मुंबई मध्ये आल्यावर पहावे अशी ठिकाणे
मुंबई मध्ये पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. समुद्र चौपाटी पासून ऐतिहासिक तसेच खरेदीसाठीचे बाजार व देवस्थाने असे सगळ्या प्रकारची स्थळे आहेत. त्यातील काही स्थळांबद्दल ची माहिती आज आपण पाहणार आहोत.
१) गेट वे ओफ इंडिया
Gate way of India in Marathi
मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहराच्या सम्रुद्र किनाऱ्यालगत असलेली कमानवजा इमारत असून अपोलो बंदराच्या भागात असलेली २६ मीटर उंच वास्तू आहे. भारतभेटीला आलेल्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. जॉर्ज विटटे यांच्या कल्पनेतून साकार झालेली वास्तू असून वास्तूचे बांधकाम पिवळ्या बसातर दगडात केले आहे. वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. या वास्तूचे बांधकाम आणि त्यावरील सुंदर गुजराती शिल्पकला वाख्ण्याजोगी आहे. अशी भव्य-दिव्य वास्तू पहिल्या नंतर येथून समुद्रात ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणीला नक्कीच भेट द्या. गुंफामध्ये कोरलेल्या भव्य हत्ती व प्राचीनकालीन शिवकालीन लेणी पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोट दर तासाला सुटतात. या फेरी बोटांचा प्रवास सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असून या बोटीतून प्रवास करण्यासाठी ८० ते १२० रुपये पर्यंत तिकीट आकारले जाते. त्याचबरोबर येथील देशी-परदेशी लोकांचे मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यागाड्या आणि टांगे. प्राचीन मुंबईत आलेल्या प्रत्येक पर्यटकाची पहिली पसंती असलेल्या या वास्तूसमोर छायाचित्र काढण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. गेट वे ऑफ इंडिया व भव्य विशाल अशा ताज होटेल समोर वेगवेगळ्या पोझमध्ये उभे राहून पर्यटकांचे फोटो काढण्यास अनेक छायाचित्रकार असतात. निव्वळ २० ते ५० रुपये आकारून हे फोटो काढून दिले जातात.
२) नरिमन पॉइण्ट
nariman point in marathi
Nariman point in Marathi
मुंबईचे “मैनहट्टन” म्हणून ओळ्खले जाणारे ठिकाण म्हणजे नरिमन पॉइण्ट ! नरिमन पॉइण्ट हे मुंबईतील मुख्य आणि देशातील पहिले केंद्रिय व्यापारी स्थळ आहे. या भागाला एक पारसी समाजसेवक खुर्शीद फ्रामजी नरिमन यांच्या नावावरून हे नाव दिले गेले. समुद्राच्या भागाचे पुनर्वसन करून हा भाग वसवण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धामुळे येथे वापरण्यात आलेले सिमेंट आणि स्टील हे काळ्या बाजारातून आणण्यात आले होते. नरिमन पॉइण्ट जास्त उजेडात आले ते २००७ साली या भागातील एक रहिवासी जागा (flat) ८.६२ लाख अमेरिकन डोलर्स म्हणजे (९७,८४२ रु.) प्रती चौरस फूट या दराने विकला गेल्यावर ! येथे अनेक विदेशी कंपन्या ची मुख्यालये आहेत. महाराष्ट्राचे राजकीय मुख्यालय म्हणून ओळखले जाणारे विधान भवन देखील देखील येथेच आहे. येथून “कफ परेड” आणि “ब्याक्बे रेक्लमेशन” हि मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे दिसतात.
३) हँगिंग गार्डन्स
hanging garden in marathi
मुंबईच्या दक्षिण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९ व्या शतकाच्या उतरार्धात मलबार हिलच्या उंच टेकडीवर पाण्याची टाकी बांधण्यात आली. तब्बल ३० दशलक्ष गॅलन पाणी मावेल इतकी मोठी टाकी उघडीच होती. त्यामधील पाणी गढूळ होण्याची शक्यता होती म्हणून या टाकीवर बगीचा करण्याच ठरले आणि १२५ वर्षाचा वारसा असलेल्या या गार्डन्सची स्थापना १८८० साली करण्यात आली. १९२१ साली बागेची डागडुजी करून त्याला मुंबईचे पहिले राजपुत्र फिरोजशहा मेहता यांचे नाव देण्यात आले. या गार्डन्सचं मुख्य आकर्षण म्हणजे येथील वृक्षराई.. त्यामुळे भर दुपारीसुद्धा उन्हाची झळ न लागता निवांत शांत बसता येते. त्याचबरोबर या उद्यानाच्या आवारात हिरवेगार झाडांना गाय, जिराफ, हत्ती इत्यादी प्राण्याचा आकार देण्यात आला आहे. याच गार्डन्सच्या समोरच असलेलं पार्क म्हणजे कमला नेहरू पार्क. या पार्कमधील प्रमुख आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. २० फुट उंच असलेल्या या बुटातून साऱ्या मुंबईचे दर्शन घडते. त्याचबरोबर या पार्कातून पूर्ण चौपाटी, मरीन ड्राईव्ह व संपूर्ण मुंबईचे नयनरम्य दर्शन घडते. या गार्डनला भेट देण्यासाठी आपण चर्नीरोड स्थानकावरून जाऊ शकता. या स्थानकावरून या पार्क मध्ये आपण टॅक्सी ने १५ ते २० मिनिटात पोहचू शकतो.
वेळ:- सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत.
४) नेहरू तारांगण
nehru tarangan in marathi
वरळीचं नेहरू तारांगण सर्वांचे आकर्षण. नेहरू तारांगण म्हणजे गोलाकार थीएटर. या गोलाकार थीएटरमधल्या प्रदर्शनात खुर्च्यांमध्ये निवांत झोपून आकाशदर्शन घेता येते. या तारांगणात चक्क आकाशातील तारे आणि ग्रह खाली येतात कि काय असे भासते. ग्रह-ताऱ्यांची ओळख व इतर अवकाशातील माहिती आणि त्या व्यतिरिक्त अंतराळ संशोधनाचे विविध टप्पेही या प्रदर्शनात मांडलेल्या असतात. विविध ताऱ्यांच्या नावाने इथे वजन काटे लावण्यात आले असून यावर उभे राहून वजन केल्यास त्या ताऱ्यांवरील तुमचे वस्तुमान किती हे समजते. या केंद्रात १४ कार्यशाळा असून त्यामध्ये भारतातील कला, बौद्धिकता व विविध सांस्कृतिक प्रदर्शने पाहता येतात. त्याचबरोबर या केंद्रातील डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे कायमस्वरूपी प्रदर्शन भारताची कथा सांगते. येथे आपण दादर, भायखळा, महालक्ष्मी या स्थानकावरून बसने जाऊ शकता.
बस क्र- २८, ३३, ८०, ५२१, ८४, ९१, ९२, ९३
वेळ- सकाळी ११ ते ५, सोमवारी सुट्टी.
५) तारापोरवाला मत्स्यालय
Taraporewala aquarium in marathi
मरीन ड्राईव्हला फेरफटका मारताना समोरच एक भव्य दिव्य इमारत दिसते ती म्हणजे मुंबई शहरातील एकमेव तारापोरवाला मत्स्यालय. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी मांडली. त्याचबरोबर समुद्राच्या आतील अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळावे, या हेतूने मरीन ड्राईव्हला ६० वर्षापूर्वी म्हणजे १९५१ साली बांधण्यात आलेले हे मत्स्यालय. मत्स्यालयाच्या बांधणीसाठी त्यावेळी आठ लाख रु खर्च झाला, त्यापैकी दोन लाखांचा निधी तारापोरवाला यांनी दिला होता. असे हे दुमजली मत्स्यालय १०८ फुट लांब व ९४ फुट रुंद असून याच्या उभारणीसाठी तीन वर्षाचा कालावधी लागला. मत्स्यालयात प्रवेश केल्यानंतर समुद्रातील व तलावातील वेगवेगळ्या प्रकारचे मासे नजरेस पडतात. या मत्स्यालयात १०० हून अधिक मासे असून आजही येथे ७२ प्रजातीचे मासे व गोड्या पाण्यातील १०० प्रजाती आहेत. यातील विशेष आकर्षण म्हणजे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे. तसेच ‘स्टिंग रे’, ‘शार्क’ किवा ‘काळा मासा’, ‘कासवे’ असे डिस्कव्हरीवर पाहायला मिळणारे समुद्री जीव समोर पाहताना मनाला फार आनंद मिळतो. त्याचबरोबर माशांच्या टँकवर लिहिलेले नाव आणि त्याबद्दलची दोन ओळीतील माहितीही मत्स्यालयात फेरफटका मारताना सर्वात महत्वाची गोष्ट वाटते. अशा या इमारतीत तळमजल्यावर मत्स्यालय आणि दुसऱ्या मजला मत्स्यव्यवसाय विभागाच्या मुख्यालयाकरिता आहे. अशा या समुद्री सफर घडवणाऱ्या मत्स्याल्याला भेट देण्याकरिता तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावरून चालत किवा टक्सीने जाऊ शकता.
वेळ:- मंगळवार ते शनिवार- सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत
रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी- सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत.
६) हाजी अली
haji ali in marathi
सिनेतारकापासून ते सर्वसामान्यपर्यंत सर्वांनाच भक्तीभावाने नतमस्तक करायला लावणारे हे ठिकाण म्हणजे मुंबईतील हाजी अली दर्गा…१४३१ साली बांधण्यात आलेली १०० वर्ष जुनी असलेली हि दर्गा हाजी अली या सुफी संताच्या स्मृतीप्रीत्यर्थ हि वास्तू बांधण्यात आली आहे. दुरून हि दर्गा पाहिल्यास अथांग सागरात एक मोती तरंगण्याचा आभास होतो. महालक्ष्मी रेसकोर्सच्या विरुद्ध दिशेला समुद्रात एका बेटावर हि दर्गा आहे. या दर्ग्यात जाण्याचा अनुभव काही निराळाच.. या दर्ग्यापर्यंत जाण्यासठी एक पायवाट आहे हि पायवाट समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा देसेनाशी होते आणि जणू हि दर्गा समुद्रावर अधांतरी तरंगल्या सारखी भासते. दर्ग्यात प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर अशा भारतीय आणि अरेबिक वास्तूशैलीचा संगम आढळतो. दर्ग्यातील कबरीभोवती चारही बाजूंनी चांदीची चौकट असून सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबांचा आधार आहे. या नक्षीकामात अरेबिक भाषेत लिहिलेली अल्लाची ९९ नावे आहे. या दर्ग्यासमोर महालक्ष्मी देवीचे मंदिरही आहे. थोडे पुढे गेलात कि घोड्याच्या शर्यतीचे मैदान म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स पाहता येतील. या दर्ग्याचे व येथील ठिकाणे पाहून झाल्यावर हाजी अलीला जो मुख्य सिग्नल आहे तिथे उभे असलेले प्रशस्त हाजी अली ज्यूस सेंटर. थंडगार मिल्कशेक, सरबत, फालुदा या वेगवेगळ्या व्हरायटीबरोबर येथे आंबा, चिकू, सफरचंद अशा विविध फळांपासून बनवलेले क्रीम ही येथील खासियत. तर नक्कीच देवदर्शन झाल्यावर या ज्यूस सेंटरला भेट द्या. या दर्ग्याला भेट द्यायला तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या महालक्ष्मी व मुंबई सेंट्रल स्थानकावरून तर मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकावरून जाऊ शकता किवा तुम्ही बसने हि प्रवास करू शकता.
बस क्र:- ३३, ३७, ६३, ८१, ८२, ८४, ९२, ९३, १२४, १२५, ३५१, ३५७, ३८५, ५२१.
७) महालक्ष्मी मंदिर
mahalakshmi mandir in marathi
महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिध्द मंदिर आहे. इ स 1831 ला धाक जी दादाजी नावाच्या एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिर पूर्ननिर्माण केले. या मंदिरामागे बराच मोठा इतिहास आहे तो म्हणजे 1785 साली वरळी आणि मलबार हिल या दोन्ही भागांना जोडण्याचे काम इंग्रज इंजिनियर करत होते. पण त्या कामात विघ्न येत होते. त्या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनियर पाठारे प्रभू यांना वरळी जवळच्या समुद्रात लक्ष्मीच्या मूर्तीचे स्वप्न पडले. त्यांनी स्वप्नात दिसलेल्या जागी त्या मुर्तीचा शोध घेतल्यास त्यांना तिथे लक्ष्मीची मूर्ती सापडली. त्यानंतर त्यांनी तेथेच तिचे मंदिर बांधले. त्यामुळे त्यांचे ते प्रोजेक्ट पूर्ण झाले. हाजी अली दर्गावरुन महालक्ष्मी मंदिर दृष्टीस पडते. हे मंदिर समुद्रा जवळ असल्याने अजून नयनरंम्य वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात देवी महालक्ष्मी, देवी महाकाली व देवी महासरस्वती यांच्या मूर्त्या आहेत. या तीनही देवींच्या मुर्त्या स्वयंभू असून त्यांना सोन्याच्या आवरणाने झाकलेले असते. त्यांचे विनाआवरण दर्शन घ्यायचे असल्यास रात्री मंदिर बंद करताना जावे लागते.
हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भक्तांसाठी खुले असते. तर नवरात्रीमध्ये सकाळी 6 वाजता देवीची आरती झाल्यानंतर दर्शनास सुरुवात होते ते रात्री 12 पर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात.
महालक्ष्मी स्टेशनवरुन शेअर टॅक्सी उपलब्ध आहेत. तसेच बसेस ही आहेत. शेअर टॅक्सी- एका माणसे किमान भाडे 10 रुपये. महालक्ष्मी स्टेशनवरुन पायी 15 ते 20 मिनिटात महालक्ष्मी मंदिरात जाता येते.
८) सिध्दीविनायक गणपती
siddhivinayak mandir in marathi
मुंबईतील प्रसिध्द असणारे सिध्दीविनायक हे मंदिर सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो. लक्ष्मण विठू पाटिल आणि देऊबाई पाटिल यांनी हे मंदिर इ. स. 1801 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी बांधल्याचे मुंबईतील देवालये या के. रघुनाथजी यांच्या ग्रंथात आढळतो. नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री सिध्दीविनायकाची ओळख आहे. गणपतीची मूळ मुर्ती 2.6 इंच व 2 इंच रुंद असून एका काळ्या दगडात बनवलेली आहे. उजवी सोंड, माथ्यावर मुकुट, चार हात, दोन हातात अंकुश आणि कमळ, खालच्या दोन हातांपैकी उजव्या हाती माळ आणि डाव्या हाती मोदकाची वाटी, मूर्तीच्या गळ्यात सर्पाचे जानवे असे या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे. उजव्या सोंडेचा हा गणपती सिध्द पीठ असल्यामुळे तो सिध्दीविनायक म्हणून ओळखला जातो. तसेच या गणपतीला लग्नी गणेश असे ही म्हटले जाते. सकाळी 6 वाजता यथासांग पूजा व अभिषेक झाल्यावर गणपतीच्या दर्शनाला सुरुवात होते.
जवळचे स्टेशन – दादर.
दादर स्टेशन वरुन पायी 10 ते 15 जाऊ शकतो. तर शेअर टॅक्सी व बस ही उपलब्ध आहेत.
९) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय(प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम)
Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya in Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya in Marathi
मुंबईतील सर्वात जुने आणि जवळपास ५० हजाराहून अधिक कलाकृतींचा संचय आणि अमर्याद माहितीचा खजिना म्हणजे मुंबईचे पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय. ब्रिटीश वास्तुविशारद डब्लू.जी.विटेट यांनी यांचा आराखडा तयार करून याची उभारणी केली असून स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे इ.स १९२२ मध्ये सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. संग्रहालयात भारत, चीन, जपान आणि अन्य देशांच्या कलाकृती येथे पहावयास मिळतील. याव्यतिरिक्त नौकावाहन, मराठा मुघल सरदरांच्या वापरातील शस्त्रे, अनेक शिल्पकला, अन्य मुर्त्या या विशेष दालनात पाहण्यास मिळतील. इथले विविध दालन व वस्तू पाहताना दिवसही अपुरा पडतोय कि काय असे नक्कीच तुम्हाला वाटेल. समस्त विश्वाच्या कलाकृती व इतर साहित्य व अन्य कृतींची माहिती करून घेण्यासठी नक्की या वास्तुसंग्रहालयास भेट द्या.
वेळ:- मंगळवार ते रविवार सकळी १०.१५ ते सायं ५.४५ वाजेपर्यंत.
शुल्क:- प्रवेश शुल्क-५ रु, प्रौढांसाठी- ३० रु
वस्तूसंग्रहालयात जाण्यासाठी- छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून बस क्र. १४, ६९, १०१, १३०
चर्चगेट स्थानकावरून बस क्र. ७०, १०६, १२२, १२३, १३२
१०) ताज महल हॉटेल
Taj Mahal Hotel information in Marathi
ताज महल हॉटेल हे मुंबई च्या कोलाबा भागातील गेट वे ओफ इंडिया समोरील एक अत्यंत मोहक आणि सुंदर पंचतारांकित होटेल आहे . तसेच आपल्या ऐतिहासिक महत्व आणि विशिष्ठ बांधकामामुळे मुंबईतील निवडक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे . हे हॉटेल प्रसिद्ध औद्योगिक समूह टाटा ग्रुप च्या मालिकेचे आहे , जवळजवळ १०९ वर्ष जून्या ह्या हॉटेल ने जगभरातल्या अनेक दिग्गजाची सेवा केली आहे. जसे बिल क्लिंट्न , प्रिन्स ऑफ वेल्स , हिलरी क्लिंट्न , बराक ओबामा, इत्यादींचा त्यात समावेश आहे. ह्या इमारतीत एकूण ५६५ खोल्या आहेत. हे हॉटेल १६ डिसेंबर १९०३ साली सुरु करण्यात आले . पहिल्या महायुद्धाच्या वेळी ह्या इमारतीचा होस्पिट्ल म्हणून वापर करण्यात आला होता. असं म्हणतात की जमशेदजी टाटा यांना एका होटेल मध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हे होटेल बनवण्याचा निर्णय घेतला. ह्या वास्तू विषयीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेट वे ओफ इंडिया समोरून जो भाग दिसतो तो ह्या हॉटेल चा मागील भाग आहे, तर मुख्य प्रवेश द्वार याच्या विरुद्ध दिशेला आहे. आता त्याच्याच बाजूला ताज महल टोवर्स म्हणून दुसरी इमारत उभारण्यात आली आहे.
by - InterNet