सोमवार, १५ मे, २०१७

लेदर्मन

‘स्थळ – धारावी, मुंबई. ७० फूटाच्या
झोपडीमध्ये आई-वडिल आणि पाच भावंडे असे सात
जणांचे कुटुंब नांदत असते. चामड्याच्या कंपन्यांबाहेर पडलेल्या
कचऱ्यातून गोळा केलेले छोटे-मोठे चामड्याचे तुकडे गावोगावच्या
गटई कामगारांना विकून मिळणाऱ्या पैशात घर चालत असते. चिमुरडा
राजेश वडिलांचे बोट धरुन कचऱ्यातील चामडे गोळा
करायला जात असतो. दिवसांमागून दिवस जात असतात. अचानक या
व्यवसायावर कुऱ्हाड कोसळते आणि घराची
जबाबदारी पेलवण्याच्या जाणीवेने लहान
वयातच राजेश प्रत्यक्ष व्यवसायात उतरतो. मार्गात आलेल्या
साऱ्या अडचणींवर मात करत, जिद्द,
चिकाटी, मेहनत करण्याची
तयारी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर माणसं जोडतो.
संधी कमावतो आणि मिळालेल्या संधीचं
सोनं करत एक दिवस लेदर इण्डस्ट्रीमधला मोठा
एक्सपोर्टर म्हणून नावारुपास येतो.’ एखाद्या
सिनेमाची कथा वाटावी अशी
ही जीवनकहाणी आहे
लेदर एक्सपोर्टर राजेश खंदारे यांची.
४१ वर्षांचे राजेश आज ‘राजदीप लेदर प्रायव्हेट
लिमिटेड’ आणि ‘सिण्ड्रेला फूटवेअर’ या दोन कंपन्यांचे मालक
आहेत. राजेश वयाच्या १३-१४ व्या वर्षापासून शिक्षण सांभाळून
वडिलांना व्यवसायात मदत करु लागले होते. मात्र एक-दोन
वर्षातच मुंबईतील चामड्याचे कारखाने बंद होऊ
लागले आणि कचऱ्यामध्ये मिळणारे चामड्याचे तुकडे मिळेनासे
झाले. “१९८९-९०ला व्यवसाय बंद झाला. इतकी
वर्ष याच व्यवसायावर आमचं घर चालत होतं. त्यामुळे आता
काय करायचं हा प्रश्न उपस्थित झाला. अशातच
काही लोकांनी आम्हाला सांगितलं
की चेन्नईला चामड्याचे मोठे कारखाने आहेत. तिथे
तुम्हाला चामड्याचे तुकडे नक्की
मिळतील. हे ऐकून मी चेन्नईला जायचं
निश्चित केलं. आई-बाबा नेहमीच माझ्या
पाठीशी उभे राहिले.
त्यावेळी त्यांनी मला २५ हजारांचं
भांडवल उभं करुन दिलं. मी ते घेऊन चेन्नईला गेलो
आणि तिथे मला प्रगतीचा मार्ग मिळाला,” राजेश
सांगतात.
ते पुढे सांगतात, “चेन्नईला मला मुंबईच्या तुलनेत खूप स्वस्तात
चामडं मिळू लागलं. मग १५-२० हजाराचा माल घेऊन मुंबईला
यायचं आणि इथे आणून तो विकायचा याचा मला चस्काच लागला.
हळूहळू ओळखी वाढत गेल्या, मुंबईतल्या
एक्सपोर्टर्सकडूनही मोठमोठ्या
शीट्सची मागणी होऊ
लागली आणि मी चामड्याच्या
तुकड्यांऐवजी पूर्ण चामड्याच्या शीट्स
आणू लागलो. बघता बघता माझा व्यवसाय वाढत गेला.
‘राजदीप लेदर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने
मी मोठ्या प्रमाणावर लेदर ट्रेडिंग करु लागलो. माझ्या
प्रामाणिकपणामुळे लोकांनीही मला खूप
चांगल्या संधी दिल्या आणि १९९८-९९ पर्यंत माझ्या
कंपनीची वार्षिक उलाढाल १५ ते २०
कोटींच्या घरात गेली.”
चेन्नई ते मुंबई मालवाहतूक करण्यासाठी राजेश
यांनी स्वतःचे तीन ट्रक घेतले आणि
‘राजदीप रोडलाइन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने
ट्रान्सपोर्ट कंपनी सुरु केली. “हे ट्रक
मी केवळ माझ्या मालाची ने-आण
करण्याकरिता वापरले. २०११ -१२ पर्यंत म्हणजे सहा-सात
वर्ष मी ही ट्रान्सपोर्ट
कंपनी चालवली. दरम्यान,
धारावीमध्ये २५ हजार फूटाच्या जागेवर लेदर
फिनिशिंगचं एक युनिट सुरु केलं. इथे चामड्यावर प्रक्रिया
केली जाते. लेदर टॅनिंग, फिनिशिंग,
कलरिंगची कामं या युनिटमध्ये होतात. हळूहळू
बाहेरच्या देशातील कंपन्यांबरोबर काम
करण्याची संधीही
मिळाली आणि मी चामडं एक्सपोर्ट करु
लागलो,” असं राजेश सांगतात.
यशाचं एक एक शिखर काबीज करणाऱ्या राजेश
यांनी २००७ साली कच्च्या मालाच्या
ट्रेडिंगबरोबरच मॅन्युफॅक्चरिंगकडे वळण्याचा निर्णय घेतला.
“इण्डस्ट्रीची जसजशी
ओळख होत गेली तसतसं माझ्या लक्षात आलं
की कच्च्या मालाच्या ट्रेडिंगमध्ये मिळणाऱ्या
मार्जिनच्या दसपट मार्जिन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मिळतं. त्यामुळे
मी ‘सिण्ड्रेला फूटवेअर’ नावाने स्वतःची
मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सुरु केली. आज
फूटवेअरबरोबरच आम्ही चामड्याचे बेल्ट, बॅग,
लेदर ऍक्सेसरीजही बनवतो आणि
एक्सपोर्ट करतो. आजघडीला जगभरात जवळपास
सगळीकडे आमचा माल एक्सपोर्ट होतो,” राजेश
सांगतात.
राजेश यांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. “मुळात सुरुवातच
गरीबीतून झाली
होती. आई-वडिलांनी दिलेले २५ हजार
आणि त्यांचा आशिर्वाद एवढ्या भांडवलावर चिकाटीने
चेन्नईचा रस्ता धरला होता. वाटेत अडथळे खूप होते. पण
मी त्यांना फार महत्त्व देत नाही.
कुठलंही काम करताना वाटेत अडचणी
या येणारच. अनेकदा नफ्यामध्ये असलेल्या
गोष्टीही सोडून द्याव्या लागतात. अशा
परिस्थितीतही प्रामाणिकपणा आणि
चिकाटी ठेवणं गरजेचं असतं. या प्रवासात तुम्हाला
वाईटाबरोबर चांगली माणसंही भेटत
असतात. ती जोडणंही तितकंच
महत्त्वाचं असतं. मलाही अशी अनेक
चांगली माणसं भेटली. फूटवेअर
एक्सपोर्ट करणाऱ्या एका महिलेने मला सर्वप्रथम
संधी दिली. त्यानंतर मलिक
एक्सपोर्ट्सचं नाव मी आवर्जून घेईन. मला
भेटलेल्या चांगल्या लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला,
मला संधी दिली. त्यामुळेच
मी हे यश संपादन करु शकलो.
आजही मी पैशांपेक्षा माणसं
जोडण्याला, ती जपण्याला अधिक महत्त्व देतो,”
राजेश सांगतात.
गरिबीतून वर आलेले राजेश आजही
आपले जुने दिवस विसरलेले नाहीत. म्हणूनच
आपला व्यवसाय सांभाळतानाच सामाजिक क्षेत्रातही
कार्यरत राहून ते गरिबांचे जीवनमान
सुधारण्यासाठी, गरीब मुलांच्या
शिक्षणासाठी प्रयत्नशील आहेत.
‘संत कक्कया विकास संस्थे’चे ते सचिव आहेत. “संस्थेच्या
माध्यमातून आम्ही
धारावीतील ‘श्री गणेश
विद्यामंदीर’ शाळेतील २५०० दलित
आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण पुरवितो.
संस्थेद्वारे मुलांना स्कॉलरशीप मिळवून देण्याचं आणि
त्यांना विदेशात शिक्षणासाठी पाठवण्याचं माझं
उद्दीष्ट आहे. धारावीमध्ये
चांगली शाळा, कॉलेज सुरु
करण्यासाठीही मी गेल्या
३-४ वर्षांपासून प्रयत्न करतो आहे. एका शाळेचं बांधकाम
सध्या सुरु आहे. विविध राजकीय
पक्षांबरोबरही मी काम केलेलं आहे.
मात्र याचा उपयोग मी राजकारण करण्यापेक्षा
समाजकारण करण्यासाठी केला.
धारावीतील लोकांना चांगलं
राहणीमान अनुभवण्याची
संधी मिळावी म्हणून येत्या काळात एक
कन्स्ट्रक्शन कंपनी सुरु करुन त्या अंतर्गत
त्यांच्यासाठी नेरळमध्ये ५००० घरांचं गृहसंकुल
उभारण्याची योजना आहे. १५-२०
लाखांमधील ही घरं
असतील,” असं राजेश सांगतात.
आपल्याप्रमाणेच गरिबीतून वर येऊ इच्छिणाऱ्या
मुलांना आणि एकूणच तरुण पिढीला ते मोलाचा सल्ला
देतात. ते सांगतात,“कोणत्याही
परिस्थितीत चिकाटी सोडू नका, खोटया
आमिषाला भूलू नका, त्वरित पैसा मिळवण्याच्या मागे लागू नका,
मेहनत करुन पैसा कमवण्याची तयारी
ठेवा. माझ्या गरजा आजही तेवढ्याच आहेत
जेवढ्या धारावीतील झोपडीत
राहताना होत्या. स्वतःच्या गरजा अनाठायी वाढवू नका.
केवळ पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करु नका
तर त्यांच्याप्रमाणे पैसाही कमवा आणि मुख्य
म्हणजे कमवलेल्या पैशाची बचत करायला शिका.”
आजकाल आसपास घडणाऱ्या घडामोडींमुळे
प्रामाणिकपणाने वागून आणि भरपूर पैसा जवळ असल्याशिवाय
माणूस यशस्वी होत नाही असा समज
समाजामध्ये रुढ होताना दिसतोय. मात्र मेहनतीच्या
जोरावर प्रामाणिक माणूसही यशस्वी
होऊ शकतो, गरिबीवर मात करु शकतो याचे राजेश
खंदारे हे एक उत्तम उदाहरण आहे.

कैलास जीवन

‘कैलास लोण्या’चे ‘कैलास जीवन’ होऊन आता साठ
वर्षे उलटून गेली आहेत. या काळात ‘सात दिवसांत
लख्ख गोरे बनवणारी’ किंवा ‘पायांच्या भेगा
चुटकीसरशी घालवणारी’
अनेक ‘स्किन क्रीम’ बाजारात आली,
पण कोणताही अचाट दावा न करताही
कैलास जीवन टिकून राहिले. आपला आब राखून
विस्तारले आणि आता ते रशिया, पोलंड आणि
स्वित्र्झलडलाही पोहोचले आहे.
‘कैलास जीवन’ नामक ‘स्किन
क्रीम’शी बहुसंख्य
मराठीजनांचा संपर्क बालपणीच येतो.
कुठेतरी खरचटून किंवा हात भाजून घेऊन आलेल्या
नातवंडांना एखादी आजी आपल्या
थरथरत्या हातांनी हळुवारपणे कैलास
जीवन लावते आणि पिवळसर लोण्यासारख्या दिसणाऱ्या
त्या क्रीमचा थंड स्पर्श आणि कापराचा वास त्या
वेळी लक्षात राहतो तो कायमचा! कैलास
जीवनला ‘स्किन क्रीम’
म्हणणेही कृत्रिम वाटावे इतके ते
घरगुती होऊन गेले आहे.
या क्रीमचे पहिले नाव चक्क ‘कैलास
लोणी’ असे होते! आंजल्र्याहून ‘व्हाया गोवा’
पुण्याला आलेल्या आणि इथेच वसलेल्या वासुदेव कोल्हटकर या
धडपडय़ा पुणेकराचे ते संशोधन. त्या ‘कैलास लोण्या’चे ‘कैलास
जीवन’ होऊन आता साठ वर्षे उलटून
गेली आहेत. या काळात ‘सात दिवसात लख्ख गोरे
बनवणारी’ किंवा ‘पायांच्या भेगा
चुटकीसरशी घालवणारी’
अनेक स्किन क्रीम बाजारात आली,
पण कोणताही अचाट दावा न करताही
कैलास जीवन टिकून राहिले. आपला आब राखून
विस्तारले आणि आता तर पार रशिया, पोलंड आणि
स्वित्झरलँडलाही पोहोचले.
वासुदेव कोल्हटकर हे मूळचे शिक्षक, पण त्यांना
कीर्तनाचा नाद होता.
कीर्तनासाठी संस्कृत यायला हवे
म्हणून त्यांनी सांगलीच्या संस्कृत
विद्यालयात धडे घेतले आणि १९२३-२४ मध्ये पुण्यात स्थायिक
झाले. आयुर्वेद आणि होमिओपॅथीची
आवड त्यांना होतीच. त्यांनी
स्वत:ची वेगळ्या
पठडीतली कीर्तने सुरू
केली. कीर्तनाच्या दोन भागांच्या मध्ये
ते दहा मिनिटांचे मध्यंतर घेत आणि या मध्यंतरात
काहीतरी सल्ला देणारी
घोषणा करीत. या वेळी लोकांना
काही साधी औषधे सांगता येऊ
शकतील असे त्यांना वाटले आणि कैलास
जीवनच्या कल्पनेचे बीज तिथे रुजले.
या क्रीमची प्रेरणा आली
आयुर्वेदातील ‘शतधौतघृत’ (विशिष्ट
पद्धतीने शंभर वेळा घासलेले/ फेटलेले तूप) या
औषधावरून. परंतु या तुपाला एक प्रकारचा उग्र वास येई.
तशीच प्रक्रिया खोबरेल तेलावर करून पाहूया, या
विचारातून कोल्हटकरांनी त्यात शंखजिरे पावडर
(टाल्क पावडर), राळ, चंदनाचे तेल, कापूर असे विविध घटक
घालून त्यापासून ‘कैलास लोणी’ बनवले. या
उत्पादनाचे हे माजघरातील नाव फार दिवस राहिले
नाही आणि ‘कैलास जीवन’ याच नावाने
उत्पादन विकायचे ठरले.
जोडधंदा म्हणून १९५५-५६ मध्ये जन्मास आलेल्या या स्किन
क्रीमचे आगळे ‘मार्केटिंग’ हे त्याचे
आणखी एक वैशिष्टय़. पहिली
जवळपास दहा वर्षे कीर्तनाच्या मध्यंतरात या
क्रीमचे नाव आणि उपयोग जमलेल्या लोकांसमोर
पोहोचवण्याचा प्रयत्न होत असे. राजा केळकर
संग्रहालयाशेजारी असलेल्या कोल्हटकरांच्या
घरातील अदिती वामन मंदिर, खुन्या
मुरलीधराचे देऊळ, मोदी
गणपती, सदाशिव पेठेत केसकर विठोबा,
कँपातील मारुती मंदिर,
शिवाजीनगरचा रोकडोबा अशी
सगळीकडे त्यांची कीर्तने
होत. या निमित्ताने समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना
कैलास जीवन माहिती झाले.
तारुण्यपिटिका, त्वचेच्या इतर तक्रारी, भाजणे,
मूळव्याध अशा विविध गोष्टींवर चालणारे व औषध
म्हणून पोटातही घेता येणाऱ्या या
क्रीमची ६० ग्रॅमची
बाटली तेव्हा एक रुपयाला मिळे. तोपर्यंत वासुदेव
कोल्हटकरांची मुलेही शिक्षण पूर्ण
होऊन हाताशी आली होती.
त्यांच्या एका मुलाने आणि एका मुलीने
वैद्यकीचे शिक्षण, तर एका मुलाने औषधनिर्माण
शास्त्राचे शिक्षण घेतले होते. आणखी एक मुलगा
एमए पूर्ण करून वडिलांना मदत करण्यास तयार झाला होता. असे
सगळे घरच उद्योगासाठी एकत्र आले.
‘आयुर्वेद संशोधनालय पुणे प्रा. लि.’ या कंपनीतर्फे
धायरीत कैलास जीवनचे उत्पादन होते.
राम कोल्हटकर, परेश आणि वेधस कोल्हटकर आणि अनुराधा
कोल्हटकर हे कंपनीचे आताचे संचालक. मधल्या
काळात या क्रीममध्ये कालानुरूप बदल झाले. हे
क्रीम ‘इमल्शन’ स्वरूपातील
असल्यामुळे त्यात पाणीसदृश चुन्याची
निवळी असते. क्रीम
बाटलीत भरल्यावर त्यातून पाणी वेगळे
होऊ नये यासाठी सुरुवातीच्या काळात
विविध प्रयोग झाले. नंतर जाड काचेच्या बाटल्या आणि
पत्र्याची झाकणेही
बदलली गेली. ‘पॅकिंग’ बदलले पण
उत्पादनाचे मूळ तेच राहिले.
पुण्याने कैलास जीवनला जिव्हाळा दिला हे मान्य
करतानाच ‘आमची कुठेही शाखा
नाही’चा पुणेरी बाणा मागे टाकून
व्यावसायिक म्हणून मोठे होण्याचा प्रयत्नही
कोल्हटकर कुटुंबीयांनी केला, हे विशेष.
आपले उत्पादन विकत घ्यायला लोकांना थेट आपले घरच गाठावे
लागणे बऱ्या व्यावसायिकाचे लक्षण नव्हे. उत्पादकाला
व्यापाऱ्याला भले कमिशन द्यावे लागो, पण त्याच्यामार्फत उत्पादन
लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हाच त्याचा अधिक प्रसार होईल, हे
व्यवसायाचे साधे तत्त्व त्यांनी दूर लोटले
नाही. कैलास जीवन
परदेशी गेले ते इथल्यापेक्षा वेगळ्या वेष्टनात आणि
वेगळ्या नावासह. व्यावसायिक म्हणून आम्हाला वाढायचे आहे,
ही स्पष्ट भूमिका त्यांनी
ठेवली. आपल्याला ज्या नवीन शहरात
उत्पादन घेऊन जायचे आहे त्या शहराचा भूगोल पक्का
माहीत हवा, तरच विपणन उत्तम करता येईल,
ही अभ्यासू वृत्ती सोडली
नाही, शिवाय उत्पादनाबद्दल अचाट
दावेही केले नाहीत. इतर अनेक
उत्पादनांपेक्षा कैलास जीवन वेगळे ठरले ते कदाचित
त्याच्या विश्वासार्हतेमुळेच. पुणेकरांनी त्याला
केव्हाच आपलेसे केले होते, पण पुण्याचा ‘ब्रँड’ म्हणून
बाहेरच्या बाजारपेठेत गेलेले हे उत्पादन तिथेही
स्थिरावले आणि त्याचा थंडावा देणारा स्पर्श आणि कापराचा वास
अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या
करू लागला.











sampada.sovani@expressindia.com

रविवार, १४ मे, २०१७

निळू भाऊ

एरवी 'मास्तर' या
शब्दांत काय आहे?
कुणीही म्हणावं असा शब्द. पण तोच
शब्द जेव्हा निळू फुलेंच्या तोंडातून येतो, तेव्हा
त्यातली खोली नि त्या शब्दाला असलेल्या
भयाचं वलयही स्पष्ट जाणवतं. निळूभाऊंच्या
घोगर्या, बसक्या आवाजातून फुटणारा हा शब्द समोरच्या
व्यक्तिरेखेचाच नाही, तर पाहणार्या तटस्थ
प्रेक्षकाच्या मनालाही भयाच्या कवेत घेऊन यायचा.
त्यांची बेरकी नजर
प्रेक्षकांच्याही आरपार जायची.
हीच नजर, सूचक हावभाव नि संवाद हे निळूभाऊंचं
बलस्थान खरंच. पण तरीही त्यांच्यात
असं काय होतं, ज्यामुळे त्यांच्या खलनायकी भूमिका
इतक्या नावाजल्या गेल्या. प्रभावी ठरल्या?
'
खलनायक' हा शब्द निळूभाऊंसाठी मोठीच
मर्यादा घालून बसला. वास्तविक सिंहासनमध्ये
पत्रकाराची व्यक्तिरेखा साकारणार्या
निळूभाऊंनी विविधांगी व्यक्तिरेखा बर्याच
केल्या, पण त्यांच्यावर प्रभाव या खलनायकी
व्यक्तीरेखांचाच जास्त पडला. त्याचा परिणाम
त्यांच्यातल्या अष्टपैलू अभिनेत्याभोवती मर्यादांचे
रिंगण आखण्यात झाला. तरीही त्यांच्या
खलनायकी भूमिकांचा प्रभाव इतका का पडला हा
प्रश्न उरतोच.
वास्तविक त्यांच्याही आधी
मराठी चित्रसृष्टीत खलनायक होते. पण
तरीही प्रेक्षकांच्या मनात रुतून बसेल नि
खोलवर भीतीचं सावट नेईल अशा
खलनायकाची नक्कीच कमतरता
होती. एक गाव बारा भानगडीतून अनंत
मानेंनी हा नवा खलनायक प्रेक्षकांसमोर आणला.
त्यामुळे तोपर्यंत मराठी सिनेमातली
खलनायकाची मोठी पोकळी
निळूभाऊंनी भरून काढली, खरं तर ते या
पोकळीत पूर्णपणे व्याप्त झाले. त्यामुळे दुसरा
कुठलाही खलनायक त्यांच्यासमोर उभा राहू शकला
नाही. कुलदीप पवारने थोडेफार प्रयत्न
केले पण कुवतीचा फरक फार मोठा पडला. मग थेट
८० च्या दशकात दीपक शिर्के, राहूल सोलापूरकर
आणि इतर असे नवे खलनायक उदयाला आले. पण निळूभाऊंचा
प्रभाव त्यांना पकडता आला नाही. एकतर या काळात
मराठी सिनेमाकडे प्रेक्षकांनाही पाठ
फिरवली होती. त्यामुळे
मराठी चित्रसृष्टीतला खलनायक म्हणून
नाव येते ते निळूभाऊंचेच.
सरपंच, पाटील या सत्ताधारी
व्यक्तींभोवती असलेल्या नकारात्मक छटा
निळूभाऊंनी अधिक उलगडून खुल्या करून दाखविल्या.
निळूभाऊंनी सादर केलेल्या या व्यक्तिरेखा
भलेही काल्पनिक असल्या तरी त्या
काळातल्या सत्ताधार्यांचेच प्रतिनिधित्व करणार्या होत्या यात
काही शंका नाही. सहकारी
चळवळीच्या माध्यमातून सर्व सत्ताकेंद्रे आपल्या
हातात ठेवणार्या मूठभरांचे खरे चित्र निळूभाऊंनी समोर
आणले. खरे तर सामान्यांच्या मनी या
गोष्टी होत्याच, पण निळूभाऊंनी त्या
पडद्यावर आणून या मंडळीचा दंभस्फोट केला.
म्हणूनच त्यांच्या व्यक्तिरेखांना बाया-बापड्यांनी शिव्या
घातल्या. आपल्या आजूबाजूला बघणार्या राजकारणी
व्यक्तींमधीलच एक समोर पडद्यावर
दिसते आहे आणि ती इतरांचे फक्त वाईटच करू
शकते, एवढे या बाया-बापड्यांच्या मनात पक्के बसलेले असायचे.
त्यातूनच त्यांचा राग अनावर यायचा नि तोंडातून शिव्या बाहेर
पडायच्या.
इतकी स्पष्ट दाद फारच क्वचित मिळते. निळूभाऊ
व्यक्तिरेखेच्या माध्यमातून थेट सत्यापर्यंत म्हणजे
तत्कालीन सत्ताधीशांच्या मूळ
व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचत होते. सत्ताधीशांचे
अविभाज्य गुणही त्यांनी तितक्याच
नागवेपणाने लोकांसमोर आणले. त्यांचा
स्त्रीलंपटपणाही त्यांच्या संवादातून
टपकत असायचा, म्हणूनच तर
'बाकी....पोरीला
साडीचोळी..ह्ये$$$ आमी
करु! आवो खानदानी पध्दतय ती
आमची!' या संवादातून काय अभिप्रेत आहे, हे
कळायला वेळ लागायचा नाही आणि संताप अनावर
व्हायचा. 'बाई, अहो आपला स्वतःचा येव्हडा वाडा असताना
तुम्ही त्या पडक्यात राहणार ? तुम्हाला तिथे बघुन,
आम्हाला हिकडं रातीला झोप यायची
नाही, हे म्हणणारी व्यक्ती
किती पोहोचलेली असेल आणि त्याचे हेतू
काय आहेत, हे कळून प्रेक्षकाच्या मनात चीड
आणि त्या स्त्री व्यक्तिरेखेविषयी
सहानुभूती चटकन निर्माण व्हायची.
ही 'चीड' म्हणजे निळूभाऊंना दाद
असली तरी राजकारणी
मंडळीच्या स्त्रीलंपटपणाविरोधतला
निषेधही होता. राजकारण्यांचा मस्तवालपणा दाखविणारे
त्यांचे हे संवाद म्हणूनच आजही लक्षात रहातात.
''आमच्या घराण्यात गलास फोडल्याचे बारा आणे कधी
कुणी भरले नाहीत. पोरानं दारु
प्यावी, मास्तराला मारावं, हवालदाराच्या कानफटात ठेऊन
द्यावी आन बापानं नायतर आज्यानं सगळं नुसतं
करंगळीवर निभाऊन न्यावं....'' आजही
काही राजकारणी मंडळींचा
'माज' यापेक्षा वेगळा असतो काय? हा संवाद वाचला
तरीही राग येतो, मग सादर करणार्या
निळूभाऊंनी तो सादर केला तर त्याची
तीव्रता काय असेल याचा अंदाजच केलेला बरा.
बेरकीपणा, मस्तवालपणा, उर्मटपणा, माज नि वरचढ
ठरण्याची राजकारणी वृत्ती
निळूभाऊंनी आपल्या खलनायकी
व्यक्तिमत्वात कशी आणली असेल?
निरिक्षणातून तर नक्कीच. कारण खेड्यातूनच पुढे
आलेल्या निळूभाऊंनी हे जग बघितले होते.
काहींच्याच हातात केंद्रित झालेली सत्ता,
त्यांचा माजही त्यांनी बघितला होता. ज्या
नजरेतून त्यांनी हे पाहिले, त्या नजरेतून हे सारं
देहात भिनवत निळूभाऊंनी प्रेक्षकांसमोर आणलं
आणि गारूड केलं. म्हणूनच निळू फुले ही
व्यक्तीच अशी खलनायकी
असावी ही समजूत दृढ करण्यात ते
यशस्वी ठरले. निळूभाऊ काही
कारणपरत्वे गावोगाव गेल्यानंतर तिथल्या शिक्षिका, नर्स
त्यांच्यापासून चार हात दूर रहायच्या. या घटना निळूभाऊंच्या
व्यक्तिरेखेतल्या अस्सलपणाचे द्योतक आहे.
खलनायक ही निळूभाऊंभोवती
पडलेली मर्यादा खरीच. पण
त्यातही त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला.
खलनायक म्हणून त्यापेक्षा वेगळा विचार आपण
आजही करू शकत नाही हे
निळूभाऊंच्या भूमिकांचे यश आहे नि पगडाही. सरपंच
आणि पाटील या व्यक्तिरेखांना निळूभाऊंचे कोंदण लाभले
आहे. म्हणूनच आजही या
व्यक्तींकडे आपण पडद्यावरच्या निळूभाऊंकडे
बघण्याच्या नजरेतूनच बघतो, ही त्यांच्या भूमिकांना नि
त्यांच्यातल्या कलावंताला मिळालेली पावती
आहे. त्यांचा हा प्रभाव पुसता येईल, अशी शक्यता
आज घडीला तरी दिसत
नाही.

Great quote in hindhi

महान व्यक्तियों के विचार
महान लोगों के विचार
Great Quotes In Hindi
mahan logo ke vichar
1. आपका काम आपके जीवन का एक
बड़ा हिस्सा भरने वाला है, और वास्तव में
संतुष्ट होने का एकमात्र तरीका है
जो आपको बहुत अच्छा काम मानते हैं वह
करना है और महान कार्य करने का एकमात्र
तरीका है कि आप क्या करना
चाहते हैं। अगर आपको यह
अभी तक नहीं मिला
है, तो आप देख रहे हैं। व्यवस्थित मत करो
दिल के सभी मामलों के साथ, आपको
पता चल जाएगा कि आपको यह कब मिलेगा।
स्टीव जॉब्स
2. हर महान सपना एक सपने देखने के साथ
शुरू होता है। हमेशा याद रखो, आपके पास
ताकत, धैर्य और जुनून को दुनिया में बदलने
के लिए सितारों तक पहुंचने के लिए आपके
भीतर है।
हेरिएट टबमैन
3. व्यवसाय में महान चीजें एक
व्यक्ति द्वारा कभी
नहीं की
जाती हैं वे लोगों की
एक टीम द्वारा किया जाता है
स्टीव जॉब्स
4. एक व्यक्ति के जीवन में दो महान
दिन हैं – जिस दिन हम पैदा होते हैं और जिस
दिन हम खोजते हैं वह क्यों
विलियम बार्कले
5. जो लोग सोचते हैं कि वे जानते हैं कि सब कुछ
हम में से उन लोगों के लिए एक महान
झुंझलाहट हैं
इसहाक असिमोव
6. कठिन काम करते हैं, जबकि वे आसान होते हैं
और बड़े काम करते हैं, जबकि वे छोटे होते
हैं। एक हजार मील
की यात्रा एक कदम से शुरू
होनी चाहिए।
लाओ त्सू
7. महान उपलब्धि आमतौर पर महान बलिदान से
पैदा होती है, और
स्वार्थीपन का नतीजा
कभी नहीं होता है।
नेपोलियन हिल
8. औसत दर्जे का शिक्षक बताता है अच्छा
शिक्षक बताता है श्रेष्ठ शिक्षक दर्शाता है
महान शिक्षक प्रेरित करता है
विलियम आर्थर वार्ड
9. एक ऐसी दुनिया में रहना जो आपको
लगातार कुछ और करने की कोशिश
कर रहा है, वह सबसे बड़ी
उपलब्धि है।
राल्फ वाल्डो इमर्सन
10. महान कार्यों को ताकत से नहीं
बल्कि दृढ़ता से किया जाता है।
सैमुएल जॉनसन
11. मुझे मेरे जीवन में इतने महान काम
करने की आशीष है-
परिवार, मित्रों और भगवान। सभी
मेरे विचारों में दैनिक होंगे
लिल ‘किम
12. शिक्षा का महान उद्देश्य ज्ञान
नहीं है, लेकिन क्रिया है।
हर्बर्ट स्पेन्सर
13. मौन महान शक्ति का स्रोत है।
लाओ त्सू
14. विकास की कोई बड़ी
सीमा नहीं है क्योंकि
मानव बुद्धि, कल्पना, और आश्चर्य
की कोई सीमा
नहीं है।
रोनाल्ड रीगन
15. जीवन या तो एक महान साहसिक या
कुछ भी नहीं है
हेलेन केलर
16. कोई भी एक महान नेता
नहीं बना सकता जो
सभी को स्वयं करना या इसे करने
के लिए सभी श्रेय देना चाहता है।
एंड्रयू कार्नेगी
17. प्रत्येक महान व्यक्ति के पीछे
उसकी आंखों को रोल करने
वाली एक महिला है।
जिम कैरी
18. बस जीवन और उसके साथ आने
वाले महान सुख का आनंद लें।
करोलिना कुर्कको
19. प्रकृति में तीन महान मौलिक
आवाज़ें वर्षा की आवाज़ हैं, एक
प्राचीन लकड़ी में हवा
की आवाज़, और एक समुद्र तट
पर बाहरी महासागर
की आवाज़ है
हेनरी बेस्टोन
20. एक महान व्यक्ति एक प्रतिष्ठित व्यक्ति से
अलग है जिसमें वह समाज के दास बनने के
लिए तैयार है।
बी आर अंबेडकर
21. जब तक आप अपनी किस्मत में
नहीं पहुंच जाते तब तक लड़ना
बंद न करें – यही है,
अद्वितीय आप जीवन
में उद्देश्य रखें, ज्ञान प्राप्त करें,
कड़ी मेहनत करें, और महान
जीवन को महसूस करने के लिए
निरंतरता रखें।
ऐ। पी. जे। अब्दुल कलाम
22. मैंने प्यार के साथ जुड़े रहने का निर्णय लिया
है। नफरत सहन करने के लिए एक बहुत
बड़ा बोझ है।
मार्टिन लूथर किंग जूनियर।
23. मेरी माँ के पास मेरे साथ
बड़ी मुश्किलें थी,
लेकिन मुझे लगता है कि उसने उसे मज़ा लिया।
मार्क ट्वेन
24. महान विचार विचारों पर चर्चा; औसत दिमाग
घटनाओं पर चर्चा करता है; छोटे दिमाग लोगों
पर चर्चा करते हैं
एलेनोर रोसवैल्ट
25. कोई महान कलाकार कभी
भी चीजों को देखता है
जैसे वे वास्तव में हैं। अगर उसने ऐसा किया,
तो वह एक कलाकार बनना बंद कर देगा
ऑस्कर वाइल्ड
26. तनाव के खिलाफ सबसे बड़ा हथियार एक दूसरे
पर एक विचार का चयन करने की
हमारी क्षमता है।
विलियम जेम्स
27. बड़ी चीजें एक साथ
लाए गए छोटी चीजों
की एक श्रृंखला से किया जाता है
विन्सेंट वॉन गॉग
28. असाधारण अवसरों के लिए इंतजार न करें
सामान्य अवसरों को जब्त करें और उन्हें
महान बनाएं अशक्त पुरुष अवसरों
की प्रतीक्षा करते हैं;
मजबूत पुरुष उन्हें बनाते हैं
ऑरिसन स्वेट मेर्डन
29. सबसे पहले, दुख को स्वीकार
करें। महसूस करो कि हारने के बिना,
जीत इतना महान नहीं
है
एलिसा मिलानो
30. खेल से आने वाली महान बात यह
है कि आप टीम की
अवधारणा को समझते हैं। यह
स्वार्थी होने के लिए कोई जगह
नहीं छोड़ता, और ऐसा कुछ जिसे
मैंने घर से उठाया था
माइकल स्ट्रैहान
*******************
महान व्यक्तियों के विचार
*******************
1. महान कार्य छोटे कर्मों से बने होते हैं
लाओ त्सू
2. दुनिया में कभी भी
महान जुनून के बिना पूरा किया गया है
जॉर्ज विल्हेम फ्रेडरिक हेगेल
3. महान महत्वाकांक्षा एक महान चरित्र का
जुनून है इसके साथ संपन्न लोग बहुत
अच्छे या बहुत बुरे काम करते हैं।
सभी सिद्धांतों पर निर्भर करता है
जो उन्हें निर्देशित करते हैं।
नेपोलियन बोनापार्ट
4. मेमोरी एक महान कलाकार है हर
आदमी के लिए और हर महिला के
लिए यह अपने जीवन का स्मरण
करता है कला का एक कार्य और
अविश्वासयोग्य रिकॉर्ड।
आंद्रे मॉौरिस
5. मुझे लगता है कि जोखिम लेने एक महान
साहसिक है और जीवन रोमांच से
भरा होना चाहिए।
हर्बी हैनकॉक
6. मैं कुछ नहीं करने का प्रयास
करने और सफल होने के बजाय कुछ महान
और विफल करने का प्रयास करता हूं।
रॉबर्ट एच। शूल्लर
7. इस दुनिया में सम्मान के साथ जीने
का सबसे बड़ा तरीका होना चाहिए
कि हम क्या होना चाहिए।
सुकरात
8. यदि आप महान काम नहीं कर
सकते हैं, तो छोटी सी
बातें एक शानदार तरीके से करें।
नेपोलियन हिल
9. हमारे दुश्मनों के सामने खड़े होने के लिए
बहुत बहादुरी होती
है, लेकिन हमारे दोस्तों के लिए
उतनी ही ज्यादा
खड़ी होती है
जे के राउलिंग
10. जब आप उन्हें बताते हैं कि लोग आपके
सामने एक बड़ा भविष्य है, तो आप अपने
अतीत को पीछे छोड़
सकते हैं।
जोएल ओस्टीन
11. श्रेष्ठता की स्थिति एक महान
व्यक्ति को अधिक से अधिक और एक छोटा
व्यक्ति को कम बनाता है
जीन डे ला ब्रुएरे
12. पहली और सबसे
बड़ी जीत अपने आप
को जीतना है; अपने आप से
जीतने के लिए सबसे लज्जाजनक
और नीच सभी
चीजों की है।
प्लेटो
13. कुछ महान पैदा हुए हैं, कुछ महानता प्राप्त
करते हैं, और कुछ लोगों पर महानता जोर
देती है।
विलियम शेक्सपियर
14. सबसे बड़ा संसाधन लोगों में से एक स्वयं को
जुटाव नहीं कर सकता है कि वे
महान चीजों को पूरा करने का
प्रयास करते हैं। सबसे उपयुक्त उपलब्धियां
एक ही दिशा में कई
छोटी चीजों का परिणाम
है।
नीडो क्यूबेइन
15. एक महान अधिकार करने के लिए थोड़ा गलत
करना
विलियम शेक्सपियर
16. कला के प्रत्येक महान काम में दो चेहरे हैं,
एक अपने समय की ओर और
एक भविष्य के लिए, अनंत काल
की ओर।
लेस्टर बैंग्स
17. अपने दिल में गहरे विश्वास करो कि आप
महान काम करने के लिए किस्मत में हैं।
जो पैटरनो
18. मुझे जीवन से प्यार हे। मुझे
लगता है कि यह शानदार है कभी-
कभी यह मुश्किल
चीजों का निपटारा करता है, और
जब यह बड़ी बातों का निपटारा करता
है, तो आपको उन्हें जब्त करना होगा।
सैम टेलर-लकड़ी
19. मेरी बड़ी चिंता यह
नहीं है कि आप असफल रहे हैं
या नहीं, लेकिन आप
अपनी विफलता से संतुष्ट हैं या
नहीं।
अब्राहम लिंकन
20. मेरा सबसे बड़ा मुद्दा मेरी दृढ़ता है
मैं एक मैच में हार नहीं मानता।
हालांकि नीचे मैं हूं, मैं
आखिरी गेंद तक संघर्ष करता
हूं। मैचों की मेरी
सूची से पता चलता है कि मैंने कई
तथाकथित अपरिवर्तनीय पराजय
जीत हासिल की है।
ब्योर्न बोर्ग
21. महान साहित्य के बारे में क्या आश्चर्यजनक
बात यह है कि यह उस व्यक्ति को बदलता
है जो इसे लिखने वाले व्यक्ति की
स्थिति की ओर पढ़ता है।
ई। एम। फोस्टर
22. हमारे पास न केवल समृद्ध समाज और
शक्तिशाली समाज की
तरफ बढ़ना है, बल्कि ग्रेट
सोसाइटी की तरफ
बढ़ने का मौका है।
लिंडन बी। जॉनसन
23. मुझे लगता है कि अच्छे और महान केवल
बलिदान की इच्छा से अलग हो जाते
हैं
करीम अब्दुल-जब्बार
24. महान चीजें आवेगों से
नहीं की
जाती हैं, लेकिन एक
छोटी सी
चीजों की एक श्रृंखला
से एक साथ लाया गया है।
जॉर्ज एलियट
25. अच्छा चिकित्सक रोग का इलाज करता है;
महान चिकित्सक रोगी को मानता है
जिसकी
बीमारी है
विलियम ओस्लर
26. हमारी सबसे बड़ी
महिमा कभी भी
असफल नहीं होती
है, लेकिन हर बार जब हम असफल हो जाते
हैं
राल्फ वाल्डो इमर्सन
27. जो लोग बुरी तरह से असफल
होने की हिम्मत करते हैं वे
बहुत अधिक प्राप्त कर सकते हैं।
जॉन एफ़ कैनेडी
28. आपको शुरू करने के लिए महान होना
जरूरी नहीं है, लेकिन
आपको महान होना चाहिए।
ज़िग ज़िगलर
29. महान विचारधारा महान समय बनाता है
किम जोंग इल
30. महान व्यक्ति वह है जो अपने बच्चे के
हृदय को नहीं खोता है
मेन्शियास
31. जब तक आप इसके साथ श्रेष्ठ कार्य करने
की चुनते हैं, तो इससे कोई फर्क
नहीं आप कितना पुरस्कृत कर
रहे हैं, या कितना शक्ति आप में आता है।
ओपरा विनफ्रे
32. शिक्षा केवल एक महान रहने की
कमाई के बारे में नहीं है यह एक
महान जीवन जीने का
मतलब है।
ब्रैड हेनरी
33. सभी लोगों ने महान
चीजें हासिल की हैं, वे
महान सपने देखने वाले हैं।
ऑरिसन स्वेट मेर्डन
34. हर महान व्यक्ति के पीछे एक
आश्चर्यजनक महिला है
मैरीयन पियरसन
35. एक युवा खिलाड़ी के रूप में, मैं खेल
का आनंद उठाया और मेरी
महत्वाकांक्षा एक महान खिलाड़ी
थी।
लिन डेविस
36. मुझे लगता है कि मैं दुनिया में
भाग्यशाली व्यक्ति हूं जो मुझे
पसंद है और हर दिन ऐसा करने में सक्षम
होने में सक्षम हो सकता है अगर मुझे पसंद
है, तो आप जानते हैं, मेरा मतलब है कि यह
बहुत अच्छा है, मुझे यह पसंद है।
आस्था रिंगोल्ड
37. एक महान कवि राष्ट्र की सबसे
कीमती गहना है
लुडविग वान बीथोवेन
38. थोड़ी सी शिक्षा उन
लोगों के लिए खतरनाक चीज
नहीं है जो बड़ी सौदा
के लिए गलती नहीं
करता।
विलियम एलन व्हाइट
39. महान केवल महान हैं क्योंकि हम अपने
घुटनों पर हैं हमें बढ़ने दो!
पियरे-जोसेफ प्रहधन

Cancer : Bollywood fight

'या' सेलिब्रेटींनी हरवले
कॅन्सरला
- Geetanjali Ambre -
कॅन्सर हा शब्द जरी नुसता उच्चारला,
तरी अंगावर काटे उभे राहतात. कॅन्सर झाला
की मृत्यू अटळ, अशी
काहीशी समजूत आजही
लोकांच्या मनात आहे. मात्र, हा रोग नेहमीच
जीवघेणा असोतच, असे नाही. असे
बरेच जण आहेत, ज्यांनी कॅन्सरशी
दोन हात करून आयुष्यात पुन्हा दमदार पुनरागमन केले.
आय़ुष्यात एखादी अप्रिय घटना घडली,
की बस्स ! आता जगायचंच नाही, असा
टोकाचा निर्णय काही जण घेतात... असा निर्णय
घेण्यापूर्वी क्षणभर या व्यक्तींचे
अनुभव ऐकावेत. ते त्यांच्यासाठी
नक्कीच प्रेरणादायी
ठरतील.

युवराजसिंग
भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंग याला वर्ल्डकप २०११च्या
आसपास कॅन्सर झाल्याची लक्षणे जाणवू
लागली.
कॅन्सरच्या पहिल्या स्टेजला असताना त्याला कॅन्सर झाल्याचे
निदान झाले. याही परिस्थितीत तो
डगमगला नाही. तो केमोथेरपी
घेण्यासाठी अमेरिकेत गेला आणि २०१२च्या
अखेरीस कॅन्सरवर मात करून त्याने क्रिकेटमध्ये
पुनरागमन केले. कॅन्सरग्रस्त तसेच इतर लोकांना जिद्द
देण्यासाठी युवीने 'द टेस्ट आॅफ माय
लाईफ' हे पुस्तक लिहिले.


इम्रान हाश्मी
बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीचा मुलगा अयान याला
वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी कॅन्सर झाल्याचे
कळाले. हे ऐकून इम्रान आणि त्याची
पत्नी परवीना यांच्या
पायाखालची जमीन सरकली
होती. मात्र, खचून न जाता इम्रानने या बलाढ्य
रोगावर मात करून मुलाला त्यातून बाहेर काढले. यानंतर त्याने 'द
किस आॅफ लाईफ : हाऊ अ सुपर हिरो अँड माय सन
डिफीटेड कॅन्सर' हे पुस्तक लिहिले. या प्रवासातून
एक गोष्ट निश्चित कळाली. कर्करोग हा अंत
नाही तर इच्छाशक्तीने त्यावर मात
करता येऊ शकते, असे इम्रान 'लोकमत' व 'कोकिलाबेन
धीरुभाई अंबानी हॉस्पिटल'च्या संयुक्त
विद्यमाने आयोजित 'एक जीवन, स्वस्थ
जीवन' या कार्यक्रमादरम्यान म्हणाला. तसेच
कर्करोगाबाबत अनेक गैरसमज आहेत. ते दूर करायला हवेत.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समुपदेशनावर भर
देण्याची गरज असल्याचे मतही त्याने
या कार्यक्रमाद्वारे व्यक्त केले.


अनुराग बसू
'बर्फी' या चित्रपटानंतर अनुराग बसू प्रकाशझोतात
आला. मात्र, फार कमी लोकांना माहिती
आहे की, त्याने कॅन्सरसारख्या बलाढ्य
आजाराशी दोन हात केले आहेत. २००४ मध्ये
अनुरागची मुलगी ईशानाचा जन्म झाला.
त्याच सुमारास तो 'तुमसा नहीं देखा' चित्रपटात
बिझी होता. याच दरम्यान त्याला ब्लड कॅन्सर
झाल्याचे कळाले. डॉक्टरांनी त्याला २ महिने
जगशील, असे सांगितले होते. त्याने
खंबीरपणे हे मान्य केले. मात्र, त्याने चित्रपटाचे
चित्रीकरण थांबविले नाही. हॉस्पिटलच्या
बेडवर बसून तो आपल्या टीमला सूचना देत होता.
एवढ्यावरच तो थांबला नाही. त्याने 'लाईफ इन अ
मेट्रो' आणि 'गँगस्टर' सारख्या चित्रपटांचे स्क्रिप्ट
हॉस्पिटलमध्ये पूर्ण केले. ३ वर्षांच्या उपचारांनंतर अनुराग
पूर्णपणे बरा झाला.


मनीषा कोईराला
९०च्या दशकातील बॉलिवूडमधली
प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मनीषा
कोईराला. वयाच्या ४२व्या वर्षी तिला कॅन्सरचे निदान झाले. यानंतर ती उपचार घेण्यासाठी
वर्षभर न्यूयॉर्कमध्ये होती.
केमोथेरपीदरम्यान मनीषाचे केस गळून
गेले होते. मात्र, याही परिस्थितीत तिने
हार मानली नाही. तिने त्या
गोष्टीचा सामना केला. वर्षभराच्या उपचारांनंतर
ती बरी झाली. आता
ती कर्करोगापासून मुक्त झाली आहे.
पूर्ववत कामसुद्धा करू लागली आहे. तिने
बॉलिवूडमध्येदेखील कमबॅक केले. कर्करोगाच्या रुग्णांना आपले अनुभव सांगायला ती वेगवेगळ्या
परिषदांमध्ये नेहमी सहभागी होते.
Dailyhunt

शनिवार, १३ मे, २०१७

Aleovera juice in jat

जतच्या रणरणत्या पट्ट्यात तयार होतोय कोरफड ज्यूस
-
Tuesday, February 04, 2014 AT 05:15 AM (IST)
Tags: agro special

सांगली जिल्ह्यात जतसारख्या दुष्काळी तालुक्‍यात तब्बल दहा एकर क्षेत्रावर सातत्याने औषधी कोरफडी वनस्पतीचे पीक गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने घेतले. उत्पादनावर न थांबता प्रकिया करून कोरफडीच्या रसाचे उत्पादन घेतले. त्याची राज्याबरोबर परराज्यांतही विक्री होते. आवळा, कारली, जांभळाच्या रसाचेही उत्पादन सुरू केले. तालुक्‍यातील शेगाव येथील संभाजीराव धोंडिराम बोराडे (वय 55) यांची शेतकरी ते उद्योजक वाटचाल प्रेरणा आहे. केवळ दहावी शिक्षण झालेल्या संभाजीरावांनी आपल्या उत्पादनांप्रति विश्‍वास कमाविला आहे. राजकुमार चौगुले 
जत तालुक्‍यातील शेगाव येथील संभाजीराव बोराडे यांची बारा एकर शेती आहे. त्यापैकी तब्बल दहा एकरांवर कोरफडीची शेती आहे. लागवडीनंतर पहिली दोन वर्षे कोरफड परिपक्व होईपर्यंत तोडणी करता येत नाही. दोन वर्षांनंतरच ती वापरता येते. एका कोंबाला पाच ते सहा वर्षे सातत्याने पाने येतात. पाच एकरांमध्ये बागायत तर उर्वरित क्षेत्रात जिराईत क्षेत्रात कोरफड आहे. बागायती क्षेत्रात दोन एकरांवर स्प्रिंकलर, एक एकरांवर ठिबक, तर दोन एकर पाटपाण्यावर आहे. या क्षेत्राला दर पंधरा दिवसांनी पाणी दिलं जातं. दोन बाय दोन फुटांवर लागवड असून, एकरी सुमारे अकरा हजार रोपे लावण्यात आली आहेत. कोरफडीवर रोग फारसे येत नाहीत, मात्र जनावरांपासून जपावे लागते. 

प्रतिकूल परिस्थितीतून यश सन 1998 मध्ये संभाजीरावांनी लागवड केली खरी. पीक तर आले. पण त्याच्या विक्रीबाबत अजूनही म्हणावा तसा विचार झालेला नव्हता. उत्पादित माल कुठे द्यायचा याबाबत फारसे ज्ञान नव्हते. एकाने खरेदीचा शब्द दिला होता; परंतु खरेदी झालीच नाही. गावातील एका अधिकाऱ्याने मदत करताना पुण्याच्या एका कंपनीचा पत्ता दिला. संभाजीरावांनी तेथे जाऊन कंपनीच्या मालकांना आपल्याकडे कोरफड असल्याचे सांगितले. तीन रुपये किलो दराने खरेदी केली. कोरफड चांगल्या दर्जाची असल्याने अन्य प्रक्रिया उद्योग कारखान्यांनाही ते कोरफड देऊ लागले. पाच ते सहा वर्षे असे प्रयत्न झाले. पाच रुपये किलो प्रमाणे सरासरी दर मिळाला. वर्षाला जिरायती शेतीत एक लाख रुपये तर बागायती शेतीत दोन ते अडीच लाख रुपये निव्वळ उत्पन्न मिळत होते.

सन 2007 मध्ये स्वतःच उत्पादनांना सुरवात आपणच उत्पादित केलेली कोरफड कंपन्यांना देण्यापेक्षा आपणच प्रकिया उद्योगात उतरावे असा विचार संभाजीरावांच्या डोक्‍यात आला. कच्च्या मालाची चिंता नव्हती. सन 2007 ला छोटेखानी उद्योग सुरू केला. प्रथम दोनशे लिटर प्रति दिन रस (ज्यूस) तयार होईल इतक्‍या क्षमतेचे युनिट सुरू केले. आवश्‍यक यंत्रांसाठी चोवीस लाख रुपयांचे कर्ज काढले. यातील शासकीय योजनेतून दहा लाख रुपये अनुदान मिळाले. आजतागायत रसनिर्मिती सुरू आहे.

कोरफड रसनिर्मितीविषयी थोडक्‍यात... पीक हाती आल्यानंतर पहिल्यांदा अर्धा किलो ते एक किलो वजनाची पाने चाकूने कापली जातात. ती एकत्र करून पाण्यात स्वच्छ धुतली जातात. त्यातील पांढरा अनावश्‍यक भाग काढला जातो. गर व हिरवा भाग वेगळा होतो. यंत्राच्या साह्याने ज्यूस तयार केला जातो. तो ठराविक तापमानापर्यंत गरम केला जातो. त्यानंतर नैसर्गिकरीत्या थंड होऊ दिला जातो. त्यानंतर त्यावर "प्रिझर्व्हेशन' प्रक्रिया (रस टिकण्याची प्रकिया) केली जाते. वजनानुसार बाटल्यांमध्ये ज्यूस पॅक केला जातो. बाटल्यांवर पॅकिंग, अंतिम मुदत (एक्‍स्पायरी डेट) आदींसह त्यातील घटकांची सर्व माहिती असलेले "लेबल' लावले जाते. लॉटनुसार नमुने पृथक्‍करणासाठी प्रयोगशाळेत पाठविले जातात. त्याचा अहवाल आल्यानंतर विक्री केली जाते.

आपल्या उत्पादनांना मिळवली बाजारपेठ कोरफड रसाची विक्री करण्यासाठी संभाजीरावांना राज्यातील विविध कृषी प्रदर्शने हे माध्यम उपयुक्त ठरले. त्यातून हक्काचा ग्राहक मिळविला. आज त्यांची उत्पादने मुंबई, पुणे, नागपूर, हैदराबाद, विशाखापट्टणम, गोवा आदी ठिकाणी जातात. संबंधित खरेदीदार पार्टीने पैसे बॅंकेत भरल्यानंतर तातडीने कुरिअर, एस.टी. पार्सलने माल पाठविला जातो. आयुर्वेदिक दुकाने, मेडिकल स्टोअर, विविध बझार या ठिकाणी रस विक्रीसाठी ठेवला जातो. ऑनलाइन विक्रीही केली जाते. खात्यावर पैसे भरल्यास तातडीने उत्पादने पाठविली जातात.

कोरफड ज्यूस दर-
एक लिटर- 500 रु.
अर्धा लि.- 275 रु.
250 मि.लि. -150 रु.

- थेट ग्राहकांना हवा असल्यास वीस टक्के डिस्काउंट दिला जातो.
- कोरफडीबरोबरच आवळा, कारले, जांभूळ आदी रसही तयार केला जातो.
- (यातील कच्चा माल गरजेनुसार वाशी मार्केटमधून खरेदी केला जातो.)
- कारले घरचेच असते. त्याचा ज्यूस दर- अर्धा लिटर- 125 ते 140 रु.
- सर्व खर्च वजा जाता वीस टक्‍क्‍यांपर्यंत नफा मिळतो.
- घरातील सुमारे सहा व्यक्ती उद्योगात असल्याने मजुरी खर्च कमी केला जातो.

कुटुंब रमलेय प्रकिया उद्योगात बोराडे कुटुंबीयांची सुशांत ऍग्रो इंडस्ट्रीज नावाची फर्म आहे. संजीवनी ऍग्रो प्रॉडक्‍ट ब्रॅंडने उत्पादनांची विक्री केली जाते. संभाजीरावांना सुशांत, संकुल ही मुले व पत्नी सौ. आशा यांची या कामात मदत करतात. मोठी ऑर्डर असेल तर सातत्याने काम केले जाते. मागणीनुसार मजुरांनाही बोलविले जाते.

बोराडे यांच्या उद्योगाची ठळक वैशिष्ट्ये... * जतसारख्या दुष्काळी भागात कोरफडीसारखे पीक घेऊन त्यावरच स्वतःच प्रक्रिया केली. शेतीला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न
-अपयशाने खचून न जाता व्यवसाय टिकविला, वाढवला
-नियमित पिकांपेक्षा वेगळेपण जपले, उद्योगात ठेवले सातत्य.
* शेतकरी, व्यावसायिक व थेट ग्राहक अशी थेट साखळी तयार केली
* औषधी गुणधर्म असणारा कोरफड रसाच्या गुणात्मक दर्जाकडे लक्ष

कोरफडीला पाणी अत्यंत कमी लागते. अवर्षणातही पीक तगून राहते. पुन्हा पाणी मिळाल्यावर वाढते. असे पीक आम्ही जतसारख्या दुष्काळी भागात पिकवून त्यावर स्वतःच प्रक्रिया केली. जतमध्ये थेट विक्री केंद्रही सुरू केले आहे, तेथून दररोज पाच ते दहा ग्राहक तरी उत्पादने खरेदी करतात. हा उद्योग आम्हाला फायदेशीर ठरला आहे.
-संभाजीराव बोराडे, 8275031800

शुक्रवार, ५ मे, २०१७

Jack maa

जॅक मा यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यावरही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या दयनीय स्थितीचा विसर पडला नाही. त्यांच्या यशातून प्रेरणा घेणार्‍या कुणालाही प्रोत्साहन देण्यास ते कुचराई करत नाहीत.

जॅक मा, अलिबाबा समूहाचे संस्थापक, २७.९ दशलक्ष डॉलर्सच्या साम्राज्यातून ते चीनमधील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. मा यांना हे यश काही एका रात्रीत मिळालेले नाही. संघर्ष, पिळवणूक आणि मेहनत यांची परिसीमा गाठल्यानंतर ते येथे पोहोचले आहेत. त्यांच्या या यशामागे एक कहाणी आहे.

कदाचित अपयश आल्यावर त्यातून बाहेर पडण्याची जबरदस्त क्षमता त्यांच्यात असावी त्यामुळेच हे शक्य झाले. जॅक मा गरीब विद्यार्थी होते. बालपणीच मा यांना त्यांच्या प्राथमिक शाळेतील जीवनात दोनदा नापास व्हावे लागले, माध्यमिक परीक्षेत ते तीनदा नापास झाले, तर विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेत हांगझोऊ सर्वसाधारण विद्यापीठात येण्यापूर्वी देखील तिनदा ते नापास झाले होते. या परिक्षेत तर त्यांना गणित विषयात एक टक्केपेक्षा कमी गुण मिळाले होते. अनेकदा त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते.

मा यांची जिद्द आणि चिकाटी यांचेही कौतुक करावे तेवढे थोडे आहे; कारण त्यांना सुमारे तीस वेळा वेगवेगळ्या कामांवरुन काढून टाकण्यात आले. मात्र ते नाराज न होता दुसरे काम शोधत राहिले. इतकेच काय, केएफसीमध्ये निवड झालेल्या २४ जणांमधून, हाकलून लावण्यात आलेले ते एकमेव होते. केवळ पाच उमेदवारांमधील ते एकजण होते ज्याची निवड पोलीसदलात झाली होती, मात्र तेथून काढून टाकण्यात आलेले ते एकमेव होते, कारण त्यांना सांगितले गेले की ते 'चांगले' नाहीत. हार्वर्डने त्यांना दहावेळा नाकारले. १९९९ मध्ये मा यांनी मित्रांच्या मदतीने अलिबाबाची स्थापना केली पण सिलिकॉन व्हॅलीला निधीसाठी गळ घातली नाही.

एका वेळी अलिबाबा दिवाळ्यात जाण्यापासून केवळ १८ महिने दूर होते. पहिली तीन वर्ष, अलिबाबाला काहीच महसूल मिळाला नाही. सप्टेंबर २०१४ मध्ये अलिबाबा सार्वजनिक कंपनी झाली. त्यातून ९२.७० डॉलर्सचे समभाग विकण्यात आले. असे करुन ती अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी आय. पी. ओ. ठरली.

सन २००९ मध्ये आणि २०१४ मध्ये मा यांचे नाव सर्वात प्रभावशाली व्यक्ती म्हणून 'टाइम' नियतकालिकात झळकले होते. बिझनेस विकमध्ये चीनमधील सर्वांत शक्तीवान व्यक्ती म्हणून त्यांची निवड झाली. फोर्बच्या मुखपृष्ठावर देखील त्याची छबी चीनमधील पहिला मुख्य प्रवाहातील उद्योजक म्हणून झळकली आहे. जॅक मा यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट म्हणजे यशाच्या उंच शिखरावर पोहोचल्यावरही त्यांना त्यांच्या पूर्वीच्या दयनीय स्थितीचा विसर पडला नाही. त्यांच्या यशातून प्रेरणा घेणार्‍या कुणालाही प्रोत्साहन देण्यास ते कुचराई करत नाहीत, त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर, तुम्ही जर काही त्याग केला नसेल तर तुम्हाला अजूनही संधी आहे, तसे करता न येणे हे मोठे अपयश आहे.

सौजन्य: संध्यानंद

माझ्याबद्दल