शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

जग बदलणारे 5 शोध : वाचा प्राचीन भारताची महान शोधगाथा..















विज्ञान आणी तंत्रज्ञानाच्या कुबड्या घेऊन चालणारा आजचा मानव पाहीला की खरंच कमाल वाटते या विज्ञानाच्या करामतीची ! 

           या पाहूया असे काही शोध आणि संकल्पना ज्यांचा उगम भारतात झाला आणि ज्यांच्यामुळे जगाचा कायापालट झाला. हे आहेत जग बदलणारे ते 5 शोध...

१. शस्त्रक्रिया (सुश्रूत)

इ.स. पूर्व 800 च्या कालावधीत काशी येथे जन्मलेल्या सुश्रूत ऋषींना 'शल्यचिकित्सा शास्त्राचे जनक' मानले जाते. सुश्रूतांनी 300 प्रकारच्या शस्त्रक्रियांचा शोध लावला होता. यात मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे! त्या काळात ते कॉस्मेटिक सर्जरीसारख्या शस्त्रक्रियेचा उपचार सहज करत. शस्त्रक्रियेसाठी ते वेगवेगळी 125 प्रकारची साधने वापरत असत. त्यांच्या 'सुश्रूत संहिता'  या ग्रंथात वैद्यकीय शास्त्राची अचंबित करणारी माहिती दिली गेलीय.

2. गुरुत्वाकर्षण (भास्कराचार्य)

इ.स १११४ - ११८५ या काळात भारतात भास्कराचार्य नावाचे महान गणितज्ञ आणी ज्योतिषी होऊन गेले. ज्यांनी न्यूटनच्या जन्माच्या कीतीतरी आधीच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला होता. आपल्या ग्रथांत त्यांनी लिहलंय की 'पृथ्वी अवकाशीय पदार्थांना विशिष्ट शक्तीने आपल्याकडे खेचते.'
लीलावती, बीजगणित, ग्रहगणित, गोलाध्याय अशा अनेक ग्रथांची त्यांनी रचना केली. आजही जगभरात त्यांच्या ग्रथांचा अभ्यास केला जातो.

३. विमान (भारद्वाज)

रामायण, महाभारतातील 'पुष्पक विमानाबद्दल' तुम्ही वाचले असेल. यंत्र - मंत्र - तंत्र आणि आयुर्वेदात पारंगत असणारे भारद्वाज मुनी या अवकाशात भ्रमण करणाऱ्या यंत्राचे निर्माते होते. त्यांना विमानाचे जनक मानल्यास आश्चर्य मानू नका. त्यांच्या 'यंत्रसर्व' या ग्रंथात वैमानिक नावाचे प्रकरण आहे ज्यात विविध क्षमतेच्या 108 प्रकारच्या विमानांची माहिती आहे. ऋग्वेदापासुन महाभारतापर्यंत अनेक ग्रंथात भारद्वाज मुनींचा उल्लेख आढळतो. त्यांच्या ग्रंथात विमान बनवण्यापासून ते चालवण्याचे नियमही सांगितले गेले आहेत.

४. अणू सिद्धांत (कणाद)

आज अणूशक्तीचा महिमा सर्व जगाला परिचित आहे. जगाच्या नजरेत अणूशास्त्रज्ञ 'डॉल्टन' ने अणूसिद्धांत मांडला. पण त्याही आधी सुमारे २५०० वर्षांपूर्वी कणाद नावाच्या विद्वानाने वैश्विक अणू सिद्धांत मांडला होता. जगातील प्रत्येक पदार्थ हा लहानातील लहान कणांनी बनला आहे. हे त्यांनी त्या काळात सांगितले आहे. ते रस्त्यावर सापडणाऱ्या वस्तूंचे कण करून त्याचा अभ्यास करायचे यामुळे त्यांना कणाद हे नाव मिळाले. इतकेच नव्हे तर न्यूटनच्या आधीच कणादांनी गतिचे तीन नियम इ.स. पूर्व सहाव्या शतकातच मांडले आहेत.

५. शून्य (आर्यभट्ट - प्रथम)

भारताकडून जगाला मिळालेली अनोखी भेट म्हणजे 'शून्याचा शोध'. सन ४९८ च्या कालावधीत भारतातील 'आर्यभट्ट' नावाच्या महान गणितज्ञ आणि ज्योतिष्याने दशांश पद्धती आणी शून्याची कल्पना लोकांसमोर आणली. तत्पूर्वी लोकांना एका ठराविक मर्यादेपर्यंतच संख्या लिहिता येत होत्या. त्यांनी लिहिलेल्या 'आर्यभट्टीय' या ग्रंथात शून्याच्या वापरासंबंधी सविस्तर माहिती मांडली आहे. संख्येसमोर शून्य लावल्याने त्या संख्येची किंमत दसपटीने वाढवता येऊ लागली. शून्याचा अविष्कार झाल्यानंतर गणितीय संकल्पनाचे स्वरुपच बदलून गेले.

इतकेच नाही तर योगशास्त्र, आयुर्वेद, सुती कपडे, लिखानाची शाई, मार्शल आर्ट, हिर्‍यांना पैलू पाडण्याची कला, दिशादर्शक यंत्र, संमोहन कला अशा अनेक गोष्टी प्राचीन भारतीय संस्कृतीने या जगाला दिल्या. त्या 'प्राचीन आणि समृद्ध' भारतासमोर आजचा आधुनिक भारत खूपच मागास वाटतो.. नाही का?

स्त्रोत : विकिपीडिया

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल