या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०
एक प्रेरणास्रोत : राधाकृष्ण दमानी...
एक प्रेरणास्रोत
एकीकडे कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातलेला असतानाच, तिकडे एका संस्थेने सर्वाधिक श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध केली. पहिल्या क्रमांकावर कोण असेल ? याची कल्पना आपल्याला असेलच. पण, मि. व्हाईट नावाने प्रसिद्ध व्यक्ती दुसऱ्या क्रमांकावर विराजमान झाली आणि सर्वच चकित झाले. कोण हा मि. व्हाईट ? काय त्याचा संघर्ष जाणून घेऊ आजच्या भागात. चला तर मग.
1954 साली राजस्थान मधील बिकानेर येथे एका सर्वसामान्य मारवाडी कुटुंबात मि. व्हाईट चा जन्म झाला. मारवाडी कुटुंबात जन्माला आलेला असल्यामुळेच लहानपणापासूनच त्याच्यावर व्यवसायच करण्याबाबतचे संस्कार झाले. त्यामुळे शिक्षणात तो जेमतेमच राहिला. बारावी पास होऊन पदवीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. अचानक एकेदिवशी वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले.
अगदी कमी वयातच त्याने आपल्या भावाबरोबर काम करायला सुरुवात केली . काही दिवसांत त्याने स्वतःचा नवा व्यवसाय सुरू केला. पण, तो तोट्यात जावू लागला. त्यामुळे लवकरच तो व्यवसाय बंद करावा लागला. त्यावेळी तो 32 वर्षांचा होता.
याच कालावधीत त्याने पुन्हा आपल्या भावासोबत कामाला सुरुवात केली. आता तो शेयर मार्केट मध्ये ट्रेडिंग करू लागला. हे काम करतानाच तो स्वतः देखील शेयर खरेदी करू लागला. प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेवून शेयर बाजारात पैसे गुंतवू लागला. मोठ्या संयमाने छोटी-छोटी गुंतवणूक, मोठ्मोठ्या कालावधीसाठी करू लागला. असे करता करता 1999 सालं उजाडलं. तोपर्यंत तो करोडपती बनला होता. आता त्याने एका नवीन व्यवसायात पदार्पण करायचे ठरविले.
आपला पहिला व्यवसाय डबघाईला आला म्हणून मि. दमाणी यांनी प्रयत्न करणे सोडले नाही. खरंतर "पुन्हा एकदा प्रयत्न करणं. हेच यशाचे गमक आहे." मि. दमाणी यांनी दुसऱ्या 'आणखी एकदा प्रयत्न करण्याच्या' मार्गाने वाटचाल केली. "आपल्या यशाच्या शेयर बाजाराने आयुष्यभरात ला उचांक गाठावा. असे वाटत असेल. तर, आजपासून नव्हे तर आतापासूनच कष्टाची गुंतवणूक करा." नेमका हाच संदेश मि. दमानी यांच्या जीवन प्रवासातून मिळतो.
मि. दमानी भारतातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.
- by Internet
बुधवार, १८ नोव्हेंबर, २०२०
*🔥डेनिस डिडरोट इफेक्ट🔥*
*🔥डेनिस डिडरोट इफेक्ट🔥* *रशियात डेनिस डिडरोट* नावाचा एक अभ्यासू वाचक होता. *इ.स. 1765 मध्ये त्याचे वय जवळ पास 52 वर्ष* होते. त्याने खूप ग्रंथ वाचले होते. *त्याचे स्वत:चे मोठे ग्रंथालय* होते. त्याचे संपूर्ण आयुष्य वाचनात; पण गरिबीत गेले. मुलीच्या लग्नासाठी सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते. इतका तो गरीब होता. त्या वेळी *रशियाची राणी कँथरीनला डेनिस डिडरोटच्या* गरीबीबद्दल कळले. तिने *डिडरोटला* त्याच्याकडील *लायब्ररी विकत घेण्यासाठी 1000 GBP, म्हणजेच 50 हजार डॉलर्स म्हणजे; आजचे जवळपास साडेतीन कोटी रुपये डिडरोटला* देऊ केले. *डेनिस डिडरोटने मान्य केले व त्याने आपले ग्रंथालय विकून टाकले*. *डेनिस डिडरोट एका दिवसांत खूप श्रीमंत झाला*. त्याने त्या पैशातून लगेच *'स्कार्लेट रॉब'*; म्हणजे एक उच्च प्रतीचा व महाग असा पोषाख खरेदी केला. हा सदरा वापरत असतांना त्याला वाटले की; आपण उच्च प्रतीचा पोषाख घालतोय; पण आपल्या घरात मात्र तशा उच्चप्रतीच्या वस्तू नाहीत. मग त्याने हळूहळू घरातल्या वस्तू बदलल्या. किचन रूममधल्या वस्तू बदलल्या. फर्निचर बदलले. सगळं काही नवं नवं. आता त्याचं संपूर्ण घर आणि पोषाख दोन्ही ही शोभून दिसत होते. परंतु हे सगळं केल्याने तो पुन्हा कंगाल झाला आणि कर्ज ही वाढत गेले. मोठ्या दु:खाने डेनिस डिडरोटने हे सहन केले आणि मग त्याने हे सगळे अनुभव आपल्या एका निबंधांत लिहून ठेवले. यालाच *मानस शास्त्रातील 'डिडरोट इफेक्ट' (Diderot Effect)* म्हणतात. *भारतातले मोठे उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स, डेव्हलपर्स पुढारी सुद्धा; या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने अवलंब करतात. याचे निरीक्षण आपण स्वत: बद्धल करून पहाण्यास हरकत नाही. कसे? समजा आपण *महागडे कपडे घेतले; तर त्याला मॅचिंग घड्याळ, पेन, बूट, गाडी.... इ. घेणार*. घरात *मोठा टी.व्ही*. आणला की *चांगला टेबल, फर्निचर, HD वाहिन्या सुरु करणार*. घराला *नवा रंग लावला की त्याला मॅचिंग पडदे लावून सजावट करणार*. समजा आपण पन्नास हजार रूपयांचा मोबाईल घेतला; तरी आपल्याला आणखी काहीतरी कमी आहे असे वाटते. मग अजून 600 रुपयांचा गोरील्ला ग्लास लावणार. दर महिन्याला 500 रुपयांचे कव्हर बदलणार. शंभर रुपयांचा हेडफोन चालला असता; पण अडीच तीन हजाराचा हेडफोन घेणार. कारण या मोबाईलला स्वस्त शोभून दिसत नाही. हे सर्व कशासाठी? इतरांवर इंप्रेशन मारण्यासाठी. यालाच म्हणतात *'डिडरोट इफेक्ट'* थोडक्यात सांगायचे तर; एक नवीन वस्तू विकत घेतली की; तिच्यामुळे दुसऱ्या वस्तूंचा दर्जा आपोआपच कमी होतो; आणि तो वाढविण्यासाठी आपण आणखी जास्त खर्च करीत जातो. *सर्वच उद्योजक, व्यापारी, ट्रेडर्स या 'इफेक्ट'चा* छुप्या पद्धतीने वापर करतात. एक laptop विकत घेतांना त्यासोबत हजार दोन हजाराचा antivirus टाकून देतो. हजार बाराशेचं कव्हर घेतो; ज्याचा क्वचितच वापर केला जातो. *कुंडी वा फुलझाड विकत घेतलं की; सोबत शे दोनशे रुपयाचे खत* माथी मारलं जातं. लग्न समारंभात तर या प्रदर्शनाची चढा ओढ लागलेली दिसून येते. अशी असंख्य उदाहरणे आहेत. *आपण एक वस्तू घ्यायला गेलो की; दुसऱ्या वस्तू आपोआपच घेतो; गरज नसली तरी*. अशा पद्धतीने आपण एक एक वस्तू घेऊन अनेक अनावश्यक किंवा फारशा महत्वाच्या नसणाऱ्या वस्तू घेत असतो; आणि ते आपणास कळत सुद्धा नाही. यालाच *'spiraling consumption'* म्हणतात. म्हणजे; एका वस्तूमुळे दुसऱ्या वस्तूची गरज वाटणे आणि ती विकत घेणे. हाच तो *'डिडरोट इफेक्ट'* (Diderot Effect) होय. ही सामान्य *मानवी प्रवृत्ती* (human tendency) आहे. या प्रवृत्तीचे परिणाम भयानक होत असतात; पण ते उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. आपण *नकळतपणे अनावश्यक खर्च* करत जातो. काही लोकांच्या हे लक्षात येतं; तर काहींच्या लक्षात खूप उशिरा लक्षात येतं पण अनेकांच्या हे लक्षातच येत नाही. म्हणून ते खूप खर्च करीत असतात. माणसाला *खर्च करताना भीती वाटत नाही*; पण नंतर *हिशोब लागत नाही*; तेव्हा त्याचा त्रास होतो. म्हणून कोणतीही वस्तू खरेदी करताना; *या वस्तूची मला कितपत गरज आहे?* असा स्वत:च स्वत:ला प्रश्न विचारावा. विचार करून त्याचं *उत्तर जर होय आलं तरच ती वस्तू खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा*. असा निर्णय घेतल्यावर त्या *वस्तूचा दर्जा आणि किंमत वाजवी आहे कां*? याचा विचार करून मिळेल त्या किंमतीत न घेता ती वाजवी किंमतीत घेण्याचा प्रयत्न करावा. दुकानदार एक वस्तू समोर ठेवतो; लगेच तो दुसरी वस्तू दाखवून संभ्रम निर्माण करतो. तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की; ती वस्तू कितीही चांगली असली; तरी तिचा आपल्या उपयोगितेशी व आनंदाशी काही संबंध नसतो. तो आनंद क्षणिक असतो. कालांतराने तो आनंद ही संपतो आणि पैसे ही जातात. म्हणून या प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज आहे. पण त्यासाठी स्वतःच प्रयत्न करावा लागतो. संदर्भ : *'डिडरोट इफेक्ट'* (Diderot Effect) *Understanding the 'Diderot Effect' and how to overcome it?* |