मंगळवार, १७ मार्च, २०२०

तुम्हाला माहित आहे का, आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणजे काय ?..






टीम महाराष्ट्र देशा : चीनमध्ये उगमस्थान असणाऱ्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर, तसेच देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळत आहेत. भारतातही आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८६ वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या ३१ वर पोहचली आहे. यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत.

या पार्श्वभूमीवर कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी पुणे जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा कायदा लागू केला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांची; तर जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, आपत्ती व्यवस्थापन कायदा म्हणजे काय, तो केव्हा आणि का लागू केला जातो.

– आपत्ती म्हणजे काय ? किंवा आपत्ती कशास संबोधता येईल?
आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित , आर्थिक आणि सामाजिक हानी होते तसेच त्या राष्ट्रावर किंवा समाजावर तिचे दूरगामी परिणाम होतात. अशा संकटाला आपत्ती म्हणतात. देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला. भारतात सर्वच ठिकाणी हा कायदा लागू आहे. एखाद्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीच्या वेळी होणारी हानी टाळण्यासाठी पथक स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले.


– आपत्ती व्यावस्थापन कायदा म्हणजे काय ?
भारतात १९९३ साली ओडिशाच्या चक्रीवादळानंतर केंद्र सरकारने एक समिती स्थापन करून धोक्यांचा आणि त्यापासून उद्भवणाऱ्या आपत्तींचा सर्वंकष अभ्यास केला. तसेच भारताने आपत्ति दरम्यान मदतकार्यासाठी व्यवस्थापनातील सगळे विभाग, शास्त्रीय संशोधनातील संस्था, शिक्षण संस्था आणि सामान्य जनसमुदाय तसेच बचावकार्य करणाऱ्या संस्था यांच्यात सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु २००४ साली आलेल्या त्सुनामीमुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा बनवण्याची निकड कळून चुकली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) हा संसदेत २५ डिसेंबर २००५ साली पारीत झाला. आपत्ती व्यवस्थापनाचे धोरण आणि आराखडा तयार करण्याची तरुतूद कायद्यात आहे.

-आपत्तीचे व्यवस्थापन कशा प्रकारे केले जाते ? आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे कोणते आहेत?
1) आपत्ती पूर्व व्यवस्थापन – यामध्ये प्रशिक्षण, जनजागृती उपक्रम, यंत्रणाचा सराव व प्रात्यक्षिक, आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून यंत्रणा सुसज्ज ठेवणे, विविध आपत्ती प्रतिसाद दलांशी संपर्क व समन्वय ठेवणे.
2) आपत्ती प्रसंगी व्यवस्थापन- प्रत्यक्ष आपत्कालीन प्रसंगी मदत कार्याचे नियोजन करणे व मदत यंत्रणा मध्ये समन्वय राखणे.
3) आपत्ती नंतरचे व्यवस्थापन- आपत्ती नंतर करावे लागणारे मदत कार्य नियंत्रित करणे, मदत व पुनर्वसन योजनेची योग्य अंमलबजावणी करणे.


– आपत्ती व्यवस्थापन कायदा कोण लागू करु शकतो?
कोणत्याही प्रकारची आपत्ती लागू करताना राष्ट्रीय, राज्य, जिल्हा स्तरीय समितीचे प्रमुख आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतात. राष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान, राज्यपातळीवर मुख्यमंत्री, जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी हा निर्णय घेतात.

भारतात आपत्ती व्यवस्थापनामध्ये खालील 4 समिती/संस्था महत्वाची भूमिका पार पडतात. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण(NDMA), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समिती तयार केली जाते ज्याचे कायमस्वरुपी अध्यक्ष पंतप्रधान असतात. पंतप्रधान 9 तज्ज्ञांची नेमणूक करतात, येणाऱ्या आपत्तींबाबत माहीत देतात. राज्यस्तरावर या समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्यमंत्री असतात.

















By - https://maharashtradesha.com/do-you-know-what-the-disaster-management-act-is/

Corona Virus : चीनमधील 'लॅब'मध्ये 'उगम' झाला जीवघेण्या 'कोरोना' व्हायरसचा ?

Corona Virus : चीनमधील 'लॅब'मध्ये 'उगम' झाला जीवघेण्या 'कोरोना' व्हायरसचा ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत १८०० लोकांचा बळी घेतला आहे. या प्राणघातक व्हायरसने पूर्ण जगालाच चिंतेत टाकले आहे. जगभरातील शास्त्रज्ञ यावर उपाय शोधण्यात व्यस्त आहेत परंतु अजून कुणाला सफलता मिळालेली नाही. त्यामुळे आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे की कोरोना व्हायरस या जगात आला तरी कसा?
अहवालानुसार या प्राणघातक व्हायरसची सुरुवात चीनच्या हुबेई प्रांतातून झाली आहे. या व्हायरसचे खतरनाक परिणाम हे हुबेईची राजधानी वुहान येथे पाहण्यास मिळत आहेत. एका अहवालानुसार चीनमधील काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की या व्हायरसचा जन्म वुहानमधील फिश मार्केटपासून थोड्या अंतरावर असलेल्या सरकारी संशोधन प्रयोगशाळेत झाला आहे.
चीनच्या सरकारी साउथ चीन युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या म्हणण्यानुसार वुहान सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (WHDC) मध्ये अशा व्हायरसचा जन्म होऊ शकतो. यामागील कारण असे आहे की लॅबमध्ये अशा प्राण्यांना ठेवले जाते जे अशा प्रकारचे रोग पसरवू शकतात. या लॅबमध्ये ६०५ वटवाघूळ ठेवण्यात आले होते. त्यांमधूनच कोरोना व्हायरसचा प्रसार झाला असणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच या युनिव्हर्सिटीच्या रिसर्च पेपर मध्ये देखील हे सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरसला जबाबदार असणाऱ्या वटवाघुळाने एकदा एक रिसर्चरवर हल्ला केला होता, ज्यात वटवाघुळाचे रक्त त्याच्या स्किन मध्ये मिसळले होते.
अहवालात असे देखील म्हटले आहे की, कोरोना व्हायरसमुळे ग्रस्त रूग्णांच्या शरीरात जीनोम सीक्वेंस ९६ किंवा ८९ टक्के होता, जो बॅट CoCzc4 कोरोना व्हायरस सारखा आहे. अहवालात असे सांगितले गेले आहे की देशी वटवाघूळ वुहानमधील सीफूड मार्केटपासून सुमारे ६०० मैलांच्या अंतरावर आढळतात. लोकांना वटवाघूळ न खाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.
शास्त्रज्ञांनी असेही म्हटले आहे की WHDC च्या एका संशोधकाने सांगितले होते की, वटवाघुळाचे रक्त त्वचेवर आल्यानंतर त्याने दोन आठवड्यांकरता स्वत:ला अलग ठेवले होते. अहवालात पुढे असेही म्हटले आहे की, WHDC मध्ये प्रथमच संसर्ग झालेल्या डॉक्टरांच्या ऐका गटाला युनियन रुग्णालयात हलविण्यात आले होते.
शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की कदाचित सुरुवातीच्या रुग्णांकडूनच हा व्हायरस आजूबाजूला पसरला असावा. तसेच अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, असे होऊ शकते की इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने हा व्हायरस लीक केलेला असावा.
चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे सुमारे २,०४८ नवीन पुष्टी झालेले प्रकरण समोर आले आहेत आणि रविवारी ३१ प्रांतीय पातळीवरील भागात आणि शिंजियांग प्रोडक्शन अँड कोर्प्समध्ये १०५ मृत्यू झाले आहेत. चीनी आरोग्य प्राधिकरणाने सोमवारी याबाबतची माहिती दिली आहे.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले की, चीन कोरोना व्हायरस विरुद्ध जोरदारपणे लढा देत आहे आणि देश लवकरच या संकटातून मुक्त होईल असा विश्वास आहे. वांग यी यांनी जर्मनीतल्या ५६ व्या म्यूनिच सुरक्षा परिषदेत हजेरी लावली होती त्या दरम्यान त्यांनी असे सांगितले.
चीनमधील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एकूण १०,८४४ रुग्णांना रविवारी अखेरीस बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. चीनी आरोग्य प्राधिकरणाने सोमवारी याबाबत घोषणा केली. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार राष्ट्रीय आरोग्य आयोगाने आपल्या दैनंदिन अहवालात म्हटले आहे की, रविवारी १,४२५ लोकांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.










by - Dailyhunt  
https://m.dailyhunt.in/news/india/marathi/policenama-epaper-policnam/corona+virus+chinamadhil+lab+madhye+ugam+jhala+jivaghenya+korona+vhayarasacha+aattaparyant+ghetale+1800+jananche+bali-newsid-166091106

कोरोना व्हायरस...

1. कोरोना व्हायरसचा नेमका उगम कसा झाला, त्याचा प्रसार कसा झाला?
कोरोना व्हायरस हा आधीपासूनच अस्तित्वात होता. फक्त तो माणसापर्यंत आलेला नव्हता. वटवाघळांमार्फत तो माणसापर्यंत येऊन पोहोचला, असा अंदाज आहे. असे बरेच आजार आहेत, जे प्राण्यांमध्ये होते आणि आता माणसांमध्ये आले आहे. याला मोठ्या प्रमाणात झालेलं नागरीकरण कारणीभूत आहे.
त्या प्राण्यांच्या भूमीवर माणसाने अतिक्रमण केलं. त्यामुळे या प्राण्यांशी माणसाचा जास्त संपर्क होत आहे. याची लागण सर्वप्रथम चीनमध्ये झाली. चीन लोकांनी वटवाघळासारख्या एखाद्या प्राण्याचे मांस खाल्यामुळे तो मानवी शरीरात दाखल झाला.
2. सध्या याचा संसर्ग कोणत्या माध्यमातून होत आहे?
या विषाणूचा संसर्ग श्वसनमार्गातून होतो. सर्वप्रथम विषाणू नाकात, घशात आणि फुफ्फुसात जातो. त्यानंतर तो संपूर्ण शरीरात पसरतो. याची लागण झालेल्या रुग्णाला खोकला येतो. लागण झालेली व्यक्ती आपल्या आजूबाजूला खोकली की त्याचा आपल्यालाही संसर्ग होण्याची शक्यता असते.
किंवा लागण झालेला व्यक्ती खोकलल्यानंतर हे विषाणू ठराविक वेळेपर्यंत टेबलवर, वाहनाच्या सीटवर किंवा दरवाजाच्या हँडलवर असे कुठेही पडलेले असू शकतात. याठिकाणी तुम्ही स्पर्श केल्यानंतर नाकाला हात लावला तर त्याचा तुम्हाला संसर्ग होऊ शकतो.
3. चीनमधून आलेल्या वस्तूंच्या माध्यमातून याचा संसर्ग होतो का?
कोरोना व्हायरसचा उगम चीनमध्ये झाला हे खरं असलं तरी तिथून आलेल्या वस्तूंच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रसार होत नाही.
रुग्ण व्यक्तीच्या खोकल्यावाटे याचा प्रसार होतो. पण तिथून आलेल्या वस्तूंपासून आपल्याला काहीही धोका नाही.
4. चिकन-मटण खाल्ल्याने याचा प्रसार होतो का?
याचा संसर्ग प्राण्यांमधून माणसाला झालेला आहे. पण नक्की कोणत्या प्राण्यातून उगम झाला हे माहीत नाही. त्यामुळे अशी शंका सर्वजण घेत आहे. पण जर तुम्ही कच्चं मांस खात असाल तरच तशी शक्यता आहे. भारतात मांस योग्यप्रकारे शिजवून खाण्याची पद्धत आहे.

मास्कImage copyrightGETTY IMAGES

तर चीनमध्ये कच्चे प्राणी, पक्षी, कीटक खाण्याची पद्धत आहे. उलट भारतात अंडीसुद्धा उकडून खाल्ली जातात. 55 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असेल तर हे विषाणू जिवंत राहत नाहीत. त्यामुळे आपण बिनधास्त चिकन-मटण खाऊ शकतो.
5. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला आहे?
रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना याचा सर्वांत जास्त धोका आहे. त्याशिवाय गर्भवती, कॅन्सर रुग्ण, एचआयव्ही रुग्ण, किमोथेरपीसारखे उपचार सुरू असलेले रुग्ण यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशा व्यक्तींनी थोडासाही त्रास जाणवू लागल्यास तातडीने उपचार घ्यावेत.
6. रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल?
रोगप्रतिकारशक्तीबाबत लोकांमध्ये गैरसमज आहेत. रोगप्रतिकारशक्ती आपल्याला जन्मापासूनच बऱ्याच आजारांबाबत असते. बाळ जन्माला आल्यानंतर आई त्याला स्तनपान देते, त्याचवेळी त्याला अनेक रोगांना लढण्याची ताकद मिळते. पण ज्या आजारांची रोगप्रतिकारशक्ती नसते, अशा आजारांचं लसीकरण केलं जातं.
एकूणच आपलं आरोग्य हीच आपली रोगप्रतिकारशक्ती आहे. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी चौरस आहार, व्यायाम आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणं महत्त्वाचं आहे.
7. तुळशीच्या पानाचं सेवन केल्यानं याचा प्रसार रोखता येतो, हा दावा कितपत खरा?
या दाव्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. कोरोना व्हायरसवरचा उपाय अद्याप सापडलेला नाही. त्यामुळे कोणत्याही ऐकीव माहितीवर विश्वास ठेवू नका. परंपरागत शास्त्रांचा वापर करून चुकीची माहिती पसरवली जात आहे.
8. भारतातील उन्हाळ्यात हा विषाणू जिवंत राहू शकतो का?
हा विषाणू 55 डिग्रीपेक्षा जास्त तापमानात जिवंत राहत नाही. आपल्या देशातील उन्हाळ्यात तापमान 40 किंवा 42 डिग्रीच्या आसपास असतं. त्यामुळे उन्हाळ्यात हा विषाणू मरून जाईल, अशी अजिबात शक्यता नाही. म्हणून आपल्याला प्रतिबंधात्मक उपाय करणं गरजेचं आहे.
9. माहिती उपलब्ध नाही, तर डॉक्टर कशाप्रकारे उपचार करत आहेत?
हा श्वसनमार्गाचा आजार आहे. लवकरात लवकर त्याचं निदान होणं आवश्यक आहे. यामध्ये ताप येणं, सर्दी, खोकला ही लक्षणं दिसू लागतात. ही लक्षणं दिसतात त्वरित त्या व्यक्तीची तपासणी करणं गरजेचं आहे. त्याची चाचणी केल्यावर विषाणूची लागण झाल्याचं कळून येतं.

मेडिकलImage copyrightGETTY IMAGES

त्या विषाणूला मारुन टाकण्याचा उपाय नाही. पण ताप, सर्दी यांच्या त्रासापासून पेशंटला आराम मिळण्यासाठी बाकीच्या सपोर्टिव्ह ट्रिटमेंट करता येऊ शकतात.
हा विषाणू ठराविक काळ शरीरात राहून निघून जातो. असं बऱ्याच विषाणूंच्या बाबतीत आहे.
आपण या विषाणूला मारू शकत नाही. पण शरीरात राहून तो जे नुकसान करु शकतो त्याला रोखण्यासाठी ट्रीटमेंट केली जाते.
10. मास्क वापरून या विषाणूला रोखता येतं का? कोणत्या प्रकारचे मास्क वापरावेत?
श्वास घेताना हा विषाणू बाहेरच राहील असा मास्क वापरल्यास प्रभावी ठरेल. कोणतंही कापड, साधा मास्क, रुमाल वापरु नये. यासाठी N95 पद्धतीचा मास्क उपयोगी ठरेल. पण याची गरज रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांना जास्त आहे.
सर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर मास्क घालून फिरण्याची गरज नाही. पण गर्दीच्या ठिकाणी फिरताना आपल्या आजूबाजूला कुणी खोकलल्यामुळे संसर्ग होऊ नये, याची काळजी घ्यावी. त्यासाठी मास्क वापरु शकतो.
11. निदान करण्यासाठी कुठे-कुठे तपासणी केंद्र आहेत?
भारतात सहा ठिकाणी याचं निदान होतं. पण तुम्हाला तिथं जाण्याची गरज नाही. प्रत्येक गावात सरकारी दवाखान्यात यासाठी तपासणी कक्ष आहेत. संशयास्पद असल्यास पुढची प्रक्रिया होईल. खासगी डॉक्टरसुद्धा याबाबत मार्गदर्शन करू शकतात.





by - Internet 

मंगळवार, ३ मार्च, २०२०

महाराष्ट्रात होऊन गेलेले मराठा समाजातील मुख्यमंत्री….

महाराष्ट्रात होऊन गेलेले मराठा समाजातील मुख्यमंत्री…
यशवंतराव चव्हाण (१ मे १९६० ते १६ नोव्हेंबर १९६२)
पी.के. सावंत (२५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३)
शंकरराव चव्हाण (२१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७)
शरद पवार (१८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०)
बाबासाहेब भोसले (२१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३) 
वसंतदादा पाटील (२ फेब्रुवारी ते १ जून १९८५)
शिवाजीराव निलंगेकर (३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६)
शरद पवार (२६ जून १९८८ ते २५ जून १९९१)
शरद पवार (६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५)
नारायण राणे (१ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९)
अशोक चव्हाण (८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९)
अशोक चव्हाण (७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१०)
विलासराव देशमुख (१८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३)
पृथ्वीराज चव्हाण (११ नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४)










by- Internet 

माझ्याबद्दल