शेंगदाणे खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे
काही जणांना शेंगदाणे खाण्यामुळे पित्ताचा किंवा ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः लाल शेंगदाणे खाण्यामुळे पित्त वाढू शकते. पिताचा त्रास किंवा दमा असणाऱ्यानी शेंगदाणे खाऊ नयेत.
बऱ्याचदा उत्तम टाईमपास म्हणून शेंगदाणे खाल्ले जातात. थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतं. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळेच शेंगदाणे प्रोटीनसाठी सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानले जातात. मुठभर शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात कॅलरीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात. शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांपासून बचाव करण्याऱ्या शेंगदाण्यांचे फायदे वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
शेंगदाणे खाण्याचे फायदे :
डायबेटीससाठी योग्य - शेंगदाण्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असून याचा Glycemic index (GI) सुद्धा अत्यंत कमी आहे. एखादा अन्नपदार्थ खाल्यानंतर त्यातील कर्बोदके (साखर) किती जलदपणे रक्तात मिसळली जातात यावरून त्या पदार्थाचा Glycemic index ठरवला जातो. शेंगदाण्यात कर्बोदके कमी असल्याने व त्याचा GI अत्यंत कमी असल्याने शेंगदाणे हे मधुमेही रुग्णांसाठी योग्य असतात. मधुमेही रुग्णांनी रोज मूठभर शेंगदाणे खाल्यास पुरेसे नायसिन मिळून रक्तवाहिन्यांचे दोषही कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करते - शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असूनही वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे खूप उपयुक्त ठरतात हे अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास किंवा वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास दररोज मूठभर शेंगदाणे भाजून खावेत. शेंगदाणे जेवणापूर्वी खाल्यास भूक कमी लागते व वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
हृदविकाराचा धोका कमी करते - शेंगदाण्यात हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अनेक पोषकतत्वे असतात. शेंगदाण्यात असणाऱ्या Oleic acid मुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचे दोष कमी होतात. यामुळे रक्तातील वाईट कॉलेस्टेरॉलची (LDL) लेव्हल कमी होते व चांगले कॉलेस्टेरॉलची (HDL) लेव्हल वाढते. तसेच शेंगदाणे खाण्यामुळे वजनही नियंत्रित राहते त्यामुळे शेंगदाण्यामुळे हृदविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.कोलेस्टेरॉलमुळे पित्ताशयात खडे होत असतात. शेंगदाण्यात असणाऱ्या Phytosterol मुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. शेंगदाणे खाण्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका कमी होतो.
गरोदरपणात उपयुक्त - शेंगदाण्यामध्ये फॉलिक ऍसिड किंवा Folate चे प्रमाणही मुबलक असते.फॉलिक ऍसिड हा घटक प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्वाचा असतो. यासाठी प्रेग्नन्सीमध्ये शेंगदाणे दररोज खाणे गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले असते.
त्वचेसाठीही फायदेशीर - त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे ओमेगा-6 फॅटी ऍसिड हा घटक शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे शेंगदाणे खाणे हे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.
शेंगदाणे कशाप्रकारे खावेत..? शेंगदाणे हे कच्चे, भाजून, उकडून व तळून खाल्ले जातात तसेच विविध भाज्या, उसळी, चिक्की व लाडवात ह्याचा वापर केला जातो. आरोग्याचा विचार करता शेंगदाण्यातील पोषकतत्वांचा आपल्या शरोराला योग्य फायदा होण्यासाठी शेंगदाणे हे सालासकट कच्चे, भाजून, उकडून खाऊ शकता किंवा भाजीत, उसळीत घालूनही खाऊ शकता. शेंगदाण्याची चटणी, शेंगदाणा चिक्कीही आपण खाऊ शकता. शेंगदाणे वाफवल्यास त्याचे गुणधर्म वाढतात तर भाजलेले शेंगदाणे पचण्यास हलके असतात. अशाप्रकारे आपण आपल्या आहारात शेंगदाण्याचा समावेश करू शकतो. मात्र तळलेले शेंगदाणे किंवा मीठ लावलेले खारट शेंगदाणे आरोग्यासाठी योग्य नसतात. तळलेल्या शेंगदाण्यात कोणतेही पोषकघटक नसतात. तर खारट शेंगदाण्यामुळे शरीरात मीठ अधिक प्रमाणात गेल्यामुळे हाय ब्लडप्रेशरसारख्या समस्याही होऊ शकतात.
आठवड्यातले काही दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो. तसेच शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊन ते नियंत्रणात राहते. शेंगदाण्य़ांमध्ये व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असल्याने शेंगदाणा उपयुक्त अँटीऑक्सिडंटचा मोठा स्त्रोत आहे. हृदयाला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट महत्त्वाचे ठरतात. शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात.
शेंगदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्याही दूर होते. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-6 फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामुळेच शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात. शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात शेंगदाणे खाणे शरीरासाठी उपयुक्त आहे. शेंगदाण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहे. अतिप्रमाणात शेंगदाण्याचं सेवन केल्यास ते शरिरासाठी धोकादायक ठरू शकतं. जास्त शेंगदाणे खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
शेंगदाणे खाण्याचे नुकसान : काही जणांना शेंगदाणे खाण्यामुळे पित्ताचा किंवा ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः लाल शेंगदाणे खाण्यामुळे पित्त वाढू शकते. पित्ताचा त्रास किंवा दमा असणाऱ्यानी शेंगदाणे खाऊ नयेत.
https://amnews.live/news/aarogya/these-are-healthy-benefits-for-eating-peanuts
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाकृपया तुमचा ईमेल आयडी देण्यात यावा. ह्या लेख विषयी माझी तक्रार आहे.
उत्तर द्याहटवाकॉपीराइट विषयी तक्रार -
उत्तर द्याहटवाhttp://dsachin1983.blogspot.com/2019/10/blog-post.html
वरील लींकमध्ये तुम्ही दिलेली माहिती ही आमच्या साईटवरील कॉपी केली आहे. ही माहिती सुरवातीला am news यांनी कॉपी केली होती. त्यांनी आमच्या तक्रारीनंतर ती माहिती काढून टाकली आहे. मात्र तुम्ही ती अजूनही तुमच्या ब्लॉगवर घातलेली आहे. तुम्ही तुमचे पूर्ण नाव का लपवता? तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर काय आहे?
वर दिलेल्या लिंकमधील माहिती तात्काळ हटवण्यात यावी अन्यथा आम्ही सायबर पोलिसात तक्रार दाखल करू.