मंगळवार, १७ सप्टेंबर, २०१९

रतन टाटा - भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन...




रतन टाटारतन टाटा हे टाटा समूहाचे ५ वे अध्यक्ष होय. १९९१ मध्ये जे.आर.डि. टाटा निवृत्त झाले आणि रतन टाटा यांचाकडे अध्यक्ष पदाची जबाबदारी आली. सुमारे 150 वर्षांची उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा अध्यक्ष होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुक़ुट आहे. कारण टाटा.. भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढय़ांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती!

ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता. या बाबी टाटा गु्रपला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रुपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रुपचा विस्तार केला. रतन टाटा यांनी आपल्या निर्णयक्षमतेने आणि कौशल्याने अतिशय अवाढव्य असलेल्या टाटा ग्रुपमध्ये सळसळते चैतन्य निर्माण केले. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटा यांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे.

जन्मरतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी सुरत येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव नवल आणि आईचे नाव सोनू असे आहे. टाटा हे पारशी धर्माचे आहेत. रतन टाटा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आले, हे खरे असले, तरीही त्यांचे बालपण मात्र अतिशय अवघड परिस्थितीमध्ये गेले. अवघ्या सहा वर्षांचे वय असताना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले आणि रतन टाटा व त्यांच्या भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आजीवर येऊन पडली. त्यांच्या वडिलांनी आपला राहता बंगलाही विकून टाकला.


शिक्षणरतन टाटा यांनी कॅथेड्रल, जॉन कॉनन स्कूल (मुंबई) आणि बिशॉप कॉटन स्कूल (शिमला) येथे त्यांचे प्रारंभिक शिक्षण पूर्ण केले. नंतर १९६२ साली ते आर्किटेक्‍ट होण्याची मनीषा बाळगून अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठामध्ये दाखल झाले.



आपले टाटा हे नाव विसरून आपण आपल्या पायावर उभे राहून शिक्षण पूर्ण करायचे, या ध्येयाने झपाटलेल्या रतन टाटा यांनी अमेरिकेतील आपल्या दहा वर्षांच्या मुक्कामामध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून ते कारकुनाच्या नोकरीपर्यंत सर्व काही केले.

कॉर्नेल विद्यापीठातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवीही घेतली. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे. आर. डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे. आर. डी. प्रभावित झाले.


टाटा समूहात प्रवेशआजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. इ.स. १९६२ च्या डिसेंबर महिन्यात रतनजी समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार ६२ ते ७१ त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले.

जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच इ.स. १९७१ मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती.

रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्‍क्‍यांवरून वीस टक्के झाला; पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली.

रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते. इ.स. १९७७ मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती.

कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमूहाला केली; पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली.

रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते; पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. इ.स. १९८१ मध्ये जे. आर. डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. इ.स. १९९१ मध्ये जे. आर. डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली.



रतन टाटा यांनी टाटा समूहात सहसा न घडणारी अशी एक महत्त्वाची गोष्ट केली आणि ती म्हणजे पारसी धर्मात न जन्मलेल्या अशा काही गुणी लोकांना त्यांनी बॉम्बे हाऊसमध्ये अत्युच्च पदांवर आणले. आधीचे मूळगावकर, केरकर, पेंडसे असे काही सन्मान्य अपवाद जरूर होते; पण रतन टाटांनी ते अधिक विस्तारले.

जे. आर. डी. टाटांच्या अति सज्जनपणाचा फायदा घेत वर्षांनुवष्रे कंपनी ही आपली जहागिरी बनवून आपल्याच सग्यासोयऱ्यांबरोबर मनमानी करणारे, कितीही वय वाढले तरी निवृत्त न होणारे टाटा समूहातील मठाधिपती त्यांनी घरी पाठवले. निवृत्तीचे वय ७५ वष्रे निश्चित केले. यात टिस्कोचे रूसी मोदी, टाटा केमिकल्सचे दरबारी सेठ असे सामथ्र्यवान दिग्गज होते. रतन टाटांनी जवळजवळ सर्वच टाटा कंपन्यांतून नवे रक्त आणले आणि लंगडणाऱ्या कंपन्या भरभराटीने धावू लागल्या.

रतन टाटांनी आपणच केलेला नियम काटेकोरपणे पाळला. आपल्या हयातीतच आपला वारस व्यवस्थित रीतीने निवडला आणि स्वत:ही ७५ व्या वर्षी निवृत्त झाले.

रतन टाटा यांची माणुसकी२oo८ मध्ये २६/११ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात हॉटेलमध्ये जखमी झालेल्या सर्वांचे उपचार टाटा यांनीच केले होते. हॉटेल च्या शेजारी असलेल्या दुकानांत जखमी झालेल्या सर्व लोकांना टाटा यांनी मदत केली होती. जोपर्यंत हॉटेल बंद होते तोपर्यंत कर्मचार्यांना त्या दिवसासांचे पूर्ण वेतन दिले जात असे. मुंबईच्या ताज हॉटेलचे बांधकाम जमशेदजी टाटा, ज्यांनी टाटा कंपनीची स्थापना केली होती, त्यांनीच केले होते . हे हॉटेल १९o३ मध्ये ४ कोटी २१ लाख रुपयांच्या बजेट मध्ये बांधले गेले होते.

अपमानाचा बदलाही कथा आहे 1998 ची….। जेव्हा रतन टाटा हे त्यांची पहिली कार टाटा इंडिका घेऊन आले होते. पण इंडिका वाईट पद्धतीने अयशस्वी झाली. पहिल्या वर्षी लोकांनी कारला नापसंती दिली. कारची खूप कमी विक्री झाली या मुळे इंडिका कार डिव्हिजन विकण्याचा सल्ला कंपनी शिष्टमंडळाने रतन टाटा याना दिला. टाटांनी देखील सल्ला मान्य केलं.

रतन टाटा हे फोर्डचे मुख्यालय डेट्रॉईटला गेले होते हे सांगण्यासाठी की टाटा मोटर्सचे ला तुम्ही विकत घ्या. त्या दिवशी बिल फोर्डने यांनी त्याचा भरपूर अपमान केला होता. त्या दिवशी ते म्हणाले की तुमचे टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनाची खरेदी करुन मी तुमच्यावर उपकार करीत आहे. टाटा यांना बरेचh सुनवण्यात आले की, एखादी गाडी तयार करणे शक्य नसताना तुम्ही या व्यवसायात का आलात? त्यावेळी रतन टाटा यांना खूप वाईट वाटले. त्याच रात्री, ते संपूर्ण टीमसह डेट्रॉईटवरून मुंबईला परतले. ते हट्टी स्वभावाचे होते. टाटा मोटर्सवर वर स्वतंत्र वेळ दिला. काही दिवसांनंतर टाटा मोटर्सने चांगली सुरुवात केली. काही वर्षांनी टाटा मोटर हि खूप नावारूपाला आली.

परंतु बिल फोर्डची कंपनी कर्जात बुडाली. २oo९ साली फोर्ड कंपनी डुबण्याच्या काठावर आली तेव्हा टाटा समूहाने त्यांना एक प्रस्ताव पाठवला की आम्ही तुम्हाला खरेदी करतो. अगदी त्याचप्रमाणे, फोर्डची संपूर्ण टीम डेट्रॉइटहून मुंबईला आली आणि म्हणाली, "आपण आमच्या जैगुआर लैंडरोवर खरेदी करून आमच्यावर उपकार करीत आहात." रतन टाटा यांनी जैगुआर लैंडरोवरला ९६oo कोटी रूपयांत विकत घेतले.




व्ययक्तिक जीवनरतन टाटा चार वेळा प्रेमात पडले, पण ते विवाहित नाही. आणि एकदा तर त्यांचे लग्न होणारच होते. वास्तविक, रतनजी अमेरिकेत शिकत असताना ते एका मुलीच्या प्रेमात पडले, व दोघे ही लग्नासाठी तयार झाले होते. त्यांच्या आजीच्या आजारामुळे ते भारतात आले परंतु त्यांची प्रेमिका भारत-चीन युद्धामुळे फारच घाबरलेली होती आणि भारतात आली नाही. आणि काही दिवसांनंतर, त्यांच्या प्रेमिकेने अमेरिकेमध्ये दुसऱ्या कोणा बरोबर लग्न केले.


सारांश

रतन टाटा यांनी १९९१ ते २०१२ च्या आपल्या २१ वर्षाच्या कारकिर्दीत कंपनीला सर्वोच्च पातळीवर आणले आहे. त्यांच्या कारकिर्दीत कंपनी चा नफा हा ५ पटीने वाढला. सुरवातीला त्यांनी जे काही निर्णय घेतले ते त्यांनी सिद्ध करून दाखवले होते. कोरस, जग्वार, टेटली सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी एका पाठोपाठ खरेदी केल्या. या भरारीने देशातल्या तरूणांना नवी ऊर्जा दिली.

'मोठी स्वप्न पाहाणे आणि ती प्रत्यक्षात आणणं' हा गुरुमंत्र रतन टाटांनी दिला आहे. या स्वप्नांमधून 'इंडिगो' आणि 'नॅनो'ची निर्मिती झाली. भारतातच कार तर जगभरात कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे टाटांनी दाखवून दिले आहे. यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समिकरण तयार झालंय.










by - https://www.marathimotivation.in

बोधकथा - युध्दातला हत्ती...


बोधकथाएका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.

काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.

वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.

कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.

त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले,

सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.

त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.


ध्यानात ठेवानिराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.

जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते ..

आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!

बोधकथा - मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी...


बोधकथा - मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी.


मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी.

एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, "तू तर नेहेमी इतरांना काहीना काही मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?" तेव्हा तो भिकारी म्हणाला, "शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?"




"अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन." शेटजी उत्तरले.




इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?




बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भीक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.




विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली.




तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.




कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, "शेटजी, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत.




तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन." शेटजीने त्याला भिकेमध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेटजी खुश झाले होते. ते म्हणाले, "व्वा! क्या बात है? आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास." एव्हढं बोलून तो शेटजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला. पण त्या शेटजीने बोललेले एक वाक्य, “आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास”, त्याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.




विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, "नाही, मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेटजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो." आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.




साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, "ओळखलंत मला?




आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला, "नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत."




पहिला : "नाही, नाही! शेठजी. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत."




दुसरा : "असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?"

पहिला माणूस हसून उत्तरला, "ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?" आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय.




पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल तर आपल्याजवळचं कांहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे. मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं मी भिकारी नाही, व्यापारी आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात. आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय."




भारतीय ऋषीमुनींनी बहुधा ह्यासाठीच माणसाला स्वतःची ओळख करवून देण्यावर नेहेमीच जोर दिलेला आहे.




सोऽहं शिवोहं !!



शेवटी सगळं कांही मनाच्या समजुतीवर अवलंबून आहे. भिकारी जो पर्यंत स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यन्त तो भिकारीच राहिला. जेव्हा आपण व्यापारी असल्याचे तो समजू लागला तेव्हा तो खरंच व्यापारी बनला. जेव्हा आपण आपल्याला आपण कोण आहोत हे समजायला लागू तेव्हा मग आणखी समजण्यासारखं राहिलंच काय? होय ना?










इतर लेख : marathimotivation.in

सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९

वाचा Pinterest या सोशल मीडियाची स्टार्टअप कथा..


वाचा Pinterest या सोशल मीडियाची स्टार्टअप कथा


आपल्यापैकी जवळजवळ सर्वांनाच आपले फोटो काढून इतर मित्र-मैत्रिणी, नातेवाईक वगैरेंना दाखवायला आवडतात, तसेच आपले विचार, नवीन कल्पनासुद्धा सर्वांसोबत शेअर करायला आवडतं; परंतु या धकाधकीच्या जीवनात आपल्याला कुठे इतका वेळ मिळतो? आपण फार तर घरातल्यांशी थोड्या गप्पा मारत असू. हीच प्रत्येकाच्या मनातली भावना बेन सिलबरमन या अमेरिकन तरुणाने ओळखली. पॉलिटिकल सायन्स शिकलेला हा बेन सिलबरमन स्वभावाने शांत. कॉलेज संपल्यावर प्रथम त्याने गुगलमध्ये नोकरी सुरू केली.

कॉलेजमध्ये असतानाच बेनला स्वत:च्या आयफोनसाठी नवनवीन app बनवण्याची सवय तसेच आवड होती. यातूनच जन्म झाला 'पिंटरेस्ट'चा. 'पिंटरेस्ट' त्याच्या वापरकर्त्यांना विविध फोटोज, त्यांचे विचार असं बरंच काही एकमेकांसोबत शेअर करण्यासाठी मदत करते. लोक 'पिंटरेस्ट'द्वारे आपल्या मित्रपरिवारासोबत फोटोज, विचार, गोष्टी इत्यादींची देवाणघेवाण करून संपर्कात राहू शकतात. प्रत्येक उद्योगाचे एक वैशिष्ट्य त्याचा मुख्य पाया असतो.

त्याचप्रमाणे लोकांची आवड हे 'पिंटरेस्ट'च्या प्रगतीचं वैशिष्ट्य आहे.

'पिंटरेस्ट'ची खरी सुरुवात झाली ती २००८ मध्ये. तेव्हा बेन सिलबरमन, पॉल सिआरा आणि इवान शार्प हे 'पिंटरेस्ट'चे सहसंस्थापक होते, तेव्हा 'पिंटरेस्ट' हे नावही ठरलं नव्हतं. आज 'पिंटरेस्ट'ची तुलना फेसबुकसारख्या जगप्रसिद्ध उद्योगाशी केली जाते.

२०१० मध्ये पिंटरेस्ट पहिल्यांदा सत्यात उतरलं तेव्हा फक्त काही मित्र आणि त्यांची कुटुंब इतकेच लोक 'पिंटरेस्ट' वापरकर्ते होते. तेव्हा 'पिंटरेस्ट' हे एक बंद बीटा होते. म्हणजेच जसे फेसबुकवरील close ग्रुप जे काही लोकांपुरतंच मर्यादित असतात. पुढे जाऊन 'पिंटरेस्ट' ओपन बीटा म्हणजेच सर्वांसाठी खुले झाले.

बेन सिलबरमन यांनी सुरुवातीला ५ हजार हस्तलिखित पत्रं पाठवली होती.

लोकांना पिंटरेस्टचे सदस्य होण्यासाठी वेबसाइट लाँच केल्यावर नऊ महिन्यांतच १० हजार लोक पिंटरेस्टचे वापरकर्ते झाले. त्यानंतर सिलबरमन आणि त्याच्या एक-दोन सोबत्यांनी 'पिंटरेस्ट'ला विविध रूपांनी सजवून आणखी आकर्षक बनवलं. 'पिंटरेस्ट'चा पहिला गुंतवणूकदार हा सिलबरमनच होता. २०१० च्या उत्तरार्धात त्याने अमेरिकेतील एका मासिक काढणार्‍या उद्योजकाला 'पिंटरेस्ट' विकायचा प्रयत्न केला, पण त्या उद्योजकाने या करारास मान्यता दिली नाही.

२०११ मध्ये आयफोनवर 'पिंटरेस्ट'ची app उपलब्ध झाली.

त्यामुळे 'पिंटरेस्ट'च्या ग्राहकसंख्येत आणखीनच वाढ झाली. १६ ऑगस्ट २०११ रोजी 'टाइम' मासिकाच्या सर्वोत्तम ५० वेबसाइट्सच्या यादीत पिंटरेस्टचं नाव आलं. २०११ मध्येच आयफोन सोडून इतर मोबाइलधारकांसाठी 'पिंटरेस्ट'ची app उपलब्ध झाली. २०१२ च्या उत्तरार्धात 'टेक क्रंच' याद्वारे सर्वोत्तम स्टार्टअपच्या यादीतही 'पिंटरेस्ट'चं नाव आलं.

प्रत्येक उद्योजकाला अशा एका मार्गाची गरज असते ज्याला तो आपली 'बिझनेस स्ट्रॅटेजी' म्हणजेच उद्योगाचा पाया/आधारस्तंभ म्हणू शकेल.

'पिंटरेस्ट'चे याबद्दलचे विचार खूप स्पष्ट आहेत. 'पिंटरेस्ट'चा संस्थापक बेन सिलबरमन म्हणतो, "साधारणत: उद्योजकांना त्यांच्या यशस्वी उद्योगाचे गुपित विचारले की, त्यांनी आजतागायत जे काही केले त्याचा सारांश सांगतात, परंतु हे साफ चुकीचे आहे." 'पिंटरेस्ट'चंच उदाहरण घेऊ. 'पिंटरेस्ट'च्या यशाचं गुपित हे २००८ मधील कल्पनेपासून २०१६ मधील यशापर्यंतचे सर्व निर्णय नक्कीच नाही, तर 'पिंटरेस्ट'ने लोकांची आवड ओळखली. त्या आवडीला मूर्तस्वरूप दिलं.

पुढे त्या स्वरूपाला विकसित केले आणि ग्राहकांच्या दृष्टिकोनातून विचार करत करत 'पिंटरेस्ट'ला घडवलं. हे 'पिंटरेस्ट'च्या यशाचे गुपित म्हणता येईल.

'पिंटरेस्ट' हा एक ऑनलाइन उद्योग असल्याने याची सुरुवात करण्यासाठी फार मोठ्या गुंतवणुकीची गरज नव्हती. सुरुवातीला सिलबरमनने स्वत:च पैसे उभे केले. त्यानंतर 'पिंटरेस्ट' उभे करण्यासाठी त्यांना संस्थात्मक कर्ज (इन्स्टिट्यूशनल लोन) मिळालं.

त्यापुढे विविध गुंतवणूकदारांमार्फत वेळोवेळी 'पिंटरेस्ट'ला गुंतवणूक मिळत गेली. यात 'फर्स्ट मार्क कॅपिटल', जॅक अब्राहम (मिलो), मायकेल बर्च (बेबी), स्कॉट बेल्स्की (बेहांस), शाना फिशर (हायलाइन व्हेंचर पार्टनर), रॉन कॉन्वे (एस.व्ही. एंजल), केविन हार्टझ (इव्हेंट ब्राइट), जेरेमी स्टॉपलमन (येल्प), हँक विगिल, क्रिट्झ लानमान आणि ब्रायन एस. कोहन यांचा समावेश होता.

२०११ : जेरेमी लेवाईन आणि सारा टॅवेल यांकडून १० दशलक्ष डॉलरची गुंतवणुकीची सीरिज मिळाली.

(पुढे सारा टॅवेल पिंटरेस्टमध्ये समाविष्ट झाले)

२०११ : ऑक्टोबर, अँड्रीसन हॉरोविट्स यांच्या २७ दशलक्ष डॉलरच्या गुंंतवणुकीमुळे पिंटरेस्टची किंमत २० कोटी डॉलर इतकी झाली.

'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे वर्गणीदार व्हा!

आज, 'पिंटरेस्ट' ही जगातील सर्वोत्तम कल्पना एकाच ठिकाणी मिळणारी वेबसाइट झाली आहे. अनेक लोक इथे दर दिवशी त्यांचे विचार, नवीन कल्पना, चांगल्या सवयी, चांगले-वाईट अनुभव लोकांसोबत वाटत आहेत तसेच अनेक लोकांना या सर्वांचा घरबसल्या लाभ घेता येत आहे.

आपल्या मराठीत एक म्हण आहे. 'अति तेथे माती'.

त्याचप्रमाणे 'पिंटरेस्ट'चा संस्थापक बेन सिलबरमन आजच्या काळातील नवउद्योजकांना सांगतो, "कुणाकडूनही अति मार्गदर्शन घेत बसू नका. अनुभवातून शिका, परंतु त्यातच हरवून जाऊ नका. अशा फार कमी गोष्टी असतात ज्यावर तुमच्या उद्योगाचे यश अवलंबून असते. बाकी बर्‍याच गोष्टी असतात ज्याने तुमची अधोगती होऊ शकते."

'पिंटरेस्ट'चा एकूण प्रवास हा मवाळ होता.

त्याची सुरुवातही कोणत्या 'बँग'ने झाली नाही तसेच त्याचे संस्थापक कोणती मोठमोठाली भाषणे देत नाही. तरीसुद्धा 'पिंटरेस्ट' हे आज एका यशस्वी स्टार्टअपकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे जास्त प्रकाशझोतात न येता, शब्दांनी आवाज न करता यशाच्या तेजाने आज पिंटरेस्ट जवळजवळ जगभरात पसरले आहे आणि मजेशीर गोष्ट म्हणजे पिंटरेस्टचे ७९ टक्के वापरकर्ते या महिला आहेत.







by - https://m.dailyhunt.in/news/india/marathi/smart+udyojak-epaper-smtudy/vacha+pinterest+ya+soshal+midiyachi+startaap+katha-newsid-75929257

जीवनात यशस्वी व्हायचयं पहाटे 4:30 वाजता उठा...

जीवनात यशस्वी व्हायचयं पहाटे 4:30 वाजता उठा...

हिवाळ्याचे दिवस... अंगाला बोचणारी थंडी त्यात सकाळी उठणे म्हणजे कर्मकठीणच! "जेव्हा आळशी माणसं काम करीत असतात तेव्हा यशस्वी माणसं स्वतःच करीअर घडवत असतात." आपल्या आजूबाजूची यशस्वी व्यक्ती पहा आणि त्यांना विचारा... बाबा तुम्ही किती वाजता उठता??? त्यांचे उत्तर पहाटे 4:30 ते 5:00 या वेळेला अनुसरुनच असेल. आता काही उदाहरणे पाहू यात...

अक्षय कुमार... फिटनेस फ्रीक असलेला ॲक्टर आणि प्रोड्युसर अक्षय कुमारच्या दिवसाची सुरुवात पहाटे 4:30 वाजल्यापासून होते. दीड-दोन तास व्यायाम त्यानंतर सकाळी 7 वाजता हा पठ्ठ्या शुटिंगसाठी सर्वात आधी तयार असतो. बरं हा झोपतो रात्री 9 वाजता म्हणजे झोपही पूर्ण आणि कामही. म्हणूनच यशस्वी व्यक्तींच्या यादीत शिस्तबद्ध अक्षयचा क्रमांक येतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी... भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिवस पहाटे 5 वाजता सुरु होतो. ते फक्त पाच-सहा तासच झोप घेतात. दिवसातील एकूण तासांपैकी 18 ते 19 तास ते कामच करत असतात. म्हणूनच त्यांनी एक साधारण चायवाला ते पंतप्रधान असा असाधारण आणि यशस्वी प्रवास मोदी यांनी केला.


पहाटे 4:30 वाजता उठणा-यांच्या यादीमध्ये फक्त हे दोघंच नाहीत. टाटा समुहाचे रतन टाटा, सदीं के महानायक अमिताभ बच्चन, चीनचे अव्वल बिझनेसमन जॅक मा, मायक्रोसॉफ्टचे सर्वेसर्वा बिल गेट्स ते भारतीय कर्णधार विराट कोहली अशी ही भली मोठी यादी आहे...

आता आपण पाहू यात जीवनात यशस्वी होण्यासाठी पहाटे 4:30 वाजता उठणे का आवश्यक आहे...

1. यशाचं गुपित... पहाटे उठणे आणि आपल्या कामाला सुरुवात करणे, हेच यशस्वी व्यक्तींच्या यशाचं गुपित आहे. जगभरातील कोणतेही यशस्वी लोकं घ्या... बिझनेसमन असो, कलाकार असो किंवा राजकीय नेते असो. सर्वजन पहाटे लवकर उठतात आणि आपल्य कामाला सुरुवात करतात.


2. कामं पूर्ण होतात... संशोधक मांडतात की, सकाळी-सकाळी आपण ताजेतवाने असतो. जे काही काम असेल ते आपण लवकर लवकर आणि १०० टक्के योगदान देऊ पूर्ण करतो. म्हणूनच पहा अनेक बिझनेसमन त्यांच्या व्यवसायातील मोठे निर्णय सकाळच्या वेळेतच घेतात.

3. शांतता... सकाळच्या वेळेस जेव्हा तुम्ही काम सुरु करता तेव्हा आपल्या आजूबाजूला सर्वत्र शांतता असते. फोन नाही, घरच्यांचा आरडाओरडा नाही. अशा वातावरणात आपण आपले सर्वोत्तम काम करु शकतो. म्हणूनच सकाळचा वेळ आवश्यक आहे.


4. तुम्हीच लीडर आहात... जेव्हा तुम्ही पहाटे उठता तेव्हा अनेजजण झोपलेले असतात. अशावेळेस तुमच्याकडे सकारात्मकता येते आणि लीडरचा ऍडिट्यूड आपल्या मन आणि बुद्धी निर्माण होतो. पुढील दिवसभरातील सर्व निर्णय आपण लीडर आणि जिंकण्याच्या ऍडिट्यूडनेच घेतो.

तर मित्रांनो ही होती पहाटे 4:30 वाजता उठण्याची कारणे. तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचंय तर ही कारणं तुम्हीही अंगी बाणा आणि तुम्हीसुद्धा वर नमूद केलेल्या नावांप्रमाणे जीवनात यशस्वी व्हाल, हे नक्की!

यशाची पाच गुपित Five secrets of success...

यशाची पाच गुपित Five secrets of success...
यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. यश ही एक वृत्ती असते, घटना नसते. प्रत्येक धंद्यात आणि संस्थेत अशी परिस्थिती येत असते की जी हाताळायचे कौशल्य तुमच्यात असावे लागते. हे कौशल्य आपल्या आतून येते आणि त्या आतल्या जागेला मी 'अध्यात्मिक' म्हणतो.
यश मिळविण्यासाठी पाच गोष्टींची गरज असते:
1) अनुकूल वातावरण
2) कामातील कौशल्य
3) सिंह होणे
4) नशिबाचा एक अंश
5) ध्यान
अनुकूल वातावरण
शांतता आणि भरभराट या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. अस्वस्थ वातावरणात भरभराट होऊ शकत नाही. इतरांबरोबर काम करताना सुद्धा तुम्हाला संघभावनेने काम करावे लागते. त्तुम्च्या गटातील सर्वांशी आदराची भावना ठेवा आणि इतरांवर खापर फोडण्याच्या भानगडीत अडकू नका. आणि आणखी एक म्हणजे गटाच्या नेत्याने उत्सवाचे, विश्वासाचे, सहकार्याचे आणि आपलेपणाचे वातावरण ठेवावे. जर सगळे लक्ष फक्त उत्पादन आणि निव्वळ नफा यावर असेल तर काहीच होणार नाही. लोकांच्या मनात आतूनच स्फूर्ती निर्माण करणे हीच सर्वात परिणामकारक क्लुप्ती आहे.
कामातील कौशल्य
कर्माच्या फळामध्ये गुंतून न रहाणे हेच भगवद्गीतेचे सार आहे. जर एखाद्या युद्धजन्य परिस्थितीत तुम्ही तुमच्या मनाला सावरू शकत असाल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सांभाळून घेऊ शकता. कर्माच्या या कौशल्याला 'योग' म्हणतात. योगाच्या या कौशल्यामुळेच उद्धटपणा-आत्मविश्वासात, लीनता-नम्रतेत, परावलंबित्व-परस्परावलंबनाची जाणीव होण्यात आणि मर्यादित मालकीची भावना पूर्णत्वात,एकत्वाची भावना निर्माण होण्यात परिवर्तीत होते. काम करत असताना जर सगळे लक्ष जर फक्त अंतिम निकालावर असेल तर तुम्ही काम करू शकत नाही. फक्त जे काम करत आहात त्यात तुम्ही प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने १०० % द्या.
सिंह होणे
संस्कृतमध्ये एक म्हण आहे, “ ज्याच्याकडे सिंहासारखे धैर्य असेल त्याच्याकडे मोठी संपत्ती चालून येते.” आंत आणि बाहेर जाणाऱ्या श्वासाइतकेच आस्था आणि वैराग्य हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. तुम्ही श्वास आत घेता पण तो जास्त काळ आत रोखून धरू शकत नाही, तुम्हाला तो बाहेर सोडावाच लागतो. त्याचप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला आस्था असावी लागते तसेच सोडून देण्यासाठी वैराग्य असावे लागते. जेव्हा तुम्हाला भरभराटीची हाव नसते तेंव्हा ती तुमच्याकडे चालून येते.
नशिबाचा एक अंश
सुबत्ता प्राप्त होण्यासाठी जर केवळ स्वत:च्या मेहनतची गरज असेल तर असे अनेक लोक कां आहेत जे खूप मेहनत करतात पण त्यांची भरभराट होत नाही? ही अगम्य गोष्ट किंवा नशीब अध्यात्माने उचलून धरली आहे. सगळी भौतिक सृष्टी लहरींच्या एका नियमाने चालते जी आपल्याला दिसते त्यापेक्षा सूक्ष्म आहे. अध्यात्मामुळे बुद्धीला आणि अंतर्ज्ञानाला धार चढते. जेंव्हा तुम्ही आस्था आणि वैराग्य यात समतोल साधता तेव्हा तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त होते. फायद्याबरोबरच सेवा, गोष्टी मिळविण्यासाठीची धडपड आणि त्याच बरोबर समाजाला परत देण्यासाठीची करुणा. अंतर्ज्ञान म्हणजे योग्य वेळी योग्य विचार येणे आणि हाच व्यवसायात यश मिळण्यासाठी असलेला एक महत्वाचा घटक आहे.
ध्यान
तुमच्या जबाबदाऱ्या आणि ध्येय जितके मोठे तितकी तुम्हाला ध्यान करण्याची जास्त गरज असते. प्राचीन काळी ध्यान हे आत्म्याच्या शोधासाठी, सिद्धी प्राप्त होण्यासाठी आणि दु:ख आणि त्रासावर मात करण्यासाठी वापरले जायचे. आजच्या काळात मनावरचा ताण,समाजातील तणाव यासाठीही ध्यान करावे लागते. करायचे खूप असते आणि वेळ थोडा असतो आणि तेवढी शक्ती नसते.
तुम्ही तुमच्या कामाचा भारही कमी करू शकत नाही आणि वेळही वाढवू शकत नाही. पण तुम्ही तुमची शक्ती, ऊर्जा वाढवू शकता. ध्यानामुळे तुमचे तुमचा ताण तणाव नाहीसा होतो इतकेच नाही तर तुमच्या क्षमताही वाढतात, तुमची मज्जासंस्था आणि मन बळकट होते.शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा होतो आणि सर्व प्रकारे तुमचे तेज वाढते. आपण जड मूलतत्व आणि चैतन्य या दोन्हीपासून बनलो आहोत. शरीराच्या काही भौतिक गरजा असतात आणि आपल्या आत्म्याचे पोषण अध्यात्माने होते. सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदाने बहरून जाणे, आत्मविश्वास, करुणा,उदारपणा आणि कोणीही घालवू शकणार नाही असे स्मित हास्य हीच यशाची खूण आहे. जीवनात काहीही झाले तरी या गोष्टी तुम्ही टिकवू शकलात तर तुम्ही खऱ्या अर्थाने यश मिळवले आहे.
पोस्ट आवडल्यास कृपया या पेजला लाईक करा आणि इतरांनाही शेअर करून प्रेरणा द्या...






सौजन्य: श्री श्री रविशंकरजी महाराज आणि आर्ट ऑफ लिव्हिंग डॉट ओआरजी

यश...

यश

मनाशी एखादी कल्पना ठरवा. त्यानंतर तुमचं सारं आयुष्य त्या कल्पनेच्या पूर्ततेसाठी झोकून द्या. मनात फक्त तिचाच विचार असू दे. स्वप्नातही तीच दिसू दे. तुमच्या जीवनाच्या


मनाशी एखादी कल्पना ठरवा. त्यानंतर तुमचं सारं आयुष्य त्या कल्पनेच्या पूर्ततेसाठी झोकून द्या. मनात फक्त तिचाच विचार असू दे. स्वप्नातही तीच दिसू दे. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात ती असू दे. तुमच्या शरीराचा अणू-रेणू त्याच ध्येयाने पछाडलेला असू दे. बाकी साऱ्याचा विचारही सोडून द्या. यशाचा मार्ग हाच आहे. 
स्वामी विवेकानंद
* जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमची यशासाठीची तळमळ अपयशाच्या भीतीपेक्षा कित्येक पटीनं जास्त हवी.
     बिल कॉस्बी, अभिनेते, लेखक 
* ज्यांच्यात प्रचंड अपयश पचवण्याची धमक असते, तेच भव्यदिव्य यश संपादन करू शकतात.
     रॉबर्ट एफ. केनेडी, राजकीय नेते
* यश संपादन करताना काय काय गोष्टी तुम्ही गमावून बसलात, काय काय गोष्टी तुम्हाला सोडून द्याव्या लागल्या, याचा विचार करा आणि त्यावरच यशाचं मोजमाप करा.
     दलाई लामा, तिबेटी धर्मगुरू
* कधीच चुका न करणं म्हणजे यश नाही; तर एकच चूक दुसऱ्यांदा न करणं ही गोष्टच तुम्हाला यशप्राप्तीकडे घेऊन जात असते.
     जॉर्ज बर्नार्ड शॉ, प्रसिद्ध नाटककार
* अपयश? छे! मी कधीच अपयशी ठरत नाही. माझ्या अवतीभवतीचे लोक माझ्यापेक्षा जरा जास्ती यशस्वी ठरतात, इतकंच!
     कॅरोल ब्रायन (प्राध्यापक, लेखिका)
* आयुष्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या! एक म्हणजे दुर्लक्ष करायला शिकणं आणि दुसरी आत्मविश्वास बाळगणं. एवढं जमलं की मग यश निश्चित!
     मार्क ट्वेन, प्रसिद्ध लेखक 
* यशस्वी व्यक्ती कोणती? तर जिच्यावर समाजाने फेकलेल्या टीकेच्या दगडविटांतूनच एक पक्का, भक्कम पाया जिला बनवता येतो ती व्यक्ती!
     डेव्हिड ब्रिन्कले, पत्रकार
* यश हा एक प्रवास आहे. ते केवळ अंतिम ठिकाण किंवा साध्य नव्हे.
     बेन स्वीटलँड, लेखक
* एखादी व्यक्ती आयुष्यात कोणत्या पदावर जाऊन बसली किंवा तिनं काय मिळवलं यावर तिचं यश मोजू नये, हे मी शिकलोय. यश मिळवण्यासाठी तिने जे प्रयत्न केले, ते करताना तिला कोणत्या अडथळ्यांना सामोरं जावं लागलं, ते कसे दूर केले यावर तिचं यश मोजलं जावं.
     बुकर टी. वाँशिग्टन, प्रसिद्ध लेखक, वक्ता व नेता
* जर योग्य मानसिक दृष्टिकोन असेल तर अंतिम साध्य गाठण्यास, यशस्वी होण्यास माणसाला कोणीही अडवूच शकणार नाही. तो यश मिळवणारच. पण मानसिक दृष्टिकोनच जर चुकीचा असेल तर त्याला कोणी यश मिळवूनही देऊ शकणार नाही हे निश्चित!
     थॉमस जेफर्सन, अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष 
* अपयशामागून अपयशाचा सामना करत तेवढय़ाच उत्साहाने सतत वाटचाल करत राहणं हाच यशप्राप्तीचा मार्ग असतो.
     विन्स्टन चíचल, ब्रिटनचे माजी पंतप्रधान
* अपयशातूनच यशाचा मार्ग चालत राहा. मनोधर्य खच्ची होणं आणि अपयश हे दोन्ही यशाचे खात्रीशीर ‘स्टेपिंग स्टोन्स’ आहेत.
     डेल कान्रेजी, प्रसिद्ध लेखक
* प्रत्येक यशाची गुरुकिल्ली एकच! ती म्हणजे कृती करत राहणं.
     पाब्लो पिकासो,  चित्रकार
* यश मिळवणं? अगदी सोपी गोष्ट आहे ही! फक्त योग्य वेळी, योग्य प्रकारे योग्य ती कृती करत राहा.
     अरनॉल्ड ग्लासो, प्रसिद्ध उद्योजक
* यश म्हणजे काय? मला वाटतं यश हे अनेक विचारांचं अजब मिश्रण असतं. तुम्ही जे करताय, तेवढंच पुरेसं नाही, तुम्हाला आणखी कष्ट करायला हवेत आणि या सगळ्यात काहीतरी प्रयोजनही नक्की हवं. यश या साऱ्या विचारातून घडत जातं.
     मार्गारेट थॅचर, ब्रिटनच्या माजी पंतप्रधान
* तुम्हाला यश मिळवायचं असेल तर यशस्वी होण्याचं अंतिम ध्येय मनाशी बाळगू नका. फक्त तुम्हाला जे करायला आवडतं ते मनापासून करत राहा. त्यावर विश्वास ठेवा. यश आपोआप मिळेलच.
     नॉर्मन विन्सेन्ट पील, ‘पॉझिटिव्ह िथकिंग’ विषयक पुस्तकांचे लेखक
* सहजसोप्या आणि निवांत पद्धतीने व्यक्तिमत्त्व घडत नसतं. प्रचंड कष्ट, अडचणी, त्रास यातूनच आत्मा कणखर बनत जातो. अविचल दृष्टी लाभते, महत्त्वाकांक्षा फुलतात आणि यश मिळत जातं.
     हेलन केलर
* तुम्हाला अमुक एक गोष्ट चांगली आहे किंवा तमुक गोष्टीवर विश्वास ठेवा असं सांगितलं गेलं, तरी तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला स्वतला जे ठाऊक आहे ते जास्त महत्त्वाचं असतं. त्यावर जेव्हा विश्वास ठेवता तेव्हाच तुमचं तुम्ही भव्य स्वप्न साकारण्याच्या मार्गावर पाऊल ठेवता. यशाचा आविष्कार तुमच्या आतूनच होत असतो.
     राल्फ वाल्डो इमर्सन, लेखक व कवी
* आपल्या प्रत्येकाच्या स्वतच्या अशा खास इच्छा असतात. प्रत्येकाच्या बोटांचे ठसे जसे वेगळे आणि खास तशाच त्या वेगळ्या असतात. यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तुम्हाला काय आवडतं, तुमचं कशावर प्रेम आहे, याचा शोध घेणं. त्यानंतर इतरांना सेवा म्हणून ते उत्तम प्रकारे देऊ करणं, खूप कष्ट करणं आणि या विश्वातल्या ऊर्जेच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन करणं.
     ऑप्रा विन फ्रे, टीव्ही शो अ‍ॅन्कर, सामाजिक कार्यकर्त्यां
* सामान्य गोष्टी असामान्य पद्धतीने उत्तम करणं हेच यशप्राप्तीचं गुपित आहे.
     जॉन डी. रॉकफलेर, प्रसिद्ध उद्योगपती व विचारवंत
* एखादी नवी गोष्ट तुम्ही करायला घेतली की प्रथम लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, नंतर तुमची खिल्ली उडवतील, मग तुमच्याशी भांडतील. त्यानंतर अखेरीस तुम्ही जिंकता.. त्यानंतरच तुम्हाला यशस्वी मानलं जाईल.
     महात्मा गांधी, राष्ट्रपिता
* अपार कष्ट आपल्या कामाप्रती अविचल निष्ठा आणि आपण जिंकू किंवा अपयशी ठरू याची तमा न बाळगता आपल्या कामात १०० टक्के झोकून देण्याचा, पूर्ण शक्ती लावून ते काम करण्याचा निश्चय या गोष्टीतूनच यश साकारत जातं. म्हणूनच यशस्वी व्यक्ती आणि इतरांच्यातला फरक काय? इतरांकडे क्षमता नसतात, ताकद नसते किंवा ज्ञान नसते असं नाही. पण यशस्वी व्यक्तींमध्ये जी आंतरिक तळमळ आणि इच्छा असते, त्याची कमी इतरांमध्ये असते.
     विन्सेट (विन्सी) लोम्बार्डी, ख्यातनाम फूटबॉलपटू
* यशाची ‘रेसिपी’: नम्रता अंगी असावी, जे काम तुमच्यावर सोपवलंय, ते पार पाडण्याची मानसिक तयारी असावी, उत्साही व व्यवस्थित राहावं. कधीही कुणाबद्दल द्वेषभावना नसावी, नेहमी प्रामाणिक राहा. तरच तुम्ही इतरांशी प्रामाणिकपणे वागू शकाल, इतरांच्या मदतीला तत्पर राहा, स्वतच्या कामात रस घ्या, कधी स्वतला इतरांच्या नजरेत दयनीय बनवू नका, इतरांची स्तुती करण्यात तत्परता दाखवा. मत्रीत निष्ठा असू द्या, पूर्वग्रह झटकून टाका, स्वतंत्र वृत्ती अंगी बाणवा.. 
     बनॉर्ड बॅरूच, अर्थतज्ज्ञ व राजकीय सल्लागार
* समाजाला हितकारक ठरतील अशा कृती करणं आणि त्या प्रक्रियेचा आनंद घेणं म्हणजे यश! यावर तुमचा विश्वास असेल, अन् ही व्याख्या तुम्ही मनापासून स्वीकारत असाल, तर ‘यश’ तुमचंच आहे.
     केली किम








by - loksatta

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१९

थाॅमस आल्वा एडिसन व स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनातील यशाचे गुपित (प्रेरणादायी विचार)

थाॅमस आल्वा एडिसन व स्टीव्ह जॉब्स यांच्या जीवनातील यशाचे गुपित (प्रेरणादायी विचार)

रविवार, ८ सप्टेंबर, २०१९

निक व्युजेसिक – हात पाय नसून सुध्दा आयुष्याला कवेत घेणारा मोटिवेशनल स्पीकर...

निक व्युजेसिक – हात पाय नसून सुध्दा आयुष्याला कवेत घेणारा मोटिवेशनल स्पीकर

माझ्याबद्दल