बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१८

हत्तीच्या शक्ती वाले यसाजी कंक ज्यांच्यासमोर बलाढय हत्तीदेखील हरला चला जाणून घेऊ या?


एकदा महाराज गोवळकोंड्याला निघाले होते महाराज पालखीत बसले मागेपुढे सैनिक आणि अचानक पालखी थांबली महाराजांना काही कळेना महाराजांनी पालखीचा पडदा उघडला आणि पहातात काय चारी बाजूला  वाळवंट महाराजांनी शिलेदाराला विचारले पालखी का थांबली आहे शिलेदार म्हणाला गोवळकोंड्याचा बादशहा कुतुबशहा आलेला आहे महाराजांना प्रश्न पडला गोवळकोंडा तर इथून शेकडो मैल लांब आहे तर कुतुबशहा इथे कसा  येईल महाराजांनी बघितले कुतुबशहा स्वतः तिथे होता महाराजांनी त्याला विचारले बादशहाची तुम्ही इथे कसे कुतुब्शहा  बोलला महाराष्ट्राचा जानता राजा स्वतः आमच्या भेटीला येत आहे तर आम्ही आमच्या मातीत त्यांचे पाय स्पर्श होण्याआधी आमच्या माथ्याला स्पर्श करणार आहे
व कुतुबशहाने महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्याच्या साम्राज्यात नेली नंतर कुतुबशहा महाराजांना त्यांचेच साम्राज्य दाखवण्यासाठी निघाला तो म्हणाला महाराज हे बघा आमची हत्ती शाळा ही ते आमचे हत्ती ठेवले जातात महाराज बघतच राहिले एवढा मोठा हत्ती आपल्या डोळ्यात मावत नाहीत लाखो असे  हत्ती तिथे रांगेत उभे होते कुतुबशहाने महाराजांना विचारले तुमच्याकडेही असे  हत्ती असतीलच की महाराजांना मनात असा विचार पडला की आमचे येथे  सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हत्तीसारखा प्राणी राहू शकत नाही महाराज म्हणाले आमच्याइथे असे हत्ती तर नाही पण हत्तीसारखी माणसं आहे कुतुबशहा त्याचाही पुढचा तो म्हणाला येताना हत्ती सारखा माणूस आणला का कोणी शिवाजी महाराजांच्या शेजारी येसाजी कंक उभे होते महाराज म्हणाले हाही त्यातलाच आहे कुतुबशहा मनाला हा येसाजी हत्तीचा शक्तीचा तर तुमच्या सेनापती बरोबर आमच्या हत्तीची लढाई लाउ ते ऐकल्यानंतर येसाजी पुढे आला आणि म्हणाला महाराज आज्ञा द्यावी यशाची आणि हत्तीची टक्कर सुरू झाली यसाजी समोर मोठा बलाढ्य हत्ती आला आणि सगळे माणसे यसाजीला म्हणू लागली माघार घे नाहीतर मारला जाशील पण यसाजी मैदानात उतरला होता आणि हत्ती आणि येसाजी चे युद्ध सुरू झाले होते हत्तीने यसाजीला सोंडेत पकडले आणि सगळेजण असे म्हणू लागले आता येसाजी संपला पण तेवढ्यात एक मोठा आवाज आला सण असा आणि एवढा मोठा बलाढ्य हत्ती खाली पडला येसाजी जिंकला होता आणि ते बघून कुतुबशहाने त्याच्या गळ्यातील मोत्याची माळा काढून त्याच्यासमोर दिली आणि म्हणाला येसाजी घे तुझे बक्षीस ते ऐकून येसाजी मागे सरकला आणि म्हणाला माझे कौतुक करायला माझे महाराज समर्थ आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल