गुरुवार, २८ जून, २०१८

अ‍ॅलर्जीचा मुकाबला



शरीरातील प्रतिकारशक्ती नैसर्गिकपणे व्यक्तीचे संरक्षण करत असते. जेव्हा एखादा पदार्थ शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो पदार्थ परका आहे असे समजून शरीर त्याविरोधात काही रसायने निर्माण करते तेव्हा त्याला एखाद्या पदार्थाचे वावडे किंवा अ‍ॅलर्जी निर्माण होणे असे म्हणता येईल. ज गभरात असे कित्येक लोक आहेत ज्यांना एखाद्या पदार्थाचे वावडे किंवा अ‍ॅलर्जी असते. अशी काही अ‍ॅलर्जी असल्यास डॉक्टरी सल्ला घेऊन त्यावर उपचार करावेत. दरवर्षी चार ते सहा टक्के मुलांना आणि 5 टक्के प्रौढांना अन्नाची अ‍ॅलर्जी होते. मग अशा वेळी काही घरगुती उपायांनी या अ‍ॅलर्जीचा इलाज करता येईल का, हेदेखील पडताळून पाहता येते. 
वावडे असलेले पदार्थ ओळखा ः एखाद्या पदार्थाची अ‍ॅलर्जी थांबवायची असेल तर कोणत्या पदार्थाचे वावडे आहे, त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवे. वावडे असलेले पदार्थ शक्यतो टाळायला हवेत. आपण रोज कोणते पदार्थ खातो ते नोंदवून ठेवा तसेच पुरेसे पाणी पितो का, याकडे लक्ष द्या. आरोग्यपूर्ण जीवनशैलीची सवय लावा आणि चांगला आहार घ्या. त्यामुळे अ‍ॅलर्जीपासून सुटका होईल. एका महिन्यात एकापेक्षा अधिक वेळ जेवायला बाहेर जाऊ नका. 
एरंडेल तेल ः आरोग्यासाठी एरंडेल तेल अत्यंत उत्तम असते. त्यामुळे शरीराची ताकद वाढते. फळांच्या रसातून एरंडेल तेल रोज प्यायल्यास त्याचा फायदा वावडे किंवा अ‍ॅलर्जी कमी होण्यासाठी होतो. जेवणापूर्वी रोज दोन चमचे एरंडेल तेल प्यायल्याचा खूप फायदा होतो. सी जीवनसत्त्वयुक्त आहार ः सी जीवनसत्त्वयुक्त आहार घेतल्याने अन्नपदार्थांची अ‍ॅलर्जी कमी होण्यास मदत होते. त्यामध्ये अँटीऑक्सिडंटस असतात आणि प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी त्याचा फायदा होतो. सी जीवनसत्त्वामुळे शरीरात हिस्टामाईन तयार होते त्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. सी जीवनसत्त्व मिळावे म्हणून लिंबू, संत्रे, ब्रोकोली, स्ट्रॉबेरी, मोडाची धान्ये आणि टोमॅटो याचा आहारात जरूर समावेश करावा. 
आले ः जठराच्या अनेक तक्रारींमध्ये आले अत्यंत गुणकारी असते. तसेच आहाराच्या अ‍ॅलर्जीवरही ते उपयुक्त असते. आल्यात अँटीऑक्सिडंट आणि जीवाणूविरोधक घटक असतात. त्यामुळे नॉशिया, उलटी येणे, अपचन आणि डायरियामध्ये आल्याचा फायदा होतो. रोज दोन कप आल्याचा चहा पिणेही चांगले असते. आपल्या आहारात त्याचा समावेश असावा. लिंबू ः लिंबाच्या सेवनाने प्रतिकारशक्तीला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे आहाराची अ‍ॅलर्जीला प्रतिबंध होतोच; पण पोटाचे विविध प्रश्‍नही सुटतात. लिंबामध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. न्याहारीअगोदर एक ग्लास लिंबूपाणी प्यावे. त्यात हवी असल्यास चवीसाठी थोडा मध किंवा साखर घालावी. 
ग्रीन टी ः पदार्थाच्या अ‍ॅलर्जीमुळे होणार्‍या पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी ग्रीन टी एक उत्तम घरगुती इलाज आहे. त्यात दाह कमी करण्याचे तसेच हिस्टामाईन विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक  क्षमता चांगली होते त्यामुळे पचन संस्थेशी निगडीत अवयव योग्य पद्धतीने काम करतात. अ‍ॅलर्जी पूर्णपणे बरी होईपर्यंत दिवसातून तीन वेळा ग्रीन टी प्यावा. लसूण ः लसणामध्ये क्युरसेटीन हे नैसर्गिक हिस्टामाईन विरोधी घटक असतो जो अन्नपदार्थांची अ‍ॅलर्जी बरी करण्यास मदत करते.
त्याशिवाय लसणात अ‍ॅटीऑक्सिडंट गुणधर्म असतातच त्यामुळे अन्नाच्या अ‍ॅलर्जीपासून लवकर बरे होण्यास मदत होते. कच्च्या लसणाचा फायदा करून घेण्यासाठी रोज तीन पाकळ्या लसूण कच्ची खावी. डॉक्टरांनी सल्ला दिल्यास किंवा सूचना दिल्यास लसणाचा अंतर्भाव असलेला पूरक आहार घरी आणू शकता. लक्षणे ः अन्नपदार्थांची अ‍ॅलर्जी किंवा वावडे असल्यास त्याची प्रतिक्रिया लगेचच उमटते. ती त्वचेवर, पचनसंस्था किंवा श्‍वसनमार्गावरही असू शकते. अ‍ॅलर्जी असेल तर प्रत्यक्ष त्रास होण्यातूनही ती कळते. 
 उलटी होणे किंवा पोटात दुखणे  दम लागणे  छातीत घरघर होणे  सतत कफ होत राहाणे  धक्का बसणे किंवा सर्क्युलेटरी कोलाप्स  घसा बसणे  जीभेला सूज आल्याने बोलण्यावर परिणाम होणे किंवा श्‍वास घेण्यास त्रास होणे  नाडीची मंद गती  फिकट किंवा निळसर त्वचा  चक्कर येणे पदार्थांच्या अ‍ॅलर्जी असल्याने ही काही लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे अन्नपदार्थांच्या अ‍ॅलर्जीकडे दुर्लक्ष न करता उपचार जरुर करावेत. 
 




by - Pudhari 
Published On: Dec 07 2017 12:38AM | Last Updated: Dec 06 2017 8:41PM
डॉ. संजय गायकवाड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

माझ्याबद्दल