या ब्लॉगच्या माध्यामातून मी शेती व अन्य क्षेत्राशी संबंधित उपयुक्त माहिती संकलित करून माहितीचे केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जी माहिती टाकली आहे ती माझी स्वतः ची तसेच विविध वेब साईट, वृत्तपत्र, मासिके, नियतकालिके आणि अनेक अभ्यासू लेखक, अनुभवी शेतकरी, जागरूक नागरिक यांच्या सौजन्याने टाकली आहे. हे सर्व करत असतांना काही लेखांचे, लेखकांचे पूर्ण संदर्भ मिळाले नाही तरी देखील त्यांचे, वरनमूद स्रोत यांचे आभार .... मी या समाजपयोगी ब्लॉगच्या कार्यात निमित्त मात्र आहे !.. आपला, * डी . सचिन
गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०२०
शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०
काय आहेत नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या 9 रंगाचे ...
काय आहेत नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या 9 रंगाचे महत्त्व (Importance Of Navratri Colors)
Dipali Naphade | ऑगस्ट 13, 2020

दिवस पहिला - रंग नारिंगीदुसरा दिवस - रंग पांढरातिसरा दिवस - रंग लालचौथा दिवस - रंग गडद निळादिवस पाचवा - रंग पिवळादिवस सहावा - रंग हिरवादिवस सातवा - रंग करडादिवस आठवा - रंग जांभळादिवस नववा - रंग मोरपिशी
नवरात्र म्हटलं की उत्साह. आजूबाजूला नऊ दिवस अगदी आनंदी वातावरणाचे दिवस आपल्याला प्रत्येकालाच अनुभवायला मिळतात. मुळात नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगांना महत्त्व असते. आपण नेहमी पाहतो की आपल्या आजूबाजूला अगदी पहिल्या दिवसापासून ते नवव्या दिवसापर्यंत ठराविक रंगांना महत्त्व असते. पण नवरात्रीच्या वेळी हे वेगवेगळे 9 रंग नक्की का घातले जातात? त्यांचे काय महत्त्व आहे याची तुम्हाला माहिती आहे का? दुर्गाची नऊ वेगवेगळी रूपं आणि त्याप्रमाणे त्याचे रंग या दिवशी घालायची प्रथा आहे. भारतामध्ये दुर्गा अर्थात देवीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक आख्यायिकादेखील आहेत. नवरात्रीच्या या उत्सवात नवरात्रीचे नऊ रंग आणि रंगांची उधळण कशाप्रकारे असते आणि कोणते रंग वापरण्यात येतात, त्याचे काय महत्त्व आहे हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. दुर्गेची नऊ रूपं अर्थात शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, काळरात्री, महागौरी आणि सिद्धीत्री यांची या दिवसात पूजाअर्चा करण्यात येते. या देवींना आवडणाऱ्या रंगांवरून नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या रंगांचे महत्त्व ठरलेले आहे. जाणून घेऊया कोणत्या देवीसाठी कोणता रंग महत्त्वाचा आहे आणि त्याचे माणासच्या आयुष्यात काय स्थान आहे. पण बरेचदा वारानुसारही रंगाची निवड करण्यात येते. उदाहरणार्थ पहिला दिवस शनिवार आला तर यादिवशी ग्रे अर्थात करड्या रंगाची निवड केली जाते. पण मूळ रंग आणि त्याचे महत्त्व हे देवीच्या आवडीनुसार असल्याचे म्हटले जाते. गेल्या दशकापासून ही प्रथा जास्त प्रचलित झाली आहे. एकाच रंगाची वस्त्र परिधान केल्याने एकोपाचा संदेश देण्यात येतो अशी यामागची भावना आहे. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा!
दिवस तारीख देवी रंग
पहिला 17 ऑक्टोबर 2020 शैलपुत्री नारिंगी
दुसरा 18 ऑक्टोबर 2020 ब्रम्हचारिणी पांढरा
तिसरा 19 ऑक्टोबर 2020 चंद्रघंटा लाल
चौथा 20 ऑक्टोबर 2020 कुष्मांडा गडद निळा
पाचवा 21 ऑक्टोबर 2020 स्कंदमाता पिवळा
सहावा 22 ऑक्टोबर 2020 कात्यायिनी हिरवा
आठवा 23 ऑक्टोबर 2020 काळरात्री करडा
नववा 24 ऑक्टोबर 2020 सिद्धीत्री मोरपिशी
TABLE OF CONTENTS
दिवस पहिला - रंग नारिंगी अर्थात भगवा
दुसरा दिवस - रंग पांढरा अर्थात सफेद
तिसरा दिवस - रंग लाल
चौथा दिवस - रंग रॉयल ब्लू अर्थात गडद निळा
दिवस पाचवा - रंग पिवळा
दिवस सहावा - रंग हिरवा
दिवस सातवा - रंग करडा
दिवस आठवा - रंग जांभळा अथवा वांगी कलर
दिवस नववा - रंग मोरपिशी
दिवस पहिला - रंग नारिंगी अर्थात भगवा

नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री देवीचा मानण्यात येतो. शैलपुत्री देवी दुर्गाचे पहिले रूप आहे. नवदुर्गेतील ही पहिली दुर्गा असल्याने या देवीची पूजा पहिल्या दिवशी करण्यात येते. पर्वतराज हिमालयच्या पोटी जन्म घेतल्यामुळे हिचे नाव शैलपुत्री असे ठेवण्यात आले. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या देवीची उपासना करण्यात येते. या देवीचा आवडता रंग नारिंगी असून तिला जास्वंदीचे फूल प्रिय असल्याचे समजण्यात येते. त्यामुळे या दिवशी नारिंगी रंगाच्या कपड्यांचे परिधान करण्यात येते. या दिवशी भगव्या रंगाचे परिधान केल्यास, शैलपुत्री प्रसन्न होते असा समज आहे. शैलपुत्री देवी भाग्य उजळवते असं म्हटलं जातं. त्यामुळे या पहिल्या दिवशी तिची पूजाअर्चा करून तिला तिचे भक्त प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात.
दुसरा दिवस - रंग पांढरा अर्थात सफेद

नवरात्रीचा दुसरा दिवस हा ब्रम्हचारिणी देवीचा मानण्यात येतो. दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. या दिवशी देवीची भक्ती आणि उपासना करण्यात येते. ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी. तपस्या आचरणात आणणारी ही देवी असल्याने या देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी कठोर तपस्या करावी लागते. या देवीच्या उजव्या हातात जपमाळा आणि डाव्या हातात कमंडलू असते असे सांगण्यात येते. कुंडलिनी शक्ती जागृत करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते असं म्हटलं जातं. तप, त्याग, संयम यासाठी ही देवी प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच या देवीचा आवडता रंग हा पांढरा आहे. पांढरा रंग हा आयुष्यात संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो. त्यामुळे या देवीची उपासना करण्यासाठी पांढऱ्या रंगाचे महत्त्व आहे. तसंच ही ज्ञानदेवता असल्याचेही समजण्यात येते.
तिसरा दिवस - रंग लाल

दुर्गा देवीच्या तिसऱ्या शक्तींचं नाव आहे चंद्रघंटा आणि तिसऱ्या दिवशी या देवीच्या पूजेला अत्याधिक महत्त्व आहे. या दिवशी विग्रह पूजन आणि आराधना करण्यात येते. मणिपूर चक्रामध्ये प्रविष्ट होण्यासाठी भक्त या देवीची आराधना करतात. देवी चंद्रघंटेच्या कृपेने अलौलिक शक्तीचे दर्शन मिळते, तसेच दिव्यदृष्टींचा अनुभव घेता येतो असे सांगण्यात येते. या देवीची पूजाअर्चा करताना दिव्य ध्वनी ऐकायला येतात असंही सांगितलं जातं. या देवीचा आवडता रंग आहे लाल. आयुष्यात आनंद आणि उत्साह येण्यासाठी आणि भक्तीरसात राहण्यासाठी या लाल रंगाचं महत्त्व जाणलं जातं. त्यामुळे या देवीला लाल रंग प्रिय आहे. म्हणून या तिसऱ्या दिवशी लाल रंगाची वस्त्र परिधान करावीत असं सांगितलं जातं. या देवीच्या कपाळाचा आकार हा अर्धचंद्राप्रमाणे असल्यामुळेच या देवीला चंद्रघंटा देवी नावाने ओळखलं जातं. लाल रंग हा पराक्रमाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच या देवीला हा रंग प्रिय असल्याचे समजण्यात येते.
चौथा दिवस - रंग रॉयल ब्लू अर्थात गडद निळा

दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा. या देवीला गडद निळा रंग जवळचा आहे म्हणून चौथ्या दिवशी या रंगाची वस्त्र परिधान करावीत. दुष्कर्म करणाऱ्या आणि राक्षसी शक्तीचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. जेव्हा सृष्टीचं अस्तित्व नव्हतं तेव्हा या देवीनेच ब्रम्हांडाची रचना केली अशी आख्यायिका आहेत. त्यामुळे दुर्गेचे हे आदिशक्ति रूप मानण्यात येते. सूर्यमंडळात या देवीचे वास्तव्य असून आठ हात असल्याने ही देवी अष्टभुजा नावानेही प्रचलित आहे. कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा अशी आयुध प्रत्येक हातात असून एका हाताने आशिर्वाद देणारी ही देवी सिद्धी प्राप्त करण्यास प्रोत्साहन देते असा समज आहे. त्यामुळेच सुखकारक गडद निळा रंग या देवीचा आवडता रंग असल्याचेही सांगण्यात येते. यामुळेच या दिवशी गडद निळ्या रंगाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. चांगले आरोग्य, संपत्ती आणि बळकटी येण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते.
नवरात्रीच्या उपवासाचे 9 फायदे घ्या जाणून, शरीर राहतं निरोगी
दिवस पाचवा - रंग पिवळा

पिवळा रंग हा दुर्गेचे पाचवे रूप स्कंदमाता देवीचा सर्वात आवडता रंग आहे. भक्ताच्या समस्त बाह्यक्रिया लोप पावून चैतन्य आणण्याचे काम ही देवी करते असे समजण्यात येते. पिवळा रंग हा अग्रेसर असून उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे. म्हणूनच या देवीचा हा आवडता रंग असून याला पाचव्या दिवशी परिधान करण्याचे महत्त्व आहे. लौकिक, सांसारिक बंधनातून मुक्त होऊन उपासना करण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते. या देवीच्या पूजेसाठीदेखील पिवळ्या फुलांचा वापर करण्यात येतो. पंचमी पूजा ही अत्यंत महत्त्वाची मानण्यात येते. घरात सुखशांती, समाधान आणि धनलाभ व्हावा यासाठी या देवीची आराधना आणि पूजा केली जाते. सतत प्रसन्न वाटण्यासाठी या पिवळ्या रंगाला अनन्यसाधारण महत्त्व या दिवशी प्राप्त झाले आहे. स्कंद अर्थात कुमार कार्तिकेय यांचं दुसरं नाव आहे. प्रसिद्ध देवासुर युद्धात देवांचे सेनापती म्हणून कार्तिकेय यांनी काम पाहिले होते. पुराणात सांगितल्यानुसार कुमार आणि शक्ती अशी यांची महिमा आहे. या स्कंदाची आई म्हणून दुर्गेचे पाचवे स्वरूप स्कंदमाता म्हटले जाते अशी आख्यायिका सांगण्यात येते.
दिवस सहावा - रंग हिरवा

परमेश्वराच्या नैसर्गिक क्रोधातून उत्पन्न झालेले हे देवी दुर्गेचे सहावे रूप म्हणजे कात्यायिनी. लाल रंगाशी जोडलेली असली तरीही या देवीचा आवडता रंग हिरवा समजण्यात येतो. षष्ठीच्या दिवशी या देवीची पूजा करण्यात येते. स्कंद पुराणात सांगितल्याप्रमाणे सिंहावर आरूढ होऊन महिषासुराचा वध या देवीने केला होता त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही नाव आहे. कालिका पुराणात ओडिसामध्ये कात्यायनी आणि भगवान जगन्नाथ यांचे स्थान सांगण्यात आले आहे. आज्ञा चक्र या दिवशी स्थित होत असून योगसाधनेत याचे महत्त्व आहे. अविवाहित मुलींसाठी ही देवी एक वरदान आहे. वैवाहिक जीवनात सुखशांती, समाधान मिळवून देण्यासाठी या देवीची महिला पूजाअर्चा करतात. त्यामुळेच हिरव्या रंगालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. हिरवा रंग हा वैवाहिक जीवनाशी जास्त संबंधित मानला जातो.
जाणून घ्या महाराष्ट्रातील शक्तिपीठांचे महत्व आणि आख्यायिका
दिवस सातवा - रंग करडा

नवरात्रीतील सप्तमीच्या दिवशी काळरात्री देवीची आराधना करण्यात येते. याची पूजाअर्चा पापांपासून सुटका मिळावी आणि आपल्या शत्रूचा नाश व्हावा यासाठी करण्यात येते. सातव्या दिवशी या देवीचा जप करण्यात येतो. या दिवशीचा रंग करडा आहे. या देवीला करडा रंग प्रिय असून ही देवी दिसायला भयानक असली तरीही नेहमी शुभफळ देणारी देवी मानण्यात येते. दुष्टांचे विनाश करणारी ही देवी असून हिच्या स्मरणाने दानव, दैत्य, राक्षस, भूत, पिशाच भयभीत होतात असा समज आहे. ग्रहांच्या बाधा दूर करण्यासाठीही या देवीची आराधना केली जाते. म्हणूनच यासंबंधित करडा रंग या देवीला प्रिय आणि महत्त्वाचा मानण्यात येतो. आयुष्यातील अंधःकार दूर करण्यासाठी या देवीला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे काळरात्रीची पूजा ही सप्तमीला करण्यात येते.
दिवस आठवा - रंग जांभळा अथवा वांगी कलर

महागौरी हे दुर्गेचे आठवे रूप असून तिचा आवडता रंग जांभळा अथवा वांगी कलर समजण्यात येतो. आयुष्यात सुंदर आणि अधिक चांगले होण्यासाठी या रंगाची निवड करण्यात येते. शांती आणि समाधानाचा हा रंग प्रतीक समजण्यात येतो. पूर्वसंचित पाप नष्ट करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. महागौरीने भगवान शिव पती मिळावे म्हणून कठोर तपस्या केली होती. या तपस्येने पार्वतीचे रूप हे सावळे होते मात्र त्यानंतर भगवान शिव पार्वतीला वरदान देऊन तिला गौर वर्ण देतात अशी आख्यायिका आहे म्हणूनच तिला महागौरी असंही नाव देण्यात आलं आहे. आपल्या नवऱ्याला भरपूर आयुष्य मिळावं म्हणून अष्टमीच्या दिवशी या देवीची महिला आराधना आणि पूजा करतात. तसंच या दिवशी लहान मुलींचीही पूजा करण्यात येतात. त्यामुळेच प्रसन्न वातावरणासाठी हा जांभळा रंग निवडण्यात आला आहे.
बाप्पाचा नेवैद्य असतो खास, कसे वाढावे ताट
दिवस नववा - रंग मोरपिशी

नवरात्रीच्या नऊ रंगांचे महत्त्व तर आपण जाणून घेतले. मात्र गेल्या काही वर्षात हा एक ट्रेंड सुरू झाला असून याआधी कुठेही त्याचा उल्लेख नाही असं जाणकार खगोलशास्त्रज्ञ दा. कृ. सोमण यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. मात्र या देवींचे आवडते रंग आणि उल्लेख हे पुराणात देण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे. या नवरात्रीलाही तुम्ही हे रंग निवडा आणि तुमची नवरात्र करा खास. या देवींच्या आराधनेसाठी हे रंग वापरण्यात येतात आणि त्याचे महत्त्व अशाप्रकारे आहे. मात्र हल्लीच्या ट्रेंडनुसार हे रंग बदलत असतात. त्यामुळे तुम्ही ट्रेंडनुसार फॉलो करायचं की देवीच्या रंगांनुसार महत्त्व द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवा. पण तरीही या नवरात्रीतही तुम्ही मस्तपैकी नवरात्रीचे नऊ रंग उधळण करत नवरात्र साजरी करा.
https://marathi.popxo.com/2020/08/importance-of-navratri-colors-in-marathi/
सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०
वृत्तपत्र व पुस्तक नोंदणी कायदा...
वृत्तपत्र व पुस्तक नोंदणी कायदा
आधुनिक काळात प्रसार माध्यमांचा समाज जिवनावर अतिशय खोलवर प्रभाव पडत आहे. अशा या नवमाध्यम युगात वृत्तपत्र तसेच इतर छापिल माध्यमे देखिल आपली महत्त्वाची भुमिका बजावत आहेत. वृत्तपत्रस्वातंत्र्य ही जरी एक व्यापक संकल्पना असली तरी या माध्यमातून काहीही छापण्याचा अधिकार या माध्यमांना नाही. म्हणून वृत्तपत्रांना देखिल कायद्याच्या चौकटीचे पालन करून आपली माध्यमांची भुमिका बजावणे भाग पडत आहे.
१२. प्रेस रजिस्ट्रारला चुकीची माहिती दिल्यास ५०० रू. दंड होतो.
१३. मुद्रक, प्रकाशक किंवा संपादक यांच्यामध्ये बदल करावयाचा असेल तर मॅजिस्ट्रेटला याची माहिती देणे आवश्यक असते
वृत्तपत्र आणि कायदा या दोघांचाही अतिशय जवळचा संबंध आहे. अशा या वृत्तपत्राशी संपादक, पत्रकार, व्यवस्थापक इ.चा संबंध येतो. या सर्वांना कायद्याच्या चौकटीचे पालन करूनच आपले कर्तव्य पार पाडावे लागते. काही कायदे वृत्तपत्रांना व इतर तत्सम माध्यमांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लागू होतात. त्यापैकीच एक प्रत्यक्ष लागू होणारा कायदा म्हणजे “वृत्तपत्र व पुस्तकनोंदणी कायदा ” म्हणजेच (The Press & Regestration of Books Act)
कायद्यात नमूद करण्यात आलेल्या बाबी/बदल पुढील प्रमाणे :
१. प्रकाशीत होणा-या प्रत्येक वृत्तपत्रावर त्याचा मुद्रक,प्रकाशक व जेथुन प्रकशीत होते त्या ठिकाणाचा उल्लेख असणे आवश्यक आहे.
२. वृत्तपत्र प्रकाशीत करावयाचे असल्यास जिल्हा दंडाधिकारी किंवा तत्सम दर्जाच्या अधिका-याकडे आवश्यक तपशीलाची नोंद असणे आवश्यक आहे.
३. वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर आवश्यक तपशीलाची नोंदणी असणे आवश्यक आहे.
४. वृत्तपत्राची भाषा, प्रसिध्दीकाळ, संपादक, प्रकाशक, नाव, इ.मध्ये बदल झाल्यास त्याची माहिती संबंधित अधिका-यास देऊन नवे नोंदणी पत्र घेणे आवश्यक आहे.
५. अंकाचे मुद्रक, प्रकाशक यांना वृत्तपत्राची भाषा, प्रसिध्दीकाळ यांची माहिती देऊन मालकाच्या अधिकारपत्रासह घोषणापत्रावर जिल्हा दंडाधिका-यासमक्षस्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
६. नोंदणीपत्र मिळाल्यापासुन सहा आठवडे, साप्ताहीकाच्या बाबतीत तीन महिने अंक प्रकाशीत होऊ न शकल्यास नोंदणीपत्र रद्द होते.
७. संपूर्ण वर्षभर वृत्तपत्र निघु शकले नाही तर नोंदणीपत्र रद्द होते
५. अंकाचे मुद्रक, प्रकाशक यांना वृत्तपत्राची भाषा, प्रसिध्दीकाळ यांची माहिती देऊन मालकाच्या अधिकारपत्रासह घोषणापत्रावर जिल्हा दंडाधिका-यासमक्षस्वाक्षरी करणे आवश्यक आहे.
६. नोंदणीपत्र मिळाल्यापासुन सहा आठवडे, साप्ताहीकाच्या बाबतीत तीन महिने अंक प्रकाशीत होऊ न शकल्यास नोंदणीपत्र रद्द होते.
७. संपूर्ण वर्षभर वृत्तपत्र निघु शकले नाही तर नोंदणीपत्र रद्द होते
९. एखादे दैनिक, साप्ताहिक, अर्धसाप्ताहिक आपल्या ठरलेल्या संख्येपेक्षा कमी निघाल्यास नोंदणीपत्र रद्द किंवा अमान्य होते.
(साप्ताहिकाला वर्षाला ५२ अंक प्रकाशीत करण्याची अनुमती असते. यामध्ये २६ पेक्षा कमी अंक प्रकाशीत झाल्यास साप्ताहिकाची नोंदणी रद्द होते)
१०. प्रेस रजिस्ट्रारला दरवर्षी प्रकाशनासंबंधीचे विवरण पाठविणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ते वृत्तपत्रात छापणेही बंधनकारक असते.
१०. प्रेस रजिस्ट्रारला दरवर्षी प्रकाशनासंबंधीचे विवरण पाठविणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे ते वृत्तपत्रात छापणेही बंधनकारक असते.
कायद्याची आंमलबजावणी
सर्वसाधारण वयोगटातील वाचक/प्रेक्षकांवर दुष्परिणाम घडवू शकेल अशा साहित्याबाबत भारतीय दंड संहितेच्या कलम २९२ व २९३ प्रमाणे कारवाई होऊ शकते. बीभत्स, अश्लिलता, कामोद्दीपक किंवा कुकर्म करण्यास प्रवृत्त करेल असे कोणतेही पुस्तक, पत्रक, कागद, चित्र, आकृती, रेखाटन, छायाचित्र किंवा इतर कोणत्याही प्रकारचे लेखन वा प्रकाशन करणे हा संहितेप्रमाणे गुन्हा ठरतो. अशा प्रकारे समाजातील कोणत्याही व्यक्तिने अशा लेखन वा प्रकाशनावर हरकत घेतल्यास त्या लिखाणाशी वा प्रकाशनाशी संबंधित व्यक्तिवर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो.
PRB Act नुसार कोणतेही वृत्तपत्र व पुस्तक छापून झाल्यानंतर त्याच्या प्रति सरकार ठरवून देईल त्या अधिका-याकडे मुद्रकाने विनामुल्य पाठविणे आवश्यक असते. या प्रति पाठवण्यासाठी येणारा सर्व खर्च मुद्रकाने करावयाचा असतो. याशिवाय सरकारने ठरवुन दिलेल्या जास्तीतजास्त पाच वाचनालयांना या प्रति मुद्रकाने विनामुल्य व स्वखर्चाने पुस्तक तयार झाल्यापासुन एका महिन्याच्या आत पाठवाव्या लागतात.
वरील प्रति मुदतीत पाठवीणे मुद्रकास सोयीस्कर व्हावे म्हणून प्रकाशकाने आवश्यक तेवढ्या प्रति मुद्रकास मुदतीच्या आत उपलब्ध करून देणे आवश्यक असते.
उदाहरण-
ओरंगाबाद येथुन प्रकाशित होणार सा.विपलव टाईम्स याला नोंदणीपत्र मिळाले. परंतु वर्षभर त्याची छपाई न झाल्याने त्याचे नोंदणीपत्र रद्द झाले.
by - unknown
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)