गुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०

घड्याळ आणि वास्तुशास्त्र...

 

  घड्याळ आणि वास्तुशास्त्र...

आपल्या घरात असणाऱ्या अत्यंत महत्वाच्या वस्तू म्हणजे आपल्या घरातील देवघर, आपल्या घरात असणार घड्याळ, कॅलेंडर, या काही अत्यंत महत्वाच्या वस्तू आहेत. मित्रांनो आज आपण घड्याळाच वास्तू शास्त्र पाहणार आहोत.घड्याळ ही वस्तू वेळ दर्शविते. आपलं जीवन सुद्धा निश्चित वेळेमध्ये बांधलेले आहे. आणि आपली जी वेळ आहे ही वेळ आपल्या घरात लावलेल्या घड्याळाशी खूप मोठ्या प्रमाणात जोडलेली असते.

जर हे घड्याळ तुम्ही चुकीच्या दिशेला लावले असेल, तर निश्चितच नकारात्मक परिणाम त्यापासून प्राप्त होतात. अनेक जणांच्या जीवनामध्ये दुर्भाग्य आपल्या


ला दिसून येत. कोणतही काम करू द्या त्या कामा मध्ये अपयश मिळत. कितीही मेहनत करूद्या पैसा येत नाही. यालाच आपण दुर्भाग्य अस म्हणतो. मित्रांनो कदाचीत तुमचे हे दुर्भाग्य तुमच्या घड्याळाशी जोडलं असावं.

काहींच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात, कुटुंबामध्ये भांडणे लागतात, घरातील लोक एकमेकांशी वाईट वागतात. मित्रांनो याचा सुद्धा संबंध तुमच्या घरातील घड्याळाशी जोडलेला असावा. चला तर जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घड्याळ कुठे लावावं आणि घड्याळाशी निगडित अत्यंत महत्वाचे नियम आपण कसे पाळावेत.

मित्रांनो सुरुवात करूयात दक्षिण दिशेपासून…खरं तर दक्षिण दिशा ही मृत्यु ची दिशा समजली जाते.दक्षिण दिशा ही मृत्यूचा देवता यमराज यांची दिशा आहे.आणि म्हणून आपण चुकूनही या दिशेला आपलं घड्याळ लावू नका.या मूळे आपल्या घरात यमदेवाचा प्रभाव वाढू लागतो.घरातमध्ये आकस्मित मृत्यू सुद्धा येऊ शकतात.कारण ही मृत्यू ची दिशा आहे.

दुसरा परिणाम म्हणजे दक्षिण दिशा ही स्थिरत्व दिशा आहे. म्हणजे आपली जी वाटचाल आहे ती अचानक थांबते. आपली प्रगती थांबते. आपल्या वाटचालीमध्ये अनेक अडथळे येतात, अनेक समस्या येतात. तुम्ही पाहिलं असेल की चालू काम कधीकधी थांबून जात. कामामध्ये खूप सारे प्रोब्लेम्स येतात. आणि मग अपयश येत. जर आपण दक्षिण भिंतीवरती घड्याळ लावलं असेल तर त्यामुळे आपल्या घराची प्रगती थांबते. आपली वाटचाल थांबते.

मुख्य म्हणजे आपल्या घरातील कर्ता असतो मग तो पुरूष असो किंव्हा स्त्री असो तर या कर्त्या व्यक्तीसाठी दक्षिण भिंतीवर लावलेलं घड्याळ हे अत्यंत हानीकारक ठरत. या कर्त्या व्यक्तीच आरोग्य बिघडू लागत. आणि म्हणून चुकूनही आपण दक्षिण दिशेला असणाऱ्या भिंतीवर घड्याळ लावू नका. दक्षिणेप्रमाने दुसरी जी दिशा आहे ती आहे पश्चिम दिशा. पश्चिम दिशेला सुद्धा वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरातील घड्याळ लावू नका. पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा आहे. पश्चिम दिशा ही सूर्य मावळण्याची दिशा. सूर्य मावळतो म्हणजे सूर्य बुडतो अगदी त्याच प्रमाणे जर आपण पश्चिम दिशेला घड्याळ लावले असेल तर त्या मुळे आपला काळ आपली वेळ सुद्धा बुडू शकते.

वैवाहिक जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात जर आपण पश्चिम दिशेला असलेल्या भिंतीवर घड्याळ लावले तर..पश्चिम दिशा ही काळाची दिशा म्हणून ओळखली जाते. आणि म्हणून या दिशेला आपण चुकूनही घड्याळ लावू नका. काही जणांच्या घरातील घड्याळ ही बंद पडलेली असतात. एकापेक्षा ज्यास्त घड्याळ असतात.मात्र ही घड्याळ चालू स्थितीत असावीत. ती बंद पडलेली नसावीत. घरामध्ये जितकी घड्याळ आहेत ही सर्वांच्या सर्व घड्याळ एकसारखी वेळ दर्शवणारी असावी. एक घड्याळ पुढे आणि एक घड्याळ जर मागे असेल तर मित्रांनो कुटुंबामध्ये ट्रेस वाढतो. ताणतणाव वाढतो. आणि म्हणून सर्व घड्याळ समान वेळ दर्शवणारी असावीत. जी घड्याळ खराब झालेली आहेत ती तात्काळ दुरुस्त करावीत.आणि जर ती दुरुस्त होत नसतील तर ती बाहेर फेकावीत.

पुढची गोष्ट म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे सुद्धा आपण घड्याळ लावू नये.हा दरवाजा वारंवार उघडला जातो बंद केला जातो.आणि जी वस्तू वारंवार बंद किंव्हा चालू होते अश्या वस्तू च्या मागे घड्याळ लावल्याने आपल्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार होतात.परिणामी घरातील लोकांची मानसिकता खराब होते.आणि म्हणून मुख्य दरवाजाच्या पाठीमागे आपण घड्याळ लावू नये. घड्याळाच्या आकाराबद्धल सुद्धा अनेक जणांच्या मनात शंका असते. अनेक वास्तू तज्ञ अस म्हणतात की घरामध्ये गोलाकार घड्याळ असावं. गोलाकार घड्याळ अत्यंत शुभ मानलं जातं. किंव्हा जे अंडाकार घड्याळ आहे ते सुद्धा चालू शकत. मात्र चौकोनी आकाराचं घड्याळ घरामध्ये आपण चुकूनही लावू नये.

रंगांच्या बाबतीत वास्तू शास्त्र अस म्हणत की घड्याळाचा जो रंग आहे तो कधीही काळ्या रंगाची नसावी. काळा रंग हा मुळता अशुभ मानला जातो. घड्याळाच्या बाबतीत हा घड्याळ कधीही वापरू नये. जे शुभ रंग आहेत त्या मध्ये सोनेरी रंग हा शुभ मानला जातो. त्यानंतर पिवळा रंग, पांढरा रंग, आणि लाल रंग हे चार रंग घड्याळासाठी अत्यंत शुभ मानले जातात. आणि त्यातल्या त्यात सोनेरी रंग अत्यंत शुभ मानला जातो. घड्याळाचे जे काटे आहेत ते अत्यंत टोकदार नसावेत. ते सौम्य असतात तर खूप चांगले.

आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ते घड्याळ कुठे लावावं. मित्रांनो शुभ परिणाम घडून आणण्यासाठी आपण घड्याळ लावताना तीन दिशा आम्ही आपल्याला सांगत आहे. कोणत्याही दिशेला आपण घड्याळ लावू शकता. पहिली जी शुभ दिशा आहे ती आहे पूर्व दिशा. पूर्व दिशेचा वेशिष्ट म्हणजे की पूर्व दिशेला जर आपण घड्याळ लावलं पूर्व दिशा म्हणजे पूर्व दिशेला असणाऱ्या भिंतीवर जर आपण घड्याळ लावलं तर त्यामुळे वातावरण शुभ ठरत.

आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी शुभ घडू लागतात. घरातील लोकांमध्ये प्रेमाचं, आपुलकीच वातावरण निर्माण होत. वैवाहिक जीवनात प्रेम वाढीस लागत. आणि म्हणून पूर्व दिशा ही सुखाची दिशा आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणणारी दिशा आहे. दुसरी जी दिशा आहे ती आहे उत्तर दिशा ज्यांना व्यवसायात, नोकरीत प्रचंड प्रगती करायची आहे. ज्यांना भरपूर धनसंपत्ती हवी आहे त्यांनी उत्तर दिशेला घड्याळ लावावं. कारण उत्तर दिशेला लावलेलं घड्याळ हे आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे वेगवेगळे मार्ग निर्माण करतात.आपल्याला अनेक संधी चालून येतील.

तिसरी जी दिशा आहे ती आहे ईशान्य दिशा..इशान्य म्हणजे पूर्व आणि उत्तर यांच्या मधील दिशा..तर या दिशेवर आपण घड्याळ लावलं तर आपल्या घरातील जो पैसा आहे तो विनाकारण खर्च होत नाही. पैसा घरामध्ये टिकून राहील. लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि कंमेंट करा…



टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

बुधवार, ३० डिसेंबर, २०२०

*रतन टाटा यांची खूपच सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट* 🚀


*रतन टाटा यांची खूपच सुंदर आणि प्रेरणादायी गोष्ट* 🚀

एका सुप्रसिद्ध उद्योगपतीची ही कहाणी अाहे. एक दिवस हा उद्योगपती सकाळी तयार होऊन कामाला जाण्यासाठी निघाला होता. तेवढ्यात त्याच्या समोर घरमालक येऊन उभा राहिला.
 *"आज कसं येणं झालं ?"* उद्योगपतीने त्या माणसाला विचारले. कामाच्या नादात तो विसरून गेला होता की, समोर त्याचा घरमालक उभा आहे.घरमालक विनम्रपणे म्हणाला, "मी भाडं वसूल करायला आलो आहे. दर महिन्याला तुम्ही पाठवता. यावेळेला कामाच्या गडबडीत राहन गेलेलं दिसतं." उद्योगपती वरमला. म्हणाला, "हे घ्या तुमचं घरभाडं. उशीर झाल्याबद्दल
क्षमा करा." एवढे बोलून उद्योगपतीने खिशात हात घालून पैसे काढले व
घरमालकाला दिले.घरमालक   उद्योगपतीला म्हणाला, 

 *तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून भाड्याच्या घरात राहता याचे मला आश्चर्य वाटते.*"
 उद्योगपती हसला व
म्हणाला, "मी कोण आहे यापेक्षा मी कसा आहे याला महत्त्व आहे. माझ्या
काही तत्त्वांमुळे मी भाड्याच्या घरात राहतो." घरमालक काही समजला नाही.तो भाडे घेऊन निघून गेला.
हा प्रसंग त्या उद्योगपतींचा ड्रायव्हर पाहत होता. उद्योगपती गाडीत बसले व आपल्या परदेश प्रवासासाठी तिकीट काढायला एका एअरलाईनच्या  ऑफिसात गेले. तिथे बरीच गर्दी होती. उद्योगपती एका सामान्य माणसासारखे रांगेमध्ये उभे राहिले, तेवढयात एअरलाईनच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले, ते घाईने पुढे आले आणि म्हणाले, 
*"सर, तुम्ही रांगेत का उभे आहात?*
 आम्ही तुमचे तिकीट काढून तुम्हाला आणून देतो. तुम्ही समोरच्या सोफ्यावर आरामात बसा तम्ही एवढे मोठे उद्योगपती, रांगेत उभे राहन आम्हाला लाजवू नका.
उद्योगपती म्हणाले, "आत्ता मी उद्योगपती म्हणून इथे उभा नाही, तुम्ही एवढी धावपळ करण्याची आवश्यकता नाही. उद्योगपती है माझ्या नावासमोर लावलेले विशेषण आहे. 
*मी कोण आाहे यापेक्षा मी कसा आहे?*
 हे अधिक महत्त्वाचे आहे. एअरलाईनचा स्टाफ हे उत्तर ऐकून चकित झाला. तिकीट काढून उद्योगपतीअपल्या ऑफिसकडे निघाले. रस्त्यात त्यांना अनेक माणसे धावतपळतआपापल्या कार्यालयाकडे जाताना दिसली. त्यांना लाज वाटली की, आपण एवढ्या अलिशान गाडीमधून एकटे प्रवास करीत आहोत. सामान्य माणसे मात्र किती कष्टाने ऑफिसला पोहोचतात. त्या दिवसापासून त्यांनी आपल्या गाडीत लोकांना लिफ्ट द्यायला सुरुवात केली. लिफ्ट मिळालेल्या लोकांचा आनंद पाहून उद्योगपतींना समाधान वाटायचे.
ज्या दिवशी उद्योगपती परदेश प्रवासासाठी निघाले, त्या दिवशी आणखीन एक प्रसंग घडला. हवाई सुंदरीच्या हातून त्यांच्या अंगावर चुकून पेय पडले.त्यामुळे ती घाबरली. तिने पाणी व कपडा आणून त्यांचा ड्रेस स्वच्छ केला.ती त्यांना ओळखत असल्याने तिने शतदा त्यांची क्षमा मागितली. तिला भीती वाटत होती की, या चुकीबद्दल तिला शिक्षा घडणार उद्योगपतींनी तिच्याकडे पाहिले व तिला विचारले, "तू माझ्या अंगावर काय सांडलेस ?'"
हवाई सुंदरी भीत भीत म्हणाली, "माझ्या हातून तुमच्या कपड्यांवर फळांचा रस सांडला, मला क्षमा करा.
उद्योगपती हसले व म्हणाले, "पुढच्या वेळेला माझ्या अंगावर सोडा,व्हिस्की
सांड, उद्योगपतींचे बोलणे ऐकून हवाई सुंदरी खुदुकन हसली. तिच्या मनावरचा सगळा ताण एका क्षणात उतरला.
असे अनेक प्रसंग उद्योगपतींच्या ड्रायव्हरने पाहिले व ऐकले. त्याची उत्सुकता चाळविली गेली. तो उद्योगपतींना म्हणाला, 

*"साहेब, तुम्हाला इतके साधे राहणेव वागणे कसे काय जमते ?* 

आम्ही तर अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतो. तुम्ही एवढे मोठे उद्योगपती असून तुम्ही किती साधे जगता??.
उद्योगपती म्हणाले, "अरे, मी पण लहान असताना फार उद्दाम होतो. मला सांभाळायला एक गव्हर्नेस होती. एकदा माझ्या मनाविरुद्ध काही घटना घडली तेव्हा मी तिला चक्क लाथ मारली होती. ते पाहून माझे वडील एवढे संतापले होते की, त्यांनी मला बदडून काढले. ते मला म्हणाले होते,

 *"तू कोण आहेस हे बिलकूल महत्त्वाचे नाही; पण तू कसा आहेस हे फार महत्त्वाचे आहे."*

 आयुष्यभर माझे हे वाक्य स्मरत राहा.
तेव्हापासून मी वडिलांचे शब्द स्मरत आलो आहे. मला हे पटले आहे की,
खरोखरच आपण कोण आहोत हे महत्त्वाचे नसतेच. आपण कसे आहोत यावर आपली किंमत ठरते. जगात जेवढे थोर पुरुष होऊन गेले, सगळे साधे होते.'या *उत्तुंग *उद्योगपतीचे नाव रतन टाटा होते.* खरंच, जगात जेवढी उत्तुंग
माणसे होऊन गेली ती सगळी बोलायला, वागायला अत्यंत साधी कुठलीही गुंतागुंत नसलेली अशी असतात. खरेतर साधे राहणे, हेच कठीण असते. व्यक्तींच्या जीवनाचे आपण अनुकरण करायला हवे.

 

सोमवार, २८ डिसेंबर, २०२०

द्धिमान लोकांच्या संपर्कात राहीलो तर आपणही निश्चितच बुद्धिमान होवु शकतो

 *प्रख्यात विद्वान आइनस्टाइन च्या ड्रायव्हरने एकदा आइनस्टाइन यांना म्हटले की--"सर मी आत्तापर्यंत आपल्या प्रत्येक सभेत बसुन आपली सगळी भाषणं पाठ केली आहेत"*


*हे ऐकुन आइनस्टाइन हैराण!!*

*ते म्हणाले ठीक आहे, आता आपण ज्या सभेसाठी जात आहोत तेथील आयोजक मला ओळखत नाहीत, तेथे माझ्या ऐवजी तु बोल मी तुझा ड्राइव्हर म्हणुन बसतो*

*झाले सभेमध्ये ड्राइव्हर स्टेजवर गेला आणि त्याने भाषणाला सुरवात केली*
*उपस्थित सर्वांनी खुप टाळ्या वाजवुन त्याला प्रतिसाद दिला*

*पण त्याच वेळेस तेथे उपस्थित एका प्रोफेसरने त्याला विचारले की-सर आपण आत्ता सापेक्षता ची जी परिभाषा सांगितली ती परत एकदा व्यवस्थित समजुन सांगता का ?*

*खाली ड्राइव्हर म्हणुन जे खरे आइनस्टाइन बसले होते त्यांना वाटले आता चोरी पकडली जाणार...*


*परंतु स्टेजवरील ड्राइव्हरचे उत्तर ऐकुन ते हैराण झाले..*

*ड्राइव्हरने त्या प्रोफेसरला उत्तर दिले की-इतकी सोपी गोष्ट आपल्याला कळाली नाही!!!*

*काही हरकत नाही ही गोष्ट तुम्ही माझ्या ड्राइव्हरला विचारा तो पण तुम्हाला समजुन सांगेल*

*नोट:-जर आपण नेहमी बुद्धिमान लोकांच्या संपर्कात राहीलो तर आपणही निश्चितच बुद्धिमान होवु शकतो ,पण आपली उठबस जर मुर्ख लोकांसोबत असेल तर आपली बुद्धी सुद्धा त्यांच्यासारखी होवु शकते....*

माझ्याबद्दल