गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१८

गरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून पाणी पिण्याचे फायदे...

गरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून पाणी पिण्याचे फायदे


हळदीमध्ये अनेक महत्त्वाचे गुण असतात. हळदीला आयुर्वेदातही महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे सकाळी उठल्यावर गरम पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून प्यायल्यास शरीरास अनेक फायदे होतात. त्यावर एक नजर टाकुयात... 

1) अस्थमा, सायनोसायटिस आणि खोकल्यापासून सुटका होईल.

2) सतत तोंड येत असल्यास हे पाणी फायदेशीर आहे.

3) वाढत्या वयाच्या खुणा रोखणार हे पाणी आहे.

4) वजन नियंत्रित करण्यासाठी हे पाणी प्यावे. मेटाबॉलिज्म नियंत्रित करुन शरीरातील जमा झालेले फॅट्स कमी करण्याचे काम हे पाणी करते.

5) या पाण्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते. ज्यामुळे वारंवार आजारी पडणारी समस्या दूर होते.

6) या पाण्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते तसेच ब्लॉक हटतात. हृदयासंबाधित आजारांवर गुणकारी आहे.

7) लिव्हरच्या आरोग्यसाठी हे पाणी अतिशय लाभदायक आहे.





By - Unknown

पाणी पिण्याचे खूप फायदे असतात विशेषत: गरम पाणी पिण्याचे….

पाणी पिण्याचे खूप फायदे असतात विशेषत: गरम पाणी पिण्याचे….

जर आपण त्वचेच्या समस्येने अस्वस्थ आहात किंवा त्वचेसाठी वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने वापरुन थकला असाल तर दररोज गरम पाणी पिणे सुरू करा त्यामुळे आपली त्वचा समस्येतून मुक्तता होईल आणि चेहराही उजाळेल.


सकाळी उपाशी पोटी आणि रात्री जेवल्यानंतर गरम पाणी प्याल्याने पाचक समस्याही दूर होते.

गरम पाणी पिण्याचे खूप फायदे असतात ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. ह्याने कफ और सर्दी लवकर दूर होतात.

वजन कमी करण्यातही गरम पाणी खूप मदत करते. गरम पाण्यात थोडं लिंबू किंवा काही थेंब मधाचे मिसळून पिल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.

नेहमी तरुण दिसण्याची इच्छा ठेवणाऱ्यांसाठी गरम पाणी एका अतिशय चांगल्या औषधाचे काम करत.

दमा, उचकी इत्यादी आजारात आणि तळलेले पदार्थ खाल्यानंतर गरम पाणी खूप उपयोगी असते.











by - http://marathi.webdunia.com/

गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे...


पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे.
Updated: Sep 29, 2015, 08:16 PM IST
 पाहा |   
गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे
मुंबई : पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे.
१. आपली पचनक्रिया एकदम नाजूक असेल तर गरम पाणी पिणे कधीही चांगले. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.
२. तुम्हाला नेहमी सर्दीचा त्रास होत असेल तर गरम पाणी पिणे नेहमी चांगले. गरम पाणी पिल्यानंतर गळाही साफ आणि चांगला राहतो. सादी सर्दी असेल तर गरम पाण्याने आराम मिळतो.
३. महिलांना मासिक पाळीच्यावेळी पोटात दुखत असेल तर तेव्हा थंड पाणी पिण्याऐवजी गरम पाणी प्या. त्यामुळे पोट दुखीवर आराम मिळतो.
४. गरम पाण्यामुळे आपल्या शरीरातील अशुद्धपणी दूर होतो. गरम पाण्यामुळे शरीरातील तापमानात वाढ होते. त्यामुळे तुम्हाला घाम येतो. त्यामुळे शरीरातील अशुद्ध घामातून बाहेर पडण्यास मदत होते.
५. गरम पाणी पिण्यामुळे वाढते वय लवकर लक्षात येत नाही. याचे कारण की गरम पाण्यामुळे अशुद्धपणी बाहेर पडतो. त्यामुळे वाढते वय लक्षात येत नाही.
६. गरम पाण्यामुळे केस आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते. पिंपल्सची समस्याही दूर होते. केस अधिक चमकदार होतात. केसांच्यावाढीसाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.
७. गरम पाणी पिण्यामुळे पचन क्रिया चांगली राहते. त्यामुळे गॅसची समस्या दूर होते. किंवा गॅस निर्माण होत नाही.





by- Zee News

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

जंगल वसवणारा अवलिया

जंगल वसवणारा अवलिया

किरण क्षीरसागर | Update - Aug 21, 2018, 06:57 AM IST Divya Marathi (Madhurima)


Kiran Kshirsagar writes about Dr Premendra Bothra



काही माणसं छंद म्हणून झाडं लावतात. काही बागा फुलवतात. डॉ. प्रेमेन्द्र बोथरा यांनी जंगल वसवलं. मात्र, तो केवळ छंद नव्हता.

Kiran Kshirsagar writes about Dr Premendra Bothra

काही माणसं छंद म्हणून झाडं लावतात. काही बागा फुलवतात. डॉ. प्रेमेन्द्र बोथरा यांनी जंगल वसवलं. मात्र, तो केवळ छंद नव्हता. त्यांची त्या कृतीमागे निसर्गाप्रती असलेली गहिरी अात्मीयता होती. अाजच्या सदरात जाणून घेऊया एका हिरव्यागार अवलियाला…

  • Kiran Kshirsagar writes about Dr Premendra Bothra
    ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा माहिती संकलनाचा प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात सुरू करायचा होता. जिल्हा समजून घ्यावा या उद्देशाने हिंगोलीला पोहोचलो. ‘थिंक महाराष्ट्र’च्या कामाचे स्वरूप समजल्यानंतर लोक अापसूक त्या त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींची नावे सुचवतात, भेटी घडवून देतात असा माझा अनुभव. हिंगोलीतही तेच घडले. मला हिंगोलीतील मंडळी अाग्रहाने प्रेमेन्द्र बोथरा या होमिओपॅथी डॉक्टरांकडे घेऊन गेली.
    डॉ. बोथरा यांचे क्लिनिक त्यांच्या घराला जोडून होते. वय चाळिशीपार. गोलाकार चेहरा. माझ्यासोबत अालेले दीपक नेनवाणी म्हणाले, ‘डॉक्टरांनी त्यांच्या गावामध्ये जंगल तयार केलंय.’
    मला क्षणभर अर्थबोध झाला नाही. मी डॉक्टरांकडे पाहिले. ते मंद स्मित करत म्हणाले, ‘अामच्या गावात एक डोंगर अाहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत तो उघडा-बोडका होता. अाम्ही त्यावर झाडं लावून तिथं जंगल निर्माण केलंय.’
    ‘किती मोठा अाहे तो डोंगर?’
    ‘चौऱ्याऐंशी एकर!’
    माझे डोळे विस्फारायचे बाकी राहिले. मनात त्या कामाचा अाणि त्याच्या परिणामाचा अावाका जाणून ‘क’ने सुरू होणारे बक्कळ प्रश्न निर्माण झाले. मी ते विचारले अाणि डॉक्टर सांगू लागले, ‘मी कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावचा. मी लातूरहून डॉक्टरकीचं शिक्षण घेतल्यानंतर १९९१ मध्ये गावी परतलो. त्यानंतरची दहा वर्षं हिंगोलीमध्ये माझी प्रॅक्टिस स्थिरस्थावर करण्यात गेली. प्रॅक्टिससोबत घरच्या शेतीकडे लक्ष देत होतो. अामच्या गावच्या डोंगराजवळ महादेवाचं मंदिर अाहे. त्याशेजारचा डोंगर रुक्ष वाळवंटासारखा. त्यावर एकही झाड नव्हतं. माझ्या मनात त्या डोंगरावर देवराई निर्माण करावी अशा भीमकाय कल्पना येत. लोक देवाच्या धाकाने देवराईच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे तसं जंगल जर देवाच्या सान्निध्यात असेल, तर त्याचं रक्षण होऊ शकेल असा माझा विचार होता.’

    ‘मी प्रयत्न करायचं ठरवलं. मी झाडांच्या बिया गोळा करू लागलो. त्यांचे सीडबॉल तयार केले. गावातील मंडळींना ती कल्पना सांगितली. तेदेखील सोबत जोडले गेले. गावच्या शाळेतील पाचवी ते सातवी इयत्तेतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांची सोबत मिळाली. मी जवळपास दहा लाख बिया गोळा केल्या. अाम्ही २००३ ते २००६ अशी तीन वर्षं सीडबॉल तयार करून ते डोंगरावर सातत्याने टाकत-पेरत राहिलो. एकेका विद्यार्थ्याने हजारो बिया पेरल्या. सोबतीला निसर्ग त्याचे काम करत राहिला. बिया रुजल्या. कोंब फुटले अाणि झाडं उगवली. अाता त्या भकास डोंगरावर घनदाट जंगल उभं अाहे.’

    डॉक्टर अाणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी पोतरा गावचा डोंगर हिरवागार झाला अाहे. त्यावर लाखो झाडे उगवली अाहेत. महत्त्वाचे म्हणजे त्या डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी, जे पूर्वी झाडांअभावी जमिनीवर थेट पडून वाहून जात असे, ते त्या झाडांमुळे जमिनीत मुरू लागले. पोतरा गावाची पाण्याची पातळी गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात वाढली अाहे. गावाला पूर्वीप्रमाणे पाण्याची अडचण भासत नाही. विहिरींना मुबलक पाणी अाहे. डॉक्टर त्या जंगलाबद्दल अभिमानाने म्हणतात की, ‘हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘मॅन मेड’ जंगल अाहे.’
    पोतरा गावचे जंगल मोठे, घनदाट झाले. तेथे वृक्ष अाणि वनस्पती यांच्या नवनव्या जाती अाढळू लागल्या. नवनवे पक्षी राहण्यास येऊ लागले. डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनुसार त्या जंगलात किमान ४५ प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास निर्माण झाला अाहे.

    डॉक्टरांचा निसर्गाशी असलेला बंध त्यांच्या प्रत्येक कामातून जाणवतो. ज्याप्रमाणे जंगलाचे इकोसिस्टिमचे जाळे असते, तसे विविध धडपडींचे जाळे डॉक्टरांच्या कामातून जाणवते. डॉक्टरांनी त्यांच्या मालकीच्या अाठ-दहा एकर जमिनीतला एक तुकडा जंगलासारखा वाढू दिला अाहे. त्यावरचा निसर्ग मनमर्जीने पसरला अाहे. तेथेदेखील विविध पक्ष्यांचा अधिवास अाहे.

    डॉक्टरांचा झाडांप्रमाणे पक्ष्यांशीदेखील तेवढाच भावबंध अाहे. ते पक्षीनिरीक्षण करतात. त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला अाहे. त्यांच्याकडे हिंगोली परिसरातील अाणि तेथे येणारे स्थलांतरित अशा सर्व पक्ष्यांचे तब्बल साडेतीन हजार फोटो अाहेत. डॉक्टर फुलपाखरांची बाग वसवण्यासाठी धडपडत अाहेत.

    डॉक्टरांशी बोलताना अापण होमिओपॅथी डॉक्टरऐवजी एखाद्या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकासोबत बोलत असल्याचा भास होतो. त्यांना झाडा-वेलींची, शेतीची, पक्ष्यांची बक्कळ माहिती अाहे. त्यांच्या जिभेवर त्या झाडा-पक्ष्यांची शास्त्रीय नावे हजर असतात. डॉक्टरांनी वीस वर्षे हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक प्रदेशाचे निसर्गाच्या अनुषंगाने अवलोकन केले अाहे. त्यांच्याकडे त्याबद्दलचे शास्त्रीय दस्तऐवज उपलब्ध अाहेत. डॉक्टर प्रयोगशील पद्धतीने शेती करतात. त्यांनी त्यांच्या शेतात पिकांना विद्राव्य खते देण्यासाठी छोटे अाणि परिणामकारक यंत्र निव्वळ शंभर रुपयांत तयार केले अाहे. एकटा माणूस हाताळू शकेल अशा त्या यंत्राद्वारे खतफवारणीचा खर्च सहा पटीने कमी तर होतोच, सोबत बेफाम खत टाकल्यामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणामदेखील अाटोक्यात येतात, असे डॉक्टर सांगतात. ते यंत्र त्यांच्या निर्मितीक्षमतेतून नव्हे, तर सर्वसामान्य माणूस, शेती, तिचा कस अाणि उत्पादन याविषयीच्या त्यांच्या विचारमंथनातून जन्माला आलेले अाहे. डॉक्टर म्हणतात, ‘मला असा वेगळा विचार करण्याचा किंवा निसर्गाशी जोडून राहण्याचा वारसा माझ्या वडिलांकडून मिळाला. ते प्रयोगशील शेतकरी होते. त्यांनी त्यांच्या काळात एका एकरात पस्तीस क्विंटल गव्हाचे उत्पन्न घेतले होते. तो त्या वेळचा विक्रम होता. अजूनपर्यंत तो कुणी मोडलेला नाही.’

    डॉक्टर बोथरा यांनी इको क्लबची सुरुवात केली. ते हिंगोली शहरातील एका शाळेचे दोनशे विद्यार्थ्यांना बसने पोतरा गावातील शेतात घेऊन जात असत. तेथे दिवसभर निसर्गाचा अभ्यासवर्ग अाणि कार्यशाळा चाले. ते विद्यार्थ्यांना तेथे शेती, पक्षी निरीक्षण, सीडबॉल तयार करण्याचे प्रशिक्षण, वनस्पती-झाडे यांची माहिती अशा बऱ्याच गोष्टी उपलब्ध करून देत. मुलांच्या प्रवासाची जबाबदारी शाळा घेई, तर त्यांची न्याहारी, जेवण अाणि परतताना खास ‘हँडमेड अाइस्क्रीम’ असा खर्च डॉक्टर स्वत: करत. ती मुले माघारी अाल्यानंतर त्यांचे अनुभव लिहून सादर करत. डॉक्टर त्यातील सर्वोत्तम पाच अनुभव निवडून त्या मुलांचा शाळेत जाऊन सत्कार करत असत. त्यांचा तो उपक्रम २०१० ते २०१२ असा तीन वर्षे चालला.

    डॉक्टर बोथरा बहुगुणी अाणि बहुप्रयत्नी अाहेत. ते पक्षी-वनस्पती यांच्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये व्याख्याने देतात. ते चांगले कवीदेखील अाहेत. त्यांनी मराठी, हिंदी अाणि इंग्रजी भाषांत हजारो कविता लिहिल्या अाहेत. त्यांचे अक्षर सुबक अाणि देखणे अाहे. त्यांच्या चार कवितांना परदेशातून चार लाख रुपयांचा पुरस्कार अवचितपणे मिळाल्याची कहाणी डॉक्टर खुलवून सांगतात.
    डॉक्टरांना त्यांच्या कामाचा अभिमान जरूर वाटतो, मात्र ते त्या भावनेत अडकून पडलेले नाहीत. ते निसर्गाच्या नवनव्या वाटा शोधत सतत पुढे जात अाहेत.
    वाचक डॉ. प्रेमेन्द्र बोथरा यांच्याशी 94221 78321 वा botharapremen15@gmail.com येथे संपर्क करू शकतात.
    (लेखक ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अाणि ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे सहाय्यक संपादक अाहेत.)
    - किरण क्षीरसागर, मुंबई
    info@thinkmaharashtra.com

शुक्रवार, १७ ऑगस्ट, २०१८

अटलजींनी लावलेल्या रोपट्याचा झाला वृक्ष...

उत्तन  येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ वर्षापूर्वी आंब्याचे रोपटे लावले होते. ते आता बहरले असून या झाडाला त्यांचे नाव देण्यात आल्याने ते अटलजींच्या पश्चात कायम स्मरणात राहणार आहे.



 Atalji news | अटलजींनी लावलेल्या रोपट्याचा झाला वृक्ष




भार्इंदर - उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १५ वर्षापूर्वी आंब्याचे रोपटे लावले होते. ते आता बहरले असून या झाडाला त्यांचे नाव देण्यात आल्याने ते अटलजींच्या पश्चात कायम स्मरणात राहणार आहे.
२००३ मध्ये प्रबोधिनीच्या लोकार्पण कार्यक्रमाला वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी, भाजपा नेते प्रमोद महाजन यांच्यासह अनेक मंत्री व नेते उपस्थित होते. त्यावेळी प्रबोधिनीतील ‘तेजोनिधी’ प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीजवळ अटलजींच्या हस्ते आंब्याचे रोपटे लावले. पुढे ते रोपटे बहरून त्याला आंबे आल्याने त्यातील तीन डझन आंबे काही वर्षापूर्वी अटलजींना भेट म्हणून पाठवले होते. त्यांना ते खूपच आवडले होते. लोकार्पणावेळी प्रबोधिनीत झालेल्या मेजवानीत पुरणपोळीचा आस्वादही त्यांनी घेतला होता. त्यावेळी त्यांनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी खरच एक केशवाची ‘सृष्टी’ असल्याचे गौरवोद्गार काढले होते.
दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १९७७ आणि १९८४ मध्ये शहापूरला भेट दिली होती. ८४ मध्ये त्यांची शहापूरमध्ये सभा झाली होती. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.










by - Lokmat

अटलजींची टीका विरोधकांनाही भुरळ पाडणारी....

जो खरा ‘सांस्कृतिक’ असतो, तो कधीच कुणाचे वाईट चिंतित नाही. वाईट बोलतही नाही. अटलजींचे अंत:करण स्वच्छ, नितळ होते. म्हणून त्यांची टीकाही विशिष्ट स्तर जपणारी होती.


Atalji's criticism of the opponents news | अटलजींची टीका विरोधकांनाही भुरळ पाडणारी


 डॉ. शरद कळणावत  Published: August 18, 2018 03:52 AM
(ज्येष्ठ साहित्यिक, यवतमाळ)

अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व अफाट समुद्रासारखे होते. वडवानल, अग्नी पचवूनही पुन्हा हा समुद्र शांत होऊ शकत होता. म्हणूनच देशासाठी कठोर निर्णय घेणारा हा नेता स्वभावाने तेवढाच संयमी म्हणून ओळखला जातो. विरोधकांवर सडकून टीका करतानाही त्यांनी आपल्या शब्दांचा स्तर कधीच खालावू दिला नाही. हल्ली राजकीय पुढाऱ्यांची भाषणे म्हणजे मनोरंजन बनले आहे. याने त्याच्यावर चिखलफेक करायची आणि त्याने याच्यावर, एवढेच सुरू आहे. म्हणूनच टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेतही चार-चार चौकटी ठेवाव्या लागत आहेत. पण राजकारणाच्या ‘चौकटी’ भेदून चर्चा कशी करावी, हे अटलजींकडून शिकण्यासारखे आहे.
मला विद्यार्थीदशेपासूनच अटलजींच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण. नागपूरच्या सिटी कॉलेजमध्ये शिकत असताना पहिल्यांदा त्यांचे भाषण ऐकण्याची संधी मिळाली. १९५३ मध्ये चिटणीस पार्कवर रात्री त्यांचे भाषण होते. त्यांच्या वक्तृत्वाविषयी अगदी सर्वसामान्य माणसांनाही आकर्षण होते. ज्यांचा राजकारणाशी काडीचाही संबंध नाही, असेही अनेक जण अटलजींना ऐकण्यासाठी आले होते.
त्यावेळच्या गलितगात्र झालेल्या काँग्रेसवर आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर अटलजींनी टीकास्त्र सोडले होते. पंडित नेहरूंवर, ते विरोधी काँग्रेसचे मुर्धण्य नेते असले तरी, त्यांच्यावर शंकराचे रूपक करण्याची उदारता अटलजींच्या ठिकाणी होती. ते म्हणाले, नेहरूजी की दशा एक शिवजी जैसी हैं. भोलेशंकर अपने दोनो हाथों मे पार्वती का निष्प्राण कलेवर लेकर बेतहाशा दौड रहे हैं. क्या इसमे प्राण फुंके जायेंगे? कभी भी नही. विरोधकाला देवाची उपाधी देण्यासाठी अटलजींसारखे दिलदार व्यक्तिमत्त्वच हवे. आपल्याला काँग्रेसची विचारधारा, धोरणे आवडत नाही, हे सांगण्यासाठी काँग्रेसच्या नेत्याला वाईट शब्दात बोलणे हा पर्याय त्यांनी कधीच निवडला नाही. काँग्रेसला निष्प्राण पार्वती म्हणताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंसाठी शिवशंकराचे रूपक वापरले. नेमकी हीच भाषा आजच्या राजकीय पुढाºयांनी गमावलेली आहे. पुढच्या काळात इंदिरा गांधींचा गौरव करताना अटलजींनी त्यांना ‘दुर्गा’ म्हटले, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. पण ही त्यांची संस्कृतीच होती. चिटणीस पार्कवरील राजकीय सभा आटोपल्यावर आमच्या सिटी कॉलेजमध्येही त्यांचे भाषण झाले. पण विद्यार्थ्यांसमोर दीड तास बोलताना त्यांनी राजकारणाला साधा स्पर्शही केला नाही. त्यांचा विषय होता, उत्तर प्रदेशातील हुंडा प्रथा. ते म्हणाले, उत्तर प्रदेश की जो कन्याए अविवाहित रहती हैं, उस का कारण यह नही की उन मे गुण नही होते. सच कहू तो गुण के ग्राहक नही होते. अटलजींची ही शैली अशिक्षितांनाही भुरळ पाडणारी होती. ज्यांच्यावर ते टीका करायचे, त्या विरोधकांनाही टीकेची ही पद्धत प्रिय वाटायची, हे विशेष.
अटलजींनी आयुष्यभर उमदेपणा सोडला नाही. निष्कलंक चारित्र्य, असामान्य नेतृत्व आणि अजातशत्रुत्व हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यामुळेच विरोधकांनाही त्यांच्याकडे बोट दाखवायला जागा उरली नाही. १३ दिवसात अटलजींचे सरकार पाडल्याचे दु:ख विरोधकांनाही व्हावे, इतका त्यांचा चांगुलपणा पराकोटीचा होता. हा चांगुलपणा जपण्यासाठी नुसता नेता असून चालत नाही. आधी तो चांगला माणूस असावा लागतो. अटलजी हे असेच निर्लेप, निरलस ‘माणूस’ होते. विद्यार्थीदशेपासून आजपर्यंत हा माणूस माझ्या आठवणीत कधीच छोटा झाला नाही. स्वातंत्र्यलढ्यात अटलजींप्रमाणे अनेक जण सहभागी होते. पण त्यातले अनेक नंतर चळले. अटलजी मात्र शेवटपर्यंत कुठल्याही पाशात अडकले नाहीत. व्यक्ती वेगळा आणि पक्ष वेगळा. अटलजी आदरणीय होते आणि आदरणीयच राहतील.
राजकारणात येण्याऐवजी अटलबिहारी वाजपेयी सांस्कृतिक आध्यात्मिक क्षेत्रात रुळले असते, तर ते संत म्हणून ओळखले गेले असते. संतत्वाची सारी वैशिष्ट्ये त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. केवळ राजकारणात आहेत, म्हणून त्यांना संत म्हणणे अनेकांना अवघड वाटेल. मात्र ते सत्पुरुष होते, हे त्यांच्या विरोधकांनाही मान्य आहे. आजच्या राजकारणात त्यांच्या तोडीचा ‘माणूस’ दुसरा दिसत नाही. मला अटलजी आणि नेहरूजी सारखेच वाटतात. कुणाविषयी दुराग्रह न ठेवता जे करायचे ते अगदी प्रामाणिकपणे करायचे, ही त्या दोघांचीही पद्धत. राजकारणी म्हणून त्यांची काही धोरणे चुकू शकतात, पण त्यांच्या प्रामाणिकतेविषयी शंकाच नाही.
जो खरा ‘सांस्कृतिक’ असतो, तो कधीच कुणाचे वाईट चिंतित नाही. वाईट बोलतही नाही. अटलजींचे अंत:करण स्वच्छ, नितळ होते. म्हणून त्यांची टीकाही विशिष्ट स्तर जपणारी होती. पण आजच्या राजकारणी मंडळींनी हा स्तर पार धुळीस मिळविला आहे. एकाचे मोठेपण दाखविताना दुसºयाला खुजे दाखविण्याची स्पर्धा लागली आहे. एखादा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असला तरी राजकीय नेते तेथे एकमेकांना चिमटे काढण्याची हौस सोडत नाही. त्यांच्या टीकाही नुसत्या टीका न राहता गरळ बनते. पण राजकीय चर्चांमध्ये ‘लोक’ हा केंद्रबिंदू ठेवायचा असेल, तर अटलजींच्या दर्जेदार टीकेची आठवण ठेवणे अत्यावश्यक आहे.
 

देशाला हवेत अटल भावनेचे सुसंस्कृत विरोधक..

वाजपेयींसारखे द्रष्टे नेते ज्या विरोधी बाकांचे दीर्घकाळ कर्णधार होते, तशा अटल भावनेच्या समर्थ विरोधकांची भारतीय लोकशाहीला आज नितांत आवश्यकता आहे.



Country need the Cultured opponent like Atal | देशाला हवेत अटल भावनेचे सुसंस्कृत विरोधक


सुरेश भटेवरा
(संपादक, दिल्ली लोकमत Published: August 18, 2018 03:57 AM)

भारतीय राजकारणात वाजपेयींची तुलनाच करायची झाली तर ती केवळ पंडित नेहरूंशीच करावी लागेल. लोकशाही मूल्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक भारतीयाच्या मनात याच तुलनेचे स्मरण गेले दोन दिवस वारंवार होत होते. नेहरूंच्या युगातही ताठ मानेने वावरलेल्या वाजपेयींचे गुरुवारी सायंकाळी महानिर्वाण झाले. वाजपेयी तरुण होते तेव्हा ‘हा मुलगा एके दिवशी भारताचा पंतप्रधान होईल’ असे भाकीत नेहरूंनी ऐकवले होते. काळाच्या कसोटीवर हे भाकीत खरे ठरले. नेहरूंसारखा आधुनिक भारताचा निर्माता हरपला, तेव्हा दैनिक मराठाच्या अग्रलेखात आचार्य अत्रेंनी दिवसा उजेडी सूर्यास्त झाल्याचे नमूद केले होते. वाजपेयींच्या निधनानंतर तशीच अनुभूती सर्वांना झाली. वाजपेयींच्या प्रस्थानाबरोबर राजकारणातील उदारमतवादी संस्कृतीच्या फक्त स्मृतीच शिल्लक राहिल्या आहेत. शुक्रवारी दुपारी दीनदयाल मार्गावर भाजपच्या मुख्यालयापासून राजघाटावरील स्मृती स्थळापर्यंत वाजपेयींची विशाल अंतिम यात्रा निघाली. सारा देश या महान नेत्याला यावेळी अखेरचा सलाम करीत होता. अंत्ययात्रेत हजारो लोकांची गर्दी होती. जड अंत:करणाने नि:शब्द अन् शोकाकूल वातावरणात लोक पायी चालत होते. पंतप्रधान मोदी, भाजपचे अध्यक्ष शहा, अनेक केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री अन् मंत्री या जनसागरात होते. हे सारे सत्ताधीश या महान नेत्याच्या महानिर्वाण यात्रेत फक्त चालणाºया गर्दीचा भाग बनलेली माणसे होती. आपल्या देदीप्यमान प्रतिभेने एखादी व्यक्ती जेव्हा सर्वोच्च सत्तेपेक्षाही मोठी असते, तेव्हा सभोवतालच्या सत्तेची उसनी कवचकुंडले खुजी वाटू लागतात. अंतिम यात्रेत सहभागी तमाम सत्ताधीशांचा रुबाब अन् बडेजाव असाच गळून पडला होता.
अटलबिहारी वाजपेयींच्या १९५५ ते २००९ पर्यंतच्या राजकीय कारकिर्दीचे सूक्ष्म अवलोकन केले तर त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीतला ९० टक्के काळ विरोधी बाकांवर गेला. सत्ताधीशांना राजकीय विरोध करताना सामान्यजनांच्या व्यथा वेदनांचा आवाज बुलंद करणे, हा विरोधकांच्या राजकारणाचा आत्मा आहे. १९५७ ते १९९६ अशी तब्बल चार दशके, नेहरूंपासून नरसिंहरावांपर्यंत सर्व पंतप्रधानांच्या विरोधात ठामपणे उभे राहूनही व्यक्तिगत आयुष्यात वाजपेयींचा कोणीही विरोधक नाही, ही वाजपेयींच्या उदार व्यक्तिमत्त्वाला मिळालेली केवळ दाद नव्हे तर भारतीय लोकशाहीतले राजकीय आश्चर्यच आहे. वाजपेयींच्या राजकारणाचा खरा वारसा म्हणूनच सत्तेचा नसून विरोधी राजकारणाचा आहे.
नेहरूंच्या अनेक धोरणांचे वाजपेयी प्रखर टीकाकार होते मात्र मोरारजीभार्इंच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्रिपद पहिल्यांदा त्यांच्याकडे आले तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयातली नेहरूंची तसबीर अचानक कुठेतरी गायब झाल्याचे त्यांना समजले. ते खिन्न झाले. उपस्थित अधिकाºयांना त्यांनी विचारले की इथली नेहरूंची तसबीर कुठे? कुणी काहीच बोलले नाही. दुसºया दिवशी मात्र ती तसबीर पुन्हा आपल्या मूळ जागेवर दिसू लागली. विद्यमान काळात पंतप्रधानांपासून त्यांच्या तमाम मंत्र्यांना नेहरूद्वेषाने पछाडले आहे. ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करताना नेहरूंचे नाव जाणीवपूर्वक टाळले जाते. वाजपेयींना हे समजले असते तर त्यांनी कदापि ते सहन केले नसते. कडक शब्दात सर्वांची कानउघाडणी केली असती.
भारताच्या राजकीय पटलावरून नेहरूंचा अस्त झाला त्यावेळी वाजपेयींना आपले अश्रू आवरता आले नव्हते. नेहरूंच्या निधनानंतर वाजपेयींनी ज्या शब्दात त्यांना आदरांजली अर्पण केली तो शोकसंदेश भारतीय लोकशाहीतला अलौकिक दस्तऐवज आहे. वाजपेयी त्यात म्हणतात : ‘पंडित नेहरू शांतीचे पुजारी होते मात्र क्रांतीचे अग्रदूत होते. ते अहिंसेचे उपासक होते मात्र भारताचे स्वातंत्र्य अन् सन्मानाच्या रक्षणासाठी शस्त्रांचा प्रयोग करण्यास ते कचरणारे नव्हते. नेहरू अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते मात्र देशात आर्थिक समानता प्रस्थापित करण्याबाबत त्यांनी कधी तडजोड केली नाही’. पंडित नेहरूंना अखेरचा सलाम करताना या संदेशातला प्रत्येक शब्द वाजपेयींनी आपल्या आदर्श संस्कारांनुसार लिहिला. स्पर्धेच्या राजकारणात राजकीय विरोधाची भूमिका समजू शकते, मात्र सत्ताधाºयांनी विरोधकांवर सूडाचा प्रवास सुरू करायचा नसतो. भारताच्या विद्यमान राजकारणात मात्र अटलजींची ही परंपरा त्यांच्या निधनाआधीच समाप्त झाली आहे. नेहरू युगातले ते अखेरचे असे नेते होते की ज्यांचा नेहरूंशी थेट संबंधही होता अन् विरोधही होता. विरोधी बाकांवर जी राजकीय मूल्ये वाजपेयींनी मनापासून जपली, ज्या महान परंपरा निर्माण केल्या, त्या आज संकटात आहेत. अटलजींच्या आयुष्याचा दीर्घकाळ रचनात्मक विरोधात गेला. त्यांनी स्वत:च स्थापन केलेल्या भाजपमध्येही त्यांना विरोधकाची भूमिकाच वारंवार वठवावी लागली. वाजपेयी पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हा भाजपमध्ये त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचे स्वर बरेच आक्रमक होते. पंतप्रधानांच्या हेतूंवर शंका घेणारे अनेक प्रश्न, संघपरिवार व भाजपच्या नेत्यांकडून विचारले जायचे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित धर्मसंसदेत तर वाजपेयींच्या विरोधात कडवट प्रहार करणारा आवाज बुलंद केला गेला. विद्यमान पंतप्रधानांबाबत मात्र अशा विरोधी स्वरात बोलण्याचे धाडस आज एकाही धर्ममार्तंडात नाही. अटलबिहारी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकायचे. मोजक्या शब्दात शक्यतो वन लायनरमध्ये त्रोटक प्रतिक्रिया द्यायचे. त्या प्रतिक्रियेत मात्र दूरदृष्टीचे सत्य दडलेले असायचे. आता काळ बदलला आहे. जमावाच्या हिंसाचारापासून, असहिष्णुतेच्या प्रयोगांची अन् अनेक भयप्रचंड अत्याचारांची मालिकाच गावोगावी सुरू आहे. सरकारी यंत्रणेचा राजरोस दुरुपयोग करून राजकीय विरोधकांवर सूड उगवला जात आहे. या घटनांवर कठोर भाष्य करण्याची वाजपेयींसारखी हिंमत अन् औदार्य दुर्दैवाने विद्यमान पंतप्रधानांकडे नाही. वाजपेयींनी आपल्या कारकिर्दीत विरोधाचे, प्रखर टीकेचे असंख्य वार झेलले मात्र सत्तेची भलामण करीत सत्ताधाºयांच्या कुशीत बसणाºया प्रसारमाध्यमांना कधी कुरवाळले नाही की प्रोत्साहनही दिले नाही. आज भारतातल्या बहुतांश प्रसारमाध्यमांची दुर्दैवाने तीच ओळख बनली आहे. वाजपेयींनी एकेकाळी संघाच्या प्रचारकाची भूमिकाही वठवली होती. भाजप सत्तेवर असताना रा.स्व.संघाचा उल्लेख साहजिकच वारंवार होतो. वाजपेयींच्या कारकिर्दीतही तो होत असे. त्या संघपरिवारालाही चार खडे बोल सुनावण्याची हिंमत फक्त वाजपेयींमध्ये होती. ‘संघ एक सामाजिक व सांस्कृतिक संघटना आहे. राजकारणात या संघटनेचा कोणताही हस्तक्षेप नाही, हे रा.स्व. संघाने आपल्या वृत्तीतून अन् आचरणातून सिध्द केले पाहिजे’, हे वाजपेयींचे विधान त्यांचे एकेकाळचे सहकारी सुधींद्र कुळकर्णींनी इंडियन एक्स्पे्रसमध्ये आपल्या लेखात २०१५ साली नमूद केले आहे. भारताच्या विद्यमान राजकारणाची आज अशी स्थिती आहे की सर्वोच्च सत्तेच्या विरोधात ठामपणे उभे राहू शकणारे विरोधक कमजोर आहेत. भाजपच नव्हे तर कोणत्याही पक्षात आज पक्षांतर्गत विरोधक फारसे नाहीत. राजकारणापासून दूर सत्तेच्या विरोधात उभे राहणाºया संघटना व स्वयंसेवी संस्थांना देशद्रोही संबोधले जाते. अशा कुंद काळोखाच्या अंधारयात्रेत वाजपेयींसारख्या प्रबळ विरोधकाची आठवण झाल्यावाचून राहात नाही. वाजपेयींसारखे द्रष्टे नेते ज्या विरोधी बाकांचे दीर्घकाळ कर्णधार होते, तशा अटल भावनेच्या समर्थ विरोधकांची भारतीय लोकशाहीला आज नितांत आवश्यकता आहे.

वाजपेयींनी भाजपाला बनविले काँग्रेसचा समर्थ पर्याय...

अटलजी व्यक्तींपेक्षा मुद्यांवर बोलणे अधिक पसंत करत. त्याचा परिणाम असा झाला की वाजपेयी अजातशत्रू बनले. कोणत्याही आव्हानांवर आपल्या भाषाकौशल्याने मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते.

Vajpayee made BJP a potent alternative to Congress | वाजपेयींनी भाजपाला बनविले काँग्रेसचा समर्थ पर्याय


-------------------------------------------------------
अरुण जेटली
(ज्येष्ठ केंद्रीय मंत्री)

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिली काही दशके देशात काँग्रेसच सत्तास्थानी होती. मात्र अशा वातावरणातही अटलबिहारी वाजपेयींनी काँग्रेसला समर्थ पर्याय ठरेल असा भाजपा मजबुतीने उभा केला. गेल्या दोन दशकात भाजपा काँग्रेसपेक्षाही मोठा पक्ष बनला आहे. भाजपा आता केंद्रात व देशातील बहुतांश राज्यात सत्तेवर आहे, असे केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. वाजपेयी व अडवाणी यांनी संयुक्त प्रयत्नाने भाजपामध्ये दुसऱ्या फळीचे नेतृत्वही उभे केले. वाजपेयी हे नेहमी नवीन संकल्पनांचे स्वागत करत. कोणतीही गोष्ट राबविताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे त्यांचे धोरण होते. ते व्यक्तींपेक्षा मुद्यांवर बोलणे अधिक पसंत करत. त्याचा परिणाम असा झाला की वाजपेयी अजातशत्रू बनले. कोणत्याही आव्हानांवर आपल्या भाषाकौशल्याने मात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात होते. संसदेत व जाहीर सभांमध्ये वाजपेयी यांनी केलेल्या ओघवत्या व ओजस्वी भाषणांच्या आठवणी लोकांच्या मनात कायम राहतील.
कारगील युद्धात मिळाला विजय
वाजपेयी यांनी केंद्रात विविध पक्षांच्या आघाडीचे सरकार यशस्वीपणे चालवून दाखविले. १९९८ साली पोखरण येथे अणुचाचणी करून देशाच्या सामर्थ्याचे दर्शन घडविले. पाकिस्तानशी शांतता व सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्यासाठी वाजपेयींनी केलेल्या प्रयत्नांचे त्या शेजारी राष्ट्रानेही कौतुक केले होते. कारगील युद्धात पाकिस्तानचा भारताने केलेला पराभव ही वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीतील महत्त्वाची कामगिरी होती.
जनसंघापासून राजकीय कार्याला प्रारंभ
विद्यार्थीदशेत असताना वाजपेयी चले जाव चळवळीत सहभागी झाले होते. त्यानंतर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले. तिथे काम करत असताना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या संपर्कात आल्यानंतर ते राजकीय कार्यात व्यग्र झाले. भारतीय जनसंघाच्या संस्थापकांमध्ये वाजपेयी यांचाही समावेश होता. काश्मीरमध्ये भारतीय नागरिकांवर जी विविध बंधने घालण्यात आली होती त्या विरोधात करण्यात आलेल्या सत्याग्रहात ते डॉ. मुखर्जी यांच्यासमवेत सहभागी झाले होते. लियाकत-नेहरू कराराला विरोध करणाºयांमध्ये वाजपेयींचा समावेश होता. १९५७ साली ते लोकसभेत पहिल्यांदा निवडून आले. तिथे तिबेट प्रश्न, १९६२ साली झालेले चीनचे युद्ध यावर त्यांनी केलेली भाषणे संस्मरणीय ठरली. जनसंघाच्या कार्यासाठी देशभर फिरत असतानाच ओजस्वी वक्तृत्वाने त्या काळात त्यांनी अनेक जणांना प्रभावित केले. १९६२ साली चीनने केलेल्या पराभवानंतर देशात डॉ. राममनोहर लोहियांनी काँग्रेस हटाव देश बचाव या संकल्पनेचा जोरदार प्रचार सुरू केला. दीनदयाल उपाध्याय, आचार्य कृपलानी व डॉ. लोहिया यांच्या संयुक्त प्रयत्नांनी १९६७ च्या निवडणुकीत बिगरकाँग्रेस पक्षांना पूर्वीपेक्षा थोडे चांगले यश मिळाले. त्यात जनसंघाचेही खासदार लक्षणीय संख्येने निवडून आले होते.
राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य
पक्षोपपक्षांतील भेदाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताला प्राधान्य देणे हा वाजपेयींचा स्वभावविशेष होता. १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळेला अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन काँग्रेस सरकारची पाठराखण केली होती. १९७४ ला जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ उभी राहिली त्यात वाजपेयी सहभागी झाले. आणीबाणीविरुद्ध जनसंघाने संघर्ष केला व लोकशाहीचे रक्षण केले. जनसंघ व अन्य पक्षांचे विलिनीकरण करुन जनता पक्ष स्थापन झाला. त्याचे सरकारही सत्तेवर आले पण तो सगळाच प्रयोग पुढे फसला. १९८० साली भाजपची स्थापना करण्यात आली. त्यावेळी प्रधानमंत्री की अगली बारी, अटलबिहारी, अटलबिहारी, ही घोषणा कार्यकर्त्यांनी दिली होती. ती भविष्यात खरी ठरली. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर त्यांनी देशाच्या विकासासाठी केलेले काम सर्वांसमोर आहेच. ते आपल्या मंत्रिमंडळातील सर्व सहकारी तसेच अधिकारी यांच्याशी अत्यंत सौजन्याने वागत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्येक मंत्र्याने मोकळेपणाने बोलावे, असा त्यांचा आग्रह असे. वाजपेयी हे अत्यंत प्रतिभावान कवी होते. त्यांनी आपल्या कवितांतून अनेक महत्त्वाच्या विषयांवर चिंतन केले आहे. अटलबिहारी वाजपेयींची विश्वासार्हता मोठी होती. त्यामुळे ते कधीही वादग्रस्त ठरले नाहीत.











by - Lokmat

अटलजी यांचे काही दुर्मिळ फोटो ....


































































by -  EEVADU India 

''अटलबिहारी अमर रहे, वंदे मातरम्'',..

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी (वय 93) यांचे गुरुवार dt.16/08/2018 सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यानंतर आज (शुक्रवार 17/08/18) दिल्लीतील राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीमध्ये त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ''अटलबिहारी अमर रहे, वंदे मातरम्'', अशा घोषणांनी अत्यंत शोकाकुल वातावरणात अटलबिहारी वाजपेयी यांना अखेरचा निरोप देण्यात आला. 









माझ्याबद्दल