हिवाळ्याचे दिवस... अंगाला बोचणारी थंडी त्यात सकाळी उठणे म्हणजे कर्मकठीणच! "जेव्हा आळशी माणसं काम करीत असतात तेव्हा यशस्वी माणसं स्वतःच करीअर घडवत असतात." आपल्या आजूबाजूची यशस्वी व्यक्ती पहा आणि त्यांना विचारा... बाबा तुम्ही किती वाजता उठता??? त्यांचे उत्तर पहाटे 4:30 ते 5:00 या वेळेला अनुसरुनच असेल. आता काही उदाहरणे पाहू यात...
अक्षय कुमार... फिटनेस फ्रीक असलेला ॲक्टर आणि प्रोड्युसर अक्षय कुमारच्या दिवसाची सुरुवात पहाटे 4:30 वाजल्यापासून होते. दीड-दोन तास व्यायाम त्यानंतर सकाळी 7 वाजता हा पठ्ठ्या शुटिंगसाठी सर्वात आधी तयार असतो. बरं हा झोपतो रात्री 9 वाजता म्हणजे झोपही पूर्ण आणि कामही. म्हणूनच यशस्वी व्यक्तींच्या यादीत शिस्तबद्ध अक्षयचा क्रमांक येतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी... भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरु होतो. ते फक्त पाच-सहा तासच झोप घेतात. दिवसातील एकूण तासांपैकी 18 ते 19 तास ते कामच करत असतात. म्हणूनच त्यांनी एक साधारण चायवाला ते पंतप्रधान असा असाधारण आणि यशस्वी प्रवास मोदी यांनी केला.
पहाटे 4:30 वाजता उठणा-यांच्या यादीमध्ये फक्त हे दोघंच नाहीत. टाटा समुहाचे रतन टाटा, सदीं के महानायक अमिताभ बच्चन, चीनचे अव्वल बिझनेसमन जॅक मा, मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स ते भारतीय कर्णधार विराट कोहली अशी ही भली मोठी यादी आहे...
आता आपण पाहू यात जीवनात यशस्वी होण्यासाठी पहाटे 4:30 वाजता उठणे का आवश्यक आहे...
1. यशाचं गुपित... पहाटे उठणे आणि आपल्या कामाला सुरुवात करणे, हेच यशस्वी व्यक्तींच्या यशाचं गुपित आहे. जगभरातील कोणतेही यशस्वी लोकं घ्या... बिझनेसमन असो, कलाकार असो किंवा राजकीय नेते असो. सर्वजन पहाटे लवकर उठतात आणि आपल्य कामाला सुरुवात करतात.
2. कामं पूर्ण होतात... संशोधक मांडतात की, सकाळी-सकाळी आपण ताजेतवाने असतो. जे काही काम असेल ते आपण लवकर लवकर आणि १०० टक्के योगदान देऊ पूर्ण करतो. म्हणूनच पहा अनेक बिझनेसमन त्यांच्या व्यवसायातील मोठे निर्णय सकाळच्या वेळेतच घेतात.
3. शांतता... सकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही काम सुरु करता तेव्हा आपल्या आजूबाजूला सर्वत्र शांतता असते. फोन नाही, घरच्यांचा आरडाओरडा नाही. अशा वातावरणात आपण आपले सर्वोत्तम काम करु शकतो. म्हणूनच सकाळचा वेळ आवश्यक आहे.
4. तुम्हीच लीडर आहात... जेव्हा तुम्ही पहाटे उठता तेव्हा अनेजजण झोपलेले असतात. अशावेळेस तुमच्याकडे सकारात्मकता येते आणि लीडरचा ऍडिट्यूड आपल्या मन आणि बुद्धी निर्माण होतो. पुढील दिवसभरातील सर्व निर्णय आपण लीडर आणि जिंकण्याच्या ऍडिट्यूडनेच घेतो.
तर मित्रांनो ही होती पहाटे 4:30 वाजता उठण्याची कारणे. तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचंय तर ही कारणं तुम्हीही अंगी बाणा आणि तुम्हीसुद्धा वर नमूद केलेल्या नावांप्रमाणे जीवनात यशस्वी व्हाल, हे नक्की!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा