कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनचा (Lockdown)परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असला तरी देश मात्र प्रदुषणमुक्त होत आहे. नद्या स्वच्छ होत आहेत. हिमालय जालंधरवरून दिसत असल्याचा फोटो नुकताच व्हायरल झाला होता. त्यानंतर अनेक प्राणी देखील या वातावरणात मोकळा श्वास घेत आहेत. यासोबतच लॉकडाऊनमुळे पर्यावरणावर (Air pollution) मोठ्या प्रमाणात चांगला परिणाम होताना पाहण्यास मिळत आहे. नासानं देखील याबाबतची पुष्टी केली आहे.
नासानं (NASA) हे फोटो मॉडरेट रिझॉल्यूशन इमेजिंग स्पेक्ट्रोरेडियोमीटर टेरा सॅटेलाईटद्वारे घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे भारतातील (INDIA) प्रदुषणाची समस्या नाहीशी झाली आहे. नासानं म्हटलं आहे की, भारतातील प्रदुषणाचा स्तर कमी झाला आहे. एयरोसोलचे ढग नाहीसे झाले आहे. नासाच्या सेटेलाईट सेंसरनं भारताचे जे फोटो काढले आहेत, ते आश्चर्यकारक आहेत. २०१६ पासून ते आतापर्यंतचे फोटो पाहून प्रदुषणातील फरक त्वरित लक्षात येतो.
नासानुसार, उत्तर भारतात हवेचे प्रदुषण सर्वाधिक निचांक पातळीवर आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर उत्तर भारतातील हवेतील प्रदुषणाचा स्तर कमी झाला आहे.
नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरचे शास्त्रज्ञ पवन गुप्ता यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, “लॉकडाऊन दरम्यान आम्हाला बर्याच ठिकाणी वातावरणीय रचनेत बदल जाणवला. परंतु यावर्षी मी इंडो-गंगेटिक प्लेनमध्ये एरोसोलची मूल्ये इतकी कमी कधी पाहिली नाहीत. शटडाऊनच्या पहिल्या आठवड्यात वैज्ञानिकांनी एरोसोलच्या पातळीत घट नोंदवली होती. २७ मार्चच्या सुमारास उत्तर भारतातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस पडला आणि त्यामुळे हवा साफ होण्यास मदत झाली."
भारतीय पर्यावरणीय संस्था केअर फॉर एअरचे सह-संस्थापक ज्योती पांडे लवकरे यांनी सांगितलं की, "मी गेल्या १० वर्षांत इतकं चांगलं वातावरण नाही पाहिलं आहे.
नासाच्या मोडिस एयरोसोल प्रोडक्ट्सचे प्रोग्राम प्रमुख रॉबर्ट लेव्ही म्हणाले की, भारतात हवा स्वच्छ होण्याचा यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही. केवळ हवाच नाही तर जमीन, पाणी देखील स्वच्छ झाले आहे. भारतानं असे प्रयत्न करायला हवे ज्याद्वारे वातावरण एवढे स्वच्छ राहील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा