या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार ....
मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !..
आपला,
* डी . सचिन
छत्रपती शिवाजी महाराज यांनी तब्बल १३२ दिवस. म्हणजे २ मार्च १६६० ते १२ जुलै १६६० एवढा काळ छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ गडाच्या वेढ्यात काढला. तो ही एक प्रकारे लॉकडाऊनचा प्रकार होता. आणि त्यावेळी त्यांच्यासोबत घरातील कुटुंबातील कोणीच मंडळी उपस्थित नव्हती. गडावर ना टीव्ही,ना मोबाईल,ना इंटरनेट,नाही कोणी संस्था-मंडळ, किंवा नेते घरपोच अन्न पुरवत होते. तरीही त्यांनी १३२ दिवस म्हणजे जवळजवळ ४ महिने त्या लॉकडाऊनचा सामना केला. आणि आज आपल्याला आपल्याच घरी आपल्या कुटुंबासोबत, सर्व सोयी सुविधा असताना सुद्धा २१ दिवस गप्प घरी बसवत नाही.मग आपण शिवरायांच्या मातीत जन्माला येऊन काय उपयोग आणि आपल्याला काय अधिकार शिवरायांचे नाव घेण्याचा. बघा विचार करा जर आपण आपल्या राजांचा इतिहास मनापासून जगलो तर शिवचरित्र आपल्याला प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नक्कीच देते.नुसते जय शिवराय बोलून उपयोग नाही शिवराय मनात,आणि डोक्यात शिरायला हवेत.
*भगवान बुद्ध म्हणतात “जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल* ” "WHAT YOU THINK , YOU BECOME”.
*करोनाला आकर्षित करू नका*
मित्रांनो मानवी मनाचे दोन भाग असतात. एक बाह्यमन व दुसरे अंर्तमन.बाह्यमन दहा टक्के पॉवरफुल असते तर अंर्तमन ९० टक्के पॉवरफुल असते.
*बाह्यमनाने अंर्तमनाला दिलेली सुचना किवा विचार प्रत्यक्षात अस्तित्वात आणण्यासाठी अंर्तमन प्रयत्नांची पराकाष्ठा करते*. *व जगातील सर्व प्राण्यांची अंर्तमन हि एकमेकांशी (कनेक्टेड) जोडलेली असतात*. म्हणून "या हृदयीचे त्या हृदयी" असे म्हणतात . थोड अधिक विस्ताराने समजून घेण्यासाठी बाह्यमनाला आपण तात्पुरते राम म्हणूया व अंर्तमनाला हनुमान. रामाने हनुमानाला जे सांगितले ते प्रत्यक्षात आणण्यासाठी हनुमान पूर्णतः ताकद वापरतो.व आपल्या सगळ्यांचे हनुमान म्हणजेच (अंर्तमन) एकमेकांशी जोडलेले आहेत. म्हणून संपूर्ण विश्वात हनुमान – वानरसेना गुगल नेटवर्क आहे.
*जो विचार तुम्ही अंर्तमनाला देताल तशी स्थिती, व्यक्ती, ते तुमच्या आयुष्यात आणते. याला LAW OF ATTRACTION आकर्षणाचा सिद्धांत असे म्हणतात*.
भयाचा विचार भयभीत स्थितीला आकर्षित करेल. *भगवान बुद्ध म्हणतात “जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल* ” "WHAT YOU THINK , YOU BECOME”.
म्हणून म्हणतात “ *तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ” विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल*.
आपण जसा विचार करतो त्या प्रकारची तरंग आपण आपल्या आयुष्यात खेचत असतो. सगळ्या प्रकारची तरंग वातावरणात आहेत. तुम्ही ज्या चॅनलचे बटन दाबता तोच ट्यूनअप होऊन प्रक्षेपित होतो. रेडिओची सुई जेथे मॅच होईल तीच धुन चालू होईल. *म्हणून तुम्ही जो अँटेना लावताल त्याच प्रकारची तरंग तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करताल*.
*तुम्ही जसा विचार कराल त्याच प्रकारची तरंग अर्थात स्थिती, व्यक्ती, संधी आकर्षित कराल. WORD IS WORLD, THOUGHT IS WORLD.शब्द व विचार हे जग आहे*. म्हणून सकारात्मक विचार करा.एकाच वेळेला अनेक जणांनी प्रार्थना केल्यावर भले ते दूर असोत “क्वांटम फिजिक्स ” चं सिद्धांतानुसार ती फलदायी होते.
*म्हणतात ना "किसी चीज को अगर दिलसे चाहो तो सारी कायनात उसे तुमसे मिलाने मे जुड जाती है" I म्हणून निर्भय होऊन करोना व्हायरस पंचतत्वात विलीन होऊन नष्ट झाला आहे. आम्ही सर्व जन सुखी , निरोगी, आनंदी आहोत. सारे प्राणी सुखी आहेत. सर्वांच कल्याण होत आहे. अशी प्रार्थना वारंवार करा*. डोळे बंद करून सर्व जग सुखी आहे. तुम्ही व तुमचे कुटुंब आनंदी व सुखी आहे असे भावना सहित चलचित्र (Visualisation) पुन्हा पुन्हा बघा. व सर्वांना संकटमुक्त केल्याबद्दल त्या वैश्विक शक्तीचे वारंवार आभार माना. याला *कृतज्ञतेची* साधना म्हणतात. मित्रानो संकटातून बाहेर पडण्याच्या आज हा उत्तम मार्ग आहे.
बाकी *काळजी घ्या म्हणजे काळजी करावी लागणार नाही* .
*लॉक आऊट चिंतन*
पटलं तर घ्यायचं नाही तर सोडून द्यायचं ...
आता खूप मोठी जागतिक मंदी येणार असे सर्वत्र बोलले जात आहे . मुळात मंदी म्हणजे काय ? गती नसणे ! गती म्हणजे काय ? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्याचा वेग ! अधिक वेग कधी आवश्यक असतो ? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे अत्यावश्यक असेल तेव्हाच ! यावरून आपल्याला कळलेच असेल की गेल्या शे-दोनशे वर्षांमध्ये काही विशिष्ट वर्गांनी ठरवून लोकांच्या गरजा वाढवल्या आणि त्यांची पूर्तता करण्यासाठी लोकांची गती वाढविली . गेल्या तीस वर्षांमध्ये आपण काय-काय अनावश्यक गोष्टी स्वीकारल्या होत्या हे आज आपल्याला वीस दिवस सलग घरी बसल्यावर लक्षात आले असेलच ! आपल्याला गाडी लागली नाही पेट्रोल लागले नाही चित्रपटगृहात जायची गरज पडली नाही हॉटेलमध्ये जाण्याची गरज वाटली नाही . ऑनलाइन काही मागवावे लागले नाही . शेवटी गल्लीतला छोटा दुकानदारच कामाला आला . मग आपण गेली तीस वर्षे ग्लोबलायझेशनच्या नावाखाली जो काही धिंगाणा घातला होता तो नक्की काय प्रकार होता ? आज जगातील सर्वात मोठे भांडवलदार देश कसे भिकेला लागले आहेत हे आपण पाहतो आहोत ! समोरच्या माणसाला जितके परावलंबी बनवाल तितका तो तुमचा गुलाम होत जातो आणि तुमचा व्यवसाय वाढतो हे व्यवसाय वाढवण्याचे सोपे सूत्र आहे . गायछाप तंबाखू ज्यांना खावी लागते त्यांना विचारा ! तंबाखू शिवाय त्यांचे आयुष्य उत्तम जात असे परंतु कोणीतरी येऊन चटक लावली आणि आता तर तंबाखू खाल्ल्या शिवाय त्यांना करमतच नाही . तशाच अनेक अनावश्यक सवयी आपल्याला या भांडवलदार देशांनी लावल्या . यापूर्वी आपल्याकडे व्यवसाय नव्हते का तर असे अजिबात नाही . *बारा बलुतेदार पद्धती ही स्थानिक व्यवसायाला पाठबळ देण्यासाठीच निर्माण झाली होती* . त्यातून एखाद्या छोट्याशा गावाची अर्थव्यवस्था अगदी सुरळीतपणे चालत असे . आपल्याकडे पैशाला पैसा म्हणत नाहीत तर अर्थ म्हणतात या अर्थातच सर्व अर्थ दडलेला आहे .ज्या गोष्टीला अर्थ आहे त्याच गोष्टीसाठी खर्च करावा लागेल तो पैसा . बाकीचा सर्व अनर्थच ! आज आपण नीट निरीक्षण करून पहा . ज्या ज्या देशांनी भांडवलशाहीचा उदोउदो केला किंवा अगदी साम्यवादाचा अंगीकार केला ते सर्व आज अक्षरशः भिकेला लागले आहेत . कारण त्यांनी आपल्या देशातील सहज नैसर्गिक विनिमय व्यवस्था मोडून काढून नवी व्यवस्था उभी केली . निसर्गाला अनुरूप आणि निसर्गावर अवलंबून असलेले अर्थकारण बाजूला टाकत निसर्गाचा बळी घेणारे घातक अर्थकारण व त्याला पूरक असे राजकारण करत राहिले . केवळ तेला वरून झालेली गेल्या शतकातील युद्धं आठवा . आज कोणाला एक थेंबभर सुद्धा तेल लागत नाही हे सिद्ध झालेले आहे .न्यूयॉर्क शहर बंद करण्यास ट्रम्प यांचा विरोध का होता यामागचे कारण देखील तेच आहे ! ते असे म्हणत राहिले की न्यूयॉर्क बंद पडले तर जगाची अर्थव्यवस्था कोलमडून पडेल . प्रत्यक्षामध्ये त्यांना अशी भीती होती की न्यूयॉर्क बंद पडून देखील जगाला काही फरक नाही पडणार हे सिद्ध होणार आहे ! त्यामुळे ते न्यूयॉर्कला बंद होऊ देत नव्हते ! इंग्लंड इटली स्पेन फ्रान्स या सर्व इतरांना लुबाडून श्रीमंत झालेल्या तथाकथित प्रगत राष्ट्रांची देखील आज काय अवस्था झाली आहे आपण पाहतो आहोत ! जिथे मानवी भावभावनांना शून्य किंमत दिली जाते आणि पैसा आणि भोग हेच सर्वस्व होते तिथे याहून वेगळे काय होणार ? आज आपल्या इथले लोक लाखो रुपये खर्च करून युरोप अमेरिका ऑस्ट्रेलिया वगैरे देश पाहायला जातात . आणि तिथली नगरे किती टापटीप आहेत व सुनियोजित आहेत याचे गोडवे गातात ! त्या सर्वांना माझे सांगणे आहे की *आपण एकदा दक्षिण भारतात यावे . इथली शब्दशहा हजारो भव्यदिव्य मंदिरे व त्यांच्याभोवती वसवलेली आटोपशीर नेटकी शहरे पहावीत* . आजही कुणाच्या बापाचा घास नाही इतकी भव्य स्ट्रक्चर्स इतक्या कमी वेळामध्ये उभे करण्याचा ! आपल्या इथे जी संस्कृती अत्यंत परमोच्च बिंदूवर नांदत होती तिचा सर्वनाश करुन या सर्व युरोपियन आणि अरबी राष्ट्रांनी स्वतःच्या तुंबड्या भरल्या व त्यावरच आज ती उभी आहेत .
*जगाच्या पाठीवर असे फार कमी देश आहेत जिथे केवळ एका वस्त्रानिशी कुठल्याही ऋतूमध्ये निवांत राहता येते* . भारत भूमी ही अशा सर्व भौगोलिक प्रांतांमध्ये श्रेष्ठ भूमी आहे कारण आपली संस्कृती अजूनही टिकून आहे . आपल्या संस्कृतीने कधीच कोणाचा द्वेष केला नाही आणि कधीच पैशाला अवाजवी महत्त्व देखील दिले नाही . आपण लक्ष्मीला झाडूची उपमा दिली . याचा अर्थ तुझे स्थान घराबाहेर आणि ते देखील दु:खे दूरिते दूर करण्यापुरतेच मर्यादित आहे . घरांमध्ये फक्त विष्णुला स्थान ! आपले अनेक देव देखील वैराग्याचे मूर्तिमंत प्रतीक आहेत जसे साक्षात शिवशंकर ! आज संपुर्ण करोनाच्या पार्श्वभूमीवर भारत देश ताठ मानेने उभा आहे याचे एकमेव कारण आपली उदात्त संस्कृती हेच होय .आज या महामारी मुळे आपल्याला काय काय कळले आहे ते लक्षात घेणे आवश्यक आहे .
चित्रपटांमध्ये डाव्या लोकांनी उभे केलेले हिरो-हिरॉईन हे खरे नव्हेत तर वेळप्रसंगी आपला जीव वाचवणारे व त्यासाठी आपला जीव धोक्यात घालणारे डॉक्टर नर्सेस पॅरामेडिकल फोर्सेस पोलीस दल आणि लष्कर हेच खरे हिरो आहेत .
*सासु सुना मध्ये भांडणाचे बीज पेरणाऱ्या किंवा वासना चाळविणाऱ्या रियालिटी शो सारख्या मालिका ह्या आनंद देणाऱ्या नसून रामायण महाभारतासारखी महाकाव्यंच आपल्याला आंतरिक समाधान आणि जगण्याचे बळ देतात* .
जगात जे जे म्हणून मोठे मोठे देश आपण मानत आलो ते सर्व भारतापुढे फारच खुजे ठरले आहेत .
*दरवर्षी ठराविक टक्के अर्थव्यवस्था वाढलीच पाहिजे हा एक मोठा भ्रम असून स्थिर अर्थव्यवस्था राहू शकणे हेच खरे यश आहे* .
मेंदूवर सतत येणारा ताण कमी करायचा असेल तर या १० अफलातून ट्रिक्स ट्राय करून पहाच!
इनमराठी टीम
===
रोजच्या जगण्यात आपल्यावर अगदी हलका तणाव नेहमीच असतो. आपल्याला या तणावाची इतकी सवय झालेली असते की, त्याचा आपल्या मनावर किंवा शरीरावर काही विशेष परिणाम जाणवत नाही.
मात्र कामाच्या ठिकाणी किंवा घरात एखादी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास आपण अगदीच खचून जातो.
याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सध्या सुरु असलेला लॉकडाऊन.
कोरोनाचा कहर आणि तो रोखण्यासाठी सरकारनं उचलेलं पाऊल म्हणजे २१ दिवसांचा लॉकडाऊन.
यापुर्वी सलग २१ दिवस घरात बसण्याची सक्ती कधीही करण्यात आली नव्हती.
ही प्रक्रिया योग्य आणि अत्यंत गरजेची आहे यात शंका नाही, मात्र यामुळे घराघरात सध्या वादाला सुरुवात होताना दिसते.
वर्क फ्रॉम होम, त्यात घरातल्या कामांचा डोंगर, दिवसभर सगळेच घरी असल्याने मतभेद यांमुळे एकाक्षणी मेंदुवरचा ताबा सुटून भांडणही होत आहे.
त्यामुळे येणारं नैराश्य, कोरोनाची भिती, चिडचीड यांचा अनुभव तुम्ही सुद्धा घेत आहात?
मग हा लेख वाचणं तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल.
कारण निराशेच्या वेळी आपल्या मनातील भावनांचा निचरा करून शांतता अनुभवणे फार गरजेचे असते.
तणावाच्या वेळीही मेंदू शांत आणि प्रसन्न ठेवण्याच्या या दहा क्लृप्त्या जाणून घ्या आणि नेहमीच आनंदात रहा.
१. ध्यान धारणेसाठी वेळ द्या
ध्यानधारणेने शरीर आणि मनावर अनेक चांगले परिणाम जाणवतात. सुरुवातील हे थोडं अवघड वाटतं. काही लोकं एक दोन दिवस ध्यान धारणा करतात आणि तिसऱ्या दिवशी कंटाळतात.
परंतु नियमितपणे ध्यानधारणा करण्याची सवय लावून घेतल्यास याचा शारीरिक आणि मानसिक तणावाशी सामना करण्यास मदत होते.
यामुळे तुमच्यातील काम करण्याचा उत्साह टिकून राहतो. दररोजच्या दिवसातील फक्त १० मिनिटे ध्यानधारणेसाठी द्या आणि स्वतःच फरक अनुभवा.
२. कृतज्ञता व्यक्त करा
अनेकदा आयुष्यात संकटांची मालिकाच सुरु होते.
अशावेळी आपण जे चांगले आहे त्यावरील लक्ष हटवून आयुष्यात जे काही वाईट घडत आहे त्यावरच जास्त जोर देतो.
परंतु, अशा संकटाच्या वेळीही तुमच्याकडे ज्या जमेच्या बाजू असतील त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करा.
दिवसातून किमान अशा तीन गोष्टी लिहून काढा ज्या तुमच्याकडे आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञ वाटते. यामुळे दैनंदिन आयुष्याकडे पाहण्याचा सम्यक दृष्टीकोन प्राप्त होईल.
३. नेहमी सकारात्मक विचार करा.
जेंव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होते तेंव्हा बहुतेक वेळा आपले मन नकारात्मक विचारात गुंतून राहते.
परिस्थिती जशी आहे त्यापेक्षा ती अधिक वाईट होऊ शकते याच्या अनेक कल्पना मानाने रंगवून झेलल्या असतात.
त्यामुळे मनावरील ताण आणखीन वाढतो. अशावेळी मन स्थिर न राहता भरकटते.
अशावेळी पुढे काय? हा प्रश्न विचारून नकारात्मक कल्पना करणे किंवा विचार करणे थांबवा. सतत पुढे काय असा प्रश्न आपण विचारतो तेंव्हा आपल्या मनात भीती निर्माण होते.
सकारात्मक विचार आणि काम करण्यावर भर द्या, ज्यामुळे मनाला शांती मिळेल.
४. रोजचा दिनक्रम किंवा दिनचर्या निश्चित करा.
रोज तेच तेच करण्याने कंटाळा येतो हे खरे असले तरी, वस्तुतः दैनंदिन आयुष्यात काही गोष्टींचा दिनक्रम पाळल्यास त्याचा आरोग्यावर आणि मानसिक शांततेवर देखील चांगला परिणाम होतो.
जेंव्हा आपला दिनक्रम ठरलेला असतो, तेंव्हा आपल्या मनातील गोंधळ कमी होतो आणि दैनंदिन जीवनात निर्णय घेण्याची वेळ की वेळा येईल.
यामुळे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गुंतून राहण्याऐवजी काहीतरी चांगले आणि मोठे काम आपल्या हातून होऊ शकते.
तुम्ही जर प्रदीर्घ काळ तणावात राहिलात तर याचे तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
नियमित व्यायाम करणे, पौष्टिक नाश्ता करणे यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील तंदुरुस्त राहील.
५. प्रयोगशील रहा.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्ती भिन्न असते. एका व्यक्तीवर ज्या गोष्टीमुळे ताण येतो, तीच गोष्ट केल्याने दुसर्या व्यक्तीचा ताण कमी होऊ शकतो.
दिवासातील कोणत्या वेळी, म्हणजे सकाळी, दुपारी, रात्री, तुम्ही फ्रेश आणि ताजेतवाने असता ते पाहून, ती वेळ नोंदवून ठेवा. यावेळी जास्तीत जास्त जे काही चांगले करता येईल ते करा.
तुमच्या स्वतःच्या सूचना तयार करा आणि या काळात तुम्ही काय करू शकता याची एक यादी देखील तयार ठेवा ज्यामूळे तुम्हाला प्रसन्न वाटेल.
६. आपली स्वतःची मते तपासून पहा.
अनेकांना इतरांनी त्यांच्याबद्दल काही मतं व्यक्त केल्यास किंवा काही टिप्पणी केल्यास त्याची भीती वाटते.
परंतु, सगळ्यात मोठी टीका ही आत्मटीका असते. अनेकदा कठीण प्रसंगावेळी आपण स्वतःलाच दोष देत असतो किंवा स्वतःच स्वतःचे अवमूल्यमापन करत असतो.
अशावेळी आपल्या मनात कोणते विचार येतात आणि आपल्यातील टीकाकाराचे म्हणणे काय आहे ते नीट ध्यानात घ्या. या विचारांवर लक्ष ठेवा आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करा.
मनातील नकारात्मक विचार आपण रोखू शकत नाही पण, त्यापासून दूर निश्चितच राहू शकतो.
७. रोजनिशी लिहा.
आपल्या मनातील विचारांवर लक्ष ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे रोजनिशी लिहिणे.
आपल्या डोक्यात जे जे विचात येतील ते कागदावर लिहून काढणे हा स्वतःला शांत करण्याचा एक चांगला पर्याय आहे.
आपले विचार एखाद्याला बोलून दाखवल्यावर जसं मन हलकं होतं तसाच परिणाम हे विचार लिहून काढण्याने देखील होऊ शकतो.
नियमित रोजनिशी लिहिल्याने तुमच्या विचारांवर आणि भावनांवर तुमचे नियंत्रण राहील. तसेच, तुमच्या भावना तुम्हाला योग्य शब्दात मांडता येतील.
८. कामाची यादी तयार करा
अनेकदा एकाच वेळी आपल्याला अनेक कमी उरकायची असतात.
अशावेळी एक काम करत असताना आपल्या मनात अचानक दुसर्या कामाचा विचार येतो आणि हातातल्या कामावरही आपण नीट लक्ष देऊ शकत नाही.
म्हणून रोजच्या कामाची त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार एक यादी बनवा.
एकानंतर एक काम करायला घेतल्याने कामाचा ताण कमी होईल आणि काम उरकल्याचे समाधान देखील मिळेल.
९. आपल्या मित्रांचा किंवा अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या.
जेंव्हा तणावाची परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी तुमचे मित्र किंवा तुमच्या जवळची अनुभवी व्यक्ती यांचा सल्ला अवश्य घ्या.
त्या परिस्थितीपासून दूर असलेली व्यक्ती त्या परिस्थीचे तटस्थपणे निरीक्षण करून, वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करून तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याबद्दल योग्य तो सल्ला देऊ शकते किंवा मार्गदर्शन करू शकते.
जेंव्हा तुम्ही तुमच्या विश्वासू व्यक्तींच्या संपर्कात असता तेंव्हा तुम्ही स्वतःला अधिक सुरक्षित समजाल.
तुम्ही एखाद्या विश्वासू व्यक्तीजवळ जेंव्हा तुमचे विचार बोलून दाखवता तेंव्हा कदाचित त्या तणावात्मक परिस्थितीवर तुम्ही काही तोडगा शोधू शकाल.
१०. अलिप्त रहा.
जेंव्हा अचानक काही तणावाची परिस्थिती उद्भवते आणि अशा परीस्ठीशी टक्कर देण्याची तुमची मानसिक तयारी नसते तेंव्हा, काही काळ त्या परिस्थितीपासून स्वतःला अलिप्त करा.
स्वतःच्या मनातील विचार, भावना जाणून घ्यायला आणि मनातील द्वंद्व शांत व्हायला थोडा वेळ द्या.
जेंव्हा तुमच्या मानतील गोंधळ मिटेल आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याइतपत तुमची मनस्थिती शांत होईल तेंव्हा तुम्ही त्या परिस्थितीकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून पहायला शिकाल.