गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

लॉकडाऊन दरम्यान पृथ्वी घेतेय मोकळा श्वास, नासाचे फोटो पाहून व्हाल चकित...

लॉकडाऊन दरम्यान पृथ्वी घेतेय मोकळा श्वास, नासाचे फोटो पाहून व्हाल चकित

कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनचा  (Lockdown)परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असला तरी देश मात्र प्रदुषणमुक्त होत आहे. नद्या स्वच्छ होत आहेत. हिमालय जालंधरवरून दिसत असल्याचा फोटो नुकताच व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक प्राणी देखील या वातावरणात मोकळा श्वास घेत आहेत. यासोबतच लॉकडाऊनमुळे पर्यावरणावर (Air pollution) मोठ्या प्रमाणात चांगला परिणाम होताना पाहण्यास मिळत आहे. नासानं देखील याबाबतची पुष्टी केली आहे.
नासानं (NASA) हे फोटो मॉडरेट रिझॉल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडियोमीटर टेरा सॅटेलाईटद्वारे घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे भारतातील (INDIA) प्रदुषणाची समस्या नाहीशी झाली आहे. नासानं म्हटलं आहे की, भारतातील प्रदुषणाचा स्तर कमी झाला आहे. एयरोसोलचे ढग नाहीसे झाले आहे. नासाच्या सेटेलाईट सेंसरनं भारताचे जे फोटो काढले आहेत, ते आश्चर्यकारक आहेत. २०१६ पासून ते आतापर्यंतचे फोटो पाहून प्रदुषणातील फरक त्वरित लक्षात येतो.
नासानुसार, उत्तर भारतात हवेचे प्रदुषण सर्वाधिक निचांक पातळीवर आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर उत्तर भारतातील हवेतील प्रदुषणाचा स्तर कमी झाला आहे.
नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरचे शास्त्रज्ञ पवन गुप्ता यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, “लॉकडाऊन दरम्यान आम्हाला बर्‍याच ठिकाणी वातावरणीय रचनेत बदल जाणवला. परंतु यावर्षी मी इंडो-गंगेटिक प्लेनमध्ये एरोसोलची मूल्ये इतकी कमी कधी पाहिली नाहीत. शटडाऊनच्या पहिल्या आठवड्यात वैज्ञानिकांनी एरोसोलच्या पातळीत घट नोंदवली होती. २७  मार्चच्या सुमारास उत्तर भारतातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे हवा साफ होण्यास मदत झाली."
भारतीय पर्यावरणीय संस्था केअर फॉर एअरचे सह-संस्थापक ज्योती पांडे लवकरे यांनी सांगितलं की, "मी गेल्या १० वर्षांत इतकं चांगलं वातावरण नाही पाहिलं आहे. 
नासाच्या मोडिस एयरोसोल प्रोडक्ट्सचे प्रोग्राम प्रमुख रॉबर्ट लेव्ही म्हणाले की, भारतात हवा स्वच्छ होण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. केवळ हवाच नाही तर जमीन, पाणी देखील स्वच्छ झाले आहे. भारतानं असे प्रयत्न करायला हवे ज्याद्वारे वातावरण एवढे स्वच्छ राहील.

रामायणाचं पुनर्प्रक्षेपण...

रामायणाचं पुनर्प्रक्षेपण संपलं. पुन्हा एकदा इतिहास घडवुन.
२०१५ मध्ये चालु झालेल्या मालिकांच्या लोकप्रियता मोजण्याच्या पद्धतीनुसार रामायण तेव्हापासुन आजपर्यंत सर्वात जास्त लोकांकडुन पाहिली गेलेली मालिका ठरली. ३३ वर्षांपूर्वीचा हाच इतिहास पुन्हा एकदा घडवत.
नाक मुरडणाऱ्यांनी तेव्हाही नाकं मुरडली आणि आताही. तेव्हा म्हणे केबल नसल्यामुळे, एकच वाहिनी आणि पर्याय नसल्यामुळे जे दाखवतील ते लोकप्रिय व्हायचं. आणि आता लोकांना घरात बसुन दुसरं काम नाही, त्यामुळे पुन्हा. पण त्याच टीव्हीवर बाकी इतक्या मालिका असताना, आणि आज तर इतक्या वाहिन्या, नेटफ्लिक्स, प्राईमवरच्या सिरीज सारखे हजारो पर्याय असताना, डेटा इतका स्वस्त असताना हे बाकीच्या मालिकांना का जमलं नाही?
आणि रामायण दाखवण्यातसुद्धा धार्मिक अजेंडा शोधणाऱ्यांना तर शत शत प्रणाम. एक एक करत रामायण, महाभारत सोबतच चाणक्य, व्योमकेश बक्षी, सर्कस, शक्तिमान हे सर्वच सुरु झालं. तरीही रामायणाने पुन्हा जी लोकप्रियता गाठली ती दुसऱ्या कोणाला जमली नाही. महाभारतला दुसरी वाहिनी (डीडी भारती) आणि थोडी विचित्र वेळ याचा फटका बसला असावा, नाही तर त्या मालिकेतही तेवढी शक्ती आहे.
i1
या कथांचा आपल्या संस्कृतीवर, आपल्या समाजमनावर जो पगडा आहे तोच यातुन ठळक दिसुन येतो. आणि हे लोक सामान्य लोकांपासुन पार तुटलेले आहेत हेही दिसुन येतं. ह्यांच्या रडगाण्याकडे साफ दुर्लक्ष करत लोकांनी पुन्हा रामायणाचा आस्वाद घेतला. तुम्ही सामान्य लोकांपासुन दूर ज्या कुठल्या पातळीवर पोचला आहात, तिथेच खुश असा.
कोरोना संकटाच्या ह्या काळात रामायण दाखवल्याबद्दल दूरदर्शनचे खुप आभार.
एका अलौकिक युगपुरुषाची हि कथा किती प्रेरणा देते, शिकवण देते. कुटुंबातल्या प्रत्येक नात्याची महती, प्रत्येक नातं निभावण्याची आदर्श सांगुन जाते.
मला रामायण, महाभारत या कथांचं लहानपणापासुन खुप आकर्षण आहे. त्या कथा मी वेगवेगळ्या रूपात वाचल्या. रामायण फार आदर्शवादी आहे, त्यात साधी साधी माणसं देवासारखी वाटतात. महाभारत जास्त सामान्य माणसाच्या जवळ आहे. त्यामुळे साहजिक अलीकडच्या काळातले लेखक आणि कादंबरीकार यांचं त्यावर जास्त प्रेम आहे. म्हणुन ते जास्त वाचनात आलं.
रामायण लहान मुलांची पुस्तकं, आणि काही थोडी विस्तीर्ण पुस्तक यापलीकडे वाचनात नाही आलं. रामायण मालिका मी लहान असताना संपलेली होती. पण जय हनुमान, जय वीर हनुमान अशा मालिकांमधून ती कथा पाहण्यात आलं होतीच.
आपल्या पुराणकथा वाचताना एक लक्षात येतं कि त्यात खुप वेगवेगळी रूपं आहेत. विष्णु पुराणात विष्णूची महती जास्त, शिव पुराणात शंकराची महती जास्त असा प्रकार आहे. आणि प्रत्येक लेखकाने आपल्या भक्तिभावाने, आपल्या समजुतीनुसार, कल्पनेनुसार त्यात भर घातली आहे. बदल केले आहेत.
एक साधा खेळ असतो, कि एकाच्या कानात काही तरी सांगायचं, त्याने दुसऱ्याच्या कानात काही तरी सांगायचं आणि मग असं दहा बारा लोकांपर्यंत पोचेपर्यंत त्यात मूळ गोष्टीतलं किती उरेल आणि बाकी मीठ मसाला किती असेल सांगता येत नाही.
या कथा हजारो वर्षांनी आपल्यापर्यंत पोचेपर्यंत त्यात किती चमत्कृती, अतिशयोक्ती यांची भर पडली असेल सांगता येत नाही. पण मला वाटतं हे सगळे थर बाजूला करून हजारो वर्षांपूर्वी खरंच हे महान लोक जन्माला येऊन गेलेच असावेत. त्याशिवाय त्यांच्या चरित्राचा इतका पगडा आशियातल्या इतक्या देशांमध्ये उमटला कसा.
त्यांच्या वास्तव्याच्या भारतात ज्या काही खुणा सांगितल्या जातात त्या सगळ्या खऱ्या असतील असं नाही. पण त्यांच्या नंतरही पराक्रमी राजे महाराजे सम्राट, संत महात्मे होऊन गेलेच कि. त्यांच्यापैकी कोणीही इतका प्रचंड प्रभाव टाकून गेले नाहीत.
या कथेमधल्या चमत्कृती, अति नाट्यमय प्रसंग यापैकी काही गोष्टी नक्कीच नंतर आल्या असतील. पण आगीशिवाय धूर उमटत नाही तसा मुळात त्या व्यक्तींचं आयुष्य श्रेष्ठ असल्याशिवाय हे वरचे दागदागिने त्यांना शोभूनही दिसले नसते.
रामानंद सागर यांनी मालिकेच्या शेवटी अत्यंत विनम्रपणे इतक्या संतांच्या विविध रामायणातून आमच्या छोट्याशा झोळीत जे मावेल तेवढं आम्ही प्रामाणिक पणे सादर केलं, चुकलो असु तर माफ करा असं सुंदर निवेदन केलं.
अगदी त्या कथेतल्या पात्रांना शोभेल अशाच भाषेत आणि भावातलं ते निवेदन ऐकून मला काही तरी सापडल्या सारखं वाटलं.
३३ वर्षांपूर्वी तंत्रज्ञान, त्याहूनही भारतीय चित्र सृष्टीतलं तंत्रज्ञान आज इतकं प्रगत नसताना त्यांनी ज्या ताकदीने रामायण सादर केलं, त्याला खरंच तोड नाही. त्या मालिकेतून भक्तिभाव ओसंडून वाहतो.
नंतर कित्येक रामायण, हनुमान, विष्णु यांवर मालिका बनल्या, पण कशालाही त्याची सर आली नाही.
आणि तरीही त्यांचा तो विनम्रपणा पाहुन मला रामायणातलं एक गुज सापडलं. विनम्रपणा, भक्तिभाव, समर्पण वृत्ती.
रामायणातील प्रत्येक पात्र बाकीच्यांना प्रचंड आदर, प्रेम आणि समर्पण वृत्तीने वागवतं. राम पित्यासाठी, त्याच्या वचनासाठी राज्य सोडतो. सीता नवऱ्यासाठी, लक्ष्मण मोठ्या भावासाठी राजमहाल सोडतो. भरत मोठ्या भावासाठी, आणि न्याय्य वारसदारासाठी राज्य परत करतो. शत्रुघ्न एकटा महालात राहुन कुटुंबाला सांभाळतो. हनुमान सुग्रीवामागे किष्किंधे बाहेर राहतो, आणि मग रामासाठी पराक्रम गाजवतो. सुग्रीव मित्रासाठी आपली सेना आणि राज्य पणाला लावतो. इंद्रजित आणि कुंभकर्ण आपल्या पित्यासाठी, भावासाठी राम लक्ष्मणाच्या दिव्यत्वाची प्रचिती येऊन सुद्धा प्राण पणाला लावतात.
अतिशय पराक्रम गाजवुन, यश मिळवुन पुन्हा पुन्हा सर्व जण याचं श्रेय एकमेकांना, एकमेकांच्या मदतीला, प्रेमाला, आशीर्वादाला देत राहतात. कोणीही आपल्या त्यागाचं भांडवल करू पाहत नाही. उलट दुसऱ्याची महती गात राहतात.
कोणीही मला कुटुंबाकडून, देवाकडून, देशाकडून काय मिळालं याचा कधीच विचार करत नाहीत. उलट आपलं कर्तव्य काय, आपला धर्म काय याचाच विचार करत राहतात.
माणसाला मोठं व्हायचं असेल तर कर्तव्य ओळखणं, ते निभावणं हाच मार्ग आहे. आपल्या कुटुंबाचा, पूर्वजांचा मान राखणं, आणि आपल्या पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असं आयुष्य जगणं हि आपली जबाबदारी आहे. आपल्या स्वतःच्या आणि आपल्या घरच्यांच्या शब्दाची किंमत आपण राखु तेवढीच.
आणि कितीही मोठे झालो तरी आपल्या कुटुंबासमोर, मित्रांसमोर, गुरूंसमोर, उपकर्त्यांसमोर, आपल्या सेवक आणि कनिष्ठांसमोर सदैव विनम्र राहिलं पाहिजे. हाच त्यांचा संदेश आहे.
अर्थात रामकथेत ज्या काही त्रासदायक गोष्टी (वालीचा वध, सीतेची अग्नी परीक्षा, सीतेला सोडणं) आहेत, त्याबद्दल नेहमी मन साशंक असतं. उत्तर रामायण तर मूळ रामायण नाही नंतर जोडण्यात आलेला भाग आहे असंही वाचनात येतं.
पण त्याबद्दल विचार करताना एक जाणवतं कि तो काळच वेगळा होता. त्या काळातल्या लोकांना आजचे मापदंड लावुन चालणार नाही.
प्रत्येक पिढीत इतका बदल होत जातो, कि ५०-६० वर्षांपूर्वीच्या लोकांना आपल्या सारखं धरून तोलू शकत नाहीत. हजारो वर्ष आधीच्या नायकांना कसं जोखणार?
आजकाल जे इंग्रजीमध्ये अर्ध्या हळकुंडात पिवळे होऊन या कथा आपल्या संकुचित विचारांनी मोडतोड करत सादर करण्याचं पेव फुटलेलं आहे, तेवढंच वाचुन आणि खरं मानुन लोक वादविवाद करतात तेव्हा त्यांची कीव करावी वाटते.
आजचं तंत्रज्ञान, चित्रपट मालिकांमध्ये झालेल्या सुधारणा, उत्कृष्ट नटांची वाढलेली संख्या या सगळ्यांचा पूर्वग्रह मनात ठेवुन हे रामायण पाहिलं तर अवघड आहे.
पण ३३ वर्षांपूर्वीचा आजच्या तुलनेतला भाबडेपणा, जुनं तंत्रज्ञान, आणि रामानंद सागर यांचा प्रामाणिक प्रयत्न याकडे पाहिलं तर त्याचं महत्व कळतं.
त्यामुळे या कठीण काळात रामानंद सागर कृत रामायण पाहण्याचा योग आला हि देवाचीच कृपा. नाहीतर याची सीडी, डीव्हीडी उपलब्ध असूनही पाहण्याचा कधी योग येणं अवघड होतं. आणि तेही इतक्या मोठ्या प्रमाणात आजच्या पिढीतल्या लोकांनी पाहणं तर फार अवघड.
त्यानिमित्ताने आता पुन्हा यावर चर्चा सुरु झाली, नेट फोरम्स वर याबद्दलचे प्रश्न दिसु लागले. मी सध्या बऱ्याचदा तशाच भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतोय.
माझ्या सारख्या अनेकांना तर पुन्हा रामायण वाचुन काढण्याची इच्छा हि झाली असेल.
हि मालिका बघुन खुप सकारात्मकता मिळाली, अनेक भावुक क्षण मिळाले, लोकांचं आणि नात्यांचं महत्व पुन्हा कळलं.
सतत वाईट आणि चिंताजनक बातम्यांचा भडीमार होत असताना मनाला उभारी देणारं असं काही तरी समोर यावं हि रामाचीच इच्छा असावी.















by-misalpaav.

अवघ्या २४ तासांत कॅन्सरने घेतला दोन दिग्गजांचा जीव...

0
1
2
3
4
5
6
7
8
9
0
1
2
3
4
5
6
7

1
2
3
4
5
6
7
8
9
0
1
2
3
4
5
6
7
8
9
0
1
2
3
4
5
6
7

 | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 30 Apr 2020, 11:50:00 AM

भारतीय सिनेप्रेमींसाठी गेले २४ तास हे एखाद्या काळ्या दिवसाप्रमाणेच होते. भारताने गेल्या २४ तासांमध्ये देशातील हरहुन्नरी अभिनेत्यांना गमावलं. त्यांची पोकळी भरून काढणं कोणालाही शक्य नाही.

 
irfaan-rishi
irfaan-rishi
मुंबई- भारतीय आणि सिनेप्रेमींसाठी गेले २४ तास हे एखाद्या काळ्या दिवसाप्रमाणे होते. अवघ्या २२ तासांमध्ये देशाने इरफान खान आणि ऋषी कपूर या दोन महान कलाकारांना कायमचं गमावलं. २९ एप्रिलला इरफान खान यांचं निधन झालं तर आज ३० एप्रिलला ऋषी यांनी जगाचा निरोप घेतला.

अमेरिकेत केले होते उपचार
३ ऑक्टोबर २०१८ ला ऋषी यांना कर्करोग असल्याचं कळलं होतं. यानंतर उपचारांसाठी ते अमेरिकेत गेले होते. ११ महिने ११ दिवसांच्या उपचारांनंतर ते भारतात परतले होते. मुंबईत आल्यानंतर चाहत्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं होतं.

सदाबहार अभिनेते ऋषी कपूर यांचं मुंबईत निधन
ऋषी यांनी आज घेतला अखेरचा श्वास

भारतात परतल्यानंतरही त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी नव्हती. अनेकदा त्यांना श्वसनाचे त्रास जाणवले. बुधवारी त्यांना सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. आज सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राण ज्योत मालवली. दोन वर्ष ते ल्यूकेमिया आजाराशी लढा देत होते.

ऋषींच्या आठवणीत ढसाढसा रडले रजा मुराद

काल इरफान खानचं झालं निधन

बुधवारी बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं निधन झालं होतं. मुंबईतील कोकिलाबेन इस्पितळात वयाच्या ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फेब्रुवाली २०१८ मध्ये इरफानला कॅन्सर असल्याचं समोर आलं होतं. दोन वर्षांनंतर कॅन्सरशी सुरू असलेल्या लढाईत त्यांनी हार मानली कोलन इन्फेक्शनमुळे त्यांचं निधन झालं.


इरफानचे अखेरचे शब्द, अम्मा मला न्यायला आलीय

लॉकडाउनमध्ये झाले अंत्यसंस्कार

वर्सोवा येथील स्मशानभूमीत इरफान खान यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लॉकडाउनमुळे फक्त २० जणांना अंतयात्रेत जाण्याची परवानगी दिली होती. याशिवाय स्मशानभूमीत घरातल्या फक्त ५ जणांना जाण्याची परवानगी होती.


माझ्याबद्दल