बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

मुंबई मध्ये आल्यावर पहावे अशी ठिकाणे

मुंबई मध्ये आल्यावर पहावे अशी ठिकाणे


मुंबई मध्ये पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. समुद्र चौपाटी पासून ऐतिहासिक तसेच खरेदीसाठीचे बाजार व देवस्थाने असे सगळ्या प्रकारची स्थळे आहेत. त्यातील काही स्थळांबद्दल ची माहिती आज आपण पाहणार आहोत.

१) गेट वे ओफ इंडिया
Gate way of India in Marathi

मुंबईतील वास्तुशिल्पाचा एक उत्तम नमुना म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबई शहराच्या सम्रुद्र किनाऱ्यालगत असलेली कमानवजा इमारत असून अपोलो बंदराच्या भागात असलेली २६ मीटर उंच वास्तू आहे. भारतभेटीला आलेल्या इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या स्वागतासाठी ब्रिटिशांच्या काळात या प्रवेशद्वाराची उभारणी करण्यात आली. जॉर्ज विटटे यांच्या कल्पनेतून साकार झालेली वास्तू असून वास्तूचे बांधकाम पिवळ्या बसातर दगडात केले आहे. वास्तूचा आकार आयताकार असून ती सागराभिमुख आहे. या वास्तूचे बांधकाम आणि त्यावरील सुंदर गुजराती शिल्पकला वाख्ण्याजोगी आहे. अशी भव्य-दिव्य वास्तू पहिल्या नंतर येथून समुद्रात ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या घारापुरी बेटावरील एलिफंटा लेणीला नक्कीच भेट द्या. गुंफामध्ये कोरलेल्या भव्य हत्ती व प्राचीनकालीन शिवकालीन लेणी पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून फेरी बोट दर तासाला सुटतात. या फेरी बोटांचा प्रवास सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत असून या बोटीतून प्रवास करण्यासाठी ८० ते १२० रुपये पर्यंत तिकीट आकारले जाते. त्याचबरोबर येथील देशी-परदेशी लोकांचे मुख्य आकर्षण म्हणजे घोड्यागाड्या आणि टांगे. प्राचीन मुंबईत आलेल्या प्रत्येक पर्यटकाची पहिली पसंती असलेल्या या वास्तूसमोर छायाचित्र काढण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. गेट वे ऑफ इंडिया व भव्य विशाल अशा ताज होटेल समोर वेगवेगळ्या पोझमध्ये उभे राहून पर्यटकांचे फोटो काढण्यास अनेक छायाचित्रकार असतात. निव्वळ २० ते ५० रुपये आकारून हे फोटो काढून दिले जातात.

२) नरिमन पॉइण्ट
nariman point in marathi
Nariman point in Marathi
मुंबईचे “मैनहट्टन” म्हणून ओळ्खले जाणारे ठिकाण म्हणजे नरिमन पॉइण्ट ! नरिमन पॉइण्ट हे मुंबईतील मुख्य आणि देशातील पहिले केंद्रिय व्यापारी स्थळ आहे. या भागाला एक पारसी समाजसेवक खुर्शीद फ्रामजी नरिमन यांच्या नावावरून हे नाव दिले गेले. समुद्राच्या भागाचे पुनर्वसन करून हा भाग वसवण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धामुळे येथे वापरण्यात आलेले सिमेंट आणि स्टील हे काळ्या बाजारातून आणण्यात आले होते. नरिमन पॉइण्ट जास्त उजेडात आले ते २००७ साली या भागातील एक रहिवासी जागा (flat) ८.६२ लाख अमेरिकन डोलर्स म्हणजे (९७,८४२ रु.) प्रती चौरस फूट या दराने विकला गेल्यावर ! येथे अनेक विदेशी कंपन्या ची मुख्यालये आहेत. महाराष्ट्राचे राजकीय मुख्यालय म्हणून ओळखले जाणारे विधान भवन देखील देखील येथेच आहे. येथून “कफ परेड” आणि “ब्याक्बे रेक्लमेशन” हि मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणे दिसतात.

३) हँगिंग गार्डन्स
hanging garden in marathi

मुंबईच्या दक्षिण भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १९ व्या शतकाच्या उतरार्धात मलबार हिलच्या उंच टेकडीवर पाण्याची टाकी बांधण्यात आली. तब्बल ३० दशलक्ष गॅलन पाणी मावेल इतकी मोठी टाकी उघडीच होती. त्यामधील पाणी गढूळ होण्याची शक्यता होती म्हणून या टाकीवर बगीचा करण्याच ठरले आणि १२५ वर्षाचा वारसा असलेल्या या गार्डन्सची स्थापना १८८० साली करण्यात आली. १९२१ साली बागेची डागडुजी करून त्याला मुंबईचे पहिले राजपुत्र फिरोजशहा मेहता यांचे नाव देण्यात आले. या गार्डन्सचं मुख्य आकर्षण म्हणजे येथील वृक्षराई.. त्यामुळे भर दुपारीसुद्धा उन्हाची झळ न लागता निवांत शांत बसता येते. त्याचबरोबर या उद्यानाच्या आवारात हिरवेगार झाडांना गाय, जिराफ, हत्ती इत्यादी प्राण्याचा आकार देण्यात आला आहे. याच गार्डन्सच्या समोरच असलेलं पार्क म्हणजे कमला नेहरू पार्क. या पार्कमधील प्रमुख आकर्षण म्हणजे म्हातारीचा बूट. २० फुट उंच असलेल्या या बुटातून साऱ्या मुंबईचे दर्शन घडते. त्याचबरोबर या पार्कातून पूर्ण चौपाटी, मरीन ड्राईव्ह व संपूर्ण मुंबईचे नयनरम्य दर्शन घडते. या गार्डनला भेट देण्यासाठी आपण चर्नीरोड स्थानकावरून जाऊ शकता. या स्थानकावरून या पार्क मध्ये आपण टॅक्सी ने १५ ते २० मिनिटात पोहचू शकतो.

वेळ:- सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत.

४) नेहरू तारांगण
nehru tarangan in marathi

वरळीचं नेहरू तारांगण सर्वांचे आकर्षण. नेहरू तारांगण म्हणजे गोलाकार थीएटर. या गोलाकार थीएटरमधल्या प्रदर्शनात खुर्च्यांमध्ये निवांत झोपून आकाशदर्शन घेता येते. या तारांगणात चक्क आकाशातील तारे आणि ग्रह खाली येतात कि काय असे भासते. ग्रह-ताऱ्यांची ओळख व इतर अवकाशातील माहिती आणि त्या व्यतिरिक्त अंतराळ संशोधनाचे विविध टप्पेही या प्रदर्शनात मांडलेल्या असतात. विविध ताऱ्यांच्या नावाने इथे वजन काटे लावण्यात आले असून यावर उभे राहून वजन केल्यास त्या ताऱ्यांवरील तुमचे वस्तुमान किती हे समजते. या केंद्रात १४ कार्यशाळा असून त्यामध्ये भारतातील कला, बौद्धिकता व विविध सांस्कृतिक प्रदर्शने पाहता येतात. त्याचबरोबर या केंद्रातील डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे कायमस्वरूपी प्रदर्शन भारताची कथा सांगते. येथे आपण दादर, भायखळा, महालक्ष्मी या स्थानकावरून बसने जाऊ शकता.

बस क्र- २८, ३३, ८०, ५२१, ८४, ९१, ९२, ९३
वेळ- सकाळी ११ ते ५, सोमवारी सुट्टी.

५) तारापोरवाला मत्स्यालय
Taraporewala aquarium in marathi

मरीन ड्राईव्हला फेरफटका मारताना समोरच एक भव्य दिव्य इमारत दिसते ती म्हणजे मुंबई शहरातील एकमेव तारापोरवाला मत्स्यालय. सर्व बाजूने सागराने वेढलेल्या मुंबईला सागरी मत्स्यसंशोधन केंद्र असावे अशी संकल्पना प्रथम १९२३ साली बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेचे कार्यवाहक श्री.मिलार्ड यांनी मांडली. त्याचबरोबर समुद्राच्या आतील अद्भूतरम्य जग लोकांना पाहायला मिळावे, या हेतूने मरीन ड्राईव्हला ६० वर्षापूर्वी म्हणजे १९५१ साली बांधण्यात आलेले हे मत्स्यालय. मत्स्यालयाच्या बांधणीसाठी त्यावेळी आठ लाख रु खर्च झाला, त्यापैकी दोन लाखांचा निधी तारापोरवाला यांनी दिला होता. असे हे दुमजली मत्स्यालय १०८ फुट लांब व ९४ फुट रुंद असून याच्या उभारणीसाठी तीन वर्षाचा कालावधी लागला. मत्स्यालयात प्रवेश केल्यानंतर समुद्रातील व तलावातील वेगवेगळ्या प्रकारचे मासे नजरेस पडतात. या मत्स्यालयात १०० हून अधिक मासे असून आजही येथे ७२ प्रजातीचे मासे व गोड्या पाण्यातील १०० प्रजाती आहेत. यातील विशेष आकर्षण म्हणजे लक्षद्वीप बेटामधून आणलेले सात प्रकारचे प्रवाळ व मासे. तसेच ‘स्टिंग रे’, ‘शार्क’ किवा ‘काळा मासा’, ‘कासवे’ असे डिस्कव्हरीवर पाहायला मिळणारे समुद्री जीव समोर पाहताना मनाला फार आनंद मिळतो. त्याचबरोबर माशांच्या टँकवर लिहिलेले नाव आणि त्याबद्दलची दोन ओळीतील माहितीही मत्स्यालयात फेरफटका मारताना सर्वात महत्वाची गोष्ट वाटते. अशा या इमारतीत तळमजल्यावर मत्स्यालय आणि दुसऱ्या मजला मत्स्यव्यवसाय विभागाच्या मुख्यालयाकरिता आहे. अशा या समुद्री सफर घडवणाऱ्या मत्स्याल्याला भेट देण्याकरिता तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या चर्नी रोड स्थानकावरून चालत किवा टक्सीने जाऊ शकता.

वेळ:- मंगळवार ते शनिवार- सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत

रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी- सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत.

६) हाजी अली
haji ali in marathi

सिनेतारकापासून ते सर्वसामान्यपर्यंत सर्वांनाच भक्तीभावाने नतमस्तक करायला लावणारे हे ठिकाण म्हणजे मुंबईतील हाजी अली दर्गा…१४३१ साली बांधण्यात आलेली १०० वर्ष जुनी असलेली हि दर्गा हाजी अली या सुफी संताच्या स्मृतीप्रीत्यर्थ हि वास्तू बांधण्यात आली आहे. दुरून हि दर्गा पाहिल्यास अथांग सागरात एक मोती तरंगण्याचा आभास होतो. महालक्ष्मी रेसकोर्सच्या विरुद्ध दिशेला समुद्रात एका बेटावर हि दर्गा आहे. या दर्ग्यात जाण्याचा अनुभव काही निराळाच.. या दर्ग्यापर्यंत जाण्यासठी एक पायवाट आहे हि पायवाट समुद्राला जेव्हा भरती येते तेव्हा देसेनाशी होते आणि जणू हि दर्गा समुद्रावर अधांतरी तरंगल्या सारखी भासते. दर्ग्यात प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर अशा भारतीय आणि अरेबिक वास्तूशैलीचा संगम आढळतो. दर्ग्यातील कबरीभोवती चारही बाजूंनी चांदीची चौकट असून सुंदर नक्षीकाम केलेल्या खांबांचा आधार आहे. या नक्षीकामात अरेबिक भाषेत लिहिलेली अल्लाची ९९ नावे आहे. या दर्ग्यासमोर महालक्ष्मी देवीचे मंदिरही आहे. थोडे पुढे गेलात कि घोड्याच्या शर्यतीचे मैदान म्हणजे महालक्ष्मी रेसकोर्स पाहता येतील. या दर्ग्याचे व येथील ठिकाणे पाहून झाल्यावर हाजी अलीला जो मुख्य सिग्नल आहे तिथे उभे असलेले प्रशस्त हाजी अली ज्यूस सेंटर. थंडगार मिल्कशेक, सरबत, फालुदा या वेगवेगळ्या व्हरायटीबरोबर येथे आंबा, चिकू, सफरचंद अशा विविध फळांपासून बनवलेले क्रीम ही येथील खासियत. तर नक्कीच देवदर्शन झाल्यावर या ज्यूस सेंटरला भेट द्या. या दर्ग्याला भेट द्यायला तुम्ही वेस्टर्न रेल्वेच्या महालक्ष्मी व मुंबई सेंट्रल स्थानकावरून तर मध्य रेल्वेच्या भायखळा स्थानकावरून जाऊ शकता किवा तुम्ही बसने हि प्रवास करू शकता.

बस क्र:- ३३, ३७, ६३, ८१, ८२, ८४, ९२, ९३, १२४, १२५, ३५१, ३५७, ३८५, ५२१.

७) महालक्ष्मी मंदिर
mahalakshmi mandir in marathi

महालक्ष्मी मंदिर हे मुंबईतील प्रसिध्द मंदिर आहे. इ स 1831 ला धाक जी दादाजी नावाच्या एका हिंदू व्यापाऱ्याने या मंदिर पूर्ननिर्माण केले. या मंदिरामागे बराच मोठा इतिहास आहे तो म्हणजे 1785 साली वरळी आणि मलबार हिल या दोन्ही भागांना जोडण्याचे काम इंग्रज इंजिनियर करत होते. पण त्या कामात विघ्न येत होते. त्या प्रोजेक्टचे मुख्य इंजिनियर पाठारे प्रभू यांना वरळी जवळच्या समुद्रात लक्ष्मीच्या मूर्तीचे स्वप्न पडले. त्यांनी स्वप्नात दिसलेल्या जागी त्या मुर्तीचा शोध घेतल्यास त्यांना तिथे लक्ष्मीची मूर्ती सापडली. त्यानंतर त्यांनी तेथेच तिचे मंदिर बांधले. त्यामुळे त्यांचे ते प्रोजेक्ट पूर्ण झाले. हाजी अली दर्गावरुन महालक्ष्मी मंदिर दृष्टीस पडते. हे मंदिर समुद्रा जवळ असल्याने अजून नयनरंम्य वाटते. मंदिराच्या गाभाऱ्यात देवी महालक्ष्मी, देवी महाकाली व देवी महासरस्वती यांच्या मूर्त्या आहेत. या तीनही देवींच्या मुर्त्या स्वयंभू असून त्यांना सोन्याच्या आवरणाने झाकलेले असते. त्यांचे विनाआवरण दर्शन घ्यायचे असल्यास रात्री मंदिर बंद करताना जावे लागते.

हे मंदिर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भक्तांसाठी खुले असते. तर नवरात्रीमध्ये सकाळी 6 वाजता देवीची आरती झाल्यानंतर दर्शनास सुरुवात होते ते रात्री 12 पर्यंत भाविक दर्शन घेऊ शकतात.

महालक्ष्मी स्टेशनवरुन शेअर टॅक्सी उपलब्ध आहेत. तसेच बसेस ही आहेत. शेअर टॅक्सी- एका माणसे किमान भाडे 10 रुपये. महालक्ष्मी स्टेशनवरुन पायी 15 ते 20 मिनिटात महालक्ष्मी मंदिरात जाता येते.

८) सिध्दीविनायक गणपती
siddhivinayak mandir in marathi

मुंबईतील प्रसिध्द असणारे सिध्दीविनायक हे मंदिर सुमारे पावणेदोनशे वर्षांपूर्वीचे असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो. लक्ष्मण विठू पाटिल आणि देऊबाई पाटिल यांनी हे मंदिर इ. स. 1801 मध्ये 19 नोव्हेंबर रोजी बांधल्याचे मुंबईतील देवालये या के. रघुनाथजी यांच्या ग्रंथात आढळतो. नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री सिध्दीविनायकाची ओळख आहे. गणपतीची मूळ मुर्ती 2.6 इंच व 2 इंच रुंद असून एका काळ्या दगडात बनवलेली आहे. उजवी सोंड, माथ्यावर मुकुट, चार हात, दोन हातात अंकुश आणि कमळ, खालच्या दोन हातांपैकी उजव्या हाती माळ आणि डाव्या हाती मोदकाची वाटी, मूर्तीच्या गळ्यात सर्पाचे जानवे असे या मूर्तीचे वैशिष्ट्ये आहे. उजव्या सोंडेचा हा गणपती सिध्द पीठ असल्यामुळे तो सिध्दीविनायक म्हणून ओळखला जातो. तसेच या गणपतीला लग्नी गणेश असे ही म्हटले जाते. सकाळी 6 वाजता यथासांग पूजा व अभिषेक झाल्यावर गणपतीच्या दर्शनाला सुरुवात होते.

जवळचे स्टेशन – दादर.

दादर स्टेशन वरुन पायी 10 ते 15 जाऊ शकतो. तर शेअर टॅक्सी व बस ही उपलब्ध आहेत.

९) छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय(प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम)
Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya in Marathi
Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya in Marathi
मुंबईतील सर्वात जुने आणि जवळपास ५० हजाराहून अधिक कलाकृतींचा संचय आणि अमर्याद माहितीचा खजिना म्हणजे मुंबईचे पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम आणि आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय. ब्रिटीश वास्तुविशारद डब्लू.जी.विटेट यांनी यांचा आराखडा तयार करून याची उभारणी केली असून स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे इ.स १९२२ मध्ये सर्वांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले. संग्रहालयात भारत, चीन, जपान आणि अन्य देशांच्या कलाकृती येथे पहावयास मिळतील. याव्यतिरिक्त नौकावाहन, मराठा मुघल सरदरांच्या वापरातील शस्त्रे, अनेक शिल्पकला, अन्य मुर्त्या या विशेष दालनात पाहण्यास मिळतील. इथले विविध दालन व वस्तू पाहताना दिवसही अपुरा पडतोय कि काय असे नक्कीच तुम्हाला वाटेल. समस्त विश्वाच्या कलाकृती व इतर साहित्य व अन्य कृतींची माहिती करून घेण्यासठी नक्की या वास्तुसंग्रहालयास भेट द्या.

वेळ:- मंगळवार ते रविवार सकळी १०.१५ ते सायं ५.४५ वाजेपर्यंत.

शुल्क:- प्रवेश शुल्क-५ रु, प्रौढांसाठी- ३० रु

वस्तूसंग्रहालयात जाण्यासाठी- छत्रपती शिवाजी टर्मिनस वरून बस क्र. १४, ६९, १०१, १३०

चर्चगेट स्थानकावरून बस क्र. ७०, १०६, १२२, १२३, १३२

१०) ताज महल हॉटेल
Taj Mahal Hotel information in Marathi

ताज महल हॉटेल हे मुंबई च्या कोलाबा भागातील गेट वे ओफ इंडिया समोरील एक अत्यंत मोहक आणि सुंदर पंचतारांकित होटेल आहे . तसेच आपल्या ऐतिहासिक महत्व आणि विशिष्ठ बांधकामामुळे मुंबईतील निवडक प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे . हे हॉटेल प्रसिद्ध औद्योगिक समूह टाटा ग्रुप च्या मालिकेचे आहे , जवळजवळ १०९ वर्ष जून्या ह्या हॉटेल ने जगभरातल्या अनेक दिग्गजाची सेवा केली आहे. जसे बिल क्लिंट्न , प्रिन्स ऑफ वेल्स , हिलरी क्लिंट्न , बराक ओबामा, इत्यादींचा त्यात समावेश आहे. ह्या इमारतीत एकूण ५६५ खोल्या आहेत. हे हॉटेल १६ डिसेंबर १९०३ साली सुरु करण्यात आले . पहिल्या महायुद्धाच्या वेळी ह्या इमारतीचा होस्पिट्ल म्हणून वापर करण्यात आला होता. असं म्हणतात की जमशेदजी टाटा यांना एका होटेल मध्ये प्रवेश नाकारल्याने त्यांनी हे होटेल बनवण्याचा निर्णय घेतला. ह्या वास्तू विषयीची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गेट वे ओफ इंडिया समोरून जो भाग दिसतो तो ह्या हॉटेल चा मागील भाग आहे, तर मुख्य प्रवेश द्वार याच्या विरुद्ध दिशेला आहे. आता त्याच्याच बाजूला ताज महल टोवर्स म्हणून दुसरी इमारत उभारण्यात आली आहे.













by - InterNet

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

*जमीन संबंधीत व्यवहार करताना खालील काळजी घ्या.*

 *जमीन संबंधीत व्यवहार करताना खालील काळजी घ्या.*

------------------

*1) जमीन खरेदी विक्री व्यवहार रजिस्टर ऑफिसला नोंदणी करा.*
*2) किमान 20 गुंठ्या पेक्ष्या कमी क्षेत्रात शेत जमीन खरेदी करू नका.*
*3) बिगरशेती आदेश प्राप्त जमीन 20 गुंठ्या पेक्ष्या कमी असेल तरी खरेदी करता येते.*
*4) शेतकरी नसलेल्या व्यक्तीस शेती खरेदी करता येत नाही.*
*5) आदिवासी व्यक्तीची शेत जमीन बिगर आदिवासी व्यक्तीस खरेदी करता येत नाही.*
*6) वर्ग 2 म्हणजे इनाम वतन देवस्थान इत्यादी जमीन सक्षम प्राधिकारी यांची परवानगी न घेता परस्पर विकत येत नाही.*
*7) नोटरी किंवा 100 च्या स्टॅम्प पेपरवर लिहून घेऊन वर्ग 2 ची जमीन स्वतःच्या ताब्यात ठेवणे याला कोणताही कायदेशीर आधार नाही.*
*8) जमिनीवर कोणत्याही संस्थेचा बोजा कमी नकरता जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार कायदेशीर नाही.*
*9) सहहिस्सेदार यांची सहमती न घेता परस्पर जमीन विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे.*
*10) देवस्थान व महार वतन जमीन परस्पर विक्री करता येत नाही याला महाराष्ट्र शासनाची परवानगी घ्यावी लागते.*
*11) कायद्याने बहीण व बहिणीच्या पश्चात तिची मुले यांची नावे 7/12 पत्रकाच्या कब्जेदार सदरी लावावी लागतात.*
*12) हक्क निर्माण झालेल्या व्यक्ती कडूनच नोंदणीकृत हक्कसोडपत्र करता येते.7/12 पत्रकावर नावाची नोंद करण्यापूर्वी हक्कसोड पत्रक करू नये.*
*13) एक लाख रुपया पेक्ष्या जास्त रक्कमेचा वितसंस्थेचा बोजा नोंद करण्यासाठी गहाण खत करणे आवश्यक आहे.एक लाख रूपया वरील बोजा कमी करण्यासाठी नोंदणीकृत ऋणमोचक दस्त करणे आवश्यक आहे.*
*14) एकत्र कुटुंब प्रमुख नोंद कमी करताना सदर नोंद झालेली डायरी च्या आधारे त्या परिवारातील सर्व कायदेशीर वारसांची नावे कब्जेदार सदरी येणे कायद्याने आवश्यक आहे.दिशाभूल करणारा एकत्र कुटुंब प्रमुख चुकीच्या कृती बद्दल कायदेशीर कारवाईस पात्र आहे.*
*15) अज्ञान व्यक्तीच्या पालकास अज्ञान व्यक्तीची शेत जमीन किंवा मिळकत विकण्याचा कोणताही अधिकार नसतो तेव्हा अशा व्यक्ती कडून कोणतीही मिळकत विकत घेऊ नये.*
*16) मयत व्यक्तीच्या सर्व वारसांची नावे लावणे आवश्यक आहे. तथापि एकादे नाव जाणीवपूर्वक न लावल्यास ती व्यक्ती आपले नाव आवश्यक पुरावे सादर करून लावून घेऊ शकते त्याचा कायदेशीर हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही पण सदरची कृती वेळेत करणे हिताचे असते.*
*17) शेतजमीन अथवा मिळकत यांचा कायदेशीर व्यवहार करण्यासाठी 7/12 पत्रकावरील मयत व्यक्तीचे नाव कमी करावे लागते.*
*18) एकाद्या वारसाचे नाव वगळून कायदेशीर वाटणीपत्र करता येत नाही.*
*19) शेत जमिनीचे तुकड्यात म्हणजे 20 गुंठ्या पेक्ष्या कमी क्षेत्रात वाटणीपत्र करता येत नाही.*
*20) वारसा हक्काने प्राप्त जमीन बक्षीस देता येत नाही.स्वकष्टार्जित मिळकत बक्षीस देता येते.*
*21) सामाईक मालकीची जमीन सर्वांच्या मालकीची असते एकाध्या हिस्सेदाराने केलेला व्यवहार कायदेशीर दृष्ट्या अवैध असतो.*
*22) शेतजमीन तुकड्यात बक्षीस देता येत नाही.*
*23) कमी जास्त पत्रका आधारे शेतजमीन व प्लॉटचे  पोट हिस्से पाडता येतात.*
*24) अंतिम रेखांकना मध्ये ओपन स्पेस,विशिष्ट सोय निर्माण करण्यासाठी आरक्षित ठेवलेली जागा विकासकाला विक्री करता येत नाही.*
*25) मिळकतधारक बेपत्ता झाला असेल तर 7 वर्षा नंतर मा दिवाणी न्यायालयात अर्ज करून त्याचे वारस सदर व्यक्ती मृत घोषित करून घेऊ शकतात व आपली नावे मिळकतीस लावू शकतात.*
*28) एकाद्या व्यक्तीला सरळ वारस म्हणजे पती पत्नी मुलगा मुलगी नसेल तसेच त्याने मृत्यूपत्र केले नसेल तर त्याचे नजीकचे वारस दिवाणी न्यायालयात अर्ज करून वारसा सिद्ध करून वारसा प्रमाणपत्र प्राप्त करून घेऊन आपली नावे वारसाने लावू शकतात.*
*29) 7/12 किंवा मिळकतीचा पूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी त्या 7/12 अथवा मिळकती मधील सर्व फेरफार किंवा डायरी काढून तपासणी करावी यालाच सर्च रिपोर्ट म्हणतात.हे अभिलेख अभिलेख कक्षात मिळू शकतात.*
*30) सातबारा संगणकीकरण प्रक्रियेत शेती कसणाऱ्या व्यक्तीचे नाव हा कॉलम रद्द करण्यात आला आहे अशा वेळी जमीन कसणाऱ्या व्यक्तीने प्रत्येक जमीन कसणाऱ्या व्यक्तीने प्रतीवर्षी तहसील कार्यालयास अर्ज करून जमीन कसत असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे त्यांच्या कायदेशीर हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे.*
*31) शेत जमीन,रहिवाशी बिगरशेती,वाणिज्यविषयक बिगरशेती,औद्योगिक बिगरशेती हे जमिनीचे वापरनिहाय प्रकार आहेत.*
*32) ब्ल्यू झोन,ग्रीन झोन,रेड झोन,यलो झोन हे जमिनीचे  भौगोलिक प्रकार म्हणता येईल,ब्ल्यू झोन पाणी नदी क्षेत्र,रेड झोन पुराचे पाणी येणारे क्षेत्र,ग्रीन झोन शेती क्षेत्र,यलो झोन रहिवासी क्षेत्र.*
*33) लक्ष्मीमुक्ती योजना अंतर्गत सातबारा पत्रकावर पती बरोबर पत्नीचे नाव लावून सातबारा पतिपत्नी यांच्या सयूंक्त मालकीचे करता येते.*
*34) मृत्यूपत्र नोंदणीकृत व विना नोंदणीकृत दोन्हीची कायदेशीर वैधता समान असते.*
*35) सहकार कायद्या अंतर्गत वसुलीचे प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या वसुली अधिकारी यांच्या बोजा नोंद करण्याच्या प्रक्रियेत हरकत घेण्यास कायदेशीर आधार शिल्लक राहत नाही.*
*37) शासनाने वाटप केलेली जमीन ज्या उद्देशाने दिली आहे त्या शिवाय विना परवानगी त्याचा वापर दुसऱ्या कारणासाठी सदर जमीन वापरली जाऊ लागली तर शासन सदर जमीन परत घेऊ शकते.*
*38) वारसाने जुन्या काळात बहिणीची नावे इतर हक्कात नमूद असतील तर अर्ज इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेता येतात.*
*39) 18 वर्ष पूर्ण झाल्या नंतर अज्ञान व्यक्ती सज्ञान होते व ती सातबारावरील आपले अपाक शेरा कमी करून स्वतःचे नाव लावू शकते.*
*40) सातबारा संगणकीकरण प्रक्रियेत वर्ग दोनची जमीनीचे गट ऑन line ब्लॉक केले आहेत तेव्हा सदर वर्ग 2 वरील कोणतेही व्यवहार नोंद करण्यासाठी सदरचा गट खुला करण्यासाठी तहसील कार्यालयास अर्ज करावा लागतो व गट खुला झाल्या नंतरच तलाठी यांना नोंद करता येते.*
----------------







by - ?

*हल्ला*! ...

 


*हल्ला*! 

*१) पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.* 
*लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, काही जाणंच आली नाही तर कशाला जनता उठाव करतेय? म्हणून पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.* मग जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे वापरून घ्यायला सोपं जातं. 

*२) दुसरा हल्ला रोजगारावर असतो, कुटुंबाला खायलाच काही मिळाले नाही तर माणूस जिथे पैसा मिळेल तिकडे धावतो. मग भले ते काम स्वतःच्या विचारांविरुद्ध असो कि अनैतिक असो.*

*३) तिसरा हल्ला हा इतिहासावर असतो. इतिहासातील स्वतःला अनुरूप बदल हे जनतेला खोट्या अभिमानाच्या गुंगीत ठेवण्यास उपयोगी पडतात.*

*४) चौथा हल्ला हा मानवी मेंदूवर असतो. खोट्या कथा पेरणे, त्याचे स्तोम माजवणे, उदात्तीकरण करणे. खोट्या कथांना आधार म्हणून जनतेच्या मनातील प्रतीकांचा (उदा. जात, धर्म, राष्ट्र, सैनिक, दैवत, क्रांतिकारक इ.) वापर आणि हे सर्व करत असताना आपली प्रतिमा डागाळू नये म्हणून वरून प्रामाणिक, भोळेपणा किंवा सात्त्विकतेचा आव.* 

*५) पाचवा हल्ला हा विरोधकांवर असतो. कारण त्यांच्यात भविष्याचा वेध घेण्याची उपजत शक्ती असल्याने हे लोक काय करतात तर पुढे त्रास होईल अशा व्यक्तीची बदनामी ते आजपासून सुरु करतात. ज्या व्यक्तीची बदनामी करायची आहे त्याच्या बदनामीसाठी एखादा क्षुल्लक किंवा खोटा आरोप शोधून काढतात (तो प्रत्येकातच सापडतो) त्या व्यक्तीच्या बाकी अनेक कार्याकडे दुर्लक्ष केले जाते, आरोपाला योग्य ठरतील असे आणखी दहा खोटे आरोप जोडले जातात आणि बदनामी सतत सुरुच राहते. आपापल्या कामात मग्न असलेली भोळी जनता तेच खरे मानून बसते. सत्य समजून घ्यायला त्यांना कुठे वेळ आहे?*

*हे सगळे हल्ले अपयशी ठरले की मग शेवटचा हल्ला म्हणजे माघार घेऊन आम्ही तुमचेच, आम्ही किती भोळे हा जप ते सुरु ठेवतात तो पुन्हा योग्य वेळ येईपर्यंत.*

*तेव्हा मित्रांनो, हे मेंदू नासवण्याचे कपट कारस्थान वेळीच ओळखा अन्यथा आपला देश पुन्हा एकदा मध्ययुगात लोटला जाईल. शिक्षण घेऊन विचारी व्हा... वैज्ञानिक व खरा दृष्टिकोन स्वीकारून खोटा राष्ट्रवाद, देवाधर्माच्या नावाखाली, इतिहासाच्या नावाने खोटं बोलणाऱ्यांना थारा देऊ नका..*

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

सामान्य भारतीयांमधील "हिरो"ला वेगवान चाक देणाऱ्या साडे तीन हजार कोटींच्या उद्योगाची कहाणी...




सामान्य भारतीयांमधील "हिरो"ला वेगवान चाक देणाऱ्या साडे तीन हजार कोटींच्या उद्योगाची कहाणी


मंडळी, बालपणीचा काळ सुखाचा असं आपण नेहमीच म्हणतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा लहान मुलं आनंदून जातात. त्यांना तो आनंद मिळवून देण्यासाठी पालक नेहमीच झटत असतात.

आता मुलांना खूप साधनं मिळत आहेत, टीव्ही, मोबाईल, आयपॅड, विविध खेळणी, पण पूर्वीच्या मुलांना फार कमी खेळणी असायची. तरीपण आत्ताची मुलं आणि पूर्वीची मुलं यात एक कॉमन गोष्ट आहे की जी मिळण्यासाठी पूर्वीपण मुलं हट्ट करत होती आणि आजही करत आहेत.

तुम्ही म्हणाल, 'काय हे? आत्ताची मुलं कुठे पूर्वीच्या गोष्टी वापरतात?' पण आहे अशी एक गोष्ट की जी पूर्वापार चालत आली आहे.
प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. मूल लहान असताना त्याला खुळखुळा, मग लाइटवरची खेळणी, मग बाबा गाडी, मग तीन चाकी सायकल.

तीन चाकी सायकल चालवली नाही? अशी मुलं फार कमी बघायला मिळतील. लहान मुलांना तीन चाकी सायकल घेऊन द्यायचीच हा जणू नियमच झालाय.

या तीन चाकी सायकल वापरून तिचा पार खुळखुळा करून टाकल्यावर मुलाचा एकच हट्ट सुरू होतो, ''मला सायकल कधी घेणार?'' बघा आहे ना ही खरी गोष्ट? सायकल घेऊन द्यायला पालकही कुरकुर करत नाहीत आणि मुलंही सायकल नको असं कधीच म्हणत नाहीत.

कोट्यावधी भारतीय मुलं ५ ते ८ वर्षांपर्यंतच्या काळात सायकल घेतात, ती शिकतात, कधीतरी धडपडतात. पण ती घेऊन बॅलन्सच्या चाकाशिवाय चालवायला लागेपर्यंत प्रयत्न अखंड सुरू असतात. पालकांना पण ती घेऊन देण्यात धन्यता वाटते.

कधी वाढदिवसाचे औचित्य साधून, तर कधी पहिल्या नंबरचं किंवा एखाद्या स्पर्धेचं बक्षीस म्हणून सायकल घेऊन दिली जाते. ही सायकल मग ती श्रीमंत कुटुंब असो किंवा सर्वसामान्य कुटुंब असो सायकल मिळवणे व ती चालवायला शिकणे हे मुलांसाठी व पालकांसाठी एक अतिशय आनंदाचा क्षण असतो.

या सायकलची निर्मिती कुणी केली माहीत आहे? कै. ओ. पी. मुंजाळ. हिरो सायकल्सचे ते संस्थापक होते. त्यांनी १९५६ मध्ये म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतात हिरो सायकल्सची स्थापना केली. तेव्हा राष्ट्र पण नुकतंच स्वतंत्र झालं होतं त्यामुळे तेही तरुणच होतं.

तरुण मुलाला स्वातंत्र्य हवं असतं ते सायकल मुळे मिळतं तसंच तरुण राष्ट्राला पण स्वातंत्र्याची चाके हवी होती.

हिरो सायकल्स हा छोटासा बिझनेस होता, पण मुंजाळ यांच्या लीडरशीपने तो मोठा केला. त्यांच्या नेतृत्वाखाली जगातील सगळ्यात मोठी सायकल बनविण्यात त्यांनी यश मिळवले.





हीच हिरो सायकल कंपनी आता वर्षाला पाच मिलियन सायकल तयार करते. त्याचं प्राथमिक उत्पादनाचं युनिट लुधियानात आहे. २५० पेक्षा जास्त पुरवठादार आणि २८०० डीलरशिप आहेत. ही कंपनी जर्मनी, पोलंड, आफ्रिका आणि फिनलँड यासह ७० देशांमध्ये निर्यात करते.

हिरो मोटर्स कंपनी हाही मुंजाळ यांचा कौटुंबिक व्यवसाय असून ३,३०० कोटी रुपयांचा त्याचा व्यवसाय आहे त्याचे अध्यक्ष पंकज एम मुंजाळ आहेत. त्यांचा मुलगा अभिषेक मुंजाळ हा या कंपनीचा डायरेक्टर असून या कंपनीमध्ये मन लावून काम करत आहे.

भारतात सायकल बनविणार्‍या कंपन्या फार थोड्या आहेत. अभिषेक म्हणतो, ''१०० पैकी ६ जण या व्यवसायात उतरतात.'' पण हिरो सायकलने मात्र सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विचार केला आहे आणि सायकलिंगची संस्कृती जपली आहे.

या व्यवसायाला सुरुवात कशी झाली? तर ओ. पी. मुंजाळ यांचा जन्म पाकिस्तानात झाला. जेव्हा त्यांनी सायकलचा व्यवसाय सुरू केला तेव्हा ते १६ वर्षांचे होते.

विभाजनानंतर पोटासाठी काहीतरी कामधंदा करण्याच्या हेतूने ओ. पी. मुंजाळ यांचे कुटुंब ब्रिजमोहन लाल मुंजाळ, दयानंद मुंजाळ आणि सत्यानंद मुंजाळ या भावांना बरोबर घेऊन अमृतसरला सायकलच्या स्पेअरपार्टचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आले.





नवीन नवीन प्रयोग करत राहिल्यामुळे काही वर्षांतच हा व्यवसाय वाढू शकला. त्यानंतर ओ. पी. मुंजाळ यांना सुट्टे भाग बनवायला जमू लागले. मग त्यांनी त्याची पूर्ण सायकल बनवून पाहिली आणि मग ते प्रगतीची शिखरे चढतच गेले, त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.

अभिषेक मुंजाळ यांनी सांगितले की, 'अल्प साधनं असूनही ओ. पी. मुंजाळ यांनी महत्त्वाकांक्षेमुळे यश मिळवले. स्वातंत्र्योत्तर देशाच्या वाटचालीसाठी स्वस्त आणि प्रभावी वाहतुकीचे साधन निर्माण करण्याकडे त्यांचे लक्ष होते.''

१९७५ मध्ये ही कंपनी भारतातील सर्वांत मोठी सायकल उत्पादक कंपनी बनली तर १९८६ मध्ये एका दिवसात सर्वाधिक बाईक बनविल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदण्याचा मान मिळवला.

पूर्वीच्या काळी आत्तासारखा गाड्यांचा सुळसुळाट नव्हता सायकल जास्त प्रमाणात वापरली जायची. कमी खर्चात कुठेही जाता येत होतं आणि मुख्य म्हणजे बाकीच्या वहानांपेक्षा जलद. तेव्हा बैलगाडी, घोडागाडी ही साधनं होती किंवा जास्तीत जास्त चालत जाणे हा पर्याय होता.

त्यामुळे त्या पार्श्‍वभूमीवर हिरो सायकल आली आणि लोकांना दिलासा मिळाला. आताही जरी वाहतुकीची साधनं मोठ्या प्रमाणावर झाली आहेत तरी सायकल मागे पडलेली नाही.





लहान मुलांसाठी तर सायकल हा पर्याय वापरायला सोपा आणि सुरक्षित आणि आता बरीच मोठी लोकंही पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सायकलचा वापर करताना दिसतात. त्यामुळे सायकल व्यवसाय वाढतच आहे कमी होत नाही.

चांगली व्यवस्थापन पद्धती, पारदर्शकता आणि त्रुटी तपासणी व त्यावर योग्य पर्याय निवडून काढण्यात हिरो सायकलला यश आले आहे त्यामुळे त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढतच आहे.

काही मोठ्या आणि जुन्या उद्योजकांना डिजिटलची लाट सर्वत्र असल्यामुळे उद्योगधंद्यात आव्हान वाटते, पण अभिषेकसारख्या तरुणाने हिरो सायकलबरोबर छान जुळवून घेतले आहे. व्यवसायात जर नवीन नवीन गोष्टी अ‍ॅड केल्या गेल्या तर फायदा नक्की होतो.

अभिषेक म्हणतात, ''आम्ही ग्राहक आणि उत्साही लोकांशी नियमितपणे कनेक्ट राहतो, आमच्या पुढच्या पिढीतील हिरो स्प्रिंट स्टोअरमध्ये सिम्युलेटेड राइड्स आणि मोबाईल अ‍ॅप उपलब्ध आहेत ज्यामुळे खरेदीदारास दुरुस्ती व देखभालीचे वेळापत्रक बसल्या जागी मिळते.

फक्त नेट चालू पाहिजे. मग बाहेर जायची गरज नाही.' जुन्या-नव्याची सांगड घालून त्यांनी व्यवसाय असा वाढवला आहे. हिरो सायकल्स ही देशातील सर्वांत मोठी सायकल कंपनी आहे.

आर्थिक वर्षांत अजून जास्त व्यवसाय करण्याचा आणि नवीन नवीन प्रॉडक्टस् लाँच करण्याचा कंपनीचा मानस आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात कंपनीची वाढ ८-९ टक्क्यांवरून २१ टक्क्यांवर गेली आहे. पुढील सहा महिन्यात अशीच वाढ होण्याची कंपनीला अपेक्षा आहे.





२०१८ मध्ये कंपनीने सुमारे ५ दशलक्ष सायकल्स विकल्या, त्यांनी एकूण उत्पादन ७ दशलक्षापेक्षा कमी केलं होतं. पंकज मुंजाळ म्हणाले, ''एप्रिल/मे पर्यंत आम्ही आमची १३००० सायकल बनविण्याची कॅपासिटी २०,००० नी त्यांची पार्टनर कंपनी जस्ट बाय सायकल्स बरोबर चेन्नईमध्ये सहा दुकाने उघडली आहेत.

राष्ट्रीय पातळीवर आता २५० दुकाने झाली आहेत आणि या आर्थिक वर्षाअखेर त्यांचा ४०० दुकाने उघडण्याचा मानस आहे. मुंजाळ म्हणाले, ''दोन वर्षांपूर्वी नोटाबंदीमुळे आणि जीएसटीमुळे बाजारातील शेअरचा हिस्सा २७ टक्क्यांपर्यंत आला होता.

पण आता सर्व स्थिती पूर्ववत होत आहे आणि तो हिस्सा आता ३५ पर्यंत वाढला आहे. तो ३९-४० टक्क्यांपर्यंत कसा वाढेल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. ते म्हणतात की, 'दक्षिणेत विशेषत: चेन्नई आणि बंगळूरमध्ये लोक आरोग्य, करमणूक यासाठी पैसे खर्च जास्त करतात.

आम्ही आता नवीन इबाईक सुरू करत आहोत त्याची किंमत २७,००० आहे. तेव्हा तिथली लोकं ही विकत घेतील अशी आशा आहे. ई-बाईक युरोपमध्ये जास्त प्रमाणात चालतात त्यामुळे त्याचे डिझाईन युरोपमधून ते शिकत आहेत.

आपल्या बजेटमध्येही विद्युत वाहनांवर काही सवलती दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे विद्युत वाहनं घेणं कस्टमरच्या दृष्टीनं फायद्याचं ठरू शकेल व कंपनीचा बिझनेसही वाढेल.

मेहनत आणि ग्राहकाची नस सापडली की बिझनेस चांगला होताच. तसंच या हिरो सायकल्सचं आहे. त्यांना ग्राहकाला काय हवं याची योग्य कल्पना आलेली आहे आणि त्यासाठी सतत नवीन नवीन प्रयोग करण्याची म्हणजेच कष्ट करण्याचीही त्यांची तयारी आहे त्यामुळे त्यांचा उद्देश नक्कीच सफल होईल यात शंका नाही.















by- https://m.dailyhunt.in/news/india/marathi/inmarathi+com-epaper-marpizza/samany+bharatiyammadhil+hiro+la+vegavan+chak+denarya+sade+tin+hajar+kotinchya+udyogachi+kahani-newsid-dhaa619ae7c9da4be09a24b7ebedeeea59_ded9e3d321383ea1a99b5d9a95a3fa61

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

ओपन सीक्रेट... ‘द सिक्रेट’


ओपन सीक्रेट...

‘बायबल’पासून प्रेरित होत राँडाने इच्छापूर्तीच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी म्हणजे, मागा. दुसरी पायरी म्हणजे, विश्वास ठेवा. तिसरी पायरी म्हणजे, प्राप्त करा. आपल्याला हवे ते मिळवणे याला लेखिका ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ म्हणते.


वि राँडा बर्न या ऑस्ट्रेलियन लेखिकेने ‘द सिक्रेट’ हे पुस्तक २००६ साली लिहिले आणि चित्रपटही काढला तेव्हा एकाही शिक्षकाने सहमती दर्शविली नव्हती. ऑपरा व्हीन्फ्रे शोमध्ये राँडाचे कौतुक झाल्यानंतर तिला खरी प्रसिद्धी मिळाली. पुस्तकाचा दोन कोटींवर खप, ५२ भाषांमध्ये अनुवाद आणि अधिक काळापर्यंत ‘बेस्ट सेलर’ राहण्याचा बहुमान हे या पुस्तकाच्या यशाचे आणि सिद्धांताचे प्रूफ मानायला हरकत नाही.


पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकाचा सार आपल्याला पूर्वीच माहीत असल्याचा अनुभव येतो. ‘Feel Good’ हे राँडा बर्नचे शब्द! ‘बायबल’पासून प्रेरित होत राँडाने इच्छापूर्तीच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत. पहिली पायरी म्हणजे, मागा (Ask). मागणी करा म्हणजे मिळेल. दुसरी पायरी म्हणजे, विश्वास ठेवा (Believe). हवी असलेली वस्तू मिळाली आहे असे गृहीत धरा. तिसरी पायरी म्हणजे, प्राप्त करा (Receive). त्या आनंदी अनुभवाच्या फ्रिक्वेंसीवर पोहचणे. आपल्याला हवे ते मिळवणे याला लेखिका ‘लॉ ऑफ अट्रॅक्शन’ म्हणते. आकर्षणाचा सिद्धांत सर्व बाबतीत सर्वांना लागू होतो, असा तिचा दावा आहे.


प्रत्यक्ष कर्मापेक्षा प्रेरित कर्म महत्त्वाचे. प्रेरित कर्म श्रमविरहीत असते. वैश्विक शक्तीच्या प्रवाहासोबत सहज प्राप्त होणारे असते. हवी असलेली प्रत्येक गोष्ट आकर्षित करू शकते. जसे पैसा, व्यक्ती, मित्र, आरोग्य. तुमचे मन चुंबकासारखे सर्व गोष्टी आकर्षित करू शकते. श्रद्धेने तुम्ही हवी ती गोष्ट साध्य करू शकता. यात श्रद्धेला जास्त महत्त्व दिले असून प्रत्यक्ष कृतीला दुय्यम समजले आहे, अशी टीकाही केली जाते.


मन ज्या गोष्टींची कल्पना करू शकते, ते मिळवूही शकते! त्यासाठी यशाचे ब्लू प्रिंट मनात असावे लागते. मानसप्रतिमा (व्हिज्युअलायझेशन) हे सफलतेचे रहस्य आहे. श्रद्धेने स्वप्न मजबूत होतात आणि शंकेने करपतात. मानसप्रतिमा रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर बघाव्यात. छोट्या गोष्टी प्राप्त झाल्या तर मोठ्या पण गोष्टी प्राप्त करण्याचे रहस्य अवगत होते. मनाची दिशा प्रत्येक दहाव्या पावलांवर बदलत असेल तर अंतिम टप्पा गाठणे कठीण आहे. एका दिशेने प्रवास करणे व फोकस करणे महत्त्वाचे.



बरेचदा एखादी गोष्ट हवी असते पण आपली भाषा विरोधाभासी असते. उदा. आपल्याला लवकर पोहचायचे असते, पण आपण ‘लेट होऊ, लेट होऊ’ असा जप करत असतो. मला घर बांधायचे आहे. ५० लाख लागतात. जवळ केवळ पाच लाख आहेत म्हणून ‘शक्य नाही, शक्य नाही’ असे म्हणत राहतो. इच्छा घराची आहे पण भाषा घर नको, अशी आहे. ‘मागा’ या बाबतीत सांगायचे झाले तर एक भक्त ‘परमेश्वराकडे मला घर पाहिजे’ अशी मागणी करतो. यात ‘घर होणार की नाही’ ही शंका नाही. फक्त मागणे स्पष्ट आहे. विचार जितका प्रबळ राहील, तितकी विचार खरा होण्याची शक्यता असते. ‘आय होप’ऐवजी ‘आय नो’, ‘आय नीड’ऐवजी ‘आय हॅव्ह’, ‘आय कान्ट’ऐवजी ‘आय कॅन’ असे बदल करावेत.


वजन उतरविण्यासाठी वजन कमी करणे या गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता, अपेक्षित आदर्श वजनावर केंद्रित करायला हवे. खाण्यामुळे माझे वजन वाढते ही भीती काढून टाकावी. अपेक्षित वजन प्राप्त करायला किती वेळ लागेल याचे लेखिकेचे उत्तर मात्र संभ्रमात टाकणारे आहे. ‘तुम्ही स्वतःला तुम्हाला हवे आहेत त्या फ्रीक्वेंसीवर नेऊन ठेवण्यात स्वतःला जो वेळ लागतो तो हा वेळ असतो’, असे ती म्हणते. लेखिकेच्या मते, चोरी, आजारपण किंवा अपघात आकर्षणाच्या नियमाप्रमाणेच घडतात. तरीही आकर्षणाचा नियम हा एक निसर्ग नियम आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे तो व्यक्तीनिरपेक्ष आहे.











by- No-Author | Maharashtra Times

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

या देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात भारतीय नागरिक, फक्त पासपोर्ट असणे आवश्यक...

 

PHOTO | या देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात भारतीय नागरिक, फक्त पासपोर्ट असणे आवश्यक

जेव्हा जेव्हा परदेशी प्रवासाची कल्पना मनात येते तेव्हा प्रथम चिंता व्हिसा (व्हिसाशिवाय प्रवास देश) बद्दल असते. परंतु असे बरेच देश आहेत जेथे आपण व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. (Indian citizens can travel to these countries without a visa, only a passport is required)

PHOTO | या देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात भारतीय नागरिक, फक्त पासपोर्ट असणे आवश्यक

शुक्रवार, २३ जुलै, २०२१

स्टार्टअप म्हणजे नेमके काय?...

 

स्टार्टअप म्हणजे नेमके काय?

नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचं हेसुद्घा समजणं आवश्यक आहे.

लहानसहान उद्योगधंदे आपल्याकडे यापूर्वीही सुरू झाले, चालवले गेले. पण आज तरुणाईला भुरळ पडली आहे ती स्टार्टअप संकल्पनेची. खरं तर स्टार्टअपची क्रेझच झाली आहे. पण म्हणून स्टार्टअप म्हणजे काय ते नेमकं माहीत झालं आहे असं नाही.

घरच्या फरशीची स्वच्छता करण्याचं काम गृहिणीसाठी फार वेळखाऊ आणि जिकिरीचं ठरतं. मग ती गृहिणी अमेरिकन का असेना! घरच्या फरशीची स्वच्छता करण्याचं काम सोपं व्हावं यासाठी १९९० मध्ये एका हरहुन्नरी, कल्पक गृहिणीने एका साध्या यंत्राचा शोध लावला. ‘मिरॅकल मॉप’ या नावाने ते यंत्र ओळखलं जाऊ  लागलं. ते वजनाला हलकं व्हावं यासाठी तिने प्लॅस्टिकचा दांडा वापरला आणि त्याच्या तळाशी लांबच लांब गुंडाळी होणारा कापसाचा बोळा बसवला. फरशीची सफाई झाल्यावर गृहिणीचे हात ओले न होता तो तळाचा कापूस बदलण्याची स्वयंचलित सोय त्यात केली होती. इतकी झकास कल्पना आणि ते यंत्र लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, हा विचार करत तिने अमेरिकेतील होम शॉपिंग नेटवर्कच्या वाहिनीचा आधार घेत आपल्या यंत्राची प्रात्यक्षिकं द्यायला सुरुवात केली. अल्पावधीत तो मॉप लोकप्रिय झाला आणि त्याची तडाखेबंद विक्री होऊ  लागली. लहानशा पण कल्पक मॉपच्या जोरावर ती गृहिणी गृहोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीची उद्योजिका झाली. जॉय मँगॅनो हे तिचं नाव. ‘इंजिनीअर्स डिझाइन्स’च्या मालकीण असलेल्या या जॉयबाईंच्या जीवनावर ‘जॉय’ नावाचा चित्रपट गेल्या महिन्यात नाताळला प्रदर्शित झाला. सर्जक उद्योजिका असलेल्या जॉयबाईंचा जीवनप्रवास तितकाच प्रेरणादायी आहे. फक्त मॉपच नाही तर प्राण्यांसाठी असलेल्या ‘फ्लोरेसंट फ्ली कॉलर’च्या निर्मितीसाठीही त्या ओळखल्या जातात. ही कल्पना त्यांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच प्रत्यक्षात आणली. आता फ्लोरेसंट फ्ली कॉलर ही काय नवी भानगड! अशी शंका जर मनात आली असेल तर तिचं निरसनसुद्धा व्हायला पाहिजे. रात्रीच्या वेळी वाहनांचे धक्के लागून जखमी किंवा मृत होणाऱ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी त्यांनी फ्लोरेसंट फ्ली कॉलरची शक्कल लढवली. जॉयबाईंच्या या उदाहरणावरून आपल्याला काय कळतं, तर एका लहानशा गरजेतून, युक्तीतून त्यांनी उद्योगाची सुरुवात झाली. तो उद्योग सुरुवातीला खूप लहान होता पण त्यात नावीन्य होते, व्यवसायवाढीला वाव होता. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी स्टार्टअप उद्योग सुरू केला होता.

स्टार्टअप (उद्यमारंभ) या शब्दाने गेल्या दशकभरात विशेषत: तरुणाईला भुरळ घातली. आजघडीला ‘मला स्टार्टअप सुरू करायचंय’, असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तेव्हा स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, त्याचं वाढतं आकर्षण का आहे, त्याला आज इतकं महत्त्व का दिलं जात आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे.

आज ‘स्टार्टअप’ या संकल्पनेची नेमकी आणि सर्वमान्य व्याख्या देता येणार नाही. वेबस्टर कोशाप्रमाणे स्टार्टअप म्हणजे ‘द अ‍ॅक्शन ऑर प्रोसेस टू गेट समथिंग इन मोशन’ अर्थात् एक ठरावीक गती येण्यासाठी केलेली कृती वा प्रक्रिया. दुसरी एक व्याख्या केली जाते ती म्हणजे उद्योगाच्या किंवा उद्योजकाच्या आयुष्यातील प्रारंभिक अवस्था जिचा प्रवास कल्पनेकडून उद्योगसंरचना, संलग्न अर्थव्यवहारांपर्यंत होतो. प्रसिद्ध उद्यमगुरू स्टीव्ह ब्लँक यांच्या मते स्टार्टअप म्हणजे (भविष्यकालीन) नफ्याचा विचार करून सुरू केलेली अंशकालीन (हंगामी / अस्थायी) उद्योगसंरचना.

स्टार्टअप आणि लघुउद्योग यांतील फरक

बऱ्याचदा स्टार्टअप म्हणजे फक्त एखादा लहान उद्योग अशी गैरसमजूत होते. मात्र त्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. कुठल्याही स्टार्टअपमध्ये भविष्यात मोठा उद्योग होण्याची क्षमता असते. ब्लँक यांच्या मते स्टार्टअप उद्योगाच्या मालकाला फक्त स्वत:च स्वत:चा बॉस व्हायची इच्छा नसते तर जग जिंकायची महत्त्वाकांक्षा असते. पहिल्यापासूनच आपली ‘आयडिया’ कशी सर्वोत्तम आहे आणि तिच्या जोरावर बाजारपेठ कशी काबीज करता येईल आणि आपली कंपनी कशी मोठी होईल, उपलब्ध पर्याय सोडून ग्राहक आपल्याकडे नव्याने कसे वळतील किंवा आपणच नवी बाजारपेठ कशी तयार करू शकतो, याचा विचार असतो. आपल्या उत्पादनाची वैशिष्टय़े सांगत त्याला एक ठरावीक दृष्टी देणे, ग्राहक, वितरणव्यवस्था, अर्थकारण इ. ठळक घटकांचा अभ्यास स्टार्टअप उद्योजकाला करावा लागतो.

मग लघुउद्योग कशाला म्हणायचं? अमेरिकन लघुउद्योग संघटनेनुसार लघुउद्योग म्हणजे स्वतंत्र मालकीचा संचालित आणि नफ्याचे उद्दिष्ट ठेवून केलेला उद्योग. त्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे असा उद्योग बाजारपेठेत फार प्रबळ, वर्चस्ववादी नसतो, कारण त्याचा मुख्य उद्देश हा स्थानिक बाजारपेठ काबीज करणे नसून तिच्यात स्थिर होणे हा असतो.

स्टार्टअप या शब्दाला गेल्या काही वर्षांत ग्लॅमर मिळालं. नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचं हेसुद्घा समजणं आवश्यक आहे. एखाद्या गृहिणीने नव्याने सुरू केलेले पोळी-भाजी केंद्र हे तिच्यासाठी स्टार्टअपच असते. फरक इतकाच की त्या केंद्राला कोणी स्टार्टअप म्हणत नाही किंवा प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटलिस्टकडून त्या केंद्राला काही आर्थिक साहाय्य दिले जात नाही. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्या पोळी-भाजी केंद्राचे उद्या एक रेस्तराँ होऊ  शकते.

व्यवहाराच्या सोयीसाठी ‘नॅसकॉम’ संघटनेने एक व्याख्या प्रस्तावित केली जिचा ‘स्टार्टअप इंडिया’च्या कृतिआराखडय़ात समावेश केला. त्यानुसार गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत भारतात नोंदणी झालेल्या आणि प्रारंभिक वर्षांत २५ कोटींपेक्षा जास्त कारभार नसलेल्या उद्योगाला स्टार्टअप म्हटलं जावं.

स्टार्टअपविषयी एक गैरसमज प्रचलित आहे, तो म्हणजे फक्त तरुणांनी सुरू केलेल्या उद्योगांनाच स्टार्टअप म्हणायचं का? याचं उत्तर अर्थात ‘नाही’ असंच आहे. कारण उद्योग सुरू करण्यासाठी ठरावीक वयोमर्यादेची आवश्यकता अजिबात नसते. शिवाय उद्योगाची संकल्पना वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुचू शकते. मात्र हेही खरं की आज भारतातील एकूण स्टार्टअप उद्योजकांपैकी ७२ टक्के उद्योजक हे पस्तीशीच्या आतील आहेत. तर मग तरुणाईमध्ये स्टार्टअपची इतकी क्रेझ का आहे, याचं उत्तर म्हणजे यशस्वी उद्योगांतून मिळणारी प्रेरणा, दूरसंचार क्रांती आणि मोबाइलच्या सर्वदूर वापरामुळे तंत्रज्ञानविषयक स्टार्टअपना मिळणारा मोठा ग्राहकवर्ग, सोप्या रीतीने होणारा पतपुरवठा, उद्योगपूरक वातावरणनिर्मिती इत्यादी.

याचा एक फायदा असा झालाय की तंत्रज्ञानविषयक स्टार्टअपची संख्या आणि लोकप्रियता वेगाने वाढत आहे. मोबाइल ‘स्मार्ट’ झाल्यापासून बरेचसे आर्थिक व्यवहार त्याद्वारे होऊ  लागले. मग ती खरेदी-विक्री असो वा बँकिंग. वाढत्या युवावर्गाचा आणि प्रौढ ग्राहकांचा कल ओळखत मोबाइलद्वारे सेवा पुरवणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सची संख्या वाढली. शिवाय अशी अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी येणारा भांडवली खर्च कमी असतो. त्यात नावीन्यपूर्णतेला वाव जास्त असतो आणि ग्राहकांचाही प्रतिसाद त्वरित मिळतो. मात्र याचा अर्थ असा नाही की स्टार्टअप फक्त तंत्रज्ञानाशीच निगडित असतात. उदाहरणार्थ अशी कल्पना करूया की आपल्या देशात फिरायला आलेल्या एका सायकलवेडय़ा पर्यटकाला एका शहरातून हजारो किलोमीटर्स दूर असलेल्या दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळी सायकलनेच जायचं आहे. मात्र त्याच्याजवळ त्याक्षणी स्वत:ची अत्याधुनिक सायकल नाही, पण तो भाडय़ाने घेऊ  शकतो. अशा वेळी जर त्याला कोणी सायकल पुरवली किंवा त्यासाठी एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करून त्याद्वारे मागणी नोंदवण्याची सोय करून दिली तर तोही एक स्टार्टअपच होईल. तात्पर्य काय, तर काहीतरी हटके किंवा स्वत:च्या मालकीचं सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षेतून सुचलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पनेत उद्योग होण्याची क्षमता आहे का आणि ती असेल तर त्या दृष्टीने भविष्यकालीन वृद्धीचा विचार करत जो उद्योग उभारला जाईल, त्याला स्टार्टअप म्हणता येईल.
ओंकार पिंपळे











by- loksatta

माझ्याबद्दल