शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

■कधी कधी तुम्ही तुमच्या जीवनात निराश होता आणि जगात त्याच वेळी काही लोकं तुमच्या सारखंच जीवन जगण्याचं स्वप्न बघत असतात...☺☺ ■ घराजवळ शेतात उभा असलेला मुलगा आकाशात उडणाऱ्या विमानाला बघून त्याच्यासारख उंच उंच उडण्याचं स्वप्न बघत असतो. परंतु त्याच वेळी विमानातील पायलट शेताकडे आणि आणि उभ्या असलेल्या मुलाकडे पाहून लवकर घरी परतण्याच स्वप्न पहात असतो......... हेच खरं जीवन आहे .जे तुम्हाला मिळालेलं आहे त्याचा आनंद घ्या..☺☺☺ ■जर धन-दौलत आणि रुपये-पैशे हेच जर आनंदी राहण्याचं गुपित असतं तर श्रीमंत लोक नाचताना दिसले असते. पण तस नसून फक्त गरीब मुलंच असं खेळून नाचून आनंद व्यक्त करताना दिसतात...☺☺☺ ■ जर पॉवर (शक्ती) मिळाल्याने सुरक्षित वाटत असते तर नेते मंडळी, अधिकारी हे लोक बिना सिक्युरिटीचे फिरताना पहायला मिळाले असते ..... पण जे लोक सामान्य जीवन जगतात ते सुखाने झोपी जाताना दिसतात.☺☺ ■ जर सौंदर्य आणि प्रसिद्धीमुळेे नाती मजबूत आणि घट्ट रहात असती तर सेलिब्रेटीज लोकांची लग्न सगळ्यांपेक्षा यशस्वी झाली असती पण तस न होता या लोकांचे घटस्फोट जास्त होतांना दिसतात ☺☺☺ ■म्हणून जीवनाचा आनंद घ्या, त्याचा भरपूर लाभ घ्या कारण जीवन एकदाच आहे परत नाही. सामान्य जीवन जगा, विनम्रता ठेवा आणि इमानदारीने जगा. स्वर्ग इथेच आहे ............... "जीवन एक प्रवास असून ते शिस्तीत आणि आरामात जगा. चढ-उतार तर येतच राहतील फक्त त्यानुसार स्वत:ला बदलत रहा. "प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा. त्याचप्रमाणे जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर जीवनात इच्छा कमी ठेवा ." कारण मातीची पकड हि घट्ट आणि मजबूत असते पण तेच संगमरवरी दगडावरून पाय घसरताना दिसतात. ☺☺☺ ■ जीवनाला एवढं सिरीयस घ्यायची गरज नाही कारण इथून जिवंत कोणी परत जाणार नाही. ज्याच्याजवळ फक्त नाण्यांचे सिक्के असतात ते आनंदाने पावसात भीजताना दिसतात आणि ज्यांच्या खिशात नोटा असतात ते कुठंतरी छताचा आधार घेताना दिसतात.☺☺ ■ पैसा माणसाला वरती घेऊन जाऊ शकतो पण माणूस वर जाताना पैसे घेऊन जाऊ शकत नाही.

https://b.sharechat.com/0S72uNfv57?referrer=whatsappShare #🏡देवघर देवघराच्या कोपऱ्यात, देव बसला रुसून, कोणीच पहात नव्हतं, तेव्हा डोळे घेतले पुसून. मी म्हणालो का रे देवा, बसलास असा रुसून, तुझं भजन म्हणतो ना, तुझ्यासमोर बसून. तुझ्यासाठी देवा, बघ काय काय केलं, सागवानी देव्हाऱ्यात, तुला सिंहासनी बसवलं. तुझ्यासाठी देवा, बघ किती फुले आणली, सोन्या चांदीची देवा, आरास बघ केली. तुझ्यासाठी देवा, बघ पंचपक्वान्न केले, शुद्ध तुपाचे देवा, निरंजन लावले. तरी देवा असा कसा, तू बसतोस रुसून, आशीर्वाद दे ना रे, गालात जरा हसून. देव म्हणे मग मला, देव तुला कळला नाही, पेढ्यांची लाच घायला, मी भ्रष्ट झालो नाही. दीन झाले आईबाबा, त्यांना जरा बघ, अरे वेड्या त्याच आहे, तुझ्या पुरतंच जग. भजने माझी गातोस रे, किती किती सुंदर, जाणून घेतले आहेस का रे, माता-पित्याचे अंतर. माझ्याशी बोलण्यापेक्षा, त्यांच्याशी तू बोल, त्यांच्याविना माझी भक्ती, शून्य आणि फोल. म्हातारपण असत बाळा, दुसरं लहानपण, किती समजून घेतलं तुला, आठव तुझं बालपण. देव देव करतोस वेड्या, असा मी भेटेन का ? आई बाबा जर उपाशी, मी तुपाशी खाईन का ? देव असा बोलला मला, डोळ्यात घातले अंजन, दाटून आले अश्रू नयनी, धूसर झाले निरंजन. 🙏🏻🙏🏻 🌸🌸 👏🏻👏🏻 🌹🌹 🙏🏻🙏🏻 .

*सर्वांनीच आता बदललेच पाहिजे* आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत, त्यांचे ना *पिंडदान होत आहे, ना तेरावे, ना गरूड पारायण, ना दान दक्षिणा, अस्थी विसर्जन करायला कोणी आळंदी, पंचगंगा, काशी, ओंकारेश्वर, पैठणला जात नाहीत, तेथे कुणाला दान देत नाहीत, पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत,* म्हणजे *संत तुकाराम, तुकडोजी महाराज, गाडगेबाबा काही गोष्टी सांगत होते तेच तंतोतंत बरोबर आहे...* *Point 21 to be noted* १. पैसा मुलांच्या शिक्षणावर, कुटुंबाच्या आरोग्यावर, गुंतवणूकीवर खर्च करा. २. कर्मातच देव आहे यावर विश्वास ठेवा. ३. 'माणूस सोबत काहीच घेऊन जात नाही', हे सांगण्यासाठी बुवा १०-२० हजार रुपये घेतो. अशा स्वामी, महाराज, बुवाबाबा यांचा नाद सोडा. ४. शेती, व्यवसाय, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, गुंतवणूक यांच्याशी निगडीत विचारवंतांच्या व्याख्यांनांचे आयोजन करा. ५. शेतीतील, कुटुंबातील गावकुसातील वाद समापोचाराने मिटवा. कोर्ट, कचे-यांचा मार्ग टाळा. ६. कुटुंबातील सदस्यांवर, समविचारी मित्रांवर प्रेम करा. त्यांच्यासाठी वेळ द्या. सुख-दु:खात ते तुमची जास्त काळजी घेतील. ७. शेतीवरच अवलंबून न राहता हळूहळू उद्योग-व्यवसायाकडे वळा आणि एकमेकांना व्यवसायासाठी शक्य तेवढी मदत करा. ८. मोडेन पण वाकणार नाही, या स्वभावात आता बदल करा. काळ खूप बदलला आहे, याचे भान असू द्या. (महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे राहती - संत तुकाराम) ९. आपसी आणि स्वार्थी राजकारणामुळे समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आता ही परिस्थिती बदला, चांगले सुशिक्षित समाजसेवक लोकप्रतिनिधी निवडा म्हणजे पुढच्या पिढ्यांचे तरी कल्याण होईल. १०. कमीत कमी गावात आणि जास्त वेळ शेतात/नोकरीत/व्यवसायात राहा. किमान ८ तास काम करा... (कुठल्याही क्षेत्रात प्रगती होईलच). स्वतःला कायम कामात आणि चांगल्या विचारात गुंतवून ठेवा. ११. पाय ओढण्याची खेकडा प्रवृत्ती सोडून समाजातील इतरांना मदत करा. (एकमेका साह्य करू). १२. नियोजन व काटकसर करून आहे त्या उत्पन्नात आनंदाने जीवन जगता आले पाहिजे. मोठेपणाच्या नादात कर्जबाजारी होऊ नका. १३. वेळ आणि पैशाचा अपव्यय टाळा, एकमेकांच्या घरी गेल्यावर व लग्नात गेल्यावर अहेर देणे बंद करा, यात फक्त व्यापारी वर्गाचा फायदा आहे. २००-३०० रुपयाची साडी आजकाल कोणी नेसत नाही, मग कशाला उगाच असा खर्च करायचा. पुजा-यांचे व्यवसाय चालविणेही बंद करा. १४. भांडकुदळ, लबाड, पैसे बुडवणाऱ्या लोकांपासून चार हात लांब रहा आणि मदत करणा-याचे कायम ऋणी रहा. १५. घरातील महिलांना सन्मानाची वागणूक द्या. मुलींना उच्चशिक्षित करा. १६. मानवी इतिहासाची, विज्ञानाची, विचारवंतांची पुस्तके द्या. १७. निंदा टाळा. त्यामुळे तुमचा खिसा रिकामा होतो.. तुमच्या ग्रह-नक्षत्रांची शांती ही केवळ एक फसवेगिरी आहे आणि असल्या फसव्या षडयंत्रात अडकू नका. १८. घराघरात जो मूर्ख TV चा बॉक्स आहे त्याच्यापासून होईल तेवढे लांब राहा, सतत वेगवेगळ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचं काम TV करतोय, आपली सर्व वैचारिक बुद्धीचा नायनाट केला आहे या TV ने. १९. आपल्या आयुष्याचं आपण स्वतःच्या चांगल्या वाईट अनुभवाने योग्य आर्थिक नियोजन करून सुरळीत ठेवा, व स्वतः कष्टाने कमावलेल्या पैशात आपल्या कुटुंबाला खुश ठेवा. २०. चांगल्या गोष्टीना चांगले म्हणा, वाईट गोष्टींचा कडाडून विरोध करा, कायम सत्याच्या पाठीशी राहा, अन्यायाविरुद्ध उभे राहा, _२१._ *आपल्या कौटुंबिक जबाबदारी बरोबर आपल्या समाजासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून _आपल्या आयुष्यात काहीतरी चांगले काम करत जा._* _हा संदेश आपल्या सर्वांच्या हिताचा आहे... तेव्हा स्वतः स्वीकार करा आणि इतरांनाही सांगा..._ *वाचन करा* 🙏🏻 *व्यायाम करा* 🙏🏻 *अर्थ साक्षर व्हा* 🙏🏻

मंगळवार, ७ जुलै, २०२०

फुकट चा सल्ला...

------------------------
*फुकट चा सल्ला*
-------------------------

एका गावात एक मासे विकणारा राहत होता. आधी तो रस्त्यावर मासे विकायचा, नंतर त्याचे ग्राहक वाढले तेव्हा त्याने विचार केला की, एक दुकान भाड्याने घेऊन तेथे मासे विकावे.
*त्याने दुकान सुरू केले आणि बोर्ड लावला येथे ताजे मासे मिळतील.*
बोर्ड पाहून त्याचे ग्राहक वाढु लागले. एके दिवशी त्याचा मित्र दुकानावर आला आणि बोर्ड पाहून म्हणाला तु ताजेच मासे विकतोस तर मग बोर्डवर लिहायची काय गरज आहे? मित्राचे ऐकुण त्याने बोर्डावरून ताजे हा शब्द काढून टाकला.
काही दिवसांनंतर एक दुसरा मित्र आला आणि तो म्हणला तु मासे इथेच विकतोस का दुसरीकडे? तो म्हणाला इथेच विकतो. मित्र म्हणला जर इथेच विकतोस तर मग बोर्ड वर इथे का लिहीले आहे? मित्राचे ऐकुण त्याने बोर्डावरून इथे शब्द काढुन टाकला.
आता बोर्डवर लिहीले मासे मिळतील. काही दिवसांनंतर त्याचा तिसरा मित्र आला आणि म्हणला माशाच्या वासानेच कळे की, इथे मासे मिळतात मग लिहायची काय गरज आहे? त्याने बोर्डावरचे मासे शब्द काढुन टाकला.
🐟🐟🐟🐟🐟
त्यानंतर हळु-हळु त्याचे ग्राहक कमी होऊ लागले, कारण लोकांना कळतच नव्हते की दुकान कशाची आहे. काही दिवसांतच दुकान चालणे बंद झाले आणि तो व्यक्ती परत रस्त्यावर आला.
🐬🐬🐬🐬
*लक्षात ठेवा*
🦈🐳🐋🐳🦈🐋
काही वेळा लोक न मागताच सल्ला देतात, त्यावेळेस आपण विचार केला पाहिजे की तो सल्ला ऐकायया का नाही. कोणाच्याही सांगण्यावरून एखादे काम करू नका, यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते.
कॉपी पेस्ट पोस्ट
🙏🙏🙏🙏🙏

माझ्याबद्दल