Chanakya Niti : आचार्य चाणक्यांनी (Acharya Chanakya) सांगितलेले मोलाचे सल्ले अनेक जण आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करत असतात. आचार्य चाणक्यांच्या या सल्ल्यांचा अनेकांना खूप उपयोग होतो आणि त्यांना आयुष्य जगणं सोपे जाते. माणसाने आपल्या आयुष्यामध्ये नेहमी नाती सांभाळावी, एकमेकांचा आदर करावा, लोकांना जोडावे असे सांगितले जाते. पण बऱ्याचदा काही लोकांकडून फसवणूक (Cheating) होते त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जर तुमची सुद्धा सतत फसवणूक होत असेल किंवा तुम्हाला चांगला माणूस ओळखता येत नसेल तर तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आचार्य चाणक्यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचा अबलंब तुम्ही तुमच्या आयुष्यात केला तर कधीही तुमची फसवणूक होणार नाही.Also Read - Chankya Niti: 'या' 5 गोष्टी तुम्ही बदलू शकत नाही; जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती
– आचार्य चाणक्यांच्या मते, बऱ्याचदा आपण एखाद्याबद्दल खूप लवकर मत तयार करतो. पण समोरच्या व्यक्तीचे गुण-दोष समजण्यासाठी थोडा वेळ लागतो. त्यामुळे त्यांच्या वागणुकीचे निरीक्षण करा. ती व्यक्ती इतर लोकांशी कशी वागतो हे सुद्धा पाहा. ती व्यक्ती इतरांशी कशी वागते त्यावरुन त्याचा खरा स्वभाव तुमच्यासमोर येईल.
– त्यागाची भावना माणसामध्ये किती आहे हे पाहणेही खूप महत्त्वाचे असते असे आचार्य चाणक्यांनी सांगितले आहे. ज्या लोकांमध्ये ही भावना असेल तेच इतरांचे दु:ख समजून घेणारे आणि मदत करणारे आहेत. ज्यांना त्याग कसा करावा हे माहित नाही त्या व्यक्ती स्वार्थी आहेत आणि त्यांचा अर्थ प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात.
– एखादी व्यक्ती ज्या कामाशी निगडीत आहे त्यावरूनही त्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज लावता येऊ शकतो. जर एखाद्याने व्याज घेतले तर धूर्तपणा त्याच्या स्वभावात निश्चित आहे. तुम्ही त्याव्यक्तीकडून दयाळूपणा आणि प्रामाणिकपणाची अपेक्षा करु नका, असे आचार्य चाणक्य सांगतात.
– एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक वैशिष्ट्ये पाहिली पाहिजेत. त्याची मूल्ये माणसाबद्द्ल बरच काही सांगून जातात. जो माणूस सुसंस्कृत असतो, त्याच्या आयुष्यात काही तत्त्वे नक्कीच असतात. तो कोणावरही अन्याय करणार नाही, असे चाणक्य सांगतात.
दरम्यान, आचार्य चाणक्यांचा चाणक्य नीती हा ग्रंथ (Chanakya Niti) मानवी जीवनासाठी कोणत्याही मार्गापेक्षा कमी नाही. आचार्य चाणक्य हे कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणून ओळखले जातात. तसंच, आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) नाव जरी घेतले तर एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुशल अर्थतज्ञ आणि अभ्यासू विद्वान अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते. आचार्य चाणक्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्याच्या जोरावर चंद्रगुप्त मौर्याला (Chandragupta Maurya) राजा बनवले. चाणक्य नेहमी इतरांच्या कल्याणाविषयी बोलत होते. त्यामुळे चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा तुम्ही तुमच्या आयुष्यात अवलंब करु शकता.
by - https://www.india.com/