गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

डावखुऱया प्रतिभावंताचे लोटलीत संग्रहालय ...


प्रतिनिधी/ मडगाव
ंंंडावखुऱया व्यक्ती या खऱया अर्थाने प्रतिभावंत असतात, जगातील पाच टक्के लोक जे गर्भ श्रीमंत आहेत. ते सर्व डावखुरे आहेत. डावखुऱया व्यक्तींनी सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे पालकांनी आपली मुले डावखुरी असली तरी न्युनगंड बाळण्याचे कोणतेच कारण नसल्याचे उद्गार कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी काढले.
लोटली येथील बिग फूटमध्ये जगातील पहिल्या वहिल्या डावखुऱया प्रतिभावंतांच्या संग्रहालयाच्या उद्घाटन सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर या इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबचे संदीप विष्णोई, बिग फुटचे महेंद्र आल्वारीस तसेच पत्रकार राजू नायक उपस्थित होते.
काल 13 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा केला जातो, या दिनाचे औचित्य साधून या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या संग्रहालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी, चार्ली चॅप्लिन, रतन टाटा, अल्बर्ट आइन्स्टाइन, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, मर्लिन मन्रो, मेरी कोम, आशा भोसले, बराक ओबामा, बिल गेट्स, युवराज सिंग व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळाचा समावेश आहे. या ठिकाणी 100 जणांचे पुतळे उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
वाचन व दोन्ही मेंदूचा वापर करा
माणसाला दोन मेंदू असतात एक उजवा व डावा. या दोन्ही मेंदूचा वापर करणे खुप महत्वाचे आहे. दोन्ही मेंदूचा वापर होतो किंवा ते कार्यरत होतात, तेव्हा ती मुले सर्व सामान्य मुलांपेक्षा हुषार होतात हे वैद्यानिक दृष्टय़ा स्पष्ट झाले आहे. तेव्हा मुलांना दोन्ही मेंदूचा वापर करण्यास शिकवा, त्यासाठी दोन्ही हाताचा वापर करणे महत्वाचे आहे. त्याच बरोबर वाचनावर भर द्यावा. ज्याला वाचनाची आवड असते, ती व्यक्ती कोणत्याही संकटावर किंवा परिस्थितीवर मात करू शकते असे मत त्यांनी मांडले.
डावखुऱया व्यक्ती संदर्भात न्युनगंड बाळगला जातो किंवा गैरसमज तरी करून घेतले जातात. पण, डावखुऱया व्यक्ती बद्दल गैरसमज करून घेऊ नये व न्युनगंड देखील बाळगू नये. कारण याच व्यक्ती प्रतिभावंत असतात असे श्री. गावडे म्हणाले.
यावेळी संदीप बिष्णोई यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, डावखुऱया व्यक्तीची माहिती सर्वासमोर जाणे महत्वाचे असल्याने इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबची स्थापना केल्याची माहिती दिली. गोव्यातच सुरू करण्यात आलेल्या या क्लबमध्ये सुरवातीला अवघेच सदस्य होते. आज ही संख्या प्रचंड मोठी झाली आहे. गोव्यातच जवळपास 3 लाख लोक डावखुरे असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी डावखुऱया मुलांना आयोजकांनी प्रशिस्तीपत्रके तसेच स्कूल बॅग देऊन गौरविले. तसेच इंडियन लेफ्ट हँडर्स क्लबच्या नवीन ऍपचेही लाँचिंग करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल