गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

छत्रपती शिवाजी महाराज आणि लॉकडाऊन..

छत्रपती शिवाजी महाराज यांनी तब्बल १३२ दिवस. म्हणजे २ मार्च १६६० ते १२ जुलै १६६० एवढा काळ
छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ गडाच्या वेढ्यात काढला.
तो ही एक प्रकारे लॉकडाऊनचा प्रकार होता. आणि त्यावेळी त्यांच्यासोबत घरातील कुटुंबातील कोणीच मंडळी उपस्थित नव्हती. गडावर ना टीव्ही,ना मोबाईल,ना इंटरनेट,नाही कोणी संस्था-मंडळ, किंवा नेते घरपोच अन्न पुरवत होते. तरीही त्यांनी १३२ दिवस म्हणजे जवळजवळ ४ महिने त्या
लॉकडाऊनचा सामना केला. आणि आज आपल्याला आपल्याच घरी आपल्या कुटुंबासोबत, सर्व सोयी सुविधा असताना सुद्धा २१ दिवस गप्प घरी बसवत नाही.मग आपण शिवरायांच्या मातीत जन्माला येऊन काय उपयोग आणि आपल्याला काय अधिकार शिवरायांचे नाव घेण्याचा. बघा विचार करा जर आपण आपल्या राजांचा इतिहास मनापासून जगलो तर शिवचरित्र आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नक्कीच देते.नुसते जय शिवराय बोलून उपयोग नाही शिवराय मनात,आणि डोक्यात शिरायला हवेत.
















by- unknown..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल