गुरुवार, २८ एप्रिल, २०२२

"विश्वास" विक्री वाढवण्यासाठी हीच बाब सर्वात महत्वाची आहे......

 Put things BEYOND REASONABLE DOUBT




मनुष्यामध्ये आणि इतर प्राण्यांमध्ये एक फार मोठा फरक आहे आणि तो फरक असा की, 'इतर प्राणी काही गोष्टींवर सरळ विश्वास ठेवतात आणि माणूस हा त्याच्या सवयीप्रमाणे प्रत्येक गोष्टीवर संशय घेतो'.

मनुष्याच्या गुणसुत्रीय संरचणेमध्येच ( Genes मध्येच म्हणलं तर समजेल ) शंका घेणे ; ही बाब फिट्ट केलेली आहे.

म्हणून ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला आपल्याला काही समजून सांगायचं असतं किंवा त्याला आपला मुद्दा पटवून द्यायचा असतो,त्या वेळेला त्या व्यक्तीच्या शंका घेण्याच्या पलीकडे जाऊन ती गोष्ट सिद्ध करावे लागते, आणि यालाच "बियॉन्ड रिझनेबल डाउट" असं म्हटलं जातं


खरं बघायला गेलं तर ही व्याख्या न्यायालयाच्या कामकाजात वापरली जाते ,,,,येथे एखादा वकील न्यायाधीशांसमोर आपली बाजू बियॉन्ड रिझनेबल डाऊट सिद्ध करू शकला,तर त्या केसचा निकाल शंभर टक्के त्याच्या बाजूनेच लागतो.


आता तुम्ही म्हणाल सर मग या पद्धतीचा वापर आपल्या व्यवसायामध्ये ग्राहकांना जास्तीची विक्री करण्यासाठी कशी करता येईल?


*********************

हा मुद्दा नीट समजून घेण्यासाठी मी मी काल बघितलेला एक प्रसंग तुमच्या बरोबर शेअर करतोय, काल प्रवासादरम्यान एक चित्र असं दिसलं की, एक मासे विक्रेता खेड्याच्या चौकात मासेविक्री करत होता,साधारणपणे मासे विक्री करणारे लोक, मासे पकडतात त्यांना कॅरेटमध्ये किंवा टोपल्यांमध्ये भारतात आणि विक्रीच्या ठिकाणी येऊन एखाद्या कपड्यावर ते मासे पसरवून ठेवून बसतात.

परंतु मी बघितलेल्या मासे विक्रेत्याने नेहमीची पद्धत वापरली नाही,,त्याने मेलेले मासे न आणता ,पकडलेले मासे पाणी असलेल्या टोपल्यांमध्ये ठेवलेले ,होते आणि अगदी विक्रीच्या ठिकाणीसुद्धा ते मासे पूर्णपणे जिवंत होते.


आता हे दृश्य तुम्ही ही डोळ्यासमोर आणा .....एक विक्रेता मृत झालेले मासे विकतोय आणि दुसरा विक्रेता जिवंत मासे विकतोय,

साधारण ग्राहकाच्या डोक्यामध्ये एक शंका असते की हे मासे ताजे असतील का शिळे असतील? तर या उदाहरणात कोणत्या विक्रेत्याने ग्राहकाची ही शंका अगोदर दूर केलेली आहे?


गोष्ट अगदी साधी आहे ज्या विक्रेत्याने मार्केटमध्ये येत असतानाच जास्तीचे प्रयत्न करून जिवंत मासे आणले, आता या व्यक्तीच्या मालावर कोणीही शंका घेणार नाही ,कारण? त्याने शंकेच्या पलीकडे जाऊन आपण किती खरे आहोत? आपण किती सच्ची आहोत ?आपण किती प्रामाणिक आहोत? हे दाखवून दिलेलं आहे

यामुळे हा जिवंत मासे विकणारा विक्रेता जास्त यशस्वी होतो.


******************

यावरील उदाहरणावरून आपल्याला शिकण्यासारखं काय आहे?: तर ते असं कि ग्राहक ज्या शंका वेळोवेळी उपस्थित करतोय, त्या शंकांचं निरसन आपण त्याने विचारण्याच्या अगोदरच केलं पाहिजे, त्याच्या मनात आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्विसेस विषयी ऑब्जेक्शन तयार होत असतील ? तर त्याला दुर केलं पाहिजे.

 जेणेकरून आपला मुद्दा "बियॉन्ड रिझनेबल डाऊट" सिद्ध होतो,आपल्यावर ग्राहकाचा Trust वाढून तो पट्टकन खरेदी करेल.

 विक्री वाढवण्यासाठी हीच बाब सर्वात महत्वाची आहे...... "विश्वास"

So,
Put things beyond reasonable doubt.



©निलेश काळे.
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंट्स
5th Floor, विघ्नहर चेंबर्स,
नळस्टॉप,पुणे.
9518950764.
Office : 9146101663.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल