शेतक-याचे उत्पन्न दुप्पट व्हावे हे ध्येय सरकारने पुढच्या पाच वर्षासाठी ठेवले आहे या दृष्टीने शासकिय योजनाही राबविण्यास सुरुवात झाली आहे, असे असले तरी आता आपण शेतक-यांनीही त्यादिशेने पाऊल टाकणे आवश्यक आहे.
शेतीच्या उत्पादन वाढावे या हेतुने पुढील घटक महत्वाची भुमिका बजावू शकतात त्यामधे,
- शेतीविषयक असणारे तांत्रिक ज्ञान
- चांगल्या दर्जाचा निविष्ठा (शेतीसाठी लागणा-या आवश्यक गोष्टी)
- उत्पादन पिकाला योग्य भाव व बाजारपेठ
- भांडवलाची उपलब्धता
सर्व व्यापारी तसेच राष्ट्रियकृत बॅंका यांना एकुण कर्जाच्या ४० % कर्ज हे पायाभुत क्षेत्र म्हणजेच कृषी, लघु, कुटिरोद्योग क्षेत्र, शिक्षण, गृह कर्ज व निर्यात उद्योग यांना देणे बंधनकारक असते त्यातही किमान १८% हे शेतीक्षेत्राला देणे अनिवार्य आहे.
असे असले तरीही हे ४०% कर्जाचे वाटप करताना बॅंकांची खरोखरच दमछाक होते. याचे कारण म्हणजे कृषी कर्जपुरवठ्याविषयी असलेली उदासीनता.
अनेक शेतकरी कर्ज घेण्याच्या फंदातच पडत नाहीत, तर काही शेतकरी कर्जासाठी लागणारी यादी बघुनाच गांगरुन जातात व नंतर त्याची पुर्तता करण्यामध्येच त्यांची दमछाक होते, कालांतराने कर्जाची वाटच ते सोडुन देतात. सद्यस्थितीत एकुण शेतक-यांच्या जवळपास २५% शेतकरीच कर्जाचा लाभ घेतात. यासाठीच शेती कर्जाचा अभ्यास करुन मगच कर्जाचा अर्ज करावा.
सोप्या शब्दात सांगायचं तर कर्जाच्या उपयोगावरुन कर्जाचे प्रकार पडतात, म्हणजेच
1.किसान क्रेडिट कार्ड /पिक कर्ज:
पिक उत्पादनाच्या दैनंदिन गरजांसाठी कर्ज घ्यायचे असल्यास त्याला पिक कर्ज किंवा किसान क्रेडिट कार्ड असे म्हणले जाते.या कर्जामध्ये बॅंकेकडुन आपल्याला मिळणा-या रकमेची मर्यादा ठरवली जाते. हे कर्ज एका वर्षाने एकदम फेडावे लागते.या कर्जासाठी उभे पिक तारण ठेवले जाते तसेच काही बॅंकांमध्ये जमिनही तारण/बोजा ठेवला जातो.
अ) कर्जदार व जामीनदारांचा “सात-बारा” उतारा, ८ अ चा उतारा, फेरफार उतारा.
ब) पीक लागवडीसंदर्भात तलाठ्याचे प्रमाणपत्र. (ऊस पीक असल्यास कारखान्याचे लागण पत्र)
क) शेतीसंदर्भात सविस्तर अहवाल. (आजपर्यंतच्या उत्पन्नाचा तपशील. आगामी तीन वर्षांचे अंदाजपत्रक.)
ड) अन्य बॅंका, सहकारी बॅंका व पतसंस्थांचा बेबाकी दाखला.
ई) जमिनीचे अद्ययावत किमतीसंबंधी प्रमाणपत्र व जमिनीवर कोणताही बोजा नसल्याचा दाखला.
- प्रकल्पासाठी कर्ज / टर्म लोन:
अ) कर्जदार व जामीनदारांचा “सात-बारा” उतारा, ८ अ चा उतारा, फेरफार उतारा.
ब) पीक लागवडीसंदर्भात तलाठ्याचे प्रमाणपत्र. (ऊस पीक असल्यास कारखान्याचे लागण पत्र)
क) शेतीसंदर्भात सविस्तर अहवाल. (आजपर्यंतच्या उत्पन्नाचा तपशील. आगामी तीन वर्षांचे अंदाजपत्रक.)
ड) अन्य बॅंका, सहकारी बॅंका व पतसंस्थांचा बेबाकी दाखला.
इ) जमिनीचे अद्ययावत किमतीसंबंधी प्रमाणपत्र व जमिनीवर कोणताही बोजा नसल्याचा दाखला.
ई) प्रकल्प अहवाल व अहवालासाठी लागणा-या वस्तुंचे कोटेशन
हे लक्षात ठेवा:
- शक्यतो नामांकित बॅंकांकडुनच किंवा सहकारी सोसायटीकडुनच कर्ज घ्यावे.
- बॅंकेच्या शिफारशी एवढेच कर्ज घ्यावे व शक्यतो एकाच बॅंकेकडुन कर्जव्यवहार करावे.
- कर्ज घेताना सात-बा-यात नावे असणा-या सर्व व्यक्तींची संमती घ्यावी लागते.
- कर्ज घेताना लागणारी सर्व कागदपत्रे अद्यावत(नविन ) असावित
- कर्जदेण्यासाठी देण्यात येणा-या कागदपत्रांमध्ये आपले नाव बरोबर आहे कि नाही याची पडताळणी करावी.
- कर्ज मंजुर झाल्यानंतर मंजुर पत्रातील (सॅंक्शन लेटर)सर्व अटी काटेकोरपणे वाचाव्या व मगच त्यावर सही करुन पुढील प्रक्रिया करावी.
- व्याजदराची संपुर्ण माहीती घेऊन सर्व प्रथम बॅंकेकडुन रिपेमेंट शेड्यल्ड घ्यावे.
- कर्ज रक्कम मर्यादा जास्त असली तरी गरजेपुरतेच रक्कम काढावी व शेतीकामासाठीच त्याचा वापर करावा.
- कर्ज घेतलेल्या बॅंकेत नियमीत भेट देऊन स्टेटमेंट ऑफ अकाऊंट घ्यावे.
- उत्पादन विक्रितुन मिळणा-या रकमेतुन नियमित परतफेड करावी शक्यतो परतफेडीच्या तारखेपुर्वीच काही दिवस अगोदर परतफेड करण्याचा प्रयत्न करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा