बाबासाहेब पुरंदरे ९९ व्या वर्षात पदार्पण करते झाले.
या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१
बाबासाहेब पुरंदरे...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय...
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ९९ वर्षांच्या जीवनकाळात महाराष्ट्रात पिंजून काढला. या काळात त्यांनी गडकिल्ले फिरत शिवचरित्राचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर अनेक पुस्तकं लिहिली तसेच 'फुलवंती' आणि 'जाणता राजा' ही नाटकं लिहून त्यांचं दिग्दर्शनही केलं. 'जाणता राजा' या महानाट्याचे गेल्या ३७ वर्षात १२५० हून अधिक प्रयोग झाले.
अल्पपरिचय -
मूळ नाव - बळवंत मोरेश्वर पुरंदरे
प्रचलित नाव - बाबासाहेब पुरंदरे
जन्म - २९ जुलै १९२२
वय - ९९ वर्षे
पत्नीचं नाव - निर्मला पुरंदरे
अपत्ये - माधुरी पुरंदरे, प्रसाद पुरंदरे, अमृत पुरंदरे
मूळ गाव - सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे
कार्यक्षेत्र - इतिहास संशोधन, साहित्य, नाटक, भाषण
पुरस्कार - डी.लिट. (२०१३), महाराष्ट्र भूषण (२०१५), गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२०१६), प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२), पद्म विभूषण (२०१९).
गुरु - ग. ह. खरे
सचित्र चरित्र - बेलभंडारा (लेखन - सागर देशपांडे)
संशोधन प्रबंध - ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ (भारत इतिहास संशोधन मंडळ)
कार्यकाळ - तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संपर्क, प्र. के. अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन, श्री. ग . माजगावकर यांच्यासोबत 'माणूस' साप्ताहिकात काम, महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर भटकंती आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्ताऐवजांचा अभ्यास, दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात सहभाग.
लेखन - आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदर्यांचा सरकारवाडा, पुरंदर्यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, शेलारखिंड, सावित्री, सिंहगड.
Babasaheb Purandare | इतिहासाची खडानखडा माहिती असणारे बाबासाहेब पुरंदरे नेमके कोण?...
Babasaheb Purandare | इतिहासाची खडानखडा माहिती असणारे बाबासाहेब पुरंदरे नेमके कोण?
बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. सुरुवातीच्या काळात बाबासाहेब पुरंदरे पुण्यातच स्थायिक झाले आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक खरे हे बाबासाहेबांना गुरू म्हणून लाभले.
पुणेः मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालंय. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. त्यांच्या सर्वच परिवाराने वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक कमावला आहे.
पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं
26 ऑक्टोबरला तोल जाऊन पडल्यानं बाबासाहेब पुरंदरेंच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कालांतरानं त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज त्यांचे निधन झाले. पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं.
कोण आहेत बाबासाहेब पुरंदरे?
बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. सुरुवातीच्या काळात बाबासाहेब पुरंदरे पुण्यातच स्थायिक झाले आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक खरे हे बाबासाहेबांना गुरू म्हणून लाभले. त्यानंतर इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 2015 सालापर्यंत 12 हजारांहून अधिक व्याख्याने दिलीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केलाय. 29 जुलै 1922 रोजी बाबासाहेबांचा जन्म झालाय, तर 15 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांचं निधन झालंय.
बाबासाहेबांनी जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले
भारताच्या स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडकेंबरोबर हिरिरीने सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर साहित्य प्रकाशित झालेय.
बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान
शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून आणि परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या 16 आवृत्ती आजपर्यंत सुमारे 5 लाख घरांमध्ये पोहोचल्यात. या पुस्तकाची 17 वी आवृत्ती 31 मार्च 2014 ला प्रसिद्ध झाली. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने 2015 साली महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कारही दिलाय, तर 2019 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आले. डी. वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले होते
बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१
मुंबई मध्ये आल्यावर पहावे अशी ठिकाणे
मुंबई मध्ये आल्यावर पहावे अशी ठिकाणे
शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१
*जमीन संबंधीत व्यवहार करताना खालील काळजी घ्या.*
*जमीन संबंधीत व्यवहार करताना खालील काळजी घ्या.*
*हल्ला*! ...
*हल्ला*! *१) पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.* *लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, काही जाणंच आली नाही तर कशाला जनता उठाव करतेय? म्हणून पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.* मग जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे वापरून घ्यायला सोपं जातं. *२) दुसरा हल्ला रोजगारावर असतो, कुटुंबाला खायलाच काही मिळाले नाही तर माणूस जिथे पैसा मिळेल तिकडे धावतो. मग भले ते काम स्वतःच्या विचारांविरुद्ध असो कि अनैतिक असो.* *३) तिसरा हल्ला हा इतिहासावर असतो. इतिहासातील स्वतःला अनुरूप बदल हे जनतेला खोट्या अभिमानाच्या गुंगीत ठेवण्यास उपयोगी पडतात.* *४) चौथा हल्ला हा मानवी मेंदूवर असतो. खोट्या कथा पेरणे, त्याचे स्तोम माजवणे, उदात्तीकरण करणे. खोट्या कथांना आधार म्हणून जनतेच्या मनातील प्रतीकांचा (उदा. जात, धर्म, राष्ट्र, सैनिक, दैवत, क्रांतिकारक इ.) वापर आणि हे सर्व करत असताना आपली प्रतिमा डागाळू नये म्हणून वरून प्रामाणिक, भोळेपणा किंवा सात्त्विकतेचा आव.* *५) पाचवा हल्ला हा विरोधकांवर असतो. कारण त्यांच्यात भविष्याचा वेध घेण्याची उपजत शक्ती असल्याने हे लोक काय करतात तर पुढे त्रास होईल अशा व्यक्तीची बदनामी ते आजपासून सुरु करतात. ज्या व्यक्तीची बदनामी करायची आहे त्याच्या बदनामीसाठी एखादा क्षुल्लक किंवा खोटा आरोप शोधून काढतात (तो प्रत्येकातच सापडतो) त्या व्यक्तीच्या बाकी अनेक कार्याकडे दुर्लक्ष केले जाते, आरोपाला योग्य ठरतील असे आणखी दहा खोटे आरोप जोडले जातात आणि बदनामी सतत सुरुच राहते. आपापल्या कामात मग्न असलेली भोळी जनता तेच खरे मानून बसते. सत्य समजून घ्यायला त्यांना कुठे वेळ आहे?* *हे सगळे हल्ले अपयशी ठरले की मग शेवटचा हल्ला म्हणजे माघार घेऊन आम्ही तुमचेच, आम्ही किती भोळे हा जप ते सुरु ठेवतात तो पुन्हा योग्य वेळ येईपर्यंत.* *तेव्हा मित्रांनो, हे मेंदू नासवण्याचे कपट कारस्थान वेळीच ओळखा अन्यथा आपला देश पुन्हा एकदा मध्ययुगात लोटला जाईल. शिक्षण घेऊन विचारी व्हा... वैज्ञानिक व खरा दृष्टिकोन स्वीकारून खोटा राष्ट्रवाद, देवाधर्माच्या नावाखाली, इतिहासाच्या नावाने खोटं बोलणाऱ्यांना थारा देऊ नका..* |
शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१
सामान्य भारतीयांमधील "हिरो"ला वेगवान चाक देणाऱ्या साडे तीन हजार कोटींच्या उद्योगाची कहाणी...
सामान्य भारतीयांमधील "हिरो"ला वेगवान चाक देणाऱ्या साडे तीन हजार कोटींच्या उद्योगाची कहाणी

मंडळी, बालपणीचा काळ सुखाचा असं आपण नेहमीच म्हणतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा लहान मुलं आनंदून जातात. त्यांना तो आनंद मिळवून देण्यासाठी पालक नेहमीच झटत असतात.
आता मुलांना खूप साधनं मिळत आहेत, टीव्ही, मोबाईल, आयपॅड, विविध खेळणी, पण पूर्वीच्या मुलांना फार कमी खेळणी असायची. तरीपण आत्ताची मुलं आणि पूर्वीची मुलं यात एक कॉमन गोष्ट आहे की जी मिळण्यासाठी पूर्वीपण मुलं हट्ट करत होती आणि आजही करत आहेत.
तुम्ही म्हणाल, 'काय हे? आत्ताची मुलं कुठे पूर्वीच्या गोष्टी वापरतात?' पण आहे अशी एक गोष्ट की जी पूर्वापार चालत आली आहे.
प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मूल लहान असताना त्याला खुळखुळा, मग लाइटवरची खेळणी, मग बाबा गाडी, मग तीन चाकी सायकल.
तीन चाकी सायकल चालवली नाही? अशी मुलं फार कमी बघायला मिळतील. लहान मुलांना तीन चाकी सायकल घेऊन द्यायचीच हा जणू नियमच झालाय.
या तीन चाकी सायकल वापरून तिचा पार खुळखुळा करून टाकल्यावर मुलाचा एकच हट्ट सुरू होतो, ''मला सायकल कधी घेणार?'' बघा आहे ना ही खरी गोष्ट? सायकल घेऊन द्यायला पालकही कुरकुर करत नाहीत आणि मुलंही सायकल नको असं कधीच म्हणत नाहीत.
कोट्यावधी भारतीय मुलं ५ ते ८ वर्षांपर्यंतच्या काळात सायकल घेतात, ती शिकतात, कधीतरी धडपडतात. पण ती घेऊन बॅलन्सच्या चाकाशिवाय चालवायला लागेपर्यंत प्रयत्न अखंड सुरू असतात. पालकांना पण ती घेऊन देण्यात धन्यता वाटते.
कधी वाढदिवसाचे औचित्य साधून, तर कधी पहिल्या नंबरचं किंवा एखाद्या स्पर्धेचं बक्षीस म्हणून सायकल घेऊन दिली जाते. ही सायकल मग ती श्रीमंत कुटुंब असो किंवा सर्वसामान्य कुटुंब असो सायकल मिळवणे व ती चालवायला शिकणे हे मुलांसाठी व पालकांसाठी एक अतिशय आनंदाचा क्षण असतो.
या सायकलची निर्मिती कुणी केली माहीत आहे? कै. ओ. पी. मुंजाळ. हिरो सायकल्सचे ते संस्थापक होते. त्यांनी १९५६ मध्ये म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात हिरो सायकल्सची स्थापना केली. तेव्हा राष्ट्र पण नुकतंच स्वतंत्र झालं होतं त्यामुळे तेही तरुणच होतं.
तरुण मुलाला स्वातंत्र्य हवं असतं ते सायकल मुळे मिळतं तसंच तरुण राष्ट्राला पण स्वातंत्र्याची चाके हवी होती.
हिरो सायकल्स हा छोटासा बिझनेस होता, पण मुंजाळ यांच्या लीडरशीपने तो मोठा केला. त्यांच्या नेतृत्वाखाली जगातील सगळ्यात मोठी सायकल बनविण्यात त्यांनी यश मिळवले.

हीच हिरो सायकल कंपनी आता वर्षाला पाच मिलियन सायकल तयार करते. त्याचं प्राथमिक उत्पादनाचं युनिट लुधियानात आहे. २५० पेक्षा जास्त पुरवठादार आणि २८०० डीलरशिप आहेत. ही कंपनी जर्मनी, पोलंड, आफ्रिका आणि फिनलँड यासह ७० देशांमध्ये निर्यात करते.
हिरो मोटर्स कंपनी हाही मुंजाळ यांचा कौटुंबिक व्यवसाय असून ३,३०० कोटी रुपयांचा त्याचा व्यवसाय आहे त्याचे अध्यक्ष पंकज एम मुंजाळ आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक मुंजाळ हा या कंपनीचा डायरेक्टर असून या कंपनीमध्ये मन लावून काम करत आहे.
भारतात सायकल बनविणार्या कंपन्या फार थोड्या आहेत. अभिषेक म्हणतो, ''१०० पैकी ६ जण या व्यवसायात उतरतात.'' पण हिरो सायकलने मात्र सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विचार केला आहे आणि सायकलिंगची संस्कृती जपली आहे.
या व्यवसायाला सुरुवात कशी झाली? तर ओ. पी. मुंजाळ यांचा जन्म पाकिस्तानात झाला. जेव्हा त्यांनी सायकलचा व्यवसाय सुरू केला तेव्हा ते १६ वर्षांचे होते.
विभाजनानंतर पोटासाठी काहीतरी कामधंदा करण्याच्या हेतूने ओ. पी. मुंजाळ यांचे कुटुंब ब्रिजमोहन लाल मुंजाळ, दयानंद मुंजाळ आणि सत्यानंद मुंजाळ या भावांना बरोबर घेऊन अमृतसरला सायकलच्या स्पेअरपार्टचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आले.

नवीन नवीन प्रयोग करत राहिल्यामुळे काही वर्षांतच हा व्यवसाय वाढू शकला. त्यानंतर ओ. पी. मुंजाळ यांना सुट्टे भाग बनवायला जमू लागले. मग त्यांनी त्याची पूर्ण सायकल बनवून पाहिली आणि मग ते प्रगतीची शिखरे चढतच गेले, त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
अभिषेक मुंजाळ यांनी सांगितले की, 'अल्प साधनं असूनही ओ. पी. मुंजाळ यांनी महत्त्वाकांक्षेमुळे यश मिळवले. स्वातंत्र्योत्तर देशाच्या वाटचालीसाठी स्वस्त आणि प्रभावी वाहतुकीचे साधन निर्माण करण्याकडे त्यांचे लक्ष होते.''
१९७५ मध्ये ही कंपनी भारतातील सर्वांत मोठी सायकल उत्पादक कंपनी बनली तर १९८६ मध्ये एका दिवसात सर्वाधिक बाईक बनविल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदण्याचा मान मिळवला.
पूर्वीच्या काळी आत्तासारखा गाड्यांचा सुळसुळाट नव्हता सायकल जास्त प्रमाणात वापरली जायची. कमी खर्चात कुठेही जाता येत होतं आणि मुख्य म्हणजे बाकीच्या वहानांपेक्षा जलद. तेव्हा बैलगाडी, घोडागाडी ही साधनं होती किंवा जास्तीत जास्त चालत जाणे हा पर्याय होता.
त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर हिरो सायकल आली आणि लोकांना दिलासा मिळाला. आताही जरी वाहतुकीची साधनं मोठ्या प्रमाणावर झाली आहेत तरी सायकल मागे पडलेली नाही.

लहान मुलांसाठी तर सायकल हा पर्याय वापरायला सोपा आणि सुरक्षित आणि आता बरीच मोठी लोकंही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सायकलचा वापर करताना दिसतात. त्यामुळे सायकल व्यवसाय वाढतच आहे कमी होत नाही.
चांगली व्यवस्थापन पद्धती, पारदर्शकता आणि त्रुटी तपासणी व त्यावर योग्य पर्याय निवडून काढण्यात हिरो सायकलला यश आले आहे त्यामुळे त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच आहे.
काही मोठ्या आणि जुन्या उद्योजकांना डिजिटलची लाट सर्वत्र असल्यामुळे उद्योगधंद्यात आव्हान वाटते, पण अभिषेकसारख्या तरुणाने हिरो सायकलबरोबर छान जुळवून घेतले आहे. व्यवसायात जर नवीन नवीन गोष्टी अॅड केल्या गेल्या तर फायदा नक्की होतो.
अभिषेक म्हणतात, ''आम्ही ग्राहक आणि उत्साही लोकांशी नियमितपणे कनेक्ट राहतो, आमच्या पुढच्या पिढीतील हिरो स्प्रिंट स्टोअरमध्ये सिम्युलेटेड राइड्स आणि मोबाईल अॅप उपलब्ध आहेत ज्यामुळे खरेदीदारास दुरुस्ती व देखभालीचे वेळापत्रक बसल्या जागी मिळते.
फक्त नेट चालू पाहिजे. मग बाहेर जायची गरज नाही.' जुन्या-नव्याची सांगड घालून त्यांनी व्यवसाय असा वाढवला आहे. हिरो सायकल्स ही देशातील सर्वांत मोठी सायकल कंपनी आहे.
आर्थिक वर्षांत अजून जास्त व्यवसाय करण्याचा आणि नवीन नवीन प्रॉडक्टस् लाँच करण्याचा कंपनीचा मानस आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात कंपनीची वाढ ८-९ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर गेली आहे. पुढील सहा महिन्यात अशीच वाढ होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.

२०१८ मध्ये कंपनीने सुमारे ५ दशलक्ष सायकल्स विकल्या, त्यांनी एकूण उत्पादन ७ दशलक्षापेक्षा कमी केलं होतं. पंकज मुंजाळ म्हणाले, ''एप्रिल/मे पर्यंत आम्ही आमची १३००० सायकल बनविण्याची कॅपासिटी २०,००० नी त्यांची पार्टनर कंपनी जस्ट बाय सायकल्स बरोबर चेन्नईमध्ये सहा दुकाने उघडली आहेत.
राष्ट्रीय पातळीवर आता २५० दुकाने झाली आहेत आणि या आर्थिक वर्षाअखेर त्यांचा ४०० दुकाने उघडण्याचा मानस आहे. मुंजाळ म्हणाले, ''दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीमुळे आणि जीएसटीमुळे बाजारातील शेअरचा हिस्सा २७ टक्क्यांपर्यंत आला होता.
पण आता सर्व स्थिती पूर्ववत होत आहे आणि तो हिस्सा आता ३५ पर्यंत वाढला आहे. तो ३९-४० टक्क्यांपर्यंत कसा वाढेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणतात की, 'दक्षिणेत विशेषत: चेन्नई आणि बंगळूरमध्ये लोक आरोग्य, करमणूक यासाठी पैसे खर्च जास्त करतात.
आम्ही आता नवीन इबाईक सुरू करत आहोत त्याची किंमत २७,००० आहे. तेव्हा तिथली लोकं ही विकत घेतील अशी आशा आहे. ई-बाईक युरोपमध्ये जास्त प्रमाणात चालतात त्यामुळे त्याचे डिझाईन युरोपमधून ते शिकत आहेत.
आपल्या बजेटमध्येही विद्युत वाहनांवर काही सवलती दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे विद्युत वाहनं घेणं कस्टमरच्या दृष्टीनं फायद्याचं ठरू शकेल व कंपनीचा बिझनेसही वाढेल.
मेहनत आणि ग्राहकाची नस सापडली की बिझनेस चांगला होताच. तसंच या हिरो सायकल्सचं आहे. त्यांना ग्राहकाला काय हवं याची योग्य कल्पना आलेली आहे आणि त्यासाठी सतत नवीन नवीन प्रयोग करण्याची म्हणजेच कष्ट करण्याचीही त्यांची तयारी आहे त्यामुळे त्यांचा उद्देश नक्कीच सफल होईल यात शंका नाही.

