रविवार, ३० एप्रिल, २०२३

*🌹वपुंच्या कथा आणि कादंबऱ्या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात. त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे सर्व मित्रांसाठी समर्पित.....*🌹🙏

 

*🌹वपुंच्या कथा आणि कादंबऱ्या यातून जीवनाची बरीचशी कोडी उलगडली जातात. त्यांच्या लेखनसंपदेतून काही विचारपुष्पे सर्व मित्रांसाठी  समर्पित.....*🌹🙏

*१) सर्वात जवळची माणसे सर्वात जास्त दुःख देतात.*

*२) सर्वात जीवघेणा क्षण कोणता?*
*खूप सदभावनेने एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच यावा व सद्हेतूंचीच शंका घेतली जावी.*

*३) सहनशक्ती जितकी चिवट तेवढा संसार चालतो.* 

*४) प्रेम म्हणजे काय?*
*दुसऱ्याच्या डोळ्यात आपली प्रतिमा पाहणे.*

*५) माणसाच्या जीवनाचा रथ प्रेमाच्या इंधनावर चालतो.*

*६) स्वतःजवळ जे असते तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो.*

*७) माणसाच्या जाण्यापेक्षा तो परत कधीही दिसणार नाही याच जाणिवेने मन जास्त दुःखी होते.*

*८) हसतीखेळती बायको हे केवढे वैभव आहे महाराजा.*

*९) सहवासाचा आनंद पैश्यात मांडता येत नाही.*

*१०) चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे मोठे प्रतीक आहे.*

*११) स्वतःच्या खिशाला ना परवडणारी स्वप्ने फक्त "बापच" विकत घेऊ शकतो.*

*१२) खर्च केल्याचे दुःख नसते, हिशोब लागला नाही की त्रास होतो.*

*१३) सर्वात जवळ असणाऱ्या माणसाने धोका दिल्याशिवाय जाग येत नाही.*

*१४) नातवंडं झाल्यावर म्हाताऱ्याचा विरोध बोथट होतो म्हणतात.*

*१५) माणसाने समोर बघायचे का मागे यावरच पुष्कळसं सुख दुःख अवलंबून असते.*

*१६) मन सांभाळायचं ठरवलं तर मन मारावं लागतं एका वेळेला एकच साधता येते.*
*स्वतःचं सुख नाहीतर दुसऱ्याचा मन.*

*१७) लोक खरं  मनात बोलतात आणि खोटं जगाला ओरडून सांगतात.*

*१८) आपल्याला वाटतं तितकं आपण स्वतंत्र नसतो.* 

*१९) समजूत घालायला कोणी नसले की स्वतःलाच बळ आणावं लागतं.* 

*२०) अपेक्षित गोष्टीपेक्षा अनपेक्षित गोष्टीत जास्त आनंद असतो. नाही का?*

*२१) जो गेल्यानंतरच कळतो त्याला "तोल" म्हणतात.*
 *✍🏻 वसंत पुरुषोत्तम काळे.*

*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा...!!!*

*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका...!!!*

 *🌺समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*

*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

*🙏यशोमंत्र... शांत रहा, शांतता राखा...*🌹🙏

 *🙏यशोमंत्र... शांत रहा, शांतता राखा...*🌹🙏


*समाजात माणसे असे म्हणतात की, राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही, राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत होण्यासाठी. कारण शब्द येत असतात.*

 *हृदयातून पण अर्थ काढले जातात, ते डोक्यातून या प्रमाणे तुमच्या जीवनामध्ये कित्येकदा किंवा मी तर म्हणेण की, प्रत्येक दिवसातून एकदातरी आपण इतरांच्यावर रागवत असतो. परंतु थोडा वेळ गेल्यानंतर आपण त्या व्यक्तीवर उगाचच रागावल्याची खंत आपल्या मनामध्ये जागी होते. नंतर तुम्ही पश्चाताप करून घेता अशी वेळ जर तुमच्या वर येऊ द्यायची नसेल तर शांत रहा आणि शांतता राखा तुमच्या ब-याच समस्या आपोआप सुटल्याची जाणीव तुम्हाला नक्कीच होईल.*

*एकदा कर्ण, कृष्ण आणि अर्जुन एका गावाच्या दिशेने चालत निघाले होते. अर्जुन कृष्णाला सारखा खोचकपणे विचारत होता, कर्णालाच का सगळे सर्वश्रेष्ठ दाता म्हणून संबोधतात आणि मला का नाही? लगेच कृष्णाने समोरच्या दोन टेकड्यांचे रूपांतर सोन्याच्या टेकड्यांमध्ये केले आणि अर्जुनाला म्हणाला, हे सगळे सोने गावक-यांमध्ये वाटून टाक. अट एकच एकूण एक सोने तू दान केले पाहिजेस. लगेच अर्जून जवळच्या गावात गेला आणि तिथे त्याने जाहीर केले की, मी प्रत्येक गावक-याला सोने दान करणार आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने टेकडीपाशी यावे. लोक अर्जुनाच्या मागे टेकडीच्या दिशेने चालू लागले. पुढे अर्जुन छाती काढून चालत होता. मागे गावकरी त्याचा जयजयकार करत होते.*

*दोन दिवस, दोन रात्री काम चालू होते. अर्जून खोदत होता आणि सोने काढून लोकांना देत होता. पण टेकडी थोडी देखील संपली नव्हती. लोक सोने घेऊन घरी जायचे आणि परत येऊन रांगेत उभे राहायचे. आता अर्जून अगदी दमून गेला होता. पण त्याचा अहंकार त्याला माघार घेऊ देत नव्हता. शेवटी त्याने कृष्णाला सांगितले की बास, आता यापुढे मी काम करू शकत नाही.*

*मग कृष्णाने कर्णाला बोलावले आणि सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकड्या आहेत त्या तू लोकांना दान करून टाकायच्या. लगेच कर्णाने पंचक्रोशीतील गावक-यांना बोलवले आणि सांगितले की, या दोन सोन्याच्या टेकड्या तुमच्या आहेत. एवढे सांगून कर्ण तिथून निघून गेला. लोक सोने वाहून नेऊ लागले. अर्जून चकित होऊन पाहात बसला. हा विचार आपल्या मनात का आला नाही, या प्रश्नाने तो अस्वस्थ झाला.*

*कृष्ण मिश्कीलपणे हसला आणि म्हणाला, अनावधानाने का होईना तू सोन्याकडे आकर्षित झालास तू गर्वाने प्रत्येक गावक-याला सोने वाटू लागलास. कर्णाच्या मनात असले काहीही नव्हते. त्याने शांत पद्धतीने दान केले आणि तो निघूनही गेला. आपले कुणी कौतुक करतंय, गुणगान गातंय. हे पाहण्यासाठी देखील तो थांबला नाही. व्यक्ती प्रकाशाच्या मार्गावर चालत असल्याचे हे लक्षण आहे... देणगीच्या बदल्यात लोकांनी आपले कौतुक करावे, शुभेच्छा द्याव्यात, धन्यवाद द्यावेत अशी अपेक्षा न ठेवून शांत राहून केलेल्या कर्माने माणूस यशस्वी होतो.*

*डोक शांत असेल तर, निर्णय चुकत नाहीत, भाषा गोड असेल तर, माणसं तुटतं नाहीत....*

*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा...!!!*

*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका...!!!*

 *🌺समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*

*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹



























by- internet

*व्हॉट्सअप चा वाढदिवस*

 *२४ फेब्रुवारी*


*व्हॉट्सअप चा वाढदिवस*

जेन कॉम याने २४ फेब्रुवारी २००९ रोजी व्हॉट्सअप INC या नावाने एक कंपनीची स्थापना केली. हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणार मेसेजिंग अप्प्लिकेशन आहे. आज प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये दुसरे कोणते अप्लिकेशन असो किंवा नसो पण व्हॉट्सअप हमखास बघायला मिळते. आज जगभरात १२५ कोटींहून अधिक लोक आपल्या दैनंदिन जीवनात व्हॉट्सअप चा उपयोग करतात.

व्हॉट्सअप याचा इंग्लिश मध्ये अर्थ होतो ’काय सुरु आहे ?’ या पाश्चिमात्य देशातील प्रसिध्द शब्दामुळे व्हॉट्सअप हे नाव या अप्लिकेशनचे ठेवण्यात आले. व्हॉट्सअप वापरणारे जगात सर्वाधिक लोक भारतात आहे. व्हॉट्सअप टीम मध्ये ५५ इंजिनियर काम करतात. यामध्ये एक इंजिनियर १ करोड ८० लाख वापरकर्त्यांना हॅन्डल करतो. व्हॉट्सअप वर रोज ४३०० करोड मेसेज सेंड होतात. तसेच रोज शेअर होणाऱ्या फोटोची संख्या १६० करोड एवढी आहे आणि व्हिडीओ ची संख्या २५ करोड एवढी आहे.

व्हॉट्सअप चा वापर आपण ५३ भाषामध्ये करू शकतो. महिन्याला अ‍ॅक्टीव वापरकर्ते १०० करोड आहे जे फेसबुक मेसेंजर पेक्षाही अधिक आहे. व्हॉट्सअप वर ग्रुपची संख्या १०० करोड पेक्षाही अधिक आहे. व्हॉट्सअप ने स्वतःच्या प्रसिद्धी करिता जाहिरातीवर रुपया सुध्दा खर्च केला नाही तरी ते एवढे लोकप्रिय आहे.

जगात सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अ‍ॅप पैकी व्हॉट्सअप हे १ व्या नंबरवरील अ‍ॅप आहे. व्हॉट्सअप 'नो अ‍ॅड पॉलीसी' वर काम करते त्यामुळे व्हॉट्सअप वर तुम्हाला कुठल्याही कंपनीची जाहिरात दिसत नाही. मी स्वत: रोज १०० हून अधीक ग्रूप वरती गेलो, पाच वर्षे रोज संगीत, मान्यवर लोकांची जयंती, पुण्यतिथी, वाढदिवस, आरोग्य, दिन विशेष, पदार्थ या विषयावर माहिती शेअर करत असतो. मी अंदाजे व्हॉट्सअप व फेसबुक मिळून ४०,००० लोकांना शेअर करतो.

*व्हॉट्सअपचा इतिहास* :

व्हॉट्सअप ची सुरवात जेन कॉम याने केली. त्यांचा जन्म युक्रेन देशातील छोट्याश्या गावी झाला. त्यांची आई एक गृहिणी आणि वडील एक मजदूर होते. त्याकाळी युक्रेन देशा मध्ये राजकीय परिस्थिती ठीक नसल्याने त्यांच्या आईवडिलांनी तिथून अमेरिकेत स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. ते त्यांचे आई वडील सगळे अमेरिकेतील कॅलिफोर्निया या शहरात राहायला आले. तिथे त्यांच्या आईवडिलांनी छोटी मोठी कामे करून घरचा आणि जेन यांच्या शिक्षणाचा खर्च भागवला. 

जेन कॉम यांना लहानपणापासूनच कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये खूप रस होता. परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना कम्प्युटर विकत घेणे परवडत न्हवते. १९ व्या वर्षी त्यांनी पैसे जमा करून स्वतः साठी एक कॉम्पुटर विकत घेतला आणि आपल्या घराजवळील लायब्ररी मधून प्रोग्रँमिंग ची पुस्तके आणून घरच्या घरी प्रोग्रामिंग शिकू लागले. यानंतर त्यांनी कॉम्पुटर सायन्स मधून आपली डिग्री पूर्ण केली आणि एक कंपनी मध्ये सिक्युरिटी टेस्टर च्या पदावर काम करू लागले. 

१९९७ मध्ये याहू या कंपनीत त्यांना इन्फ्रास्ट्रक्ट्चर इंजिनियर या पदावर नोकरी मिळाली. तिथे त्यांची ओळख ब्रायन अक्टन यांच्याशी झाली. दोघांनी मिळून ९ वर्ष याहू कंपनी मध्ये नोकरी केल्या नंतर फेसबुक मध्ये नोकरी करूया असा ठरवून याहू च्या नोकरीचा राजीनामा दिला. परंतु फेसबुक मध्ये नोकरीसाठी आवेदन दिल्यानंतर त्यांना तिथे रिजेक्ट करण्यात आले. 

दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा आपण आपली स्वतःची कंपनी सुरु करू असे दोघांनी ठरवले. आणि त्या हिशेबाने पैसे जमवायला सुरुवात केली. त्यावेळी अ‍ॅपल कंपनीने त्यांचा पहिला आयफोन बाजारात आणला होता, परंतु त्यात आपल्या नातेवाईक आणि मित्रांना मेसेज पाठवणे हे खूप खर्चिक होते. याचवेळी त्यांना व्हॉट्सअप ची कल्पना सुचली आणि दोघांनी मिळून व्हॉट्सअप हे नवीन मेसेजिंग अँप बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला याहू मध्ये काम करणाऱ्या त्यांच्या काही मित्रांनी मिळून कंपनी साठी अडीच लाख डॉलर्स चा फंड गोळा केला आणि २४ फेब्रुवारी २००९ ला व्हॉट्सअप INC या नावाने एक कंपनी ची स्थापना केली.

सुरुवातीचा त्यांनी जवळच एक ऑफिस कंपनीसाठी भाड्याने घेतले. तिथे हिटर ची व्यवस्था नसल्याने ते आणि त्यांचे सहकारी ऐन थंडीत दिवसातील १६ तास काम करायचे. सुरुवातीच्या दिवसात व्हॉट्सअप चा इन्कम महिन्याला फक्त ५००० डॉलर्स इतकाच होता. परंतु २०११ ला जेव्हा त्यांनी अँड्रॉइड मोबाईल साठी आपले व्हॉट्सअप लाँच केले तेव्हा त्यांचा इन्कम २ वर्षात २० पटीने वाढला आणि त्यांचे अँप Play Store मध्ये २० व्या क्रमांकाचे अँप बनले. 

२०१४ मध्ये व्हॉट्सअप चा प्रभाव एवढा वाढला कि फेसबुक चे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना फेसबुक मेसेंजर ची लोकप्रियता कमी होते की काय याची भीती वाटू लागली. यानंतर मार्क झुकेरबर्ग यांनी २०१४ मध्ये जेन कॉम यांच्याशी संपर्क करून व्हॉट्सअप ला विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जेन कॉम याना मार्क यांचा हा प्रस्ताव आवडला. यानंतर मार्क झुकेरबर्ग यांनी १९ बिलियन डॉलर्सला व्हाट्सअप खरेदी केले आणि जेन कॉम आणि ब्रायन अक्टन यांना कंपनीचे शेयर्स देऊ केले. जगाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा सौदा मनाला जातो. 







संकलन व संकल्पना
अनिल देशपांडे बार्शी

*चांगले केले तर चांगलेच होते याचे छान उदाहरण मास्तर साहेबांची स्कूटर*

 

*चांगले केले तर चांगलेच होते याचे छान उदाहरण मास्तर साहेबांची स्कूटर*
*प्रवीण भारती नावाचे एक शिक्षक होते. ते प्राथमिक शाळेतील मुलांना शिकवत असत. त्यांची शाळा गावापासून सात किलोमीटर दूर* *होती. शाळेच्या आसपासची जागा ही पूर्णपणे निर्जन होती.*
      
*त्यांच्या गावातून शाळेपर्यंत जाण्यासाठी क्वचितच वाहन मिळत असे, त्यामुळे ते बरेचदा कुणाकडून तरी लिफ्ट मागत असत. कधी जर लिफ्ट मिळाली नाही, तर असा विचार करत पायीच जात असत की, "देवाने मला दोन पाय दिले आहेत, तर त्यांचा उपयोग कधी होणार."*
     
*जेव्हा प्रवीणजी रोज लिफ्ट मागण्यासाठी उभे राहत तेव्हा विचार करत की, “सरकारने कुठल्या निर्जन ठिकाणी शाळा उघडली आहे, त्यापेक्षा गावातच मी किराणा मालाचे दुकान उघडलं असतं तर बरं झाल असतं.”*
       
*रोजच्या कटकटीतून सुटका मिळण्यासाठी प्रवीणजीनी थोडे थोडे पैसे जमा करून, चेतक कंपनीची एक नवीन कोरीकरकरीत स्कूटर विकत घेतली. स्वतःचे वाहन नसल्यामुळे जो त्रास प्रवीणजींनी सहन केला होता, त्यामुळे त्यांनी मनाशी एक खूणगाठ बांधली की कोणालाही लिफ्टसाठी नाही म्हणायचं नाही.*
      
*कारण, त्यांना हे माहित होतं की कोणी आपल्याला लिफ्ट नाकारली की किती ओशाळल्यासारखं होतं ते. आता प्रवीणजी रोज स्वतःच्या कोऱ्या करकरीत स्कूटरवरून शाळेत जात असत आणि रस्त्यात कोणी ना कोणी रोज त्यांच्याकडे लिफ्ट मागत असे आणि त्यांच्याबरोबर जात असे. परत येतानासुद्धा कोणी ना कोणी त्यांच्याबरोबर असे.*
       
*एक दिवस, जेव्हा प्रवीणजी शाळेतून परत येत होते तेव्हा रस्त्यात, एक व्यक्ती हताश होऊन लिफ्ट मागण्यासाठी हात दाखवत होती. आपल्या सवयीनुसार प्रवीणजींनी आपली स्कूटर थांबवली आणि ती व्यक्ती काहीही न बोलता त्यांच्या स्कूटरवर मागे बसली. थोड पुढे गेल्यावर त्या व्यक्तीने चाकू काढला आणि प्रवीणजींच्या पाठीवर टेकवून म्हणाला, "असतील तितके सगळे पैसे आणि ही स्कूटर माझ्या हवाली कर."*
      
*ही धमकी ऐकून प्रवीणजी खूप घाबरले आणि त्यांनी लगेच स्कूटर थांबवली. त्यांच्याजवळ जास्त पैसे नव्हतेच पण ही स्कूटर तर होतीच, जिच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. स्कूटरची किल्ली त्याला देत प्रवीणजी म्हणाले, "एक विनंती आहे."*
     
*"काय ?" त्या व्यक्तीने खेकसून म्हंटले.*
     
*प्रवीणजी विनंतीच्या सुरात त्याला म्हणाले, “तू कधीही कोणाला हे सांगू नकोस की ही स्कूटर तू कुठून आणि कशी चोरलीस, विश्वास ठेव मी पण पोलिसात तक्रार करणार नाही.”*
      
*त्या व्यक्तीने आश्चर्याने विचारले, "का?"*
    
*मनामध्ये असलेली भीती आणि चेहऱ्यावर असलेल्या औदासीन्याने प्रवीणजी म्हणाले, “हा रस्ता खूप उबड-खाबड आणि निर्जन आहे. इथे क्वचितच वाहन मिळते. त्यात या रस्त्यावर जर अशा घटना घडल्या तर जे थोडेथोडके लोक लिफ्ट देतात, तेसुद्धा लिफ्ट देणे बंद करतील.”*
      
*प्रवीणजींची ही भावपूर्ण गोष्ट ऐकून ती व्यक्ती हळवी झाली. त्याला प्रवीणजी एक चांगली व्यक्ती वाटली, पण त्यालाही तर स्वत:चे पोट भरायचे होते. "ठीक आहे" असं म्हणून तो स्कूटर घेऊन तिथून निघून गेला.*
      
*दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवीणजी, जेव्हा वर्तमानपत्र घेण्यासाठी दरवाजाजवळ आले व त्यांनी दरवाजा उघडला, तर त्यांना त्यांची स्कूटर समोर उभी असलेली दिसली. प्रवीणजींचा आनंद गगनात मावेनासा झाला. ते पळत पळत स्कूटर जवळ गेले आणि आपल्या स्कूटरवर प्रेमाने हात फिरवू लागले, जणूकाही ते त्यांचे मूल होते. त्यांना तिथे एक कागद चिकटवलेला दिसला.*
 
*त्यावर लिहिले होते :*
      
*“मास्टर साहेब, असं समजू नका की तुमच्या बोलण्याने माझं हृदय द्रवले.*

*काल मी तुमची स्कूटर चोरी करुन गावी गेलो, वाटलं भंगारवाल्याला ती विकून टाकावी, पण ज्याक्षणी भंगारवाल्याने ती स्कूटर पाहिली, मी काही बोलायच्या आधीच तो उद्गारला, "अरे ही तर मास्तर साहेबांची स्कूटर आहे."*
     
*स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात मी त्याला म्हणालो :*
.*"हो! मास्तर साहेबांनी मला बाजारात काही कामानिमित्त पाठवल आहे." कदाचित त्याला माझा संशय आला होता.*
         
*तिथून सूटून मी एका बेकरीत गेलो. मला खूप भूक लागली होती व काहीतरी खाण्याचा मी विचार केला. बेकरीवाल्याची नजर स्कूटरवर पडताच तो म्हणाला, "अरे ही तर मास्तर साहेबांची स्कूटर आहे." हे ऐकून मी घाबरून गेलो आणि गडबडून म्हणालो, "होय, या गोष्टी मी त्यांच्यासाठीच घेतोय, कारण त्यांच्या घरी काही पाहुणे आले आहेत.” कसंतरी करून मी तेथूनही निसटलो.*
      
*मग मी विचार केला की गावाबाहेर जाऊन कुठेतरी तिला विकून येतो. मी थोड्याच दूरपर्यंत गेलो होतो की नाक्यावरील पोलिसाने मला पकडलं आणि रागाने विचारले की, "कुठे चालला आहेस? आणि ही मास्तर साहेबांची स्कूटर तुझ्याकडे कशी आली?” मग काहीतरी बहाणा करून, मी तिथून ही पळालो.*
       
*पळून पळून मी आता दमलो आहे!*
        
*मास्तर साहेब ही तुमची स्कूटर आहे की अमिताभ बच्चन??* *सगळेच तिला ओळखतात. तुमची अमानत मी तुमच्या स्वाधीन करत आहे. तिला विकण्याची ना माझ्यात हिंमत आहे ना ताकद. तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल मला क्षमा करा आणि त्रास दिल्याच्या बदल्यात, मी तुमच्या स्कूटरची टाकी पूर्ण भरून दिली आहे.”*
      
*हे पत्र वाचून प्रवीणजींना हसू आले आणि ते म्हणाले, *"कर भला तो हो भला."*

                ♾
        
*जर तुम्ही उदात्त अंतःकरणाचे असाल, तर तुमच्या आसपासच्या लोकांना नक्कीच आनंद जाणवेल.*

*म्हणून जीवनात कधीही कोणालाही मदत करण्यास मागे पुढे पाहु नका......!*

*बरच काही बघितले आहे*

 


*बरच काही बघितले आहे*

 *पास होण्या पुरते ३५% मिळवूनही खुश होऊन पार्ट्या देणारे आणि ९५% मिळवून ही २% कमीच पडले म्हणून रडत बसणारेही बघितले.*

*जॉब अचानक गेल्यामुळे आता तसही दुसरा जॉब मिळेपर्यंत अनायसे सुट्टीच आहे तर मस्त फिरुन येऊ म्हणणारे आणि अपेक्षित Increment मिळालं नाही म्हणून करुन ठेवलेले Flight Bookings कॅन्सल करुन घरात उदास बसून राहणारेही बघितले आहेत.*

*जिभेच्या कॅन्सर मुळे नाकात नळी असतांनाही उत्साहाने गर्दीत जाऊन पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करणारा आणि नको त्या गर्दीत नाटक बिटक उगीच कशाला आजाराला निमंत्रण म्हणून घरात बसून राहणाराही बघितला आहे.*

*बाल्कनीतुन किती छान दिसतोय इंद्रधनुष्य म्हणून दोन्ही काखेत crutches लावून तरातरा बाल्कनीत बघायला जाणारा आणि कितीदा बघितलाय यार फोटोत, त्यात काय बघायचं म्हणत लोळत पडून राहणारा त्याचा रुम पार्टनर ही बघितला आहे.*

*फर्निश्ड थ्री बीएचके फ्लॅट मधे तेव्हाच थोडे पैसे अजून टाकून फोर बीएचके घेऊन टाकायला हवा होता म्हणून हळहळत बसणारे नवरा बायको आणि एकाच खोलीत काहीच पुरेसं नसूनही हसतखेळत आनंदात राहणारं पाच जणांचं एक कुटुंब ही बघितलं आहे.*

*हे नको खायला असं होईल, ते नको प्यायला तसं होईल ह्या टेंशन मधे ठराविक मोजकं मिळमिळीत खाऊन पिऊनही अटॅक ची चिंता डोक्यात ठेवणारे आणि जातील त्या ठिकाणी मिळेल ते झणझणीत चटपटीत बिनधास्त खाऊनही काही नाही होत यार म्हणत मजेत असणारे खवय्येही बघितले आहेत.*

*आयुष्य सगळ्यांना सारखंच मिळालेलं असतं, पण काही ते फुलवत जगतात , काही सुकवत जगतात....*

*आता त्याला कोण काय करणार?*

*जगा बिनधास्त.....✍🏽*

*""😘चूगलीखोर""... चूगलीखोरांना ओळखणे शक्य नसते. आपली ओळख लपवणे यावर चूगलीखोरीचे यश अवलंबून असते..*.😎😡🙏

 *""😘चूगलीखोर""... चूगलीखोरांना ओळखणे शक्य नसते. आपली ओळख लपवणे यावर चूगलीखोरीचे यश अवलंबून असते..*.😎😡🙏

   
*माणसामधली चूगलखोर ही एक अमानवी जमात आहे. जगातील बहुतेक भांडणे ह्याच जमातीची देण आहे. चूगलखोरांना ओळखणे सोपे नसते. ही जमात वेळोवळी हवे तशी रुपं पालटणारी असते. आपली कारस्थाने अत्यंत गुप्तपणे यशस्वी करण्यात या लोकांचा हातखंडा असतो. 'कान भरणे' ही म्हण याच लोकांमधून उदयास आली.*

*चूगलीखोरीचा धंदा नेहमी जोमात असतो. तो एखाद्याच्या घरापासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत वाढवता येतो. हा फार मोठा उद्योग आहे. अनेकांची पोटं यावर भरतात. यासाठी कुठलेही भाग भांडवल लागत नाही, फक्त अंगी नीचपणा हवा असतो. नीचपणातूनच चूगलखोरीचा जन्म होतो, चूगलखोरांनी अनेक चांगली माणसे व चांगल्या बाबी उध्दवस्त करुन दाखवल्या आहेत.*

*चूगलखोरांचा वावर सगळीकडे असतो. कुणाच्या तरी कानाजवळ ते निश्चित सापडतात. इकडचे तिकडे तेल मीठ लावून सांगता येणे हे कौशल्य त्यांच्याकडे असते. आपणास हवे तसे, हवे ते सांगण्याची कला त्यांच्याकडे उपजत असते.*

*या दूर्गुंणाच्या जोरावर अनेकांना देशोधडीला लावण्याचे पातक या लोकांनी केले आहे. ऐकणाऱ्याचे कान कच्चे असतील तर हा धंदा लवकर फोफावतो. ऐकणारा मूर्ख असेल तर धंद्याला बरकत येते. ऐकणारा अंहकारी असेल तर तो अंहकार कसा दुखवायचा याचे बाळकडू या लोकांकडे असते.*
 
*लोकांना नामोहरम करणे ह्यात यांचे सुख दडलेले असते. चूगलखोरी लिंगभेद करत नाही, जातीभेद मुळीच नाही. ही संपूर्ण जमात एकदिलाने चूगलवादी असतात. यांचे साम्राज्य फार मोठे असते. साम्राज्य निर्माण व नष्ट करण्याचे कसब त्यांच्याकडे असते.* 

*चूगलखोरांना ओळखणे शक्य नसते. आपली ओळख लपवणे यावर चूगलीखोरीचे यश अवलंबून असते. जगातील सर्व कटकटी लावण्याचे काम हीच टोळी करत असते. यांचे वावरणे सर्वत्र असते. मानाचे स्थान ते मिळवतात. कित्येकांची मैत्री, प्रेम हे लोक तोडून दाखवतात. यांनी अनेक आपल्या देशातील  चांगले चांगले लोकनेते, कार्यकर्ते,  तसेच काही सुसंस्कृत लोकांना देशोधडीला लावले आहेत.*

*चूगलखोर हा न दिसणारा शत्रू आहे. त्याची फक्त लक्षणे आहेत. परिणाम आहे पण तो दिसत नाही. तो महामारी सारखा पसरत आहे. अनेक निरपराध,निरोगी लोकांचे तो बळी घेत आहे. अनेकांना वेगवेगळ्या कामात धोका देत असतात. विश्वास तोडतात. किमान त्यांच्यापासून सावध असले पाहिजे. ही लोकं बहुधा  गोड-गोड बोलनारी व विश्वास घातकी असतात.*

*गुळात विष घालून देणारी असतात. आम्हाला तुमची खूप काळजी आहे असे दाखवतात. आम्हीच तेवढे साजूक बाकी सगळे  बेअक्कल असं त्यांना वाटत. लावालावी करणारे कितीही असो, परंतु ऐकणारे कच्च्या कानाचे असू नयेत.*

*चुगल्या लावणाराचं वाटोळं हे निश्चित असतं पण तोपर्यंत दुसरा पूर्ण तळाला गेलेला असतो. म्हणून नुसतं कानाने ऐकून डोळ्यांनी पाहिल्याशिवाय कोणताही गंभीर निर्णय घेऊ नये...*

*उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्या सभ्यतेचा विजय समजा....!*

*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या जीवनाची व आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही वाचवा...!!!*

*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका, वाद  वाढऊ नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे ...!!!*

 *🌺समाजातील खोट्या राजकारणी व स्वार्थी, मतलबी लोकांपासुन दूर रहा, खोट्या अफवानवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*

*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹






































by- WhatsApp

माझ्याबद्दल