गुरुवार, २८ मार्च, २०१९

दारूचा जन्म कसा झाला माहितीये? वाचा दारूच्या उगम व निर्मितीची रोचक कहाणी !

दारू म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटतं. परंतु आपल्या प्राणाहून प्रिय असलेल्या दारूची निर्मीती कशी झाली? कोणी लावली दारू प्यायची सवय? खरंच दारू म्हणजे अमृत आहे का, की नुसतं रसायन? या सगळ्या गोष्टी जाणून घेणं आपल्यासाठी कुतूहलाचा विषय नक्कीच आहे शिवाय दारू घर संसारांची कशी राखरांगोळी करते हे पण जाणून घेतलंच पाहीजे ना !
असं म्हटलं जातं की दारूची निर्मीती सुमारे ९ हजार वर्षांपूर्वी चीनमध्ये झाली. ही दारू म्हणजे वाईन आंबवलेल्या तांदळाचं पाणी आणि मधाची मिसळ असायची.
२ हजार वर्षांनंतर ही दारू युरोपीय देशातही निर्मीली जाऊ लागली. पुरातत्वीय उत्खननात इतक्या वर्षांनंचतर सुध्दा दारू बनवण्याचं साहित्य आणि दारूच्या साठ्यांसाठी बनवलेली विशेष भांडी सापडलीत. अशाच काही प्रकारची उत्खनने युरोपीय देश, पश्चिम आशिया या ठिकाणी केली असता तिथेही दारूचं अस्तित्व असल्याचं जाणवतं. परंतु दारूची खरी सवय ही चीनने साऱ्या जगाला लावली.

wine-inmarathi
en.wikipedia.org
इसवी सन पूर्व ७०००-६६०० मध्ये चीनमध्ये दारूची निर्मीती केली जायची याचे भक्कम पुरावे आपल्याला पहायला मिळतात.
तांदूळ,मध आणि टार्टारिक एसिड असणारी काही फळांचा वापर करून ही दारू बनवली जायची. जी तेव्हा घरातील सर्रास प्रत्येकजण प्राशन करत असे. द्राक्षांच्या बीया, हॉथर्न, लाँगयान किंवा कॉर्लियान चेरी यांच मिश्रण अथवा या फळांपैकी कोणत्याही दोघांचं मिश्रण बनवून वाईन तयार केली जायची.
चीनच्या झोऊ डायनॅस्टी या प्रांतात इसवी सन पूर्व १०४६ ते २२१ या कालखंडात ही फळे वापरल्याचे पुरावे सापडतात. चीनमध्ये केवळ वाईनसाठीचे ४० ते५० प्रकारचे द्राक्ष वापरल्याचे पुरावे मिळतात.
इसवीसन ५४०० ते ५००० मध्ये पूर्वी आशियामध्ये दारू अस्तित्वात असल्याचे पुरावे मिळतात. दारूसाठी बनवलेले मोठे मोठे जार आजही अस्तित्वात आहेत. युरोपीय देशात प्रामुख्याने ग्रीस आणि फ्रांसमध्ये सुमारे १० ते १२ हजार वर्षांपूर्वी दारू अस्तिवात असल्याच्या कथा आहेत मात्र केवळ इसवीसन पूर्व ४०००वर्षांपूर्वीचेच पुरावे इथे पाहायला मिळतात.
फ्रान्समध्ये प्रामुख्याने दारू ही द्राक्षांपासूनच बनवली जायची. त्यामुळे पुरावे जर पाहिले तर सगळ्यात आधी दारूडा देश कोणता होता तर चीन असं म्हणायला हरकत नाही.
भारतामध्येसुधा पुराण कथांमध्ये मदिरेचा उल्लेख आढळतो. दारू पिऊन नशेत झुलणारे मालिकांमधले राक्षस आणि देवता अजूनही डोळ्यासमोर उभे राहतात अर्थात झुलत- झुलत. याचाच अर्थ भारत देखील दारू निर्मीतीत मागे नव्हता. पुर्वी दारू हे विरंगुळ्याचं किंवा थकावट दूर करण्याचं साधन होतं.

Wine taste better with age.Inmarathi1
nzwine.com
परंतु आज दारू हे व्यसन बनल्यामुळे समाजाचं स्वास्थ्य बिघडत चालल्याचं आपण आपल्या डोळ्यांनी पाहतोय. उच्चभ्रू समाजासाठी महागडी दारू आणि वाईन मिळते तर अगदीच चिंधीचोर दारूड्यासाठीसुध्दा पाचची देशी हातभट्टी मिळते. मोठ मोठे दारूचे ब्रँड आपण पाहतो. हे ब्रँड दररोज किती जणांच्या घरांना उध्वस्त करतं हे सुध्दा आपल्याला माहिती आहे.
अगदी गावाकडे गाळली जाणारी हातभट्टीसुध्दा भल्या-भल्यांची मती गुंग करते. काही लोक प्रमाणत घेतात परंतु काही पेक्षा जास्त लोक हे प्रमाणाच्या बाहेर दारू पितात त्यामुळे संसाराची राखरांगोळी होते.
आज वाईन आणि दारू शक्यतो द्राक्ष, उसाची मळी, नवसागर आणि मळीचा गुळ यांच्यापासून बनवली जाते. द्राक्षांची बनवलेली वाईन ही महागडी असते तर नवसागर आणि उसमळीच्या घाणेरड्या गुळापासून बनवलेली हातभट्टी मात्र स्वस्त असते.

याचा मध्यम पर्याय म्हणजे संत्र्याचा अर्क आणि उसमळी घालून बनवेली क्वार्टर ही देखील आजकाल चाळीस- पन्नास रूपयांना मिळून जाते. दारू म्हटलं की एखादा हाडाचा दारूडा सरणावरूनही उठून बसेल. विजय माल्यासारख्या दारू बनवणाऱ्या माणसाची सुध्दा दारूमुळेच वाट लागली.
दारू बनवल्यामुळे देखील एखादी व्यक्ती बर्बाद होणं म्हणजे माल्याचं उत्तम उदाहरण. भले त्याला कारणं अनेक असतील पेशेवार दारूभट्टीवाला म्हणून माल्याची गणणा करायला काही हरकत नाही.
भारतीय इतिहासातसुध्दा दारूचं महत्व फार होतं. प्राचीन कालापासून आपण दारू प्राशन करत आलोय. दारूचं महात्म्य हे केवळ दारूच्या प्रशंसकांना आणि चाहत्यांनाच माहिती आहें. दारूची इतकी प्रशंसा करणं म्हणजे दारूच्या पिण्याचं, निर्मीतीचं आणि विक्रीचं समर्थन करणं नव्हे हे वाचकांनी लक्षात घेतलं पाहिजे.

daru-inmarathi
youtube.com
हौशेपोटी दारू पिणं किंवा व्यसन म्हणून दारू पिणं या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आजकाल टेन्शन, घरगुती वाद, स्ट्रेस ही कारणं दारू पिणारे लोक देतात. दारूमुळे सर्व कलहातून काही वेळेपुरते का होईना त्यांना सुटल्याचं समाधान मिळतं. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी न घेता दारूच्या आहारी जाऊन पैसा, वेळ आणि आरोग्य या तिन्ही अनमोल गोष्टी आपण नष्ट करतोय हे न समजण्याईतकी झिंग दारूड्यांच्या मनावर आणि मेंदूवर चढत असेल का?
दारूच्या सुरूवातीचा जन्म हा कदाचित व्यसन म्हणून झाला नसेल परंतु तिची नशा अशी काही समाजमनावर चढलीय की आज तिच्या शिवाय जमतही नाही आणि करमतही नाही.
===










by - https://www.inmarathi.com/origin-of-wine/

पृथ्वीवर माणूस केव्हा आणि कसा आला?...

पृथ्वीवर माणूस केव्हा आणि कसा आला?

मानवाच्या विजयाची गाथा सांगणारी ही लेखमाला आहे.. पण यातील मानवाने कुणावर विजय मिळवला?



मानवाच्या विजयाची गाथा सांगणारी ही लेखमाला आहे.. पण यातील मानवाने कुणावर विजय मिळवला? किंवा, जयगाथा गाण्याइतका – म्हणजे प्रेरक ठरण्याइतका – मानवाने संपादन केलेला विजय कोणता? याsam06मालेतील लेख दर सोमवारी उलगडत जाण्याआधी हे स्पष्ट केले पाहिजे, की हा मानवाने कुणाच्या विरुद्ध मिळवलेला विजय नव्हे.. किंवा, मानवाने विजय संपादन केला म्हणजे कोणी तरी हरलेच असेही नव्हे.. हा विजय मानवाने, स्वतच्याच वृत्तींवर मिळवला आहे. आजघडीला ‘कृत्रिम प्रज्ञा’ निर्माण करू पाहणाऱ्या या भूतलावरील एका प्रजातीने, आधी स्वतच्या बुद्धीपुढील अशास्त्रीय आव्हाने पेलली, म्हणून मिळालेला हा विजय आहे.. मात्र, ही आव्हाने कधी संपणारी नाहीत, याची विनम्र जाणीवही ही लेखमाला सादर करताना नक्कीच आहे..
विज्ञान आपल्याला सांगते की, अगणित सूर्यानी बनलेल्या आपल्या विश्वाचे वय सुमारे तेराशे कोटी वर्षे असून, त्यात आपला सूर्य सुमारे फक्त ५०० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे. त्यानंतर म्हणजे सुमारे ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या जन्मदात्या हय़ा सूर्यापासून आपली पृथ्वी बनलेली आहे, पण तेव्हा ती एक अतिउष्ण जळता गोळा होती. ती थंड आणि जलमय व्हायला सुमारे शे-सव्वाशे कोटी वर्षे लागली. त्या सुमारास केव्हा तरी म्हणजे सुमारे तीन-साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कुठे तरी काही रासायनिक प्रक्रिया निसर्गत: होऊन आधी अल्गी शेवाळ व नंतर केव्हा तरी अगदी साधे अमिबा, बॅक्टेरियासारखे जिवाणू किंवा एकपेशी सजीव निर्माण झाले. नंतरची सुमारे दोनशे कोटी वर्षे पृथ्वीवर फक्त असलेच प्राथमिक अवस्थेतील सजीव होते. तेव्हा आजच्यासारखी जंगले किंवा पशू-पक्षीसुद्धा पृथ्वीवर नव्हते. नंतर सुमारे साठ कोटी वर्षांपूर्वीपासून सुमारे वीस कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर बहुपेशीय पण कमी गुंतागुंतीची शरीरे असलेल्या सजीवांचे ‘प्राचीन जीवयुग’ होऊन गेले. पुढे वीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते पाच कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर सरपटणारे प्राणी व वेगवेगळे डायनॉसॉर आणि अनेक वनस्पती वगैरेंचे ‘मध्यजीवयुग’ होऊन गेले. त्यानंतर हय़ा शेवटच्या पाच कोटी वर्षांपूर्वी आज जगात दिसणाऱ्या सस्तन प्राण्यांचे ‘नवजीवयुग’ सुरू झाले. हय़ाच नवजीवयुगात सुमारे सव्वाकोटी वर्षांपूर्वी, मानवाचा पूर्वज असलेला बिनशेपटीचा, चतुष्पाद असलेला, पण दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करू लागलेला ‘मानव-पूर्वज-मर्कट’ पृथ्वीवर वावरत होता. हय़ाचे पुरावे शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात मिळालेले आहेत.
हीच वन्यप्राणी असलेली मर्कट जात शेवटची एक सव्वा कोटी वर्षे उत्क्रांत होत राहिलेली आहे. ती जात मागील दोन पायांवर, पण जरा पुढे वाकून चालू लागली व पुढील दोन पायांचा हातासारखा उपयोग करू लागली. उदाहरणार्थ, झाडावर चढताना फांद्या धरायला, जमीन खरवडून कंदमुळे खाण्यासाठी काढायला किंवा बीळ खणून लहानसहान प्राणी पकडून खायला किंवा झाडांच्या फांद्यांचा वा प्राण्यांच्या हाडांचा काठीसारखा हत्यार म्हणून उपयोग करायला वगैरे. हय़ा उत्क्रांतीत त्याला निसर्गनियमाने तीन महत्त्वपूर्ण गोष्टी प्राप्त झाल्या. एक म्हणजे हाताचा आकार बदलला व एका बोटाचा अंगठा बनला, जो इतर बोटांना टेकवता येऊ लागला. दुसरे म्हणजे कंठ थोडा उत्क्रांत  होऊन तो वेगवेगळे आवाज काढू लागला. ज्यातून पुढे ‘काही शब्द’ आणि नंतर ‘भाषा’ निर्माण झाली व तिसरे म्हणजे हाताने अन्नाचे लहान तुकडे करून खाणे शक्य झाल्यावर, त्याला मोठय़ा जबडय़ाची गरज उरली नाही, त्यामुळे जबडा लहान होऊ लागल्याने डोक्यात मेंदूची वाढ व्हायला जागा निर्माण झाली व तशी मेंदूची वाढ क्रमश: होऊ लागली.
नंतर अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी हय़ा ऑस्ट्रेलोपिथेक्स किंवा ज्याला दाक्षिणात्य वानर असेही म्हणतात, त्याच्यापासून दोन पायांवर सरळ ताठ चालू शकणारा आदिमानव (होमो इरेक्टस) निर्माण झाला आणि त्यानंतर आजपासून अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी ‘होमो सॅपियन’ ऊर्फ ‘शहाणा मानव’ ही आजची मानवजात निर्माण झालेली आहे व त्याचीही उत्क्रांती होतच आहे. आदिमानव असतानाच तो हाताने दगडांपासून साधीसुधी हत्यारे बनवायला शिकला. जंगलात किंवा उघडय़ावर एकटय़ादुकटय़ाने स्वसंरक्षण करून राहण्यापेक्षा तो माणसांच्या टोळ्या व नंतर संघसमाज बनवू लागला, घरे बांधू लागला, समाजात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्याच्या आवाजाचे काही शब्द व हळूहळू त्याची भाषा बनू लागली. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की त्याचा मेंदू वाढू शकल्याने तो विचार करू लागला. भाषा आणि मेंदू एकमेका साहय़ करू लागले. स्मृती वाढली, विचार वाढले, आता काय झाले पाहा. मूलत: वन्य -प्राणी असलेला आदिमानव, उत्क्रांतीच्या त्याच्या पुढच्या पायरीवर तो आता स्वत:च्या हाताने स्वत:च आपली हत्यारे बनवू शकणारा, विचार करू शकणारा, एकमेकांशी गुंतागुतीचे संवाद भाषेद्वारे करू शकणारा, स्वत:ची घरे बांधू शकणारा, पशुपालन करणारा व नंतर मानवरूपात येऊन काही हजार वर्षे जीवन जगल्यावर शेवटच्या दहा-बारा हजार वर्षांत शेती करून धान्योत्पादन करून ते साठवूनही ठेवू शकणारा, हुशार मानव बनला. हय़ा इतक्या कुवती प्राप्त झाल्यामुळे ही द्विपाद मनुष्यजात पृथ्वीवरील इतर सर्व पशू-पक्ष्यांशिवाय वरचढ ठरली, समर्थ ठरली. बिनशेपटीच्या एका मर्कट जातीपासून अनेक टप्प्यांनी अखेर आजची बुद्धिमान, शहाणी, कुशल व सुसंस्कृत मानवजात बनायला त्याला एक-सव्वा कोटी वर्षांचा दीर्घ काळ मात्र घ्यावा लागला, हे खरे. ते असो.
याचा अर्थ असा होतो की ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाल्यापासून, सुमारे ४५९ कोटी वर्षेपर्यंत मानवच नव्हे तर मानवाचा कुणी पूर्वजही पृथ्वीवर नव्हता. म्हणजे मानव नवागत आहे, आदिमानवरूपात अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी व शहाण्या मानवरूपात तो पृथ्वीवर अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आलेला आहे.
गेल्या काही शतकांत वैज्ञानिकांनी अतिशय परिश्रमाने संशोधन व सिद्ध केलेली अशी ही माहिती आज आपणाला उपलब्ध आहे. परंतु अवघ्या आठ-दहा हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागून शरीराची भूक सहजतेने भागून, सुरक्षित व स्थिर मानवी जीवन शक्य झालेल्या आपल्या शहाण्या मानव पूर्वजांना हय़ापैकी काहीच माहीत नव्हते. त्यामुळे त्यांनी ईश्वर व धर्मविषयक काही कल्पना रचायला सुरुवात केली असावी. जगात आज अस्तित्वात असलेले सगळे मोठे धर्म, गेल्या अवघ्या चार-पाच हजार वर्षांत मनुष्याने आपल्या कल्पनेने स्थापन व विस्तार केलेले आहेत. त्यापूर्वी मनुष्य जातीला ‘भूक आणि भीती’ यांच्याबरोबर ‘भगवंत कल्पनेने’ गाठले असणे शक्य आहे, पण तत्कालीन ईश्वर कल्पनांचे संघटित धर्म बनले नाहीत व कुठे बनले असले तर ते टिकले नाहीत.
जगातल्या प्राचीनांसह बहुतेक धर्मानी अशी कल्पना केली की ‘आकाशात दिसणारे हे विश्व आणि पृथ्वीवरील जग-निसर्ग हे निर्माण करणारा कुणी ईश्वर आहे, दोन पायांवर चालणारा शहाणा माणूस हा इतर प्राणिसृष्टीहून वेगळा, अशी ईश्वराची खास निर्मिती आहे आणि त्याच्या इच्छेनेच सगळी जगरहाटी सुरू आहे. त्याने असेही मानले की हे सर्व जग ईश्वराने माणसासाठीच निर्माण केलेले आहे. खरे तर विश्व फार जुने आहे व त्यामानाने माणूस त्यात अगदी अलीकडे निर्माण झालेला आहे हे त्यांना माहीतच नसल्यामुळे, ‘आधीच अस्तित्वात असलेल्या पृथ्वीवरील जगाचा, उत्क्रांत मानव उपयोग करून घेत आहे’ हे त्यांना कळलेच नाही व त्यामुळे ‘ईश्वराने माणसासाठी जग निर्मिले’ असे त्यांनी मानले. आणि केवळ माणसासाठीच का? माणसाचे एवढे मोठे असे काय महत्त्व आहे, की ईश्वराला खास त्याच्यासाठी योजनापूर्वक जग निर्मिण्याची गरज वाटली? किंवा त्याचे विश्व आधीच अस्तित्वात असले तर नंतर कोटय़वधी वर्षांनी ईश्वराने त्यात हा माणूस कशासाठी (कोणत्या हेतूने) निर्मिला? भौतिकशास्त्राचे ज्ञान नसलेल्या तत्कालीन माणसाला असे प्रश्न पडलेच नाहीत. त्यामुळे तो ईश्वर कल्पना व धर्मकल्पना रचण्यात गुंग झाला. एकदा ईश्वर-अस्तित्व आपल्या मनात मान्य केल्यावर, तो असा आहे, तसा आहे, तो हे करतो, ते करतो’ असे तो म्हणू लागला. जगात वेगवेगळ्या ठिकाणी मोठमोठय़ा नद्यांच्या काठी वेगवेगळ्या मानवसमूहांनी आपापल्या संस्कृती आणि धर्म निर्माण केले. त्यातील काही टिकले व काही कालौघात नष्ट झाले. ‘ईश्वर अस्तित्वात नाही’ असा वेगळा विचार मांडणारेही काही विचारवंत विशेषत: भारतात होऊन गेले. आपण ह्य़ा प्रकरणात, मानव पृथ्वीवर केव्हा आणि कसा आला व त्याच्या प्रगतीचा आरंभ कसा झाला, त्यावर फक्त एक नजर टाकलेली आहे.
- शरद बेडेकर








by - Loksatta First Published on January 5, 2015 1:07 am

माझ्याबद्दल