गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

पांढरे डाग : साधा उपाय


1. पांढरे डाग किंवा कोड असलेल्यांनी “विटामन बी-१२” च्यागोळ्या नियमितत खाणे फायदेशिर ठरते.


2. पोटातून रक्तशुद्धीकर मंजिष्ठा चूर्ण, मंजिष्ठादि काढा घ्यावा. पांढर्‍या डागांवर बाहेरून लावण्यासाठी बावचीचे तेल उपयोगी पडते, मात्र हा प्रयोग आयुर्वेदिक तज्ञाच्या सल्ल्यानेच करावा.

3. चार गरम हळद पाव लिटर दूधाबरोबर ५-६ महिने घेतल्यास पांढरे डाग जातात.

4. दिवसातून ४-५ कप काळा चहा सहा महिने घेत राहिल्यास छाती आणि हातावर असणारे पांढरे डाग निघून जातात.

5. तुळशीची २५-३० ताजी पाने घेऊन बारीक वाटून घ्यावी. ६० गरम गोड दह्यासोबत किंवा दीड चमचा मधासोबत सकाळी न्याहारी अगोदर अर्धा तास सलग ३ वेळ प्यावे.

6. केळीची वळलेली पाने आगीत जाळावीत. या राखेत लोणी किंवा तूप मिसळुन अंगावर लावावे. हा उपाय दिवसातून ३-४ वेळ करावा.










साभार - इंटरनेट 

पांढरे डाग (Skin Disorder) (Vitiligo) (White Skin Patches)


आपल्या शरीरात विविध प्रकारच्या रंगांचे रेणू असतात. त्यापैकी मेलॅनिन या रंगद्रव्याने काळा अगर लाल रंग येतो. हे मेलॅनिन निरोगी त्वचेत, केसात, शरीराच्या आतील भागातील आवरणे- अस्तरे यात किंवा नखात असते. ते पुरेशा प्रमाणात नसले, अजिबात नसले किंवा झपाट्याने नष्ट पावले तर त्या भागातील रंगद्रव्याचा अभाव जाणवतो. असा अभाव जन्मजात अथवा आयुष्यात नंतर केव्हाही उत्पन्न झालेला असू शकतो. अनेकदा अशा भागामुळे व्यक्तीला कोणताही फरक जाणवत नाही, परंतु काही वेळा रुग्णाला तो भाग निरामय नसल्याचे जाणवते. आनुवंशिकतूेन आलेल्या जनुकीय दोषांमुळे असे होणे शक्‍य आहे. आहारातील त्रुटींचादेखील असा परिणाम होणे शक्‍य आहे. काही रसायने किंवा औषधांचे हे दुष्परिणाम असू शकतात. एखाद्या भागावर दाह होण्यानेदेखील असा अभाव होतो. जंतू, जीवाणू अथवा बुरशीच्या संसर्गाचा हा परिणाम असू शकतो. शारीरिक इजा किंवा जखमेमुळेदेखील असे डाग होऊ शकतात. थोडक्‍यात, पांढरे डाग येण्याची बरीच कारणे असू शकतात. त्वचेवर पांढरे डाग येण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे "कोड‘ येणे. सुरवातीला एखाद्या भागावर त्वचेचा रंग बदलतो. एक ते 20 सेंटिमीटर्स चौरस भागावर हा डाग असतो. या भागाच्या कडा अनेकदा अधीन गडद सावळ्या किंवा काळ्या वर्णाच्या असतात. बहुतेक वेळा शरीराच्या दोन्ही बाजूंना (उजव्या आणि डाव्या) एकसारख्या ठिकाणीच हे डाग उठू लागतात. सहसा शरीराच्या उघड्या भागावर आधी येतात. ज्या भागात त्वचेची घडी पडते तेथे येण्याचे प्रमाण जास्त असते. डोळे, नाक, तोंड, पार्श्‍वभागातील घडी येथे प्रमाण जास्त असते. शरीरातील हाडे जेथे सहज हाताला लागतात त्या भागावरही असे डाग आधी येतात. हे डाग वाढत जातात व एकमेकांत मिसळतात. ते शरीरभर पसरतात व केसांच्या मुळांवर परिणाम होऊन केसही पांढरे होतात. भुवया व पापण्यांचे केसही असे रंगहीन बनू शकतात. या सर्व भागात आपोआप रंगद्रव्याची निर्मितीदेखील होऊ शकते. चंद्राला खळे पडते त्याप्रमाणे कधी कधी काळ्या किंवा लाल तिळाच्या बाजूने गोलाकार कोडाची सुरवात होऊ शकते. कोड ही रंगाच्या रेणूच्या अभावाची एक स्थिती आहे. या स्थितीमुळे कोणत्याही शरीरक्रियेत बिघाड निर्माण होत नाही. कोडाप्रमाणे दिसणारे, परंतु न वाढणारे डाग त्वचेवर येऊ शकतात, यांना "इडियोपॅथिक गट्टे‘ म्हणतात. असे गोल किंवा लांबट गोल पांढरे डाग सहसा हातावर किवा पायावर येतात. हे डाग वाढत नाहीत आणि हा कोडाचा प्रकार नव्हे. संपूर्ण शरीरावर जन्मापासून असणाऱ्या "कोडा‘ला "आल्बिनिझम्‌‘ म्हणतात. हा विकार रंगगुणसूत्रांतील दोषामुळे आनुवंशिकतेतून आलेला असतो. त्वचा, केस आणि डोळे येथे कोठेही मेलॅनिन नसते. अगदी पांढऱ्या रंगापासून ते किंचित सावळ्या रंगाकडे झुकणाऱ्या वर्णापर्यंत त्वचेचा रंग असू शकतो. परंतु डोळ्यातील बाहुलीला मात्र रंग नसतो. हे डोळे स्थिर राहू शकत नाहीत. नजर तीक्ष्ण नसते. किंचित तिरळेपण आढळते. नेत्रपटलासदेखील रंग नसतो. मेलॅनिन रंगाच्या अभावामुळे त्वचेला सूर्यकिरणांचा अपाय होणे संभवते. ही काळजी आजन्म घ्यावी लागते. अशा व्यक्तींना कायम सनक्‍लॉथ वापरावे लागतात. त्वचा आच्छादलेली ठेवावी लागते. डोळ्यांना काळा चष्मा वापरावा लागतो. डोक्‍यावर टोपी ठेवावी लागते. त्वचेचा कर्करोग होण्याची शक्‍यता मोठी असते. त्वचा मानली तर तेथील मेलॅनोन्साईट पेशी अकार्यक्षम होतात. काही काळ अथवा कायम पांढरा डाग पडतो. आपल्या प्रतिकारशक्तीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे परकीय रेणूंना नष्ट करण्याकरिता त्या रेणूंविरुद्ध प्रथिने (प्रतिपिडे) निर्माण करणे. या कार्यात बिघाड झाल्याने दुर्दैवाने स्वतःच्या शरीरातील पेशींच्या विरुद्ध प्रतिपिडे तयार होऊ लागतात. अशा प्रकारच्या आजारांना (ऑटो- इम्यून डिस्‌ऑर्डर्स) म्हणतात. या आजारांपैकी काहींचा परिणाम त्वचेवर होतो. डिस्कॉईड व्यूपस एरिथिमॅटॉलस) हा असाच आजार होय. त्वचेवर दाह होऊन पुरळ उठते व तेथील त्वचेचा रंग बदलतो. त्वचेवर डाग व चट्टे उठू लागतात. हे चट्टे गुलाबी किंवा जांभळट रंगाचे असतात. त्यावर पिवळ्या किंवा राखी रंगाची खपली येते. त्वचेवर खपल्या दिसू लागतात. नाक व शेजारचा गालांचा भाग येथे बहुतेक रुग्णांना आजार होतोच. आजार बरा झाला तरी त्वचेवर व्रण दिसतात. डोक्‍यावरच्या त्वचेत झालेल्या आजारामुळे तिथे केस गळून पडतात (टक्कल पडते). 

त्वचेवर कोणत्याही कारणाने दाह झाला तरी मागे राहणाऱ्या व्रणामुळे तेथे पांढरा डाग कायम राहतो. अनेक विषाणूंमुळे असे डाग चेहऱ्यावर राहतात. अशा त्वचेच्या आजारांपैकी बुरशीमुळे होणारा आजार नेहमी आढळतो. त्याला "शिबे‘ म्हणतात. त्वचेवर लहान लहान खपल्या आल्यासारखी त्वचा होते. छातीच्या वरच्या भागात, मानेवर, दंडावर हा आजार अनेकांना होतो. त्वचेचा रंग हलका अथवा गडद होतो. सहसा गौरवर्णाच्या व्यक्तींमध्ये त्वचा काळवंडते. आता भारतातून महारोग या आजाराचे उच्चाटन होत आले आहे. महारोग एका जीवाणूपासून होतो ः मायकोबॅक्‍टेरियम लेप्री. त्वचेवर पांढरे चट्टे उठतात. तेथील वेदनेची संवेदना बधिर होते. आता या विकारावर प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत. योग्य वेळी उपचार झाल्यास तो पूर्ण बरा होऊ शकतो. काही औषधांमुळे केस व त्वचेच्या रंगावर परिणाम होतो. मलेरियासाठी क्‍लोरोक्वीन हे औषध वापरले जात असे. त्यामुळे भुवया व पापण्यांच्या केसांचा रंग भुरा होणे संभवते. त्याचप्रमाणे प्लॅस्टिक आणि विविध चिकटवणाऱ्या औषधांत वापरलेल्या रसायनांमुळे त्वचेचा रंग जाणे शक्‍य असते.









- डॉ. ह. वि. सरदेसाई
"Sakal"

नखांवर हे पांढरे डाग येण्यामागची ही आहेत कारणे...


नखांवर हे पांढरे डाग येण्यामागची ही आहेत कारणे

 अनेकांच्या नखांवर पांढरे डाग असतात. शनिवारी बेसन अथवा चणे खाल्ल्यास तसेच शनिची साडेसाती असल्यास असे डाग येतात असे सांगितले जातात. आपल्याही लहानपणी आपल्याला हेच सांगण्यात आले होते. 
मात्र नखांवरील पांढरे डाग असण्यामागे शनिची साडेसाती नाही तर कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हे पांढरे डाग नखांवर दिसतात. 
तसेच नखांना इजा झाल्यास त्याचे डाग नखांवर दिसतात. अनेकदा नखांना लहानसहान इजा होत असतात ज्या आपल्याला जाणवत नाहीत. मात्र त्याचे डाग नखांवर दिसतात. 
त्यामुळेच नखे मोठी होत गेल्यास नखांबरोबर हे डाग पुढेपुढे सरकतात आणि दिसेनासे होतात. तसेच अॅलर्जीमुळेही नखांवर पांढरे डाग होऊ शकतात...

पांढरे डाग मिटवू शकतात हे 7 उपाय


पांढरे डाग मिटवू शकतात हे 7 उपाय
शरीरावर कोणत्याही पांढरे डाग पडले की ते सोपे रित्या बरे होत नाही. डॉक्टर्सप्रमाणे याचे विभिन्न कारण असू शकतात. पण काही घरगुती उपायाने हे दूर होऊ शकतात: 

1 तांबा- तांबा तत्त्व त्वचेत मेलनिन निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यासाठी रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेलं पाणी सकाळी रिकाम्यापोटी प्यावे.

2. नारळाचे तेल- हे त्वचेला पुन्हा पूर्वीसारखं करण्यात मदत करतं. यात जीवाणूरोधी आणि संक्रमण विरोधी गुण आढळतात. प्रभावित त्वचेवर दिवसातून 2 ते 3 वेळा नारळाच्या तेलाने मसाज करणे फायद्याचे ठरेल.

3. हळद- 250 मिलीलीटर मोहरीच्या तेलात 5 मोठे चमचे हळद पावडर मिसळून लेप तयार करा. हे लेप दिवसातून दोनदा प्रभावित त्वचेवर लावा. किमान 1 वर्षापर्यंत हा उपाय अमलात आणा. याव्यतिरिक्त आपण हळद पावडर आणि कडुनिंबाच्या पानांचा लेपही लावू शकता.

4. कडुनिंब- कडुनिंब सर्वोत्तम रक्तशोधक आणि संक्रमण विरोधी तत्त्वाने भरपूर औषधी आहे. कडुनिंबाचे पाने ताकात पिसून लेप तयार करा. हा लेप त्वचेवर लावा आणि पूर्णपणे वाळल्यावर धुऊन टाका. याव्यतिरिक्त आपण कडुनिंबाचे तेलही वापरू शकता. कडुनिंबाचा ज्यूस पिणेही उत्तम राहील.

5. लाल माती- लाल माती भरपूर मात्रेत तांबा आढळतो, जे मेलनिन निर्मिती आणि त्वचेला पूर्ववत करण्यात मदत करतं. आल्याच्या रसात लाल मातीचे लेप तयार करून प्रभावित त्वचेवर लावणे फायद्याचे ठरेल.

6. आलं- रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी आणि मेलनिन निर्मितीसाठी आलं फायदेशीर आहे. 
आल्याचं रस पाण्यात मिसळून प्यावं. आल्याचं रस प्रभावित त्वचेवर लावावं.













आभार - इंटरनेट 

पांढरे कोड




पांढरे कोड










त्वचेखाली रंगद्रव्याचे प्रमाण कमी झाल्याने 'पांढरे डाग' येतात. मात्र पांढरे कोड का येते याची पूर्ण माहिती आपल्याला अजून तरी नाही. काही प्रकारचे कोड काही प्रमाणात आनुवंशिक आहेत. याचा अर्थ काही वेळा ते पुढच्या पिढयांत उतरू शकतात. पण दिसण्याचा भाग सोडल्यास कोडाचा इतर त्रास अजिबात नसतो. केवळ डागांसाठीच कोडावर उपचाराची इच्छा असते.
कोडासाठी अजून तरी हमखास औषध किंवा उपाय सापडलेला नाही. ब-याच वर्तमानपत्रांत लोकांच्या भावनांचा आणि अगतिकतेचा गैरफायदा घेऊन कोडाच्या उपचारांची जाहिरात येते व ती ब-याचदा फसवी असते. कोडाच्या उपचारावर अजून संशोधन चालू असून अल्ट्राव्हायोलेट किरण, काही रसायने, इत्यादी वापरून पांढरा झालेला भाग इतर त्वचेसारखा करण्याचे प्रयत्न चालू आहेत. (याने सुमारे 60-70 टक्के रुग्णास फायदा होतो)
मात्र आयुर्वेदिक पध्दतीत आंतरशुध्दीबरोबर भल्लातक तेल लावतात. याने काही रुग्णांमध्ये सुधारणा झाल्याचा अनुभव आहे. यासाठी आयुर्वेद तज्ज्ञाकडे पाठवावे.
किनवट तालुक्यात उनकेश्वर येथे उष्ण पाण्याचे झरे आहेत. या गंधकयुक्त पाण्याचा वापर व वनौषधी उपचारासाठी अनेक रुग्ण येतात. यातल्या अनेकांना गुण आलेला दिसतो.


















आभार - आरोग्य विद्या   

शुक्रवार, १३ जानेवारी, २०१७

मकर संक्रांत म्हणजे काय?..


सूर्याच्या मकर संक्रमणावर आधारलेला एक भारतीय सण. वर्षभरात बारा राशींतून सूर्याची बारा संक्रमणे होत असली, तरी भारतीय लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला म्हणजेच संक्रांतीला अधिक महत्त्व आहे कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो आणि उत्तर गोलार्धात राहणाऱ्या भारतीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता यांचा लाभ होतो. त्यामुळेच त्यांना मकर संक्रमण उत्सवाच्या स्वरूपात स्वागतार्ह वाटते.
सूर्याचा मकर राशीत प्रवेश होण्याच्या क्षणाला मकर संक्रमण म्हणतात. मकर संक्रांतीचा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. यावर्षी गुरूवार १४ जानेवारी रोजी रात्री १२ नंतर सूर्य निरयन मकर राशीत प्रवेश करत असल्याने मकर संक्रांतीचा पुण्यकाल दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार १५ जानेवारी रोजी सुर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे. मकर संक्रमणाचा क्षण सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या वेळात येत असेल, तर पुण्यकाल त्याच दिवशी धरावयाचा व सूर्यास्तानंतर येत असेल, तर पुढचा दिवस संक्रांती म्हणून मानावयाचा अशी पद्धत असल्यामुळे मकर संक्रांत क्वचित एका दिवसाने पुढे जाऊ शकते.
 मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. हा आनंदाचा व उपभोगाचा सण मानला जातो. तीळ लावलेल्या भाकऱ्या, लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि खमंग खिचडी असा लज्जतदार खास बेत या दिवशी असतो. 
हा सण माणसांच्या परस्पर संबंधांमध्ये स्नेह व माधुर्य हवे, असा संदेश देत असल्यामुळे सामाजिक दृष्टीनेही महत्त्वाचा आहे. तिळगूळ देताना ’तिळगूळ घ्या गोड बोला’ असे म्हणण्याची पद्धत एकमेकांमधीव स्नेह वाढवतो. भारतातील बहुतेक सर्व भागांतून हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात संक्रातीला खिचडी संक्रांती असे म्हणतात. तर बंगालमध्ये संक्रांतीला तिळुआ संक्रांती व पिष्टक संक्रांती असे म्हणतात. दक्षिणेत याच वेळी पोंगळ (पोंगल) नावाचा तीन दिवस चालणारा उत्सव असतो. पहिल्या दिवशी इंद्राप्रीत्यर्थ भोगी पोंगळ वा इंद्रपोंगळ, दुसऱ्या दिवशी सूर्याप्रीत्यर्थ सूर्यपोंगळ आणि तिसऱ्या दिवशी गायीसाठी मट्टपोंगळ साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थस्नान आणि दान पुण्यदायी मानले आहे. त्या दिवशी प्रयाग, गंगासागर इ. ठिकाणी प्रचंड मेळे भरतात.

इंग्रजी महिन्यांची नावे कशी पडली?...


इंग्रजी महिन्यांची नावे कशी पडली?
आज संपूर्ण जगाने 'ग्रेगरियन' कालगणना स्‍वीकारली आहे. पोप ग्रेगरी (तेरावे) यांनी हे कॅलेंडर प्रचारात आणल्यामुळे त्यांच्‍या सन्मानार्थ याला ग्रेगारियन कॅलेंडर हे नाव देण्यात आले. या पद्धतीला न्यू स्टाइल, ख्रिस्ती वा इंग्रजी कालगणना असेही म्हणतात. मात्र, या कंलेंडरमधील महिन्‍याला नावे कशी दिली गेली, या नावांचा अर्थ काय ? याची ही रंजक खास माहिती

जानेवारी
जानेवारी हा शब्द ‘जॅनरियुस’ या लॅटीन भाषेतील शब्‍दापासून तयार झाला. 'जानूस किंवा 'जेनस' या रोमन देवाच्‍या आधारे ‘जॅनरियुस’ हे नाव पडले. या देवाला पोटासमोर आणि पाठीमागे अशी दोन तोंडे असल्‍याची अख्‍यायिका आहे. त्‍यामुळे हा देव एकाच वेळी मागे आणि पुढे पाहू शकतो. जानेवारी महिन्‍याचेही असेच आहे. जानेवारीमध्‍ये मागील वर्षाला विसरले जात नाही आणि नवीन वर्षाचे स्‍वागत केले जाते. एकूणच काय तर व्‍यक्‍ती दोन वर्षांकडे समान नजरेने पाहते. त्‍यामुळे वर्षाच्‍या पहिल्‍या महिन्‍याला जानेवारी हे नाव दिले गेले.

फेब्रुवारी
‘फॅबीएरियुस’ हा लॅटीन शब्‍दाचा 'फेब्रुवारी' असा अपभ्रंश झाला. ‘फेब्रू’ आणि ‘अरी’ हा त्‍याचा मूळ धातू. त्‍याचा अर्थ शुद्ध करणे असा होतो. प्राचीन रोमन संस्‍कृतीमध्‍ये हा महिना आत्‍मशुद्धी आणि प्रायश्चितासाठी महत्‍त्‍वाचा मानला जात होता. त्‍यामुळे त्‍याला फेब्रुवारी नाव दिले गेले.

मार्च
रोमन देवता ‘मार्टियुस’ (मार्स) याच्‍या नावावर 'मार्च' महिन्‍याचे नाव पडले. हा युद्ध आणि समृद्धीचा देव आहे. या महिन्‍याच्‍या २३ तारखेला सूर्य आकाशाच्‍या मधोमध तळपतो. या दिवशी दिवस आणि रात्र सारख्‍याच तासांचे असतात.

एप्रिल
‘एप्रिलिस’ या शब्‍दांपासून 'एप्रिल' हा शब्‍द तयार झाला. एप्रिलिस हा लॅटिन भाषेतील ‘एप्रिल्ज’ या शब्‍दाचा अपभ्रंश आहे. उद्घाटन करणे, उघडणे, फुटणे असा त्‍याचा अर्थ आहे. या महिन्‍यामध्‍ये युरोपात वसंताचे आगमन होते. त्‍यामुळे या महिन्‍याचे नाव ‘एप्रिलिस’ असे ठेवले गेले. कालांतराने त्‍याला ‘एप्रिल’ असे म्‍हटले जाऊ लागले. रोमन देवी ‘एक्रिरिते’च्‍या नावावर हे नाव आधारित आहे.
मे
‘मेइयुस’ या लॅटिन शब्‍दापासून 'मे' शब्‍द तयार झाला. हे नाव वसंतदेवी 'मेयस'च्‍या नावावरून पडले, अशी अख्‍यायिका आहे.

जून
जून हा ‘जुनियुस’ शब्‍दाचा अपभ्रंश आहे. रोमची प्रमुख देवी ‘जूनो’ हिच्‍या नावावरून या महिन्‍याला हे नाव दिले गेले. ‘जूनो’ ही रोमन देवराज जीयस याची पत्नी आहे. जूनो शब्द ‘जुबेनियस’ या शब्‍दापासून तयार झाला. त्‍याचा अर्थ 'विवाह योग्य कन्या' असा होतो.

जुलै
रोमन सम्राट जूलियस सीजर याच्‍या नावावरून जुलै महिन्‍याचे नाव पडले. याच महिन्‍यात जूलियस सीजरचा जन्‍म झाला होता. त्‍याच्‍या जन्‍मापूर्वी या महिन्‍याचे नाव ‘क्विटिलिस’ असे होते.

ऑगस्‍ट
जूलियस सीजरचा पुतण्‍या आगस्टस सीजर याने आपल्‍या नावावर या महिन्‍याचे नाव ठेवले. यापूर्वी या महिन्‍याचे नाव ‘सॅबिस्टलिस’ असे होते.

सप्‍टेंबर
‘सप्टेम’ शब्‍दावर आधारित असलेल्‍या 'सप्‍टेंबरचा अर्थ '७' असा होतो. प्राचीन रोमन कॅलेंडरमध्‍ये ‘संप्टेबर’ महिन्‍याला सातवे स्‍थान होते. मात्र, त्‍यात सुधारणा होऊन आता हा वर्षातील नववा महिना आहे.

ऑक्‍टोबर
प्राचिन रोमन कॅलेंडरमध्‍ये या महिन्‍याला आठवे स्‍थान होते. मात्र, आता हा दहावा महिना आहे. याचा अर्थ '८' असा होतो.

नोव्‍हेंबर‘नोवज’ या लॅटिन शब्‍दावरून ‘नोव्‍हेबर’ हे नाव पडले. याचा अर्थ 'नऊ' असा होतो. प्राचिन रोमन कॅलेंडरमध्‍ये हा नववा महिना होता



डिसेंबर
लॅटिन शब्द ‘डेसेम’ पासून ‘डेसेंबर’ (डिसेंबर) हा शब्‍द तयार झाला. याचा अर्थ १० असा होतो. प्राचीन रोमन कॅलेंडरमध्‍ये हा दहावा महिना होता. आता वर्षाचा शेवटचा आणि बारावा आहे.

माझ्याबद्दल