रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

बाबासाहेब पुरंदरे...

 बाबासाहेब पुरंदरे ९९ व्या वर्षात पदार्पण करते झाले.

करोनाचा संदर्भ देत बाबासाहेब म्हणाले,
‘मानव जातीवर अशी अनेक संकटे यापूर्वीही आलेली आहेत. परंतु त्या त्या वेळी समाजाने धैर्याने त्याचा सामना केला. 
मी स्वत: प्लेगच्या तब्बल पाच साथी अनुभवल्या. अतिसार, घटसर्प, ‘स्वाइन फ्लू’ पाहिले. या प्रत्येक वेळी काळजी घेतली, पण भीतीने पछाडले असे कधी झाले नाही आणि तसे होऊही दिले नाही. जगण्यावरचे प्रेम, श्रद्धा निरंतर असू द्या. त्यातली ऊर्जा वाहती ठेवा. असे केले तरच ते जगणे आनंदी होईल.’

शताब्दीला अवघी दोन घरे बाकी असण्याचा संदर्भ देत बाबासाहेब म्हणाले,
‘तुम्ही कितीही मोठे व्हा, तुमच्यात दडलेल्या सात-आठ वर्षांच्या मुलाला जिवंत ठेवा.
मी आजही या वयात जेवढा धीरगंभीर, चिंतनशील, स्थितप्रज्ञ वाटतो तेवढाच खोडकर, थट्टेखोर आणि दंगेखोर देखील आहे.
मी जसे वाचन-संशोधन करतो तसेच पत्तेही खेळतो. 
हातात असलेले ‘पुलं’चे ‘खिल्ली’ पुस्तक दाखवत, हे असे आनंद देणारे साहित्यही वाचतो.

आनंदाने जगणे ही
देखील एक कला आहे.

कशाचीही भीती बाळगू नका. संकटे येणार, ती चुकणार नाहीत. मरणावर विजय मिळवा, जगणे सुसह्य़ होईल. 
मी एवढय़ा प्रदीर्घ आयुष्यात एकदाही आजारी पडलो नाही. याचे रहस्य माझ्या शरीरापेक्षा या विचारांमध्ये असावे. आजवर सतत आनंदी, सकारात्मक आणि कार्यमग्न राहिलो. माझा भवतालही सतत हसता, आनंदी ठेवला. या प्रदीर्घ वाटचालीचे श्रेय कदाचित या ‘चैतन्या’लाच असेल!’

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा अल्पपरिचय...

 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या ९९ वर्षांच्या जीवनकाळात महाराष्ट्रात पिंजून काढला. या काळात त्यांनी गडकिल्ले फिरत शिवचरित्राचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर अनेक पुस्तकं लिहिली तसेच 'फुलवंती' आणि 'जाणता राजा' ही नाटकं लिहून त्यांचं दिग्दर्शनही केलं. 'जाणता राजा' या महानाट्याचे गेल्या ३७ वर्षात १२५० हून अधिक प्रयोग झाले.

अल्पपरिचय -

  1. मूळ नाव - बळवंत मोरेश्वर पुरंदरे

  2. प्रचलित नाव - बाबासाहेब पुरंदरे

  3. जन्म - २९ जुलै १९२२

  4. वय - ९९ वर्षे

  5. पत्नीचं नाव - निर्मला पुरंदरे

  6. अपत्ये - माधुरी पुरंदरे, प्रसाद पुरंदरे, अमृत पुरंदरे

  7. मूळ गाव - सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे

  8. कार्यक्षेत्र - इतिहास संशोधन, साहित्य, नाटक, भाषण

  9. पुरस्कार - डी.लिट. (२०१३), महाराष्ट्र भूषण (२०१५), गार्डियन-गिरिप्रेमी जीवनगौरव पुरस्कार (२०१६), प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१२), पद्म विभूषण (२०१९).

  10. गुरु - ग. ह. खरे

  11. सचित्र चरित्र - बेलभंडारा (लेखन - सागर देशपांडे)

  12. संशोधन प्रबंध - ’मराठा इतिहासाची शकावली- सन १७४० ते १७६१’ (भारत इतिहास संशोधन मंडळ)

  13. कार्यकाळ - तारुण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संपर्क, प्र. के. अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन, श्री. ग . माजगावकर यांच्यासोबत 'माणूस' साप्ताहिकात काम, महाराष्ट्रातील गडकोट किल्ल्यांवर भटकंती आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्ताऐवजांचा अभ्यास, दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात सहभाग.

  14. लेखन - आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, जाणता राजा, पन्हाळगड, पुरंदर, पुरंदरच्या बुरुजावरून, पुरंदर्‍यांचा सरकारवाडा, पुरंदर्‍यांची नौबत, प्रतापगड, फुलवंती, महाराज, मुजर्‍याचे मानकरी, राजगड, राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, लालमहाल, शिलंगणाचं सोनं, शेलारखिंड, सावित्री, सिंहगड.

Babasaheb Purandare | इतिहासाची खडानखडा माहिती असणारे बाबासाहेब पुरंदरे नेमके कोण?...

 

Babasaheb Purandare | इतिहासाची खडानखडा माहिती असणारे बाबासाहेब पुरंदरे नेमके कोण?

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. सुरुवातीच्या काळात बाबासाहेब पुरंदरे पुण्यातच स्थायिक झाले आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक खरे हे बाबासाहेबांना गुरू म्हणून लाभले.


पुणेः मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध असलेले बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालंय. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात चिरंजीव अमृत आणि प्रसाद तसेच कन्या माधुरी असा परिवार आहे. त्यांच्या सर्वच परिवाराने वेगवेगळ्या क्षेत्रांत नावलौकिक कमावला आहे.

पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं

26 ऑक्टोबरला तोल जाऊन पडल्यानं बाबासाहेब पुरंदरेंच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कालांतरानं त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना न्यूमोनिया झाला आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज त्यांचे निधन झाले. पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं.


कोण आहेत बाबासाहेब पुरंदरे?

बळवंत मोरेश्वर पुरंदरे ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत. सुरुवातीच्या काळात बाबासाहेब पुरंदरे पुण्यातच स्थायिक झाले आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक खरे हे बाबासाहेबांना गुरू म्हणून लाभले. त्यानंतर इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर 2015 सालापर्यंत 12 हजारांहून अधिक व्याख्याने दिलीत. बाबासाहेब पुरंदरे यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांचा आणि मराठा साम्राज्य आणि शिवकालीन ऐतिहासिक दस्तऐवजांचा सखोल अभ्यास केलाय. 29 जुलै 1922 रोजी बाबासाहेबांचा जन्म झालाय, तर 15 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांचं निधन झालंय.

बाबासाहेबांनी जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले

भारताच्या स्वातंत्र्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडकेंबरोबर हिरिरीने सहभागी झाले होते. बाबासाहेब पुरंदरे यांनी मुख्यत्वे ऐतिहासिक विषयांवर वर्णनात्मक लेखन, ललित कादंबरी लेखन तसेच नाट्यलेखन व जाणता राजा या नाटकाचे दिग्दर्शन केले. पुरंदऱ्यांची दौलत, पुरंदऱ्यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर साहित्य प्रकाशित झालेय.

बाबासाहेब पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मान

शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून आणि परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या 16 आवृत्ती आजपर्यंत सुमारे 5 लाख घरांमध्ये पोहोचल्यात. या पुस्तकाची 17 वी आवृत्ती 31 मार्च 2014 ला प्रसिद्ध झाली. बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने 2015 साली महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कारही दिलाय, तर 2019 साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आले. डी. वाय. पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल शरद पवार यांच्याच हस्ते त्यांना ‘डी.लिट’ ही सन्माननीय पदवी देऊन गौरविले होते












माझ्याबद्दल