http://khaasre.com/pramod-mahajan-short-bio/

गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

लि-चिंग युएन....... २५६ वर्ष जगले



लि-चिंग युएन....२५६ वर्ष


एखाद्या माणसाचं वयोमान जास्तीत जास्त किती असू शकतं तुम्हाला कल्पना आहे का? कुणी म्हणेल ७५ ते ८५ कुणी म्हणेल १०० वर्षे.. पण आज आम्ही तुम्हाला या बातमीतून सांगतोय २५६ वर्षे जगलेल्या माणसाची गोष्ट. वाचून आश्चर्य वाटेल पण चीनच्या ली-चिंग यूएन या माणसाचा मृत्यू वयाच्या २५६ व्या वर्षी झाला. ही गोष्ट कोणतीही परिकथा नाही तर वास्तव आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’नं या ली चिंग यूएन यांच्या १५० व्या वाढदिवसासंबंधीचा एक लेख १९३० मध्ये प्रकाशित केला होता. चेंगाडू विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक वू- चुंग- चियाह यांनी ली-चिंग यूएन यांना १५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा १८२७ मध्ये दिल्या होत्या आणि ते १५० वर्षे कसे जगले यासंदर्भातला लेख लिहीला होता, जो १९३० मध्ये पुन्हा छापण्यात आला होता.




आपल्या १० वर्षे ते ४० वर्षांच्या वयात ली चिंग यांनी कान्सू, शन्सी, तिबेट, अनाम, सिआम आणि मंचुरिया इथल्या पर्वतरांगा पालथ्या घातल्या होत्या आणि तिथल्या वनऔषधींची त्यांना खडान् खडा माहिती होती. ली चिंग यांना मार्शल आर्टचीही माहिती होती. त्यांनी जवळपास २५ पिढ्या आपल्या डोळ्यासमोर मोठ्या होताना पाहिल्या आहेत. ली चिंग यूएन यांच्याबाबत हा लेख ‘स्टीव्हन बॅनक्राझ’ यांनी लिहीला आहे आणि ‘स्पिरिट अँड मेटा फिजिक्स’ या संस्थेनं हा लेख प्रकाशित केला आहे.




मन शांत ठेवा, कबुतराप्रमाणे चाला, कासवासारखं बसा आणि कुत्र्यासारखं झोपा तुमचं आयुष्य वाढेल असं ली चिंग मृत्यू शय्येवर असताना म्हटले होते. आहाराची काटेकोर पथ्य पाळणं हेदेखील माझ्या दीर्घ आयुष्याचं रहस्य आहे असंही ली यांनी म्हटलं आहे. मी या जगात जन्माला आलो आणि मला हवं ते सगळं केलं असंही ली यांनी आपल्या शेवटच्या क्षणी म्हटलं होतं.





ली चिंग यूएन यांची संपूर्ण माहिती विकिपीडियावरही उपलब्ध आहे. १९०८ मध्ये या दीर्घायुषी माणसावर एक पुस्तकही लिहीलं गेलं. मार्शल आर्ट ही कला त्यांनी ज्या ज्या शिष्यांना शिकवली ते कायम निरोगी राहिले. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी एकदाही अॅलोपथी औषध घेतलं नाही, दारू, तंबाखू किंवा इतर व्यसनांना स्पर्शही केला नाही. तसंच आहारावर कायम नियंत्रणही ठेवलं असंही ली चिंग यूएन यांनी म्हटलं आहे. एखाद्या माणसाचं वयोमान हा चर्चेचा विषय नसतो. मात्र ली चिंग यूएन यांचं २५६ वर्षांचं वय हेच आता चर्चेचा विषय ठरलं आहे.







By - इंटरनेट 

बुधवार, २० डिसेंबर, २०१७

आजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”

पुण्यातील शनिवार वाडा खूप प्रसिद्ध आहे परंतू काय आपल्याला माहीत आहे की बाजीरावांच्या या महालात एका राजकुमारची आत्मा भटकतं असते. जवळपासच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याची आणि रडण्याची आवाज ऐकू येते. शनिवारवाडा आपल्या या भुताटकी प्रकरणामुळे ही प्रसिद्ध आहे.
या महालाचा पाया 1730 साली शनिवारी ठेवण्यात आला असून त्या काळात 16, 110 रुपये लागत आली होती. या महालात एक हजाराहून अधिक लोक राहू शकत होते. 22 जानेवारी 1732 साली गृह प्रवेश करण्यात आले होते. नंतर यात एक काळे पान जुळले.


या महालात 30 ऑगस्ट 1773 ला रात्री 16 वर्षाचे नारायण राव, जे मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवा बनले होते, त्यांची कट रचून हत्या केली गेली. जेव्हा खाटीक किल्ल्यात शिरले तेव्हा नारायण रावांनी धोक्याची चाहूल लागली आणि ते आपल्या खोलीतून पळाले. नारायण राव पूर्ण महालात “काका मला वाचवा”..... “काका मला वाचवा” असे ओरडत होते. परंतू त्यांना वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. नारायण रावांच्या काकांनी त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचले होते असे लोकं म्हणायचे.


नारायण राव यांची आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असते आणि त्यांचे शेवटले शब्द काका मला वाचवा हेही लोकांना ऐकू येतात. अंधारात हे महाल अजूनच भीतिदायक वाटतं. महालाच्या भीतींवर रामायण आणि महाभारत काळातील दृश्य बनलेले आहेत.


या महालाच्या पहिल्या मजलावर 17-18 शताब्दीच्या दरम्यानच्या काही वस्तू आणि मुरत्या ठेवलेल्या आहेत. या महालाचा एक मोठा भाग 1824 मध्ये जळाला होता.


शनिवार वाड्यात पाच दारं आहेत. जे दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा नावाने ओळखले जातात.













by - http://marathi.webdunia.com/article/maharashtra-darshan/shaniwar-wada-pune-117041000022_1.html

बुधवार, ६ डिसेंबर, २०१७

ध्वजदिन 7.12.17




‘हिमालयाच्या शिखरावरूनी सांगू जगाला सा-या गर्जुनी। खबरदार जर इथे याल, तर सांडतील रक्ताचे सागर’, अशी गर्जना करीत तळहातावर शिर घेऊन झुंजणा-या सैनिकांना आदरांजली वाहण्याचा आजचा दिवस. घरादाराला आणि आप्तस्वकीयांना दूर सारून देशासाठी, स्वबांधवांच्या रक्षणासाठी कोसळत्या पावसात आणि गोठविणा-या थंडीत लढणा-या सा-या लढवय्यांचाच आज स्मरणदिन. किती जणांची नावे सांगावीत? म्हणूनच आज या सा-यांनाच मानवंदना देण्याचा दिवस..ध्वजदिन ! ‘नव्या मनूतील नव्या दमाचा मी शूर शिपाई आहे, कोण मला वठणीला आणू शकतो ते मी पाहे’, असे म्हणणा-या अनेक सैनिकांनी स्वदेशरक्षणार्थ आपल्या प्राणांची आहुती दिली. आजच्या ध्वजदिनाच्या निमित्ताने त्या सर्व वीरांचा स्मृतिदिन. राष्ट्राच्या स्वातंत्र्य रक्षणार्थ रणांगणात देह ठेवणा-या वीरांच्या स्मृती जागत्या ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सढळ हाताने मदत करणे, हे त्यांचे.. आपले, सर्वाचे कर्तव्यच आहे. आज जमा होणारा निधी म्हणजे त्या नरवीरांना आदरांजली वाहण्याचीच एक संधी आहे. म्हणूनच आज एका व्यक्तीचा नाही, तर देशरक्षणार्थ आपल्या प्राणांची कुरवंडी करणा-या सा-या वीरपुत्रांचाच स्मृतिदिन. त्या वीरमरण पत्करलेल्या वीरांचे स्मरण करून आजही आपले सैनिक म्हणताहेत, ‘शिंग फुंकिले रणी, वाजतात चौघडे। सज्ज व्हा उठा चला, सैन्य चालले पुढे।।’











by-  Dainik Prahar dt.07.12.17

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

..म्हणून निर्माते म्हणायचे विद्या बालनचा पायगुण चांगला नाही !


'हम पांच' या टीव्ही मालिकेतून पुढे आलेली विद्या बालन आज यशाच्या शिखरावर आहे.

...म्हणून निर्माते म्हणायचे विद्या बालनचा पायगुण चांगला नाही !




मुंबई : 'हम पांच' या टीव्ही मालिकेतून पुढे आलेली विद्या बालन आज यशाच्या शिखरावर आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडच्या टॉप १० मध्ये आपले नाव समाविष्ट केले आहे. विद्याचे चित्रपट आणि तिचा अभिनय काहीसा वेगळ्या ढंगाचा असून तिचा खास असा वेगळा प्रेक्षकवर्ग आहे. मात्र एककाळ असा होता ज्यावेळी निर्माते तिला चित्रपटात घेण्यास नकार देत असतं. तिचा पायगुण वाईट असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे होते. 

विद्याने सुरुवातीला अनेक बंगाली चित्रपटात काम केले पण ते काही कारणास्तव प्रदर्शित झाले नाहीत. त्यानंतर विद्या ज्या चित्रपटात काम करेल त्याचे नुकसान होत असे. त्यामुळे विद्या असेल तिथे नुकसान, असा गैरसमज निर्माण झाला. काम मिळवण्यासाठी मला फार संघर्ष करावा लागला, असे तिने एका मुलाखतीत सांगितले होते. त्याचबरोबर तिने अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या. पण तिला सगळीकडून नकारघंटाच ऐकू आली. परंतु, स्वभावाने जिद्दी असलेल्या विद्याने हार न मॅनटा आपले प्रयत्न सातत्याने चालूच ठेवले. 

परिणिता चित्रपटासाठी अनेक वेळा तिला स्क्रिन टेस्ट द्यावी लागली, असे विद्या सांगते. मात्र एकदा निर्मात्याने चक्क तिची जन्मपत्रिका मागितली तेव्हा तर हद्दच झाली. त्यानंतर विद्याला देखील आपला पायगुण चांगला नसल्याचे वाटू लागले. परंतु, वेळेसोबत नशीबही बदलले. 
मिळालेल्या संधीचे सोने करत तिने अनेकांची मने जिंकली. 

परिणिता, कहानी, कहानी 2 आणि द डर्टी पिक्चरसारख्या चित्रपटांनी विद्याचे आयुष्यच बदलून टाकले. तसेच विद्याला एक नवी ओळख मिळवून दिली. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेला 'बेगम जान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल करू शकला नाही. मात्र त्यातील विद्याच्या अभिनयाचे कौतुक करण्यात आले. सध्या विद्या आपला आगामी चित्रपट ‘तुम्हारी सुलू'मध्ये व्यस्त आहे. नुकतेच ‘तुम्हारी सुलू'चे दुसरे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.


























Zee News 

माझ्याबद्दल