गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

शिवाजी महाराज शाकाहारी होते कि मांसाहारी? पहा शिवाजी महाराज हयात असताना लिहलेल्या पुस्तकात ‘श्री शिवभारत’ आणि इंग्रजांनी काय लिहलंय

शिवाजी महाराज शाकाहारी होते कि मांसाहारी? पहा शिवाजी महाराज हयात असताना लिहलेल्या पुस्तकात ‘श्री शिवभारत’ आणि इंग्रजांनी काय लिहलंय

छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना कवी परमानंद यांनी ‘श्री शिवभारत’ हे समकालीन चरित्र लिहलं त्याची नवीन आवृत्ती बाजारात आजही उपलब्ध आहे. ह्या पुस्तकात काय लिहलंय तो संदर्भ घेऊन आणि जेंव्हा शिवाजी महाराज्यांचा राज्याभिषेकावेळी थॉमस निकोलस आणि हेन्री ऑक्सिनेंन या दोन इंग्रज अधिकाऱ्यांना बोलावून संपूर्ण राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन लिखित स्वरूपात लिहण्यात आले त्यात काय लिहलंय ते पाहुयात.
छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाच्या १५ दिवस पूर्वी महाराज्यांनी हा संपूर्ण सोहळा लेखीस्वरूपात मांडावा म्हणून दोन इंग्रज अधिकाऱ्यांना रायगडावर बोलावून घेतले त्याची नावे थॉमस निकोलस आणि हेन्री ऑक्सिनेंन. ज्यावेळी ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना मांसाहार करायची इच्छा व्हायची तेंव्हा गडाच्या पायथ्यावरुन तो मांसाहार शिजवून आणला जायचा. गडावर कधीही कोणी मांसाहार करत नसे इतकेच नव्हे तर गडावर तो शिजवलाही जात नसत अशी नोंद आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना कवी परमानंद यांनी ‘श्री शिवभारत’ हे समकालीन चारित्र लिहलं. ह्या चरित्रात कवी परमानंदाने असं लिहलंय कि शिवाजी महाराज हे “मितआहारी” आहेत. मितआहारी याचा अर्थ शाकाहारी असा होतो. त्यामुळे शिवाजी महाराज हे शाकाहारी होते हे सिद्ध होते.

इतकेच नव्हे तर शिवाजी महाराज्यांचे गुरु संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी महाराज्यांच्या मावळ्यांना प्रेरणा म्हणून ज्या ओव्या आणि अभंग रचले त्यातही असा उल्लेख आहे कि मावळ्यांनी निर्व्यसनी आणि शाकाहारी असायला हवे.









by - http://bolkyaresha.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल