गुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९

जाणून घ्या ‘शॉर्टकट’मध्ये ‘संपूर्ण आयुर्वेद’...


*संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,*
हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही!
वाचा आणि पालन करा.

|| शरीराला आवश्यक खनिजं ||

*🔺कॅल्शिअम*
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
🌺🌺🌺

*🔺लोह*
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
🌺🌺🌺

*🔺सोडिअम*
कशात असतं?
मीठ, पाणी, बटाटा, आलं, लसूण, कांदा, मिरची, पालक, सफरचंद, कारलं
कमतरतेमुळे काय होतं?
रक्तदाबाशी निगडित समस्या, निद्रानाश, अंगदुखी, अपचन, मूळव्याधीसारखे आजार, मोतीबिंदू, बहिरेपणा, हात अणि पाय कडक होणे.
कार्य काय असतं?
शरीराला आवश्यक असणारी पाचक रसायनाची निर्मिती करतात, त्याचप्रमाणे शरीरात होणारा गॅस नष्ट होतो.
🌺🌺🌺

*🔺आयोडिन*
कशात असतं?
शिंघाडा, काकडी, कोबी, राजगिरा, शतावरी, मीठ आणि लसूण.
कमतरतेमुळे काय होतं?
थायरॉइडची समस्या, केस गळणे, डिप्रेशन किंवा बैचेनी येणे.
कार्य काय असतं?
शरीरात उत्पन्न होणाऱ्या विषारी पदार्थापासून मेंदूला बचावण्याचं काम करतो.
🌺🌺🌺

*🔺पोटॅशिअम*
कशात असतं?
सर्व प्रकारची धान्य, डाळ, संत्र, अननस, केळं, बटाटा, लिंबू, बदाम.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, त्वचेवर सुरकुत्या किंवा मुरुमं येणं, त्वचा रोग, केस पिकणे.
कार्य काय असतं?
शरीरात तंतू आणि यकृत यांना सुरळत ठेवण्याचं कार्य करतं.
🌺🌺🌺

*🔺फॉस्फरस*
कशात असतं?
दूध, पनीर, डाळी, कांदा, टोमॅटो, गाजर, जांभळं, पेरू, काजू, बदाम, बाजरी आणि चणे.
कमतरतेमुळे काय होतं?
ऑस्टिओपोरोसिस, गतिमंद होणे, मानसिक थकवा, दंत रोग.
कार्य काय असतं?
मेंदूला ताजंतवानं ठेवण्याचं काम हे खनिजं करतं.
🌺🌺🌺

*🔺सिलिकॉन*
कशात असतं?
गहू, पालक, तांदूळ, कोबी, काकडी, मध,
कमतरतेमुळे काय होतं?
कॅन्सर, त्वचारोग, बहिरेपणा, केस गळणे.
कार्य काय असतं?
जननेंद्रियांची कार्यक्षमता वाढवून शरीरातील तंतूना मजबूत करतात.
🌺🌺🌺

*🔺मॅग्नेशिअम*
कशात असतं?
बाजरी, बीट, खजूर, सोयाबीन, दूध, लीची, कारलं.
कमतरतेमुळे काय होतं?
उदास होणे, आळस येणे, तणाव असणे, झोप न लागणे, बैचेनी, सोरायसिस, फोडं, नपुंसकता किंवा वांझपणा.
कार्य काय असतं?
पेशीचं कार्य सुधारतं. रेचक म्हणून काम करतं.
🌺🌺🌺

🔺सल्फर
कशात असतं?
दूध, पनीर, डाळ, टोमॅटो, बटाटा, आलं, मिरची, सफरचंद, अननस, सुरण.
कमतरतेमुळे काय होतं?
प्रतीकारशक्ती कमी होते, केस गळतात, वजन वाढतं, मधुमेहाला आमंत्रण मिळतं.
कार्य काय असतं?
इन्सुलिनचं रेचन म्हणून कार्य करतं.
🌺🌺🌺

*🔺क्लोरिन*
कशात असतं?
पानी, बीट, कोबी, मीठ, दूध, लिंबू, आवळा, मध.
कमतरतेमुळे काय होतं?
अ‍ॅसिडिटी, अल्सर, कॅन्सर, आणि अ‍ॅलर्जी.
कार्य काय असतं?
सोडिअम आणि पोटॅशिअमला पाचक बनवण्यासाठी सहायता करतं, त्याचप्रमाणे शरीरातील आम्लक्षाराचं संतुलन राखलं जातं.
🌺🌺🌺

*🔺खाद्यपदार्थामधील खनिजं शरीराला मिळावीत म्हणून काय केलं पाहिजे.🔺*
» फळं किंवा भाज्या कापल्यानंतर कधीच धुवू नयेत. असं केल्याने त्यातील खनिजं पाण्यावाटे नष्ट होतात.
» डाळ, तांदूळ किंवा धान्यदेखील उकडण्यापूर्वीच स्वच्छ धुऊन घ्यावेत.
» काही धान्य, फळं तसंच भाज्यांच्या सालींमध्ये खनिजांचा मोठा प्रमाणावर साठा असतो. त्यामुळे अशा सालींचा आहारात समावेश करावा.
» दुधात खनिजांचा भरपूर स्रेत असतो म्हणूनच दूध जास्त प्रमाणात उकळू नये. दूध जास्त प्रमाणात उकळल्याने त्यातील खनिजं नष्ट होतात.
» फळं कापून खाण्याऐवजी शक्यतो आहे तशीच खावीत. उदाहरणार्थ, चिकू किंवा सफरचंद ही फळं संपूर्ण खावीत.
🌺🌺🌺

*▫ब्लड प्रेशर आणि नियंत्रण▫*
*============================*

ब्लडप्रेशर असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. धकाधकीच्या जीवनात फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या या कारणामुळे या आजाराचे रुग्ण भारतातही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजार, स्ट्रोक अशा समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषध घ्यावे लागते. आज तुम्हाला काही घरगुती उपायांची माहिती देत आहोत. तुम्हालाही ब्लडप्रेशरचा त्रास असेल तुम्ही हे घरुगुती उपाय अवश्य करून पाहा. या उपायांनी तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहील.
🌺🌺🌺

*▫लसूण -*

ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. यामध्ये एलिसीन नावाचे तत्त्व असते, जे नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मासपेशींना आराम मिळतो. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.
🌺🌺🌺

*▫शेवगा -*

यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. एका संशोधनानुसार, या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर सकारत्मक प्रबाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.
🌺🌺🌺

*▫जवस -*

जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. विविध संशोधनामध्ये समोर आले आहे, की ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
🌺🌺🌺े

*▫विलायची -*

एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शर
हळद Turmeric
🌺🌺🌺

*गुणधर्म -----*

तिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, वात, पित्त, कफ शमन करणारी.

*उपयोग -----*

*१)* जखमेवर किंवा मुका मार लागणे. हळद लावा.
*२)* रक्ती मुळव्याध - बकरीचे दूध + हळद घ्या.
*३)* सर्दी, कफ, खोकला - गरम दूध + तूप + हळद घ्या.
*४)* जास्त लघवी - पांढरे तीळ + गुळ + हळद घ्या.
*५)* आवाज़ बसणे - हळद + गुळ गोळ्या करून खा.
*६)* काविळ - ताक + हळद.
*७)* ताप - गरम दूध + हळद + काळीमिरी पुड.
*८)* लघवितून पू जाणे - आवळा रस + हळद + मध.
*९)* मुतखडा ( स्टोन ) - ताक + हळद + जूना गुळ.
🌺🌺🌺

# *आरोग्य संदेश* #

हळदच आहे जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक,
नक्कीच आजारांना आहे ती मारक.

*तोंडाचे विकार*

*कारणे -----*

जागरण करणे, जास्त तिखट खाणे, पोट साफ नसणे, पित्त होणे, अपचन होणे, उष्णता वाढणे, रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे. व्यसन करणे.

*उपाय -----*

*१)* जेवणात गाईचे तूप व ताक घ्या.
*२)* गुलकंद खा.
*३)* ज्येष्ठमधाची कांडी चघळावी.
*४)* दुधाची साय आणि शंखजीरे मिक्स करून तोंडातून लावा.
*५)* हलका आहार घ्या.
*६)* वरील कारणे कमी करा. त्रिफळा चूर्ण घेऊन पोट साफ ठेवा.
*७)* दही उष्ण असल्याने जास्त खाऊ नका.
*८)* जाईची पाने किंवा तोंडलीची पाने किंवा पेरूची पाने किंवा उंबराची कोवळी कांडी चावून थुंका.
*९)* नियमित प्राणायाम करा.
*१०)* आवळा पदार्थ खा.
*११)* एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
🌺🌺🌺

*जीभेची साले निघत असल्यास*

*उपाय -----*

*१)* पुदिन्याची पाने आणि खडीसाखर मिक्स करून चावून थुंकत रहा.
*२)* एक केळ गाईच्या दूधाबरोबर खावे.
*३)* त्रिफळाच्या काड्याने गुळण्या करा. जंतुसंसर्ग कमी होतो.
🌺🌺🌺

# *आरोग्य संदेश* #

*व्यायामानेच पचनशक्ती वाढवा*

*उपाय -------*

*१)* नारळाची शेंडी जाळून राख बनवा.
*२)* ती राख २/३ ग्रँम ताकातून घ्या.
*३)* रिकाम्या पोटीच घ्या.
*४)* सकाळ व संध्याकाळ घ्या.
*५)* मुळा / सुरण भाजी खा.
*६)* अक्रोड खाऊन वर दूध प्या.
*७)* जेवणात कच्चा कांदा खा.
*८)* श्वास रोखू बटरफ्लाय व्यायाम करा.
*९)* हलका आहार घ्या. गाईचे तुप खा.
*१०)* पोट साफ ठेवा.
*११)* नियमित प्राणायाम करा.
*१२)* चोथायुक्त पदार्थ खा.
*१३)* शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा.
*१४)* एकाचवेळी सर्व उपाय करू नका.
🌺🌺🌺

# *आरोग्य संदेश* #

पोट राहूद्या नियमित साफ,
मुळव्याधीचा चूकेल व्याप.

*काळ्या द्राक्षांचे 10 फायदे, वाचाल तर रोज खाल*

*1. डायबिटीस, ब्लड प्रेशरवर नियंत्रण*

काळी द्राक्ष नियमित खाल्यामुळे डायबिटीस आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो, ज्यामुळे रक्तात इन्सुलिन वाढतं. ही द्राक्ष खाल्यामुळे शरिरातलं रक्त वाढायलाही मदत होते, त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही.

*2. एकाग्रता वाढायला मदत*

काळी द्राक्ष खाल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढायला मदत होते. तसंच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो.
🌺🌺🌺

*3. हार्ट ऍटेकचा धोका कमी*

काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात. तसंच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतं, ज्यामुळे हार्ट ऍटेकचा धोका कमी होतो.

*4. वजन होतं कमी*

नियमित काळी द्राक्ष खालली तर वजन कमी होऊ शकतं. यामध्ये असणारा एँटीऑक्साईड शरिरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतो. ज्यामुळे वजन कमी होतं.
🌺🌺🌺

*5. अस्थमा होतो बरा*

काळी द्राक्ष शरिरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात, जी इंफेक्शन तयार करतात. पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही द्राक्ष हा चांगला उपाय आहे. काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते.

*6. कॅन्सरला रोखा*

काळी द्राक्ष खाल्यामुळे ब्रेस्ट, लंग, प्रोस्टेट आणि आतड्यांच्या कॅन्सरच्या धोक्यापासून वाचता येऊ शकतं.

*7. अपचन होत नाही*

काळ्या द्राक्षांमध्ये शुगर, ऑरगॅनिक ऍसिड आणि पॉलीओस जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटाची जळजळ होत नाही.
🌺🌺🌺

*8. डोळ्यांसाठी गुणकारी*

दृष्टी सुधारण्यासाठीही काळी द्राक्ष गुणकारी आहेत.

*9. सुरकुत्या होतात कमी*

काळ्या द्राक्षांमुळे डोळ्यांखाली होणारा काळा भाग कमी करतो. तसंच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही यामुळे कमी होतात.
🌺🌺🌺

*10. केस गळती थांबवायला मदत*

काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन इ मुळे केस गळणं, केस पांढरे होणं यासारख्या समस्या दूर होतात. द्राक्ष खाल्यानं केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते, त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात.
शरीरावरील काळे डाग
🌺🌺🌺

*उपाय -----*

*१)* नियमित प्राणायाम करा.
*२)* पचनशक्ती स्ट्राँग ठेवा.
*३)* पोट साफ राहूद्या.
*४)* पालेभाज्या व फळभाज्या खा.
*५)* सकाळी ऊठल्यावर तोंडातील लाळ सर्व डागांवर चोळून लावा. तोंड धुण्यापूर्वीची लाळ पाहिजे. हा जबरदस्त उपाय आहे.
*६)* कोरफड पानातील गर लावा.
*७)* आवळा रस / पदार्थ घ्या.
*८)* डागांवर कच्च्या पपईचा रस लावा.
*९)* कडुलिंबाची पाने आंघोळीच्या पाण्यात टाकून पाणी उकळवून घ्या. नंतर त्याच पाण्याने आंघोळ करा. मात्र साबण वापरू नका.
🌺🌺🌺

# *आरोग्य संदेश* #

करा योग, पळतील रोग. संपतील भोग.
🍲 आहार तज्ञ - ऋजुता दिवेकर यांच्या मते आहाराविषयीच्या संकल्पना.

🍲 *नियोजनबद्ध आहार कोणता?*

आपला भारतीय संस्कृतीतील आहार योग्य आहे. भाजी, पोळी, भात, आमटी, पोहे, उपमा हे पदार्थ अतिशय पौष्टिक आहेत. आपण आपला आहार सोडून अन्य पदार्थांचे पर्याय शोधतो. म्हणून खाद्यसंस्कृती बदलते आहे. आपले वेगळेपण आपणच जपले पाहिजे. आपल्या चौरस आहाराची किंमत आपल्यालाच समजत नाही, याची खंत आहे.
🌺🌺🌺

🏃 *वाढलेली चरबी कशी कमी करावी?*

आपल्या खाण्या-पिण्याला शिस्त असेल, तर चरबी वाढणार नाही. वाढली तरी कमी होण्यासही मदत होईल. सलग ३० मिनिटे एका जागेवर बसू नका. आपण शरीराचा पुरेसा वापर करीत नाही म्हणून चरबी वाढते. दरवर्षी अर्ध्या किंवा एक किलोने वजन वाढते. वजन वाढते, याचा अर्थ आपण आळशी होत आहोत, हे समजून घ्या. म्हणून गरज आहे ती `मूव्ह मोअर अँड सिट लेस` या मंत्राची.
🌺🌺🌺

🍇 *कोणती फळे खावीत?*

आंबा, केळे, सीताफळ, चिकू आणि द्राक्ष ही फळे प्रत्येक भारतीयाच्या आहारात आवर्जून आलीच पाहिजेत. आरोग्यासाठी केळे हे सर्वोत्तम असल्याचा दुजोरा आता जगभरातून मिळत आहे. बाळाच्या आहारातही आईच्या दुधानंतर फळांमध्ये केळ्याचाच समावेश होतो.

◆ *मधुमेहासाठी आहार कसा असावा?*

खरं तर मधुमेहींनी जे पदार्थ खाल्ले पाहिजेत, तेच पदार्थ डॉक्टर टाळण्यास सांगतात. मात्र, भात, केळं आणि तुपाचा समावेश आहारात अवश्य असावा. दोन जेवणांमध्ये फार अंतर ठेऊ नये, व्यायाम भरपूर करावा आणि अगदी झोपेपर्यंत टीव्ही पाहणे टाळावे.
🌺🌺🌺

◆ *शुगर-फ्रीचा वापर करावा का?*

शुगर फ्री आहारातून वर्ज्यच करा. आहारात जेवढी साखर आवश्यक असते, तेवढी खावी. लाडू, हलवा यासारख्या घरी बनणाऱ्या गोड पदार्थांत वापरली जाणारी साखर आरोग्यासाठी चांगली असते. ऊस आणि गूळ यांना एकमेकांशी रिप्लेस करू नये. आवश्यकतेनुसार पदार्थात साखर किंवा गुळाचा वापर करावा. शरीरातील उष्णता वाढवायला गुळाची मदत होते.
🌺🌺🌺

◆ *वाढतं वजन आणि ताण यांचा संबंध कसा आहे?*

वाढत्या ताणामुळे वजन वाढतं. फर्गेट, फर्गिव्ह आणि फॉर्वर्ड या सूत्रानुसार जीवन जगायला सुरवात केल्यास आयुष्यातील तणाव कमी होतील.
🌺🌺🌺

● *कडधान्य कशी खावीत..*

आपण उसळ करताना कडधान्य शिजवून घेतो. त्यामुळे मोड आलेली कडधान्ये कच्ची कशासाठी खायची? ती उकडून, उसळ करून खाणेच योग्य.

● *जेवणात कोणते तेल आणि किती वापरावे?*

शेंगदाण्याचे घाण्यावरून करून आणलेले तेल स्वयंपाकासाठी सर्वोत्तम आहे. शंभर ग्रॅम शेंगदाण्याचे २५ ते ३० टक्के तेल निघते. बाकी चोथा वाया जातो. तेल बनविण्याची पारंपरिक पद्धत अतिशय शुद्ध आहे. आहारात तेल बदलण्याची गरज नसते. पिशव्या किंवा डब्यांमध्ये मिळणारे आणि हृदयाच्या आकाराचे चित्र डब्यांवर दिसणारे तेल आरोग्याला योग्य नाही. तेल जेवढे वापरावेसे वाटते, तेवढे वापरावे. लोणचे, तळलेला पापड, भजी हे पदार्थ आहारात आलेच पाहिजेत. जास्त तेल पोटात जाईल, म्हणून ते खाणे टाळू नये.
🌺🌺🌺

🚫 *आहारातून ड जीवनसत्त्व कमी झाल्यास काय होते?*

शरीरात हवे असलेले फॅट मिळत नाहीत, म्हणून ड जीवनसत्व कमी होते. वेळेवर त्यावर उपाय न केल्यास हाडे दुखतात, केस गळतात, त्वचेवर डाग पडतात. मधुमेह किंवा कॅन्सर होण्यापर्यंत ही पातळी जाऊ शकते.

*आजकाल बिझी रुटीनमुळे व्यायाम करणे अनेकांना शक्य होत नाही. व्यायामाला दुसरा काही पर्याय आहे का?*

आजच्या युगात आपण नवीन गाडी घेतली, तरीसुद्धा ती नियमितपणे चालवतो. बाहेरगावी गेलो, तरी शेजारी किंवा नातेवाईकांना गाडी सुरू ठेवायला सांगतो. व्यायामाचेसुद्धा तसेच आहे. व्यायामाला कोणताही पर्याय नाही, तो नियमितपणे केलाच पाहिजे. अंगबी दुखतं, म्हणून व्यायाम करत नाही, अशी सबब अनेक जण देतात. पण खरे तर व्यायाम करत नाही, म्हणून अंग दुखतं. व्यायाम करण्यासाठी आठवड्यात फक्त १५० मिनिटे लागतात. आठवड्याच्या व्यायामाचे नीट प्लानिंग करून ते वेळापत्रक पाळले जायला हवे. व्यायाम अनेकदा उद्यावर ढकलला जातो, त्याचं योग्य नियोजन होत नाही, त्याचं गांभीर्य लोकांच्या लक्षात येत नाही.
🌺🌺🌺

✌ *दोन- दोन तासाने खा, असे सांगितले जाते. हे योग्य की अयोग्य?*

सकाळी उठल्या उठल्या आपण चहाने सुरुवात केली, तर दिवसभराची भूक मरते आणि दिवसभराचे रुटीन बिघडते. दोन- दोन तासाने खावे. सकाळी उठून एखादं केळ खाल्लं की, आपण नंतर नीट नाश्ता करू शकतो. सकाळी नाश्त्याला डोसा, घावन, थालीपीठ असं खावं. त्यानंतर जेवणाआधी पन्हं, कोकम सरबत यासारखं पेय घेऊन त्यानंतर आपण नियमित जेवण घेऊ शकतो. जेवताना शक्यतो पाणि पिऊ नये,जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणि प्यावे व जेवणानंतर एक तासाने पाणि प्यावे.त्यानंतर मध्ये एखाद- दुसरं फळ, संध्याकाळी चार ते सहाच्या मध्ये पुन्हा सकाळच्या नाश्त्याप्रमाणे आहार घेतला की, आपल्याला रात्री फार भूक लागत नाही. मग रात्री पेज किंवा भात खावा, म्हणजे आपल्याला शांत झोप लागू शकते.

🍚 *घरी केलेले चिवडा, लाडू खाण्याची योग्य वेळ कोणती?*

चिवडा आणि लाडू आपण कधीही खाण्यासाठीच तयार करून ठेवतो. चिवड्यासारखी व्हर्सेटाइल गोष्ट कोणतीच नाही. चिवडा कशातही मिक्स करून खाऊ शकतो, त्यामुळे चिवडा कोणत्याही वेळी खाता येईल. लाडूसुद्धा संध्याकाळी ५-६च्या आसपास किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा लाडू चांगला.
🌺🌺🌺

👨👩 *वाढत्या वयाबरोबर कसा व्यायाम करावा ?*

वयानुसार आपलं शरीर बदलतं, पण ते बिघडू देऊ नये. आपलं रुटीन नियमित फॉलो केलं पाहिजे. आठवड्याला १५० मिनिटे व्यायाम केला, तर ते कोणत्याही वयाला चालतं. वय वाढलं म्हणून व्यायाम कमी करण्याची गरज नाही.

💧 *सकाळी उठून गरम पाणी प्यायल्याने चरबी कमी होते, असा समज आहे. यात किती तथ्य आहे?*

सकाळी उठल्यावर आवड म्हणून गरम पाणी पिण्यास काहीच हरकत नाही. पण त्यामुळे चरबी अजिबात कमी होत नाही. सकाळी उठल्यावर साधं, माठाचं किंवा गरम कोणतेही पाणी आपण पिऊ शकतो.

🍲 *साखरेऐवजी गूळ वापरल्याने फायदा होतो का ?*

प्रत्येक गोष्टीचा एक विशिष्ट गुणधर्म असतो. त्यामुळे ज्या गोष्टीत साखर वापरण्याची गरज आहे, त्यात साखर वापरली पाहिजे आणि ज्या गोष्टीत गूळ वापरण्याची गरज आहे, त्यात गूळच वापरला पाहिजे. अन्यथा पदार्थाची चव बिघडते. साखर ही चांगलीच आहे. उगाच साखरेच नाव वाईट आहे. साखरेने उष्णता कमी होते, तर गुळाने उष्णता वाढते. त्यामुळे आपण पदार्थानुसार साखर किंवा गूळ वापरावा,
🌺🌺🌺

🙆 *केस, त्वचेसाठी काय सल्ला.*

केस गळण्यापासून वाचण्यासाठी तसेच तजेलदार त्वचेसाठी आहारात भात, नारळ, तूप यांचा समावेश हवा. आहारामध्ये हळदीचा समावेश असण्याची गरज आहे. हळद केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे.

🌞 *आपला दिवस कसा असतो?*
मी ज्या शहरात असेन, त्यानुसार दिवस प्लॅन करते. ऋतूमानानुसार आणि स्थानिक पदार्थांना आहारात प्राधान्य देतेत. रोज सकाळी पोहे खाते. सध्या उन्हाळ्यामुळे कोकम आणि पन्हं घेते. जे आवडतं, तेच पदार्थ खाते. जे पदार्थ शरीराला लागतात, ते आवर्जून खाते. कारण, आपण जे खातो, तेच आपल्या चेहऱ्यावर दिसते.

🍌 *फळ किंवा सुका मेव्याने दिवसाची सुरुवात करा*

🍲 *नाश्त्याला पोहे, उपमा, शिरा खा*

🍷 *जेवणापर्यंतच्या वेळेत सरबत घ्या*

🍎 *जेवणानंतर एखादे फळ खा*

🍲 *संध्याकाळी गूळ, तूप, पोळी किंवा फोडणीचा भात*

😇 *रात्री ८.३० च्या दरम्यान हलका आहार घ्या*

हलका आहार घेतल्याने झोप चांगली लागते आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करण्यास उत्साह राहतो.
🌺🌺🌺

*आहारातून उपचार*
बी
पुढील आजार झाल्यास त्यांच्या खाली दिलेले अन्नपदार्थ खा. आजार लवकर बरे होतील.

*१) आम्लपित्त :-*
काळी मनुका, आलं, थंड दुध, आवळा, जिरे खा.

*२) मलावरोध :-*
पेरु, पपई, चोथा / फायबरयुक्त असलेले अन्न, दुध + पाणी, कोमटपाणी , त्रिफळा चूर्ण घ्या. पोटाचे व्यायाम करा, टाँयलेटला बसल्यावर हनुवटी प्रेस करा. लवकर पोट साफ होते.

*३) हार्टअटैक / ब्लॉकेज :-*
लसूण, कांदा, आलं खा. रक्ताच्या गाठी होत नाहीत. रक्ताभिसरण उत्तम होते.

*४) डिसेन्टरी / जुलाब :-*
कापूर + गुळ एकत्र करून खा. त्यावर पाणी प्या. लगेच गुण येतो.

*५) खोकला :-*
२ / ३ काळीमिरी चोखा. दिवसातून तीन वेळा. खोकला थांबतो.

*६) मुळव्याध :-*
नारळाची शेंडी जाळून राख ताकातून दिवसातून २ / ३ वेळा घ्या. चांगला गुण येतो. रामदेव बाबांचा उपाय आहे.

*७) दारूचे व्यसन :-*
वारंवार गरम पाणी प्या. तसेच दारू पिण्याची आठवण येईल त्यावेळी जरूर गरमच पाणी प्या. २ / ३ महीन्यात दारू सुटेल.

*८) डोळे येणे :-*
डोळ्यांना गाईचे तुप लावा. आराम पडेल. कापूर जवळ ठेवा. संसर्ग वाढणार नाही.

*९) स्टोन :-*
पानफुटीची पाने खा. कुळीथ भाजी खा. भरपूर पाणी प्या.

*१०) तारूण्यासाठी :-*
भाज्यांचा रस, आरोग्य पेय, फळे खा. गव्हांकुराचा रस, Green Tea ,प्या.
🌺🌺🌺

📢 *आरोग्य संदेश* 🔔

*संतुलित आहारात उपचार आहेत खरे, सर्वच आजार नक्कीच होतील बरे.*

*आर्टीकल जरा मोठे आहे ,पण जीवनावश्यक आहे*🙏🏼🙏🏼
🌺🌺🌺





http://checkmatetimes.com/news/NewsDetailDisplay.aspx?NewsCode=1000005151


by - 
स्रोत - आयुर्वेदाचा शोध लावणारे आणि जगातील पहिली शस्त्रक्रिया करणारे ऋषी सुश्रुत आणि वागभट्ट यांचा ग्रंथावर आधारित...






मुलांच्या आहारातील या ’10’ अ‍ॅलर्जींना वेळीच ओळखा...


मुलांच्या आहारातील या ’10’ अ‍ॅलर्जींना वेळीच ओळखा
लहान मुलांना भरवताना या गोष्टींचे भान पाळा








मुलांमध्ये होणारी फूड अ‍ॅलर्जी हे प्रत्येक पालकांसाठी चिंतेचा विषय असतो. परंतू प्रत्येकामध्ये ही लक्षणं सारखीच आढळतील असे नाही. म्हणूनच पेडीअ‍ॅट्रीक न्युट्रीशिअनिस्ट आणि ‘Don’t Just Feed…Nourish Your Child,’ या पुस्तकाच्या लेखिका ध्वनी शहा यांनी मुलांमधील फूड अ‍ॅलर्जी ओळाखण्याची काही लक्षणं सांगितली आहेत. मग पहा कशी ओळखाल फूड अ‍ॅलर्जी


#1 गहू –


गव्हातील ग्ल्युटनमुळे लहान मुलांमध्ये अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता असते. ग्ल्युटेन हे एक प्रोटीन घटक आहे. अनेकदा औषधांशी किंवा शस्त्रक्रियांशी रिअ‍ॅक्शन झाल्याने ही अ‍ॅलर्जी वाढू शकते. गव्हासोबतच ओट्स,बार्ली अशा धान्यांमध्ये ग्ल्युटेन अधिक असल्याने त्याचीदेखील अ‍ॅलर्जी होऊ शकते.


लक्षणं
पातळ जुलाब
अपचन,मळमळणे,डोकेदुखी, अति प्रमाणात ढेकर येणे
पोटदुखी, पोटातील आतड्यांना सूज येणे


#2 सोयाबीन –


नाजूक पचनशक्ती असलेल्या मुलांमध्ये सोयाबीन खाणे हे त्रासदायक ठरू शकते. सोयाबीनमुळे शरीरात हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते. तसेच सोयाबीन पचायला कठीण आहे.


लक्षणं
हातापायावर सूज येणे, जीभ जड होणे, ओठ सुजणे
डोळ्यांजवळचा भाग सुजणे
पोट बिघडणे


#3 दूध –


दूधातील लॅक्टोज घटकांशी रिअ‍ॅक्शन झाल्यास जगभरातील 60% लोकांना अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. लॅक्टोज त्रासदायक ठरल्यास प्राथमिक स्थितीत दूध किंवा दूधजन्य पदार्थ खाणे शक्य होत नाही. मात्र सेकेंडरी स्थितीत दही, चीझ, पनीर असे दूग्धजन्य पदार्थ पचवणे शक्य होते.


लक्षणं
पोटात गॅस होणे
पोट जड होणे
डायरिया
उलट्या


#4 कॅरोटीनयुक्त पदार्थ


गाजर, रताळ, लाल भोपळा, आंबा.पपई यामधून प्रामुख्याने कॅरोटीनचा पुरवठा होतो. कॅरोटीनचा त्रास हा ठराविक काळापुरता मर्यादीत असतो. वाढत्या वयानुसार हा त्रास कमी होतो. मुलांना अ‍ॅन्टीबायोटीक्स किंवा स्टिरॉईड्सयुक्त औषधं दिली जात असल्यास कॅरोटीनची अ‍ॅलर्जी होऊ शकते.


लक्षणं

हिरवट मलविसर्जन
उलट्या होणे
त्वचा पिवळट दिसणे


#5 मासे


मांसाहारींनी मुलांना मासे किंवा मांसाहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. खेकडा किंवा तत्सम मांसाहाराचा मुलांना त्रास होऊ शकतो. सोबतच बाळाला मांसाहार भरवताना या ‘७’ गोष्टींची काळजी घ्या !


लक्षणं
आवाजात बदल होणे
कफ होणे
मळमळणे, उलट्या होणे
निस्तेजपणा


#6 अंड


अंड प्रोटिनयुक्त असल्याने काही मुलांना त्याचा त्रास होऊ शकतो. तर काही जणांमध्ये अंड्याच्या पांढर्‍या किंवा पिवळ्या भागाचा त्रास होऊ शकतो.


लक्षणं
शरीरावर लाल चट्टे येणे
पोटदुखी
श्वासघेण्यास त्रास होणे


#7. बेरी


अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स, व्हिटामिन, मिनरल्स यांनी परिपूर्ण असले तरीही ते काही मुलांना त्रासदायक ठरू शकते. अनेका मुलांना स्ट्रॉबेरीज आणि ब्लूबेरीजचा त्रास होऊ शकतो.


लक्षणं
खाज येणे
हातापायावर लाल चट्टे येणे
रॅश येणे
तोंडात जळजळ जाणवणे


#8 सुकामेवा


शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी ही अनेकांमध्ये सर्रास आढळते. मात्र सोबतच बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता खाणेदेखील त्रासदायक ठरू शकते.


लक्षणं
तोंड, डोळे सुजणे
मळमळणे


#9 सायट्रस फळं


आंबट- गोड रसदार फळं आरोग्यदायी असली तरीही काही मुलांना त्याचा त्रास होण्याची शक्यता असते.


लक्षणं
घसा खवखवणे
पायांवर सूज येणे


#10 मिरची


मुलांना मसालेदार खाणे त्रासदायक ठरू शकते. पण त्यातून लक्षणं दिसत नाहीत. लहान मुलांमध्ये सुकवलेल्या मिरच्या अधिक त्रासदायक ठरतात.


लक्षणं –
अन्न टाळणे
नाकातून पाणी येणे
डोळ्यातून सतत पाणी येणे
घशात खवखव होणे
तोंडात जळ्जळ जाणवत असल्याने आईस्क्रिम सारखे पदार्थदेखील खाणे टाळणे










by- https://www.thehealthsite.com 

फूड अ‍ॅलर्जीबद्दल थोडेसे...


फूड अ‍ॅलर्जीबद्दल थोडेसे...



डॉ. साईनाथ पोवार


अ‍ॅलर्जी ही आजकालच्या जीवनातील महत्त्वाचा आजार आहे. अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अ‍ॅलर्जीबद्दल अनेक समज व गैरसमज आहेत व ते दूर होणे आवश्यक आहे.



अ‍ॅलर्जी म्हणजे एखाद्या गोष्टीचा सगळ्यांच्या शरीराला त्रास होत नाही, पण एखाद्या शरीराला होतो त्याला अ‍ॅलर्जी असे म्हणतात. हा शरीराच्या इम्युनिटीचा अ‍ॅबनॉर्मल रिस्पॉन्स आहे. आपण येथे फूड अ‍ॅलर्जी म्हणजे खाद्यपदार्थांची अ‍ॅलर्जी याबद्दल माहिती घेऊ.


अन्‍नपदार्थ खाल्ल्यानंतर अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. त्यापैकी अ‍ॅलर्जी हा महत्त्वाचा त्रास आहे. बदलती जीवनशैली व खाण्याच्या सवयी यामध्ये फूड अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढत आहे. विकसित देशामध्ये फूड अ‍ॅलर्जीचे प्रमाण जास्त आहे. आपल्या देशामध्येसुद्धा फूड अ‍ॅलर्जीचे प्रमाण हळूहळू वाढत आहे.


फूड अ‍ॅलर्जीमुळे काहीवेळा अत्यंत सीरिअस रिअ‍ॅक्शन (अ‍ॅनाफायलेक्सीस) येऊ शकते. त्यामुळे फूड अ‍ॅलर्जीच्या पेशंटनी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. भारतामध्ये फूड अ‍ॅलर्जीचे प्रमाण 10-15 टक्के आहे. लहान मुलांमध्ये प्रमाण 6-8 टक्के आहे.


फूड अ‍ॅलर्जी व फूड इनटॉलरन्स या दोन गोष्टीत फरक करणे खूप महत्त्वाचे आहे. फूड अ‍ॅलर्जी ही आपल्या इम्युनिटीच्या चुकीच्या रिस्पॉन्समुळे असते व फूड इनटॉलरन्स हा फूडमधील काही घटकांच्या खाद्यपदार्थातील अ‍ॅडेटिव्ह व प्रिझरवेटिव्हमुळे होतो. फूड अ‍ॅलर्जी ही प्रामुख्याने त्या पदार्थांमधील प्रोटिनमुळे होते. फूड अ‍ॅलर्जी लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसते, पण ती कोणत्याही वयात उद्भवू शकते. अ‍ॅलर्जी सुरू होताना सुरुवातीला त्या पदार्थाचे सेन्सटायझेशन होते व नंतर अ‍ॅलर्जीची लक्षणे दिसतात.


प्रगत देशांमध्ये फूड अ‍ॅलर्जीचे प्रमाण जास्त आहे. लंडनमध्ये अ‍ॅलर्जीचे प्रशिक्षण घेताना बरेच पेशंट पाहण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. अनुवंशिकता, खाण्याच्या सवयी व कमी प्रमाणात असलेले जंतुसंसर्ग ही त्याची महत्त्वाची कारणे आहेत.

आपल्या देशात फूड अ‍ॅलर्जीचे प्रमाण त्यामानाने खूप कमी आहे; परंतु बदलत्या जीवनशैली व आधुनिकीकरण यामुळे हे प्रमाण वाढताना दिसत आहे.


फूड अ‍ॅलर्जी वाढण्याचे कारणे कोणती ते आपण पाहू.


1) आधुनिक जीवनशैली

2) बदलत्या खाण्याच्या सवयी

3) अनुवंशिकता

4) ज्या मुलांना जंत व सूक्ष्मजंतू संसर्गाचे प्रमाण कमी होते. त्यांच्यामध्ये अ‍ॅलर्जीचे प्रमाण जास्त असते. त्याला ‘हायजीन हायपोथेरपीस’ असे म्हणतात.

5) विटामीन ‘डी’ ची कमतरता.

यामुळे अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढले.


वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते, पण दूध, अंडी, मटण, चिकन, मासे व इतर सी फूड, शेंगदाणे, सोयाबीन, गहू, डाळी यापासून अ‍ॅलर्जीचे प्रमाण जास्त आहे, पण इतर कोणत्याही खाद्यपदार्थामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते.

फूड अ‍ॅलर्जीमुळे होणारा त्रास

फूड अ‍ॅलर्जीमुळे वेगवेगळे त्रास होऊ शकतात. हा त्रास खाद्यपदार्थ खाल्ल्यानंतर लगेच होतो, तर काहींना नंतर होऊ शकतो.


* त्वचेवर गांधी उठणे, पित्त उठणे, अंगाला खाज उठणे.

• अंगावर, चेहर्‍यावर सूज येणे.

• पोटदुखी, उलटी होणे, जुलाब होणे.

• डोकेदुखी, डोळे लाल होणे.

• नाकतून पाणी, खाज येणे.

• खोकला, धाप लागणे, अस्थमाची लक्षणे वाढणे.


फूड अ‍ॅलर्जीमुळे अ‍ॅनाफायलेक्सीस म्हणून एक सिरियस रिअ‍ॅक्शन होऊ शकते. यामध्ये चक्‍कर येणे, धाप लागणे, हृदयाचे ठोके वाढणे, कमी होणे, रक्‍तदाब कमी होणे या गोष्टी होतात. यावर योग्य वेळेत उपचार झाल्यास जीवाचा धोका संभवू शकतो.

प्रगत देशामध्ये फूड अ‍ॅलर्जीमुळे होणार्‍या अ‍ॅनाफायलेसीसचे प्रमाण जास्त आहे व त्यासाठी तेथे विशेष यंत्रणा उपलब्ध आहेत.


फूड अ‍ॅलर्जीचे निदान ः-


अ‍ॅलर्जी स्किन प्रिक टेस्ट ः यामध्ये नक्‍की कोणत्या पदार्थाची अ‍ॅलर्जी आहे ते समजते. ही टेस्ट वेदनारहित (Painless) व रक्‍तस्त्रावविरहित (Bloodless) असते. एकदा आपल्याला कोणत्या खाद्यपदार्थाची अ‍ॅलर्जी आहे हे समजले तर तो टाळता येऊ शकतो किंवा त्याची ट्रिटमेंट केली जाते. ही अ‍ॅलर्जीच्या निदानासाठीची गोल्ड स्टँडर्ड टेस्ट आहे.

पेशंटनी योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वतःहून कोणतीही अ‍ॅलर्जी टेस्ट करू नये. त्याचा ट्रिटमेंटमध्ये फायदा होत नाही. अ‍ॅलर्जीच्या निदानासाठी अ‍ॅलर्जी स्किन प्रिक हीच योग्य टेस्ट आहे. ती स्वतः तज्ज्ञ डॉक्टरांनी करणे आवश्यक आहे.


फूड चॅलेंज टेस्ट


एखाद्या खाद्यपदार्थाची अ‍ॅलर्जी असण्याचा दाट शंका असताना व स्किन प्रिक टेस्टमध्ये अपेक्षित निदान मिळत नसेल तर ही टेस्ट केली जाते. यामध्ये पेशंटला तो खाद्यपदार्थ थोड्या-थोड्या प्रमाणात खायला देऊन हळूहळू त्याचे प्रमाण वाढविले जाते. जर पेशंटला त्याचा त्रास होऊ लागला तर त्याचा लगेचच उपचार करता येतो. तसेच अ‍ॅलर्जीचे निदान होते. म्हणजे भविष्यात त्या पदार्थामुळे होणारा त्रास टाळता येतो. जर कोणताही त्रास झाला नाही तर त्या पदार्थाची अ‍ॅलर्जी नाही याची खात्री होते.


फूड अ‍ॅलर्जी कमी करण्यासाठी घ्यावयाची काळजी ः-


1) लहान बाळांना सहा महिने पूर्ण होईपर्यंत फक्‍त आईचे दूध देणे.

2) अ‍ॅलर्जीची असण्याची शक्यता असणार्‍यांना (अनुवंशिकता) ते पदार्थ उशिरा चालू करणे.

3) बाहेर विकत मिळणार्‍या खाण्याच्या वस्तूंवर त्यामधील घटक लिहिणे आवश्यक आहे.

4) फूड अ‍ॅलर्जी असणार्‍यांनी बाहेर खाणे टाळावे.

लहान मुलांना असणारी फूड अ‍ॅलर्जी ही वाढत्या वयानुसार कमी होऊ शकते.

उदा. दुधाची अ‍ॅलर्जी 5 वर्षांपर्यंत, त्याप्रमाणे अंडी किंवा शेंगदाण्याची अ‍ॅलर्जी 6-7 वर्षांनंतर कमी होऊ शकते. मोठेपणी झालेली फूड अ‍ॅलर्जी कमी होत नाही.


फूड अ‍ॅलर्जीचे उपचार ः-


यामध्ये ज्या खाद्यपदार्थांची अ‍ॅलर्जी आहे ते टाळणे सर्वात महत्त्वाचे, परंतु काही वेळा तो पदार्थ पूर्ण टाळणे शक्य होत नाही व त्यामुळे काही धोका संभवू शखतो. त्यामुळे फूड अ‍ॅलर्जी कमी करण्याची ट्रिटमेंट करणे आवश्यक आहे.


फूड अ‍ॅलर्जी बरी करण्यासाठी आधुनिक उपचारपद्धती आता उपलब्ध आहे. त्याला अ‍ॅलर्जेन स्पेसिफिक इम्युनोथेरपी असे म्हणतात. या उपचार पद्धतीमुळे फूड अ‍ॅलर्जी पूर्णपणे व मुळापासून बरी होऊ शकते.


ही आधुनिक, शास्त्रोक्‍त व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त झालेली उपचारपद्धती आहे.

या उपचाराने शरीरातील अ‍ॅलर्जी कमी होत जाते व अ‍ॅलर्जी पूर्णपणे बरी होऊ शकते व त्यामुळे अ‍ॅलर्जीमुळे होणारा त्रास खूप कमी होतो.

ही उपचार पद्धती अ‍ॅलर्जीची सर्दी, अस्थमा, अ‍ॅलर्जीमुळे उठणारे पित्त, स्किन अ‍ॅलर्जी, डोळ्यांची अ‍ॅलर्जी यासाठीसुद्धा केली जाते.

अ‍ॅलर्जीच्या इतर सर्व ट्रिटमेंटचा फायदा हा ट्रिटमेंट चालू असेपर्यंत होतो, पण इम्युनोथेरपीचा फायदा हा दीर्घकाळ राहतो. त्याचप्रमाणे इम्युनोथेरपीमुळे नवीन अ‍ॅलर्जी येण्याचे प्रमाण कमी होते.


Who Position Paper नुसार इम्युनोथेरपी ही अ‍ॅलर्जी मुळापासून बरी करण्याची एकमेव ट्रिटमेंट आहे व अ‍ॅलर्जीच्या प्रत्येक पेशंटला इम्युनोथेरपीचा पर्याय देणे आवश्यक आहे.


इम्युनोथेरपी ही अत्यंत सुलभ व सर्वसामान्यांना परवडणारी उपचारपद्धती आहे. फूड अ‍ॅलर्जीचे योग्य उपचार केल्याने त्याचे बरेच त्रास कमी होऊ शकतात. यासाठी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. फूड अ‍ॅलर्जीचे निदान होताच पेशंटनी घाबरून न जाता त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन उपचार करणे आवश्यक आहे.






























by - http://www.pudhari.news/news/Aarogya/Food-Allergy/

ऍलर्जी....

डॉ. स्वप्निल सुतार
मला त्याची ऍलर्जी आहे, असे आपण नेहमी ऐकतो. कोणाला कशाची ऍलर्जी असेल काही सांगता येत नाही. माझी नातेवाईक आहे, तिला शेवग्याच्या शेंगांची ऍलर्जी आहे. कधीही घरात शेवग्याच्या शेंगांची भाजी केली, तर ती किचनमध्ये पाऊलसुद्धा टाकत नाही. कधी चुकून शेवग्याची शेंग वा अगदी शेवग्याच्या शेंगेच्या भाजीचा रस्सा जरी खाल्ला, तरी तिच्या अंगावर पुरळ उठते. कोणाला धुऴीची ऍलर्जी असते. एखाद्याला एखाद्या वासाची वा सेंटचीही ऍलर्जी असू शकते. माझ्याकडे येणाऱ्या पेशंट्‌सनाही औषध देण्यापूर्वी विचारावे लागते, की कशाची ऍलर्जी तर नाही ना? कारण अनेकांना विशिष्ट औषधाचीही ऍलर्जी असू शकते, असते. अँटिबायोटिक्‍सची ऍलर्जी असणारेही पेशंटस असतात. तशी ऍलर्जीची यादी फार मोठी आहे. काही माणसांना काही माणसांचीही ऍलर्जी असते. त्यांनी त्यांना पाहिले की लगेच डोके ठणकू लागते. हा झाला गमतीचा भाग.
सामान्यत: ऍलर्जीचे काही ठरावीक प्रकार आढळतात. हे प्रकार आणि त्यामागची कारणे
फिव्हर- ऍलर्जी चा हा प्रकार परागकण अथवा इतर सूक्ष्म घटकांमुळे दिसून येतो यात सर्दी, खाज सुटणे, आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसतात. अधिक संवेदनशील व्यक्‍ती असेल तर त्वचेवर चट्टेही उठू शकतात
रॅश-काही वेळा गडद लाल रंगाचे चट्टे पडतात, किंवा तेवढा भाग फुगल्यासारखा होतो. विषाणुजन्य ऍलर्जीमुळे, ताणताणावामुळे, सूर्यकिरण किवा तापमानातील बदलामुळे त्वचेवर रॅश येऊ शकतात
वनस्पतीची ऍलर्जी – काही वनस्पती, बागकामाचे साहित्य इत्यादीच्या संपर्कात आल्यास याचा त्रास होऊ शकतो
कीटकांचा चावा – मधमाशी, गांधीलमाशी, कुंभारमाशी, मुंग्या यांसारखे कीटक आणि त्यांचा चावा यामुळे अनेकांना ऍलर्जी येऊ शकते. या कीटकांच्या नांगीद्वारे विशिष्ट रस त्वचेवर सोडला जातो. त्यामुळे अल्प वेदना, सूज, लाली वैगेरे येऊ शकते
पेट ऍलर्जी – काही व्यक्तींना पाळीव प्राण्यांची ऍलर्जी असते. एखाद्या व्यक्तीची शारीरिक संरक्षण संस्था प्राण्यामधील ठराविक प्रथिनाप्रति तीव्र प्रतिक्रिया दाखवते तेव्हा आशा प्रकारची ऍलर्जी होते. यामुळे नाकाच्या भागात तीव्र खाज सुटते, शिंका येतात, नाक वाहते आणि इतरही लक्षणे दिसतात.
लैटेक्‍स ऍलर्जी – रबरामधील प्रोटीनमुळे काही व्यक्तिना ऍलर्जी येते, यामधे सर्दीपासून ते तीव्र प्रकारच्या ऍलर्जीपर्यंत वेगवेगळे प्रकार दिसतात , पातळ अथवा जास्त ताणले जाणारे रबर म्हणजे फुगे, हातमोजे यातील रबर मधे प्रोटीन जास्त प्रमाणात असते त्यामुळे काहिना ऍलर्जी चा त्रास संभवतो
बुरशीची ऍलर्जी – यामधे प्रामुख्याने इनडोर अणि आउटडोर अशा बुरशीच्या स्पेसीज असतात. बुरशीचे बीजकण श्‍वसनामार्फत शरीरात गेल्यास शरीर संरक्षण संस्थेद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त होते. परिणामी कफ, डोळ्यांना खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात. अस्थमादेखील अशा ऍलर्जीमुळे होतो.
सौन्दर्यप्रसाधनांची ऍलर्जी – मॉइश्‍च्चराइजर, शाम्पू, डिओ, मेकअपचे साहित्य, कोलेजेन्स, आणि इतर सौन्दर्य प्रसाधने अनेकदा त्यातील सुगंध, प्रीझर्वेटिव्हजमुळे ऍलर्जिक रिएक्‍शनला कारणीभूत ठरतात
औषधांची ऍलर्जी – औषधांच्या ऍलर्जीमुळे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसतात. एखाद्या औषधाची ऍलर्जी असणे ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. सौम्य खाज सुटणे, किवा सौम्य साइड इफेक्‍ट्‌स म्हणजे उलट्या होणे किवा अन्नावरील वासना उड़ण्याबरोबरच अंगावर बारीक़ बारीक़ पुरळ उठते.
सिलम सिकनेस – हा औषधे घेतल्यानंतर काही दिवसांनी दिसणारा ऍलर्जीचा प्रकार आहे. अशी ऍलर्जी एका आठवड्यानंतरही येते.
एखादी लस दिल्यानंतर अशा प्रकारची ऍलर्जी दिसू शकते. सल्फा ड्रग्स, आकडीसाठी येणारी औषधे, इन्सुलिन, आयोडिनेटेड एक्‍स रे कॉन्ट्रास्ट डाइज इत्यादी औषधांमध्ये ऍलर्जीसाठी कारणीभूत घटक असू शकतात.
एक्‍झिमा – हा त्वचेवर खाज निर्माण करणारा ऍलर्जीचा एक प्रकार आहे. काही व्यक्तींना आयुष्यभर या त्रासाला सामोरे जावे लागते.
एक्‍झिमा होण्यामागे त्वचेच्या संपर्कात्‌ येणारे काही सर्व सामान्य घटक म्हणजे साबण, प्रसाधाने, कपडे, डिटर्जेंट, दागिने आणि घाम!
डोळ्यांची ऍलर्जी – ही एक सर्वसामान्य तक्रार आहे. यामुळे डोळे येणे, डोळ्यात घाण येणे, खाज सुटणे यांसारखी लक्षणे दिसतात परागकण, गवत, धूळ, पाळीव प्राण्यांच्या अंगावरील सूक्ष्म कण यामुळे ही ऍलर्जी होऊ शकते
दुधाची ऍलर्जी – दूध आणि दुधाची उत्पादने काही व्यक्तींच्या एलर्जीस कारणीभूत ठरू शकतात. त्यांना उलट्या होणे, जुलाब होणे, पोटात मुरडा मारणे अशी लक्षणे दूध किवा दुग्धजन्य पदार्थ सेवनाने लगेच दिसतात.
डॉ. स्वप्निल सुतार
सामान्यत: ऍलर्जीचे काही ठरावीक प्रकार आढळतात. हे प्रकार आणि त्यामागची कारणे
अन्न पदार्थाची ऍलर्जी-काहींना ठरावीक अन्नपदार्थाची ऍलर्जी असते. यामध्ये अंडी, दूध, शेंगदाणे,यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो याप्रकारच्या ऍलर्जीमुळे ऍलर्जी निर्माण करणाऱ्या इम्यूनोग्लॉबिन अँटीबॉडीज तयार होतात. अन्नाची खरंच ऍलर्जी असेल, तर संरक्षण संस्था अँटीबॉडीज आणि हिस्टामाइन अर्थात रक्तपेशींशी संबंधित असणारे द्रव तयार करतात.
घराभोवती असणारी झाडे – उदा. कॉंग्रेस गवत, फुलझाडे व इतर झाडांचे परागकण इत्यादींमुळे, तसेच गाड्यांचे प्रदूषण, कारखान्यांचे प्रदूषण, धूळ, धुरळा इत्यादीमुऴे ऍलर्जी होऊ शकते.
काही लोकांना थंड पदार्थ, थंड वातावरण यांची ऍलर्जी असते. काही लोकांना वातावरणात बदल झाला की ऍलर्जीच्या लक्षणांना सुरुवात होते. त्यात काहींना लगेच सर्दीचा त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने याचे अधिक प्रमाण शिक्षकांमध्ये व शाळेतील मुलांमध्ये दिसून येते. ग्रंथालयातील पुस्तके हाताळणे.
खडूचा वापर यामुळे ऍलर्जीचे प्रमाण वाढलेले दिसून येते. खाण्यातील पदार्थांची ऍलर्जी हा एक खूप रुग्णांमध्ये दिसून येत असलेला प्रकार आहे. यामध्ये प्रामुख्याने काही प्रथिनांच्या मुळे व्यक्तींना ऍलर्जीचा त्रास सुरू होतो. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीचा समावेश होतो. साधारणपणे प्रत्येकाला एकदातरी एखाद्या पदार्थांची ऍलर्जीचा अनुभव येत असतो.
काही लोकांना दागिन्यांची पण ऍलर्जी आढळून येते. त्यामुळे त्याजागी पुरळ उठणे, गांधी येणे, खाज, त्वचा काळी पडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जर एखाद्या माणसाला त्वचाविकार असेल, तर त्याच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या व्यक्‍तीला ऍलर्जीचा त्रास सुरू होऊ शकतो. महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्‍ती कमी आहे, त्यांना ऍलर्जीचा त्रास जास्त होत असल्याचे दिसून येते.
 ऍलर्जीची व्याख्याच करायची झाली तर अशी करता येईल-कुठल्याही बाह्यघटकांच्या विरुद्ध शरीरातील संरक्षण संस्थेने दिलेली तीव्र स्वरूपातील प्रतिक्रिया ऍलर्जी अनेक कारणांमुळे अथवा घटकांमुळे होऊ शकते. उदा. परागकण, धूलिकण , अन्नपदार्थ , कीटकांचा चावा, औषधे, बुरशीचे बीजाणू इत्यादी. ऍलर्जीची लक्षणे काही वेळा अगदी सौम्य स्वरूपाची असतात, तर काही वेळेस अगदी तीव्र स्वरूपाची असतात; ज्याची परिणीती अतिशय घातक रूपात अथवा मृत्यूमध्येही होऊ शकते.
फिव्हर-ऍलर्जी चा हा प्रकार परागकण अथवा इतर सूक्ष्म घटकांमुळे दिसून येतो यात सर्दी, खाज सुटणे, आणि डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसतात. अधिक संवेदनशील व्यक्‍ती असेल तर त्वचेवर चट्टेही उठू शकतात
रॅश-काही वेळा गडद लाल रंगाचे चट्टे पडतात, किंवा तेवढा भाग फुगल्यासारखा होतो. विषाणुजन्य ऍलर्जीमुळे, ताणताणावामुळे, सूर्यकिरण किवा तापमानातील बदलामुळे त्वचेवर रॅश येऊ शकतात
वनस्पतीची ऍलर्जी – काही वनस्पती, बागकामाचे साहित्य इत्यादीच्या संपर्कात आल्यास याचा त्रास होऊ शकतो
कीटकांचा चावा – मधमाशी, गांधीलमाशी, कुंभारमाशी, मुंग्या यांसारखे कीटक आणि त्यांचा चावा यामुळे अनेकांना ऍलर्जी येऊ शकते. या कीटकांच्या नांगीद्वारे विशिष्ट रस त्वचेवर सोडला जातो. त्यामुळे अल्प वेदना, सूज, लाली वैगेरे येऊ शकते
पेट ऍलर्जी – काही व्यक्तींना पाळीव प्राण्यांची ऍलर्जी असते. एखाद्या व्यक्तीची शारीरिक संरक्षण संस्था प्राण्यामधील ठराविक प्रथिनाप्रति तीव्र प्रतिक्रिया दाखवते तेव्हा आशा प्रकारची ऍलर्जी होते. यामुळे नाकाच्या भागात तीव्र खाज सुटते, शिंका येतात, नाक वाहते आणि इतरही लक्षणे दिसतात .
लैटेक्‍स ऍलर्जी – रबरामधील प्रोटीनमुळे काही व्यक्तिना ऍलर्जी येते, यामधे सर्दीपासून ते तीव्र प्रकारच्या ऍलर्जीपर्यंत वेगवेगळे प्रकार दिसतात ,
पातळ अथवा जास्त ताणले जाणारे रबर म्हणजे फुगे, हातमोजे यातील रबर मधे प्रोटीन जास्त प्रमाणात असते त्यामुळे काहिना ऍलर्जी चा त्रास संभवतो
बुरशीची ऍलर्जी – यामधे प्रामुख्याने इनडोर अणि आउटडोर अशा बुरशीच्या स्पेसीज असतात. बुरशीचे बीजकण श्‍वसनामार्फत शरीरात गेल्यास शरीर संरक्षण संस्थेद्वारे तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त होते. परिणामी कफ, डोळ्यांना खाज सुटणे अशी लक्षणे दिसतात. अस्थमादेखील अशा ऍलर्जीमुळे होतो.
सौन्दर्यप्रसाधनांची ऍलर्जी – मॉइश्‍च्चराइजर, शाम्पू, डिओ, मेकअपचे साहित्य, कोलेजेन्स, आणि इतर सौन्दर्य प्रसाधने अनेकदा त्यातील सुगंध, प्रीझर्वेटिव्हजमुळे ऍलर्जिक रिएक्‍शनला कारणीभूत ठरतात
औषधांची ऍलर्जी – औषधांच्या ऍलर्जीमुळे एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणे दिसतात. एखाद्या औषधाची ऍलर्जी असणे ही तशी सर्वसामान्य गोष्ट आहे. सौम्य खाज सुटणे, किवा सौम्य साइड इफेक्‍ट्‌स म्हणजे उलट्या होणे किवा अन्नावरील वासना उड़ण्याबरोबरच अंगावर बारीक़ बारीक़ पुरळ उठते.
सिलम सिकनेस – हा औषधे घेतल्यानंतर काही दिवसांनी दिसणारा ऍलर्जीचा प्रकार आहे. अशी ऍलर्जी एका आठवड्यानंतरही येते.
एखादी लस दिल्यानंतर अशा प्रकारची ऍलर्जी दिसू शकते. सल्फा ड्रग्स, आकडीसाठी येणारी औषधे, इन्सुलिन, आयोडिनेटेड एक्‍स रे कॉन्ट्रास्ट डाइज इत्यादी औषधांमध्ये ऍलर्जीसाठी कारणीभूत घटक असू शकतात.
एक्‍झिमा – हा त्वचेवर खाज निर्माण करणारा ऍलर्जीचा एक प्रकार आहे. काही व्यक्तींना आयुष्यभर या त्रासाला सामोरे जावे लागते.
एक्‍झिमा होण्यामागे त्वचेच्या संपर्कात्‌ येणारे काही सर्व सामान्य घटक म्हणजे साबण, प्रसाधाने, कपडे, डिटर्जेंट, दागिने आणि घाम!
डोळ्यांची ऍलर्जी – ही एक सर्वसामान्य तक्रार आहे. यामुळे डोळे येणे, डोळ्यात घाण येणे, खाज सुटणे यांसारखी लक्षणे दिसतात परागकण, गवत, धूळ, पाळीव प्राण्यांच्या अंगावरील सूक्ष्म कण यामुळे ही ऍलर्जी होऊ शकते
दुधाची ऍलर्जी – दूध आणि दुधाची उत्पादने काही व्यक्तींच्या एलर्जीस कारणीभूत ठरू शकतात. त्यांना उलट्या होणे, जुलाब होणे, पोटात मुरडा मारणे अशी लक्षणे दूध किवा दुग्धजन्य पदार्थ सेवनाने लगेच दिसतात.
अन्न पदार्थाची ऍलर्जी-काहींना ठरावीक अन्नपदार्थाची ऍलर्जी असते. यामध्ये अंडी, दूध, शेंगदाणे,यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो याप्रकारच्या ऍलर्जीमुळे ऍलर्जी निर्माण करणाऱ्या इम्यूनोग्लॉबिन अँटीबॉडीज तयार होतात. अन्नाची खरंच ऍलर्जी असेल, तर संरक्षण संस्था अँटीबॉडीज आणि हिस्टामाइन अर्थात रक्तपेशींशी संबंधित असणारे द्रव तयार करतात.
घराभोवती असणारी झाडे – उदा. कॉंग्रेस गवत, फुलझाडे व इतर झाडांचे परागकण इत्यादींमुळे, तसेच गाड्यांचे प्रदूषण, कारखान्यांचे प्रदूषण, धूळ, धुरळा इत्यादीमुऴे ऍलर्जी होऊ शकते.
काही लोकांना थंड पदार्थ, थंड वातावरण यांची ऍलर्जी असते.
काही लोकांना वातावरणात बदल झाला की ऍलर्जीच्या लक्षणांना सुरुवात होते. त्यात काहींना लगेच सर्दीचा त्रास सहन करावा लागतो. प्रामुख्याने याचे अधिक प्रमाण शिक्षकांमध्ये व शाळेतील मुलांमध्ये दिसून येते. ग्रंथालयातील पुस्तके हाताळणे. खडूचा वापर यामुळे ऍलर्जीचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
खाण्यातील पदार्थांची ऍलर्जी हा एक खूप रुग्णांमध्ये दिसून येत असलेला प्रकार आहे. यामध्ये प्रामुख्याने काही प्रथिनांच्या मुळे व्यक्तींना ऍलर्जीचा त्रास सुरू होतो. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तीचा समावेश होतो. साधारणपणे प्रत्येकाला एकदातरी एखाद्या पदार्थांची ऍलर्जीचा अनुभव येत असतो.
काही लोकांना दागिन्यांची पण ऍलर्जी आढळून येते. त्यामुळे त्याजागी पुरळ उठणे, गांधी येणे, खाज, त्वचा काळी पडणे इत्यादी लक्षणे दिसून येतात. जर एखाद्या माणसाला त्वचाविकार असेल, तर त्याच्या संपर्कात आल्यामुळे दुसऱ्या व्यक्‍तीला ऍलर्जीचा त्रास सुरू होऊ शकतो.
महत्त्वाचे म्हणजे ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारशक्‍ती कमी आहे, त्यांना ऍलर्जीचा त्रास जास्त होत असल्याचे दिसून येते.
ऍलर्जीच्या रुग्णांनी घ्यावयाची काळजी
ऍलर्जी ही एक अशी संकल्पना आहे की, ज्याबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. ऍलर्जीवर काही रामबाण, हमखास परिणाम करणारे औषध नाही. काळजी घेणे हा सर्वोत्तम उपाय. ज्या गोष्टीची आपल्याला ऍलर्जी आहे, त्यापासून दूर राहणे हाच सर्वोत्तम उपाय.
आपल्या घरातील अंथरुण पांघरूण स्वच्छ ठेवणे, वेळोवेळी घरातील अडचणीची जागा साफ करणे, जेणेकरून धूळ जास्त साठणार नाही.
शक्‍यतो घरामध्ये पाळीव प्राणी नसावेत.
गाडीवरून फिरताना तोंडाला रुमाल लावून जाणे, जेणेकरून नाक व तोंड झाकले जाईल.
रस्त्यावरील धूळ, चुलीचा धूर, सिगारेटचा धूर या गोष्टी टाळाव्यात.
वातावरणात बदल होत असताना खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवावे व योग्य ती काळजी घ्यावी.
धुम्रपान, विडी, पानसुपारी इत्यादी सवयी असतील तर त्या बंद कराव्या.
आंबट पदार्थ, लिंबू, लोणचं, मोसंबी, कैरी, संत्रे, दही, लस्सी, पेरू, काकडी, थंड पेय, फ्रिजमधील पाणी, मासे, अशा प्रकारचे पदार्थ, ज्यामुळे त्रास होत असेल तर ते टाळावेत.
सर्दी होऊ नये म्हणून काळजी घ्यावी व झाल्यास त्यावर त्वरित उपचार करून घ्यावे.
आपल्याला ऍलर्जी असणाऱ्या पदार्थांची व औषधांची माहिती नेहमी जवळ ठेवावी. तसेच नवीन ठिकाणी उपचार घेण्यास जात असेल तर त्या डॉक्‍टरना त्याची पूर्वकल्पना देणे गरजेचे असते.
घरामध्ये मच्छर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉइल अथवा श्रळर्िींळव चा जास्त वापर करू नये, अगरबत्ती-धूप या गोष्टी वापरू नये. झाडून काढताना तोंडाला रुमाल बांधावा.
त्वचासंदर्भात ऍलर्जी असेल तर अशा रुग्णांनी कडक उन्हात जाणे टाळावे, बोचऱ्या थंडीत योग्य रीतीने गरम राहण्याचा प्रयत्न करावा, साबण, क्रीम, जीर्‌ ीीळीं होते तीच वापरावी. सारखी बदलत राहू नये.
ऍलर्जीसाठी उपचार
यामध्ये प्रामुख्याने रश्रश्रेरिींहू मध्ये र्ळीापीेंहशीरिू चा, तसेच रपींळ रश्रश्रशीसळल, रपींळ हळीींराळपळली, दम्याच्या रुग्णांमध्ये ीीेंरहशश्ररी, ीींशीेळवी, ळीं ूररवशशलरर वापर केला जातो. परंतु, यामध्ये असे दिसून येते की, या औषधांचा वापर रुग्णाला खूप काळासाठी करावा लागतो. कारण जोपर्यंत औषधे सुरू आहेत, तोपर्यंत रुग्णाला आराम मिळत असतो. काही केसेस मध्ये असे दिसून येते की रुग्णाने काही कारणास्तव औषधे बंद केल्यास त्या लक्षणांचा पुनरुद्‌भव झालेला दिसतो.
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार केला तर असे दिसून येते की औषधांसोबत काही पंचकर्म यांचा उपयोग केल्यास रुग्णाला पूर्णपणे आराम मिळू शकतो. यामध्ये शरीराची रोग प्रतिकारशक्‍ती वाढवणाऱ्या औषधांचा उपयोग केला जातो. परंतु, त्याचप्रमाणे वमन, रक्‍तमोक्षण, नस्य, विरेचन, इत्यादीचा योग्य रितीने व योग्य ऋतू काळात उपचारात वापर केला गेल्यास रुग्णाला नक्कीच उपाय मिळालेला दिसून येतो.
या सर्व गोष्टींसोबत रुग्णाने त्यांच्या डॉक्‍टर वा वैद्यांनी दिलेल्या पथ्य, अपथ्यांचे पालन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.




https://www.dainikprabhat.com/allergy-part-1/

शेंगदाणे खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे..

शेंगदाणे खाण्याचे 'हे' आहेत आरोग्यदायी फायदे

काही जणांना शेंगदाणे खाण्यामुळे पित्ताचा किंवा ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः लाल शेंगदाणे खाण्यामुळे पित्त वाढू शकते. पिताचा त्रास किंवा दमा असणाऱ्यानी शेंगदाणे खाऊ नयेत.
बऱ्याचदा उत्तम टाईमपास म्हणून शेंगदाणे खाल्ले जातात. थंडीच्या दिवसात शेंगदाणे खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतं. शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळेच शेंगदाणे प्रोटीनसाठी सर्वात स्वस्त वनस्पती स्रोत मानले जातात. मुठभर शेंगदाण्यामध्ये योग्य प्रमाणात कॅलरीज, कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असतात. तसेच शेंगदाण्यापासून व्हिटॅमिन इ, के, आणि बी6 भरपूर प्रमाणात मिळतात. शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक आजारांपासून बचाव करण्याऱ्या शेंगदाण्यांचे फायदे वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

शेंगदाणे खाण्याचे फायदे :
डायबेटीससाठी योग्य - शेंगदाण्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असून याचा Glycemic index (GI) सुद्धा अत्यंत कमी आहे. एखादा अन्नपदार्थ खाल्यानंतर त्यातील कर्बोदके (साखर) किती जलदपणे रक्तात मिसळली जातात यावरून त्या पदार्थाचा Glycemic index ठरवला जातो. शेंगदाण्यात कर्बोदके कमी असल्याने व त्याचा GI अत्यंत कमी असल्याने शेंगदाणे हे मधुमेही रुग्णांसाठी योग्य असतात. मधुमेही रुग्णांनी रोज मूठभर शेंगदाणे खाल्यास पुरेसे नायसिन मिळून रक्तवाहिन्यांचे दोषही कमी होण्यास मदत होते.
वजन कमी करते - शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात फॅट आणि कॅलरीज असूनही वजन कमी करण्यासाठी शेंगदाणे खूप उपयुक्त ठरतात हे अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास किंवा वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास दररोज मूठभर शेंगदाणे भाजून खावेत. शेंगदाणे जेवणापूर्वी खाल्यास भूक कमी लागते व वजन आटोक्यात राहण्यास मदत होते.
हृदविकाराचा धोका कमी करते - शेंगदाण्यात हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारी अनेक पोषकतत्वे असतात. शेंगदाण्यात असणाऱ्या Oleic acid मुळे हृदयातील रक्तवाहिन्यांचे दोष कमी होतात. यामुळे रक्तातील वाईट कॉलेस्टेरॉलची (LDL) लेव्हल कमी होते व चांगले कॉलेस्टेरॉलची (HDL) लेव्हल वाढते. तसेच शेंगदाणे खाण्यामुळे वजनही नियंत्रित राहते त्यामुळे शेंगदाण्यामुळे हृदविकाराचा धोका कमी होण्यास मदत होते.कोलेस्टेरॉलमुळे पित्ताशयात खडे होत असतात. शेंगदाण्यात असणाऱ्या Phytosterol मुळे कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते. शेंगदाणे खाण्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका कमी होतो.
गरोदरपणात उपयुक्त - शेंगदाण्यामध्ये फॉलिक ऍसिड किंवा Folate चे प्रमाणही मुबलक असते.फॉलिक ऍसिड हा घटक प्रेग्नन्सीमध्ये खूप महत्वाचा असतो. यासाठी प्रेग्नन्सीमध्ये शेंगदाणे दररोज खाणे गर्भवती स्त्रियांसाठी खूप चांगले असते.
त्वचेसाठीही फायदेशीर - त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे ओमेगा-6 फॅटी ऍसिड हा घटक शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे शेंगदाणे खाणे हे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.
शेंगदाणे कशाप्रकारे खावेत..? शेंगदाणे हे कच्चे, भाजून, उकडून व तळून खाल्ले जातात तसेच विविध भाज्या, उसळी, चिक्की व लाडवात ह्याचा वापर केला जातो. आरोग्याचा विचार करता शेंगदाण्यातील पोषकतत्वांचा आपल्या शरोराला योग्य फायदा होण्यासाठी शेंगदाणे हे सालासकट कच्चे, भाजून, उकडून खाऊ शकता किंवा भाजीत, उसळीत घालूनही खाऊ शकता. शेंगदाण्याची चटणी, शेंगदाणा चिक्कीही आपण खाऊ शकता. शेंगदाणे वाफवल्यास त्याचे गुणधर्म वाढतात तर भाजलेले शेंगदाणे पचण्यास हलके असतात. अशाप्रकारे आपण आपल्या आहारात शेंगदाण्याचा समावेश करू शकतो. मात्र तळलेले शेंगदाणे किंवा मीठ लावलेले खारट शेंगदाणे आरोग्यासाठी योग्य नसतात. तळलेल्या शेंगदाण्यात कोणतेही पोषकघटक नसतात. तर खारट शेंगदाण्यामुळे शरीरात मीठ अधिक प्रमाणात गेल्यामुळे हाय ब्लडप्रेशरसारख्या समस्याही होऊ शकतात.
आठवड्यातले काही दिवस शेंगदाणे खाल्ल्यास हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी राहतो. तसेच शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होऊन ते नियंत्रणात राहते. शेंगदाण्य़ांमध्ये व्हिटॅमिन इ मोठ्या प्रमाणात असल्याने शेंगदाणा उपयुक्त अँटीऑक्सिडंटचा मोठा स्त्रोत आहे. हृदयाला संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट महत्त्वाचे ठरतात. शेंगदाण्याचे नियमित सेवन गर्भवती स्त्रियांसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. गर्भावस्थेत बाळाच्या विकासासाठी शेंगदाणे फायदेशीर ठरतात.
शेंगदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्याही दूर होते. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-6 फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामुळेच शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात. शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात शेंगदाणे खाणे शरीरासाठी उपयुक्त आहे. शेंगदाण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहे. अतिप्रमाणात शेंगदाण्याचं सेवन केल्यास ते शरिरासाठी धोकादायक ठरू शकतं. जास्त शेंगदाणे खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
शेंगदाणे खाण्याचे नुकसान : काही जणांना शेंगदाणे खाण्यामुळे पित्ताचा किंवा ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः लाल शेंगदाणे खाण्यामुळे पित्त वाढू शकते. पित्ताचा त्रास किंवा दमा असणाऱ्यानी शेंगदाणे खाऊ नयेत.












https://amnews.live/news/aarogya/these-are-healthy-benefits-for-eating-peanuts

माझ्याबद्दल