बुधवार, २० एप्रिल, २०१६

स्वयंरोजगार




स्वयंरोजगार का करावा

काही माणसांना नोकरीतच समाधान मानता येते. नोकरी आणि पगाराने आखून दिलेली चौकट यामध्येच ते सुखी असतात. परंतू ज्या व्यक्तीमध्ये मोठी स्वप्ने पाहण्याची शक्ती असते अशी माणसे आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करतात. अधिक जोखीम पत्करली तर अधिक पैसे मिळू शकतात याची त्यांना खात्री असते. -याच वेळेला आपली क्षमता तपासण्यासाठी स्वयंरोजगार हाच चांगला उपाय ठरू शकतो.
स्वयंरोजगारात नोकरी पेक्षा अधिक मेहनत असते. कामाचे तास अधिक असतात अधिक कौशल्याची गरज असते पण एकदा स्वयंरोजगाराची नस सापडली तर त्यातून अधिकाधिक पुढे जाण्याचेही मार्ग सापडू शकतात. एकदा का स्वयंरोजगार स्थिर स्थितीत आला की अनेकदा हातात बराच वेळ मिळू शकतो आणि पुढच्या योजना आखल्या जाऊ शकतात. व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नाच्या आधारे आपल्या आवडीच्या क्षेत्रात गुंतवणूक करता येते. त्याचप्रमाणे पुरेसे पैसे हातात आल्यानंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करावयाचे असल्यास व्यवसायाची धुरां इतरांच्या हातात देऊन निवृत्तीही घेता येऊ शकते. त्यामुळे अधिक पैसे मिळवणे त्याचप्रमाणे अधिकाधिक स्वातंत्र्य मिळवणे यासाठी स्वयंरोजगार हा एकमेव पर्याय असतो.

स्वयंरोजगार म्हणजे काय?

 शिक्षणानंतर सर्वच जण नोकरीच्या शोधात असतात पण  पुष्कळदा तुम्हाला तुमच्या शैक्षणिक योग्यतेची नोकरी मिळत नाही. अशा परिस्थितीत स्वयंरोजगार हा एक चांगला पर्याय ठरू  शकतो.  स्वयंरोजगार या शब्दाचा अर्थ स्वतःच  स्वतःसाठी  रोजगार उपलब्ध करणे आणि त्याद्वारे अर्थार्जन करणे असा होतो. नोकरी करता स्वयंरोजगाराचा मार्ग       पत्करणा-यांची  खरेतर खूप कमी आहे. याचे एक कारण म्हणजे समाजामध्ये स्वयंरोजगाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन तितकासा सकारात्मक नाही.  त्यामुळे आणि योग्य माहिती अभावी आजही  स्वयंरोजगारा पेक्षा नोकरीलाच प्राधान्य दिले जाते.
 खरे तर योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमांची जोड मिळाल्यास  स्वयं रोजगाराच्या माध्यमातून नोकरीपेक्षा कितीतरी जास्त आर्थिक विकास साध्य करणे शक्य आहे.  याशिवाय  स्वयं रोजगाराच्या माध्यमातून स्वतःबरोबरच इतरांसाठीही रोजगाराची संधी निर्माण  करणे शक्य आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या आर्थिक विकास सोबतच इतरांच्याही आर्थिक विकासास हातभार लावू शकाल. म्हणून  कुठलाही न्यूनगंड   बाळगता स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबण्यात काहीच गैर नाही. स्वाभिमानाने स्वतःचा आर्थिक विकास साधायचा असेल तर स्वयंरोजगारासारखा दुसरा चांगला मार्ग नाही.

स्वयंरोजगारासाठी

कोणताही व्यवसाय हा त्या त्या व्यक्तीची आवड, त्याला मिळालेली संधी, त्याच्याकडे असणारी भांडवल यावर अवलंबून असते. ज्याला स्वयंरोजगार सुरु करण्याची इच्छा असते त्याने स्वत: प्रयत्न करायचा असतो. काही काही वेळेला यश मिळते तर काही वेळेला अपयशही पदरी पडते. परंतू व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणतेही रेडीमेड व्यवस्था नसते. काम करता करता शिकणे आणि शिकता शिकता काम करणे हाच त्यातला उत्तम मार्ग असतो.
कधी कधी जो व्यवसाय आपल्याला करावयाचा आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे कठीण जाते. अश्यावेळी आपल्याला जो व्यवसाय करावयाचा आहे त्याचे प्रशिक्षण कोठे मिळते याची माहिती मिळवणे आवश्यक असते. प्रशिक्षणाबरोबर प्रत्यक्ष कामाचा अनुभव किती मिळणार आहे याचीही माहिती घ्यावी. काही काही प्रशिक्षणामध्ये प्राक्तीकल त्याचप्रमाणे अपरांटीशिप असते. त्यामध्ये शिकता शिकताच अनुभवही मिळतो त्यामुळे त्याचा प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करतांना फायदाच होतो.
सरकारतर्फे काही व्यवसायाभिमुख स्वरूपाचे कोर्स शिकवले जातात. त्याच प्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरु करण्यासंबधी मार्गदर्शनही दिले जाते. सरकार तर्फे व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध असतात. त्या कशा मिळवाव्या यासंबंधीची माहितीही दिली जाते. आज काल स्वयंसेवी संस्थाही व्यवसाय करण्यासाठे इच्छुक असणा-या तरुणांना मार्गदशन करतात. काही ठिकाणे व्यवसाय मार्गदर्शन केंद्रही असतात जी आपल्याकडून लोकांना योग्य ती माहिती पुरवण्याचं काम करतात. त्यामुळे एकूणच असे म्हणता येईल की ज्याला मनापासून व्यवसाय करण्याची इच्छा आहे त्याला अनेक मार्ग सापडतात पण तिथ पर्यंत पोहचता आले पाहिजे

http://pune.thebeehive.org

 ·         खास स्वताचा उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या प्रत्येक नव उद्योजकासाठी.
·         आपल्या घरच्या घरी लघु उद्योग सुरु करू इच्छिणाऱ्या आपल्या आई वडील भाऊ आणि मित्रासाठी खास पहिल्यांदाच...
·         विविध उद्योग व्यवसायांची यादी ...
·         जनहितार्थ प्रकाशित.

एकूण व्यवसायांची संख्या : 254
1.कृषी सल्ला सेवा केंद्र
2. पिण्याच्या पाण्याचे जार पुरवठा करणे
3. फळ रसवंती गृह
4. कच-यापासून बगीचा
5. आय. क्यू. एफ. प्रकल्प
6. एम.सी.आर. टाईल्स
7. पी.व्ही.सी. केबल
8. चहा स्टॉल
9. मृद जल चाचणी प्रयोगशाळा
10. वडा पाव
11. शटल कॉक
12. कुक्कुट पालन
13.शेळी पालन
14. खवा तयार करणे
15. हात कागद तयार करणे
16. चार चाकी वाहनांसाठी सेवा केंद्र
17. आटा चक्की
18. पान दुकान
19. भात खरेदी करणे
20. ऑटो लॉक्स कास्टिंग
21. जॉब वर्क्स
22. रीळ मेकिंग
23. सौर उपकरणे विक्री दुकान
24. ऑटो टयूब्ज फ्लॅप्स
25. खडू उत्पादन
26. रबर गास्केट
27. वीट उत्पादन
28. केश कर्तनालय
29. दोर निर्मिती
30. रबर स्टॅम्प्स
31. सौर कूकरमध्ये खारवलेले शेंगदाणे
32. कमी अंतराकरीता कुरीअर सेवा
33. वेब डेव्हलपमेंट
34. माल वाहतूकीसाठी स्वयंचलित वाहन
35. इडली
36. चकली
37. ढाबा
38. साइल वाटर टेस्टिंग लॅब
39. केबल टी.व्ही.
40. आवळा चहा
41. पिको फॉल
42. सोया दूध पनीर उत्पादन
43. मिनी कॉल सेंटर
44. आवळा सरबत
45. काजू सरबत
46. कोकम सरबत
47. धोबी सेवा
48. मंडप सेवा
49. शेळी पालन
50. वराह पालन
51. तयार कपडे गांधी टोप्या
52. गादी तयार करणे
53. मोजे तयार करणे
54. सोलर वॉटर हिटर
55. मिनी डेअरी
56. कृषि बाजार माहिती केंद्र
57. चिंच पावडर तयार करणे
58. मँगो ज्यूस तयार करणे
59. सुके अंजीर तयार करणे
60. कॉइन बॉक्स टेलिफोन बूथ
61. ऑफीस फाईल्स
62. पापड बनविणे
63. वॉटर फिल्टर कम कूलर
64. चिकन विक्री केंद्र
65. वॉटर फिल्टर कॅंडल्स
66. पोहे प्रकल्प
67. झिंक फास्फेट
68. विमा व्यवसाय सेवा
69. कॉईल वाईंडींग
70. जनरल इंजिनियर
71. टॉफी निर्मिती
72. मिनी लायब्ररी
73. एग्ज अल्बुमीन फेल्क्स
74. काजू प्रक्रीया
75. शुगर ग्लोब्युल्स
76. अल्प गुंतवणुकीतून नॅडेप सेंद्रिय खत
77. ब्लो-मोल्डींग प्लास्टीक वस्तू
78. आमचूर
79. फरसाण
80. बिंदी
81. बेकरी
82. हॅचरी
83. फॅक्स -मेल प्रक्षेपण
84. आळंबी नॅडेप सेंद्रिय खत
85. डोअरी नॅडेप सेंद्रिय खत
86. ऊसाचे गु-हाळ
87. कापूर वडी
88. ब्रास बँड
89. हरभरा डाळ
90. सुरभी बॅग इतर वस्तू तयार करणे
91. आमलेट पाव गाडी
92. क्रेन सेवा
93. लिंबू सरबत
94. सायबर ढाबा
95. फिरते कापड कपडे विक्री दुकान
96. मसाले तयार करणे
97. लोणचे तयार करणे
98. ब्रेक ड्रम कास्टिंग
99. कच्चा चिवडा
100. कांडी कोळसा
101. गोल्ड फिंगर तयार करणे
102. स्वीस क्रिस सिमेंट कौले
103. रेशीम उद्योग
104. बाजार माहिती केंद्राची स्थापना करणे.
105. कापडी पिशव्या
106. क्रिम सेपरेटर
107. चक्का श्रीखंड
108. लाकडी फर्निचर
109. शेवया उत्पादन
110. घडयाळ दुरूस्ती
111. छोटया बल्बच्या सजावटी माळा
112. मोटार रिवायडींग
113. टाकाऊ शेतमालाचा उपयोग
114. पावडर ऑसिडॅक्टरीन
115. भांडी घासण्यासाठी सफाई पावडर
116. राजगि-याच्या वड्या
117. सायकल, पान कॅरम दुकान
118. अडूळसा
119. चिक्की
120. बॉलपेन
121. कुल्फी कॅंन्डी तयार करणे
122. बुढ्ढी के बाल
123. गांडूळ खत तयार करणे
124. किराणा माल भाजीचे दुकान
125. साडीचा फॉल तयार करणे
126. अंबाडी सरबत
127. चिक्कू मेवा
128. टेलर्स लेबल
129. टोमॅटो केचप
130. तेलाची घाणी
131. पेप्सी कोला
132. शतावरी कल्प
133. लिफाफे तयार करणे
134. दुचाकी वाहन धुलाई केंद्र
135. साडीला पिको-फॉल करणे
136. भाताची गिरणी
137. किराणा दुकान पिठाची गिरणी
138. केळीचे वेफर्स
139. घरगुती खानावळ
140. नर्सरी प्रकल्प
141. वायनरी प्रकल्प
142. फळांचा मुरांबा तयार करणे
143. वनौषधी वनस्पती लागवड
144. लाह्या उत्पादन प्रकल्प
145. आधुनिक सुतारकाम
146. बॅटिंग ग्लोव्हज उत्पादन करणे
147. स्प्रे प्रिंटींग
148. घरगुती उपकरणांची दुरुस्ती
149. एलपीजी सिलेंडरसाठी ऑल्युमिनियम सील
150. फुलशेती
151. बाकरवडी
152. मुरमुरे
153. शिकेकाई
154. शीतगृहे
155. टायपिंग
156. स्थानिक दूरस्थ डाटा एन्ट्री करणे
157. एरंडीचे तेल
158. जाहिरात कला
159. लिक्वीड सोप तयार करणे
160. कुक्कुट पालन
161. नाचणीचे सत्व
162. लोकरीचे कपडे
163. विद्युत सेवा तज्ञ
164. झेरॉक्स सेंटर
165. द्रवरूप फिनेल तयार करणे
166. फॅशनेबल चप्पल तयार करणे
167. ग्रामीण गोदाम योजना
168. मेटॅलीक वॉशर्स
169. टेलिकॉम संबधित फॉर्म विक्री, बीले भरणे सेवा
170. कॉक्रिट मिक्सर सेवा
171. टेलिकॉम संबधित सेवा
172. वनस्पती शाम्पू तयार करणे
173. सुगंधित सुपारी प्रकल्प
174. विद्युत उपकरणे दुरूस्ती
175. सुधारित निर्धूर चूल
176. इव्हेंट मॅनेजमेंट
177. फिरत्या ग्राहकांसाठी फॅक्स -मेलची सेवा
178. बिस्कीटे
179. अगरबत्ती
180. दूरध्वनी बुथ
181. माक्याचे तेल तयार करणे
182. लॅंटेक्स रबर कंडोम्स
183. आक्झालिक असिड
184. कशिदाकाम करणे
185. चुन्याची पूडी
186. सेंटरींग सेवा
187. पशुखाद्य तयार करणे
188. पापकार्न तयार करणे
189. व्हिडीयो सेंटर
190. वैयक्तिक संगणक देखभाल कंत्राट
191. छंदामधून विविध व्यवसाय
192. व्हिडीयो शूटींग सेवा
193. भाजीपाला सुकविणे
194. इंजेक्शन मोल्डेड शूज ( बूट )
195. धान्याची प्रतवारी ठरविणे
196. वैयक्तिक संगणकाची वार्षिक देखभाल
197. डोसाभट्टी
198. फोटोफ्रेम
199. मळणीयंत्र
200. कांदाचाळी
201. धाग्यांचे रीळ
202. निरगुडीचे तेल
203. कपड्यांचा साबण
204. पुरूषांचे तयार कपडे
205. आईस्क्रीस चर्नर
206. ऑटोमोबाईल गॅरेज
207. प्रिंटींग प्रेस
208. फरश्यांना पॉलिश करणे
209. बांबूच्या वस्तू तयार करणे
210. प्लॅस्टिक पार्टस
211. बटाट्याचे वेफर्स
212. रोपवाटिका संगोपन
213. कॉंक्रिंट मिक्सर सेवा
214. स्वयंचलित दुचाकी वाहन दुरूस्ती देखभाल
215. वनसंपत्ती माहिती केंद्र
216. कर्बयुक्त शीतपेये ( सोडा वॉटर )
217. प्लास्टीक मोल्डींग
218. नारळाच्या पानापासून झाडू तयार करणे
219. स्वयंचलित वाहनांमध्ये ग्रीस भरणे
220. छायाचित्रण
221. फोटोग्राफी
222. खरबूजाच्या सूर्यफूलाच्या बिया
223. द्राक्षाचे सरबत
224. मधुमक्षिका पालन
225. सुतळ्यांची पोती तयार करणे
226. कडबाकुट्टी यंत्र
227. कॉंक्रीटचे ठोकळे
228. बांगडयांचे फिरते दुकान
229. वाहनांसाठी धुलाई केंद्र
230. मोबाईलसाठी निकेल कॅडमियम बॅटरी
231. बैलांकरीता घांगरी पट्टा
232. आयुर्वेदिक सुगंधी तेलाचे उत्पादन
233. टाचण्यांचे उत्पादन
234. फॅब्रिकेशन वर्कशॉप
235. कॉम्प्युटर भाडयाने देणे
236. आयुर्वेदिक रोपांची नर्सरी
237. आयुर्वेदिक प्रसाधने
238. कॉम्प्युटर प्रशिक्षण देणे
239. पत्रावळ्या-द्रोण
240. व्यायामशाळा
241. रसायनविरहीत गुळ
242. भुईमूगाच्या शेंगा फोडणे
243. डिहाड्रेटेड कॅरेट श्रेडस्
244. व्हर्च्युअल पर्सनल ऑफिस असिस्टंट
245. हार्टीकल्चर क्लिनिक
246. प्लॅस्टिकचे ज्वेलरी बॉक्स तयार करणे
247. वाळविलेल्या माश्यांची विक्री करणे
248. ब्युटीपार्लर
249. कागदपत्रांचे कागदपत्रांमध्ये रूपांतर करणे.
250. चामड्यापासून विविध वस्तू बनविणे
251. कॉम्प्युटरवर अकौंटस् लिहणे
252. कडधान्यांपासून डाळ
253. डिस्ट्रीब्युशन बोर्ड
254. द्राक्षांपासुन मनुके तयार करणे

शासकीय योजना 
. क्र. यंत्रणेचे नाव योजनेचे नाव
        
संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ मर्यादित
1 )
बीज भांडवल योजना (संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाची योजना )
2 )
मुदती कर्ज सहायता योजना (संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 )
महिला समृध्दी योजना. (मायक्रो फायनान्स योजना) ( संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 ) 50%
अनुदान योजना (संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळाची योजना )
      
कृषी विभाग
1 )
फळ रसवंती गृह चालविणे. (राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाची योजना)
2 )
फळे भाजीपाला विक्रीकरिता बाजार सहाय्य योजना. (राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाची योजना)
3 )
डाळ मिल स्थापनेकरिता अर्थसहाय्य योजना. (कृषी विभागाची योजना)
4 )
पॅक हाऊस / शीतगृह / वातानुकुलित वाहन योजना (राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
5 )
फूल पिकांची काढणीत्तोर सुविधा उभारणी योजना (प्रि-कुलींग, पॅक हाऊस, वातानुकुलित वाहन, अपनी मंडी .) (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
6 )
काजू प्रक्रिया उद्योग स्थापित करणे. (राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाची योजना)
7 )
बाजार माहिती (कृषी माहिती / तंत्रज्ञान) केंद्राची स्थापना करणे. (कृषी विभागाची योजना)
8 )
मसाला प्रक्रिया केंद्र स्थापित करणे. (कृषी विभागाची योजना)
9 )
गांडूळ कल्चर / गांडूळ खत प्रकल्प उभारणी. (कृषी विभागाची योजना)
10 )
आळींबी उत्पादनाद्वारे स्वयंरोजगार निर्माण करणे (राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाची योजना)
11 )
हरितगृह उभारणे योजना (राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
12 )
सेंद्रिय शेती पध्दती योजना (राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
13 )
फलोत्पादन पिकावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया केंद्र स्थापित करणे. (राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाची योजना)
14 )
फलोत्पादन पिकांवर प्रक्रिया - फळांचा मुरब्बा तयार करण्याचा उद्योग (कृषी विभागाची योजना )
15 )
मधुमक्षिका पालन योजना (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
16 )
फलोत्पादित पिकांचे मुल्यवर्धन गुणात्मक वाढीव्दारे स्वयंरोजगार योजना (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
17 )
शेतमालासाठी गोडाऊन कांदा चाळी / शीतगृहे स्थापित करणे. (कृषी विभागाची योजना)
18 )
पुष्पोत्पादन विकास कार्यक्रम योजना (कृषी विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
19 )
निर्यातीसाठी प्रोत्साहनपर योजना. (कृषी विभागाची योजना)
20 )
द्राक्षापासून बेदाणे मनुके तयार करणे. (राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत कृषी विभागाची
     
समाज कल्याण विभाग (जिल्हा परिषद)
1 )
अपंगांसाठी बीज भांडवल योजना (समाज कल्याण विभागाची योजना)
 
शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळ मर्यादित
1 )
एन. एस. टी. एम. डी. सी., नवी दिल्ली पुरस्कृत कर्ज योजना (शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
2 )
एन. एस. टी. एम. डी. सी., नवी दिल्ली पुरस्कृत आदिवासी महिला सशक्तीकरण योजना (शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 )
शबरी महामंडळाच्या स्वनिधीमधून कर्ज वाटप योजना. (शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाची योजना)
4 )
महिला सशक्तीकरण योजना (शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाची योजना)
5 )
राष्ट्रीयकृत बँकेच्या सहकार्याने राबवावयाच्या कर्ज योजना. (शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाची योजना)
 
महिला बाल विकास विभाग
1 )
महिला मंडळाच्या महिला प्रशिक्षण केंद्रास अनुदान योजना (महिला बालविकास विभागाची योजना)
2 )
स्वयंरोजगार योजनेखाली महिलांना व्यक्तीगत अनुदान योजना (महिला बाल विकास विभागाची योजना)
     
नेहरु युवा केंद्र संघठन
1 )
युवक मंडळ अनुदान योजना (नेहरू युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना)
2 )
युवा विकास केंद्र योजना ( नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना )
3 )
ग्रामीण क्रिडा क्लब योजना (नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना)
4 )
ग्रामीण माहिती तंत्रज्ञान युवा विकास केंद्र योजना ( नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना )
5 )
व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम योजना ( नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना )
6 )
प्रदर्शन कार्यक्रम योजना ( नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना )
7 )
उद्योजकता विकास कार्यक्रम योजना ( नेहरु युवा केंद्राची केंद्र पुरस्कृत योजना )
7
सैनिक कल्याण विभाग 1 ) सेम्फेक्स - 2 योजना (सैनिक कल्याण विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
2 )
सेम्फेक्स - 3 योजना (सैनिक कल्याण विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
    
रेशीम संचालनालय
1 )
टसर रेशीम तुती रेशीम योजना. (रेशीम संचालनालयाची योजना)
   
क्रीडा युवक संचालनालय
1 )
जलतरण तलाव बांधकाम अनुदान योजना (क्रिडा युवक संचालनालयाची योजना)
2 )
ग्रामीण नागरी भागातील स्वयंसेवी संस्थांना आर्थिक सहाय्य योजना (क्रीडा युवकसेवा संचालनालयाची योजना)
3 )
समाजसेवा शिबीरे भरविणे (क्रीडा युवकसेवा संचालनालयाची योजना)
4 )
अद्ययावत व्यायामशाळा, कुस्ती, ज्युदो, कराटे इतर खेळांच्या विकासासाठी अनुदान योजना (क्रीडा युवक संचालनालयाची योजना)
5 )
क्रीडांगण विकास अनुदान योजना (क्रिडा युवक संचालनालयाची योजना)
6 )
व्यायामशाळा विकास अनुदान योजना (क्रिडा युवक संचालनालयाची योजना)
   
रोजगार स्वयंरोजगार विभाग
1 )
बेरोजगारांच्या सहकारी सेवा संस्थांना आर्थिक सहाय्य योजना ( रोजगार स्वयंरोजगार विभागाची योजना )
11
जिल्हा परिषद 1 ) गरीब महिलांना स्वयंरोजगारासाठी अनुदान योजना (महिला बाल कल्याण समितीची योजना)
   
मौलाना आज़ाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्यादित
1 )
थेट कर्ज योजना (मौलाना आज़ाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची योजना)
2 )
बीज भांडवल कर्ज योजना (मौलाना आज़ाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची योजना)
3 )
मुदत कर्ज योजना (मौलाना आज़ाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 )
शैक्षणिक कर्ज योजना (मौलाना आज़ाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची योजना)
  
जिल्हा उद्योग केंद्र
1 )
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना. (उद्योग संचालनालयाची योजना)
2 )
सुधारीत बीजभांडवल योजना. (उद्योग संचालनालयाची योजना)
3 )
राष्ट्रीय समभाग निधी योजना. (उद्योग संचालनालयाची केंद्र पुरस्कृत योजना)
4)
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना. (Prime Minister Employment Generation Program) (केंद्र शासनाच्या सुक्ष्म, लघु मध्यम उद्योग मंत्रालयाची, खादी ग्रामोद्योग आयोग उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येणारी केंद्र पुरस्कृत योजना)
  
मत्स्य व्यवसाय विभाग
1 )
शासकीय खाजण जागा वाटप योजना. (मत्स्य व्यवसाय विभागाची योजना)
2 )
बर्फालय शितगृहासाठी अर्थसहाय्य योजना (मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 )
मासळीची सुरक्षण वाहतूक विक्री. (मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 )
अवरुध्द पाण्यात मत्स्यसंवर्धन योजना ( मत्स्य व्यवसाय विभागाची योजना )
5 )
निकृष्ट शेतजमिनीत तलाव बांधून मत्स्य गोडया पाण्यातील कोळंबी संवर्धन करणे (मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना )
6 )
मासेमारी नौकांचे यांत्रिकीकरण नौकांची सुधारणा योजना. (मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
7 )
मासेमारी नौकांसाठी बाह्य/आंतर इंजिन खरेदीवर अर्थसहाय्य योजना (मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना )
8 )
मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य ) सूत जाळी खरेदी ) बिगर यांत्रिकी नौकांसाठी योजना. (मत्स्य व्यवसाय विभागाची योजना)
9 )
यंत्रचलित नौका बांधणी योजना ( मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना )
10 )
मच्छिमारांसाठी राष्ट्रीय कल्याण निधी योजना ( मत्स्य व्यवसाय विभागाची केंद्र पुरस्कृत योजना )
  
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
1 )
स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना - स्वयंसहाय्यता गट योजना. (ग्रामीण विकास विभागाची योजना)
 
वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित
1 )
बीज भांडवल कर्ज योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाची योजना)
2 )
बीज भांडवल कर्ज योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 )
मुदती कर्ज योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 )
सुक्ष्म कर्ज योजना (मायक्रो फायनान्स स्कीम) (वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
5 )
शैक्षणिक ऋण योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
6 )
स्वयंसक्षम योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
7 )
महिलांसाठी स्वर्णिमा योजना (वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
   
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित
1 )
थेट कर्ज योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची योजना)
2 )
बीज भांडवल योजना (राज्य शासन पुरस्कृत) (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची योजना)
3 )
सफाई कामगार पुनर्वसन योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 )
मुदती कर्ज योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
5 )
अस्वच्छ सफाई कामगारांच्या कुटुंबियांसाठी पुनर्वसन योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची योजना)
6 )
सुक्ष्म पतपुरवठा योजना (मायक्रो फायनान्स स्कीम) (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
7 )
शैक्षणिक कर्ज योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
8 ) 50%
अनुदान योजना (महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
   
आदिवासी विकास विभाग
1 )
पी. व्ही. सी. पाईप पुरवठा योजना. (आदिवासी विकास विभागाची योजना)
2 )
विद्युत मोटार पंप तेल पंप पुरवठा योजना. (आदिवासी विकास विभागाची योजना)
3 )
एरंडीची लागवड योजना. (आदिवासी विकास विभागाची योजना)
4 )
मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्थांना अर्थसहाय्य योजना. (आदिवासी विकास विभागाची योजना)
 
सामाजिक वनीकरण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
1 )
किसान रोपवाटिका योजना (सामाजिक वनीकरण संचालनालयाची योजना)
 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित
1 )
बीज भांडवल योजना (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची योजना )
2 )
मुदती कर्ज योजना (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना )
3 )
अनुदान योजना (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची योजना )
 
सार्वजनिक बांधकाम विभाग
1 )
खाजगीकरणातून बांधकामे योजना. (सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना)
    
पशुसंवर्धन विभाग
1 )
दूध / दुग्धजन्य पदार्थ साठविण्यासाठी शीतगृह योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
2 )
पशु वैद्यकीय दवाखाना (खाजगी) योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 )
चिकन, ऑम्लेट, चिकन बिर्याणी अनुषंगिक पदार्थ बनविणे विक्रीकरिता हातगाडया लावणे योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 )
विशेष घटक योजना. (अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागाची योजना) (दुधाळ जनावरांचे गट वाटप)
5 )
फिरता पशु वैद्यकीय दवाखाना (खाजगी) योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
6 )
दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना. (आदिवासी उपयोजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागाची योजना)
7 )
दुधावर प्रक्रिया / दुग्धजन्य पदार्थाचे उत्पादनासाठी यंत्रसामुग्री खरेदी योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
8 )
कुक्कुट खाद्य निर्मिती केंद्र/युनिट उभारणी योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
9 )
कुक्कुट उत्पादन विपणन व्यवस्था केंद्र स्थापित करणे योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
10 )
कुक्कुट उत्पादन निर्यात सहाय्य केंद्र उभारणी योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
11 )
कुक्कुट उत्पादनांच्या किरकोळ विक्रीसाठी दुकाने उभारणी योजना (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
12 )
शेळ्यांचे गट वाटप योजना. (आदिवासी / अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत पशुसंवर्धन विभागाची योजना)
13 )
दुग्धजन्य पदार्थ वाहतूक सुविधा (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
14 )
लहान दुग्ध व्यावसायिकांना 10 दुभत्या जनावरांचा पुरवठा (पशुसंवर्धन विभागाची केंद्र पुरस्कृत योजना)
    
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ लि.
1 )
बीज भांडवल योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची योजना)
2 )
मुदती कर्ज योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 )
स्वयं-सक्षम कर्ज योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 )
मार्जीन मनी योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
5 )
सुक्ष्म पतपुरवठा योजना (मायक्रो फायनान्स स्कीम) (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
6 )
व्यावसायिक अभियांत्रिकी शिक्षण कर्ज योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
7 )
महिलांसाठी समृध्दी योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
8 )
महिलांसाठी स्वर्णिमा योजना (महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
    
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ
1 )
विशेष घटक योजना. (खादी ग्रामोद्योग मंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
2 )
मार्जिन मनी योजना. (खादी ग्रामोद्योग मंडळाची योजना)
3 )
कारागीर रोजगार हमी योजना. (खादी ग्रामोद्योग मंडळाची योजना)
4 )
ग्रामोद्योग वसाहत योजना. (खादी ग्रामोद्योग मंडळाची योजना)
  
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित
1 )
लघु उद्योग स्थापनेसाठी योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
2 )
सेवा विषयक क्षेत्रातील छोटया धंद्यासाठी कर्ज सहाय्य योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
3 )
कृषी उद्योगाकरीता कर्ज सहाय्य योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
4 )
मानसिक विकलांग (मनोरूग्ण) सेरेब्रल पाल्सी आणि (ऑटीझम) आत्ममग्न अशा अपंगासाठी स्वयंरोजगार योजना.(. राज्य अपंग वित्त आणि वि. महामंडळाची योजना)
5 )
वाहतूक व्यवसायासाठी वाहन खरेदी योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
6 )
व्यापार खरेदी / विक्री विषयक योजनांखालील छोटया धंद्यासाठी कर्ज सहाय्य योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची योजना)
7 )
सूक्ष्म वित्त सहाय्य योजना (मायक्रो फायनान्स असिस्टन्स स्कीम). (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची केंद्र पुरस्कृत योजना)
8 )
अपंगांसाठी प्रविणता / कौशल्य तथा उद्योजकता विकसित करणेसाठी कर्ज योजना (महाराष्ट्र राज्य अपंग वित्त आणि विकास महामंडळाची योजना)
9 )
मनोरूग्णांना माता, पिता/पालकांद्वारा संचलित संस्थांना संबंधित मनोरूग्णाच्या लाभासाठी कर्ज योजना (.राज्य अपंग वित्त आणि वि. महामंडळाची योजना)
   
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) (महाराष्ट्र शासन पुरस्कृत)
1 )
सौर चूल योजना ( महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा ) ची योजना )
2 )
सौर कंदील योजना (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा)) ची योजना
3 )
सौर घरगुती दिवे योजना (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा) ची योजना)
4 )
सौर ऊष्णजल संयंत्र (सोलर हीटर) योजना (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा)) ची योजना
5 )
पॅराबोलिक सोलर कुकर योजना (महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण(मेडा) ची योजना
27
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित
1 )
गट प्रकल्प योजना. (अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची योजना)
2 )
बीज भांडवल कर्ज योजना. (अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची योजना)
   
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ
1 )
पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारी योजना - (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची योजना)
   
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास महामंडळ मर्यादित
1 )
शेळी गट वाटप योजना (100 शेळ्या 4 बोकड) (पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास महामंडळाची योजना)
2 )
शेळी गट वाटप योजना (20 शेळ्या 1 बोकड) ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास महामंडळाची योजना)
3 )
शेळ्यांचा गट वाटप योजना (50 शेळ्या 2 बोकड) ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी शेळी विकास महामंडळाची योजना)
    
महानगरपालिका / नगरपरिषद
1 )
लोकसेवा केंद्र योजना. (महानगरपालिका / नगरपालिकांची योजना)
2 )
सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना - बचत पतसंस्था गट योजना. (महानगरपालिका / नगरपालिकांची योजना)
    
दुग्धव्यवसाय विकास विभाग
1 )
दूध वितरण केंद्र योजना (दुग्धव्यवसाय विकास विभागाची योजना

३ टिप्पण्या:

  1. सर मला गांडूळखत प्रकल्प चालु करायचा त्यासाठि कर्ज कोठे मिळेल

    उत्तर द्याहटवा
  2. सर मला काजू प्रक्रिया उद्योग चालु करायचा त्यासाठि कर्ज कोठे मिळेल

    उत्तर द्या

    उत्तर द्याहटवा
  3. सर.माजे.कुक्कुपालन.चे.प्रक्षिशन.झालेआहे.व.मला.कुक्कुपालन.चालू.करायचे.त्यासाठी.कर्ज.कोठे.मिळेल
    उत्तर.धा

    उत्तर द्याहटवा

माझ्याबद्दल