व्यावसायिक आयुष्यात तणावावर नियंत्रण मिळविणे खूप आवश्यक आहे. तणावावर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले तर संपूर्ण व्यावसायिक आयुष्यच धोक्यात येऊ शकते. म्हणून खास करून व्यावसायिकांनी, उद्योजकांनी आपल्या तणावावर नियंत्रण मिळविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहायला हवे. ज्यावेळी सकारात्मक विचारांपेक्षा नकारात्मक विचारांनी डोके भरून गेल्यासारखे वाटेल तेव्हा आपण मोठ्या आजाराकडे (आणि विनाशाकडेही) वाटचाल करत आहोत हे लक्षात घेऊन त्यावर तात्काळ उपाय करायला हवेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा