गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

डावखुरे इतके दुर्मिळ का असतात?

 डावखुरे इतके दुर्मिळ का असतात?

सचिन तेंडुलकर तसा तर राईट हँडेड बॅट्समन आहे पण तो डाव्या हाताने लिहितो.
लहान असताना जेव्हा आपण हाती खडू घेऊन कागदावर रेषा ओढायला सुरू करतो तेव्हाच स्पष्ट होतं की आपण डावखुरे होणार का उजवे होणार? पण आपला कुठलाही एकच हात जास्त प्रभावी का असतो? आणि डावखुरे लोक अल्पसंख्याक का असतात?
The Curious Cases of Rutherford & Fry या BBC Radio 4च्या मालिकेसाठी मी आणि अॅडम रुदरफोर्डने याचं उत्तर शोधण्याचं ठरवलं. पण नंतर आमच्या लक्षात आलं की यासाठी एक नाही तर अनेक प्रश्नांची उत्तरं शोधावी लागणार आहेत.
मला हे कधीच माहीत नव्हतं की आपलं शरीर एका बाजूला अधिक झुकतं माप देतं. डोळ्यांचंच उदाहरण घ्या. जसं हातांचं असतं तसंच डोळ्यांचंसुद्धा असतं. तुमचा कोणता डोळा जास्त प्रबळ आहे, हे ठरवण्यासाठी साधी आयडिया करता येईल.
कुठलाही एक हात लांब करा आणि त्याचा अंगठा वर करा. आधी दोन्ही डोळ्यांनी अंगठ्याकडे पाहा. त्यानंतर एक डोळा बंद करून पाहा. ज्या डोळ्याने पाहताना अंगठा अधिक जवळ दिसेल, तुमचा तो डोळा जास्त प्रबळ असतो.
हे कानाबद्दलही आहे. तुम्ही फोनवर बोलताना सहजपणे कोणता कान वापरता? कधी विचार केलाय की तुम्ही फोन कुठल्या बाजूला पकडता, यासाठी हातावर पडणाऱ्या ताणाऐवजी कानाची ऐकण्याची क्षमताही कारणीभूत असेल म्हणून.
डावखुरे
अशी असमानता पाहणं मोठं गमतीचं असतं. आपल्या शरीराच्या नैसर्गिक क्षमता वापरण्याचा हा प्रयत्न असतो.
सर्वसाधारणपणे 40 टक्के लोक डाव्या कानांचे, 30 टक्के लोक डाव्या डोळ्यांचे आणि 20 टक्के लोक डाव्या पायांचे असतात. पण हाताचा विचार केला तर फक्त 10 टक्के लोक डावखुरे असतात.

पण डावखुरे एवढे अल्पसंख्याक का?

पूर्वीच्या काळी डावखुऱ्यांना 'ते सामान्य नाहीत' म्हणून खूप हिणवलं जायचं, कमी लेखलं जायचं. याची सुरुवात शाळेतूनच व्हायची. त्यातूनच Left किंवा डावा या शब्दाला नकारात्मक छटा आली.
Left हा शब्द अँग्लो-सॅक्सन Lyft पासून आला आहे, ज्याचा अर्थ दुबळा असा होतो. Lyft चा विरुद्धार्थी लॅटिन शब्द म्हणजे dexter, ज्याचा अर्थ कौशल्य असा आहे.
डावखुरे
मग आपलं डावखुरे असणं किंवा उजव्या हाताचे असणं, हे नेमकं ठरतं कसं? उत्क्रांतीच्या दृष्टीतून पाहिलं तर वेगवेगळ्या कामांसाठी कुठल्याही एकाच हाताला सक्षम बनवणं जास्त चांगलं. मानवाचे पूर्वज मानले जाणारे चिंपांझीसुद्धा वेगवेगळ्या कामांसाठी त्यांचा आवडता हात वापरतात.
चिंपांझींना वाळवी खातांना कधी पाहा. चिंपांझी योग्य अशी एक काडी घेऊन ती वाळवीत घुसवतो आणि किती वाळवी आहे याचा अंदाज घेतो. त्यानंतर तो वाळवीवर ताव मारतात. अशा प्रकारे ते सुद्धा कुठल्या तरी एकाच हाताचा वापर करतात.
पण शास्त्रज्ञांनी जेव्हा जंगलातील चिंपांझींचं निरीक्षण केलं तेव्हा त्यांना त्यांपैकी 50 टक्के चिंपांझी डावखुरे दिसून आले तर उर्वरित 50 टक्के उजव्या हाताचे होते. मग मानवांमध्ये डावखुऱ्यांचं प्रमाण 10 टक्क्यांवर कसं आणि का आलं?
अमिताभ बच्चनही डावखुरे आहेतImage copyrightAFP / GETTY IMAGES
प्रतिमा मथळाअमिताभ बच्चनही डावखुरे आहेत
याचं उत्तर निअँडरथल काळातल्या माणसांच्या दातात सापडू शकतं. निअँडरथल हुशार होते पण ओबडधोबड होते. आपले हे पूर्वज मटणाचे मोठाले तुकडे दातात पकडायचे आणि चाकूसारखं धारदार शस्त्र एका हातात पकडून हे मांस तोडायचे. यासाठी त्यांना दाताने मासाला हिसडा मारावां लागायचा.
निअँडरथलच्या दातांवरील खड्ड्यांचा अभ्यास केला तर ते कोणत्या हाताने शस्त्र पडकत असतील, हे अंदाज लावता येतो. यामध्ये डाव्या हाताचं प्रमाण 10 पैकी 1 असं आढळून आलं. आणि हेच प्रमाण आजही आहे.
डावखुरे
डावखुरं असणं किंवा उजवं असणं, हे जनुकांशी संबंधित आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. पण नेमक्या कोणत्या जनुकांवर हे अवलंबून आहे, हे मात्र अजून समजलेलं नाही. जवळपास 40 वेगवेगळे जीन्स याच्याशी संबंधित असतील, असं म्हटलं जातं. म्हणजेच डावखुरेपणाच नेमकं कारण अजूनही समजलेलं नाही, असं म्हणता येईल.
पण डावखुरं असण्याचा माणसाच्या जीवनावर काही परिणाम होतो का?
डावखुरेImage copyrightGETTY IMAGES
डावखुरं असण्याचा मेंदूशी काय संबंध आहे, यावर बऱ्याच वर्षं वादविवाद सुरू आहेत. मेंदूचा उजवा भाग शरीराची डावी बाजू नियंत्रित करतं आणि डावा भाग उजवी बाजू नियंत्रित करतं. म्हणजेच डावखुरं असणं म्हणजे मेंदूच्या रचनेवर मोठा परिणाम करणारं असतं.
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनमधील मानसशास्त्रज्ञ ख्रिस मॅकमॅनस यांनी Right Hand, Left Hand हे पुस्तक लिहिलं आहे. ते म्हणतात, "ज्या पद्धतीने डावखुऱ्या व्यक्तींच्या मेंदूची मांडणी असेत, ती फार वैविध्यपूर्ण असते. माझं वैयक्तिक मत असं आहे की डावखुरे लोक जास्त बुद्धिमान असतात आणि उणिवांनाही तोंड देतात. जर तुम्ही डावखुरे असला तर तुमच्या मेंदूची रचनेत किंचित बदल असल्याचं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे इतरांकडे नसणारी कौशल्य तुमच्याकडे असतात."
अर्थात सर्वांनाच हे मान्य नाही. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधील डेव्हल्पमेंटंल न्युरोसायकॉलॉजीचे प्रा. डॉरथी बिशप म्हणतात, "मी स्वतः डावखुरा आहे. मी इतरांपेक्षा वेगळा का आहे, असं मला नेहमी वाटत होतं. डावखुरेपणाचा ऑटिझम आणि डिसलेक्सियाशी संबंध जोडणारे आणि 'आर्किटेक्ट आणि संगीतकार डावखुरे असतात', असं सांगणारे अनेक दावे झाले केले जातात.
डावखुरे
पण डाऊन सिंड्रोम, इपिलेप्सी आणि सेरेब्रल पाल्सी, अशा दुर्मिळ व्याधींचा अभ्यास केला तर त्यात डावं-उजवं प्रमाण 50 : 50 असून ते 1 : 10 नाही, हे त्यांनी मान्य केलं. बिशप म्हणतात डावखुरे असणं हे लक्षण आहे.
त्या म्हणाल्या, "काही न दिसणाऱ्या स्थिती डावखुरे असण्याचं लक्षण असू शकतात. पण डावखुरं असण्यामुळं काही समस्या निर्माण होऊ शकत नाही. पण सर्वसाधारणपणे बुद्धिमत्तेच्या विकासात याचा फार काही लक्षणीय संबंध असतो, असं नाही."
हा वाद असाच सुरू राहील आणि खरंतर यावर बरंच संशोधन होणं बाकी आहे. समस्येचं एक कारण असंही आहे की संशोधक जेव्हा वर्तणुकीच्या अनुषंगाने संशोधन करत असतात तेव्हा उजव्या हाताच्या व्यक्तींचाच जास्त अभ्यास होतो. आणि डावखुऱ्यांना फक्त त्यांच्याशी संबंधित संशोधनातच सहभागी करून घेतलं जातं.
डावखुरे
मी गरोदर असतानासुद्धा मला माहिती होतं की माझं बाळ डावखुरं असेल की उजवं. त्यासाठी क्विन्स विद्यापीठातील संशोधक पीटर हेप्पर यांच्या संशोधनाचा आधार घेता येऊ शकतं. गर्भातील अर्भकांचे अल्ट्रासाउंड घेऊन त्यांनी काही अभ्यास केले आहेत. जे अर्भक डावा अंगठा चोखत होते ते मोठेपणी डावखुरे तर जे उजवा अंघठा चोखत होते ते मोठेपणी उजवे झाले, असं त्यांना दिसून आलं आहे.
त्यामुळे माझं बाळ मोठ होऊन हाती क्रेयॉन घेईपर्यंत तो उजवा की डावखुरा, हे समजण्याची मला वाट पाहावी लागणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल