मुलांच्या आहारातील या ’10’ अॅलर्जींना वेळीच ओळखा
लहान मुलांना भरवताना या गोष्टींचे भान पाळा
मुलांमध्ये होणारी फूड अॅलर्जी हे प्रत्येक पालकांसाठी चिंतेचा विषय असतो. परंतू प्रत्येकामध्ये ही लक्षणं सारखीच आढळतील असे नाही. म्हणूनच पेडीअॅट्रीक न्युट्रीशिअनिस्ट आणि ‘Don’t Just Feed…Nourish Your Child,’ या पुस्तकाच्या लेखिका ध्वनी शहा यांनी मुलांमधील फूड अॅलर्जी ओळाखण्याची काही लक्षणं सांगितली आहेत. मग पहा कशी ओळखाल फूड अॅलर्जी
#1 गहू –
गव्हातील ग्ल्युटनमुळे लहान मुलांमध्ये अॅलर्जी होण्याची शक्यता असते. ग्ल्युटेन हे एक प्रोटीन घटक आहे. अनेकदा औषधांशी किंवा शस्त्रक्रियांशी रिअॅक्शन झाल्याने ही अॅलर्जी वाढू शकते. गव्हासोबतच ओट्स,बार्ली अशा धान्यांमध्ये ग्ल्युटेन अधिक असल्याने त्याचीदेखील अॅलर्जी होऊ शकते.
लक्षणं
पातळ जुलाब
अपचन,मळमळणे,डोकेदुखी, अति प्रमाणात ढेकर येणे
पोटदुखी, पोटातील आतड्यांना सूज येणे
#2 सोयाबीन –
नाजूक पचनशक्ती असलेल्या मुलांमध्ये सोयाबीन खाणे हे त्रासदायक ठरू शकते. सोयाबीनमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते. तसेच सोयाबीन पचायला कठीण आहे.
लक्षणं
हातापायावर सूज येणे, जीभ जड होणे, ओठ सुजणे
डोळ्यांजवळचा भाग सुजणे
पोट बिघडणे
#3 दूध –
दूधातील लॅक्टोज घटकांशी रिअॅक्शन झाल्यास जगभरातील 60% लोकांना अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. लॅक्टोज त्रासदायक ठरल्यास प्राथमिक स्थितीत दूध किंवा दूधजन्य पदार्थ खाणे शक्य होत नाही. मात्र सेकेंडरी स्थितीत दही, चीझ, पनीर असे दूग्धजन्य पदार्थ पचवणे शक्य होते.
लक्षणं
पोटात गॅस होणे
पोट जड होणे
डायरिया
उलट्या
#4 कॅरोटीनयुक्त पदार्थ
गाजर, रताळ, लाल भोपळा, आंबा.पपई यामधून प्रामुख्याने कॅरोटीनचा पुरवठा होतो. कॅरोटीनचा त्रास हा ठराविक काळापुरता मर्यादीत असतो. वाढत्या वयानुसार हा त्रास कमी होतो. मुलांना अॅन्टीबायोटीक्स किंवा स्टिरॉईड्सयुक्त औषधं दिली जात असल्यास कॅरोटीनची अॅलर्जी होऊ शकते.
लक्षणं
हिरवट मलविसर्जन
उलट्या होणे
त्वचा पिवळट दिसणे
#5 मासे
मांसाहारींनी मुलांना मासे किंवा मांसाहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. खेकडा किंवा तत्सम मांसाहाराचा मुलांना त्रास होऊ शकतो. सोबतच बाळाला मांसाहार भरवताना या ‘७’ गोष्टींची काळजी घ्या !
लक्षणं
आवाजात बदल होणे
कफ होणे
मळमळणे, उलट्या होणे
निस्तेजपणा
#6 अंड
अंड प्रोटिनयुक्त असल्याने काही मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो. तर काही जणांमध्ये अंड्याच्या पांढर्या किंवा पिवळ्या भागाचा त्रास होऊ शकतो.
लक्षणं
शरीरावर लाल चट्टे येणे
पोटदुखी
श्वासघेण्यास त्रास होणे
#7. बेरी
अॅन्टीऑक्सिडंट्स, व्हिटामिन, मिनरल्स यांनी परिपूर्ण असले तरीही ते काही मुलांना त्रासदायक ठरू शकते. अनेका मुलांना स्ट्रॉबेरीज आणि ब्लूबेरीजचा त्रास होऊ शकतो.
लक्षणं
खाज येणे
हातापायावर लाल चट्टे येणे
रॅश येणे
तोंडात जळजळ जाणवणे
#8 सुकामेवा
शेंगदाण्याची अॅलर्जी ही अनेकांमध्ये सर्रास आढळते. मात्र सोबतच बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता खाणेदेखील त्रासदायक ठरू शकते.
लक्षणं
तोंड, डोळे सुजणे
मळमळणे
#9 सायट्रस फळं
आंबट- गोड रसदार फळं आरोग्यदायी असली तरीही काही मुलांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.
लक्षणं
घसा खवखवणे
पायांवर सूज येणे
#10 मिरची
मुलांना मसालेदार खाणे त्रासदायक ठरू शकते. पण त्यातून लक्षणं दिसत नाहीत. लहान मुलांमध्ये सुकवलेल्या मिरच्या अधिक त्रासदायक ठरतात.
लक्षणं –
अन्न टाळणे
नाकातून पाणी येणे
डोळ्यातून सतत पाणी येणे
घशात खवखव होणे
तोंडात जळ्जळ जाणवत असल्याने आईस्क्रिम सारखे पदार्थदेखील खाणे टाळणे
by- https://www.thehealthsite.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा