बुधवार, १२ डिसेंबर, २०१८

कोणता व्यवसाय सुरु करावा ? व्यवसाय करायला कोणते गुण हवे ?...



कोणता व्यवसाय सुरु करावा ?

कोणता व्यवसाय सुरु करावा ? अनेकजण ह्या प्रश्नाच उत्तर शोधताना दिसतात. प्रश्न लहान आहे. पण उत्तर नाही. ह्या प्रश्नाच उत्तर तुमच जीवन बदलू शकत. ह्या प्रश्नाच्या उत्तराने तुम्ही जगही बदलू शकता.
बदल

मागील १० वर्षात कोणते व्यवसाय जन्माला आले ? आणि कोणते नाहीसे झाले ?

Coin box, आठवतात का ? काही वर्षा अगोदर जागोजागी दिसणारे Coin box आता कुठे आहे ? सर्वांच्या घरी दिसणारे Kodak कॅमेरा रोल कुठे आहेत ? Cassettes, Radio कुठे आहेत ? जर तुम्हाला कोणी १० वर्षा आधी सल्ला दिला असता ह्या पैकी काही व्यवसाय कर तर काय झाले असते ? १० वर्षात काही नवीन व्यवसाय पण जन्माला आलेत म्हणा. ऑनलाइन शॉपिंग, तिकीट बुकिंग, मोबाइल recharge सेंटर, Mobile चा विमा पण आलाय. आधी लोकांना दूरदर्शन पाहून मजा यायची पण आज शेकडो tv channels कमी पडून लोकांना youtube पाहिजे आहे. मागील १० वर्षात काही व्यवसाय जन्माला आले तर काही मरण पावले. मग मी कोणता व्यवसाय करावा ?

तुम्हाला एक गोष्ट दिसून येईल कि जग बदलत आहे, आणि ते आता फार वेगाने बदलत आहे. तुम्ही कल्पना केली कि माझा फोन पाण्यात पण चालावा आणि काही वर्षात तसे फोन आले पण. तुम्ही कल्पना केली कि घर बसल्या मला खरेदी करता यावी आणि आता आपण ते करत पण आहोत. घरबसल्या आपल्या नातेवाईकांना आपण पैसे पाठवू शकतो. आता तर नवीन 3d प्रिंटर येत आहेत. आपण घरी बसल्या अनेक वस्तू आता प्रिंट करू शकतो. हे सर्व सांगण्याचा उद्देश काय ? तर मी कोणता व्यवसाय करू हा प्रश्न आजच्या जगात योग्य प्रश्न नाही.
बरोबर प्रश्न कोणता ?

मी या जगाला काय देऊ शकतो ? मी हे जग आणखी चांगले कसे करू शकतो ? माझ्यात असे कोणते गुण / कला आहेत ? ज्यांच्या मदतीने मी हे करू शकतो ?

ह्या जगात चांगले काम करायला आपल्याला फक्त समाजकार्य करावे लागेल असे नाही. आज Jack Ma यांनी चीन मध्ये Alibaba.com हि वेबसाईट सुरु केली, यामुळे अनेक छोटे व्यवसाय एकमेकांशी जोडले गेले. त्यामुळे छोटे व्यावसायिकांना फायदा झाला आणि अर्थातच त्याचा फायदा सामान्य लोकांना पण झाला.

Steve Jobs यांनी Apple कंपनी सुरु केली. Apple मुळेच फोन च्या जगात इतक्या झपाट्याने प्रगती झाली. आज आपण कितीतरी गोष्टींसाठी फोनचा वापर करतोय.

Bill Gates यांनी Microsoft कंपनी बनवली. त्यामुळे computer सहज वापरणे आज जगाला शक्य झाले. या सर्व लोकांनी जग बदलण्यात मदत केली नाही का ? त्यांनी स्वत:ला विचारले “मी कोणते काम चांगल्या प्रकारे करू शकतो ? मला कोणती गोष्ट मनापासून करायला आवडते ?”

ह्या लोकांनी मोठे स्वप्नं पाहिले. स्वतःसाठी नाही, की मी मोठी कार घेईल, बंगला बांधेल. तर या लोकांनी जग बदलण्याचे स्वप्नं पाहिले. आपण काय देऊन जाणार ? आपण काय बदल घडवून जाणार ? हा विचार त्यांनी सतत केला. त्यामुळेच ते एवढा मोठा धोका पत्करू शकले. त्यामुळेच कठीण प्रसंगी त्यांनी माघार घेतली नाही. कारण त्यांचे स्वप्नं फार मोठे होते.

सर्वांचाच उद्देश जगाला काहीतरी देऊन जाण्याचा नसेल, सर्वानाच व्यवसाय करताना एवढे मोठे बनायचे नसेल. मग त्यांनी काय विचार करावा ? जर जग बद्दलण्याऐवढे मोठे स्वप्नं नसेल तर देश कसा बदलेल ? ते पण नाही तर माझे राज्य कसे बदलेल ? माझं शहर ? माझ्या घराच्या आसपासचा परिसर कसा बदलेल ? हा विचार करायला हवा.

सांगण्याचा मुद्दा असा की, व्यवसाय करताना आपण आपल्या व्यवसायाच्या माधम्यातून या जगाला, मानव समाजाला काय देऊ शकतो ? असा उद्देश असावा. फक्त श्रीमंत होणे हा तुमचा उद्देश असेल तर तुम्ही एक स्वार्थी, नफ्याच्या मागे पळणारा व्यवसाय कराल. ज्यात पैसे कमावणेच सारे काही असेल. असे व्यवसाय दूरचा विचार करत नाही आणि स्वार्थीपणे नफा कसा वाढेल हा विचार करत राहतात. असे व्यवसाय जास्त काळ टिकत नाहीत. तुम्ही किती मोठा बदल घडवता त्यावर तुमचा व्यवसाय किती मोठा होईल हे अवलंबून तर आहेच, पण उद्देश नेहमी देण्याचा असला पाहिजे. फक्त श्रीमंत होण्याचा नाही.

कधी ह्या लोकांनी कोणाला जाऊन विचारलं का ? मी कोणता व्यवसाय सुरु करू ? याउलट ह्या लोकांनी आपल्या व्यवसायासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. अनेक लोकांनी त्यांना मुर्खात काढले असताना, जगाविरुद्ध जाऊन हे लोक लढले. आपल्या व्यवसायात त्यांनी आपले जीवन अर्पण केलेे.
व्यवसाय कि नोकरी ?

मी कोणता व्यवसाय सुरु करू, हा मुख्य प्रश्न नाही आहे. मुख्य प्रश्न आहे मी व्यवसाय करू कि नाही ? आधी तुम्ही हे ठरवा कि तुम्हाला व्यवसाय करायचा कि नोकरी करायची आहे. कोणता व्यवसाय करावा हि नंतरची गोष्ट आहे.

नोकरी आणि व्यवसाय मध्ये मूळ फरक हा आहे कि व्यवसायात तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकाव्या लागतात. तुम्हाला सर्व गोष्टींची जवाबदारी स्वीकारावी लागते. इथे तुम्ही तुमच्या साहेबाला दोष देऊन सुटू शकणार नाही. इथे तुम्हाला नोकरी पेक्षा जास्त धोका पत्करावा लागेल. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला हा प्रश्न विचारता मी कोणता व्यासाय करू ? तर तुम्हाला काय उत्तर अपेक्षित असत ? कि असा व्यवसाय सांगावा जो मस्त चालेल, असा व्यवसाय सांगावा जो करणे सोपे असेल, असा व्यवसाय सांगावा ज्यात कमी गुंतवणूक असेल. कोणता व्यवसाय सुरु करू ? हा प्रश्नच मुळात सुरक्षात्मक आहे. तुम्हाला उत्तरात असा व्यवसाय अपेक्षित आहे ज्यात धोका कमी आहे. तुम्हाला जर सुरक्षा हवी असेल तर तुम्ही नोकरी कडे जावे. तुम्हाला जर जास्त धोका घ्यायचा आहे तर व्यवसायाकडे यावे. व्यवसाय कि नोकरी ? मग काय उत्तर आहे तुमच्या प्रश्नाच ?

जेव्हा तुम्ही विचारता कोणता व्यवसाय सुरु करू ? तेव्हा तुमच्या व्यवसायाची सुरवात उधारीच्या ज्ञानावर सुरु होते. उद्या ज्याने तुम्हाला सल्ला दिला तो नसेल मग ? जेव्हा व्यवसायात वाईट वेळ येईल तेव्हा तुम्ही काय करणार ? तुम्ही पहिला ना, जग कसे पटापट बदलत आहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय पण आता पटापट बदलेल. तुम्ही कदाचित तोच व्यवसाय कराल पण त्याच स्वरूप बदलेल. तुम्ही आताही कदाचित किरणा मालच विकाल, पण online, home delivery, cash back. हे शब्द तुमच्या व्यवसायात जमा होत जातील. तुम्ही कदाचित कपडेच विकाल पण होऊ शकते भविष्यात तुमचे कपडे एवढे smart होतील, के तुमच्याशी सवांद साधतील, तुमच्या mood नुसार तुमचे कपडे रंग बदलतील, तुम्हाला कदाचित कधी दुसरा ड्रेस घ्यावाच नाही लागेल, तुमचा ड्रेस हवा तस रूप घेईल.

महत्वाचा सांगायचा मुद्दा इथे हा कि, आपण जो व्यवसाय करणार आहोत, त्यात यश मिळेल कि नाही ? तो टिकेल का नाही ? किंवा त्याच प्रारूप किती बदलून जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवसाय करायचाच, हे तुमच नक्की झाले तर हा ना तो व्यवसाय तुम्ही करालच. महत्वाचं आहे तुमची मानसिकता व्यवसाय करण्याची होणं, ती झाली की, तुम्ही स्वतःसाठी योग्य व्यवसाय शोधून काढणार वा निर्माण करणारच.

आता आपला प्रश्न कोणता व्यवसाय सुरु करावा ? जसे मी वर बोललो कि मी या जगाला काय देऊ शकतो. मी हे जग कसे अजून चांगले करू शकतो ? हा विचार करणे. असे का ? कारण ह्या प्रश्नांचं उत्तर शोधताना तुम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी मिळतील.

१. माझी आवड काय ?

२. माझ्याकडे कोणते गुण आहेत ?

आपण दुसरा प्रश्न आधी पाहू. मी नक्कीच हि गोष्ट मानतो, कि जी गोष्ट आपल्याला येत नाही ती सराव करून आपण शिकू शकतो. पण तुम्ही स्वत:ला ओळखणे फार आवश्यक आहे. तुमच्यात काय गुण आहे ? तुम्ही कोणते काम चांगल्या प्रकारे करू शकता हा पण विचार करा. आपल्याला काय आवडत हा प्रश्न बहुतेक वेळा बरोबर उत्तर देत नाही. कारण आपली आवड हि आजूबाजूच्या गोष्टींमुळे प्रभावित होते. अनेक लोकांना सचिन तेंडूलकर बनायचे होते आता काहींना विराट कोहली. हळूहळू कबड्डी प्रसिद्ध होत आहे, काहींना त्यात कारकीर्द करावी वाटेल. हिरो तर आपण सर्वांना कधी ना कधी बनायची इच्छा झालीच असेल.

आवड अशी नको जमलं तर करून पाहू, ६ महिने – १ वर्ष टिकणारी. आयुष्याची बांधिलकी असणारी आवड हवी.

आपल्याला काय आवडत ? आणि आपण कोणत काम चांगल्या प्रकारे करू शकतो. या दोन गोष्टींचा सुवर्णमध्य जर तुम्ही गाठला तर फार चांगले होईल. म्हणजे अशी गोष्ट शोधणे जी मला आवडते आणि जी करण्यासाठी लागणारे थोडेफार गुण माझ्यात आहेत. मला फिल्म्स पाहायला फार आवडत, म्हणून मी actor वा director व्हायचा निर्णय घेतला नाही. कारण ते बनण्यासाठी लागणारे गुण माझ्यात आहेत असा मला वाटले नाही. म्हणून अशी गोष्ट निवडणे जी तुम्हाला आवडते आणि तुमच्यात ती करण्याचे गुण पण आहेत.


तुम्हाला व्यवसायात यश कधी मिळेल ?

जेव्हा तुमच्याकडे प्रतिस्पर्ध्यापेक्षा काहीतरी चांगले असेल. तुम्ही प्रतिस्पर्ध्यापेक्षा चांगल काही केव्हा करू शकाल ? त्यासाठी तुम्हाला काय कराव लागेल ? तुम्हाला त्या गोष्टीचा तज्ञ बनाव लागेल. गोष्ट मनापासून आवडली नाही तर तुम्ही त्या गोष्टीचे तज्ञ होवू शकाल का ? तज्ञ झाल्याशिवाय तुम्ही ती गोष्ट इतरांपेक्षा चांगल्या प्रकारे करू शकाल का ? आणि तुम्ही ती इतरांपेक्षा चांगली करू शकत नाही, मग लोक तुमच्याकडे का येतील ?

जर तुम्हाला गाण म्हणायला आवडत आणि तुम्ही इलेक्ट्रोनिक्स चा व्यवसाय सुरु केला, कारण तुम्हाला कोणी हा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला आहे. आता तुम्हाला lcd आणि led मधला फरकच कळत नाही, मग तुम्ही तो व्यवसाय कसा करणार ? पण दोन संगीतातील रागांमधील फरक तुम्हाला अचूक ओळखता येतो. तर तुम्ही कोणता व्यवसाय केला पाहिजे ?
व्यवसाय करायला कोणते गुण हवे ?


नेता

व्यवसाय मालकाला चांगला नेता होणे फार आवश्यक आहे. त्याच्या हाताखाली नेहमी लोक काम करतात. त्या लोकांकडून त्याला काम करवून घेता आले पाहिजे. त्याला लोकांना प्रशिक्षित करता आले पाहिजे. नाहीतर तो आपल्या व्यवसायात अडकून जाईल आणि तिथला कर्मचारी बनून जाईल.

तुम्ही अनेक कपड्याचा दुकानात हे दृश्य पहिले असेल कि. मालक गुजराती, मारवाडी लोक आहेत. जे फक्त काउंटरवर पैसे घ्यायचं काम करतात. आपल्याला कपडे दाखवणे. बिल तयार करणे हि सर्व कामे मराठी माणसे करतात. अनेक दुकानात तुम्हाला दिसून येईल कि manager हा मराठीच आहे आणि मालक हजर नसताना पण तेच दुकान चांगल्या प्रकारे चालत आहे.

जो माणूस manager बनू शकतो तो मालक का नाही ? त्या दुकानाच्या मालकाने एका इमानदार आणि कर्तुत्वशील माणसाला नोकरीवर ठेवण्यात यश मिळवले आहे. आता तो आपल्या दुसऱ्या व्यवसायाकडे लक्ष्य द्यायला तयार झाला आहे. कोणत्या समाजा बद्दल असंतोष पसरवणे हा उद्देश नाही, तर फरक लक्ष्यात घेऊन स्वतः मध्ये सुधारणा घडवणे आहे.

अनेक लोक स्वतःच्या व्यवसायात नोकरी करू लागतात त्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढीवर ते स्वत:च बंधन लावतात.
विकता येणे

विकता येण का आवश्यक आहे ? आपण सर्वजण काय करतोय ? नोकरीच्या मुलाखतीला तुम्ही जाता तेव्हा तुम्ही काय करता ? लग्नासाठी स्थळ पाहायला जाता तेव्हा तुम्ही काय करता ? नातेवाईकांना, मित्रांना तुमच्या नवीन विकत घेतलेल्या गोष्टी दाखवताना काय करता ? बॉस ला गुड मॉर्निंग बोलून काय करता ? तुमची आवडती व्यक्ती तुम्हाला दिसली कि तुम्ही काय करता ? आपण स्वतःला विकत असतो. स्वतःला विकणे म्हणजे पैशासाठी काहीही करायला मी तयार आहे आहे, असे नाही. तर दुसऱ्याच लक्ष्य स्वत:वर ओढवणे दुसऱ्यांना म्हणने मी चांगला आहे. माझी निवड करा. आपण जीवनात स्वत:ला विकतच असतो. आपल्याकडची गोष्ट किंवा आपल मत इतरांना पटवून देणे हि विक्रीकलाच आहे.

व्यवसाय म्हणजे काय ? वस्तूंची देवाणघेवाण, खरेदी विक्री. म्हणजे जेव्हा लोक तुमच्याकडून विकत घेतील, तेव्हा तुम्ही व्यवसाय करू शकाल. आता लोकांनी तुमच्याकडे येण्याची तुम्ही वाट पाहणार की त्यांच्या जवळ जावून तुम्ही बोलणार माझ्याजवळून विकत घ्या ?

आपला समाजात विकणाऱ्या व्यक्तीकडे हीन भावनेने पहिले जाते. असे समजल्या जाते , जो विकू पाहतो, त्यात काही कमी आहे. जर कोणती वस्तू तुम्ही चांगली बनवली आहे. लोकांचा ती वापरून फायदा होणार आहे. तर त्याची जाहिरात का करू नये ? जर आपण जाहिरात केली नाही तर लोकांना आपल्याबद्दल कसे कळेल ? आपण जर फक्त असे बोललो कि माझा ग्राहक माझी प्रशंसा करेल तोच माझी जाहिरात. तर त्याप्रमाणे तुम्ही सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याकरिता किती वेळ लागेल ?

आपण काही विकतोय म्हणजे आपल्यात काही कमी आहे, हा न्यूनगंड मनातून काढून टाका. मी उत्पाद तयार केले आहे. मला वाटत लोकांचा ते उत्पाद वापरून फायदा होईल. हे उत्पाद लोकांपर्यंत पोहोचवणे त्याचे फायदे लोकांना कळविणे हे माझ काम आहे, हा विचार करा. तुमचा व्यवसाय तुम्हाला जर वाढवायचा नसेल, तर जाहिरात करू नका. पण तुम्हाला व्यवसायच वाढवायचा असेल, नवीन ग्राहक जोडायचे असतील, तर मात्र तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचावेच लागेल. कसे विकावे ? याविषयावर संपूर्ण एक लेख मी लिहिला आहे तो लेख तुम्ही इथे वाचू शकता.
संयम

व्यवसाय करणे हे रात्रीच्या काळोखात दिव्याचा प्रकाशाकडे चालत जाणे आहे. आपल्याला कुठे जायचे हे आपल्याला माहित आहे. पण आपल्याला किती लांब जायचे आहे, हे आपल्याला माहित नाही. अंधारात आपल्याला अंदाज येत नाही कि तो प्रकाश किती दूर आहे. आपण त्या दिव्याच्या प्रकाशाकडे चालत राहतो. आपल्याला वाटत फार वेळ झाला आपण चालतोय. अजून किती दूर आहे तो प्रकाश ? परत जाऊ का ? कि दुसरा प्रकाश शोधू मी ? असे अनेक प्रश्न आपल्या मनात यायला सुरवात होते.

व्यवसायात उतरताना आपल्याला आपल ध्येय माहित असत. आपला व्यवसाय आपल्याला केवढा वाढवायचा आहे. त्यात झालेल्या कमाईने आपण काय काय विकत घेऊ ? याची पण यादी बनलेली असते. आपल यश कसे असेल, याच एक चित्र आपल्या डोक्यात असत. पण तिथपर्यंत कस पोहोचायचे ? कधी पोहोचणार ? पोहचू कि नाही ? पोहोचलो तर टिकू का नाही ? असे अनेक प्रश्न मनात येतात. या गोंधळातच अनेक जण माघार घेतात. व्यवसाय सुरु करण्याधी, अशा स्थितीचा विचार करा. या परिस्थितीमध्ये तुम्ही टिकून राहणार का ?

कोका कोला कंपनी जेव्हा सुरु झाली तेव्हा ती दिवसाला ९ bottle विकत होती.आज कोका कोला कंपनी पूर्ण जगभर दिवसाला १९०००००००० एवढ्या bottle विकते. यावरून तुम्हाला कळून येईल कि व्यवसाय करताना किती संयम लागतो. फक्त ९ bottle विकल्या जातात म्हणून जर कोका कोला थांबले असते तर ते आज दिवसाला १९०००००००० एवढ्या bottle विकू शकले असते का ?
वातावरण

तुमच्या व्यवसायामध्ये असे वातावरण असले पाहिजे कि कर्मचारी येऊन तुम्हाला नवीन कल्पना सांगू शकतील. त्यासाठी तुम्ही त्यांच्यावर रागावता वा बदला घेता कामा नये.

नेहमी घडणाऱ्या गोष्टींसाठी एक आदर्श नियमावली बनवली पाहिजे. म्हणजे तुमचे कर्मचारी दरवेळी तुमच्याकडे येणार नाहीत. त्यांना माहित असेल कि आपण अशा परिस्थितीमध्ये काय केले पाहिजे.

कर्मचाऱ्यांची प्रशंसा सर्वांसमोर करा, पण चुका एकट्यात काढा. तुमच्या व्यवसायामधल्या इतर सर्व गोष्टींची किंमत कमी-कमी होत जाईल, फक्त कर्मचारी सोडून. प्रशिक्षण आणि अनुभवामुळे कर्मचाऱ्यांची किंमत वाढतच जाईल. कर्मचारी आपले गुलाम आहेत, त्यांच्याकडून जास्तीत जास्त काम करून घ्या. असा दृष्टीकोन न ठेवता, कर्मचारी हे आपले व्यवसायाचे साथीदार आहेत, हा व्यवसाय वाढवायला तेच मदत करतील. असा दृष्टिकोन असावा.

तुम्ही व्यवसायाचे नेता आहात, तुम्ही निष्पक्ष ठाम, मैत्रिपुर्वक आणि दूरदृष्टी ठेऊन काम केले पाहिजे.
भाव करणे

कोणत्या वस्तूच मूल्य कशावरून ठरलं ? समजा एक प्लॉट आहे, तो कोणी १० लाखात घ्यायला तयार आहे, तर कोणी ७ तर कोणी १५ लाखात. तर त्या प्लॉटच मूल्य काय ? कोणत्याच गोष्टीला ठराविक मूल्य नसत. कोणत्याही गोष्टीच मूल्य हे घेणारा आणि देणारा हे दोघ स्वीकारतील ते असत. म्हणून व्यवसाय करताना आपल्याला भाव करता आला पाहिजे. भाव करताना कोणाकडे शक्ती आहे ते पहिले जाणून घ्या. हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे.
भाव कशावर ठरतो ?
माहिती – त्या सामानाबद्दल तुम्हाला किती माहिती आहे ? भविष्यात त्याची किती उपलब्धता असेल ? ते कोण विकत घेईल ? ते कुठे विकत मिळेल ? तुम्हाला जितकी जास्त माहिती तितकी तुमची बाजू मजबूत.
वेळ – माझ्या एका मित्राला अर्जंट फोटो फ्रेम हवी होती, त्याच्याकडे वेळ नव्हता, दुसऱ्या दुकानात फिरून भाव करायला. दुकानदाराला कळल, ह्या माणसाकडे वेळ नाही आहे. त्यामुळे तो त्याचा भाव सोडायला तयार नव्हता. लवकरात लवकर सामान पाहिजे असेल, तर त्याची जास्त किंमत मोजावी लागते.
win-win

भाव करताना सर्वात चांगली स्थिती कोणती ? जिथे तुम्ही पण जिंकता आणि समोरचा पण जिंकतो. असे झाले तरच दोन्ही बाजूचे लोक खुश होतील. एकमेकांशी भविष्यात परत परत व्यवहार करतील. फक्त तुम्ही जिंकलात किंवा समोरचा जिंकला, तर तो व्यवहार परत होण्याची शक्यता फार कमी होऊन जाते.

भाव करताना कधीच एका गोष्टीवर अडून राहू नका. अशा वेळी जिंकणे व हरणे केवळ हाच पर्याय उरतो. कधीच गृहीत धरू नका, समोरच्याला काय पाहिजे हे तुम्हाला माहित आहे म्हणून. प्रत्येक माणूस वेगळा आहे. भाव करताना तो वेगळा विचार करतो. पैसाच सर्वकाही नसतो भाव करताना. भाव हा नेहमी दोन पक्षांवर अवलंबून असतो.
नफा

व्यवसाय करण्याचा मूळ उद्देश हाच आहे कि नफा मिळवणे. यावर्षी आपण बातम्यांमध्ये पाहिले अनेक online कंपनी बंद झाल्यात. त्या कंपनी नफा बनवत नव्हता. नफा न बनवणारा व्यवसाय जास्त वेळ चालवणे फार कठीण काम आहे. वाढीसाठी कर्ज घेणे आवश्यक आहे. पण कर्ज किती घ्यावे ? ते कसे फेडणार ? हे तुम्हाला ठरवावं लागेल. सर्वात उत्तम हेच आहे कि, तुम्हाला होणारा नफा हा तुमच्या व्यवसायाच्या वाढीकरिता वापरावा. व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज घेणे जास्त धोकदायक आहे. त्यामुळे कर्जाच्या चक्रात सापडू शकता. तुम्ही सामान कितीला विकणार आहे ? कितीला विकत घेणार आहे ? तुमचा नफा किती ? ह्याच गणित करूनच व्यवसाय सुरु करा.

अनेक लोकांना व्यवसाय सुरु करायचा असतो. काहीना तो चालवायचा असतो आणि फार कमी लोकांना तो टिकवायचा असतो. व्यवसाय करणे म्हणजे शिकत राहणे. 
















by - http://www.guntavnuk.com 

युवा शेतकरी उतरला बटाटा वेफर्स उद्योगात...


-----------------
कुटुंबाचे पाठबळ, कल्पकता, व्यवसाय
बांधणीसाठी केलेले "होमवर्क",
जोखीम घेण्याची वृत्ती या
गुणांच्या जोरावर पुणे जिल्ह्यातील बोरी
बुद्रुक येथील भरत बाळू वाजे या युवकाने बटाटा वेफर्स
निर्मिती उद्योग सुरू केला आहे. परिसरात सहा ते सात
वितरक नेमून स्थानिक स्तरावरच बाजारपेठ हस्तगत करण्याचे
प्रयत्न सुरू केले आहेत.
-----------------
संतोष डुकरे
-----------------
पुणे जिल्ह्यात बोरी बुद्रुक (ता. जुन्नर)
येथील मारुती नाना वाजे यांचे एकत्र कुटुंब.
सुमारे 18 ते 20 एकर शेती. भरत हा
कुटुंबातील नव्या पिढीचा
प्रतिनिधी. त्याने बी. कॉमनंतर पुण्यात
"अकाउंट मॅनेजर'चा एक वर्षाचा अभ्यासक्रम केला आणि
नोकरीचा शोध घेतला. पण आठ-दहा हजार रुपयांहून
अधिक पगार मिळेना. कुटुंबाची
शेतीची पार्श्वभूमी, व्यवसाय
मार्गदर्शन, "डिस्कव्हरी' चॅनेलवरील
"फुड फॅक्टरी' हा कार्यक्रम, जगप्रसिद्ध
उद्योगपतीच्या आयुष्यावरील पुस्तक
आदींमधून त्याला उद्योजक होण्याची
प्रेरणा मिळाली. पुण्यातील खाद्यपदार्थ
विक्रीच्या दुकानांची पाहणी,
इंटरनेटरील "प्रकल्प', बाजारपेठ सर्वेक्षण हे सर्व
टप्पे पार केल्यानंतर बटाटा वेफर्सला मार्केटमध्ये मोठी
मागणी असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर हाच
व्यवसाय उभारण्याचे नक्की केले.
सुरवातीचे प्रयत्न
भरत यांनी व्यवसायाचा कच्चा आराखडा तयार केला.
बटाटा, तेल, पॅकेजिंग मटेरियल सहज उपलब्ध होते. अनेक
प्रकल्पांची पाहणी केली.
नारायणगाव, पुणे, रांजणगावला घरगुती वेफर्स तयार
करून विक्री करणाऱ्यांच्या भेटी घेतल्या. या
व्यवसायातील संभाजी गाढवे यांचे अनुभवाचे
बोल मार्गदर्शक ठरले. काही कंपन्यांच्या
अधिकाऱ्यांनीही सहकार्य केले. प्रत्येक
ग्रॅमच्या वेफर्स पॅकिंगमागे किमान 5 पैसे निव्वळ नफा शिल्लक
राहतो इथपर्यंत गणित जुळले. त्यानंतर भांडवल
उभारणीसाठी कुटुंबासमोर प्रस्ताव ठेवला.
कुटुंबीयांनी भरतची कल्पना
उचलून धरत प्रक्रिया केंद्र उभारणीचा
श्रीगणेशा केला.
प्रकल्पाची जुळवाजुळव
इंटरनेटवरील संकेतस्थळावरुन वेफर्स
निर्मितीच्या यंत्रांची ऑनलाइन'
खरेदी केली. प्रक्रिया युनिटचा आत्मा
असलेले मुख्य यंत्र पाच लाख रुपयांना पडले. पॅकिंग यंत्रासोबत
हवा भरण्यासाठी "कॉम्प्रेसर', वेफर्स जास्त काळ
टिकून रहावेत व त्याची चव दीर्घकाळ
रहावी यासाठी पॅकिंगमध्ये
भरण्यासाठी नायट्रोजन, प्लॅस्टिक पॅकेजिंग मटेरियल
आदींची खरेदी
केली. बटाट्याची साल
काढण्यासाठी पोटॅटो पिलर, चकत्या कटर, वेफर्स ड्रायर
ही यंत्रे पुण्यातून खरेदी
केली. एका "इंजिनिअरिंग फर्म'कडून बटाटे
धुण्यासाठी "वॉशिंग युनिट व वर्किंग टेबल' घेतले.
.....................................
भरत यांचा वेफर्स उद्योग दृष्टिक्षेपात
-यंदाच्या एक जूनपासून वेफर्स निर्मिती सुरू
-सध्या बटाटा मंचर व नारायणगाव परिसरातून व्यापाऱ्यांकडून
खरेदी केला जातो.
-परिसरातील शेतकऱ्यांसोबत करार शेतीद्वारे
बटाटा उपलब्ध करणार
-पूर्ण क्षमतेने प्रकल्प चालवला तर दररोज एक टन बटाट्यापासून
तयार होतात 100 ते 250 किलो वेफर्स
-सध्या भरत तयार करतात दररोज 50 किलोपर्यंत वेफर्स
-सध्या बटाट्याचे "शॉर्टेज'असल्याने उत्पादन तात्पुरते थांबवले.
-आत्तापर्यंत एकूण दोन ते अडीच टन उत्पादन व
विक्री
-बटाटा कमी असेल त्या वेळी फरसाण
निर्मिती करून उत्पन्न सुरू ठेवले.
.....................................................................
वेफर्सचा दर
प्रत्येकी 18 ग्रॅमचे पॅकेट- त्याची
एमआरपी- पाच रुपये.
मार्केट
सध्या सहा ते सात डीलरची नेमणूक.
त्यांच्यामार्फत तालुक्यात किरकोळ दुकानांची
साखळी तयार झाली आहे. त्यामार्फत
विक्री होते. मागणी चांगली
असून त्यानुसार पुरवठा करण्याचे प्रयत्न. वर्षाला 20 टन वेफर्स
निर्मितीचे उद्दिष्ट.
अर्थकारण
एकूण प्रकल्प उभारणीसाठी सुमारे 20
लाख रुपये खर्च आला. शेतातील उत्पन्नातून पैसे
जमवले. आता बॅंकेचे कर्ज काढणार असून कृषी
विभागाच्या अनुदानाचाही लाभ घेण्याचा प्रयत्न आहे.
एक किलो बटाट्यापासून सुमारे 250 ग्रॅम वेफर्स तयार होतात. या
प्रति पॅकेटमागे किमान 50 पैसे नफा हे आर्थिक गणित समोर ठेवले
आहे.
...............................................................
मनुष्यबळ
वेफर्स निर्मितीसाठी मनुष्यबळ जास्त
लागते असे भरत सांगतात. बटाटा प्रतवारी, धुणे, कापणे,
सुकवणे, फ्राय करणे, पॅकिंग या सर्व कामांसाठी कुशल
कामगार लागतात. कुटुंबातील सात जण प्रकल्पात
कार्यरत आहेतच. शिवाय उत्तर प्रदेशातील दोन भैये
(वेफर्स तळण्यासाठी), बटाटा धुण्यासाठी
स्थानिक तीन व्यक्ती असे मनुष्यबळ
आहे.
स्वतःची कंपनी, स्वतःचा ब्रॅन्ड
वेफर्स निर्मितीतील प्रत्येक
बाबीवर बारकाईने लक्ष ठेवून गुणवत्तेशी
तडजोड न करण्याचा भरत यांचा प्रयत्न असतो. अनेकांप्रमाणे
सुट्या स्वरूपात विक्री किंवा मोठ्या कंपनीला
सुट्या वेफर्सचा पुरवठा हे दोन पर्याय सुरक्षित व्यवसायाच्या
दृष्टीने अनेकांनी सुचवले. मात्र ते नाकारून
श्री राजमाता फूड्स ऍन्ड वेफर्स प्रा. लि या
नावाची स्वतःची कंपनी स्थापन
केली.
गुणवत्ता
अन्नसुरक्षा विषयक संस्थेकडून (एफएसएसएआय) परवाना
घेतला आहे. सध्या "श्री' या ब्रॅन्डने
वेफर्सची विक्री केली जाते.
उत्पादन निर्मितीत कोणतेही रासायनिक
घटक वापरले जात नाहीत. वेफर्समधील
खारटपणा संतुलित ठेवल्याने आपले उत्पादन चविष्ट झाल्याचे भरत
सांगतात. गुणवत्ता सर्वोत्तम देणार असू तर दुसऱ्यांच्या
ब्रॅंडसाठी माल का द्यायचा? आपल्यात व्यवसाय
वृद्धीची क्षमता असताना केवळ माल
पुरवठादार का व्हायचे? या विचारसरणीने भरत
यांची वाटचाल सुरू आहे.
जोखीम
वेफर्स निर्मिती उद्योगात बटाटा हा कच्चा माल
असल्याने त्याचा पुरवठा सतत होणे गरजेचे असते.
त्याच्या दरात अचानक वाढ झाली की
नफ्याचे मार्जीन बिघडते. त्याचा आर्थिक
फटकाही सहन करावा लागतो. अन्य
ब्रॅंडचीही स्पर्धा आहे, त्यामुळे गुणवत्ता
सतत टिकवावी लागते.
भरत यांच्यातील उद्योजकाचे गुण
1) पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील
सातगाव पठार हा बटाटा उत्पादनाचा सर्वात मोठा परिसर आहे. या
भागातील शेतकरी काही
कंपन्यांसोबत वेफर्ससाठी बटाटाची करार
शेती करतात. बटाट्यावर आधारीत प्रक्रिया
उद्योग सातत्याने चालू शकेल का, तोटा झाला तर काय? अशा
शंकांनी इथले शेतकरी अद्याप प्रक्रियेत
उतरलेले नाहीत. मात्र भरत यांनी
स्वतःकडे बटाटा उत्पादन नसतानाही
परिसरातील ही कोंडी फोडण्याचा
प्रयत्न करताना स्थानिक व्यापाऱ्यांकडून बटाटा खरेदी
केला.
2) खेड्यापाड्यात किराणा माल, खाद्यपदार्थांची दुकाने
आहेत. त्यांना विविध जिन्नसांचा पुरवठा करणारी
साखळी कार्यरत असते. पुणे जिल्ह्यातील
एकेका तालुक्यात अशा साखळ्या कार्यरत आहेत. भरत
यांनी अशाच साखळीवर लक्ष केंद्रित करून
वेफर्सचे वितरण सुरू केले.
3) शेती व संलग्न व्यवसाय किंवा शेतमाल
प्रक्रियाविषयक कोणत्या प्रकारचे शिक्षण, अनुभव नसताना
प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. कागदपत्रे
जमविण्यासाठी बऱ्याच अडचणी आल्या.
वेफर्स निर्मितीच्या प्रमाणीतर
पद्धतींपासून सर्व बाबींची
खातरजमा केली. इच्छा असेल तर मार्ग दिसेल यानुसार
प्रक्रीयेच्या वेगळ्या वाटेने वाटचाल सुरू
केली.
--------------------
भरत वाजे - 7775965025, 7387825756

गृहिणीत उद्योजक बनण्याचे सर्वाधिक गुण..





गृहिणी; महिलांनो जागे व्हा. कुटुंब संस्थेच्या जातीचा व धर्माच्या नावाखाली मुळीच जीवन जगू नका. स्वत:च कर्तृत्व दाखवा. आज महिलांना करण्यासारख्या अनेक व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. अंगावर काही तोळे दागिने घालून शोभेची वस्तू होण्यापेक्षा, स्वत:च्या हिमतीवर कमवणारी उद्योगिनी व्हा.

गृहिणींनी स्वत:चा वेळ, बुद्धीचा वापर करावा, उद्योग व्यवसायात उतरावे व फक्त गृहिणी न राहता गृहलक्ष्मी बनावे. मला एक उच्चशिक्षित गृहिणी भेटावयास आल्या होत्या. त्यांचे वडील शेतकरी आहेत, मुलगी हुशार असल्याने तिला मोठ्या कष्टाने कॉम्प्युटर इंजिनीअरिंग शिकवलं, पण एकट्या मुलीला मुंबई, बेंगलोरसारख्या सिटीमध्ये नोकरीस पाठवायचे कसे म्हणून नात्यातील एका शिक्षकाशी विवाह करून दिला. लग्नानंतर लवकरच मूल झालं. ते मोठं होताच तोपर्यंत दुसरं झालं. मुलं मोठी करणे व शाळेत जाईपर्यंत त्यांना कोणतीच नोकरी करता आली नाही. इयत्ता १०वीत ८८% गुण, १२वीत ७८% गुण, बीई ७२% गुण, पण उपयोग काहीही नाही.

आता लहान मुलगा ५ वर्षांचा होता तेव्हा त्यांनी ठरवलं की, आता नोकरी करायची त्यांनी मुलाखतीला जायला सुरू केले. खूप गॅप पडल्यामुळे व अनुभव नसल्यामुळे नोकरी मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यांच्या सासू व मैत्रिणी म्हणतात, तू एवढी शिकलेली आहेस, मग काही का करत नाहीस. सर्वसाधारण कोणी भेटले की विचारतात, तुम्ही वर्किंग वुमन आहात की हाऊसवाइफ. सर्वांचा असा समज असतो की, हाऊसवाइफ काहीच करत नाहीत, एक यशस्वी उद्योजकाला जे जे काही करावं लागतं ते सर्व एक हाऊसवाइफ करते. तेव्हा माझ्या मते, एका गृहिणीमध्ये यशस्वी उद्योजक बनण्याचे सर्व गुण असतात.

ती सर्वांसाठी स्वयंपाक करते म्हणजे ती चांगली शेफ आहे. ती चांगला हॉटेल व्यवसाय करू शकते किंवा एका कंपनीचे कॅन्टीन कसे चालते हे तिला माहीत असते. ती मुलांचा अभ्यास घेते म्हणजे ती खासगी शिकवणीही घेऊ शकते म्हणजे ती शिक्षिकाही आहे, ती सासू-सासर्‍यांची, मुलांची, नवर्‍याची काळजी घेते म्हणजे ती केअरटेकरही आहे. ती चांगला हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय करू शकते. ती घराचं व मुलाचं राखण करते म्हणजे ती सिक्युरिटी गार्डही आहे. ती काटकसर करून कमी दरात भाज्या सर्व गोष्टी घेते म्हणजे ती चांगली परचेस मॅनेजरही आहे, ती आले-गेलेले पाहुणे, मित्रमंडळी यांचा पाहुणचार करते म्हणजे ती चांगली रिसेपश्‍निस्ट आहे.

सासूबाईंनी सांगितलं की पाहुण्याच्या लग्नात घराण्याची प्रतिनिधी म्हणून नटून जाते म्हणजे ती चांगली मॉडेलही आहे. आपला नवरा, सासू यांचे ती बाहेर कौतुक करते म्हणजे ती खूप चांगली सेल्समन आहे. नवरा ताणतणावात असेल तर त्याचं सांत्वन करते म्हणजे ती एक चांगली सायकॉलॉजिस्टही आहे. गृहिणीं संपूर्ण घराची स्वच्छता व नीटनेटकेपणाही ठेवते. ती चांगली हाऊसकीपर आहे. नवरा अडचणीत आला तर स्वत:चे दागदागिने गहाण टाकून पैसे उभा करते. ती ट्रबलशूटर आहे. समाजात तुमच्या कुटुंबाबद्दल बोलत असते. तिच्यामुळेच समाजात ओळख असते. ती चांगली पब्लिक रिलेशन ऑफिसर आहे. ती संसाराचा हिशेब खूप तंतोतंत ठेवते. ती चांगली फायनान्स कर्मचारी आहे. शेजार्‍याच्या, पाहुण्यांच्या बर्‍या-वाईट प्रसंगांत जाऊन येते म्हणजे ती कॉर्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलिटी सांभाळते.

आता मला सांगा, असे कोणते काम राहते, की गृहिणी पार पाडत नाही, जे एक उद्योजक किंवा कॉपारेट कंपनी चालवण्यासाठी लागते आणि समाजाचा असा दृष्टिकोन असतो की, गृहिणी काय करत नाही.

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

गृहिणीने धाडसाने पुढे यावे, उद्योगात यशस्वी व्हावे व उद्याच्या वीणा पाटील (वीणा वर्ल्ड), चंदा कोचर (आयसीआयसीआय बँक), इंद्रा नुई (पेप्सी) तुम्हीही होऊ शकता. जे लोक गृहिणींना तुम्ही काय काम करत नाही म्हणतात त्यांना तुमच्या कामासंबंधीची लिस्ट दाखवा. मागे एका सर्जनने आश्चर्यकारक घटना सांगितली, जेव्हा कुटुंबात कोणाची किडनी ट्रान्स्फर करायची वेळ येते तेव्हा रिप्लेसमेंट किडनी डोनर हे गृहिणी असतात म्हणजे आपल्या शरीराचा अवयवसुद्धा वेळ पडल्यास कुटुंबाला मदतीसाठी देते.

मुलांची किंवा नवर्‍याची किडनी खराब झाली तर महिला आपली किडनी देतात. हे असे ९ ५% गृहिणीच्यांत आहे, पण गृहिणीची किडनी खराब झाली तर ५% सुद्धा डोनर मिळत नाहीत. तेव्हा गृहिणी महिलांनो, जागे व्हा. कुटुंबसंस्थेच्या जातीच्या व धर्माच्या नावाखाली मुळीच जीवन जगू नका. स्वत:चं कर्तृत्व दाखवा. आज महिलांना करण्यासारख्या अनेक व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. अंगावर काही तोळे दागिने घालून शोभेची वस्तू होण्यापेक्षा, स्वत:च्या हिमतीवर कमावणारी उद्योगिनी व्हा.

आज जगभर उद्योग, नोकरी, प्रशासन, कॉर्पोरेट, संशोधन अशा प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर चालल्या आहेत. ममता बॅनर्जी, इंदिरा गांधी, चंदा कोचर, इंद्रा नुई, वीणा पाटील, कल्पना चावला, विद्या बालन, प्रियंका चोपडा अशा अनेक महिलांनी आपापल्या क्षेत्रांत आपले कर्तृत्व गाजवले आहे. तुम्ही अनेक उद्योग व व्यवसायांची माहिती घेण्यास सुरुवात करा.

आपल्याकडे शिक्षण, ज्ञान, मेहनत करण्याची तयारी व आपण कितपत भांडवल गुंतवू शकतो याचा अंदाज घेऊन कोणकोणते व्यवसायाचे ऑप्शन्स आहेत याची यादी बनवा. त्यातील प्राधान्यक्रमाने काही व्यवसायांची निवड करा. पैकी शेवटी निवडलेल्या व्यवसायाचा सखोल अभ्यास करा. सुरुवात कशी करायची, रोजचे कामकाज, मार्केटिंग कसे करायचे याचे सखोल ज्ञान घ्या. तुम्हाला स्किल्ड व अनस्किल्ड असे दोन्ही प्रकारचे व्यवसाय करता येतील. स्किल्डमध्ये कॉम्प्युटर, इंजिनीअरिंग, वैद्यकीय इत्यादी पद्धतीचे व्यवसाय ज्यात तुम्हाला त्या त्या क्षेत्राचे चांगले शिक्षण व अनुभव आवश्यक आहे.

दुसरे क्षेत्र अनस्किल्ड ज्यात फारशी शिक्षणाची गरज नसते. त्यात खाद्यपदार्थ, सेवा, शिक्षण, लोणची, पापड, दुकान इत्यादीचा समावेश होतो. काही महिला एकत्र येऊन २० ते ५० जणी मिळून चांगला व मोठा व्यवसाय करू शकतात. आज प्रत्येक गृहिणी रोज १२ ते १६ तास काम करते. तेवढेच काम तिने स्वत:च्या व्यवसायात केले तर तिला किमान दरमहा ५० हजार रुपये फायदा होऊ शकतो.

स्किल्ड क्षेत्रात कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग, डेटा अ‍ॅनॅलिसिस, ई-कॉमर्स, पोर्टल मॅनेजमेंट, कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, एसईओ, इंटरनेट मार्केटिंग, इंटरनेट रीसर्च, ब्लॉगर, ऑनलाइन कन्सल्टंट, ऑनलाइन पब्लिक रिलेशन सपोर्ट, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, फोटो एडिटर इत्यादी शेकडो प्रकारचे व्यवसाय आहेत. अनस्किल्डमध्ये खाद्यपदार्थ बनवणे व विकणे, शिवणकाम, वस्तूचे पॅकेजिंग, एम्ब्रॉयडरी, टीशर्ट प्रिंटिंग, कस्टमाइडसाठी डिझाईनिंग, आर्ट व पेंटिंग, इमिटेशन ज्वेलरी, क्रेडिटेशन, ब्युटी पार्लर, योगा क्लासेस, वस्तूची खरेदी-विक्री, मसाला उद्योग इत्यादी शेकडो प्रकारच्या व्यवसाय संधी आज उपलब्ध आहेत.

छोटे उद्योग पुढे मोठे होतात. संधी तर हजाराने उपलब्ध आहेत. गरज आहे ती चाकोरीबद्ध जीवनपद्धती व मागास विचारसरणी झटकून धाडसाने कामाला लागणे व कर्तृत्व करून दाखवण्याची धमक असावी. आज नवर्‍याची खासगी नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी, कधी गळून पडेल सांगता येत नाही. अपघात, आजार इत्यादी खूप मोठी अनिश्चितता माणसाच्या जीवनात आहे. काही बरेवाईट झाले तर कुटुंब रस्त्यावर येईल तेव्हा दुय्यम चांगले उत्पादन असणे केव्हाही चांगले.

'स्मार्ट उद्योजक'चे आतापर्यंतचे सर्व अंक डिजिटल आवृतीत वाचा फक्त ४७० रुपयांत

तुम्ही अडचणीत आल्यावर तुमचा सख्खा भाऊ व बहिणीसुद्धा धावून येणार नाहीत, कारण आज ज्याचे त्याचे जीवन जगण्याचे वांधे झाले आहेत. तेव्हा गृहिणींनी स्वत:चा वेळ, थोडेसे भांडवल, बुद्धीचा वापर करावा व उद्योग व्यवसायात उतरावे व फक्त गृहिणी न राहता गृहलक्ष्मी बनावे. नोकरदाराची बायको नव्हे, तर नोकर्‍या देणारी बनावे. मुलींना हुंडा देऊन दुसर्‍याचे गुलाम करण्यापेक्षा तिला थोडे भांडवल देऊन उद्योग उभारण्यास मदत करा.



- प्रा. प्रकाश भोसले
bhosale1611gmail.com
९८६७८०६३९९

उद्योजकता... म्हणजे काय रे मित्रा? - अतुल राजोळी...







अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'उद्योजकता म्हणजे काय?' या विषयावरील उद्योजकीय मानसिकता उलगडणारा दिनांक १८-मार्च-२०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...
नमस्कार मित्रांनो 'माझा बिझनेस मित्र' या सदराअंतर्गत मी उद्योजक मित्रांशी संवाद साधणार आहे. आज बर्‍याच प्रमाणात मराठी तरुण उदयोग क्षेत्रात येत आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरु करुन तो यशस्वी करण्याच्या उद्देशाने ते निरनिरळ्या क्षेत्रांमध्ये बिझनेस करत आहेत. 'मराठी माणूस धंदा करु शकत नाही!' ही समजुत हळूहळू इतिहास जमा होऊ लागली आहे. मी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात गेल्या १० वर्षांपासुन कार्यरत आहे. प्रामुख्याने मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय सुरु करावा व नोकरी मागणार्‍यांच्या यादीत सामिल न होता नोकरी देणार्‍यांच्या यादीत सामिल व्हावे या विचारांचा मी आहे. परंतु आपल्यापैकी बहूतांश मराठी लघुउद्योजक, खास करुन पहिल्या पिढीचे लघुउद्योजकांना व्यवसायाचा काहीच अनुभव नसतो. त्यांच्याकडे विशिष्ट क्षेत्राचे थोडेफार तांत्रिक ज्ञान असते. त्याच्या आधारावर ते स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतात. उद्योजक बनतात! परंतु व्यवसायाचा अनुभव पाठीशी नसल्यामुळे, व्यावसायिक कौशल्य आत्मसात न केल्याने व व्यवसाय उभारणीबद्दल आवश्यक ज्ञान नसल्यामुळे कित्येक लघुउद्योजक वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असतात. मी शेकडो मराठी लघुउद्योजकांना व्यक्तिगतरित्या ओळखतो. त्यांच्या व्यवसायाबद्द्ल मला इथंबुत माहीती आहे व त्यांच्या अडचणी मी जवळून पाहिल्या आहेत. मी स्वतःदेखिल एक उद्योजक आहे. त्यामुळे 'माझा बिझनेस मित्र' या सदराव्दारे मी लघुउद्योजक मित्रांना, दर आठवडयाला आपला व्यवसाय यशस्वी करण्याच्या मार्गावर येणार्‍या अडचणींवर परिणामकारकपणे मात करण्यासाठी एक कानमंत्र देणार आहे. मी ठामपणे सांगु शकतो प्रत्येक कानमंत्र आपल्याला आपली व्यावसायिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लाभदायक ठरेल.
मित्रांनो आपण एक उद्योजक आहात. परंतु उद्योजकता म्हणजे काय? ह्या मुलभुत प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजुन घेतलं पाहीजे. जो पर्यंत आपण 'उद्योजकता' या शब्दाचा अर्थ समजुन घेत नाही तो पर्यंत आपण उद्योजकीय मानसिकतेचा अवलंब करु शकत नाही. बर्‍याच व्यक्तींची अशी समजुत असते की उद्योजक म्हणजे 'आपण आपल्या मर्जीचे मालक' असणे. आपण हवे ते करु शकतो व त्याचे आपल्याला पैसे मिळतात. बर्‍याच जणांना असं देखिल वाटत असते की उद्योजकता म्हणजे स्वावलंबी असणे, भरपुर मेहनत घेण्याची तयारी असणे व सर्व गोष्टी आपण स्वतः करणे. आपल्या, उद्योजकते विषयीच्या समजुती ठरवत असतात की एक उद्योजक म्हणुन आपण किती प्रगती कराल. आणि म्हणुनच 'उद्योजकता' म्हणजे काय हे समजुन घेणं महत्त्वाचे आहे.
मित्रांनो, उद्योजकता म्हणजे Entrepreneurship (आंत्रप्रुनियरशीप) उद्योजक म्हणजे Entrepreneur ( आंत्रप्रुनियर). 'आंत्रप्रुनियर' हा शब्द इंग्रजी जरी असला तरी त्यांचं मुळ फ्रेंच भाषेमध्ये आहे. या शब्दाचा अर्थ आहे 'अशी व्यक्ती जी जोखिम घेते'. Someone who undertakes risk. उद्योजकाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' आपल्याला उद्योजकता म्हणजे काय हे समजुन घ्यायचं असेल तर उद्योजक जोखिम का घेतो व कशी घेतो हे समजुन घेतलं पाहीजे. उद्योजकाने जोखिम घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 'बाजारपेठेतील व्यावसायिक संधी'. उद्योजक संधी ओळखुन त्यातुन यश मिळवण्यासाठी जोखिम घेतो व व्यवसाय उभारणीसाठी तो आपली कार्यक्षमता, पैसा, वेळ, मनुष्यबळ व यंत्रणा पणाला लावतो. त्या मोबदल्यात मिळालेले यश किंवा अपयशाला सामोरे जाण्याची त्याची तयारी असते.


मित्रांनो, जो पर्यंत बाजारपेठेत संधी नाही तो पर्यंत व्यवसाय किंवा कोणतंही प्रॉडक्ट किंवा सर्विस अस्तित्वात येणं अशक्य! उद्योजकाकडे ही संधी ओळखण्याची नजर असली पाहीजे. तसा दॄष्टिकोन आपसुक नसेल तर उद्योजकांनी विकसित केला पाहीजे. उद्योजक नेहमी भविष्याचा वेध घेणारा व त्यामध्ये संधी शोधणारा असला पाहीजे. एकदा व्यावसायिक संधी हेरली की मग वेळ येते रिस्क घेण्याची म्हणजेच जोखिम घेण्याची! व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी उद्योजक महत्त्वाचे रिसोर्स उपलब्ध करुन देतो व रिसोर्स उपलब्ध करुन देण्यासाठी त्याला जोखिम घ्यावी लागते. जोखिम घेण्यासाठी उद्योजकाने पुरेसा अभ्यास करणे गरजेचे आहे. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी उद्योजकाने कार्यक्षमता, संस्था व यंत्रणा, मनुष्यबळ, आर्थिक भांडवल व वेळ या सर्व रिसोर्सची योग्य त्या प्रमाणात उपलब्धता करुन दिली पाहीजे.
कार्यक्षमता : व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक ज्ञान व कौशल्य.
संस्था व यंत्रणा : व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी संस्था निर्माण करणे व त्या अंतर्गत सुनियोजीत यंत्रणा प्रस्थापित करणे.
मनुष्यबळ : योग्य प्रमाणामध्ये आवश्यक कार्यक्षमतेचे मनुष्यबळ उपलब्ध करणे.
आर्थिक भांडवल : व्यवसाय उभारणीसाठी लागणारा पैसा उभा करणे.
वेळ : आपला वेळ व्यवसाय निर्मितीसाठी गुंतवणे.
वरील सर्व बाबी जेव्हा उद्योजक उपलब्ध करतो तेव्हा तो एक प्रकारे जोखिम घेतो. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी प्लान बनवतो व कृती करतो. साध्य होणार्‍या परिणांमाना उद्योजक स्वतः सामोरा जातो. मग तो परिणाम यश असेल कींवा अपयश! आणि हा मुलभुत फरक आहे उद्योजकांमध्ये व इतरांमध्ये. 'Entrepreneur takes risk & experiences the consequences!' व्यवसायाच्या वाट्याला जर अपयश आलं तर त्याचा भुर्दंड उद्योजकालाच भरावा लागतो. आणि जर यश हाती आलं तर त्याचा मोलाचा वाटा उद्योजकाच्या वाट्याला येतो. म्हणुनच जगातील सर्वात श्रीमंत माणसे हे उद्योजकच असतात. त्यांनी घेतलेल्या जोखिमेचा त्यांना फार मोठा मोबदला मिळतो. कारण व्यवसाय उभारणीची एवढी मोठी जोखिम जर उद्योजक घेत असेल आणि जर अपयश आले तरी तो सामोरा जात असेल तर यश मिळाल्यावर त्याच्या जोखिमेच्या प्रमाणातच त्याला मोबदला मिळतो.
मित्रांनो, बरेच लघुउद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीलाच जोखिम घेतात. थोडेफार यशस्वी होतात. परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखिम घेणं थांबवतात. नवीन संधीचा शोध घेत नाहीत. नवीन रिसोर्सची निर्मीती करत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. बचावात्मक पवित्रा घेतात. माझ्यामते असे उद्योजक फक्त कागदावरच उद्योजक असतात. मानसिकतेने ते निवृत्त उद्योजक असतात असं मला वाटतं.
मित्रांनो, उद्योजकाचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' व्यवसायात अग्रेसर राहण्यासाठी उद्योजकांनी सातत्याने 'अर्थपूर्ण जोखिम' घेणं गरजेचं आहे. जो जोखिम घेतो तो उदयोजक! हे सुत्र लक्षात ठेवलं पाहीजे. त्यासाठी भविष्याचा वेध घेणारा दृष्टीकोन अवलंबला पाहीजे. जगातील बाजारपेठेत होणार्‍या गोष्टींचा आढावा घेतला पाहीजे. नवीन संधींचा ठाव घेतला पाहीजे व संधींच सोनं करण्यासाठी, व्यवसाय उभारणी केली पाहीजे. आणि त्यासाठी जोखिम घेतली पाहीजे.
लक्षात ठेवा, बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते. पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवले जात नाही.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन




Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठ्वा...




वेबसाईट: www.born2win.in
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.

मंगळवार, ११ डिसेंबर, २०१८

श्रीमंतीची गुरुकिल्ली’ - द मास्टर की टू रिचेस-The Master Key To Riches -



अ‍ॅण्ड्रय़ू कार्नेगी यांच्या ‘धन कमवा’ या सूत्रावर आधारित ‘श्रीमंतीची गुरुकिल्ली’ हे पुस्तक आजच्या सर्वोच्च व्यावहारिक यशाच्या तत्त्वज्ञानाचे तपशीलवार वर्णन करते. जगातील सर्वात शक्तिशाली आणि धनाढय़ अशा शेकडो माणसांच्या यशावर रचलेले हे अद्भुत तत्त्वज्ञान तुम्हाला जीवनाच्या सर्वच क्षेत्रात कशा रीतीने यश संपादन करायचे असते, ते दाखवून देईल. यात श्रीमंतीची सुरुवात, जीवनाच्या श्रीमंतीचे प्रकार, जीवनाचे पुरस्कार मिळवण्यासाठी सवयी, निश्चित उद्दिष्ट, मोबदल्यापेक्षा अधिक काम करण्याची सवय, मास्टरमाइंड तत्त्वाचे विश्लेषण, उपयोजित श्रद्धा, सवयीच्या ऊर्जेचा वैश्विक नियम, स्वयंशिस्त आदी पैलूंची ओळख करून देण्यात आली आहे


https://www.bookganga.com/R/60K8C

या 9 चांगल्या सवयी पुढच्या पिढीला नक्की शिकवा...



तुमच्या मुलांना तुम्ही चांगल्या सवयी लावल्या आहेत का?





आपल्या पालकांनी आणि आजी-आजोबांनी आपल्याला लहानपणी या चांगल्या गोष्टी करण्याची सवय लावली.सकाळी लवकर उठणे, देवाला नमस्कार करणे, सायंकाळी दिवा लावुन शुभंकरोती व श्लोक म्हणणे, जमिनीवर मांडी घालुन व हातपाय धुऊनच जेवायला बसणे.यापैकी किती गोष्टी तुम्ही आजही करता? वडीलधा-यांनी शिकवलेल्या कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीलादेखील शिकवल्या आहेत?

तुमच्या मुलांचे व्यक्तिमत्व घडवतील अशा काही चांगल्या सवयी

१. सकाळी लवकर उठणे-

तुम्ही रोज सकाळी लवकर उठता का? लेटनाईट पार्टीज,रात्री उशीरापर्यंत काम करणे किंवा रात्री बाहेर उशीरा फिरण्याच्या सवयीमुळे रात्री लवकर झोपुन सकाळी लवकर उठणे सर्वांनाच शक्य होते असे नाही.मात्र आयुर्वेदानुसार निरोगी आयुष्यासाठी आपण रोज सकाळी लवकर उठले पाहीजे.सकाळी लवकर उठल्याने शरीरावरचा ताण कमी होतो व पुर्ण दिवस आनंदात जातो.या सवयीमुळे तुम्हाला व्यायाम करण्यास वेळ मिळतो.रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठल्याने तुम्हाला फ्रेश वाटते व त्याचा तुमच्या कामावर चांगला परिणाम होतो. Psychiatry and Clinical Neurosciences मध्ये छापुन आलेल्या संशोधनानुसार सकाळी लवकर उठणा-या लोकांना डिप्रेशनचा धोका कमी असतो.

२. जमिनीवर बसून जेवणे-

सहसा लोक डायनिंग टेबल किंवा सोफ्यावर बसुन जेवतात.पण असे जेवणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक नाही.आपल्या पुर्वंजाप्रमाणे आपणही जमिनीवर मांडी घालुन बसुनच जेवले पाहीजे.कारण जमिनीवर बसुन जेवल्याने आपली पचनशक्ती सुधारते,वजन कमी होण्यास मदत होते,बॉडी पॉश्चर सुधारते,गुडघे आणि सांध्याचे कार्य सुरळीत चालते व रक्ताभिसरण देखील व्यवस्थित होते. जाणून घ्या जमिनीवर बसून जेवण्याचे 10 आरोग्यदायी फायदे !

३. जेवताना पाणी पिऊ नये-

आपण नेहमी जेवताना एक चुक करतो ती म्हणजे ताटासोबत एक पाण्याचा भरलेला ग्लास घेतो.जरी वडीलधा-यांनी जेवताना पाणी पिऊ नये हे सांगितले असले तरी आपण जेवताना पाणी पितो.जेवताना पाणी पिऊ नये यामागचे शास्त्रीय कारण असे की, त्यामुळे पचनासाठी पोटात निर्माण होणारे गॅस्ट्रीक ज्युस किंवा पाचकरस डायल्युट होतात.सहाजिकच त्यामुळे पचनप्रकिया मंदावते व अपचनाचा त्रास होतो.डायटिशन नेहा चंदा यांच्या मते, ‘जेवताना पाणी प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी देखील वाढते.’ हे नक्की वाचा या ‘५’ कारणांसाठी, जेवताना पाणी पिणे टाळा

४. रात्री सूर्यास्तापुर्वी जेवा-:

तुमचे आईवडील तुम्हाला रात्री आठ वाजण्यापुर्वी जेवा व लवकर झोपा असे सांगायचे का? जर तुमचे उत्तर होय असेल तर तुम्ही देखील तुमच्या मुलांना ही चांगली सवय जरुर लावा.आयुर्वेदानुसार आपण दररोज ‘रात्रीचर्ये’च्या पहिल्या प्रहरात जेवले पाहीजे.ज्यामुळे आपल्या शरीराचे कार्य निसर्गचक्राशी सुसंगत रहाते.तसेच त्यामुळे तुमचे वजन कमी होते,पचनाच्या समस्या दूर होतात,झोप चांगली लागते व तुम्ही दुस-या दिवशी उठल्यावर फ्रेश राहता.

५. गरम पाण्याने केस न धुणे-
आपले पुर्वज केस धुताना थंड पाण्याचा वापर करायचे.कारण गरम पाण्याने केस धुतल्यामुळे केसांच्या त्वचेतील पी.एच चे प्रमाण वाढते व परिणामी केस गळु लागतात. हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांच्या मते, ‘गरम पाण्याने केस धुतल्यास ते कोरडे व कमजोर होतात त्यामुळे ते पातळ दिसु लागतात.’ त्यामुळे शरीराचे व केसांचे तापमान नियमित ठेवण्यासाठी थंड पाण्याने केस धुवा. जाणून घ्या केसांचे सौंदर्य वाढवा , हेअर एक्स्पर्ट जावेद हबीबच्या विशेष टीप्स संगे !

६. जेवणापुर्वी व जेवणानंतर हात स्वच्छ धुणे-
मुलांना चांगली सवय लावण्यासाठी जरी ते काटे-चमच्याने जेवत असतील तरी जेवण्यापुर्वी त्यांना हात स्वच्छ धुण्यास सांगा.यामुळे त्यांना डायरिया,फुड इनफेक्शन व हिपॅटायटीस होण्याचा धोका कमी होतो.स्वच्छता व अधिक सुरक्षेसाठी जेवणानंतरही हात धुण्याची सवय त्यांना लावा.

७. जेवणानंतर चूळ भरा-

जेवणानंतर तुम्ही चूळ भरता का ? नसेल तर तुम्ही ही सवय स्वत: ला लगेच लावा व मुलांनाही शिकवा.चूळ भरल्याने दातांमध्ये अडकलेले अन्नकण साफ होतात.वेळीच हे अन्नकण साफ न केल्यास दातांमध्ये जंतुसंसर्ग होतो व त्यामुळे दातांमधुन दुर्गंध येणे व हिरडयांच्या समस्या निर्माण होतात.

८. घरी आल्यावर लगेच हातपाय धुणे-

दिवसभरातील कामे करुन घरी आल्यावर (जर अंघोळ करणे शक्य नसेल) आपण हातपाय स्वच्छ धुतले पाहीजे.घराबाहेर असताना आपल्या चेहरा व हातापायांवर धुळीचे कण जमा होतात.ज्यामुळे पोटांचे विकार,श्वासाच्या समस्या व त्वचा विकार होण्याचा धोका असतो.

९. दिवा लावुन प्रार्थना करणे-

तुम्ही रोज घरी देवासमोर दिवा लावुन प्रार्थना करता का ? तुमच्या मुलांना तुम्ही ही चांगली सवय लावली आहे का?

आपली संस्कृती व परंपरा जपण्यासाठी ही सवय मुलांना जरुर लावा.प्रार्थना किंवा गायत्रीमंत्रासारखे मंत्र मनाला शांत करतात.मुलांमध्ये स्मरणशक्ती व एकाग्रता वाढवातात.ह्रदयाला निरोगी ठेवतात,चिंता काळजी दुर करतात.डोळे बंद करुन ध्यानपुर्वक केलेली प्रार्थना तुमच्यामध्ये सकारात्मक विचार व अध्यात्मिक भावना निर्माण करते. जाणून घ्या गायत्री मंत्र पठणाचे 10 आरोग्यदायी फायदे

I Love Money (Marathi Edition) by Suresh Padmanabhan #आय लव्ह मनी - सुरेश पद्मनाभन



I Love Money (Marathi Edition) by Suresh Padmanabhan




आय लव्ह मनी




"जेव्हा तुम्ही पैशाकडे लक्ष देता, तेव्हा तो वाढायला लागतो." - सुरेश पद्मनाभन



आता नवीन उद्दराणे व प्रकरणासह पैशाच्या बाबतीतल तुम्ही ऐकलेलं सर्वात मोठ असत्य म्हणजे , "पैसा काही जीवनात फारसा महत्वाचा नाही." तुम्हाला तो आवडो किवा नावडो, त्याच्याशिवाय राहू शकत नाही." तुम्हाला तो आवडो किवां नावडो, तुम्ही त्याच्याशिवाय राहू शकत नाही, हे तर उघडच आहे. तुम्ही विकत घेत असलेल्या इतर वस्तुसारख्याच पैशालासुद्धा 'वापरण्याच्या सूचना' नकोत का?




पैशाची अंतिम रहस्ये जाणून घ्या, कारण जेव्हा तुम्ही पैशाकडे लक्ष देता, तेव्हा तो वाढायला लागतो. हे पुस्तक तुम्हाला काय देतं :

तुम्ही, तुमचं कुटुंब आणि तुमची संस्था याच्यासाठी पैशाचा स्पष्ट आराखडा


पैसा तुमच्या आयुष्यात कसा येतो आणि जातो त्याची नेमकी प्रक्रिया



शाची गळती थांबवण्याच्या पद्धती

तुमचं पैशाला विश्व पालटून टाकणान्या शक्तिशाली सवयी


पैशाला कसं आकर्षून घ्यावं, अडकलेले पैसे कसे वसूल करावे याच्या युक्त्या, देणं आणि घेणं, खर्च आणि बचत, पैसा आणि मेहनत , "नाही" म्हणण्याची शक्ती, आणि महान यशाच्या मार्गावर


तुमची घोडदौड सुरु करून देणाऱ्या पद्धती.



गेल्या दहा वर्षांत जगभरातील 40 000 हून अधिक लोक ज्यात सहभागी झाले, त्या मनी वर्कशॉपमध्ये ही सारी तंत्र वापरलेली आणि पारखलेली आहेत.




माझ्याबद्दल