law of attraction | आचार्य चाणक्यांच्या मते, मनातील विचारांचे काहूर बंद करा, जे हवे त्याचाच विचार करा, ती गोष्ट तुमच्याकडे स्वत:हून येईल!
आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि अभ्यासक होते. शिक्षणाला त्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते.
- मृणाल पाटील
- https://www.tv9marathi.com/
मुंबई : आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि अभ्यासक होते. शिक्षणाला त्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते. चाणक्य यांनी अगदी लहान वयातच वेद आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले होते. चाणक्य यांनी आपल्या मुत्सद्दीपणा आणि रणनीतिने आपल्या सर्वात मोठ्या शत्रू पद्मानंदचा पराभव केला आणि सामान्य चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवले. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले. आचार्य चाणक्यांच्या (Acharya Chanakya) नीती पुस्तकात जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूचा उल्लेख केलेला आहे. चाणक्याने सुचवलेल्या गोष्टींचा अवलंब आपण आज केला तर आपल्याला आपले आयुष्य सुरळीतपणे जगण्यसाठी मदत होते. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी स्वतः त्यांच्या जीवनात अनेक समस्यांचा सामना केला होता, परंतु तरीही त्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या प्रत्येकाने आपल्या जीवनात (Life) आणल्या पाहिजेत. तुमच्या मनातील विचारांचे काहुर बंद करा आणि जे हवे त्याचाच विचार करा, ती गोष्ट तुमच्याकडे स्वत:हून येईल असे आचार्यांनी सांगितले होते. पण स्वत:चा विचार करण्यासाठी पुढील गोष्टींचा अवलंब करा.
आत्मकेंद्रित
अनेक वेळा यश मिळाल्यावर माणूस स्वतःला सर्वोत्कृष्ट समजू लागतो. आचार्य यांच्या मते, अशा व्यक्तीला एका वेळी पराभवाला सामोरे जावे लागते. नाहीतर तो एकाकी पडतो. ते म्हणतात की अहंकार आणि स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजणे ही मोठी चूक आहे. माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्याने जमिनीशी जोडलेले राहिले पाहिजे.
नकारात्मक लोक
अनेकदा असे दिसून येते की लोक समस्यांमुळे नकारात्मक वागणूक स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आर्थिकच नव्हे तर शारीरिक समस्याही निर्माण होऊ लागतात. चाणक्य म्हणतो की नकारात्मक न होता कठीण प्रसंगांना सामोरे जावे.
वेळेचे महत्त्व
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्यांना वेळेचे महत्त्व कळत नाही, त्यांना अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते आणि त्यांना नेहमी पराभवाचा सामना करावा लागतो. वास्तविक, एकदा गेलेली वेळ परत येत नाही.त्यामुळे वेळेचा आदर केला पाहीजे
राग
आचार्य सांगतात की जो माणूस रागावर वर्चस्व गाजवू देतो त्याला एकवेळ मोठे नुकसान सहन करावे लागते. हा पराभव केवळ एक प्रकारचा पराभव असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर अपयशही अशा लोकांना त्रास देते.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा