गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

ऍलर्जी....

डॉ. स्वप्निल सुतार
मला त्याची ऍलर्जी आहे, असे आपण नेहमी ऐकतो. कोणाला कशाची ऍलर्जी असेल काही सांगता येत नाही. माझी नातेवाईक आहे, तिला शेवग्याच्या शेंगांची ऍलर्जी आहे. कधीही घरात शेवग्याच्या शेंगांची भाजी केली, तर ती किचनमध्ये पाऊलसुद्धा टाकत नाही. कधी चुकून शेवग्याची शेंग वा अगदी शेवग्याच्या शेंगेच्या भाजीचा रस्सा जरी खाल्ला, तरी तिच्या अंगावर पुरळ उठते. कोणाला धुऴीची ऍलर्जी असते. एखाद्याला एखाद्या वासाची वा सेंटचीही ऍलर्जी असू शकते. माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्‌सनाही औषध देण्यापूर्वी विचारावे लागते, की कशाची ऍलर्जी तर नाही ना? कारण अनेकांना विशिष्ट औषधाचीही ऍलर्जी असू शकते, असते. अँटिबायोटिक्‍सची ऍलर्जी असणारेही पेशंटस असतात. तशी ऍलर्जीची यादी फार मोठी आहे. काही माणसांना काही माणसांचीही ऍलर्जी असते. त्यांनी त्यांना पाहिले की लगेच डोके ठणकू लागते. हा झाला गमतीचा भाग.
सामान्यत: ऍलर्जीचे काही ठरावीक प्रकार आढळतात. हे प्रकार आणि त्यामागची कारणे
फिव्हर- ऍलर्जी चा हा प्रकार परागकण अथवा इतर सूक्ष्म घटकांमुळे दिसून येतो यात सर्दी, खाज सुटणे, आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसतात. अधिक संवेदनशील व्यक्‍ती असेल तर त्वचेवर चट्टेही उठू शकतात
रॅश-काही वेळा गडद लाल रंगाचे चट्टे पडतात, किंवा तेवढा भाग फुगल्यासारखा होतो. विषाणुजन्य ऍलर्जीमुळे, ताणताणावामुळे, सूर्यकिरण किवा तापमानातील बदलामुळे त्वचेवर रॅश येऊ शकतात
वनस्पतीची ऍलर्जी – काही वनस्पती, बागकामाचे साहित्य इत्यादीच्या संपर्कात आल्यास याचा त्रास होऊ शकतो
कीटकांचा चावा – मधमाशी, गांधीलमाशी, कुंभारमाशी, मुंग्या यांसारखे कीटक आणि त्यांचा चावा यामुळे अनेकांना ऍलर्जी येऊ शकते. या कीटकांच्या नांगीद्वारे विशिष्ट रस त्वचेवर सोडला जातो. त्यामुळे अल्प वेदना, सूज, लाली वैगेरे येऊ शकते
पेट ऍलर्जी – काही व्यक्तींना पाळीव प्राण्यांची ऍलर्जी असते. एखाद्या व्यक्तीची शारीरिक संरक्षण संस्था प्राण्यामधील ठराविक प्रथिनाप्रति तीव्र प्रतिक्रिया दाखवते तेव्हा आशा प्रकारची ऍलर्जी होते. यामुळे नाकाच्या भागात तीव्र खाज सुटते, शिंका येतात, नाक वाहते आणि इतरही लक्षणे दिसतात.
लैटेक्‍स ऍलर्जी – रबरामधील प्रोटीनमुळे काही व्यक्तिना ऍलर्जी येते, यामधे सर्दीपासून ते तीव्र प्रकारच्या ऍलर्जीपर्यंत वेगवेगळे प्रकार दिसतात , पातळ अथवा जास्त ताणले जाणारे रबर म्हणजे फुगे, हातमोजे यातील रबर मधे प्रोटीन जास्त प्रमाणात असते त्यामुळे काहिना ऍलर्जी चा त्रास संभवतो
बुरशीची ऍलर्जी – यामधे प्रामुख्याने इनडोर अणि आउटडोर अशा बुरशीच्या स्पेसीज असतात. बुरशीचे बीजकण श्‍वसनामार्फत शरीरात गेल्यास शरीर संरक्षण संस्थेद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त होते. परिणामी कफ, डोळ्यांना खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात. अस्थमादेखील अशा ऍलर्जीमुळे होतो.
सौन्दर्यप्रसाधनांची ऍलर्जी – मॉइश्‍च्चराइजर, शाम्पू, डिओ, मेकअपचे साहित्य, कोलेजेन्स, आणि इतर सौन्दर्य प्रसाधने अनेकदा त्यातील सुगंध, प्रीझर्वेटिव्हजमुळे ऍलर्जिक रिएक्‍शनला कारणीभूत ठरतात
औषधांची ऍलर्जी – औषधांच्या ऍलर्जीमुळे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसतात. एखाद्या औषधाची ऍलर्जी असणे ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. सौम्य खाज सुटणे, किवा सौम्य साइड इफेक्‍ट्‌स म्हणजे उलट्या होणे किवा अन्नावरील वासना उड़ण्याबरोबरच अंगावर बारीक़ बारीक़ पुरळ उठते.
सिलम सिकनेस – हा औषधे घेतल्यानंतर काही दिवसांनी दिसणारा ऍलर्जीचा प्रकार आहे. अशी ऍलर्जी एका आठवड्यानंतरही येते.
एखादी लस दिल्यानंतर अशा प्रकारची ऍलर्जी दिसू शकते. सल्फा ड्रग्स, आकडीसाठी येणारी औषधे, इन्सुलिन, आयोडिनेटेड एक्‍स रे कॉन्ट्रास्ट डाइज इत्यादी औषधांमध्ये ऍलर्जीसाठी कारणीभूत घटक असू शकतात.
एक्‍झिमा – हा त्वचेवर खाज निर्माण करणारा ऍलर्जीचा एक प्रकार आहे. काही व्यक्तींना आयुष्यभर या त्रासाला सामोरे जावे लागते.
एक्‍झिमा होण्यामागे त्वचेच्या संपर्कात्‌ येणारे काही सर्व सामान्य घटक म्हणजे साबण, प्रसाधाने, कपडे, डिटर्जेंट, दागिने आणि घाम!
डोळ्यांची ऍलर्जी – ही एक सर्वसामान्य तक्रार आहे. यामुळे डोळे येणे, डोळ्यात घाण येणे, खाज सुटणे यांसारखी लक्षणे दिसतात परागकण, गवत, धूळ, पाळीव प्राण्यांच्या अंगावरील सूक्ष्म कण यामुळे ही ऍलर्जी होऊ शकते
दुधाची ऍलर्जी – दूध आणि दुधाची उत्पादने काही व्यक्तींच्या एलर्जीस कारणीभूत ठरू शकतात. त्यांना उलट्या होणे, जुलाब होणे, पोटात मुरडा मारणे अशी लक्षणे दूध किवा दुग्धजन्य पदार्थ सेवनाने लगेच दिसतात.
डॉ. स्वप्निल सुतार
सामान्यत: ऍलर्जीचे काही ठरावीक प्रकार आढळतात. हे प्रकार आणि त्यामागची कारणे
अन्न पदार्थाची ऍलर्जी-काहींना ठरावीक अन्नपदार्थाची ऍलर्जी असते. यामध्ये अंडी, दूध, शेंगदाणे,यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो याप्रकारच्या ऍलर्जीमुळे ऍलर्जी निर्माण करणाऱ्या इम्यूनोग्लॉबिन अँटीबॉडीज तयार होतात. अन्नाची खरंच ऍलर्जी असेल, तर संरक्षण संस्था अँटीबॉडीज आणि हिस्टामाइन अर्थात रक्तपेशींशी संबंधित असणारे द्रव तयार करतात.
घराभोवती असणारी झाडे – उदा. कॉंग्रेस गवत, फुलझाडे व इतर झाडांचे परागकण इत्यादींमुळे, तसेच गाड्यांचे प्रदूषण, कारखान्यांचे प्रदूषण, धूळ, धुरळा इत्यादीमुऴे ऍलर्जी होऊ शकते.
काही लोकांना थंड पदार्थ, थंड वातावरण यांची ऍलर्जी असते. काही लोकांना वातावरणात बदल झाला की ऍलर्जीच्या लक्षणांना सुरुवात होते. त्यात काहींना लगेच सर्दीचा त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने याचे अधिक प्रमाण शिक्षकांमध्ये व शाळेतील मुलांमध्ये दिसून येते. ग्रंथालयातील पुस्तके हाताळणे.
खडूचा वापर यामुळे ऍलर्जीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. खाण्यातील पदार्थांची ऍलर्जी हा एक खूप रुग्णांमध्ये दिसून येत असलेला प्रकार आहे. यामध्ये प्रामुख्याने काही प्रथिनांच्या मुळे व्यक्तींना ऍलर्जीचा त्रास सुरू होतो. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीचा समावेश होतो. साधारणपणे प्रत्येकाला एकदातरी एखाद्या पदार्थांची ऍलर्जीचा अनुभव येत असतो.
काही लोकांना दागिन्यांची पण ऍलर्जी आढळून येते. त्यामुळे त्याजागी पुरळ उठणे, गांधी येणे, खाज, त्वचा काळी पडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जर एखाद्या माणसाला त्वचाविकार असेल, तर त्याच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या व्यक्‍तीला ऍलर्जीचा त्रास सुरू होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्‍ती कमी आहे, त्यांना ऍलर्जीचा त्रास जास्त होत असल्याचे दिसून येते.
 ऍलर्जीची व्याख्याच करायची झाली तर अशी करता येईल-कुठल्याही बाह्यघटकांच्या विरुद्ध शरीरातील संरक्षण संस्थेने दिलेली तीव्र स्वरूपातील प्रतिक्रिया ऍलर्जी अनेक कारणांमुळे अथवा घटकांमुळे होऊ शकते. उदा. परागकण, धूलिकण , अन्नपदार्थ , कीटकांचा चावा, औषधे, बुरशीचे बीजाणू इत्यादी. ऍलर्जीची लक्षणे काही वेळा अगदी सौम्य स्वरूपाची असतात, तर काही वेळेस अगदी तीव्र स्वरूपाची असतात; ज्याची परिणीती अतिशय घातक रूपात अथवा मृत्यूमध्येही होऊ शकते.
फिव्हर-ऍलर्जी चा हा प्रकार परागकण अथवा इतर सूक्ष्म घटकांमुळे दिसून येतो यात सर्दी, खाज सुटणे, आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसतात. अधिक संवेदनशील व्यक्‍ती असेल तर त्वचेवर चट्टेही उठू शकतात
रॅश-काही वेळा गडद लाल रंगाचे चट्टे पडतात, किंवा तेवढा भाग फुगल्यासारखा होतो. विषाणुजन्य ऍलर्जीमुळे, ताणताणावामुळे, सूर्यकिरण किवा तापमानातील बदलामुळे त्वचेवर रॅश येऊ शकतात
वनस्पतीची ऍलर्जी – काही वनस्पती, बागकामाचे साहित्य इत्यादीच्या संपर्कात आल्यास याचा त्रास होऊ शकतो
कीटकांचा चावा – मधमाशी, गांधीलमाशी, कुंभारमाशी, मुंग्या यांसारखे कीटक आणि त्यांचा चावा यामुळे अनेकांना ऍलर्जी येऊ शकते. या कीटकांच्या नांगीद्वारे विशिष्ट रस त्वचेवर सोडला जातो. त्यामुळे अल्प वेदना, सूज, लाली वैगेरे येऊ शकते
पेट ऍलर्जी – काही व्यक्तींना पाळीव प्राण्यांची ऍलर्जी असते. एखाद्या व्यक्तीची शारीरिक संरक्षण संस्था प्राण्यामधील ठराविक प्रथिनाप्रति तीव्र प्रतिक्रिया दाखवते तेव्हा आशा प्रकारची ऍलर्जी होते. यामुळे नाकाच्या भागात तीव्र खाज सुटते, शिंका येतात, नाक वाहते आणि इतरही लक्षणे दिसतात .
लैटेक्‍स ऍलर्जी – रबरामधील प्रोटीनमुळे काही व्यक्तिना ऍलर्जी येते, यामधे सर्दीपासून ते तीव्र प्रकारच्या ऍलर्जीपर्यंत वेगवेगळे प्रकार दिसतात ,
पातळ अथवा जास्त ताणले जाणारे रबर म्हणजे फुगे, हातमोजे यातील रबर मधे प्रोटीन जास्त प्रमाणात असते त्यामुळे काहिना ऍलर्जी चा त्रास संभवतो
बुरशीची ऍलर्जी – यामधे प्रामुख्याने इनडोर अणि आउटडोर अशा बुरशीच्या स्पेसीज असतात. बुरशीचे बीजकण श्‍वसनामार्फत शरीरात गेल्यास शरीर संरक्षण संस्थेद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त होते. परिणामी कफ, डोळ्यांना खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात. अस्थमादेखील अशा ऍलर्जीमुळे होतो.
सौन्दर्यप्रसाधनांची ऍलर्जी – मॉइश्‍च्चराइजर, शाम्पू, डिओ, मेकअपचे साहित्य, कोलेजेन्स, आणि इतर सौन्दर्य प्रसाधने अनेकदा त्यातील सुगंध, प्रीझर्वेटिव्हजमुळे ऍलर्जिक रिएक्‍शनला कारणीभूत ठरतात
औषधांची ऍलर्जी – औषधांच्या ऍलर्जीमुळे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसतात. एखाद्या औषधाची ऍलर्जी असणे ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. सौम्य खाज सुटणे, किवा सौम्य साइड इफेक्‍ट्‌स म्हणजे उलट्या होणे किवा अन्नावरील वासना उड़ण्याबरोबरच अंगावर बारीक़ बारीक़ पुरळ उठते.
सिलम सिकनेस – हा औषधे घेतल्यानंतर काही दिवसांनी दिसणारा ऍलर्जीचा प्रकार आहे. अशी ऍलर्जी एका आठवड्यानंतरही येते.
एखादी लस दिल्यानंतर अशा प्रकारची ऍलर्जी दिसू शकते. सल्फा ड्रग्स, आकडीसाठी येणारी औषधे, इन्सुलिन, आयोडिनेटेड एक्‍स रे कॉन्ट्रास्ट डाइज इत्यादी औषधांमध्ये ऍलर्जीसाठी कारणीभूत घटक असू शकतात.
एक्‍झिमा – हा त्वचेवर खाज निर्माण करणारा ऍलर्जीचा एक प्रकार आहे. काही व्यक्तींना आयुष्यभर या त्रासाला सामोरे जावे लागते.
एक्‍झिमा होण्यामागे त्वचेच्या संपर्कात्‌ येणारे काही सर्व सामान्य घटक म्हणजे साबण, प्रसाधाने, कपडे, डिटर्जेंट, दागिने आणि घाम!
डोळ्यांची ऍलर्जी – ही एक सर्वसामान्य तक्रार आहे. यामुळे डोळे येणे, डोळ्यात घाण येणे, खाज सुटणे यांसारखी लक्षणे दिसतात परागकण, गवत, धूळ, पाळीव प्राण्यांच्या अंगावरील सूक्ष्म कण यामुळे ही ऍलर्जी होऊ शकते
दुधाची ऍलर्जी – दूध आणि दुधाची उत्पादने काही व्यक्तींच्या एलर्जीस कारणीभूत ठरू शकतात. त्यांना उलट्या होणे, जुलाब होणे, पोटात मुरडा मारणे अशी लक्षणे दूध किवा दुग्धजन्य पदार्थ सेवनाने लगेच दिसतात.
अन्न पदार्थाची ऍलर्जी-काहींना ठरावीक अन्नपदार्थाची ऍलर्जी असते. यामध्ये अंडी, दूध, शेंगदाणे,यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो याप्रकारच्या ऍलर्जीमुळे ऍलर्जी निर्माण करणाऱ्या इम्यूनोग्लॉबिन अँटीबॉडीज तयार होतात. अन्नाची खरंच ऍलर्जी असेल, तर संरक्षण संस्था अँटीबॉडीज आणि हिस्टामाइन अर्थात रक्तपेशींशी संबंधित असणारे द्रव तयार करतात.
घराभोवती असणारी झाडे – उदा. कॉंग्रेस गवत, फुलझाडे व इतर झाडांचे परागकण इत्यादींमुळे, तसेच गाड्यांचे प्रदूषण, कारखान्यांचे प्रदूषण, धूळ, धुरळा इत्यादीमुऴे ऍलर्जी होऊ शकते.
काही लोकांना थंड पदार्थ, थंड वातावरण यांची ऍलर्जी असते.
काही लोकांना वातावरणात बदल झाला की ऍलर्जीच्या लक्षणांना सुरुवात होते. त्यात काहींना लगेच सर्दीचा त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने याचे अधिक प्रमाण शिक्षकांमध्ये व शाळेतील मुलांमध्ये दिसून येते. ग्रंथालयातील पुस्तके हाताळणे. खडूचा वापर यामुळे ऍलर्जीचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
खाण्यातील पदार्थांची ऍलर्जी हा एक खूप रुग्णांमध्ये दिसून येत असलेला प्रकार आहे. यामध्ये प्रामुख्याने काही प्रथिनांच्या मुळे व्यक्तींना ऍलर्जीचा त्रास सुरू होतो. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीचा समावेश होतो. साधारणपणे प्रत्येकाला एकदातरी एखाद्या पदार्थांची ऍलर्जीचा अनुभव येत असतो.
काही लोकांना दागिन्यांची पण ऍलर्जी आढळून येते. त्यामुळे त्याजागी पुरळ उठणे, गांधी येणे, खाज, त्वचा काळी पडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जर एखाद्या माणसाला त्वचाविकार असेल, तर त्याच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या व्यक्‍तीला ऍलर्जीचा त्रास सुरू होऊ शकतो.
महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्‍ती कमी आहे, त्यांना ऍलर्जीचा त्रास जास्त होत असल्याचे दिसून येते.
ऍलर्जीच्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी
ऍलर्जी ही एक अशी संकल्पना आहे की, ज्याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. ऍलर्जीवर काही रामबाण, हमखास परिणाम करणारे औषध नाही. काळजी घेणे हा सर्वोत्तम उपाय. ज्या गोष्टीची आपल्याला ऍलर्जी आहे, त्यापासून दूर राहणे हाच सर्वोत्तम उपाय.
आपल्या घरातील अंथरुण पांघरूण स्वच्छ ठेवणे, वेळोवेळी घरातील अडचणीची जागा साफ करणे, जेणेकरून धूळ जास्त साठणार नाही.
शक्‍यतो घरामध्ये पाळीव प्राणी नसावेत.
गाडीवरून फिरताना तोंडाला रुमाल लावून जाणे, जेणेकरून नाक व तोंड झाकले जाईल.
रस्त्यावरील धूळ, चुलीचा धूर, सिगारेटचा धूर या गोष्टी टाळाव्यात.
वातावरणात बदल होत असताना खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवावे व योग्य ती काळजी घ्यावी.
धुम्रपान, विडी, पानसुपारी इत्यादी सवयी असतील तर त्या बंद कराव्या.
आंबट पदार्थ, लिंबू, लोणचं, मोसंबी, कैरी, संत्रे, दही, लस्सी, पेरू, काकडी, थंड पेय, फ्रिजमधील पाणी, मासे, अशा प्रकारचे पदार्थ, ज्यामुळे त्रास होत असेल तर ते टाळावेत.
सर्दी होऊ नये म्हणून काळजी घ्यावी व झाल्यास त्यावर त्वरित उपचार करून घ्यावे.
आपल्याला ऍलर्जी असणाऱ्या पदार्थांची व औषधांची माहिती नेहमी जवळ ठेवावी. तसेच नवीन ठिकाणी उपचार घेण्यास जात असेल तर त्या डॉक्‍टरना त्याची पूर्वकल्पना देणे गरजेचे असते.
घरामध्ये मच्छर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉइल अथवा श्रळर्िींळव चा जास्त वापर करू नये, अगरबत्ती-धूप या गोष्टी वापरू नये. झाडून काढताना तोंडाला रुमाल बांधावा.
त्वचासंदर्भात ऍलर्जी असेल तर अशा रुग्णांनी कडक उन्हात जाणे टाळावे, बोचऱ्या थंडीत योग्य रीतीने गरम राहण्याचा प्रयत्न करावा, साबण, क्रीम, जीर्‌ ीीळीं होते तीच वापरावी. सारखी बदलत राहू नये.
ऍलर्जीसाठी उपचार
यामध्ये प्रामुख्याने रश्रश्रेरिींहू मध्ये र्ळीापीेंहशीरिू चा, तसेच रपींळ रश्रश्रशीसळल, रपींळ हळीींराळपळली, दम्याच्या रुग्णांमध्ये ीीेंरहशश्ररी, ीींशीेळवी, ळीं ूररवशशलरर वापर केला जातो. परंतु, यामध्ये असे दिसून येते की, या औषधांचा वापर रुग्णाला खूप काळासाठी करावा लागतो. कारण जोपर्यंत औषधे सुरू आहेत, तोपर्यंत रुग्णाला आराम मिळत असतो. काही केसेस मध्ये असे दिसून येते की रुग्णाने काही कारणास्तव औषधे बंद केल्यास त्या लक्षणांचा पुनरुद्‌भव झालेला दिसतो.
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केला तर असे दिसून येते की औषधांसोबत काही पंचकर्म यांचा उपयोग केल्यास रुग्णाला पूर्णपणे आराम मिळू शकतो. यामध्ये शरीराची रोग प्रतिकारशक्‍ती वाढवणाऱ्या औषधांचा उपयोग केला जातो. परंतु, त्याचप्रमाणे वमन, रक्‍तमोक्षण, नस्य, विरेचन, इत्यादीचा योग्य रितीने व योग्य ऋतू काळात उपचारात वापर केला गेल्यास रुग्णाला नक्कीच उपाय मिळालेला दिसून येतो.
या सर्व गोष्टींसोबत रुग्णाने त्यांच्या डॉक्‍टर वा वैद्यांनी दिलेल्या पथ्य, अपथ्यांचे पालन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.

https://www.dainikprabhat.com/allergy-part-1/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल