या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
शुक्रवार, ३१ जुलै, २०२०
https://b.sharechat.com/0S72uNfv57?referrer=whatsappShare #🏡देवघर देवघराच्या कोपऱ्यात, देव बसला रुसून, कोणीच पहात नव्हतं, तेव्हा डोळे घेतले पुसून. मी म्हणालो का रे देवा, बसलास असा रुसून, तुझं भजन म्हणतो ना, तुझ्यासमोर बसून. तुझ्यासाठी देवा, बघ काय काय केलं, सागवानी देव्हाऱ्यात, तुला सिंहासनी बसवलं. तुझ्यासाठी देवा, बघ किती फुले आणली, सोन्या चांदीची देवा, आरास बघ केली. तुझ्यासाठी देवा, बघ पंचपक्वान्न केले, शुद्ध तुपाचे देवा, निरंजन लावले. तरी देवा असा कसा, तू बसतोस रुसून, आशीर्वाद दे ना रे, गालात जरा हसून. देव म्हणे मग मला, देव तुला कळला नाही, पेढ्यांची लाच घायला, मी भ्रष्ट झालो नाही. दीन झाले आईबाबा, त्यांना जरा बघ, अरे वेड्या त्याच आहे, तुझ्या पुरतंच जग. भजने माझी गातोस रे, किती किती सुंदर, जाणून घेतले आहेस का रे, माता-पित्याचे अंतर. माझ्याशी बोलण्यापेक्षा, त्यांच्याशी तू बोल, त्यांच्याविना माझी भक्ती, शून्य आणि फोल. म्हातारपण असत बाळा, दुसरं लहानपण, किती समजून घेतलं तुला, आठव तुझं बालपण. देव देव करतोस वेड्या, असा मी भेटेन का ? आई बाबा जर उपाशी, मी तुपाशी खाईन का ? देव असा बोलला मला, डोळ्यात घातले अंजन, दाटून आले अश्रू नयनी, धूसर झाले निरंजन. 🙏🏻🙏🏻 🌸🌸 👏🏻👏🏻 🌹🌹 🙏🏻🙏🏻 .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा