शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

■कधी कधी तुम्ही तुमच्या जीवनात निराश होता आणि जगात त्याच वेळी काही लोकं तुमच्या सारखंच जीवन जगण्याचं स्वप्न बघत असतात...☺☺ ■ घराजवळ शेतात उभा असलेला मुलगा आकाशात उडणाऱ्या विमानाला बघून त्याच्यासारख उंच उंच उडण्याचं स्वप्न बघत असतो. परंतु त्याच वेळी विमानातील पायलट शेताकडे आणि आणि उभ्या असलेल्या मुलाकडे पाहून लवकर घरी परतण्याच स्वप्न पहात असतो......... हेच खरं जीवन आहे .जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा आनंद घ्या..☺☺☺ ■जर धन-दौलत आणि रुपये-पैशे हेच जर आनंदी राहण्याचं गुपित असतं तर श्रीमंत लोक नाचताना दिसले असते. पण तस नसून फक्त गरीब मुलंच असं खेळून नाचून आनंद व्यक्त करताना दिसतात...☺☺☺ ■ जर पॉवर (शक्ती) मिळाल्याने सुरक्षित वाटत असते तर नेते मंडळी, अधिकारी हे लोक बिना सिक्युरिटीचे फिरताना पहायला मिळाले असते ..... पण जे लोक सामान्य जीवन जगतात ते सुखाने झोपी जाताना दिसतात.☺☺ ■ जर सौंदर्य आणि प्रसिद्धीमुळेे नाती मजबूत आणि घट्ट रहात असती तर सेलिब्रेटीज लोकांची लग्न सगळ्यांपेक्षा यशस्वी झाली असती पण तस न होता या लोकांचे घटस्फोट जास्त होतांना दिसतात ☺☺☺ ■म्हणून जीवनाचा आनंद घ्या, त्याचा भरपूर लाभ घ्या कारण जीवन एकदाच आहे परत नाही. सामान्य जीवन जगा, विनम्रता ठेवा आणि इमानदारीने जगा. स्वर्ग इथेच आहे ............... "जीवन एक प्रवास असून ते शिस्तीत आणि आरामात जगा. चढ-उतार तर येतच राहतील फक्त त्यानुसार स्वत:ला बदलत रहा. "प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा. त्याचप्रमाणे जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर जीवनात इच्छा कमी ठेवा ." कारण मातीची पकड हि घट्ट आणि मजबूत असते पण तेच संगमरवरी दगडावरून पाय घसरताना दिसतात. ☺☺☺ ■ जीवनाला एवढं सिरीयस घ्यायची गरज नाही कारण इथून जिवंत कोणी परत जाणार नाही. ज्याच्याजवळ फक्त नाण्यांचे सिक्के असतात ते आनंदाने पावसात भीजताना दिसतात आणि ज्यांच्या खिशात नोटा असतात ते कुठंतरी छताचा आधार घेताना दिसतात.☺☺ ■ पैसा माणसाला वरती घेऊन जाऊ शकतो पण माणूस वर जाताना पैसे घेऊन जाऊ शकत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल