शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

‘रद्दी वीक’



आईसक्रीम तसे वर्षभर विकले जात असले तरी उन्हाळ्याच्या मोसमात त्याची मागणी वाढलेली असल्यामुळे विक्री भरपूर होते. रद्दीवाल्यांसाठीही हा हंगाम सुगीचा असतो. या काळात बाजारात असलेल्या रद्दीवाल्यांच्या संख्येत थोडीशी वाढ होते. मागणीमध्ये वाढ झाल्यामुळे किंमतही वाढते. गेल्या महिन्यात ७ रुपये किलो भावाने विकली जाणारी रद्दी आता सुमारे ८ रुपये किलो भावाने विकली जात आहे. लवकरच पुढील शैक्षणिक वर्षांला सुरुवात होणार आहे आणि त्या वेळी वह्णाा, पुस्तके यांची नव्याने गरज भासणार आहे. त्यामुळे सध्या रद्दीचा व्यवसाय तेजीत सुरू आहे. वर्षभराचा हिशेब पाहिला तरी दिवसाकाठी एकटय़ा मुंबईतूनच सुमारे ३०० टन रद्दी विकली जाते.
या उलाढालीविषयी माहिती देताना मशीद बंदरमध्ये कागदाचा व्यवसाय करणाऱ्या रमतालाल शहा यांनी सांगितले. रद्दी विकत घेणाऱ्यांची एक साखळी आहे. घरांतून फेरीवाला रद्दी घेतो, तिथून ती रद्दी छोटय़ा दुकानदाराकडे पोहोचते, छोटा दुकानदार सब-डीलकरकडे आणि सब-डीलरकडून घाऊकविक्रेता रद्दी विकत घेतो. हा गोळा झालेला कागद विविध व्यवसायांना पुरविला जातो. पिशव्या तयार करणे, फळांसाठी पॅकिंग आणि रिसायकलिंगसाठी या रद्दीचा वापर करण्यात येतो. स्थानिक रद्दीवाला ८ रुपये प्रतिकिलो या दराने रद्दी विकत घेत असेल तर पेपरमिलकडे रद्दी पोहोचेपर्यंत रद्दीचा भाव सुमारे ८.५० रुपये प्रतिकिलो एवढा झालेला असतो. या साखळीतील प्रत्येक रद्दीवाला किलोमागे केवळ १० पैशाच्या ‘मार्जिन’ने हा व्यवसाय करतो. 
ते पुढे म्हणाले की, पूर्वी केवळ मशीद बंदर येथे ही बाजारपेठ होती. मुंबईतील रद्दी येथे येत असे आणि इथून पुढे ती कागदाच्या गिरण्यांमध्ये पोहोचविली जात असे. रमतालाल सुट्टीच्या दिवशी एका आठवडय़ात भायखळा ते दादर आणि दुसऱ्या आठवडय़ात दादर ते चिंचपोकळी असा भाग पिंजून काढायचे. प्रत्येक रद्दीवाल्याकडे किती रद्दी येते हे पाहून घाऊक रद्दीवाल्यांशी संपर्क साधायचे. आता मात्र अंधेरी, दादर, घाटकोपर, मुलुंड अशा सर्व ठिकाणी घाऊक रद्दी घेणारे आणि विकणारे आहेत. कागदाच्या गिरण्यांना दररोज अमूक एक किलो रद्दी पुरविण्याचे कंत्राट घाऊक रद्दीवाल्यांनी केलेले असते. त्यामुळे या व्यवसायात रद्दी विकली जाईल की नाही, हा प्रश्न सहसा उद्भवत नाही. कारण या साखळीतील एका घटकाकडील रद्दी विकत घेण्यास दुसरा घटक सदैव तयार असतो. कागदाची मागणी न संपणारी आहे. २००७-०८ या आर्थिक वर्षांत या धंद्यात थोडीशी मंदी आली होती. त्यावेळी डॉलरचा भाव उतरला होता. त्यामुळे परदेशातील कागदाचा दरही कमी झाला होता. त्या कागदाचा दर्जा भारतातील कागदापेक्षा चांगला असल्यामुळे कागद गिरण्यांनी कागद आयात करणे पसंत केले होते. त्यावेळी कित्येक जण रद्दीच्या व्यवसायातून बाहेर पडल्याचे शहा यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले. 
लाकडापासून कागद तयार होतो. त्यानंतर चार वेळा त्याचे ‘रिसायकलिंग’ करण्यात येते. पार चोथा झालेल्या कागदाचा वापर शेवटी खत तयार करण्यासाठी होतो. 
शहा यांची तिसरी पिढी या व्यवसायात आहे. ‘रद्दीवाले’ हा शब्द काहीसा ‘डाऊन मार्केट’ वाटत असला तरी एकेकाळी या व्यवसायाला किराणा मालाच्या व्यवसायापेक्षा वरचे स्थान होते. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या जोरावर रद्दी विकणारा स्वत:चे वाहन खरेदी करू शकत असे. रमतालाल यांची चौथी पिढी मात्र या व्यवसायाबाबत फारशी उत्सुक नाही. रमतालाल म्हणतात की, या व्यवसायासाठी ठिकठिकाणी फिरावे लागते. दुसरीकडे, एका जागी बसून शेअर बाजारातील उलाढाल करता येते आणि दिवसाला किमान पाचशे रुपये सहज कमावता येतात. त्यामुळे त्यांची मुले रद्दीपेक्षा शेअर बाजाराकडे जास्त आकृष्ट झाली आहेत.
प्लास्टिकचाही या धंद्यावर थोडा परिणाम झाला आहे. पिशव्या तयार करण्यासाठी किंवा पॅकिंगसाठी प्लास्टिकचा वापर व्हायला लागल्यापासून रद्दीची मागणी थोडीशी कमी झाली आहे, असे ते कबूल करतात. पण या धंद्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी अजूनही प्लास्टिकच्या व्यवसायात जायचे ठरविलेले नाही. त्यांच्या मते रद्दीच्या धंद्याला मरण नाही. कागदाची मागणी सतत राहणार आहे. त्यामुळे रद्दी विकत कोण घेणार, हा प्रश्न उद्भवणार नाही. रद्दीमध्येही ‘चोरी’ करणारे काही व्यापारी असतात. कागदाबरोबर पुठ्ठा देऊन वजन वाढविणारे किंवा इतर सामान देऊन भेसळ करणारे काही व्यापारी असतात. त्यांचा अपवाद वगळला तर रद्दी हा पांढरपेशा आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवून देणार व्यवसाय आहे, असे रमतालाल यांचे मत आहे.















सुनील डिंगणकर - 
by - Losatta 

रद्दीचा व्यवसाय ...

raddi

कदाचित लोकांचा विश्‍वास बसणार नाही, परंतु रद्दीचा व्यवसाय हा लाखो रुपयांच्या उलाढालीचा विषय आहे. याही व्यवसायात तरुणांना संधी आहे. चिंधी विकणे हा एक व्यवसाय असेल असेही कोणाला वाटणार नाही, परंतु तो फार मोठा व्यवसाय आहे. मोठ मोठ्या मुद्रणालयांमध्ये छपाई मशीन पुसण्यासाठी कॉटनची चिंधी लागते. काही काही मुद्रणालयात तर दररोज १० ते १५ किलो चिंधीची गरज असते जी म्हणावी त्या प्रमाणात उपलब्ध सुद्धा होत नाही. कोणी व्यवसायात शिरलेच तर त्याच्या चिंध्यांना उत्तम मागणी येऊ शकते.
व्यवसाय खूप आहेत पण आपण एक खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे की, आपण ज्या उद्योगांना बिनभांडवली उद्योग म्हणत आहोत त्याचे उद्योगाच्या क्षेत्रातील नाव सर्व्हिस इंडस्ट्री असे आहे. ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेत खूप प्रगती झालेली असते त्या देशात वरचेवर सर्व्हिस इंडस्ट्री वाढायला लागते. अमेरिकेसारख्या देशात लोकसंख्येच्या फक्त पाच टक्के लोक शेती करतात. भारतात मात्र लोकसंख्येच्या ६० टक्के लोक शेती करतात. अमेरिकेत २० टक्के लोक हे उद्योगात आणि कारखान्यात गुंतलेले असतात. बरेच लोक वृद्ध असतात आणि लोकसंख्येच्या ५५ टक्के लोक सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काम करत असतात. शेतीत गुंतलेले पाच टक्के लोक आणि कारखानदारीत काम करणारे २० टक्के लोक यांच्याकडे भरपूर पैसा असल्यामुळे ते निरनिराळ्या प्रकारची कामे सर्व्हिस इंडस्ट्रीच्या लोकांकडून करून घेत असतात. म्हणजे ज्या देशात उद्योगात मोठी उलाढाल होते आणि वेतन चांगले असते तिथे असे बिनभांडवली सेवा उद्योग चांगले चालत असतात.
या ठिकाणी उद्योगाचे तीन प्रकार लक्षात घेतले पाहिजे. पहिला प्रकार असतो कारखानदारीचा. म्हणजे काही तरी उत्पादन करण्याचा. अशा उद्योगाला भांडवल भरपूर लागते आणि फार मोठे उद्योगपतीच कारखानदारीमध्ये गुंतवणूक करत असतात. उत्पादित मालाच्या विक्रीची देशव्यापी व्यवस्था उभी करण्याची ताकद त्यांच्यात असते. नव्याने उद्योगात शिरणार्‍या लोकांनी कारखानदारीच्या वाट्याला जाऊ नये. दुसरा प्रकार असतो व्यापाराचा. या व्यापारात एखादी वस्तू ठोक स्वरूपात खरेदी करून ती किरकोळीने विकणे. हा व्यवहार गुंतलेला असतो. तोही पैशाशिवाय उभा रहात नाही. मात्र हे दोन प्रकार सोडून जे सगळे उद्योग असतात ते सेवा उद्योग किंवा सर्व्हिस इंडस्ट्री या प्रकारात मोडतात. नव उद्योजकांनी आणि ज्यांच्या घरी व्यापाराची, उद्योगाची परंपरा नाही त्यांनी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये शिरले पाहिजे, कारण तिथे जोखीम नसते, धोका नसतो, फायद्या-तोट्याचे चढ-उतार नसतात. अशा सर्व्हिस इंडस्ट्रीची निवड करताना ती शक्यतो बिनभांडवली असावी आणि असलेच तर त्याला कमी भांडवल लागावे याची दक्षता घेतली पाहिजे. या मार्गाने गेल्यास चाकरमानी वृत्तीचा मराठी माणूस स्वत:च्या पायावर उभा राहून उद्योजक होऊ शकेल अशी खात्री वाटते.
ब्लर्ब
महाराष्ट्रातल्या काही संस्थांच्या प्रयत्नामुळे आणि प्रशिक्षणामुळे मराठी तरुण हळू हळू का होईना पण उद्योगाकडे वळायला लागला आहे. मात्र या तरुणांच्या मनामध्ये अजूनही गोंधळ आहे. एखादा उद्योग करायचाच झाला तर त्याला भांडवल कोठून आणावे आणि भांडवल गुंतवून उद्योग केल्यानंतर तोटा झाल्यास काय करावे, असे प्रश्‍न त्याला भंडावून सोडत आहेत. अशा तरुणांच्या मनातील उद्योगधंद्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. उद्योगधंद्याला भांडवल लागतेच हा गैरसमज आधी दूर झाला पाहिजे. म्हणूनच एक पैसाही गुंतवणूक न करता हजारो रुपये कमवून देणारे काही व्यवसाय या पुस्तकात दाखविण्यात आलेले आहेत. हे पुस्तक वाचून चाकरमान्या वृत्तीचा मराठी तरुण उद्योगधंद्याकडे वळेल अशी अपेक्षा आहे.










घ्या मार्केटचा आढावा...



उद्योगधंद्याच्या क्षेत्रात कोणतीही व्यावसायिक योजना आखताना मार्केट रिसर्च अर्थात बाजारपेठेचे सर्वेक्षण करणे आवश्यक झाले आहे. मार्केट रिसर्च म्हणजे बाजारपेठ आणि ग्राहक यांच्याबाबतची माहिती गोळा करणे होय. आपल्या उत्पादनाच्या पॅकेजिंग आणि जाहिरातीविषयी निर्णय घेण्यासाठी प्रत्येक कंपनीला या मार्केट रिसर्चची मदत होत असते. यात ग्राहकांची आवडनिवड आणि प्राधान्यक्रम याबाबतची माहिती गोळा केली जाते. सतत बदलत राहणाऱ्या बाजारातील ट्रेंड्स, स्थान, गरजा या मुद्द्यांच्या आधारे मार्केट रिसर्चचा अभ्यास केला जातो. ग्राहकांचे विश्लेषण, जोखीम विश्लेषण (रिस्क अ‍ॅनालिसिस), उत्पादनाबाबतचे संशोधन आणि जाहिरातीचे संशोधन आदी पद्धतींच्या आधारे मार्केट रिसर्च केला जातो.

बाजारपेठेचे सर्वेक्षण करून मिळवलेल्या या माहितीआधारे मार्केट रिसर्च अ‍ॅनालिस्टला (बाजार संशोधन विश्लेषक) आपल्या कंपनीच्या उत्पादनाच्या वा सेवेच्या संभाव्य विक्रीचा आकडा नमूद करता येतो. भूतकाळातील विक्रीच्या आकड्यांआधारे भविष्यकाळातील संभाव्य विक्रीचे विश्लेषण केले जाते. स्पर्धक कंपन्यांची माहिती मिळवणे, विविध उत्पादनांच्या किंमती, त्यांची विक्री आणि मार्केटिंग-डिस्ट्रिब्युशनच्या पद्धती आदी माहिती हे संशोधक गोळा करतात. टेलिफोन कॉल्स, इंटरनेट सर्व्हे किंवा प्रत्यक्ष मुलाखत घेऊन ही माहिती मिळवली जाते. काहीवेळा सर्वेक्षणासाठी ग्राहकांच्या प्रत्यक्ष मुलाखती, समूह चर्चा, किंवा शॉपिंग मॉल्स/ इतर सार्वजनिक ठिकाणी स्टॉल्स टाकून ग्राहकांशी संवाद साधून ही माहिती गोळा केली जाते. विविध महापालिका/ महामंडळे, सरकारी एजन्सी, राजकीय उमेदवार आणि सर्व्हिस प्रोव्हायडर यांच्यासाठी असे मार्केट सर्व्हे केले जातात. अशा सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीचा फायदा या संघटना/संस्था/व्यक्ती यांना विविध योजना आखताना आणि बजेटची तयारी करण्यासाठी होतो. अर्थशास्त्रज्ञ, स्टॅटिस्टिशियन, मार्केट रिसर्च अ‍ॅनालिस्ट आणि डेटा यूझर्स यांच्याशी चर्चा करूनच असे बाजारपेठेशी निगडीत सर्वेक्षण केले जातात. सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या टीमला हाताळण्याचे काम मार्केट रिसर्च मॅनेजर करतो नवीन उत्पादन बाजारात दाखल करण्यापूर्वी कंपनीत होणारे ग्रूप डिस्कशन व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी याच मार्केट रिसर्च मॅनेजरवर असते. विशेष सॉफ्टवेअरच्या आधारे ही सगळी कामे केली जातात. बाजार सर्वेक्षण, समूह चर्चा या सगळ्याचे निष्कर्ष सरतेशेवटी प्रॉडक्ट मॅनेजर किंवा मार्केटिंग मॅनेजरपुढे सादर केले जातात.

प्रवेश

या क्षेत्रात एन्ट्री लेव्हलवर (प्रवेश करताना) मान्यताप्राप्त विद्यापीठाची अंडरग्रॅज्युएट डिग्री असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही कोणत्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक आहे. पोस्ट ग्रॅज्युएट स्तरावर तुम्हाला एमबीए करता येईल. या क्षेत्राचे प्रशिक्षण देणारे डिप्लोमा आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा कोर्सेसही उपलब्ध आहेत.

करिअरच्या संधी

या क्षेत्राचे प्रशिक्षण घेतलेले उमेदवार प्रोफेशनल, सायंटिफिक आणि टेक्निकल सर्व्हेइंग फर्म, टेक्निकल कन्सल्टिंग फर्म, रिसर्च अँड डेव्हलपमेंट फर्म आदी ठिकाणी नोकरी करू शकतात. राज्य सरकारी संस्था, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि वेब सर्च पोर्टल्स आदी ठिकाणीही मार्केटिंग रिसर्चचा अभ्यास केलेल्या तरुणांना कामाच्या संधी मिळतात. स्वत:चा व्यवसाय किंवा मार्केट रिसर्च कंपनीत काम करण्याचा पर्यायही आहे.









































- सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर
(लेखिका करिअर मार्गदर्शक आहेत.)
by - Maharashtra Times

गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०१७

उदयोग सुरू करताना हे लक्षात ठेवा...

उदयोग सुरू करताना हे लक्षात ठेवा...



कोणताही उदयोग करताना अनेक घटकांचा सांगोपांग विचार करणे आवश्‍यक आहे. नाहीतर उदयोगात अयशस्‍वी होण्‍याची वेळ येते. तसे होऊ नये म्‍हणून लेखात दिलेल्या बाबी पडताळून पहाव्‍यात.
  • बाजारपेठेच्‍या सदयस्थितीचा अभ्‍यास (मार्केट सर्व्हे) केलेला असावा.
  • ज्या वस्‍तुला मागणी आहे असा उदयोग असावा.
  • उत्‍पादनाची उपयुक्‍तता किती आहे व ग्राहकाला त्‍या उत्‍पादनाची गरज आहे का?
  • योग्‍य त्‍या व्‍यक्‍तीचे व्‍यवस्थित मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. शक्‍यतो व्‍यवसाय मार्गदर्शकाबरोबर चर्चा करावी.
  • स्‍वतःवर विश्‍वास असावा.
  • उदयोगाची दिशा निश्चित असावी.
  • उत्‍पादनाचा ग्राहक वर्ग कोणता असेल? बाजारपेठ कोठे मिळेल? हे विचारात घ्‍यावे.
  • वेळेचे, कामाचे व आर्थिक नियोजन कसे करणार याबाबत विचार केलेला असावा.
  • कामाचे टप्‍पे करावेत व त्‍यानुसार कामाची जबाबदारी योग्‍य त्‍या व्‍यक्‍तींवर सोपवावी.
  • उत्‍पादन करण्‍यासाठी चाचणी उत्‍पादन करुन पहावे. उत्‍पादन खर्च काढून पहावा. तो खर्च विक्री किंमतीच्‍या ५०% एवढा येतो आहे का? हे पहावे.
  • विक्रीचा आराखडा तयार असावा.
  • कच्‍च्या मालाचे भाव मा‍हीत असावेत. खरेदीसाठी योग्‍य त्‍या होलसेल बाजारपेठेचा अभ्‍यास असावा.
  • सर्व उदयोगविषयक कायदयांबाबत माहिती करुन घ्‍यावी. उदा. जर उत्‍पादन अन्‍नप्रकिया उदयोगातील असेल तर अन्न व भेसळ कायदा माहित असावा.
  • भविष्‍यात येणाऱ्या अडचणी कोणत्‍या असू शकतात व त्‍यांना कशा पद्धतीने तोंड दयावे लागेल किंवा त्‍यावर काय उपाययोजना करता येतील यावर विचार केलेला असावा.
  • कर्ज योजनांचा अभ्‍यास केलेला असावा व त्‍या दृष्‍टीने प्रयत्‍नांना सुरुवात करावी.
  • कर्ज योजनांसाठी प्रकल्‍प अहवाल तयार असावे.
  • उदयोगाचे मार्केटिंग कोणत्‍या पद्धतीने करता येईल? याचा विचार करावा.
  • उत्‍पादनाचे आयुष्‍य (Expiry Date) किती असेल?
  • पुढील पाच वर्षात हाच उदयोग मी कसा वाढविणार?
  • उदयोगासाठी भांडवलाचा विचार केला आहे का? भांडवल उभारणीसाठी कोणते प्रयत्‍न करणार?
  • वस्‍तुची किंमत किती असेल व ती योग्‍य असेल का?
  • उत्‍पादनाला रंग, रुप, चव, गुणवत्ता इत्‍यादी आहे का?
  • आकर्षक पॅकिंग आहे का?
  • माझे गुंतवणूक केलेले पैसे कधी वसूल होतील?
  • या उत्‍पादनाचा वातावरणावर काही परिणाम होणार आहे का? (प्रदूषण होणार काय?)
  • उदयोगासाठी खेळते भांडवल पुरेसे आहे का?
  • हाताखालच्‍या कर्मचाऱ्यांबरोबर चांगले संबंध ठेवा. कर्मचाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करुन दया.
  • कर्मचारी निवडताना त्‍यांची शारीरिक क्षमता, बुद्धिमत्ता, शिक्षण, कर्तृत्‍व यानुसार त्‍यांच्‍यावर कामाची जबाबदारी सोपवा.
  • चुकीच्‍या माणसांची निवड करु नका.
  • अनावश्‍यक खर्च टाळा.
  • व्‍यवहार करताना अॅग्रीमेंटचा वापर करा. लेखी व्‍यवहार करा. स्‍वतःची फसवणूक होऊ देवू नका.
  • हिशोबपत्रके चोख ठेवा. आर्थिक व्‍यवहार चोख करा.
  • विक्री वाढविण्‍यासाठी आग्रही रहा. त्‍यासाठी जाहिरात तंत्राचा वापर करा. आपल्‍या खिशाला परवडेल अशी जाहिरात करा.
  • ग्राहकाच्‍या प्रतिक्रिया जाणून घ्‍या.
  • ग्राहक हाच उदयोगाचा पाया आहे हे समजून घ्‍या. ग्राहकाच्‍या मागणीनुसार व गरजेनुसार उत्‍पादनात बदल करा.
  • पैसा मिळविण्‍यासाठी उदयोग सर्वच करतात. परंतु ध्‍येयासाठी उदयोग करावा. त्‍यातून मानसिक व बौद्धिक समाधान मिळावा.
  • नवनिर्मितीचा आनंद मिळावा.
  • बाजारपेठेत स्‍वतःची चांगली पत निर्माण करा.
  • हसत – खेळत सर्वांना समजून घेऊन उदयोग करा.
                       क्रांतिज्योती उद्योजिका

व्यवसायाच्या वाटेवर चालताना


नव्याने व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी सुवर्ण संधी...


व्यवसायाच्या वाटेवर चालताना या पुस्तकातील सर्व लेख उद्यापासून दररोज सकाळी ९.०० वाजता www.facebook.com/amolckadam1 या पेजवर प्रकाशित केले जातील.



व्यवसायाच्या वाटेवर चालताना
-------------------------------
महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यात फिरुन माहिती घेतल्यानंतर, वेगवेगळ्या ठिकाणच्या तरुणांकडून त्यांच्याशी चर्चा केल्यावर, तसेच विविध ठिकाणची आर्थिक, सामाजिक, राजकीय व इतर सर्व प्रकारची परिस्थितीचा चिकित्सक अभ्यास केल्यावर सदर लेखमालिका सुरु करत आहोत. तरुणांच्या मनात उटणारे प्रश्नांचे वादळ, प्रत्यक्ष कामाला सुरवात केल्यावर येणाऱ्या अडचणी व अडचणीबरोबरची हतबलता, त्यावर उपाय न शोधता येणे, नोकरी करावा की व्यवसाय? असा पेच पडणे व त्याचे योग्य उत्तर न मिळणे, व्यवसाय करायचा तर कोणता करायचा? त्यासाठी लागणारे भांडवल कसे उभा करायचे? त्याचे मार्केटिंग कसे करायचे? यासारखे व इतर अनेक प्रश्न पडणारे तरुण पाहिले काही मुली ही व्यवसाय करु इच्छितात.

या प्रश्नात मुख्य प्रवाहाबाहेरच्या काही इतर प्रश्नांचीदेखील भर पडत असते. ते प्रश्न म्हणजे, शिक्षणसाठी आयुष्याची २०-२२ वर्षे घालवल्यानंतर ऐन उमेदीच्या काळात पैसा कमावण्यासाठी घरुन येणारा दबाव किंवा मजबूरी, पाठीमागच्या पिढीने करुन ठेवलेले कर्ज (मग ते आपल्या शिक्षणासाठी असो की अजून कोणत्या कारणाने) कसे फेडायचे, त्यानंतर समाजातील काही लोक विचारतात लग्न कधी करणार? (हा प्रश्न सामान्यतः मुलींना अधिक प्रमाणात व थोड्या फार फरकाने २५ वयाच्या दरम्यान मुलांनाही विचारला जातोच.) लग्न केले तर वाढणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन लग्नाआधीच व्यवसाय स्थिर स्थावर करण्यासाठीची धावपळ, व कमीअधिक महत्वाचे अजून काही प्रश्न सोडवता सोडवता कोणता प्रश्न कधी सोडवायचा? हाही एक नवीन प्रश्न.

उत्तर देणारे कुणी नसते. आपल्या वाट्याला येते मग गळचेपी. पाठीमागची पिढी नव्या वाटावरुन चालायला विरोध करते. तर आपल्या सोबत असणारी नवी पिढी अनुभवाअभावी व थोड्याशा अधीरपणामुळे काही ठिकाणी चुकते. ह्या चुका टाळता याव्यात म्हणून करता येणाऱ्या उपाययोजना येत्या ३० दिवसात नवी अर्थक्रांतीच्या पेजवर प्रकाशित करु. ज्या व्यवसायाच्या वाटेवर चालताना मार्गदर्शक ठरतील.

भाग - १ – मानसिकता व पूर्वतयारी.
१. व्यवसाय की नोकरी?
२. व्यवसायच का?
३. सुरवात करण्यापूर्वी काय?
४. मानसिकता
५. व्यवसाय कोणता?
६. कार्यक्षेत्र कसे ठरवावे?
७. बिझनेस प्लान जरुरी आहे का?
८. कुटूंबातील व्यक्तींचा पाठिंबा की विरोध? व उपाय
९. अनुभवाची गरज आहे का?

भाग - २ – प्रत्यक्ष सुरवात, भांडवली उभारणी व सरकारी परवानग्या

१०. कशी करावी सुरवात?
११. व्यवसायासाठी किती भांडवल लागेल? व्यवसाय प्रकारानुसार
१२. भांडवल कसे उभा करावे?
१३. भांडवल उभा करताना तारण नसल्यास काय?
१४. भांडवलासाठी घेतलेले पैसे कसे परत करणार?
१५. कोणत्या परवानग्या लागतील? व्यवसाय प्रकारानुसार
१६. सरकारी परवानग्यांचा होणारा फायदा काय?
१७. कशा मिळवाव्यात परवानग्या?

भाग - ३ – उत्पादने, मार्केटिंग व प्रत्यक्ष नफा

१८. उत्पादन करण्यापूर्वी काय तयारी करावी?
१९. प्रत्यक्ष उत्पादन कसे करावे?
२०. आकर्षक मांडणी व लागल्यास पॅकेजिंग कसे करावे?
२१. मार्केटिंग साठी लागणारे सोपे उपाय
२२. सेल्स करताना घ्यावयाची काळजी
२३. अडचणीच्या काळात व्यवसायात टिकून कसे रहावे?
२४. नेहमी उत्साहात काम करण्याची कला
२५. प्रत्यक्ष नफा मिळवण्याची प्रक्रिया

भाग - ४ – करप्रणाली, व्यवसाय वृध्दी व ब्रॅंड बनवणे

२६. भरावे लागणारे कर व त्याचे फायदे तोटे
२७. व्यवसाय वृध्दीची गरज
२८. व्यवसाय वृध्दी साठी उचलावी लागणारी पावले
२९. ब्रॅंडचे महत्व व गरज
३०. ब्रॅंड निर्मितीचे मार्ग व यशस्वी उद्योग चिरकाल टिकवताना
--------------------


या लेखमालिकेतील सर्व लेख समविष्ट असणारे पुस्तक उपलब्ध आहे.

प्रकाशन - नवी अर्थक्रांती प्रकाशन
पाने - 168 
किंमत - 100/- फक्त

बुकिंगसाठी लिंक - http://www.naviarthkranti.com/shop
(कृपया संपूर्ण पत्ता पिनकोड सहित नोंदवावा)
--------------------
- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती

मार्केटिंगचा अभ्यास


मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एम.बी.ए.) या अभ्यासक्रमातून व्यावसायिक व्यवस्थापनाचे सर्व पलू उलगडले जातात. एमबीए

मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एम.बी.ए.) या अभ्यासक्रमातून व्यावसायिक व्यवस्थापनाचे सर्व पलू उलगडले जातात. एमबीए अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा विषय म्हणजे मार्केटिंग. या घटकाची ओळख करून घेऊया.  
मास्टर ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एम. बी. ए.) हा अभ्यासक्रम व्यावसायिक व्यवस्थापनाचे सर्व पलू विशद करतो. त्यात व्यवस्थापनाच्या अनेक अंगांचा समावेश आहे. विपणन किंवा मार्केटिंग हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. हा एक व्यापक विषय असून सर्वच क्षेत्रांत अत्यंत उपयुक्त गणला जातो. 
एम. बी. ए. च्या मार्केटिंगच्या अभ्यासक्रमात विपणनाची मूलतत्त्वे (Basics of Marketing), विपणनाचे व्यवस्थापन (Marketing Management) हे मूळ विषय आहेत.
हे विषय विपणनाच्या मूळ संकल्पना सखोल विशद करतात. तसेच विपणनाची विविध अंगे म्हणजेच प्लािनग, सेगमेन्टेशन, टाग्रेटिंग, पोझिशिनग आणि मार्केटिंग मिक्सचे ‘4 पी’ अर्थात प्रॉडक्ट (उत्पादन), प्राइस (किंमत), फिजिकल डिस्ट्रिब्युशन (वितरण) आणि प्रमोशन (जाहिरात) सारख्या इतर महत्त्वाच्या संकल्पनांचीही माहिती देतात.
 या विषयाची सुरुवात करताना नीड (need)), वाँट (want), डिझायर (desire), डिमांड (demand)), मार्केट (market), प्रॉस्पेक्ट (prospect), कंझ्युमर (Consumer), कस्टमर (Customer) अशा मार्केटिंगच्या मूलभूत संकल्पनांची ओळख केली जाते. यालाच ‘कोअर कन्सेप्ट्स ऑफ मार्केटिंग’ असे म्हणतात.
यानंतर मार्केटिंगबद्दलचा पूर्वीचा दृष्टिकोन आाणि आजच्या जगातील मार्केटिंगची व्याख्या याची माहिती दिली जाते.
नंतर कुठल्याही उत्पादनाचे किंवा सेवेचे मार्केटिंग करताना त्याचे नियोजन कसे केले पाहिजे, अर्थात मार्केटिंग प्लॅिनग आणि त्यातील वेगवेगळे टप्पे याबद्दल सविस्तर चर्चा या विषयात केली जाते.
मार्केटिंगच्या अभ्यासक्रमातला पुढचा भाग हा अत्यंत उपयुक्त असा आहे. यात एखाद्या उत्पादनाचे  किंवा सेवेचे मार्केट याचे वर्गीकरण अर्थात सेग्मेंटेशन कसे करावे, त्यातून समोर आलेल्या वर्गापेकी म्हणजेच सेग्मेंट्सपैकी आपल्या उद्योगाला साजेसा वर्ग किंवा साजेसे वर्ग कोणते हे कसे निवडावे (टाग्रेटिंग) आणि आपले उत्पादन किंवा सेवा याचा ग्राहकांच्या मनात कसा ठसा उमटवावा (पोझिशिनग) या तीन महत्त्वाच्या पलूंची माहिती आहे. या तीन पलूंना एस.टी.पी. (STP) असेही म्हणतात.
त्यानंतर ‘न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट’ हा विषय हाताळला जातो. त्यात कुठलेही नवीन उत्पादन बाजारात आणताना काय काय केले पाहिजे आणि ती संपूर्ण प्रक्रिया कशी पार पाडली पाहिजे याची माहिती आहे. या प्रक्रियेला न्यू प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस असे म्हणतात.
पुढचा भाग हा मार्केटिंग मिक्सच्या चार घटकांबद्दल  माहिती देतो. यांना 4 Ps  ऑफ मार्केटिंग असे म्हणतात. यात प्रत्येक ढ मध्ये वेळोवेळी योग्य बदल करून उत्पादक ग्राहकांच्या गरजा उत्तमरीत्या पुरवू शकतात.
प्रत्येक उत्पादनाची ‘प्रॉडक्ट लाइफ सायकल’ (PLC) असते. त्या उत्पादनाच्या आयुष्याच्या चार महत्त्वाच्या टप्प्यांचे वर्णन या विषयात केले आहे आणि प्रत्येक टप्प्यात मार्केटिंगसाठी काय केले पाहिजे हे सांगितले आहे. त्यानंतर मार्केटिंग कंट्रोल्स, मार्केटिंग अ‍ॅनॅलिसीस याचा या विषयात समावेश आहे.
या विषयाचा अभ्यास करताना नुसतीच संकल्पना समजून घेणे पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांनी त्या संकल्पनेचा कसा वापर होतो हे जाणून घ्यायला हवे. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या केस स्टडीज, तसेच प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करायला हवा. अनेक कंपन्यांच्या केस स्टडीज इंटरनेटवर उपलब्ध असतात. तसेच ‘केस स्टडीज’ विषयाची बरीच पुस्तकेदेखील बाजारात उपलब्ध आहेत. या वास्तववादी केसेसमधून विद्यार्थ्यांना मार्केटिंगचे वेगवेगळे पलू प्रत्यक्षात कसे वापरले जातात, हे कळेल.
उदा. प्रमोशनबद्दल शिकत असताना- वेगवेगळ्या कंपन्या जाहिरात, पब्लिसिटी, सेल्स प्रमोशन इत्यादींचा कसा वापर करतात आणि ग्राहकांना कसे आकर्षति करतात, हे शिकणे आवश्यक ठरते.
तसेच प्रमोशनचा एक भाग आहे सेलिब्रिटी एंडॉर्समेंट. याचा अर्थ प्रख्यात व्यक्तीला आपल्या उत्पादनाची जाहिरात करायला सांगणे. कॅडबरीच्या केस स्टडीमध्ये, या कंपनीने अडचणीच्या काळात अमिताभ बच्चनसारख्या सुपरस्टारचा कसा वापर केला, हे खूप रंजक पद्धतीने सांगितले आहे. अशा केस स्टडीजमधून विद्यार्थ्यांना खूप काही शिकायला मिळते. 
प्रत्यक्ष कार्यानुभाव उपयुक्त ठरतो. उदा. मोबाइल फोनचे उत्पन्नानुसार असणारी बाजारपेठ किंवा टाटा मोटर्सचे ग्राहक वर्गीकरण याचा अभ्यास करणे उपयुक्त ठरते. वरील सर्व संकल्पना मार्केटिंग विषयाच्या मूलभूत संकल्पना असून सर्व क्षेत्रांतील मार्केटिंगला लागू पडतात. 
आता आपण मार्केटिंग हा विषय स्पेशलायजेशनसाठी जेव्हा निवडला जातो तेव्हा त्यात कुठल्या विषयांचा समावेश असतो, ते पाहूया.
मार्केटिंग या विषयाची अनेक अंगे किंवा पलू आहेत. त्यालाच ‘मार्केटिंग व्हर्टकिल्स’ असे म्हणतात. स्पेशलायजेशनमध्ये आपण हेच शिकतो.
रिटेल मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिटेल ऑपरेशन्स – रिटेल हा सध्या जोरात फोफावणारा उद्योग असून त्यात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. हा विषय रिटेल उद्योगाच्या सर्व अंगांची ओळख करून देतो. याद्वारे विद्यार्थ्यांना रिटेल आउटलेटचे कार्य कसे चालते, दुकानाची जागा कशी निवडली जाते व त्याचे डिझाइन, फ्रंट एंड आणि बॅक एंड मॅनेजमेंट इत्यादीची माहिती दिली जाते.
सेवा क्षेत्र हे असेच वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. या क्षेत्राचे योगदान भारतीय उद्योगात सर्वात जास्त आहे. सíव्हसेस मार्केटिंग हा विषय सेवा व वस्तू यातील फरक स्पष्ट करतो आणि सेवा या विषयाची व्याख्या, संकल्पना स्पष्ट करतो. हॉस्पिटॅलिटी, टुरिझम, बँकिंग तसेच इतर वित्तीय सेवांचा या विषयात समावेश आहे. 
मार्केटिंग स्पेशलायजेशनच्या अंतर्गत इंटरनॅशनल मार्केटिंग व आयात-निर्यात व्यवस्थापन असे विषय मोडतात. हे विषय आंतरराष्ट्रीय व्यापार व त्याचे लाभ, वेगवेगळ्या बाजारपेठा व त्यांची वैशिष्टय़े इत्यादींवर भर देतात. आंतरराष्ट्रीय व्यापारात स्वारस्य असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असा हा विषय आहे.
विक्री व्यवस्थापन हादेखील मार्केटिंगमधला एक महत्त्वाचा विषय आहे. विक्री कौशल्य, वाटाघाटी असे त्यातील उपयुक्त भाग आहेत.
वितरण व्यवस्थापन हाही मार्केटिंगमधला एक महत्त्वाचा विषय आहे. वितरण व्यवस्थापन म्हणजे काय याची तोंडओळख जरी अनिवार्य विषयांमधून झाली असली तरी वितरण व्यवस्थापन या विषयाद्वारे विद्यार्थी त्याचा सखोल अभ्यास करू शकतात. त्यात  वेगवेगळ्या प्रकारचे वितरणाचे चॅनेल्स, त्यांचे कार्य, त्यांची  निवड कशी करावी, असे स्वारस्यपूर्ण विषय आहेत.
इंडस्ट्रियल मार्केटिंग हा विषय उत्पादन क्षेत्रात तयार होणारी उत्पादने व त्याचे विपणन यावर चर्चा करतो. व्यावसायिक उत्पादने ही मुख्यत: एका व्यवसायामधून दुसऱ्या व्यवसायासाठी निर्मित केली जातात. त्याचे मार्केटिंग कसे झाले पाहिजे, याची माहिती या विषयात दिली जाते. 
ब्रँड मॅनेजमेंट हा एक नव्याने उदयाला आलेला विषय आहे. यामध्ये एखादा ब्रँड अधिकाधिक लोकप्रिय कसा होईल, याचा विचार केला जातो. याद्वारे उत्पादक आपले उत्पादन इतरांपेक्षा कसे वेगळे आहे व अधिक लाभदायक आहेस हे ग्राहकांवर ठसविण्याचा प्रयत्न करतात. जाहिरात क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय उत्तम आहे.
तसेच मीडिया मॅनेजमेंट, इव्हेन्ट मॅनेजमेंट, स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, रुरल मार्केटिंग अशा विषयांचाही मार्केटिंग स्पेशलायजेशनमध्ये समावेश आहे.
या सर्व विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी चांगल्या पुस्तकांचा, चांगल्या रिसर्च जर्नल्सचा, तसेच चांगल्या वेबसाइट्स आणि इतर चांगल्या माहिती स्रोतांचा वापर करायला हवा. असे केल्याने त्यांचे ज्ञान अद्ययावत राहील. त्यायोगे वर्गात शिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या संकल्पना आणि प्रत्यक्षात घडणाऱ्या व्यवहारातील गोष्टींची उत्तम सांगड विद्यार्थ्यांना घालता येईल






by - Loksatta 

मार्केटिंग मॅनेजमेन्ट...

एमबीए अभ्यासक्रमातील मार्केटिंग म्हणजेच विपणन व्यवस्थापन या विद्याशाखेचा अभ्यासक्रम, अध्ययन आणि करिअर संधी याबद्दलची




एमबीए अभ्यासक्रमातील मार्केटिंग म्हणजेच विपणन व्यवस्थापन या विद्याशाखेचा अभ्यासक्रम, अध्ययन आणि करिअर संधी याबद्दलची सविस्तर माहिती-

एम.बी.ए.च्या दुसऱ्या वर्षी घेता येणाऱ्या स्पेशलायझेशनमध्ये विपणन व्यवस्थापन किंवा मार्केटिंग मॅनेजमेन्ट हा एक पर्याय आहे. मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन करून पुढे उत्तम करिअर करता येते. या पर्यायामध्ये समाविष्ट असलेले काही महत्त्वाचे विषय खालीलप्रमाणे आहेत –

१) मार्केटिंग मॅनेजमेन्ट : हा विषय मार्केटिंगच्या मूलभूत तत्त्वांवर आधारित आहे. यामध्ये मार्केटिंगची मूळ संकल्पना, तसेच मार्केटिंग मॅनेजमेन्टच्या मूलभूत तत्त्वांबरोबरच प्रॉडक्ट डेव्हलपमेन्ट तसेच वस्तू जीवनचक्र (प्रॉडक्ट लाइफ सायकल), नवीन वस्तूंची बाजारपेठेमध्ये चाचणी घेणे (टेस्ट मार्केटिंग) इत्यादी अनेक संकल्पनांचा समावेश होतो. सर्वसाधारणपणे हा विषय एम.बी.ए.च्या पहिल्या वर्षीच शिकविला जातो. ज्यांना मार्केटिंगमध्ये स्पेशलायझेशन करायचे आहे, त्यांनी हा विषय काळजीपूर्वक व मुळापासून समजून घेतला पाहिजे.
२) मार्केटिंग रिसर्च : मार्केटिंगमधला एक प्रमुख विषय म्हणजे मार्केटिंग रिसर्च किंवा विपणन संशोधन. संशोधनाचे महत्त्व हे सर्वच क्षेत्रामध्ये आहे. मार्केटिंगसुद्धा याला अपवाद नाही. मार्केटिंगमध्ये संशोधनाचा उपयोग, प्रामुख्याने ग्राहकांच्या आवडीनिवडी शोधून काढणे, स्पर्धकांच्या प्रॉडक्टविषयी माहिती घेणे, वस्तू व सेवा वितरित करताना वापरल्या जाणाऱ्या वितरणाच्या साखळीसंबंधी (डिस्ट्रिब्युशन चॅनल्स) धोरण ठरवणे, किमतीविषयक धोरण ठरवणे, जाहिरातींचे माध्यम ठरविणे आदी अनेक ठिकाणी होतो. या विषयामध्ये, वेगवेगळ्या विभागांमध्ये संशोधन कसे करावे, यामध्ये माहिती गोळा करण्याचे कोणकोणते मार्ग आहेत, तसेच माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावली (क्वेश्चनरी) कशी तयार करावी आणि गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण कसे करावे यासंबंधी मार्गदर्शन केले जाते. संशोधन केल्यानंतर आणि त्यामधून निष्कर्ष काढल्यानंतर संस्थेच्या धोरणामध्ये योग्य ते बदल कसे करावेत यासंबंधीसुद्धा मार्गदर्शन केले जाते. याचबरोबर आंतरराष्ट्रीय विपणन संशोधन (इन्टरनॅशनल मार्केटिंग रिसर्च) कसे करावे याचीही माहिती मिळते. या ठिकाणी असे म्हणता येईल की, विपणन संशोधन असे की, ज्यामध्ये बाजारपेठांचे संशोधन (मार्केट रिसर्च) याचाही समावेश होतो, हा एक महत्त्वाचा विषय आहे. एम.बी.ए. अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थी-विद्यार्थिनींनी लहान-लहान संशोधन प्रकल्प पूर्ण केले तर त्यांना या विषयाची पूर्ण कल्पना येऊ शकेल आणि त्याचा फायदा पुढील करिअरमध्ये होईल.
३) ग्राहकांची वर्तणूक (कन्झ्युमर बिहेव्हिअर) : यशस्वी मार्केटिंग व्यवस्थापकाला ग्राहकाचे मानसशास्त्र (कन्झ्युमर सायकॉलॉजी) या महत्त्वाच्या विषयाचे पूर्ण ज्ञान असणे अतिशय आवश्यक आहे. यासाठी ग्राहकांची निर्णयप्रक्रिया कशी आहे, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत आणि त्या कशा बदलतात, त्यांच्या खरेदीमागे कोणत्या प्रेरणा (मोटिव्ह्स) आहेत इत्यादी गोष्टींची सखोल माहिती करून घेणे हेसुद्धा तितकेच आवश्यक आहे. 
आधुनिक जगातील मार्केटिंग हे ग्राहक केंद्रित (कन्झ्युमर ओरिएन्टेड) असल्यामुळे ग्राहकांचे समाधान हे मार्केटिंग मॅनेजरचे सर्वात महत्त्वाचे ध्येय आहे. यादृष्टीने हा विषय महत्त्वाचा ठरतो. या विषयासाठी तयारी करताना विद्यार्थ्यांनी आपल्या भोवतालच्या परिस्थितीकडे जर डोळसपणे पाहिले आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या मार्केटिंगच्या धोरणांचा अभ्यास केला तसेच ग्राहकांच्या आवडीनिवडीविषयीची निरीक्षणे नोंदवून ठेवली तर त्यांचा भविष्यात चांगला उपयोग होतो.
४) विक्री व्यवस्थापन (सेल्स मॅनेजमेन्ट) : विपणन व विक्री या दोन वेगळ्या गोष्टी असल्यामुळे विक्री व्यवस्थापनाचे वेगळेपण कसे आहे आणि ते प्रभावीपणे कसे करावे, याचे मार्गदर्शन या विषयात मिळते. त्याचप्रमाणे वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कशा पद्धतीने वितरणविषयक धोरणे आखावीत याचेही मार्गदर्शन मिळते. विपणनाचा एक उद्देश म्हणजे प्रभावीपणे विक्री करणे, असा असल्यामुळे विक्री व्यवस्थापनाची मुलभूत तत्त्वे समजावून घेणे महत्त्वाचे आहे.
५) सव्‍‌र्हिसेस मॅनेजमेन्ट : आजच्या युगामध्ये सेवा क्षेत्र (सव्‍‌र्हिस सेक्टर) वाढत असल्यामुळे सेवांचे मार्केटिंग कसे करावे, हे समजून घेणे आवश्यक आहे. एखाद्या वस्तूचे मार्केटिंग करणे आणि आपण देत असलेल्या सेवांचे मार्केटिंग करणे यामध्ये फरक आहे. एखादी वस्तू ही ग्राहकांना प्रत्यक्ष बघता येते, पण सेवा या दिसत नसल्यामुळे (इन्टॅन्जिबल) त्यांचे मार्केटिंग तुलनेने अवघड आहे. सेवा क्षेत्रामध्ये बँकिंग, इन्शुरन्स, कन्सल्टन्सी इत्यादी अनेक क्षेत्रांचा समावेश असल्यामुळे व या सर्व क्षेत्रांमध्ये स्पर्धा दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे प्रशिक्षित मार्केटिंग मॅनेजरची नितांत गरज आहे. या दृष्टीने या विषयाचे महत्त्व आहे.
६) आंतरराष्ट्रीय विपणन व्यवस्थापन (इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेन्ट) : आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये संपूर्ण जगच ही एक बाजारपेठ झाली आहे. यादृष्टीने एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे जागतिक बाजारपेठेमध्ये विपणन करताना कोणकोणत्या अडचणी येऊ शकतात आणि त्या दूर करण्यासाठी कोणत्या तंत्रांचा वापर केला पाहिजे याची माहिती या विषयात मिळते. जगातील विविध देशांमधील कायदे तसेच सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय परिस्थिती याचा अभ्यास करण्याची संधी या विषयात मिळते. या विषयाचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी जगातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेचा तसेच देशांतर्गत परिस्थितीचा अभ्यास स्वत:हून करणे आवश्यक आहे.

वरील विषयांव्यतिरिक्त मार्केटिंग मॅनेजमेन्ट या स्पेशलायझेशनमध्ये मार्केटिंग कम्युनिकेशन, आयात-निर्यातविषयक कायदे व पद्धती, रिटेल मार्केटिंग, मार्केटिंगविषयक कायदे, इंटरनेट मार्केटिंग इत्यादी अनेक विषयांचा समावेश होतो.

मार्केटिंगचा अभ्यास करताना, प्रत्यक्ष व्यवहारात या तत्त्वांचा वापर कसा होतो हे पाहिले पाहिजे. त्या दृष्टीने कंपन्यांच्या केस स्टडीज, यशस्वी मार्केटिंग मॅनेजरच्या मुलाखती, कंपन्यांना भेटी इत्यादींचा वापर करता येईल.

मार्केटिंगमध्ये करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र पहिल्या दिवसापासून मॅनेजरची नोकरी मिळेतच, असे नाही. कित्येक वेळा सुरुवातीला काही दिवस उमेदवारी करून नंतर बढतीची संधी मिळते. मात्र यासाठी मेहनत करण्याची शारीरिक व मानसिक तयारी ठेवली पाहिजे.









by - Loksatta 

सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

ONLINE USER

बुधवार, ४ ऑक्टोबर, २०१७

वन मॅन नेटवर्क... प्रदीप लोखंडे


बड्या कंपन्यांची मार्केट विस्ताराची गरज ओळखून हजारो गावांचा डाटाबेस प्रदीप लोखंडे यांनी उभा केला आहे. व्यवसायाच्या या आगळ्यावेगळ्या मॉडेलच्या माध्यमातून गावागावांतून त्यांचं नेटवर्क तयार झालं आहे. या नेटवर्कच्या आधारावर ‘बिझनेस’ आणि ‘आयडॉलॉजी’ यांचा मेळ त्यांनी साधला आहे.
pradip lokhande_0_0_0_0.jpg
भारत हा १२० कोटी लोकसंख्या असलेला देश आहे. भारतात उद्योग करू पाहणा-या, उद्योग वाढवू पाहणा-या बड्या देशी-विदेशी कंपन्यांना हा आकडा मोह घालतो. तथापि, भारत हा विशाल देश आहे, लक्षावधी खेड्यापाड्यापर्यंत तो पसरलेला आहे. इथल्या लोकसंख्येचं स्वरूपही आर्थिक-सामाजिकदृष्ट्या विषम आहे. अशा स्थितीत आपलं उत्पादन घेऊन भारतात खोलवर कसं पोहोचायचं हा मोठा प्रश्न या कंपन्यांना भेडसावतो. त्यासाठी जी सर्वांगीण माहिती हवी, डाटा हवा, तो कसा मिळवायचा? हे सर्व स्वत: करायचं तर त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करावा लागणार. बड्या उद्योगांची ही कळीची समस्या ओळखून कल्पकतेने स्वत:चं करिअर व व्यवसाय उभा करणा-या व्यक्तीचं नाव आहे प्रदीप लोखंडे. महाराष्ट्रातल्या ग्रमीण भागाचा विस्तृत डाटाबेस हेच त्यांच्या व्यवसायाचं भांडवल! अथक परिश्रमांतून त्यांनी हजारो गावांची माहिती गोळा केली. त्यात आणखी हजारो गावांची भर ते घालताहेत. महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातल्या इतर राज्यांचाही ते डाटाबेस गोळा करताहेत, तो अद्ययावत ठेवताहेत. ‘हिन्दुस्तान लिव्हर’पासून ‘एशियन पेन्टस’पर्यंत आणि ‘टाटा टी’ पासून ‘पारले’पर्यंत अनेक बडे उद्योग आज त्यांचे क्लाएंट आहेत. एके काळी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगलेला हा माणूस आज मर्सिडीज गाडीमधून फिरतो. स्वत: व्यवस्थापनशास्त्राचं शिक्षण न घेतलेला हा माणूस आज देशातल्या प्रतिष्ठित व्यवस्थापन महाविद्यालयांतून लेक्चर्स देतो. एकंदरीत, स्वत:च कल्पकतेतून प्रदीप लोखंडे यांनी यशस्वी करिअर घडवलंय.
पण प्रदीप लोखंडे यांची ओळख इथेच थांबत नाही. ‘बिझनेस’ आणि ‘आयडॉलॉजी’ यांचा मेळ घालत त्यांनी एक आगळं मॉडेल निर्माण केलं, ज्यातून ग्रामीण तरुणांना करिअरच्या वाटा मिळताहेत, गावांतल्या विद्यार्थ्यांना संगणक हाताळता येताहेत, त्यांचं ज्ञानसंवर्धन होतंय. हे सारं कसं घडतं याची ही कहाणी.
सातारा जिल्ह्यातल वाई तालुक्यातील एक छोटंसं खेडं प्रदीप लोखंडे यांचं गाव. तिथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्याला आले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी नोकरी करतच १९८१ मध्ये वाडिया कॉलेजमधून कॉमर्सची पदवी प्राप्त केली. एकूण शिक्षणकाळात त्यांची ऍकेडेमिक प्रगती फार चांगली नसली तरी डोक्यात बिझनेस-मार्केटिंगचे विचार मात्र सुरू होते. त्यातूनच त्यांना मार्केटिंगचा डिप्लोमा करावा असं वाटलं. पुण्यातल्या एका नामांकित मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी प्रवेशासाठी प्रयत्न केले; परंतु त्यांचं एकूण राहणीमान, ग्रामीण भाषा पाहून ‘मार्केटिंग तुम्हारे बस की बात नहीं है’ असं म्हणून त्यांना तिथून पिटाळण्यात आलं. पण मुळातच जिद्दी असलेल्या लोखंडे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. संस्थाचालकांना वारंवार विनंती केल्यानंतर कुठे त्यांना त्या संस्थेत प्रवेश मिळाला. पुढे त्यातूनच त्यांची ‘जॉन्सन ऍण्ड जॉन्सन’ कंपनीत निवड झाली. काम करण्यासाठी युनिट मिळालं मध्य प्रदेश. कंपनीच्या कामानिमित्ताने शहरांबरोबरच ग्रामीण भागही त्यांनी अक्षरश: पिंजून काढला. पुढे नोकरी सोडली. छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. त्यात यशापयश पचवलं. काही कंपन्यांसाठी प्रमोशनची कामंही त्यांनी केली; पण त्यांना त्यातून म्हणावं इतकं समाधान मिळत नव्हतं. व्यवसायाचं स्वत:चं काहीतरी वेगळं मॉडेल आपण शोधलं पाहिजे, याच विचारात असताना त्यांनी सिटी बँकेच्या अध्यक्षांचं भाषण मुंबईत ऐकलं. त्याने ते भारावून गेले. त्यांनी भाषणात सांगितलं, ‘‘खेड्यांकडे चला, तिथे काम करण्यासाठी खूप पोटेन्शियल आहे.’’ बस्स! लोखंडे यांनी हेच वाक्य आपल्या व्यवसायाची दिशा निश्चिठत करण्यासाठी प्रमाण मानलं. नवं काही तरी शोधण्याची आंतरिक ओढ होतीच. थोडाफार नोकरी-व्यवसायाचा अनुभव गाठीशी होता. ग्रामीण भागात व्यवसायाचं स्वत:चं वेगळं मॉडेल का असावं या प्रश्नावर त्यांनी बराच काळ विचार केला, बरीच चाचपणी केली.
मोठ्या प्रमाणात उत्पादन करणा-या राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांना एक समस्या नेहमीच भेडसावत असते, ती म्हणजे बाजारपेठ उपलब्ध होणं. रोजच्या गरजेच्या जीवनोपयोगी वस्तूंच्या विक्रीसाठी व्यापक मार्केट ग्रामीण भागात उपलब्ध असूनही वेळ, मनुष्यबळाच्या अभावी या कंपन्यांना आपल्या उत्पादनांचं प्रमोशन करण्यासाठी स्वतंत्रपणे नेटवर्क उभं करणं शक्य नसतं. त्यामुळे या कंपन्या या मोठ्या मार्केटला मुकतात व त्यात त्यांचं आर्थिक नुकसान होतं. या कंपन्यांची ही निकड प्रदीप लोखंडे यांनी अचूक हेरली व त्यातूनच त्यांना आपल्या व्यवसायाची वाट मिळाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जायचं, गावांची संपूर्ण माहिती मिळवायची, त्याचा डाटाबेस तयार करायचा आणि मार्केटच्या शोधात असणा-या कंपन्यांना पुरवायचा. एवढंच नाही, तर या कंपन्यांच्या उत्पादनांबद्दल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ग्रामीण भागात नेटवर्कच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करायची. अशा स्वरूपाचं व्यवसायाचं कल्पक असं आगळंवेगळं मॉडेल त्यांनी शोधलं. हे मॉडेल यशस्वीपणे राबवायचं तर गावांची संपूर्ण माहिती असणं आवश्यक होतं. गावांच्या प्रत्यक्ष संपर्कात गेल्याशिवाय आपल्याला गावांची माहिती मिळणार नाही, हे लक्षात घेऊन त्यांनी गावोगावची भटकंती सुरू केली.
एके काळी नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने विमानातून प्रवास करणारे लोखंडे चक्क छकड्यांतून, एसटी-बसमधून तर कधी पायी गावोगाव फिरू लागले. शहरात नोकरी-व्यवसायात स्थिरावलेला माणूस त्यावर पाणी सोडून ग्रामीण भागात आपला काही व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतो, हे लोकांच्या दृष्टीने ‘खूळ’ होतं. लोकांनी त्यांना अनेक ‘व्यावहारिक’ सल्ले दिले, पण लोखंडे आपल्या निर्णयावर ठाम राहिले. कारण आपण काय करत आहोत याची त्यांना पूर्ण कल्पना होती. तोपर्यंत त्यांचं ‘बिझनेस माइंड’ ब-यापैकी सेट झालं होतं. एखादी गोष्ट करायचीच हे मनाशी पक्कं केल्यावर सर्व शक्ती त्याच्या दिशेने लावायची, हे तत्त्व ते पाळत आल्यामुळे त्यांनी भविष्यात उभ्या राहणा-या संकटांचा फार विचार न करता कामाची दिशा निश्चितत केली. भारतातल्या चार हजारपेक्षा जास्त गावांना त्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तेथील ग्रामवासीयांशी ते बोलले. त्यांची जीवनशैली समजून घेतली. गावातल्या निर्णयप्रकियेतल्या महत्त्वाच्या लोकांना ते भेटले. त्यातून गावाची आर्थिक स्थिती, बाजारहाट, दुकानदार- लोकांच्या नित्याच्या गरजा समजावून घेतल्या. लोकांशी प्रत्यक्ष संवादातून त्यांना गावाविषयी बरीच माहिती मिळाली. इंडियातला भारत समजून घेण्यासाठी त्यांना या माहितीचा खूप उपयोग झाला. त्यातून ते आपल्या व्यवसायाच्या मॉडेलला निश्चिणत अशी दिशा देऊ शकले. गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोस्टमास्तर, शाळेचे मुख्याध्यापक, ग्रंथालयं आदींना पत्रं पाठवून गावाचं नाव, तालुका, जिल्हा, गावाची लोकसंख्या, बाजाराचा दिवस, बाजाराचं स्वरूप, बाजाराला येणा-या लोकांची संख्या, दुकानं, शाळा, गावातल्या प्रमुख व्यक्ती, टीव्ही संच, दूरध्वनी, इतर चॅनेल्स, तिथे उपलब्ध असणा-या जीवनोपोगी वस्तू-उत्पादनं आदींची सविस्तर माहिती व आकडेवारी गोळा करण्यास त्यांनी सुरुवात केली. हजारो पत्रांनी यासाठी गावोगावी पाठविली. फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा तोच प्रयत्न केला. तरीही म्हणावा एवढा प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली. या लोकांना त्यांनी या पत्राबरोबर दिवाळीच्या शुभेच्छा देणारं पत्रही पाठवलं. ही युक्ती कामी आली. लोकांनी ब-यापैकी प्रतिसाद देऊन त्यांना माहिती पाठवली. पुढेही त्यांनी तसाच पयत्न सुरू ठेवला. त्यातून त्यांनी महाराष्ट्रातल्या तब्बल ६ हजार ३०० गावांच्या विस्तृत माहिती व आकडेवारीचा डाटाबेस तयार केला. १९९३ ते १९९६ ही तीन वर्षं त्यांनी अहोरात्र कष्ट घेत माहिती गोळा करण्यासाठी खर्ची घातली. हा काळ त्यांच्यासाठी नक्कीच खडतर असा होता. नोकरी-व्यवसायातून मिळवलेले सगळेच पैसे त्यांनी या कामी खर्च केल्याने त्यांच्या घरात आर्थिक ओढाताण सुरू झाली. पण त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना या काळात मोलाची साथ दिली. गावोगावी पाठवायची हजारो पत्रं त्यांच्या पत्नी व वडिलांनी लिहिली. जमा झालेली सर्व माहिती त्यांच्या पत्नीने संगणकावर नोंदवली. या माध्यमातून आपल्याला पुढे नक्की काय साधायचं आहे याची ‘लाइन’ पक्की असल्यामुळे पेशन्स ठेवत कामात सातत्य ठेवलं. त्यातून एक विस्तृत डाटाबेस त्यांच्याकडे तयार झाला.
चहा, बिस्किटं, डिटर्जंट, साबण, टूथपेस्ट, पावडर, क्रीम, खोबरेल तेल आदी नित्याची गरजेची उत्पादनं विकणा-या राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी हा डाटाबेस खूपच उपयुक्त होता. ग्रामीण भागातलं व्यापक मार्केट काबीज करण्यासाठी अशी माहिती या कंपन्यांना हवीच होती. या माहितीचा लोखंडे यांनी खुबीने वापर केला. ‘माझ्याकडे ६ हजार ३०० गावांची अद्ययावत विस्तृत अशी माहिती आणि आकडेवारी आहे,’ असं सांगणारी पत्रं त्यांनी विविध कंपन्यांना पाठवली. त्यांचं हे मॉडेल ब-याच कंपन्यांच्या पचनी पडलं. त्यातूनच त्याची उपयुक्तता पटल्याने त्यांना पहिली वर्क ऑर्डर मिळाली ‘टाटा टी’ची तीही तब्बल २ लाख ७५ हजार रुपयांची. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. आज ‘हिन्दुस्तान लिव्हर’, ‘पी ऍण्ड जी’, ‘टाटा टी’, ‘एशियन पेन्टस्’, ‘लाइफबॉय’, पेप्सोडेन्ट’, ‘मायक्रोसॉफ्ट’, ‘ओनिडा’, ‘एल ऍन्ड टी’, ‘आय.सी.आय.सी.आय.’, ‘हच’, ‘किसान’, ‘क्रॉम्प्टन ग्रीव्हस’, ‘रसना’ अशा नामांकित कंपन्या त्यांच्या क्लाएंट आहेत. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, आंध्र प्रदेश अशा नऊ राज्यांतल्या तब्बल ४९ हजारहून अधिक गावांशी त्यांचं भक्कम नेटवर्क तयार झालं आहे. या राज्यांतल्या २८ हजारांहून अधिक गावांशी त्यांचा संपर्क झाला असून १ कोटी ३० लाखांहून अधिक ग्रामवासी त्यांच्याशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या जोडले गेले आहेत. ही त्यांची मोठी व्यावसायिक अचीव्हमेंट आहे.

ग्रामीण तरुणांना जोडलं
एकीकडे ग्रामीण भागाला आपल्या व्यवसायाचा-करिअरचा आधार बनवत असताना विकासापासून कोसो दूर असलेल्या ग्रामीण भागाचं मागासलेपणही त्यांच्यातल्या कार्यकर्त्यानं टिपलं होतं. आपल्या व्यवसायाशी ग्रामीण तरुणांना जोडून घेतलं तर त्यांनाही रोजगाराची दिशा मिळू शकेल, या विचारातून त्यांनी २००० साली ‘रूरल रिलेशन्स’ या संस्थेची स्थापना केली.
महाराष्ट्रात तब्बल ४३००० हजार गावं आहेत. सर्वच गावांमध्ये जाऊन काम करणं शक्य नव्हतं. त्यामुळे ज्या गावात खरंच गरज आहे अशा गावांत ‘रूरल रिलेशन्स’ मार्फत काम करण्याचं त्यांनी ठरवलं. अशा गावांची माहिती त्यांनी जमा केली. त्यातून त्यांच्या लक्षात आलं, की गावांत शिक्षित-अर्धशिक्षित असे अनेक बेरोजगार युवक आहेत. परिस्थितीअभावी किंवा माहितीच कमतरतेमुळे त्यांचे रोजगारासाठी किंवा शिक्षणासाठी शहरांकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. अशा युवकांना आपल्या व्यवसायाचा भाग बनवत ग्रामीण भागात ‘व्हिलेज डेव्हलपर्स’ म्हणून काम करण्यास तयार केलं, त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं. गावांची माहिती गोळा करणं, त्यांच्याशी व्यवसायाच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या कंपन्यांच्या उत्पादनांची गावोगावच्या बाजारांतून माहिती देणं, लीड जनरेट करणं, त्यांच्या उत्पादनांची प्रात्यक्षिकं सादर करणं, लोकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करणं, अशा स्वरूपाची कामं करण्यासाठी त्यांनी ‘व्हिलेज डेव्हलपर्स’चा योग्य प्रकारे उपयोग करून घेतला.
इथे काम करत असताना अजून एक गोष्ट लक्षात त्यांच्या आली, की ग्रामीण भागातल्या सर्वच बाजारपेठांमध्ये साधारणपणे अस्सल उत्पादनासारखी दिसणारी, त्यासारखीच किंवा नावांत साम्य असणारी अनेक उत्पादनं मोठ्या प्रमाणात येतात. लोकांच्या अडाणीपणाचा फायदा घेत ही उत्पादनं त्यांच्या माथी मारली जाऊन त्यांची मोठी फसवणूक होते. ‘व्हिलेज डेव्हलपर्स’च्या माध्यमातून रोजच्या वापरातील साध्या साध्या वस्तूंपासून ते खतं-बी-बियाणं खरेदी करताना काय काळजी घ्यावी म्हणजे त्यांची नकली मालापासून फसवणूक होणार नाही, हे त्यांनी लोकांना समजावून सांगितलं. त्यांच्या संस्थेशी व्यवसायाच्या निमित्ताने जोडल्या गेलेल्या काही राष्ट्रीय-बहुराष्ट्रीय कंपन्यांची अस्सल उत्पादनं या ‘व्हिलेज डेव्हलपर्स’च्या माध्यमातून त्यांनी गावागावांत उपलब्ध करून दिली. कधी कंपन्यांच्या माध्यमातून तर कधी ‘रूरल रिलेशन्स’च्या माध्यमातून. काम करण्याच्या बदल्यात या ‘व्हिलेज डेव्हलपर्स’ना दरमहा ४ ते ५ हजार रुपये मानधन मिळू लागलं. ‘गावातल्या तरुणांना गावातच काम’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली. त्याचा परिणाम असा झाला, की तरुणांना त्यांच्याच गावात रोजगार उपलब्ध झाला व तिथेच राहिल्यामुळे त्यांना इतर काही कामधंदा करत घरच्या शेतीकामातही हातभार लावता येऊ लागला. चांगल्या कंपन्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे व त्या कंपनीने त्यांना उत्तम व्यावसायिक प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांच्यातील ग्रामिणतेचा, मागासलेपणाचा न्यूनगंड जाऊन त्यांच्यात आत्मविश्वाणस निर्माण झाला व त्यातूनच स्वत:ची व कुटुंबाची प्रगती ते आज साधू शकले आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रासह नऊ राज्यांमध्ये अशा ३ हजारांपेक्षा जास्त तरुणांना या संकल्पनेतून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध झाला आहे.
हे काम करत असताना त्यांनी एक तत्त्व मात्र कायम जपलं आहे, ते म्हणजे कुठल्याही प्रकारे कुठल्याही कंपनीचं कुठलंही उत्पादन आपल्या ‘व्हिलेज डेव्हलपर्स’नी विकायचं नाही. आणि कंपन्यांनाही त्यांनी हे ठामपणे सांगितलं आहे, की ‘आमची संस्था ही ‘रूरल रिलेशन्स’वर उभी राहिली आहे. त्यामुळे तुमचं काम करतानाही आम्ही आमची सामाजिकता जपणार आहोत.’ तमुळे ग्रामीण भागात लोकांमध्ये या संस्थेविषयी विश्वाास निर्माण होण्यास हातभार लागला. संस्थेमार्फत ग्रामीण भागात संपर्काचं एक भक्कम जाळं उभं राहिलं आहे. ‘रूरल रिलेशन्स’ मार्फत व्यवसायाबरोबरच ग्रामीण भागासाठी राबवले जाणारे विविध उपक्रम असोत किंवा जनजागृतीचा कोणताही संदेश ग्रामवासीयांपर्यंत पोहोचवण्याचं काम असो, हे तरुण ‘व्हिलेज डेव्हलपर्स’ आज त्यासाठी महत्त्वाचं माध्यम बनले आहेत. नव्या काळाशी, नव्या माध्यमांशी, आजच्या गतिमान युगाशी ही तरुण मंडळी जोडली जावीत म्हणून लोखंडे यांनी त्यांना मोबाइल, ई-मेल, इंटरनेटची सोय करून दिली आहे.

अनिवासी गाववासी’ चळवळ
ग्रामीण भागात ‘रूरल रिलेशन्स’च्या माध्यमातून काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं, की संगणकासारखं प्रगत माध्यम अद्याप गावागावांमध्ये पोहोचलेलं नाही. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणकापासून कोसो दूर आहेत. २०००-२००१ च्या दरम्यानचा हा काळ असेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक हाताळणं तर सोडाच, पण संगणक कसा असतो, कसा दिसतो हेही माहीत नव्हतं. अशा परिस्थितीत गावातील शिक्षक फळ्यावर संगणकाचं चित्र काढून विद्यार्थ्यांना संगणकाची माहिती देत होते. शहरांमध्ये प्रत्येक मुलाच्या समोर एक संगणक, तर ग्रामीण भागातल्या २०० मुलांसाठी मिळून एकसुद्धा संगणक नसावा, ही विषमता प्रदीप लोखंडे यांना सतावत होती. हे चित्र बदलल्याशिवाय शहरातील व ग्रामीण भागातील मुलांमध्ये निर्माण झालेली ज्ञानाची दरी कधीच सांधली जाणार नाही, ही परिस्थिती त्यांना जाणवली. ग्रामीण भागातल्या संगणक नसलेल्या माध्यमिक शाळांची एक यादी त्यांनी तयार केली. या शाळांना संगणक मिळावेत म्हणून त्यांनी त्या शाळेतीलच विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री, पंतप्रधान तसंच काही उद्योगपतींना पत्रं लिहायला लावली; पण या पत्रांना संबंधितांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. लोखंडे यांनी याची कारणं शोधली तेव्हा काही उद्योगपतींनी त्यांना सांगितलं, की अशी मदतीची शेकडो पत्रं आम्हाला दररोज येत असतात. त्यात कोण गरजू आहे हे ठरवणं अवघड असतं व एवढ्या लोकांना प्रतिसाद देणंही शक्य नसतं. त्यावर लोखंडे यांनी संगणक नसलेल्या शाळांची यादी त्यांना दिली व त्या शाळांना संगणक देण्याचं आवाहन केलं. त्यातून काही संगणक मिळाले, ते त्यांनी शाळांपर्यंत पोहोचवले. अशा प्रकारे वैयक्तिक प्रयत्नांतून त्यांनी ‘रूरल रिलेशन्स’च्या माध्यमातून ५४० गावांमधील शाळांमध्ये ६०० संगणक मिळवून दिले, पण त्यातूनही सर्वच शाळांची संगणकाची गरज भागू शकत नव्हती.
उर्वरित गरजू शाळांची संगणकांची गरज भागवायची असेल तर काही तरी नावीन्यपूर्ण कल्पना राबवली पाहिजे, या विचारातून २००१ साली ‘एनआरव्ही’ या कल्पनेचा जन्म झाला. ‘एनआरव्ही’ म्हणजे ‘नॉन-रेसिडेन्ट व्हिलेजर्स- अनिवासी गाववासी’ चळवळ. गावातून नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने शहरात आलेले व नंतर शहरवासी झालेले लोक म्हणजे ‘अनिवासी गाववासी’. आपल्या गावासाठी काही तरी काम करावं अशी इच्छा यातील कित्येकांच्या मनात असते, परंतु दररोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत असं काम करायला उसंत मिळणं कठीणच. या लोकांची ही अडचण अचूक हेरून प्रदीप लोखंडे यांनी अशा ‘अनिवासी गाववासीं’पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला. ‘तुम्ही मागे वळून बघा व तुमच्या गावासाठी काही तरी करा’ असा साधा विचार त्यांनी या चळवळीतून मांडला. गावातील माध्यमिक शाळेत शिकणार्यार विद्यार्थ्यांनाच त्यांनी अशा लोकांची यादी करायला सांगितलं. त्यांचे शहरातील पत्ते मिळवून विद्यार्थ्यांनाच या लोकांना पत्रं पाठवायला सांगितली. ‘तुमच्याकडील जुन्या व्हर्जनचा संगणक फेकून न देता तो तुम्ही आम्हाला द्या. आम्ही तो ग्रामीण भागातल्या गरजू शाळांपर्यंत पोहोचवू,’ असं आवाहन त्यांनी या माध्यमातून केलं. काही लोकांना ते प्रत्यक्ष जाऊन भेटले. लोकांना ही संकल्पना मुळातूनच खूप आवडली. त्यामुळे त्यांनी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला व त्यांच्या वापरात नसलेले संगणक, संगणकाचे सुटे भाग उपलब्ध करून दिले. घरोघर फिरून त्यांनी हे सर्व गोळा केलं व त्यातून चांगल्या स्थितीतील संगणक शाळांपर्यंत पोहोचवले. संगणक कसा हाताळायचा याचं प्रशिक्षण विद्यार्थी व शिक्षकांना दिलं. फळ्यावर, पुस्तकात संगणकाचं फक्त चित्र पाहणारी मुलं सुरुवातीला भीतभीतच प्रत्यक्ष संगणक हाताळू लागली.
त्यांच्या या चळवळीला देशातूनच नव्हे तर परदेशांतूनही प्रतिसाद मिळाला. त्यातूनच त्यांनी आतापर्यंत ३६५० हून अधिक शाळांना संगणक मिळवून दिले. त्याही व्यतिरिक्त या उपक्रमानं प्रेरित होऊन अनेकांनी स्वतंत्रपणे शाळांना संगणक भेट दिले- तो आकडा आहे तब्बल २५ हजारांहून अधिक. त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामुळेच आज ग्रामीण भागातल्या अनेक गावांतली मुलांची एक पिढी संगणक साक्षर होण्यास मदत झाली आहे. स्पर्धेच्या नव्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी अशा उपक्रमांतून ते प्रयत्न करत आहेत.
२००७ साली त्यांच्या असं लक्षात आलं की आता मुलांना जुना संगणक देऊन उपयोग नाही. त्यामुळे त्यांनी या चळवळीच्या माध्यमातून आता जुना संगणक घ्यायचा नाही, नवीन संगणक कुणी दिला तरच तो घ्यायचा असं ठरवलं. मूळ संकल्पनेत हा बदल करत त्यांनी हे काम अविरतपणे सुरू ठेवलं आहे.


‘ग्यान की लायब्ररी’
संगणक शिक्षणाबरोबरच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठीही प्रदीप लोखंडे प्रयत्नशील आहेत. त्यांनी ‘रूरल रिलेशन्स’च्या माध्यमातून ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या ‘आकाशाशी जडले नाते’ या पुस्तकाच्या दोन हजार प्रती ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये पोहोचविल्या. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर ते पुस्तक वाचून त्यांना काय वाटलं, हे त्यांनी विद्यार्थ्यांना पत्र लिहून कळविण्यास सांगितलं. त्यातून तब्बल बत्तीस हजार मुलांनी त्यांना पत्रं लिहिली. लोखंडे यांनी स्वत: या सर्व मुलांच्या पत्रांना उत्तरं लिहिली. याचा परिणाम असा झाला, की ही सर्व बत्तीस हजार मुलं लोखंडे यांच्याशी कायमची जोडली गेली.
मुलांच्या या अशा प्रतिसादामुळेच त्यांच्यासाठी चांगलं वाचनालय असावं, याची निकड त्यांना जाणवली. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून ‘ग्यान की लायब्ररी’ हा नवा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, जी पुस्तकं त्यांना तिथे वाचायला मिळत नाही ती मिळावीत, वाचनामुळे त्यांच्या विचारांमध्ये-दृष्टिकोनामध्ये फरक पडावा आणि आजच्या जगाशी एकरूप होण्यासाठी त्यांना मदत व्हावी, असे उद्देश ठेवून या वाचनालयाचं काम त्यांनी सुरू केलं आहे. ज्या गावाची लोकसंख्या १० हजारांच्या आत आहे, ज्या शाळेत किमान २०० विद्यार्थी आहेत, जिथे मोठं ग्रंथालय नाही अशा शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यास त्यांनी प्राधान्य दिलं आहे. तिथल्या मुलांच्या डोक्यात येणार्या कोणत्याही विषयावरचं किमान एक तरी पुस्तक त्या वाचनालयात असावं, असा प्रयत्न त्यांनी केला आहे. एखाद्या शाळेत अशी ‘ग्यान की लायब्ररी’ सुरू करायची असेल तर त्या शाळेतीलच ८-१० मुलांना त्यांच्या संस्थेकडे पत्र पाठवायला सांगितलं जातं. त्यांना वाचनालयाची आवश्यकता का आहे, हे त्यांच्याच शब्दांत यावं अशी अपेक्षा त्यामागे असते. त्यातून निवडलेल्या शाळांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात येतो. हा उपक्रमसुद्धा पूर्णपणे लोकसहभागातून सुरू आहे. त्याची पद्धतही खूप पारदर्शी आहे. देणगीदाराकडून या वाचनालयासाठी पाच हजार रुपये देणगी मागताना देणगीचा धनादेश सरळ त्या प्रकाशकाच्या किंवा ग्रंथविक्रेत्याच्या नावाने घेतला जातो. तेवढ्या रकमेची जवळजवळ १७० पुस्तकं यादीसहित त्या शाळेलाच पाठवली जातात. पुस्तकं मिळाल्यावर त्या शाळेचे मुख्याध्यापक त्या देणगीदाराला शाळेच्या लेटरहेडवर पत्र लिहून कळवतात, की ‘तुम्ही दिलेल्या देणगीतून ही ही पुस्तकं आमच्या ‘ग्यान की लायब्ररी’ला मिळाली’. त्यानंतर विद्यार्थीही काही पुस्तकं वाचून त्या देणगीदाराला पत्र लिहून पुस्तकांचा अभिप्राय कळवितात. त्यामुळे त्या देणगीदाराला आपली देणगी सार्थकी लागल्याचं समाधान मिळतं. या सर्व शाळांतल्या वाचनालयाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच शाळेतील एक छोटीशी मुलगी ‘ग्यान की मॉनिटर’ म्हणून त्या वाचनालयाचं व्यवस्थापन सांभाळत आहे. त्यात त्यांनी अजून एक गोष्ट जाणीवपूर्वक केली आहे, ती म्हणजे त्यांनी त्या शाळेतील मुलांना आवाहन केलं, की तुमच्या वाढदिवसाला गोळ्या-बिस्किटं न वाटता त्या पैशांतून तुम्ही एखादं पुस्तक- मग ते ५ रुपयांचं असो, १० रुपयांचं असो किंवा ५० रुपयांचं असो- तुमच्या वाचनालयाला भेट द्या. मुलांनीही या कल्पनेला चांगला प्रतिसाद दिला. यातून त्या वाचनालयाची व्याप्तीही वाढत आहे व मुलांचं सामाजिक भानही. केवळ वाचनालय सुरू करून ते थांबले नाहीत तर या शाळांच्या ते सतत संपर्कात राहतात. यातून त्यांच्यातील वीण अधिकच घट्ट होत आहे.
त्यांच्याच वाई तालुक्यातील एका शाळेतून सुरू केलेल्या या उपक्रमाला आज समाजाच्या सर्व स्तरांतून मदतीचे हात लाभत आहेत. त्यामुळेच लोकसहभागातून त्यांनी गेल्या ४०० दिवसांत ‘दिवसाला एक’ याप्रमाणे ४०० शाळांमध्ये ‘ग्यान की लायब्ररी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या शाळांतील १ लाख ३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा मिळत आहे. या उपक्रमाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पुण्या-मुंबईपासून भंडा-यापर्यंत महाराष्ट्राच्या सर्व भागांत हा उपक्रम सुरू आहे. या वर्षी ‘दिवसाला किमान दोन’ वाचनालयं सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ई-मेल्स, पत्रं, एसएमएस, वैयक्तिक संपर्क, प्रसारमाध्यमं आदी माध्यमांतून ते लोकांना आवाहन करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रात चार हजार शाळांमध्ये अशा प्रकारची वाचनालयं उभारण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानाची दारं खुली करणारा व वाचनसंस्कृतीला वाढावा देणारा आहे.
हे सगळं करत असताना त्यांना कित्येक वेळा लोकांकडचा नकारही पचवावा लागला आहे, मनस्तापही सहन करावा लागला आहे; पण त्यांनी ना ध्यास सोडला, ना प्रयत्न सोडले. त्यांची ‘रूरल रिलेशन्स’ ही मुळातच एक ‘प्रोफेशनल संस्था’ आहे, ती ‘एनजीओ’ नाही. ती कुणावर अवलंबून नाही. म्हणजे अमुक एक फंड आला तरच ते काम करायचं, असं अजिबात होत नाही. त्यामुळे त्यांच्या डोक्यात असलेल्या कल्पना त्यांना मूर्त स्वरूपात आणता येतात. त्यात त्यांनी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळविला आहे. गावातील सगळ्या लोकांना एकत्र आणून परिणामकारक काम उभं करण्याचा एक चांगला मेळ लोखंडे यांनी साधला आहे. या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक नामवंत कंपन्यांबरोबर काम करत असताना त्यांनी ‘बिझनेस’ आणि ‘आयडॉलॉजी’ या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधल्या आहेत. व्यवसायामध्ये या दोन गोष्टींचा कधीच मेळ साधला जात नाही असं म्हटलं जातं, पण त्यांनी ते प्रयत्नपूर्वक सिद्ध करून दाखवलं आहे. ही त्यांची मोठी अचीव्हमेंट आहे.
आज त्यांच्याकडे तब्बल २८००० गावांची अद्ययावत माहिती आहे. ती त्यांनी पोस्टकार्डावरून, आंतरदेशीय पत्रांवरून मिळवली आहे, जतन केली आहे व अपग्रेड केली आहे. गावोगावची एवढी प्रचंड अद्ययावत माहिती आपल्या शासनाकडेही असेल की नाही याबाबत शंका आहे. त्यांच्या कल्पकतेचं वेगळेपण त्यांनी व्यवसायाच्या निमित्ताने सुरू केलेल्या ‘रूरल रिलेशन्स’च्या वेबसाइटवरूनही सहज जाणवतं. अतिशय नावीन्यपूर्णता त्यांनी त्यात आणली आहे. ग्रामीण भागातील जनजीवन दाखविणारे अनेक व्हिडिओज आणि छायाचित्रं त्यावर दिली आहेत. त्यांच्या विविध उपक्रमांची माहिती त्यावर त्यांनी विस्ताराने दिली आहे.
एकीकडे ग्रामीण भागात व्यवसायाच्या बरोबरीने असे अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवत असताना आपलं आगळं-वेगळं मॉडेल ते ‘आयआयएम’, ‘आयएमडीआर’, ‘सिम्बायोसिस’, ‘सेंट झेव्हियर्ससारख्या अनेक नामांकित मॅनेजमेंट संस्थांतून शिकवत आहेत. जागतिक स्तरावर मान्यता मिळवलेले मार्केटिंग गुरू फिलिप कोटलर यांनी त्यांच्या मार्केटिंग संदर्भातल्या मार्गदर्शक पुस्तकात प्रदीप लोखंडे यांनी व्यवसायाच्या निमित्ताने ग्रामीण भागात उभ्या केलेल्या आगळ्या-वेगळ्या मॉडेलचा ‘केसस्टडी’ म्हणून समावेश केला आहे. ही नक्कीच नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे. इंटरनेटच्या आजच्या गतिमान युगातही लोखंडे यांनी पोस्टकार्डावर पत्र लिहिणं सोडलेलं नाही. दिवसाला त्यांना किमान १५०-२०० पत्रं सहज येत असतात. त्यांच्या या उपक्रमांतून साह्य मिळालेल्या मुलांची कृतज्ञता व्यक्त करणारी १८ हजारांहून अधिक पत्रं लोखंडे यांना आली आहेत व तो ओघ आजही सुरूच आहे. ही सर्व पत्रं न्याहाळताना लोखंडे नकळतपणे त्या पत्रांतील अक्षरांमध्ये त्या मुलांच्या चेहर्या वरील अवर्णनीय आनंद वाचत असतात. आपण निमित्तमात्र असलेलं काम बर्याुच प्रमाणात सार्थकी लागल्याचं समाधान त्यांना यातून मिळतं.
ग्रामीण भागातून शहरात येऊन व्यवसायात स्थिरावलेले प्रदीप लोखंडे हेही तशा अर्थानं ‘अनिवासी गाववासी’च. ज्या मातीतून आपण आलो, ज्या मातीच्या बळावर आपण घडलो त्या मातीसाठी काही तरी काम करून ‘गिव्हिंग बॅक’ची भावना जोपासण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ग्रामीण भारताचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी असे अनेक ‘अनिवासी गाववासी’ निर्माण होणं गरजेचं आहे.







-महेंद्र मुंजाळ
मोबाइल: ९८५०५९८४८७
mahendra.munjal@uniquefeatures.in
प्रदीप लोखंडे
पुणे- ४११०१३
मोबाइल : ९८२३०१४१५०
pradeep@ruralrelations.com
वेबसाइट : www.ruralrelations.com






by - http://uniquefeatures.in

नवीन उद्योजकांसाठी मराठीतून व्हिडीओ ब्लॉग, पुण्याच्या अविनाश जोशी यांचा अभिनव प्रयोग



देशात मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या दोन्ही अभियानाची जोरदार सुरवात झाली आहे. भारतात उत्पादन व्हावं यासाठी मेक इन इंडिया तर, नवीन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी स्टार्टअप इंडिया ही अभियाने राबवण्यात येत आहेत. या दोन्हीचा फायदा महाराष्ट्राला मिळावा यासाठी मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहाला पण सुरवात होणार आहे. एकूणच देशाची आणि राज्याची उद्योजकतेकडे जोमाने वाटचाल सुरु आहे.

तरीही अजूनही काही तरुणांना उद्योजक कसं बनावं. स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करावा असा संभ्रम आहेच. यावर अभिनव मार्ग शोधून काढला आहे पुण्याचा आन्त्रप्रेनियर्स ट्रेनिंग फाऊन्डेशनच्या अविनाश जोशी यांनी. जोशी यांनी युवकांना नवीन व्यवसाय कसा सुरु करावा आणि तो कसा वाढवावा याची माहिती मिळावी यासाठी चक्क मराठी ब्लॉग सुरु केला आहे.

अविनाश जोशी हे गेली २५ वर्ष व्यवसाय मार्गदर्शन क्षेत्रात कार्यरत आहेत. व्यवसाय सुरु कसा करावा, तो कसा वाढवावा याचं मार्गदर्शन ते गेली अनेक वर्ष करत आहेत. त्यांच्या अनुभवानुसार अनेक युवक व्यवसाय सुरु करतात पण तो यशस्वीपणे चालवणं शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा असे व्यवसाय बंद पडतात.









देशात सुमारे ६ कोटी छोटे उद्योजक आहेत. नवीन उद्योजकांसाठी मुद्रा बँके माध्यमातून ९३ हजार कोटी रुपयांचं कर्ज देण्यात येणार आहे. याची माहिती युवकांना मिळावी. तसंच कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय कसा सुरु करावा. व्यवसाय सुरु केल्यावर तो कसा वाढवायचा, नफा कसा कमवायचा, उच्च दर्जाची ग्राहक सेवा कशी द्यावी, आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग कसं करावं. याबाबत युवकांना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचं जोशी यांना जाणवलं. व्यवसाय मार्गदर्शन करण्यासाठी वेगळा प्रयोग करावा या उद्देश्याने अविनाश जोशी यांनी 'ETF Video Blog ।।ग्राहक देवो भवः।।'. (etfvideoblog.blogspot.in) हा व्हिडीओ ब्लॉग सुरु केला.

हा ब्लॉग सामान्य युवकांना समजावा यासाठी त्यांनी मराठी मध्ये हा ब्लॉग सुरु करायचा निर्णय घेतला. व्यवसाय वृद्धी विषयी वेगवेगळ्या विषयावर माहिती देणारा हा ब्लॉग आहे. प्रत्येक सोमवारी एका नवीन विषयावर या ब्लॉग च्या माध्यमातून माहिती दिली जाते. ५ ते ६ मिनिटांचा प्रत्येक व्हिडीओ असून, अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत माहिती दिली जाते. जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आलेला हा व्हिडीओ ब्लॉग ५२ आठवडे सुरु राहणार आहे.

तुम्हाला एखादा नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे का? पण सुरवात कशी करायची हे जाणून घेण्यासाठी 'ETF Video Blog ।।ग्राहक देवो भवः।।'. (etfvideoblog.blogspot.in) या ब्लॉग ला भेट द्या. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन या ठिकाणी होईल.






अविनाश जोशी यांनी हा ब्लाॅग सुरु करून पाच आठवडे झाले आहेत. पण या ब्लॉग च्या माध्यमातून मिळणारी माहिती ही उपयुक्त असल्याने त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसंच यावर अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली जात असल्याने समजायला सोपी आहे. तसंच मोबाईल फोन च्या माध्यमातून इंटरनेट उपलब्ध झाल्याने, मोबाईल फोनवरही हा ब्लॉग बघणं शक्य झालं आहे.

नवीन उद्योजकांसाठी सरकार अनेक नवीन योजना सुरु करत आहे. पण त्याची माहिती युवकांना मिळत नाही. त्यामुळे अनेक नवीन व्यावसायिक व्यवसाय सुरु करतात आणि यशस्वी न झाल्याने व्यवसाय पुन्हा बंद करतात. पण 'ETF Video Blog ।।ग्राहक देवो भवः।।'. (etfvideoblog.blogspot.in) या व्हिडीओ ब्लॉग च्या मदतीने नवीन उद्योजकांना नक्कीच चालना मिळेल.















by - https://marathi.yourstory.com/read/922744a593/new-video-blog-for-entrepreneurs-in-marathi-pune-avinash-joshi-innovation

माझ्याबद्दल