शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१८

आता तांत्रिक ज्ञानाशिवाय स्वतःच तयार करा स्वतःची वेबसाईट...



स्वतःची वेबसाईट खर्चिक काम आहे असा एक गैरसमज आहे. खरतरं नवनवीन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज कोणीही म्हणजे अगदी पाचवीतला विद्यार्थी देखील स्वतः वेबसाईट बनवू शकतो आणी तेही तांत्रिक ज्ञानाशिवाय, केवळ शब्द टाईप करता यायला हवेत. तुम्ही इंग्रजी,मराठी त्याचप्रमाणे हिंदीतही वेबसाईट बनवू शकता.
तुम्ही एखादी संस्था चालवता का? किंवा तुम्ही उद्योजक आहात का? किंवा तुम्हाला जनसंपर्क वाढवायचाय का? तुम्हाला तुमचे स्वतःचे संकेतस्थळ असावे असे वाटते का? यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जर हो असेल तर मग हा लेख तुमच्यासाठीच आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर नवनवीन तंत्रज्ञानाची कास धरायलाच हवी याशिवाय केवळ मेहनत करून उपयोग नाही तर त्याचे मार्केटिंग देखील तितक्याच जोमाने करायला हवे. स्वतःचे संकेतस्थळ असणे म्हणजे याचाच एक प्रकार आहे. आज अगदी पंतप्रधानांपासून ते पुणेरी पाट्यांपर्यंत प्रत्येकाची वेबसाईट अस्तित्वात आहे, मग तुम्ही तरी यामध्ये मागे का रहावे?
     स्वतःची वेबसाईट बनवणे म्हणजे अत्यंत खर्चिक काम आहे असा एक गैरसमज देखील बघायला मिळतो. स्वतः वेबसाईट बनवायची असेल तर प्रचंड तांत्रिक ज्ञान आणी कौशल्य आवश्यक आहे असाही एक गैरसमज आढळतो.

खरतरं नवनवीन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज कोणीही म्हणजे अगदी पाचवीतला विद्यार्थी देखील स्वतः वेबसाईट बनवू शकतो आणी तेही तांत्रिक ज्ञानाशिवाय, केवळ शब्द टाईप करता यायला हवेत. तुम्ही इंग्रजी,मराठी त्याचप्रमाणे हिंदीतही वेबसाईट बनवू शकता.

आता तांत्रिक ज्ञानाशिवाय स्वतःच तयार करा स्वतःची वेबसाईट



  • तुम्ही स्वतः तुमची, व्यवसायाची, संस्थेची माहिती देण्यापेक्षा लाखो लोक ती माहिती वेबसाईटवरून मिळवतील.
  • तुम्ही थेट जनसंपर्क प्रस्थापित करू शकता. वेबसाईटवर भेट देणारे अनोळखी लोक तुम्ही माहिती दिल्याप्रमाणे तुमच्याशी थेट संपर्क साधू शकतील.
  • तुम्ही स्वतःचे ऑनलाईन दुकान उघडू शकता आणी व्यवसाय करू शकता आणी थेट पैसे स्वीकारु देखील शकता.
  • तुमचा सुरु असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी संकेतस्थळ मोलाची भूमिका बजावेल.


     आज आपण अशाच एका संकेतस्थळाविषयी माहिती घेणार आहोत जिथे आपण सहज आपली वेबसाईट बनवू शकतो. DIY तंत्रज्ञान म्हणजे Do it yourself – तुमचे तुम्हीच करा याची मदत घेऊन केवळ तीन पायऱ्यांमध्ये आपण आपले संकेतस्थळ बनवू शकतो.

१) तुम्हाला आवडणारी डिझाईन (थीम) निवडा –

१७० पेक्षा अधिक आकर्षक आणी व्यावसाईक दर्जाचे डिझाईन्स आणी जवळपास ८५,००० हून अधिक छायाचित्रे उपलब्ध.

२) संकेतस्थळावर माहिती भरा –

जी तुम्हाला तुमच्या संकेस्थळावर प्रसिद्ध करायची आहे. तुमच्या संकेस्थळावर तुम्ही तुमची, तुमच्या संस्थेची किंवा व्यवसायाची माहिती देऊ शकता. तुम्हाला हवी त्याप्रमाणे, थोडी, मध्यम किंवा सर्व माहिती जगासमोर मांडू शकता.

३) आणी वेबसाईट जगासमोर प्रसिद्ध करा –

     तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती भरून झाल्यावर वेबसाईट जगासमोर प्रसिद्ध करता येते. नंतर जर कधी तुम्हाला डिझाईन किंवा माहिती बदलायची असेल किंवा पूर्ण नवीन माहिती लिहायची असेल तर तुम्ही ते किती वेळा बिनदिक्कतपणे करू शकता.

(Bigrock) बिगरॉक ह्या संकेस्थळावर अशा प्रकारे Do it yourself सेवा दिली जाते. इतरही अनेक संकेतस्थळांवर ही सेवा दिली जाते पण बिगरॉकची सेवा मला इतरांपेक्षा अधिक सरस आणी स्वस्त आहे असे दिसते.
(Bigrock) बिगरॉक Do it yourself  सेवेबरोबरच विनामुल्य मिळणाऱ्या इतर गोष्टी..

  • - गुगल द्वारे जाहिरात करण्यासाठी रुपये. २५०० किमतीचे कुपन्स
  • - २ जी.बी क्षमतेची ईमेल खाती
  • - फोटो, व्हिडियो, नकाशा आणी इतर गोष्टी जोडण्याची सुविधा
  • - गुगल याहू सारख्या सर्च इंजिन्सना त्यांच्या भाषेत माहिती देण्याची सुविधा 
  • - तुमच्या वस्तू, सेवा विकण्याची आणी पैसे स्वीकारण्याची सुविधा
  • - काही अडचण उद्भवल्यास २४ तास कधीही संपर्क करण्याची सुविधा
  • - स्वतंत्र ब्लॉग तयार करण्याची सुविधा
  • - तुम्ही तयार केलेले संकेतस्थळ मोबाईलवर उघडल्यावर आपोआप मोबाईल संकेतस्थळात बदलले जाईल, त्यामुळे मोबाईलवर संकेतस्थळ वापरताना अडचण येणार नाही.


तुम्ही जर स्वतः संकेतस्थळ तयार करत असाल तर उपलब्ध असलेल्या लेखांमुळे शक्यतो अडचण येणार नाही आणी जरी आली तरी तुम्ही दिवसाच्या २४ तासात कधीही संपर्क करून त्याचे निवारण करू शकता.
तुम्ही वेबसाईट नक्कीच तयार करू शकता आणी नमुना वेबसाईट (तात्पुरती) बनवून पाहण्यासाठीइथे टिचकी द्या.

पैसे न भरता तुम्ही इथे तात्पुरती वेबसाईट बनवू शकता आणी जर आवडली तर Do It Yourself  सेवा विकत घेऊ शकता.

गुगल आणी १० अफलातुन करामती..



कोणत्याही विशेष मुहूर्ताला गुगल आपला नेहेमीचा लोगो बदलून त्याजागी दिनविशेष दाखवणारा लोगो दाखवते (उदा – एखाद्याचा वाढदिवस, एखाद्याचा स्मृतीदिन इत्यादी) इतकेच नव्हे तर गुगल तुमच्या वाढदिवसाला देखील अशा प्रकारचे डूडल दाखवते, पण फरक इतकाच कि ते फक्त तुम्हालाच दिसते (पर्सनलाईज सेवेच्या माध्यमातुन) जगभरातील काही डेव्हलपर्सनी गुगलचा वापर करून काही अफलातुन करामती सादर केल्या आहेत याच गुगलच्या काही भन्नाट आणी अफलातुन १० करामती येथे दिल्या आहेत.
गुगल आणी १० अफलातुन करामती

नुकतेच गुगल या इंटरनेटवरील सर्वात मोठ्या संकेतस्थळाने आपला १५ वा वर्धापन दिवस साजरा केला. गुगलने त्या दिवशी डूडलच्या माध्यमातून जगभरातील वापरकर्त्यांवर शेकडो चॉकलेटसचा अक्षरशः पाऊस पाडला सर्वात जास्त चॉकलेटस मिळवण्याची स्पर्धाच जणू नेटिझन्स मध्ये लागली होती. कोणत्याही विशेष मुहूर्ताला गुगल आपला नेहेमीचा लोगो बदलून त्याजागी दिनविशेष दाखवणारा लोगो दाखवते (उदा – एखाद्याचा वाढदिवस, एखाद्याचा स्मृतीदिन इत्यादी) इतकेच नव्हे तर गुगल तुमच्या वाढदिवसाला देखील अशा प्रकारचे डूडल दाखवते, पण फरक इतकाच कि ते (पर्सनलाईज सेवेच्या माध्यमातुन) फक्त तुम्हालाच दिसते.  जगभरातील काही डेव्हलपर्सनी गुगलचा वापर करून काही अफलातुन करामती सादर केल्या आहेत याच गुगलच्या काही भन्नाट आणी अफलातुन १० करामती येथे दिल्या आहेत.


१) गुगल ग्रॅव्हीटी (Google Gravity) –  
     गुगल ग्रॅव्हीटी म्हणजे न्युटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताला गुगलने दिलेली मानवंदना असे गमतीने म्हटले जाते. गुगल अतिशय वेगवान आणी सुरक्षित असलेले संकेतस्थळ आहे हे सर्वश्रुत आहे पण गुगलवर आपण जेव्हा शोध घेतो तेव्हा प्रत्येक वेळी आपल्याला हवी असलेली माहिती सापडतेच असे नाही मग अशा वेळी गुगलच्या होमपेजवरील सगळ्या गोष्टींची मोडतोड करून त्या अस्ताव्यस्त करायला तुम्हाला आवडु शकेल. जेव्हा अस्ताव्यस्त केलेल्या गोष्टी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे खाली पडतील तेव्हा तुम्ही पुन्हा उचलून त्या हवेत उडवू शकता. तुम्हाला आलेल्या रागाचे मनोरंजनात किंवा असुरी आनंदात  रूपांतर करण्यासाठी पहायलाच हवी अशी गुगल ग्रॅव्हीटी. 

२) गुगल स्पहीयर (Google Sphere) –  
     नेहेमी शांत आणी गुणी बाळाप्रमाणे वागणाऱ्या गुगलने अचानक तुम्हाला चकवा द्यायला सुरुवात केली तर ?? गुगल स्पहीयर म्हणजे याचेच एक द्वाड उदाहरण आहे. तुम्ही इमेज सर्च करायला गेला कि हवे असलेले कीवर्ड्स टाइप करून सर्च इमेजेस या बटणावर टिचकी द्यायला गेला आणी तेवढ्यात जर ते बटन तुमच्या हातावर तुरी देऊन धुम पळत सुटले तर तुम्हाला इमेजेस सर्च करण्यासाठी नक्कीच थोडा पकडापकडीचा खेळ खेळावा लागेल आणी यामध्ये जीमेल, मॅप्स, न्युज असे इतर उत्सुक दुवेदेखील सामील होतील हे निश्चित. 

३) गुगल झेर्ग रश (Google Zerg Rush) –  
     आपणच निर्माण केलेल्या गोष्टीची आपणच सहसा विल्हेवाट लावत नाही पण गुगल झेर्ग रश मात्र याला अपवाद आहे. तांदूळ, गहू अशा धान्यांमधले किडे तोडणीनंतर प्रक्रिया करून काढले जातात नाहीतर असे किडे धान्य खराब करू शकतात पण गुगलच्या शोधांमध्ये मात्र असे किडे येतील आणी चक्क सर्च रिझल्ट्सच खाऊन संपवतील अशी कल्पना खुद्द गुगलचे निर्माते सर्जी आणी लॅरी यांनीही केली नसेल.  गुगल झेर्ग रश मधील किडे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून गुगल मधीलच ‘ओ’ हि इंग्रजी अक्षरे आहेत पण तुमचे सर्च रिझल्ट्स वाचवण्यासाठी तुम्हाला कीटकनाशक फवारणी एवजी एक + च्या आकाराची बंदूक दिली जाते. 

४) गुगल पॅक मॅन (Google Pac Man) -  
     जर तुम्ही ९० च्या दशकात जन्मलेले असाल तर तुम्ही पॅक मॅन हा खेळ नक्कीच खेळलेला असाल. गुगलने हा खेळ पॅक मॅनच्या ३० व्या वाढदिवसाला (२१ मे २०१२) सन्मान म्हणुन डूडलच्या रुपात पुन्हा जगापुढे आणला. अगदी जुन्या रुपात म्हणजे कॉईन टाकल्याशिवाय सुरु न होणे इत्यादी बारकावे देखील आपल्याला पहायला मिळाले. तुम्हाला जर हा खेळ परत डूडल वर खेळायचा असेल तर मात्र तुम्हाला पॅक मॅनच्या ५० व्या किंवा ६० व्या वाढदिवसापर्यंत वाट पहायची आवश्यकता नाही. गुगलच्या डूडल अर्काईव्हज मध्ये तुम्ही हा खेळू शकता. 

५) गुगल टर्मिनल (Google Terminal) –  
     तुम्हाला माहिती आहे का बिल गेट्स यांनी फक्त कोडिंगच्या ज्ञानावर जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावला होता? ज्यावेळी पर्सनल कॉम्प्युटर अस्तित्वात आले तेव्हा ते कसे दिसत असतील हे जाणून घेण्यासाठी गुगल टर्मिनल तुम्हाला उपयोगी पडू शकेल याचे होमपेज पाहिल्यावरच आपल्याला जुन्या पद्धतीच्या कोडिंग संदर्भात कल्पना येते. त्या पद्धतीचे कोडिंग आजही बायोस मेन्यूमध्ये तुम्हाला बघायला मिळते पण एकदा संगणकावर ‘वेलकम’ असा संदेश झळकला कि आजची रंगीबेरंगी साधी आणी सोपी संगणक प्रणाली पहायला मिळते. गुगल टर्मिनल मध्ये शोध घेताना फक्त किबोर्डचाच वापर आवश्यक आहे. 

६) गुगल अंडरवॉटर (Google Underwater) –  
     आपण केलेली मेहेनत पाण्यात जाऊ नये अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याचप्रमाणे कोणाला पाण्यात पाहणे असभ्यपणाचे लक्षण मानले जाते पण गुगल अंडरवॉटर वापरून घेतलेले शोध मात्र पहायचे असेतील तर मात्र गुगलला पाण्यात पाहण्यावाचून काही उपाय उरत नाही. सुरुवातीला पाण्यावर तरंगणारा सर्च बॉक्स शोध घेतल्यानंतर मात्र सापडलेल्या शोधांच्या वजनाने जड होतो आणी सगळ्या शोधांसह पाण्याखाली बुडतो म्हणूनच गुगल अंडरवॉटर वापरून घेतलेले शोध पहाताना ते पाण्यात पहावे लागतात. 

७) लेट मी गुगल दॅट फॉर यु (Let Me Google That for You) –  
     गुगल वर शोध घेण खरच खूप अवघड असते का?? नक्कीच नाही पण गुगल पहिल्यांदा वापरताना कदाचित एखाद्याला अडचण येऊ शकते, यावेळी तुम्ही ‘लेट मी गुगल दॅट फॉर यु’ चा वापर करू शकता. येथे होमपेजवर आपला नेहेमीचा गुगल सर्च बॉक्स दिसतो तेथे जाऊन कीवर्ड टाइप करायचे आणी सर्च बटणावर टिचकी द्यायची आता नेहमीप्रमाणे सर्च न होता एक लिंक तयार होईल जी तुम्ही नंतर कधीही वापरू शकता. ह्या लिंकवर टिचकी दिल्यावर दर वेळेस कीवर्ड टाइप होण्यापासून ते सर्च रिझल्ट्स दिसेपर्यंत सर्व प्रोसेस तुम्ही पाहू शकाल आणी सरतेशेवटी तुमच्याकडे असतील सर्च रिझल्ट्स. एक उदाहरण तुम्ही या दुव्यावर पाहू शकता. 



आपण गुगलच्या इतक्या अफलातुन आणी मनोरंजक करामती पहिल्या, आता उपयोगी पडणाऱ्या काही सुविधांची माहिती घेऊयात.


८) स्ट्रीट व्ह्यू (Google Street View) –  
     नकाशा पहाताना तुम्ही बहुतेक वेळेला गुगल मॅप्सचा वापर करत असाल तर स्ट्रीट व्ह्यू हि सुविधा तुम्ही वापरायलाच हवी. सध्या भारतातील नकाशा स्ट्रीट व्ह्यू मार्फत पाहता येत नसला तरीही इतर देशातील नकाशे पाहू शकाल. स्ट्रीट व्ह्यू म्हणजे चक्क एखाद्या रस्त्याचा फोटो होय, पण थांबा स्ट्रीट व्ह्यू सुविधा तुम्हाला नुसताच फोटो दाखवत नाही तर तुम्ही तुमचा किबोर्ड वापरून पुढे-मागे चालू शकता डाव्या-उजव्या बाजूला वळू शकता म्हणजेच थोडक्यात एखादा व्हिडियो-गेम खेळल्याप्रमाणे तुम्ही त्या देशाची मुक्त भटकंती करू शकता याशिवाय व्हाईट हाउस सारख्या स्थळांचाही समावेश गॅलेरी मध्ये करण्यात आलेला आहे. 

९) अकाऊंट अॅ‌‍क्टीव्हीटी (Google Account Activity) -  
     अकाऊंट अॅ‌‍क्टीव्हीटी म्हणजे एक अशाच प्रकारची उपयुक्त सुविधा आहे जी तुम्हाला तुमच्या गुगल अकाऊंटची सर्व माहिती पुरवते. तुम्ही पाठवलेले सर्व ई-मेल्सची संख्या, गुगल वर केलेले सर्च इत्यादी याशिवाय तुम्ही पाहिलीली संकेतस्थळे, सबस्क्राइब केलेल्या फिड सुविधा याबाबतही माहिती  गुगलच्या अकाऊंट अॅ‌‍क्टीव्हीटी मध्ये उपलब्ध आहे. 

१०) टेक-आउट (Google Takeout) – 
     कदाचित तुम्हाला माहिती नसेल कि तुम्ही जेव्हापासून गुगल प्रोडक्ट्स वापरत आहात (उदा- गुगल अर्थ, गुगल क्रोम) तेव्हापासून गुगलकडे तुमच्याबद्दलची इत्यंभूत माहिती जमा केली जात आहे, रिसर्चच्या नावाखाली जमा केली जात असलेली सर्व माहिती गुगल पर्सनलाईझ सेवा देण्यासाठी वापरते आणी याच माहितीचा वापर करून तुमच्यासाठी सर्वाधिक योग्य अशा जाहिराती देखील दाखवल्या जातात ज्या तुम्हाला आवडु शकतात. तुम्हाला देखील तुमच्याबद्दलची गुगलकडे असणारी माहिती हवी असेल तर तुम्ही ती डाऊनलोड करू शकता, पण सर्व माहिती तुम्हाला दाखवण्यात येत नाही त्यामुळे जितकी आवश्यक तितकीच माहिती तुम्हाला पुरवण्यात येते आणी गुगलकडे तुमच्याबद्दल असलेली माहिती तुम्ही गुगलच्या पॉलिसीनुसार डिलीट करू शकत नाही

विद्यार्थीदशेत स्वतःचा व्यवसाय कसा सुरु कराल ?...

भारतात व्यवसायासाठी पूरक वातावरण तयार होत आहे, त्याचा फायदा घेऊन विद्यार्थी आपला स्वतंत्र व्यवसाय कसा सुरु करू शकतील याबाबत या लेखात पाहुयात
----------------------
जेव्हा  विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणाच्या टप्प्यात असतात तेव्हा त्यातील १०% विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला असतो, १७% विद्यार्थी शिक्षण पूर्ण होण्याआधी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे ठरवतात तर २७% विद्यार्थी शिक्षण पूर्ण झाल्यावर पुर्णपणे व्यवसायाच्या क्षेत्रात उतरायचे ठरवतात. ही जरी जागतिक आकडेवारी असली तरी भारतातही आता तरुणांचा व्यावसायिक होण्याकडे कल वाढत चालला आहे, त्याच अनुषंगाने तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असलेले विद्यार्थी असाल तर आजचा लेख तुमच्यासाठीच आहे..!!


विद्यार्थीदशेत स्वतःचा व्यवसाय कसा सुरु कराल ?
एक आयडीया जो बदल दे आपकी दुनिया..

६ पायऱ्यांमध्ये आपण याबाबत माहिती घेऊयात

 # १. स्वतःचा शोध घ्या – 
तुम्हाला कशा प्रकारची कौशल्ये अवगत आहेत? कोणत्या गोष्टीबद्दल तुमच्याकडे अधिक ज्ञान आहे? तुम्हाला कोणत्या क्षेत्रात काम करायला आवडेल? तुम्हाला कशा प्रकारे काम करायला आवडेल? या मुलभूत प्रश्नांचा शोध घ्या
खरं तर तुम्हाला एखाद्या क्षेत्राचा पुरेसा अनुभव गाठीशी असणे चांगले आहे पण अनुभवा अभावी एखाद्या क्षेत्रात जाण्याची भीती बाळगू नका. फेसबुक संस्थापक मार्क झुकरबर्ग म्हणतो वेगाने बदलणाऱ्या या जगात जर एखाद्याने धोका पत्करला नाहीत तर तो नक्कीच अपयशी होईल याची खात्री आहे. कारण धोका न पत्करणे हाच सगळ्यात मोठा धोका आहे.

 # २. चांगली कल्पना शोधा – 
एक चांगला व्यवसाय म्हणजे तो आहे जो लोकांची नस ओळखून त्या दृष्टीने पाऊलं टाकतो, ग्राहकाची गरज ओळखून ती भागवतो.

  • तुमच्या उत्पादनाला किंवा सेवेला बाजारात मागणी आहे का?
  • ग्राहक तुमचे उत्पादन किंवा सेवा विकत घेऊ इच्छितात का?
  • तुमच्या उत्पादनात किंवा सेवेत इतरांच्या उत्पादन किंवा सेवांच्या तुलनेत नाविन्य आहे का?
  • तुम्ही शक्यता असलेल्या उणीवा आणी मर्यादांचा विचार केला आहे का?
  • तुमचे उत्पादन किंवा सेवा कायदेशीर आहेत का?
यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही असेल तर एखादी नवीन कल्पना घेऊन सर्व उत्तरे हो येईपर्यत हे प्रश्न पुन्हा विचारत रहा. तुमची सर्व उत्तरे जर हो असतील तर तुमचे उत्पादन किंवा सेवा सध्यातरी बाजारात उतरण्यासाठी तयार आहे पण हे प्रश्न वारंवार विचारत रहा जेणेकरून तुमचा व्यवसाय व्यवस्थित सुरु राहील.

 # ३. प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करा – 
कोणत्याही व्यवसायात उतरण्याआधी त्या व्यवसायात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या प्रतिस्पर्ध्यांचा अभ्यास करा त्यांच्याशी द्वेषभावना न ठेवता मैत्रीपूर्ण स्पर्धा करा.

यासाठी प्रतिस्पर्ध्यांची माहिती
  • इंटरनेट - तुम्ही इंटरनेटवरून मिळवू शकता. प्रतिस्पर्धी कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतात त्यांची पद्धत काय, त्यांना असलेला ग्राहकांचा प्रतिसाद कशा प्रकारचा आहे याबद्दल माहिती मिळवा.
  • इतर माध्यमं - इतर माध्यमांद्वारे (उदाहरणार्थ – वर्तमानपत्र, मासिक, पत्रक इत्यादी) येणाऱ्या जाहिराती,  माहिती याकडे लक्ष द्या. त्यांच्या जाहिरातींच्या पद्धतीबद्दल जाणून घ्या.
  • उपस्थिती - प्रतिस्पर्ध्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावा, तेथील संबंधित व्यक्तींची भेट घ्या, प्रतिस्पर्ध्यांबद्दल जाणून घ्या. प्रतिस्पर्ध्यांची बलस्थाने त्यांच्या कमकुवत बाजू यांची नोंद घ्या.
  • अभ्यास - प्रतिस्पर्ध्यांची काम करण्याची शैली, पद्धत आणी शक्य असल्यास उत्पादन किंवा सेवा निर्माण करण्याची तसेच ती ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया याबद्दल माहिती घ्या.
 # ४. व्यवसायाचा आराखडा तयार करा – 
प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याआधी एक प्रारंभिक स्वरूपाचा आराखडा तयार करा. एक यशस्वी व्यावसायिक आराखडा तुमच्या व्यवसायाची कल्पना योग्य प्रकारे मांडेल. व्यवसाय चालवण्यासाठी तुमची दीर्घकालीन उद्दिष्टे आखा. तुमच्या व्यावसायिक आराखड्यात खालील गोष्टी असायला हव्यात..
  • व्यवसायाची संकल्पना – व्यवसायाच्या क्षेत्राबद्दल मुलभूत माहिती, व्यवसायाची रचना (वन पर्सन कंपनी, खासगी कंपनी, पार्टनरशिप फर्म इत्यादी) आणी तुम्ही जी सेवा किंवा उत्पादन सादर करणार आहात त्याबद्दलची माहिती.
  • मार्केट आणी प्रतिस्पर्धी – जे ग्राहक तुमच्या सेवा किंवा उत्पादनात घेण्यात रस दाखवू शकतील त्यांची माहिती. तुमची सेवा किंवा उत्पादन यांच्याशी साधर्म्य असणारी इतर सेवा किंवा उत्पादन यांची माहिती त्याचबरोबर त्या व्यवसायातील प्रतिस्पर्ध्यांची माहिती.
  • विक्री आणी विपणन (मार्केटिंग) – तुम्ही ग्राहकांपर्यंत तुमची सेवा किंवा उत्पादन कसे पोहोचवणार आहात तसेच ते  वापरण्यासाठी कसे आकृष्ट करणार आहात याबद्दलची तुमची योजना.
  • व्यवस्थापन विभाग – सर्व गोष्टींचे व्यवस्थापन करणाऱ्या विभागाविषयी माहिती. उदाहरणार्थ कोणत्या प्रकारची व्यक्ती कोणत्या प्रकारची जबाबदारी सांभाळेल, कोणत्या प्रकारच्या व्यक्तीकडून कोणत्या प्रकारची कौशल्य अपेक्षित आहेत इत्यादी
  • आर्थिक बाजू – तुम्ही सेवा किंवा उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आलेला खर्च, इतर खर्च आणी अपेक्षित नफा या सर्वांचा ताळेबंद करून जे भांडवल अपेक्षित आहे ते आणी त्याच्या व्यवस्थेबद्दल माहिती.
(विद्यार्थ्यांसाठी तसेच व्यवसाय सुरु करू इच्छिणार्यां साठी भारत सरकार तसेच खासगी बँकांच्या कर्ज योजना उपलब्ध आहेत, त्याचा वापर करून घेता येईल)
 # ५. गुरु, सल्लागार, दिशादर्शक – 
आराखडा तयार झाल्यावर त्या व्यवसायातील अनुभवी व्यक्ती ज्या तुम्हाला दिशा दाखवू शकतील अशा व्यक्तींशी संपर्क साधा,
  • शंका - व्यवसायासाबद्दल त्यांच्याकडून तुमच्या सर्व शंकांचे निरसन करून घ्या.
  • आवश्यक बाबी - व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींबद्दल जाणून घ्या.
  • अनुभव - व्यवसायातील त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून घ्या.
  • पूर्वतयारी - त्यांच्या मदतीने व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी करा.
 # ६. व्यवसायाची नोंदणी – 
काही पद्धतीचे व्यवसाय नोंदणी न करता देखील करता येत असले तरी व्यवसायाची नोंदणी केल्याचे बरेच फायदे आहेत. तुम्ही तुम्हाला हव्या त्या प्रकाराखाली व्यवसायाची नोंदणी करू शकता

  • One Person Company (वन पर्सन कंपनी) – भारतात हा प्रकार नुकताच खुला करण्यात आला आहे, आता तुम्ही (केवळ एक व्यक्ती, तुम्ही किंवा कोणीही)  खासगी कंपनी सुरु करू शकता.
  • Private Limited Company (प्रायवेट लिमिटेड कंपनी) - तुम्ही आणी तुमचे सहकारी मिळून प्रायवेट लिमिटेड कंपनी स्थापन करू शकता. जिथे तुम्ही निवडलेले बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तुमच्या वतीने काम पाहतील.
  • Partnership Firm (पार्टनरशिप फर्म) -  तुम्ही आणी तुमचे सहकारी मिळून पार्टनरशिप फर्म देखील स्थापन करू शकता.
(व्यवसायाच्या नोंदणीसाठी एखाद्या सनदी लेखापालाची म्हणजेच Charted Accountant ची मदत घेऊ शकता).. नोंदणी झाल्यावर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरु करू शकता, उद्योजकतेच्या इतर घटकांबाबत आपण माहिती घेऊच. पुढील प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा..!!

मंजिले उन्हीको मिलती है, जिनके सपनों मे जान होती है,
          बस यु ही पंख होनेसे कुछ नही होता, हौसलो से उडान होती है..!!

जग बदलणारे 5 शोध : वाचा प्राचीन भारताची महान शोधगाथा..















विज्ञान आणी तंत्रज्ञानाच्या कुबड्या घेऊन चालणारा आजचा मानव पाहीला की खरंच कमाल वाटते या विज्ञानाच्या करामतीची ! 

           या पाहूया असे काही शोध आणि संकल्पना ज्यांचा उगम भारतात झाला आणि ज्यांच्यामुळे जगाचा कायापालट झाला. हे आहेत जग बदलणारे ते 5 शोध...

१. शस्त्रक्रिया (सुश्रूत)

इ.स. पूर्व 800 च्या कालावधीत काशी येथे जन्मलेल्या सुश्रूत ऋषींना 'शल्यचिकित्सा शास्त्राचे जनक' मानले जाते. सुश्रूतांनी 300 प्रकारच्या शस्त्रक्रियांचा शोध लावला होता. यात मोतीबिंदू सारख्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे! त्या काळात ते कॉस्मेटिक सर्जरीसारख्या शस्त्रक्रियेचा उपचार सहज करत. शस्त्रक्रियेसाठी ते वेगवेगळी 125 प्रकारची साधने वापरत असत. त्यांच्या 'सुश्रूत संहिता'  या ग्रंथात वैद्यकीय शास्त्राची अचंबित करणारी माहिती दिली गेलीय.

2. गुरुत्वाकर्षण (भास्कराचार्य)

इ.स १११४ - ११८५ या काळात भारतात भास्कराचार्य नावाचे महान गणितज्ञ आणी ज्योतिषी होऊन गेले. ज्यांनी न्यूटनच्या जन्माच्या कीतीतरी आधीच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला होता. आपल्या ग्रथांत त्यांनी लिहलंय की 'पृथ्वी अवकाशीय पदार्थांना विशिष्ट शक्तीने आपल्याकडे खेचते.'
लीलावती, बीजगणित, ग्रहगणित, गोलाध्याय अशा अनेक ग्रथांची त्यांनी रचना केली. आजही जगभरात त्यांच्या ग्रथांचा अभ्यास केला जातो.

३. विमान (भारद्वाज)

रामायण, महाभारतातील 'पुष्पक विमानाबद्दल' तुम्ही वाचले असेल. यंत्र - मंत्र - तंत्र आणि आयुर्वेदात पारंगत असणारे भारद्वाज मुनी या अवकाशात भ्रमण करणाऱ्या यंत्राचे निर्माते होते. त्यांना विमानाचे जनक मानल्यास आश्चर्य मानू नका. त्यांच्या 'यंत्रसर्व' या ग्रंथात वैमानिक नावाचे प्रकरण आहे ज्यात विविध क्षमतेच्या 108 प्रकारच्या विमानांची माहिती आहे. ऋग्वेदापासुन महाभारतापर्यंत अनेक ग्रंथात भारद्वाज मुनींचा उल्लेख आढळतो. त्यांच्या ग्रंथात विमान बनवण्यापासून ते चालवण्याचे नियमही सांगितले गेले आहेत.

४. अणू सिद्धांत (कणाद)

आज अणूशक्तीचा महिमा सर्व जगाला परिचित आहे. जगाच्या नजरेत अणूशास्त्रज्ञ 'डॉल्टन' ने अणूसिद्धांत मांडला. पण त्याही आधी सुमारे २५०० वर्षांपूर्वी कणाद नावाच्या विद्वानाने वैश्विक अणू सिद्धांत मांडला होता. जगातील प्रत्येक पदार्थ हा लहानातील लहान कणांनी बनला आहे. हे त्यांनी त्या काळात सांगितले आहे. ते रस्त्यावर सापडणाऱ्या वस्तूंचे कण करून त्याचा अभ्यास करायचे यामुळे त्यांना कणाद हे नाव मिळाले. इतकेच नव्हे तर न्यूटनच्या आधीच कणादांनी गतिचे तीन नियम इ.स. पूर्व सहाव्या शतकातच मांडले आहेत.

५. शून्य (आर्यभट्ट - प्रथम)

भारताकडून जगाला मिळालेली अनोखी भेट म्हणजे 'शून्याचा शोध'. सन ४९८ च्या कालावधीत भारतातील 'आर्यभट्ट' नावाच्या महान गणितज्ञ आणि ज्योतिष्याने दशांश पद्धती आणी शून्याची कल्पना लोकांसमोर आणली. तत्पूर्वी लोकांना एका ठराविक मर्यादेपर्यंतच संख्या लिहिता येत होत्या. त्यांनी लिहिलेल्या 'आर्यभट्टीय' या ग्रंथात शून्याच्या वापरासंबंधी सविस्तर माहिती मांडली आहे. संख्येसमोर शून्य लावल्याने त्या संख्येची किंमत दसपटीने वाढवता येऊ लागली. शून्याचा अविष्कार झाल्यानंतर गणितीय संकल्पनाचे स्वरुपच बदलून गेले.

इतकेच नाही तर योगशास्त्र, आयुर्वेद, सुती कपडे, लिखानाची शाई, मार्शल आर्ट, हिर्‍यांना पैलू पाडण्याची कला, दिशादर्शक यंत्र, संमोहन कला अशा अनेक गोष्टी प्राचीन भारतीय संस्कृतीने या जगाला दिल्या. त्या 'प्राचीन आणि समृद्ध' भारतासमोर आजचा आधुनिक भारत खूपच मागास वाटतो.. नाही का?

स्त्रोत : विकिपीडिया

शोधगाथा : महाभारताचा भाषाशास्त्रीय ताळा...

हडप्पा संस्कृतीतील उत्तरकालीन दफनकुंभावर चित्रित केलेले मोर एवढय़ा एकाच संदर्भावरून त्याआधीच्या काळात आर्याच्या जीवनातकोणकोणत्या घडामोडी घडलेल्या असाव्यात याचा अंदाज बांधता येतो. त्या सगळ्याचा महाभारत काळाशी काही संबंध आहे का, याचा सखोलअभ्यास होण्याची गरज आहे. पुणे विद्यापीठातील मानववंशशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या आर्यविषयक एका परिसंवादामध्ये काही वर्षांपूर्वीमी सहभागी झालो होतो.  ‘हडप्पा संस्कृतीच्या उत्तरकालीन दफनकुंभावर चित्रित केलेले मोर या विषयावर तिथे संशोधनात्मक सादरीकरण केलेहोते. हा विषय एका अर्थाने नवीन नव्हता. कारण त्यावर सर्वप्रथम डॉ. दामोदर धर्मानंद कोसंबी यांनी एक लेख लिहिला होता. त्यापाठोपाठ डॉ.मधुकर केशव ढवळीकर यांनी विषयाचे महत्त्व जाणून भाष्य केले. डॉ. कोसंबी यांना हा विषय एकदम वेगळा वाटला. कारण दफनकुंभावरीलमोरांच्या चित्रणामुळे त्यांना महाभारतात वर्णिलेल्या एका प्रसंगाची  त्यातील तपशिलांची त्यांना आठवण झाली. इंद्रपत्नी शचिशी करावयाच्यासंभाव्य दुर्वर्तनामुळे आणि पालखी वाहून नेणाऱ्या सप्तर्षीशी केलेल्या माजोरी वागणुकीमुळे नहुषाला अजगर होऊन त्यावेळेस जमिनीवर पडावेलागले. स्वर्गातून पतन होऊन पृथ्वीवर येताना वाटेत अनेक क्रौव्याध ( शिजवलेले मांस खाणाऱ्या) पक्ष्यांनी आणि मयूरांनी त्याच्या शरीरावरचोचा मारून प्रहार केल्याचा उल्लेख येतो. मयूर हा वास्तविक गिधाड किंवा ससाण्यांच्या प्रमाणे क्रौव्याध नसल्यामुळे नहुषाच्या आता दिव्यनसलेल्या शापित शरीरावर त्या प्राण्यांनी प्रहार का केले या प्रश्नामुळे त्यांची उत्सुकता जागृत झालेली होती आणि दफनकुंभावर चित्रित केलेल्यामोरांच्या पोटामध्ये शवप्राय मनुष्याकृती चितारल्यामुळे मरणाशी किंवा मरणोत्तर क्रियाविधींशी तर याचा संबंध नाही ना, अशी शंका त्यांना आली. डॉ. ढवळीकर यांनी पुढे जाऊन त्यावर असे भाष्य केले की मयूर हा दोन दैवतांशी संबंधित प्राणी आहे. मयूराच्या पाचू किंवा इतर अर्धरत्नांमधीलप्रतिकृती . . पूर्व तिसऱ्या सहस्रकापासून पश्चिम आशियामध्ये निर्यात केल्या जात होत्या. त्यामुळे हडप्पा संस्कृतीमध्येसुद्धा मोर या प्राण्यालाकाही प्रतिमात्मक अर्थ  मरणोत्तर क्रियाविधीशी संबंध असावा, अशी  शंका येण्यासारखा पुरावा आहे. त्यांच्या हेही लाक्षात आले की, वैदिक आणिद्राविड संस्कृतीमध्ये प्रत्येकी एक देवता आहे की जिचे वाहन मयूर आहे. त्या देवता म्हणजे दक्षिणेतील मुरुगन अथवा स्कंद आणि विद्य्ोचीदेवता सरस्वती. डॉ. ढवळीकरांच्या मते त्या दफनकुंभावर मोराच्या आजूबाजूला नदी, त्यातील मासे इत्यादी जलचरांसह म्हणजे प्रत्यक्ष वेदातीलसरस्वती हीच चित्रित केलेली आहे. त्या काळापासूनच ती सरस्वती देवी आणि मयुराचा संबंध असला पाहिजे. मुरुगनशी अथवा स्कंदाशी येणारामोराचा संबंध तो एका मृत्युदेवतेशी असलेला संबंध आहे. आणि साहजिकच दफनकुंभावरील मोराच्या उदरात मानवी शव चितारलेले आढळते. मरणोत्तर जीवन सरस्वती देवीचे वाहन असलेल्या या मोरामुळे जीवन सुखपूर्ण व्हावे अशा प्रकारची आशाच त्यातून प्रकट केलेली दिसते. आणिदोघांच्याही दृष्टीने ययातीचा जसा त्याच्या स्वर्गपतनानंतर मोराचा संबंध आला तसा येऊ नये अशीच अपेक्षा त्यातून व्यक्त केलेली असावी. त्यामुळे हे चित्रण ज्याची प्राचीनता इसवी सन पूर्ण दोन हजापर्यंत जाते ते समकालीन हडप्पा संस्कृतीचा भाग असलेल्या आर्याच्या मरणोत्तरविश्वासांच्यावर प्रकाश टाकते. त्याच दृष्टीने त्यांना अथर्ववेदातील सूर्याच्या रथाशी संबंधित असलेल्या मयूरींना उद्देशून केलेल्या वैदिक अथर्वरचना अर्थपूर्ण वाटतात. डॉ. धर्मानंद कोसंबी आणि डॉ. ढवळीकर यांनी उल्लेखिलेल्या सूर्यरथाशी संबंधित असलेल्या २१ मयूरींचा अथर्व कवनातूनअधिक मागोवा घेतल्यानंतर असे लक्षात येते की, त्यांना आवाहन यासाठी केले आहे की, त्यांनी संबंधित मानवाला सूर्यदेवतेशी संबंधित असलेलेअमृतत्त्व प्राप्त करून द्यावे. या संदर्भात हेही लक्षात ठेवले पाहिजे की, हडप्पा येथील दफनकुंभावरच मयूरांचे चित्रण आहे, असे नाही तरहडप्पोत्तरकालीन मध्य प्रदेशातील  महाराष्ट्रातील ताम्रपाषाणयुगीन समकालीन दफनकुंभांच्यावर मयूरांचे चित्रण आढळते. मध्य प्रदेशातीलमाळवा येथील नर्मदेकाठच्या नावडाटोली येथे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील माळवा  जोरवे येथे मृदभांडय़ांवर त्याचे चित्रण आढळते. एका चित्रणाततर सूर्य आणि कुत्रा यांचेही चित्रण आढळते. वर अथर्ववेदातील कवनात वर्णिलेला सूर्याचा आणि मोराचा अमृतत्त्वाशी असलेले लागेबांधा तर याचित्रात चित्रित केलेले नाहीत ना, असे वाटण्याइतपत हे चित्रण प्रभावकारी आहे. या ठिकाणी सारमेयाचे सरमापुत्र कुक्कुराचे चित्रण का, अशी शंकामनात आल्यास एक संदर्भ असा लक्षात येतो की, महाभारतातील मोक्षधर्मपर्वात स्वर्गात सदेह जाणाऱ्या युधिष्ठिराबरोबर फक्त कुत्राच असतो याप्रयत्नांत मानवी दोषांनी कलंकित झालेले त्याचे भाऊ आणि पत्नी द्रौपदीसुद्धा त्याची साथ देऊ शकत नाहीत. साथ देतो तो फक्त कुत्राच आणित्यामुळे व्यास आपल्याला समजावून सांगतात की, हा कुत्रा दुसरा तिसरा कुणी नसून प्रत्यक्ष धर्मराजच आहे म्हणजे यमधर्मच आहे. अशा रीतीनेकुत्र्याचा आणि निर्मल धार्मिक आचरणाचा संबंध आहे. यावरून असाही अंदाज काढता येतो की, हडप्पा संस्कृतीच्या विलयानंतर सिंध पंजाबमधीलदुष्काळी हवामानामुळे पडलेले आणि बंगाल, उत्तर प्रदेश, माळवा आणि महाराष्ट्र आणि पश्चिमेला असलेल्या काही इराणी प्रदेशात गेलेलेहडप्पावासी आर्यच होते. या प्रमेयाची मीमांसा करताना हेही लक्षात येते की, ज्या प्रदेशामध्ये इसवी सन पूर्व २३०० नंतरच्या काळामध्ये हडप्पावासीहे कुरुक्षेत्र आणि सप्तसिंधूंच्या प्रदेशातून बाहेर पडून स्थायिक झाले त्याच प्रदेशात आजच्या काळातही आर्य-भारतीय (इंडो- आर्यन) भाषाचउदाहरणार्थ बंगाली, िहदी, गुजराती, मराठी या भाषा बोलल्या जातात. अधिक बारकाईने विचार केला तर महाराष्ट्रात मराठी भाषक प्रदेशाच्यापलीकडे दक्षिणेत कानडी, विदर्भाच्या पलीकडे गोंडी आणि बंगालच्या दक्षिणेस ऑस्ट्रो- आशियाई किंवा द्राविड भाषा बोलणारे आदिवासी आहेत. समकालीन पुरातत्त्वाच्या दिशेने पाहिल्यास महाराष्ट्रापुरते तरी निश्चित सांगता येईल की, अकोला अमरावतीच्या जवळ असलेली तुळजापूर गढीही ताम्रपाषाण युगीन आहे तर त्या पलीकडे विदर्भात सगळीकडे बहद्अश्मयुगीन संस्कृती आहे. या उदाहरणांवरून स्पष्ट दिसते की, हडप्पासंस्कृतीतून बाहेर पडलेला आणि या प्रांतात स्थिर झालेला समाज हा भारतीय- आर्य (इंडो- आर्यन) भाषिक होता. त्यामुळेच या आधुनिक प्रांतांमध्येआर्य- भारतीय भाषा दिसतात. (इंडो आर्यन). अशाच काही कारणांमुळे आणि पुराणामधील पुराव्यांमुळे गेल्या पिढीतील आर्य- भारतीय भाषांचाआणि द्राविड भाषांचा अभ्यास करणाऱ्या विद्वानांनी असा निष्कर्ष काढला आहे की, वेदांच्या बरोबरच त्या काळचा बहुजन समाज ज्या आधुनिकआर्य भाषांच्या जननी असलेल्या प्राकृत भाषा (मागधी, शौरसेनी, महाराष्ट्री)  यांची जननी असेल अशी प्राकृत भाषा बोलत असावेत कदाचित,पार्जीटर आणि इतर विद्वानांच्या मध्ये, अशा वेद समकालीन प्राकृत भाषेतच सुतांनी ग्रंथित केलेली पुराणे लिहिली असावीत. इसवी सनाच्यातिसऱ्या किंवा चौथ्या शतकात अभिजात संस्कृतला प्रतिष्ठा प्राप्त झाल्यामुळे हे रूपांतर झाले असावे. अधिक खोलात  जाता हे नक्कीच म्हणतायेते की, ऋग्वेदातील ऋचांची संस्कृत भाषा ही क्षत्रिय ब्राह्मणादी अभिजात वर्गात प्रचलित असेल तर जनसामान्य एक सर्व प्राकृत भाषांची जननीअसलेली दुसरी एक प्राकृत भाषा असणार आणि माझ्या मते ती आणखी एक  उल्लेखिलेली  वायव्य सरहद्द प्रांतात प्रचलित असलेली गांधारी हीप्राकृत भाषा आणि अवेस्तातील गाथांची अभिजात भाषा, वेदांची संस्कृत भाषा या तिघींना  इतर प्राकृत भाषांना जवळ असणारी एखादी प्राकृतभाषा असावी. असे विधान करण्यामागे कारण असे की, आजही संस्कृत आणि अवेस्तातील गांथांच्या भाषांमध्ये परस्पर विनिमयाचे संबंधदर्शविणारे काही निकष सौराष््रठातील कच्छी भाषेत आढळतात. उदाहरणार्थ  चा  होणे. सरस्वतीचा पहेलवीमध्ये प्रतिशब्द हरकवैती असाहोतो. सरयूचा हरयू असा होता. अजूनही कच्छी भाषेत सप्ताह हप्ताह होता. या विषयातील अंतिम मत हे निरनिराळ्या आज उपलब्ध असलेल्याप्राकृत भाषा आणि तुलनेने कमी ज्ञात असलेल्या पशाची गांधारी यांच्या तसेच अफगाणिस्तानातील अर्वाचीन भारतीय भाषांचा सखोल अभ्यासकेल्यानंतरच देता येईल. हडप्पा संस्कृतीशी आर्याचा कितपत संबंध होता, तो कसा संबंध होता , हडप्पा संस्कृतीचे जनक हे भारतीय- इराणी (इंडो- इराणीयन) भाषकच होते इत्यादी प्रश्नांची उकल अशा प्रकारचे संशोधन नंतर होईल, अशी आशा वाटते. या संदर्भामध्ये डॉ. ढवळीकर यांनी हडप्पासंस्कृतीच्या विलयानंतर झालेली सप्तसिंधू प्रांतातील आर्य भाषिक जनांची सुरू झालेली नवीन वाटचाल म्हणजेच सांप्रतच्या कलियुगाची सुरुवातम्हणजेच पुराणातील कलियुगाची सुरुवात असा मांडलेल्या अभ्युपगमाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे हे वर íचत केलेल्या मयूर प्रतिमेतीलआशय प्राकृत भाषांच्या उद्गमासंबंधिची प्राच्य विद्वांनांची चिंतने आणि भाषा शास्त्राच्या साहाय्याने आजच्या अफगाणिस्तान पाकिस्तानातीलआर्य भाषांचा अभ्यास यांच्या साहाय्याने ही संशोधनाची वाटचाल अधिक सुकर होईल, हे सहज लक्षात येते. एकूणच पुरातत्त्वीय अभ्यास आणि याभाषांच्या भाषाशास्त्रीय अभ्यासानुसार, सध्या डॉ. ढवळीकर यांनी काढलेला मनु  महाभारताचा कालखंड पुराव्यानिशी जुळणारा आहे, असेम्हणता येईल. अर्थात त्याची खातरजमा करण्यासाठी या सर्वच विद्यांचा महाभारताच्या अनुषंगाने अधिक खोलात जाऊन एकत्र अभ्यासकरण्याची गरज आहे. 







डॉअरिवद जामखेडकर - See more at: http://www.loksatta.com/vishesha-news/study-of-mahabharat-era-1224276/#sthash.ZdPFHrLN.dpuf

माझ्याबद्दल