Authored by म. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स | Updated: Jun 8, 2022, 12:37 PM
या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
मंगळवार, २८ जून, २०२२
...तर नाशिक बनले असते भारताची राजधानी; पण नाशिकला विरोध कोणी अन् का केला?
साठे खत आणि खरेदी खत : फरक लक्षात ठेवण्यासारखे...
साठे खत आणि खरेदी खत : फरक लक्षात ठेवण्यासारखे आपल्याकडे एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक व्यक्तींच्या हयातीमध्ये खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो. हे दस्त कायद्याने नोंदविणे गरजेचे आहे आणि त्यावर योग्य ते मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्क भरणे गरजेचे असते. त्याच बरोबर अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी की ७/१२ उतारा किंवा प्रॉपर्टी कार्ड ह्या सारख्या रेव्हेन्यू रेकॉर्डने जागेमध्ये कोणाला मालकी हक्क मिळत नाही किंवा कोणाचाही मालकी हक्क हिरावून घेत नाहीत, तर हे उतारे केवळ महसूल नोंदणी करणारे दस्तऐवज आहेत. ह्यामधील खरेदीखताबरोबरच ( सेल- डीड ) अजून एका दस्ताबद्दल आपण बऱ्याच वेळा ऐकले असेल आणि तो दस्त म्हणजे "साठे खत ". साठे खताला 'साठे खत' का म्हणतात ह्या बद्दल काही माहिती आढळून आली नाही. साठे खताला इंग्रजी मध्ये "ऍग्रिमेंट फॉर सेल" असे म्हणले जाते, परंतु दोन्ही करार सारखे वाटले तरी त्यामध्ये खूप फरक आहे. कोर्टामध्ये मालमत्ते संबंधांमधील बहुतांशी वाद हे ह्याच दस्तांभोवती फिरत असतात आणि हा विषय तसा मोठा असल्यामुळे ह्या दस्तांबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. ट्रान्स्फर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट च्या कलम ५४ अन्वये 'सेल' म्हणजे स्थावर मिळकतीमधील मालकी हक्क ठरलेल्या मोबदल्याबदल्यात तबदील करणे होय. असे खरेदी खत झाल्यावर खरेदी घेणाऱ्याला जागेमध्ये मालकी हक्क मिळतो आणि असे खरेदीखत हे नोंदणीकृत असणे गरजेचे आहे . मात्र एखाद्या मिळकतीचे खरेदी खत करण्याआधी "साठे-खत" करण्याची पद्धत दिसून येते. मिळकतीचे साठेखत/करारनाम्यामुळे मिळकतीमधील मालकी हक्काचे हस्तांतरण होत नाही. कलम ५४ मध्ये पुढे असेही नमूद केले आहे की “केवळ असा करार ( साठे खत ) झाला म्हणजे संबंधित मिळकतीवर (खरेदीदाराचा) कसलाही हक्क , बोजा किंवा हितसंबंध निर्माण होत नाही.” साठेखतात मालमत्तेचे वर्णन, मिळकतीच्या मालकी हक्काचा इतिहास, मोबदला किती आणि कसा आणि किती कालावधीमध्ये देणार, जागेचा प्रत्यक्ष आणि खुला ताबा कधी देणार, कागदपत्रांची पूर्तता, विविध प्रकारच्या परवानग्या लागणार असल्यास त्याची पूर्तता कोण आणि कधी करणार, आणि खरेदी खत किती मुदतीमध्ये करणार आणि ह्या अटी शर्तींचा भंग झाल्यास सेलर -पर्चेसर ह्यांचे अधिकार अश्या महत्वाच्या अटी, शर्ती यांचा स्पष्ट लेखी उल्लेख असतो. थोडक्यात 'साठे खत' म्हणजे हा एखादी स्थावर मिळकत भविष्यात, काही अटी शर्तींना अधीन राहून, हस्तांतरित करण्याचे म्हणजेच खरेदीखत करून देण्याचे वचन देणारा करार असतो. जागेचा ताबा : साठे खताच्या वेळी जागेचा ताबा द्यायचा कि नाही हे प्रत्येक व्यवहारावर अवलंबून असते आणि असा ताबा मिळाला तरी मालकी हक्क साठे खताने मिळत नाही. *परंतु कायद्याचे एक महत्वाचे तत्व आहे की "ताबा असणे म्हणजे १० पैकी ९ मार्क मिळण्यासारखे आहे"*. शेवटी हक्का इतकाच जागेचा ताबाही तितकाच महत्वाचा आहे, ताबाच नसेल तर कागदोपत्री मालकी हक्काचा काय उपयोग ? असो. मात्र या बाबतीत ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मधील कलम ५३-अ ज्याला 'पार्ट परफॉर्मन्स' म्हणून ओळखले जाते, ते बघणे गरजेचे ठरेल. या कलमाप्रमाणे जर मिळकत खरेदी घेणाऱ्याने साठे खतात नमूद केल्याप्रमाणे त्याच्यावर जबाबदारी असणाऱ्या अटी व शर्तींची पूर्तता केली असेल आणि त्याचबरोबर अश्या मिळकतीचा ताबाही घेतला असेल, तर मिळकत विकणाऱ्याला सदर मिळकतीचा खरेदीदाराला दिलेला ताबा परत मागता येणार नाही, परंतु करारनाम्यामधील अटी -शर्तींप्रमाणे पुढील कारवाई करता येईल. अर्थात ह्या परिस्थितीमध्ये मालकी हक्क मूळ मालकाकडेच राहतो. स्टॅम्प ड्युटी : महाराष्ट्र स्टँम्प ऍक्ट प्रमाणे साठे खताच्या वेळीच आता पूर्ण स्टँम्प ड्युटी भरावी लागते, नंतर खरेदीखताच्या वेळी परत स्टँम्प ड्युटी भरावी लागत नाही. परंतु पूर्ण स्टम्प ड्युटी भरली म्हणून साठे खताने मालकी हक्क मिळत नाही. साठे खत केलेच पाहिजे , असा काही नियम नाही हेही तितकेच खरे आहे. मागील लेखात आपण पाहिल्याप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने 'सूरज लॅम्प इंडस्ट्री विरुद्ध हरियाणा राज्य' ह्या याचिकेवर २००९ आणि २०११ मध्ये निकाल देऊन हे स्पष्ट केले की केवळ पॉवर ऑफ ऍटर्नीच्या आधारावर किंवा साठे खताच्या आधारावर जागा विकत घेणाऱ्याला जागेमध्ये मालकी हक्क मिळत नाही, केवळ योग्य स्टँम्प ड्युटी भरलेल्या नोंदणीकृत खरेदीखतानेच जागेमध्ये मालकी हक्क प्राप्त होतो. हे दोन्ही दस्त खूप महत्वाचे आहेत. व्यवहारामध्ये असेही दिसून येते की लोक अनोंदणीकृत साठे खत किंवा लोकांचा आवडीचा म्हणता येईल असा "एम. ओ. यू" म्हणजेच 'समजुतीचा करारनामा' करतात. दस्ताला काय नाव दिले आहे ह्याने नव्हे तर त्यातील अटी -शर्तींप्रमाणेच दस्त कोणता आहे हे ठरते. कोर्टामध्ये देखील दस्ताच्या अटी -शर्ती ह्यांचे एकत्रितरित्या वाचन करून दस्त कोणता आहे हे ठरविले जाते. अश्या अनोंदणीकृत, एम. ओ. यू. सारख्या दस्तांमुळे जागेमध्ये मालकी हक्क मिळत नाही. सध्याच्या जागांच्या प्रचंड किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे आपला कष्टाचा पैसा गुंतवण्याआधी योग्य तो कायदेशीर सल्ला तज्ज्ञ व्यक्तींकडून घेणे इष्ट. by- internet |
आर. डी. बर्मन यांनी शोलेमधल्या 'या' गाण्यात पाण्यानं भरलेल्या बीअर बाटल्या वापरून दिलेलं संगीत..
आर. डी. बर्मन
मंगळवार, ३१ मे, २०२२
बोधकथा : कुणाला कमी समजू नये...
प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडितांमागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवळ काहीच पैसे नाहीत. थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा म्हणून स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला, भाऊ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो.
त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपडय़ात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खूश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा. मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे. पंडित म्हणाले, बरं भाऊ, तुम्ही गरीब दिसता पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पाहिले असता तो चकित झाला. कारण त्या गाठोडय़ात वीस सोन्याचे लाडू होते.*"आपल्यात काही टॅलेंट आहे किंवा टॅलेंट होते", त्याने जरूर वाचावे...*
ज्याला वाटते की,*.....
फेंगशुई
*एका व्यक्तीने व्यवसायात प्रगती करून लंडनमध्ये जमीन विकत घेतली आणि त्यावर आलिशान घर बांधले.* *त्या जमिनीवर आधीच एक सुंदर जलतरण तलाव होता आणि मागे 100 वर्ष जुने लिचीचे झाड होते.* *त्या लिचीच्या झाडामुळेच त्यांनी ती जमीन विकत घेतली होती, कारण त्यांच्या पत्नीला लिची खूप आवडत होती.* *काही काळानंतर घराचे नुतनीकरण करावे असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना नूतनीकरणाच्या वेळी सल्ला दिला की त्यांनी वास्तुशास्त्र तज्ञाचा सल्ला घ्यावा.* *त्यांचा अशा गोष्टींवर फारसा विश्वास नसला तरी, मित्रांचे मन राखण्याचे त्याने मान्य केले आणि ३० वर्षांपासून हाँगकाँग येथील वास्तुशास्त्राचे प्रसिद्ध मास्टर काओ यांना बोलावले.* *काओंना विमानतळावरून नेले, दोघांनी शहरात जेवण केले आणि त्यानंतर ते त्यांना त्यांच्या कारमध्ये घेऊन त्यांच्या घराकडे निघाले. वाटेत जेव्हा एखादी गाडी त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा तो त्याला रस्ता देत असे.* *मास्टर काओ हसले आणि म्हणाले की तुम्ही खूप सुरक्षित ड्रायव्हिंग करता. ते देखील हसले आणि प्रतिसादात म्हणाले की लोक सहसा काही आवश्यक काम असतानाच ओव्हरटेक करतात, म्हणून आपण त्यांना मार्ग दिला पाहिजे.* *घराजवळ पोहोचल्यावर रस्ता थोडा अरुंद झाला आणि त्याने गाडीचा वेग बराच कमी केला. तेवढ्यात अचानक एक मुल रस्त्यापलिकडून हसत हसत आणि वेगाने धावत त्यांच्या गाडीच्या समोरून रस्ता ओलांडून गेले. त्याच वेगाने चालत असताना तो मात्र त्या रस्त्याकडे पाहतच राहिला, जणू कोणाची तरी वाट पाहत होता. तेवढ्यात त्याच रस्त्यावरून अचानक आणखी एक मूल पुढे आलं. त्यांच्या कारच्या पुढून पळत गेले, बहुधा पहिल्याचा पाठलाग करत असावे. मास्टर काओने आश्चर्याने विचारले - दुसरे मूलही धावत बाहेर येईल हे तुला कसे कळते?* *ते मोठ्या सहजतेने म्हणाले, मुले अनेकदा एकमेकांच्या आगे मागे धावत असतात आणि कोणतेही मूल जोडीदाराशिवाय असे धावत असते यावर विश्वास बसत नाही..* *मास्टर काओ हे ऐकून मोठ्याने हसले आणि म्हणाले की तुम्ही निःसंशयपणे खूप स्थिर चित्त व्यक्ती आहात.* *घराजवळ आल्यानंतर दोघेही गाडीतून खाली उतरले. तेवढ्यात अचानक घराच्या मागच्या बाजूने ७-८ पक्षी वेगाने उडताना दिसले. हे पाहून तो मालक मास्टर काओला म्हणाला की, "जर तुमची हरकत नसेल तर आपण इथे थोडा वेळ राहू शकतो का?"* *मास्टर काओ यांना कारण जाणून घ्यायचे होते. त्यावर ते गृहस्थ म्हणाले की, "कदाचित काही मुले झाडावरून लिची चोरत असतील आणि आमच्या अचानक येण्याने मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होईल, तर झाडावरून पडून मुलाला दुखापतही होऊ शकते.* *मास्टर काओ काही वेळ गप्प बसले, मग ते संयत आवाजात म्हणाले, "या घराला वास्तुशास्त्राच्या तपासाची आणि उपायांची गरज नाही."* *त्या गृहस्थाने मोठ्या आश्चर्याने विचारले - का?* *मास्टर काओ - "जिथे तुमच्यासारखे विवेकी आणि आजूबाजूच्या लोकांचा चांगला विचार करणारे लोक उपस्थित/रहात असतील - ते ठिकाण , ती मालमत्ता वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार अतिशय पवित्र-आनंददायी-फलदायी असेल".* *"मित्रांनो, आपले तन आणि मन जेव्हा इतरांच्या सुख-शांतीला प्राधान्य देऊ लागते तेव्हा, इतरांनाच नव्हे तर आपल्यालाही मानसिक शांती व आनंद मिळतो.* *जेव्हा माणूस नेहमी स्वतःच्या आधी इतरांच्या भल्याचा विचार करू लागतो, तेव्हा नकळत त्याला संतत्व प्राप्त होते, ज्यामुळे इतरांचे भले होते आणि त्याला ज्ञान प्राप्त होते.* *आपणही असे गुण विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे आपल्या घराला फेंगशुई किंवा "वास्तू"सारख्या तंत्राची किंवा नवस बोलण्याची गरज भासणार नाही.* 🙏🏻🌹🌹🌹🙏🏻 |
● UNIQUE VILLAGES IN INDIA......*●
● UNIQUE VILLAGES IN INDIA......*●