मंगळवार, १९ मे, २०२०

अमिताभ - पुनरागमन ...

1995/96 च्या सुमारास श्री अमिताभ बच्चन यांनी ABCL नावाची कॉर्पोरेट कंपनी काढली. Miss world ची management चुकली व ABCL bankrupt झाली व या कंपनींवर बँकांचे कर्ज चढले. आणि अमिताभ बच्चन हे नांव सोडल तर अमितजी कर्जात बुडाले..अशी महाभयंकर परिस्थिती जी covid 19 नंतर कईक माणसांना face करायला लागणार आहे ती अमितजींनी 1995/96 मधेच अनुभवली.

*How Mr. Amitabh Bachchan Restructured Himself -*


1)वास्तविक अमितजी मोठ्या पडद्यावरचे महानुभाव व महानायक पण त्यांनी प्रथम Ego सोडुन, समोरच्या गल्लीत यशराज बंगल्यात यश चोपडाजींना भेटायला गेले. व चित्रपटात काम करण्याची संधी द्यावी ही विनंती केली. यशजी व अमिताभजी यांचे वर्षानुवर्षे असलेले ऋणानुबंध त्यांनी मोहबते साठी अमितजींना साईन केल.व आपल्या वयानुसार भुमिका करण्याचा निर्णय घेतला. आपला prime संपला आहे हे समजुन वयाला शोभतील अश्या characters करायला सुरवात केली. Restructuring करतानाचे पहिल पाऊल.


2) आपल माध्यम बदलल.
खान मंडळी established झाली होती तेव्हा Amitji नी आपल माध्यम बदलल. 1992 Economy opened झाली होती व त्याचे शुभपरिणाम हे 2000 च्या आसपास दिसायला सुरवात झाले होते व private channels आपल्या कडे स्तिरावले होते व अश्या वेळी अमितजींनी आपल माध्यम बदलल व star plus वर KBC करायच ठरवल. KBC was super duper hit. अमितजी घराघरात पोहचले व एका वेगळ्याच उंचीवर. त्यांनी आपली सगळी कर्ज फेडुन टाकली व नवीन माध्यमातून पुन्हा स्वतःला Restructured केल.
थोडक्यात मोठ्या पडद्याची अपेक्षा न ठेवता, छोट्या पडद्यावर जिथे एक मोठी " Anchoring" ची space होती ती भरुन काढुन स्वतःला financially restructured केल.
थोडक्यात आपण सुद्धा व्यवसायच माध्यम बदलाव पण ते शक्य नसेल तर Tiny गोष्टीच कराव्यात. लहान लहान tiny projects करावे.

3) जस मी वर म्हटल्याप्रमाणे 2000 open Economy चे चांगले परिणाम दिसायला लागले होते. श्री अमितजींनी advertising products endrose करायला सुरुवात केली. Cadbury, pespi, नवरतन, अश्या बर्‍याच product चे Brand Ambassador झाले. कुठे चित्रपटातील एकेकाळाचे महानायक हा Ego न ठेवता चांगल्या कंपनीच्या products नी स्वतःला opened up केले व त्यामुळे अमितजींना असंख्य options निर्माण झाले. Trust च दुसर नांव हे श्री अमिताभ बच्चन हेच वाटायला लागल. Trust हा जगातील सगळ्यात मोठा selling point आहे. अमितजींनी ते सिद्ध केल. कॅडबरी ची गेलेली विश्वासार्हता केवळ श्री अमिताभ बच्चन यांच्या मुळे परत आली. गेल्या 20 वर्ष वयाला शोभतील असे चित्रपट, advertising च माध्यम अश्या रितीने स्वतःला restructured केल.

*Can Mr. Amitabh Bachchan's strategy applicable to post covid - 19*.

Yes,surely. 22 मार्च पासुन आपण lockdown मधे आहोत. एक गोष्ट आपल्या सगळ्यांना कळली व ती म्हणजे शैक्षणिक व मेडिकल खर्च सोडला तर without चैन आपण घरामधे राहु शकतो.
" साध जगण्यासाठी जास्त पैश्याची गरज नसते." but that doesn't mean people should stop thinking big. No, we can still do the big things by changing our mediums. आता कुठलीही undue Risk न घेता "survival mod" वर स्वतःला टाकायच. जस अमितजींनी स्वतःला " चरित्र अभिनेता" या मोडवर टाकल अस. म्हणजे" survival mod" वर टाकल व ते करुन ते नुसते तरुन नाही गेले तर त्यांनी जी उसळी मारली ती एक " उत्तुंग भरारी" ठरली...

Survival मोड, time being basics चा विचार करायचा.. Covid 19 मुळे आपण पुन्हा basics वर गेलो आहोत.. आता या परिस्थितीत आपण survived होण आवश्यक.. पुनश्च ग म भ न करायला लागेल अशी काही ठिकाणी परिस्थिती असणार आहे. पण या survived मोड वर एकदा आपण व्यवस्थित उभ राहिलो की मग आपल्याला पुढचा प्रवास माहीती आहे. श्री अमितजींनी त्यावेळी मी महानायक हा आविर्भाव न ठेवता तस बघायला गेल तर जे जे चांगले काम मिळेल ते श्री अमितजी करत गेले. कुठली संधी फुकट घालवली नाही.. त्यावेळी survival मोड पार चांगल्या products च brand Endorsements केल, कारण त्यांना प्रथम survived व्हायच होत. ते झाले. . याचा अर्थ मोठ्या गोष्टी व मोठी स्वप्ने बघायची नाहीत का? .. नक्की बघायचीच पण त्यासाठी आधी survived होण अत्यंत आवश्यक आहे.
सिग्नल रेड आहे, तो ऑरेंज होईल व नंतर तो green येईलच..
Economy चा चांगला काळ 100% येणार आहे फक्त आज आपल्याला या covid - 19 मधे वाचायच आहे. जरा tolerance व patience दाखवायचा आहे. नंतर संधीच संधी आहे व प्रत्येक संधी आपल्याला कशी मिळेल हे प्रत्येकाने बघायच.. अमितजींनी येणारी प्रत्येक "संधी उचललली". लहान लहान brands पकडले तर त्या काळी अमितजी 15/20 brands endorsement करत होते... आपल्याला सुद्धा येणाऱ्या प्रत्येक संधीचा उपयोग करुन घ्यायला लागेल.. In every crisis there is a Hidden opportunity, फक्त ती ओळखता आली पाहिजे. US /EU हे भारता कडे चीनला पर्याय म्हणून बघत आहेत हे म्हणजे " संधींची मालगाडीच" आपल्या कडे येत आहे. बस्स आपण आधी survived होऊ या व मग दिसणार्‍या संधींच सोन करुया.

Late90's or early 2000 मधे एक Anchoring ची space होती. ज्याला Anchoring मधल " उत्तुंग" अस काहीही नव्हत की people could follow as an ideal or ज्याला बघुन example set होईल.. बरोबर ती space श्री अमितजींनी भरुन काढली. संधी होती अस नाही तर " संधी शोधुन स्वतःची एक जागा निर्माण केली" आपल्याला सुद्धा संधी शोधायला लागेल. Its going to be positive research for opportunities. व त्या opportunities आहेत फक्त त्या शोधुन त्यावर फोकस करण आवश्यक असेल.














By_unkown

सोमवार, ११ मे, २०२०

*मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल.. हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं

*मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल.. हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं*

 ते सांगतात कि *मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.* अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत. विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते.
 *हायब्रीड अन्न खाऊन आपल्या शाररीक क्षमतेचा विकास, मानसिक क्षमतेचा विकास होत नाही हे आता विज्ञानानं सिद्ध केले आहे.*
 मात्र जगण्याच्या स्पर्धेत आपण हरवून बसलोय. मात्र पुढील पिढीला अतिशय कुमकुवत करीत आहोत. शाररीक क्षमता नसल्याने मानव आपली पुढील पिढी वाढवू सुद्धा शकणार नाही असे भाकीत होत आहेत. आपण बारकाईने पाहिल्यास अलीकडील काळात अनेक डाळिंब बागायतदार मधमाश्याच्या पेटांच्या शोधात असतात कारण कि *डाळींब असे झाड आहे कि याचे परागीभवन फक मधमाश्याच करू शकतात. जर मधमाश्या नसतील तर डाळिंब फुलांचे रुपांतर फळात होतच नाही कारण याची नर व मादी फुले वेगवेगळी असतात आणि मग मधमाश्या एका फुलामधील नर उचलून मादी फुलावर सोडण्याचे महत्वाचे काम करतात. आणि फक्त माधामाश्याच हे काम करू शकतात, हे आजच्या जगाला समजले आहे. मात्र *मधमाश्यांना काय आवडते हे आपण शिकत नाही, तिला पोळे करायला कुठली झाडे आवडतात, पराग व मकरंद गोळा करायला कुठली झाडे आवडतात.*

आपल्यापैकी बहुतेकजन हिमालयात जातात मात्र हिमलायात मनालीच्या पायथ्याशी अनेक गावे आहेत कि जिथ अगदी २०० वर्षेपूर्वी पासून मधमाशी पालन करीत आहेत, मात्र हे कधीच पाहत नाहीत, खरतर आपल पर्यटन हे शाश्वत व ग्रामीण भागाला उर्जा देणार असले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. अर्थात मधमाशी पालन २०० वर्षपूर्वी ते पण शास्त्रीयदृष्ट्या पालन केल्याचे आढळून येते. आपल्या राहत्या घरात मधमाश्या पालन करीत आहेत आणि दरवर्षी १० किलो मध विकतात आणि ३ किलो  मध स्वतःसाठी ठेवतात. मात्र खरतर हे करण्यापाठीमागे उद्धेश परागीभवन हा असून अनेक पिके यावर अवलंबून आहेत. आणि हे सगळ त्या मधमाश्यांनी सुद्धा स्वीकारले आहे. यात ही माणस त्यांना अति थंडीत गुळाचा व साखरेचा पाक करून ठेवतात काहीजण तर गोळा केलेला मधसुद्धा ठेवतात. 
आपल्याला वाटत आपणच शेती करतो मात्र मुंग्या, मधमाश्या, कीटक, गांडुळे, साप, पक्षी असे सर्वच जीव शेतकऱ्याला शेती करण्यासाठी मदत करीत असतात. यात सर्वात आघाडीवर मधमाश्या आहेत हे विसरून चालणार नाही कारण फुलांचे फळात रुपांतर करण्यात मधमाश्या पटाईत असतात, त्यांच्याशिवाय दुसरे किटक हे काम करूच शकत नाहीत, अगदी डाळिंब, काकडी, सफरचंद अशी अतिशय महत्वाची फळे. आपण फक्त जगात मधमाश्या आहेत तोपर्यंतच करू शकतो हे वेळीच जगाने लक्षात घेणे गरजेचे आहे.   मधमाश्याची बदलती जीवनशैली यावर अनेक बाबी समोर येत आहेत, यात १९९० मध्ये साध मधमाश्यांच पोळ हे फक्त काटेरी झाडावर बसायची यात *साधी बाभूळ, बोर* ही झाड महत्वाची होती, मात्र आजच्या काळात हीच पोळी काटेरी झाड सोडून जांभूळ, आंबा अश्या सहज शिकार होईल अश्या झाडांवर शिवाय घरात, भिंतीवर दिसू लागली, हा अतिशय महत्वाचा बदल दिसून येत आहे.  हा बदल करण्यापाठीमागे कारण सुद्धा असेच आहे की, *आजकाल बोरी व बाभळी तोडण्याचे प्रमाण भयानक वाढत गेले आणि वास्तवात तर आता बोरी व बाभळी दुर्मिळ होत गेल्या, पर्यायाने त्यांनी आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात बदल करीत नवे पर्याय स्वीकारला केवळ माणसांच्या चुकामुळेच..*

आगी मधमाश्या तर जंगलातील उंच झाड कमी होत गेली शिवाय, नैसर्गिक पाणवठे कमी होत गेले, ज्यात या मधमाश्या सहज मातीत उतरून गाळात पाणी पिऊ शकत होत्या, आता हे पाणवठे नष्ट झालेत, यात काही वन अधिकाऱ्यांनी तर पर्यटकांना वाघ दिसावा म्हणून जंगलातील नैसर्गिक पाणवठे नष्ट केले आणि आता नवीन पाणवठे रोडलगत तयार करून वाघ दिसावा अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र यात सिमेंटच्या टाक्या बांधल्याने त्यात मधमाश्या पाणी प्यायला उतरतात आणि बुडून मरतात. असे हे व्यवस्थापन कसे जंगल वाढविणार.
यात या माश्यांनी आपला नैसर्गिक अधिवास बदलून इमारती, मंदिरे अश्या जागा निवडून लोकवस्तीत प्रवेश केला. कारण पाणी सहज मिळू लागले शिवाय उसाची रसवंती हे सुद्धा महत्वाचे आहे कारण यात त्यांना उन्हाळ्यात गोड रस मिळत असतो.
आजकाल शिकलेल्या लोकांना मधमाशी काय करू शकते याच महत्त्व राहिलेले नाही. मात्र शेतीत अडचण आली की मग आपण सर्व पर्याय शोधत असतो.
मी पोस्ट ग्रॅज्युएशन करताना एकजण  मित्र झाला होता,  त्याने सध्या पॉली हाऊस करून आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली. अर्थात शेती घेतली त्यावेळी शेतीच्या बांधावर बोर, बाभूळ, जांभूळ, आंबा, शेवगा, भोकर, रुई अशी विविध झाड बांधावर होती. मात्र इतरांचे ऐकून सर्व झाडे तोडली आणि जास्त पाणी पिणारी नारळाची झाडे बांधावर लावली, यात शेतीची जैव विविधता झपाट्याने कमी झाली हे लक्षात आलेच नाही.
आता खरी गंमत अशी आहे की, लॉकडाऊन मध्ये अनेक बिझी मित्र free झाले व त्यांचे फोन आले तसाच त्याचा पण फोन आला की, व तो सांगू लागला पॉली हाऊसमध्ये काकडी लावली आहे आणि खूप मोठी पिवळी फुल येत आहेत, आणि जळून जातायेत शिवाय काकडी अंगठ्या एवडीच राहतेय, काय कराव लागेल, म्हणून मी नैसर्गिक शास्वत शेतीचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की या काकडीचे परागीभवन होत नाही कारण या फुलात आत शिरून परागीभवन कोणीही करत नाही, त्यामुळे त्याचे पराग फुटत नाहीत आणि मग फुल जळून जात आहेत, मग यावर उपाय म्हणजे मधमाश्याच जगात हे काम करू शकतात, खटपट करून मधमाश्यांच्या पेट्या आणल्या  आणि त्याच रात्री दोन पेट्या पॉली हाऊसच्या तोंडाजवळ ठेवल्या. सकाळी लवकर मधमाश्यांनी आपले परागीभवनाचे काम सुरु केले. मग ७ दिवसांनी १ क्रेटऐवजी आता ६ क्रेट काकड्या तोडल्या आणि शिवाय टवटवीत माल सापडला, २० किलोची वाढ १५ पटीने उत्पन्न वाढले. याचा टक्केवारीत अर्थ काढायचा असेल तर १५०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. माझा मित्र सहज म्हणाला शिक्षणात कधी अस शिकवलं जात नाही, यापुढे मात्र पर्यावरण पूरक वृक्षारोपण करणार असल्याचे स्पष्टपणे बोलून दाखविले. अगदी *शेतीच्या बांधावर बोरी, बाभळी, करंज, भोकर, उंबर, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ* अशी जैव विविधता पूरक झाडे लावणार असे कबूल केले. अनेकजण सांगतात झाडांची सावलीमुळे पिकांना फटका बसतो मात्र हे खोटं असून आपली स्थानिक झाडांच्या पानांचे खतात लवकर रुपांतर होते, शिवाय सावलीमुळे काही फरक पडत नाही, मात्र यात परदेशी निलगिरी, गुलमोहर आणि नारळ झाडे बांधावर असल्यास भूजल पातळी झपाट्याने खोलवर जाते आणि यांची पाने जमिनीवर पडल्यास जमीन नापीक होत असते. त्यामुळे *फक्त स्थानिक झाडेच* शेतीच्या बांधावर लावली पाहिजेत.   काकडीचे परागीभवन करताना मधमाशी फुलात शिरून परागीभवन करीत असते. आणि मग काकडीचे वेलींची वाढही झपाट्याने होत असते, याचा अर्थ वेलीची वाढ जोरात होते आणि उत्पादन क्षमता वाढते ती पण कित्येक पटीने...काहीजण दिवसा कीटकनाशक फवारतात आणि मग मधमाश्या मारतात. यावर उपाय म्हणजे रात्री मधमाश्यांनी आपले परागीभवन काम थांबविले की फवारणी करावी जर गरज असेल तरच.. अगदी ज्येष्ठ निसर्गतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी नागझिरा येते सांगितले की, जंगलात अस्वले मधमाश्यांची पोळी व मध आवडीने खातात, त्याच्या भाकरी करतात त्या करताना झाडांची पाने टाकतात आणि मग त्या सर्व भाकरी गुहेत ठेवतात कारण त्यांच्या पिल्लांसाठी उपयोगी येतील, मात्र काहीवेळा या भाकरी चोरायला आदिवासी लोक येतात आणि मग अस्वले हल्ले करतात मात्र अस्वलाचा हल्ला म्हणजे जगात सर्वात वाईट चेहरा होतो, कारण त्याची एक चापट म्हणजे चेहरा विद्रुपीकरणच. मात्र एकदा त्यांनी एक अस्वल झाडावर चढत असल्याचे पहिले, ते झाडावर मधमाशी पोळे खाण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर गेले आणि वरून खाली पडले आणि मेले याचा अर्थ असा आहे की , त्या मध्यामाश्याच्या पोळ्यावर अनेकदा अस्वल हल्ले झाले होते आणि मग त्या पोळ्यातील राणीने आपल्यात बदल करीत झाड फांदी ऐवजी अस्वल आल्यावर फांदी सहज तुटेल अश्या फांदीवर आपले पोळे केले आणि यावर कायमस्वरूपी आगी माश्यांनी उपयायोजना केली. ज्या प्रजाती बदलायला शिकतात त्याच निसर्गात टिकतात आता वेळ आहे मानवाला बदलायची, जर आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला नाहीतर आपणसुद्धा संपणार यात शंकाच नाही, हे विशेष लक्षात घेणे आवश्यक आहे.


*आज कोरोना च्या रूपाने धोक्याची घंटी वाजली आहे वेळीच सुधारणा बदल नाही केला तर मानवी जीवन संपायला वेळ लागणार नाही !*

माझ्याबद्दल