रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

पुरंदरचा वेढा व तह...

पुरंदरचा वेढा व तह


किल्ले पुरंदर हा शिवरायांचा प्रचंड व बळकट किल्ला होता. हा किल्ला घेतल्याशीवाय शिवरायांचा बिमोड होऊशकणार नाही,हे दिलेरखानाला माहीत होते. आणि त्यामुळेच दिलेरखानाने पुरंधरला वेढा दिला होता. दिलेरखानाची फौज फार मोठी होती,पण पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता. आणित्याच्याजवळचे सैनींक मोठे शूर गडी होते. हे सगळे शूर सैनिक घेऊन मुरारबाजी लढाईसाठी उभा राहिला. दिलेरखानाच्या तोफा कडाडू लागल्या. आणि तोफेचे लालभडक गोळे किल्ल्यावर कोसळू लागले,परंतुमुरारबाजी व त्याचे सैन्य बाजूला हटले नाहीत,उलट ते अधिक जोराने झुंजू लागले. मुघलांनी तोफांचा भडीमारकेला. आणि माचीचा बुरुज ढासळला. तेवढ्यात मुघल माचीवर घुसले. आणि दिलेरखानाने माची जिंकली. नंतर मराठ्यांनी वरच्या माचीचा आधार घेतला. आणि ते लढतच राहिले. दिलेरखान आपल्या छावणीतून हिलढाई बघत होता. मुरारबाजी रागाने लाल झाला होता. मुरारबाजीने पाचशे मावळे निवडले. 








आणि त्यांना घेऊन त्याने मुघलांवर हल्ला करण्याचा बेत केला. आणि बालेकिल्याचा दरवाजा उघडला. आणि'हर हर महादेव'अशी गर्जना करत मुरारबाजी आणि त्याचे मावळे मुघलांवर तुटून पडले. थोडा वेळ भयंकरलढाई झाली. मुघलांचे सैन्य अफाट होते,तरीही मराठ्यांनी त्या सैन्याचा धुव्वा उडवला. आणि शेवटी मुघलांनीमाघार घेतली. आणि ते दिलेरखानाच्या छावणीकडे जीव मुठीत घेऊन पळत सुटले. मुरारबाजीने तेपाहिले,आणि त्यांनी त्यांचा पाठलाग केला. मुराजबाजींचे सैन्य छावणीत घुसले. आणि एकच गोंधळ मजला. धावाधाव,आरडाओरडा,किंकाळ्या यांचा हाहाकार उडाला. दिलेरखान घाई घाईने हत्तीवर अंबारीत बसला. आणि त्याने समोर पाहिले,तोच त्याला मुरारबाजी दिसला. मुरारबाजींची तलवार कोणाच्याछाताडात,कोणाच्या मस्तकात,तर कोणाच्या कंठात घुसत होती. मुरारबाजी कोणालाही आवरत नव्हता. त्याचेशौर्य पाहून दिलेरखान थक्क झाला. आणि दिलेरखानाला पाहून मुरारबाजी चवताळला. 'कापा,तोडा,मुडदेपाडा,असे ओरडून मुरारबाजी शत्रूवर तुटून पडला. त्याची समशेर जोराने फिरू लागली. जो आड आला,तो ठारझाला. त्यामुळे या एकट्या वीराला मुघलांनी चारी बाजूनी घेरले. इतक्यात दिलेरखान अंबारीतूनओरडला,''थांबा'' मुगल थांबून मागे सरले. खान मुरारबाजींना म्हणाला,''मुरारबाजी,तुझ्यासारखा समशेरबहाद्दरमी आजपर्यंत पाहिला नाही.


तू आमच्यात ये बादशहा तुला सरदार करतील. आणि बक्षीस देतील,तुला जहागीर देतील''त्याचे हे शब्द ऐकूनमुरारबाजीला राग आला रागाने त्याचे डोळे लाल झाले. आणि तो चवताळून म्हणाला,''अरे, आम्ही शिवाजीमहाराजांचे मावळे,आम्हाला काय कमी आहे. तुझ्या बादशहाची जहागीर हवी कोणाला'' आणि मुरारबाजीनेखानाच्या दिशेने झेप घेतली आणि तो तुफान कत्तल करत सुटला. हे पाहून दिलेरखानाने अंबारीतून एक बाणसोडला. तो बाण मुरारबाजीच्या कंठात घुसला. मुरारबाजी जमिनीवर कोसळला. मराठ्यांनी त्याचा देहउचलला आणि त्यांनी बालेकिल्ला गाठला. किल्लेदार मुरारबाजी पडला म्हणून मराठ्यांना खूप दुःखझाले,पण एक मुरारबाजी पडला म्हणून काय झाले,आम्ही तसेच शूर आहोत. हिम्मत धरून लढतो,मावळे असेम्हणून पुन्हा न डगमगता लढू लागले. हि बातमी महाराजांना किल्ल्यावर त्यांना फार दुःख झाले. आणिमहाराजांनी विचार केला,कि एक एक किल्ला वर्ष वर्ष लढवता येईल,पण लाख मोलाची माणसे मारतील. शिवरायांना ते नको होते. शक्ती चालेना,युक्ती उपयोगी पडेना,त्या वेळी माघार घेणेच योग्य;म्हणून मुघलांशीतह करायचा असे शिवरायांनी ठरवले. स्वता महाराज जयसिँगाकडे गेले. आणि त्यांनी त्याच्याशीमुत्सद्देगिरीचे बोलणे केले. 


ते म्हणाले,''मिर्झाराजे,आपण राजपूत आहात. आमचे दुःख आपण जाणता. बादशहांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्रउध्वस्त झाला आहे. सर्व लोकांचे हाल होत आहे. लोक सुखी व्हावे,म्हणून आम्ही स्वराज्याचे काम हाती घेतलेआहे. आपणही हे काम हाती घ्यावे मी आणि माझे मावळे सतत आपल्या पाठीशी उभे राहू''. पण जयसिगमोठा धूर्त होता. त्याने शिवरायांना तह करण्यास सांगितले. आणि महाराजांनी तह केला. या तहातशिवरायांनी तेवीस किल्ले आणि त्याखालचा चार लक्ष होनांचा मुलुख मुघलांना देण्याचे कबुल केले. हा तह१६६५ साली झाला. पुरंदरचा तह झाला. आनी याच वेळी शिवरायांनी आग्ऱ्यास जाऊन बादशहाची भेटघ्यावी,जयसिंगाने महाराजांना असे सांगून त्यांना सुरक्षततेची हंमी दिली. महाराजांनी जयसिंगाच्यासुचसनेवर विचार केला. पण बादशहा मोठा कपटी आहे,बादशहाने स्वतःच्या भावांशीसुद्धा दगाबाजी केली,हेराजे ओळखून होते. तरीही या मोठ्या प्रसंगाला सावधगिरीने तोंड द्यावे,असे शिवरायांनी ठरवले. आम्हीबादशहाची भेट घेण्यासाठी आग्ऱ्याला जायला तयार आहोत,असे शिवरायांनी जयसिंगाला कळवले.


















by - Internet

पावनखिंड संग्राम...


पावनखिंड संग्राम


अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. आदिलशाहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड़लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दीजौहर निघाला. फाजलखानाही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला. सिद्दी जौहरनेपन्हाळ्याला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळा सुरु झाला कि सिद्दी जौहर वेढा उठविलअसे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरु होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपतआली.




आता शक्तीचे कामनाही,तर युक्तीने सुटकाकरून घ्यायचेशिवरायांनी ठरवले. लवकरच किल्लातुमच्या स्वाधीन करतोअसा निरोप त्यांनीसिद्दीला पाठवला. त्यानेकाबुल केले. वेढ्याच्याकामाने सिद्दीचे सैनिककंटाळले होते. शिवाजीशरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. ते खाणे पिणे गाणे बाजावणे व हुक्कापाणी यात दंग होऊनगेले. शिवरायांनी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेनेजाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर जाणार, दुसरी पालखीशत्रूला सहज दिसल्याने ती पकडली जाणार. आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोषकरणार,एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार,अशी योजना होती. असे सोंग घ्यायचे म्हणजेमरणाला सामोरे जायचे. पण एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. तो मोठाधाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेली शीवाजीची पालखी बाहेर पडली. शत्रूने हि पालखीपकडली. आणि त्यांनी ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरु झाला. पण थोड्या वेळानेशिवाजीचे सोंग उघडकीस आले. 


तेव्हा सिद्दीने संतापून त्याला ठार केले. शिवरायांसाठी या शिवाजीने बलिदान केले. शिवराय हातावर तुरीदेऊन निसटल्याचे कळताच सिद्दी चवताळून गेला. त्याने मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग केला. शिवरायांनी घोडखिंड ओलांडली. चौताळलेल्या सिद्दीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवरायबाजीप्रभूंना म्हणाले बाजी वेळ आणीबाणीची आहे. आता विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला तोंडदेऊया. खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता. स्वराज्य आणि शिवरायांचे जीवित धोक्यात होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. मी मरेनपण शत्रूला खिंड चढू देणार नाही. गनिमांची संख्या अफाट आहे. आम्ही खिंड रोखून धरतो. तुम्ही गडावरपोहोचेपर्यंत आम्ही शत्रूला येथेच थोपवून धरू. बाजीप्रभूंची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले. पण त्यांनास्वराज्याचे धेय्य गाठायचे होते. शिवराय बाजींना प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो. तेथेपोहोचताच तोफांचे आवाज होतील. 


मग ताबडतोब तुंही निघून या. बाजी खिंडीच्या तोंडापाशी उभा राहिला. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादीफळी तयार झाली. इतक्यात शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला जीव गेला तरी गनिमांनाखिंड चढू देऊ नका. खिंडीतली वाट नागमोडी होती. एकाच वेळी तीन चार माणसे चढू शकत होती. खिंडीतशर्थीची झुंज सुरु झाली. सिद्दी जौहर चिडला होता. शत्रूने बाजिप्रभूवर हल्ला केला. बाजीला घेरले. बाजीच्याअंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्यानेखिंडीचे तोंड सोडले नाही. त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला. पण तो मागे हटला नाही. बाजीप्रभूघायाळ झाला होता,तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्याआवाजाकडे होते. एवढ्यात तोफांचा आवाज कडाडला. बाजींच्या कानी तोफांचे आवाज पडले. महाराज गडावरपोहोचले. आता मी सुखाने मरतो. असे म्हणून त्या स्वामिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. हे महाराजांनाकळल्यावर त्यांना खूप मोठे दुःख झाले. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते,म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिड पावन झाली.

















by - Internet

दौलतखान चा पराक्रम ...

दौलतखान चा पराक्रम 


शिवाजीराजे महाबळेशवरच्या एका उंच कडेपठारावरून सभोवतालचा परिसर न्याहाळत असताना,नारळपोकळीच्या बागा,सागरकिनारा यांनी शोभून दिसणारा कोकण किनारपट्टीने महाराजांचे लक्ष वेधून घेतले. त्याठिकाणी मायनायक भंडारी,बाळशास्त्री जोशी,कोळी आणि आणखी काही मंडळींची शिवरायांनी भेट घेतली.इंग्रज,पोर्तुगीज आणि सिद्दी या लोकांच्या हुकुमतीमुळे कोकण किनारपट्टी असुरक्षित आहे. आणि तेथीललोकांचे जगणे अवघड झाले आहे.,तिथल्या आया-बहिणींची अब्रू धोक्यात आहे,यावर महाराजांनी काही उपायकरावा अशी त्यांनी विनंती केली. राजांच्या पारखी नजरेने तेथील लोकांचे म्हणणे जाणले कि मायनायकालात्या भागातील अडीअडचणींची,गरजांची,सागरांची चांगलीच माहिती आहे. हा महाराष्ट्र जर एका भगव्याझेंड्याखाली आणायचा असेल तर ह्याच कोकणी माणसांना हाताशी धरून दर्यावर आपले सागरी आरमार उभंकरायला हवं. या इंग्रज,पोर्तुगीज आणि सिद्द्दी हयांना वेळीच आवरायला हवे. पण हे जमणार कसे ? हा विचारकरत असताना शिवरायांना एकदम काहीतरी आठवले. आणि त्यांनीही विचारले,''तुमच्यात दौलतखान म्हणूनकुणीतरी आहे ना तो दिसत नाही, तेव्हा मायनायकेने सांगितले कि ''राजे दौलतखान एका लग्नाच्यावऱ्हाडाबरोबर त्यांचा अंगरक्षक म्हणून गेला आहे. दौलतखान आपला तांडेलांचा तांडा घेऊन गेला आहे. 






त्याचा या 'तिघांवर' मोठा वचक आहे. हि माहिती मिळताच महाराज म्हणाले,''माय-नायके,तुम्ही सागरकिनाऱ्यावर आमचे आरमार उभे करण्याची जबाबदारी घ्या. आणि दौलतखानला तुमच्या मदतीला घ्या.आम्हाला उत्तम विश्वासू आणि निष्ठावंत माणसांची सदैव गरज आहे. महाराजांनी विश्वास दाखवला. आणिपैशांची तरतूद केली,मदत केली आणि मदत मागितली. थोड्याच दिवसात मायनायक भंडारी,आणि त्याचेसहकारी यांनी राजांचे स्वप्न सत्यात आणले. आणि कोकणच्या सागरी किनाऱ्यावर राजांचे सागरी आरमारउभे राहिले. त्या आरमाराने उत्तर-दक्षिण भाग काबूत घेतला. रघुनाथपंथ अत्रे ह्यांनी दाभोळ बंदर काबीजकेले. मोरोपंतांनी जंजिरा,त्या सोबत विजय दुर्ग, सुवर्ण दुर्ग, सिंधुदुर्ग या ठिकाणी आपली बळकट आरमारीस्थाने तयार केली. आपल्या सांगण्याप्रमाणे मायनायक भंडारी,आणि त्याचे साथीदार,इतर स्वामिनिष्ठमंडळींनी सुसज्ज केलेले ते आरमार पाहण्यासाठी राजे स्वतः आले तेव्हा त्यांनी प्रथम आपल्या आरमाराचेअवलोकन केले ते सिंधेदुर्गावरून. राजे सागरी किनाऱ्यावर येताच अनेक तांडेलांनी महाराजांचा जयजयकारकेला. एका मचव्यांतून मायनायके राजांना घेऊन पहिल्या सागरी जहाजाजवळ गेला. तांडेलांनी शिड्या खालीसोडल्या. त्यावरून मंडळी मोठ्या जहाजावर गेली. तेथून समोरच्या अथांग सागराचे दर्शन घेत असतानाचसुकाणू जवळ उभी असलेली एक व्यक्ती महाराजांच्या नजरेत भरली. कोण होता तो सडसडीतबांध्याचा,बलदंड बाहुंचा,वीतभर दाढी असलेला रांगडा गडी दौलतखान. त्याची आणि महाराजांची नजरानजरहोताच मोठ्या विनयने त्याने महाराजांना सलाम ठोकला. त्याचबरोबर भंडारी गराजला,''अरे दौलत्या,राजांनासलाम कायला करतोस. मुजरा कर.'' त्यावर मोठ्या आदबीन दौलतखान म्हणाला,''माफी करो महाराज ''अरेमाफी कसली मागता. आजवर आम्ही तुमचं नाव आणि पराक्रम ऐकला होता. 


आता भेट तर झालीच पण अजून तुमचा पराक्रम पाहायचा आहे.'' असे म्हणून महाराजांनी सागराला पहिलामानाचा नारळही त्या दौलतखानाच्या हातूनच अर्पण करवला. सागराला नारळ अर्पण केला. प्रार्थना केली,वंदनकेलं ... आणि सर्वजण एकेका जहाजावर चढताच,राजे,सैन्य,दारुगोळा,तोफा,तिरंदाज ह्यांनी सज्ज झालेलीराजांची आरमारी फौज सागरी लाटांवरून पुढे पुढे निघाली. या मोहिमेतील राजांचे लक्ष होते ती बसनूरचीबाजारपेठ. स्वराज्याच्या कामी एक एक दुर्ग हाती मिळवताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात दारुगोळा शस्त्रास्त्रेयावर खर्च झाला होता. दौलत उभी करणे हे गरजेचे होते. त्यासाठी यावेळी गोव्याच्या दक्षिणेस कारवारजवळच्या बसनूर बाजारपेठेचे लक्ष ठरविण्यात आले होते. कारण गोरगरिबांचे घामाचे धन लुटणारी, अमापधन कमावणारी,अधर्म-अत्याचार करणारी मोठमोठी मंडळी या गावात होती. त्यांना चांगला धडा शिकवायचाहोता. या सागरी मोहिमेसाठी आता महाराजांबरोबर मायनायक भंडारे,अनेक तांडेल,मराठी फौज आणि मुख्यम्हणजे दर्यासागरात एक लाखमोलाचा देवमासा दौलतखान हा त्यांच्याबरोबर होता. या सागरी प्रवासातल्याएका कठीण प्रसंगी राजांना दौलतखानची नजर,त्याचे सागरी आराखडे यांची कल्पना आली. तसेच आपटीम्हणजे पाण्यातला पाषाण आणि उफली म्हणजे सागरातील प्रचंड मोठी पाण्याची लाट हे पणदौलतखानाकडूनच राजांना कळले. राजांना त्याचे मोठे कौतुक वाटले. गोव्यामार्गे महाराजांचे सागरी आरमारहे बसनूरच्या खाडीत शिरले. नांगर टाकून गलबते,संग्रमीया म्हणजे लढाऊ जहाजे खाडीत थांबवली. 


राजांच्या सूचना ऐकून घेऊन इशारा मिळताच आरमारी फौज बसनूर मध्ये घुसली. त्यावेळी सारेजण झोपेतहोते. ''तोच हर हर महादेव '' च्या गर्जना घुमल्या. एका हाती मशाल आणि दुसऱ्या हाती नंग्या तलवारी घेऊनसैन्याने महत्वाच्या ठाण्यावर हमला केला. पहारेकऱ्यांनी मुख्य ठाणेदाराला वर्दी दिली. ठाणेदार या अचानकझालेल्या हल्ल्यामुळे पार घाबरला. पण स्वतःला सावरत त्याने सशस्त्र सैन्यासह मराठी फौजेवर प्रतिहल्लाकेला. तेवढ्यात दौलतखानाने सपासप वार करून ठाणेदाराची सौरक्षण फळी फोडली. त्यांच्यावर झडपघातली. आणि ठाणेदाराला जेरबंद केले. इकडे इतर सैन्याने बसनूरची बाजारपेठ,मोठमोठे वाडे,धनिकांच्यातिजोऱ्या फोडल्या,तोडल्या आणि मोठी डौलात हाशील करून ती जहाजावर चढवली. महाराजांची नियोजनपूर्वक केलेली हि सागरी मोहीम फत्ते झाली. त्यातजडजवाहीर,सोनेनाणे,पैका,दागदागिने,कपडा,धान्य,मौल्यवान वस्तू,अशा अनेक वस्तू हाती लागल्या. यायशस्वी कामगिरीबद्दल राजांनी सर्व तांडेल,भंडारे,दौलतखान आदींचा गौरव केला. कोकण किनाऱ्याचीजबाबदारी प्रामुख्याने दौलतखान याच्यावर सोपवून राजे जमिनीच्या मार्गाने पुन्हा आपल्या मुलखाकडेपरतले. महाराजांनी दिलेली जबाबदरी पार पाडत असताना,दर्या किनाऱ्याच संरक्षण करत असताना,एकदादौलतखानचा सिद्दी संबूळ याच्याशी सामना झाला. सागरावर राज्य करू पाहणाऱ्या शिवरायांच्या सागरीआरमाराचे मुख्य तीन शत्रू होते. 


ते म्हणजे सिद्दी कासीम,सिद्दी संबूळ,आणि सिद्दी खैरीयत. या तिघांच्या भरीला इंग्रज,डच,पोर्तुगीज इ. मंडळीहोतीच. पण त्या सर्वांना पुरून उरत होता तो शिवरायांचा एकनिष्ठ सेवक दौलतखान. सिद्दी संबूळ बरोबरच्यासरळ युद्धात दौलतखान याने सिद्दीला पार जेरीस नेले. पुरते नमवले. त्याला पराभूत करून जंजिऱ्यास परतजायला लावले. त्यामुळे सिद्दी संभुळ दुखावला. त्याच्यावर दुसरा आघात झाला तो त्याच्याच माणसांकडून. तोम्हणजे सिद्दी कासीम. आणि सिद्दी खैरियात. त्यांनी त्याच्याविरुद्ध औरंगजेब बादशहाचे कान भरले. आणित्याला एकटा पाडला.... पण जेव्हा हि बातमी दौलतखानच्या कानी पडली तेव्हा दौलतखानला राहावले नाही.एकेवेळी आपण परस्परांचे शत्रू होऊन लढलो होतो. आपण सिद्दी शंभुळला पराभूत करून पळवून लावले होते. तो आपला शत्रू आहे. मुसलमान आहे. ह्या साऱ्या गोष्टी विसरून दौलतखान हा सिद्दीच्या मदतीला धावूनगेला. त्यावेळी प्रथम सिद्दी संभुळ याला मोठे आश्चर्य वाटले. त्याने मदतीचा हात करणाऱ्या दौलतखानलाप्रश्न विचारला,''खान,हंम तो एक दुसरेके दुश्मन होते हुए भी आप हमे मदत कारणा चाहते हो. कयू त्यावरदौलतखान म्हणाला, ''सिद्दी जब तुम हमारे साथ लढणे आए थे,तब तुम हमारे दुश्मन थे।


लेकिन अभि नही। अभि तुम खुद्द बेसहारा हो। तुम्हे मदत कि जरुरत है। और आप को मदत कारणा हमाराफर्ज है। ये हमारी इन्सानियत है। सिद्दी संभुळ ने ते शब्द ऐकले आणि आश्चर्याने दौलतखानकडे पहिले आणिम्हणाला, भाईजान,ये प्यार,ये इन्सानियत... ''सिद्दी,भाई,ये प्यार,हे इन्सानियत हमने हमारे शिवाजीराजासेसिखी है। शिवाजी राजा दिल का बडा साफ है, दिलदार है, जो किसीको भी उसके जात धर्म से नही,बल्कीअच्छे बुरे काम और नियत से आपना पराया मानता है। हमने तो यही सिखा है। कि ऊस कि नजर से तो वहीसच्चा दुश्मन है जो हमारे मुल्कपार हमला करता है। चाहे वो हिंदू हो,मुसलमान हो,अंग्रेज हो,फिरंगी हो याकोई भी। दौलतखानच्या शाब्दांतून त्यांच शिवाजी राजांवरच प्रेम,आदर, श्रद्धा व्यक्त होताना पाहून सिद्दीसंबुळ भारावला. तोच दौलत खान याने सिद्दी संभुळला विचारले,बोलो सिद्दी कि तुम हमारे आरमार मे आणाऔर हमारे साथ एक भला काम कारणा पसंद करोगे'' आणि दौलतखानच्या या प्रस्तावाला मान्यता देत सिद्दीसंभळ दौलतखानच्या आरमारात सामील झाला. अशा अनेक चांगल्या कामगिऱ्या करून दौलतखाननेमहाराजांची आणि स्वराज्याची,भगव्या झेंड्याची सेवा करीत आणि त्यांच्याशी इमान राखत आपले नावइतिहासाच्या पानावर नोंद करून ठेवले.






















by - Internet

शिवाजी महाराजांचा जन्म (Shivaji Maharaj Birth)...


शिवाजी महाराजांचा जन्म (Shivaji Maharaj Birth)



फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ १९फेब्रुवारी १६३०. शिवनेरीच्या नगारखाण्यात सनई, चौघडा वाजत होता अशामंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदी आनंद झाला. बाळाचे बारसे झाले . शिवनेरीकिल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुगलबादशाहाशाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गावपुणे. विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते.शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आडतिकडे विहीर शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या, तेव्हा याधामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याचीआठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्यातील जुन्नरजवळीलकिल्ला. त्याच्या चारी बाजूंना उंच कडे,भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता.विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनीस्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले. व ते मुघलांवर चालून गेले. 


शिवरायांचे बालपण
शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली,पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तमशिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत. शिवबांना जवळ घेत,मायेने कुरुवाळात,त्यांना रामाच्या निकृष्णाच्या,भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांचे,कधी ज्ञानेश्वरांचे तर कधीएकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखेपराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. त्यातून शिवरायांनासाधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधीशिवबाहि त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकर आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत.
मावळ्यांची मुले जणू रानातील पाखरे ती पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडेबनविणे, मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद लपंडाव, चेंडू, भोवरा हे यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्यामुलाबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फारफार आवडायचे.
शिवरायांचे शिक्षण
स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांनाआणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमनूक केली होती . शिवराय सातवर्षांचे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेतपारंगत झाले. रामायण, महाभारत,भागवत यातील गोष्टीं ते स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांनायुद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसने,कुस्तीखेळणे,दांडपट्टा फिरवणे,तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या बाराव्यावर्षांपर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. लवकरच आदिलशाहाने शहाजीराजांनाकर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनीजिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्या वेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनीहत्ती,घोडे,पायदळ,खजिना,ध्वज,तसेच विस्वासू प्रधान,शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले.
स्वराज्याची शपथ
पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे १६४५ साली शिवराय वआजूबाजूच्या खोऱ्यांमधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली होती. त्या किर्र अरण्यातझाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते. श्रीशंकरापाशी कोणते मागणे मागत होते. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते,पण यांच्या मनाची भरारीमोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सगळ्यांना ते कळकळीने म्हणाले, ''गड्यानो,मी आज तुमहाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का. आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदारआहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचा अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे. पणगड्यानो,मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का. दुसऱ्याच्याओंजळीनेच आपण पाणी प्यावे का. आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखीयुद्धे चालू असतात.


आपली माणसे या युद्धात नाहक मारतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाणहोते. आणि इतके सोसुनही आपल्या पदरी काय. तर गुलामगिरी आपण हे किती दिवस सहन करायचे.दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे. सांगा, तुमीच सांगा वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू दयायचेका. शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहेरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुणसवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारूनगेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला,"बोला बाळराजे, बोला. आपला मनोदय सांगाआम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. "हो राजे,तुम्ही जे सांगाल तेआम्ही करू आमचे प्राणही देऊ.


मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकेकाकडे पाहत ते आनंदाने म्हणाले,
''गड्यानो आपला मार्ग ठरला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे,सर्वांनी खपायचे,सर्वांनी प्राण अर्पनकरायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे 'हिंदवी स्वराज्य' तुमचे ,माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापनकरायचे.परक्यांची गुलामी आता नको. उठा,या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू.स्वराज्यस्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व वाहणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. ''हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे,असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया.''शिवरायशेवटी निश्चयाने बोलले.रायरेश्वराच्या देवालयातून सारे मावळे बाहेर पडले,ते स्वराज्याच्या आणाभाका घेऊनच.शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रींकडे गेले.


घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्यधन्य वाटले. आपण मणी जे धरले ते बालराजेपूर्ण करणार अशी आशा,असा विस्वास त्यांना वाटू लागला. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले.मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी,डोंगरातील आडमार्ग शोधावे,खिंडी,घाट,चोरवाटानिरखाव्या,आसा त्यांचा नित्यक्रम सुरु झाला. शिवरायांनी मावळ्यांची अंतःकरने जिंकून घेतली. तरुण मावळेशिवरायांसाठी वेडे झाले. शिवरायांसाठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे, असे ते मानू लागले. आता शिवरायांच्याहालचालींना उधाण आले,समुद्राला भरती यावी तसे.शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट,किल्ले आपल्यासवंगड्यांसह बारीक नजरेने न्याहाळले. चोरवाटा,भुयारे,तळघरे,दारुगोळा,हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणीयांची खडानखडा माहिती मिळवली. 
तोरणा गड स्वराज्याचे तोरण
रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली,पण केवढे अवघडकार्य होते ते, दिल्लीचा मुघल बादशाह,विजापूरचा आदिलशाही सुलतान,गोव्याचे पोर्तुगीझ आणि जंजिऱ्याचासिद्दी अशा चार सत्ता त्या वेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या. या सत्तांचा दरारा मोठा होता.त्यांच्याविरुद्ध ब्र काढायची कुणाची हिम्मत नव्हती. अशा बिकट परीस्तीथत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता. कुठे शत्रूच्याफौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचे अल्प बळ पण शिवरायांचानिश्चय अढळ होता. त्यातूनच बळ निर्माण झाले.


शिवरायांकडे पुणे,सुपे,चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागीर होती. जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातीलअधीकाऱ्यांच्या ताब्यात होते. किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य, ज्याचे किल्ले त्याचे राज्य, किल्ला ताब्यातअसला,कि आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा एक मुख्य आधार. तेव्हाएखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे,असे शिवरायांनी मनाशी ठरवले. तोरणा किल्लाशिवरायांच्या डोळ्यांपुढे होता. पुण्याच्या नैऋत्येस चौसष्ठ किलोमीटरवर कानद खोऱ्यात हा किल्ला आहे.डोंगरी किल्ल्यात तोरणा किल्ला मोठा बाका. त्या किल्ल्यावर दोन भक्कम माच्या होत्या. एक झुंजार माचीआणि दुसरी बुधला माची. माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरीत्या सपाट झालेल्या भागांची तटबंदी.झुंजार माची नावाप्रमाणेच झुंजार आहे, लढाऊ आहे. किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकाच वाट आहे. तीआहे झुंजारमाचीवरून. हि वाट अतिशय अवघड आहे. वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खालीदरीत कोसळून पडणार ! महाराष्ट्रातील बळकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो. किल्ल्यावर तोरनजाईदेवीचे देऊळ आहे. त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा 'हे नाव पडले. एवढा प्रचंड किल्ला ! पण आदिलशाहाचे याकिल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते. किल्ल्यावर
पुरेसे पहारेकरी नव्हते,कि दारुगोळा नव्हता. शिवरायांनी हे हेरले. शिवरायांना नेमके हेच हवे होते. तोरणा जिंकूनस्वराज्याचे तोरण बांधायचे,असे त्यांनी ठरवले. निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शीवराय कानद खोऱ्यातउतरले. साऱ्या मावळ्यांसह ते सिहाच्या छातीने व हरणाच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले. मावळ्यांनीभराभर मोक्याच्या जागा ताब्यात घेतल्या. तानाजी मालुसरे या वीराने दरवाजावर मराठ्याचे निशाण उभारले.येसाजी कंक हा शिवरायांचा विश्वासू आणि निष्ठावाण सहकारी. त्याने चौकीवर पहारे बसवले. किल्ला ताब्यातआला. सर्वांनी शिवरायांचा जयजयकार केला. हिंदवी स्वराज्याची नौबत झडली.नगाऱ्यांचा आणि शिंगांचाआवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला. शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड' असे नाव दिले.
कुलस्वामिनी आई भवानीचा आशीर्वाद
तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरु झाला. त्यांनी किल्ल्याची बारीक पाहणी केली. किल्ल्यावर मराठाकिल्लेदार, ब्राह्मण सबनीस, प्रभू कारखानीस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणूका केल्या. शिबंदीतमावळे,कोळी,रामोशी,महार इत्यादी जातीजमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद,
वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता. किल्ल्याची दुरुस्ती सुरु झाली आणि काय आश्चर्य मोहरांनी गच्चभरलेल्या चार घागरी, काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या कामकऱ्यांना आनंदी आनंद झाला. 'शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे,तिनेच धन दिले 'असे जो तो म्हणू लागला. कामकऱ्यांनी मोठ्या आनंदानेधनांच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिल्या. एका मोहोरेलाही कुणी हात लावला नाही. स्वराज्याचे धन होतेते ते त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले. स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी सापडले म्हणूनशिवरायांना हुरूप आला. आपल्या कार्याला आईभवानीचा आशीर्वाद आहे, असे त्यांना वाटले. 


हे धन स्वराज्याच्या कामी आले. या धनातून शिवरायांनी शस्त्रे विकत घेतली. दारुगोळा जमा केला. उरलेल्याधनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्यास ठरवले. तो बेत असा. तोरण्यापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेलामुरुंबदेवाचा डोंगर आहे. शिवरायांनी तो हेरून ठेवला होता. हा डोंगर खुप उंच,अवघड आणि मोक्याचा
होता. आदिलशाहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता. या किल्ल्यावरही पहारा ढिलाचहोता, तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायांनी ठरवले.
स्वराज्याची पहिली राजधानी
एक दिवस शिवराय आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला.तोरण्यावर सापडलेले काही धन मुरुंबदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले. शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले'राजगड' गडावर पाथरवटांनी दगड घडवले. लोहाराने भाता फुंकला. सुतार ,गवंडी ,मजूर, भिस्ती अशी सारीमाणसे कामाला लागली. राजवाडा,बारा महाल,अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली. राजगड हिस्वराज्याची पहिली राजधानी सजली. शिवरायांची घोडदौड सुरु झाली. बारा मावळांतील किल्ल्यामागून किल्लेत्यांनी ताब्यात घेतले. बारा मावळात आनंद आणि उत्साह यांना पूर आला. गावोगावचे पाटील,देशमुखशिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले ;परंतु तांदळात जसे काही खडे असतात,तसे मावळातही काही दुष्ट लोकहोते. शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले. शिरवळच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्धतक्रारी गेल्या. ठाणेदाराने विजापूरला सांडणीस्वार पाठवून शिवरायांच्या या घोडदौडीची हकीकत आदिलशहाच्याकानी घातली.


क्रमश:


























by - Internet

तानाजी मालुसरे...

तानाजी मालुसरे


तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई,दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार मोठा हिम्मतवान गडी. तो अंगाने धिप्पाड ताकदीने भारी आणि बुद्धीने चलाख होता. तानाजी म्हणजे महाराजांचा जीव कि प्राण. त्यांचा बालपणीचा सवंगडी स्वराज्याचा सुभेदार आणि मूळचा महाडजवळील उमरठ गावचा, तानाजी सह्याद्रीचा वाघ कुणालाही घाबरत नसे. महाराजांनी सांगावे आणि त्याने काम फत्ते करावे असा शिस्ता पडला होता. सूर्यराव सुर्वेला त्याने लढाईमध्ये पळूवून लावले होते. आगऱ्याला महाराजांसोबत तो होता. जिजाऊ साहेबाना कोंढाण्याचा सल होता. राजांनी तानाजीवर कोंढणत्याची कामगिरी सोपवली. त्या मुलाचे लग्न होते. पण तानाजी म्हणाला आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे. एवढं बोलून तानाजी शांत बसला नाही. तर त्या स्वामिनिष्ठ सेवकाने पोटच्या पोराच्या लग्नाकडे पाठ फिरवली. आणि कोंढाण्याच्या कामगिरीसाठी 











तानाजी स्ववंगड्याना घेऊन कोंढाण्याच्या दिशेने निघाला. प्रथम त्याने गोंधळ्याचे रूप घेतले. आणि गडाखालच्या भागात फिरला. बारीक माहिती गोळा केली. आणि मग सारा बेत पक्का ठरला. तानाजीने शंभर मावळ्यांसह उंच सरळ अवघड कड्यावरून घोरपडीच्या मदतीने वर जायचे ठरवले. तानाजीचा भाऊ सूर्याजी पाचशे मावळ्यांसह कल्ल्यान दरवाजाशी यायचे. शेलारमामांनी आपली जागा सांभाळायची तानाजी वर पोहोचताच दोघातिघानी गडावर प्रवेश करून दरवाजा उघडायचा. सूर्याजीने एकदम सर्व सैन्यासह गडात घुसायचे आणि रात्रीच गडकाबीज करायचा. हा सारा बेत पक्का झाला ४ फेब्रुवारी १६७० रात्रीच्या भयाण आंध्रारात तानाजी डोणागिरीच्या कड्यापाशी आला. त्या सरळसोट सुळक्यावर तानाजी आपल्या तीनशे मावळ्यांसह चढून गेला. त्याचप्रमाणे काळोख्या रात्री त्या उंच खड्या कड्यावरून तानाजीने घोरपडीच्या साहाय्याने गडावर आपले मावळे चढवले. त्यातील दोघातिघांनी रात्री डुलक्या घेणाऱ्या पहारेकर्यांची नजर चुकवून कल्ल्यान दरवाजा उघडण्याची कामगिरी फत्ते केली. त्याबरोबर शेलारमामा,सूर्याची आणि जवळ जवळ पाचशे मावळे किल्ल्यात घुसले. 


प्रत्येकाची समशेर आडव्या येणाऱ्याची गर्दन उडवू लागली. तानाजी सिहासारखा लढत होता. उदेभानने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरु झली. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी एकमेकांच्या वारांनी दोघेही जबर जखमी झाले आणि धारातीर्थी कोसळले. तानाजी पडला हे पाहून मावळे पळू लागले. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. आणि पाळणाऱ्या मावळ्यांना तो म्हणाला,अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे. तुम्ही असे भागुबाईसारखे का पळता मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उद्या टाकून मारा नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला. पण गड सर करताना तानाजीसारखा शूर धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. राजे धावत सहगडावर आले त्यांना कळले कि त्यांचा लाडका तान्या त्यांना सोडून गेला. राजांनी हंबरडा फोडला महाराज खूप हळहळले आणि म्हणाले गड आला पण सिह गेला.















by - Internet







शहाजीराजे भोसले (Shahaji Raje Bhosale)


शहाजीराजे भोसले (Shahaji Raje Bhosale)


शहाजीराजे मालोजी भोसले
शहाजीराजे हे मालोजीराजे यांचे पुत्र व शिवाजीराजे यांचे वडील होते. निजामशहाने मालोजीराजांची जाहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता. मुगल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा बेत केला. विजापूरचा आदिलशहाही त्याला मिळाला,तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगरजवळ भटवाडी येथे हि प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले,. पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली. इतकी कि खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली, आणि ते विजापूच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. 
शहाजी महाराज 



आदिलशाहाने त्यांना 'सरलष्कर'हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मरण पावला. त्याचा पुत्र फतेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले,तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. 
शहाजीराजेचा मुघल आणि आदिलशहा यांच्या बरोबर संघर्ष 
अहमदनगरजवळ मोगलांवरती त्यांनी लढाई जिंकली. त्या वेळी लखुजी जाधव सासरे मोगलांच्या बाजूने लढत होते. नंतर निजामशहाच्या पदरी त्यांना अपमान सहन करावा लागला. कारण निजामाचा वजीर मलिक अंबरला शहाजीराजे यांचा दरारा वाढलेला आवडत नसे. शहाजीराजे हे निजामशाही सोडून विजापूरच्या आदिलशहाकडे नोकरीसाठी गेले. शहाजीराजे सरलष्कर झाले. शहाजीराजांना वाटत असे कि आपले राज्य असावे. त्यांना सुलतानी सत्तेची चीड येई. पण त्यांना ती गिळावी लागे. आपल्या मराठीपणाचा त्यांना फार अभिमान वाटे. मराठ्यांबद्दल त्यांना कळकळ वाटे. प्रेम वाटे. पण सुल्तानपुढे काही चालत नसे. शेवटी त्यांनी आदिलशहाविरुद्ध बंड केले. जिजाऊ गरोदर होत्या. त्यांना शिवनेरी किल्ल्यावर ठेवले. हे शहाजीराजे यांचे मोठे धाडस होते. बादशहाने त्यामुळे पुण्याची राखरांगोळी केली. राजे मोगलांना मिळाले. शहाजहान याने निजामशाही बुडवण्याचा चंग बांधला. राजे मोगलांना सोडून पुन्हा निजामशाहीत आले. पण तेथे निजामशहाचा पराभव झाला. 
राजे मोगलशाही,निजामशाही व आदिलसाही यांच्याकडे नोकऱ्या आदळलून बदलून करत. सुलतान याबद्दल त्यांना काही बोलत नसे. कारण त्यावेळी राजांची जरुरी भासत असे. नाहीतर तोफेच्याच तोंडी दिले असते. राजांनी निजामशहाचा मुर्तिजा म्हणून लहानसा वंशज घेऊन शहाजीराजांनी त्याला निजाम केले. व स्वतः वजीर झाले. राज्यकारभार पाहू लागले. परंतु आदिलशहा व शहाजहानने एकत्र येऊन निजामशाही बुडवली. शहाजीराजे नाईलाजाने शेवटी आदिलशहाकडे नोकरीला गेले. 
शहाजी राजांची कर्नाटकात रवानगी 
शहाजान बादशहाने आदिलशाहला सांगितले कि शहाजीला पुण्यात ठेऊ नका. त्याने शहाजीराजांना बंगलोरात पाठवले. शहाजीराजांचे मराठेशाहीचे राज्य बनवण्याचे स्वप्न वाया गेले नाही. त्यांचे पुत्र शिवाजीराजे यांनी ते पूर्ण केले. स्वराज्यासाठी शहाजीराजे यांनी मोठा त्याग केला होता. जिजाऊंवर पुणे जहागीर व लहानग्या शिवबाची जबाबदारी सोपवुन ते बंगळूरची जहागिरी सांभाळत असत. दि. २३ जा. १६६४ ला ते मरण पावले. त्यांची समाधी कर्नाटकमध्ये आहे.








































by - Internet

स्वराज्यातील महत्वपूर्ण घडामोडी







स्वराज्याची शपथ






शिवाजीराजे सोळा वर्षांचे झाले. छोट्या मित्रमंडळींचे रूपांतर आता मोठ्या मावळी सेनेमध्ये झाले होते. पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवराय व मावळे मंडळी तिथे जमली होती. शिवरायांच्यामावळी सेनेमध्येतानाजी,सूर्याजी,बाजीजेधे,बाजीपासलकर,येसाजी,सूर्यराव,चिमणाजी,गोदाजी शूर होते.शिवरायांच्या सेनेमध्ये अठरापगड जातीजमातीचे लोक होते पण राजे मनुष्याची गुणवत्ता पाहत असत. त्यांना जात शिकवली होती माणुसकी. रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर ते मावळे श्री शंकरापाशी कोणते मागणे मागत होते. शिवराय वयाने लहान होते. पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्याना ते कळकळीने म्हणाले,गड्यानो सुलतानाच्या वतनदारीवर आपन संतुष्ट राहावे का दुसऱ्यांच्या ओंजळीनेच आपण पाणी प्यावे का आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. 



आपली माणसे या युद्धात मारली जातात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते आणि इतके सोसून काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे.वतणांच्या लोभाने आपण हे असेच चालू दयायचे का. शिवरायांचा चेहेरा रागाने लाल झाला होता. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले. रायरेश्वराच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी व त्यांच्या सवंगड्यानी शंकराच्या पिंडीवर आपल्या रक्ताचा अभिषेक केला व प्रतिज्ञा घेतली हे सर्वसाक्षी परमेश्वरा आजपासून आम्ही आमचे तण,मन,धन देशाच्या सेवेत वाहिले आहे. जुलमी आक्रमकांच्या अगर आमच्या रक्ताचा मळवट भरून आम्ही मातृभूमीचे सौभाग्य प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे तेजस्वी ठेऊ. आम्हाला तुझा आशीर्वाद असू दे. हर हर महादेव.












तोरणगड आणि राजगड


पुण्यापासून ७० कि.मी. आणि भोरपासून ३५ कि.मी. उत्तरेला प्रचंडगड किल्ला आहे. पूर्वी याचे नाव तोरणा होते. शिवाजी महाराजांनी अनेक जुन्या किल्ल्यांची नवीन नावे ठेवली.या किल्ल्यात विजापूरच्या आदिलशाही सैनिकांची तुकडी राहत असे. पावसाळ्यात जोरदार पावसामुळे हि तुकडी काढून घेतली जात असे. याच वेळी शिवाजी महाराजांनी १६५६ मध्ये किल्ला काबीज केला. तोरणा गडावर सोन्याच्या मोहोरांनी भरलेले बावीस हंडे सापडले. ते धन स्वराज्यस्थापनेसाठी शुभशकुन होत. ते वापरून त्याच जागी अष्टभुजा,महिषासुरमर्दिनी,श्री तोरणजाईच मंदिर बांधण्यात आलं.




राजगड हि शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला किल्ला होता. या किल्ल्यात जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. त्यांना पाणी,गुजड,आणि चोरवारे म्हणतात. या तिन्ही रस्त्यावर बुरुज आहेत. चोरवाटेच्या दरवाजाने जाणे सोपे आहे. पण याची चढण उभी आणि कठीण आहे. किल्ल्याच्या प्रेक्षणीय स्थानात राजमहाल, वाडा,अंबारखाना,दिवाणघर,चबुतरे, महादेव,रामेश्वरी,पद्मावती आणि भगीरथ मंदिरे,अनेक तलाव आहेत. हिंदवी स्वराज्याच्या विस्ताराच्या योजना या किल्ल्यात आखण्यात आल्या. हा किल्ला अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घटनांशी संबंधित आहे. शाहिस्तेखानाचा पराभव,राजा जयसिहशी करार,अफजलखानाला प्रतापगडात मारल्यानंतर त्याचे डोके माता जिजाबाईंना दाखविण्यासाठी आणून बालेकिल्ल्याजवळ नगारखान्याच्या भिंतीत पुरण्यात आले. येथूनच बादशाहा औरंगजेबास भेटावयास शिवाजी राजे आगऱ्यास गेले. तिथे त्यांना कैद झाली. 








अफजलखानाचा वध










शिवाजी महाराज केवळ एकोणीस वर्षांचे होते. पण त्यांची मुत्सद्देदिरी भल्याभल्यांना गुंग करून टाकणारी होती. महाराजांनी काही काळ निवांत काधला. कर्नाटकात कनकगिरीच्या वेढ्यामध्ये राजांचे सख्खे थोरले बंधू संभाजीराजे हे अफजलखानाने केलेल्या दग्यामुळे मारले गेले. त्या वेळी जिजाऊंना तीव्र दुःख झाले. राजे दिवसेंदिवस प्रबळ झालेले शत्रूला ते पाहावेना. म्हणून आदिलशाहाने आपला मोठा सरदार अफजलखानास मोठी फौज देऊन स्वराज्यावर सोडले. स्वराज्यावर पुन्हा संकट आले. कारण अफजलखानाने शिवरायांना मारण्याचा विडा उचलला होता. खानाने हिंदूंची धर्मक्षेत्रे भ्रष्ट केली. शिवरायांना सपाट मैदानात खेचण्याचा खानाचा डाव होता. पण महाराजांनी सय्यम ठेवला त्यांनी अफजलखानास सांगितले. तुम्ही आमच्या पिताश्रींचे खास दोस्त,आम्ही तुमचा आदर करतो. मी तुम्हाला शरण आहे. मला अभय द्या. खानाला महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावले. भेटीची वेळ ठरली. शिवाजी महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराय लहान होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. 

त्यावेळी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली. आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत काट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. बिचवा काढून तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली आणि खान कोसळला. राजांनी अफजलखानाला संपवले. एवढ्यात कृष्णाजी भास्करने शिवरायांवर तलवारीचा वार केला. महाराजांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले. सय्यद बंडा शामियान्याय घुसला. तो शिवरायांवर वार करणार,तोच जिवा महाला धावून आला. सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन त्याने त्याला एका घावात जागीच ठार केले. नंतर इशारतीच्या तोफा झाल्या. जंगलात दडून बसलेल्या मराठी सैन्याने एका दिवसात खानाच्या फौजेचा खुर्दा उडवला. भयंकर युद्ध झाले. 








पावनखिंड संग्राम












अफजलखानाच्या वधामुळे विजापुरात हाहाकार उडाला. आदिलशाहा भयंकर चिडला. त्याला अन्नपाणी गोड़ लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्दी जौहर या सरदाराला पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्दी जौहर निघाला. फाजलखानाही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्या बरोबर निघाला. सिद्दी जौहरने पन्हाळ्याला चौफेर वेढा घातला. शिवरायांना गडात कोंडले. पावसाळा सुरु झाला कि सिद्दी जौहर वेढा उठविल असे शिवरायांना वाटले. पण पाऊस सुरु होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. गडावरची शिदोरी संपत आली. आता शक्तीचे काम नाही,तर युक्तीने सुटका करून घ्यायचे शिवरायांनी ठरवले. लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्दीला पाठवला. त्याने काबुल केले. वेढ्याच्या कामाने सिद्दीचे सैनिक कंटाळले होते. 


शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्यांना आनंद झाला. ते खाणे पिणे गाणे बाजावणे व हुक्कापाणी यात दंग होऊन गेले. शिवरायांनी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या. एकीतून शिवराय अवघड वाटेने जाणार आणि दुसरीतून शिवरायांचे सोंग घेतलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर जाणार, दुसरी पालखी शत्रूला सहज दिसल्याने ती पकडली जाणार. आणि शिवाजीराजाच पकडल्याचे समजून शत्रू जल्लोष करणार,एवढ्यात शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार,अशी योजना होती. असे सोंग घ्यायचे म्हणजे मरणाला सामोरे जायचे. पण एक बहादूर तरुण तयार झाला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. तो मोठा धाडसी आणि चतुर होता. ठरल्याप्रमाणे सोंग घेतलेली शीवाजीची पालखी बाहेर पडली. शत्रूने हि पालखी पकडली. आणि त्यांनी ती पालखी सिद्दी जौहरच्या छावणीत नेली. तेथे जल्लोष सुरु झाला. पण थोड्या वेळाने शिवाजीचे सोंग उघडकीस आले. 


तेव्हा सिद्दीने संतापून त्याला ठार केले. शिवरायांसाठी या शिवाजीने बलिदान केले.
शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे कळताच सिद्दी चवताळून गेला. त्याने मोठ्या फौजेनिशी शिवरायांचा पाठलाग केला. शिवरायांनी घोडखिंड ओलांडली. चौताळलेल्या सिद्दीचे सैनिक जोराने खिंडीकडे दौडत येत होते. शिवराय बाजीप्रभूंना म्हणाले बाजी वेळ आणीबाणीची आहे. आता विशाळगड हाती लागत नाही. चला शत्रूला तोंड देऊया. खिंडीच्या रोखाने शत्रू चौताळून येत होता. स्वराज्य आणि शिवरायांचे जीवित धोक्यात होते. बाजीप्रभूने शिवरायांना कळकळीने सांगितले महाराज तुम्ही थोडे सैनिक घेऊन विशाळगडाकडे चला. मी मरेन पण शत्रूला खिंड चढू देणार नाही. गनिमांची संख्या अफाट आहे. आम्ही खिंड रोखून धरतो. तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत आम्ही शत्रूला येथेच थोपवून धरू. 


बाजीप्रभूंची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले. पण त्यांना स्वराज्याचे धेय्य गाठायचे होते. शिवराय बाजींना प्रेमाने भेटले व म्हणाले आम्ही गडावर जातो. तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतील. मग ताबडतोब तुंही निघून या. बाजी खिंडीच्या तोंडापाशी उभा राहिला. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रू खिंडीखाली आला होता. बाजी मावळ्यांना म्हणाला जीव गेला तरी गनिमांना खिंड चढू देऊ नका. खिंडीतली वाट नागमोडी होती. एकाच वेळी तीन चार माणसे चढू शकत होती. खिंडीत शर्थीची झुंज सुरु झाली. सिद्दी जौहर चिडला होता. शत्रूने बाजिप्रभूवर हल्ला केला. बाजीला घेरले. बाजीच्या अंगावर अनेक वार झाले. जागोजागी जखमा झाल्या. अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तरीही त्याने खिंडीचे तोंड सोडले नाही. 


त्याचा सारा देह रक्ताने न्हाऊन निघाला. पण तो मागे हटला नाही. बाजीप्रभू घायाळ झाला होता,तरीही मावळ्यांना झुंज चालू ठेवण्यास तो बजावत होता. त्याचे सारे लक्ष तोफांच्या आवाजाकडे होते. एवढ्यात तोफांचा आवाज कडाडला. बाजींच्या कानी तोफांचे आवाज पडले. महाराज गडावर पोहोचले. आता मी सुखाने मरतो. असे म्हणून त्या स्वामिभक्त बाजीप्रभूने प्राण सोडला. हे महाराजांना कळल्यावर त्यांना खूप मोठे दुःख झाले. बाजीप्रभूसारखे देशभक्त होते,म्हणून स्वराज्याचे पाऊल पुढे पडले. त्या स्वामीनिष्ठांच्या रक्ताने घोडखिड पावन झाली.







शायिस्तेखान फजिती










मुघलांच्या स्वाऱ्यांनी महाराष्ट्राची धूळधाण उडाली होती. त्या वेळी दिल्लीचा औरंगजेब हा मुघल बादशाहा होता. त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या होत्या. त्यामुळे बादशाहा चिडला. त्याने त्याने आपला मामा शायिस्ताखान याला पाठवले. तो पुण्यावर चालून आला. त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला. तो पुढे पुढे येत होता. पण एकदा डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले. मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाईस्ताखानाचे सैन्य हैराण झाले. कंटाळून त्याने पुरंदरचा वेढा उठवला. मग शाइस्तेखान पुण्याकडे वळला. प्रथम त्याने चाकनचा किल्ला घेतला. चाकणच्या किल्ल्यात फिंरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुनकीने शाईस्ताखानाशी मुकाबला केला. दोन महिने फिरंगोजींने किल्ला लढवला. पण शाईस्ताखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही. शायिस्ताखान पुण्यात आला. त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला. त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला. एक वर्ष गेले दुसरे वर्ष गेले पण खान काही लाल महालातून हालेना. 


त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलुख उध्वस्त केला. शायिस्तेखानाची खोड मोडायचीच,असे शिवरायांनी ठरवले. खान लाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने चांगले होते. कारण त्या वाड्यातील खोल्या,दालने,खिडक्या,दारे,वाटा,चोरवाटा यांची शिवरायांना सगळी माहिती होती. खुद्द शायिस्तेखानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा बेत शिवरायांनी केला. शिवरायांनी दिवस निश्चित केला. वाजत गाजत लग्नाची वरात चालली होती. शेकडो स्त्री-पुरुष नटून थटून चालले होते. शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते. वरात पुढे निघून गेली. शिवराय आणि मावळे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली. या वेळी शायिस्ताखान गाढ झोपलेला होता. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. त्यांना त्याचा कानाकोपरा माहीत होता. 


शिवरायांच्या मावळ्यांनी खानाच्या पहारेकऱ्यांना बांधून टाकले. इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धाऊन आला. शिवरायांनी त्याला ठार केले. तो शायिस्ताखानाचा मुलगा होता. गडबड झाली लोक जागे झाले. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. समशेर उपसली. शायिस्ताखान घाबरला. सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला. शिवराय त्याच्या मागे धावले. शायिस्ताखान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार,तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची तीन बोटे कापली गेली. प्राणांवर आले पण बोटांवर निभावले. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शायिस्ताखान ने तर हायच खाल्ली. आज बोटे तुटली,उद्या आपले शीर शिवाजी कापून नेईल. अशी भीती त्याला वाटू लागली. 





मिर्झाराजे आक्रमण आणि आग्ऱ्याहून सुटका












शिवाजी राजे बादशाहाच्या भेटीस आगऱ्याला जाण्यास निघाले. जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवून त्यांचा आशीर्वाद घेतला. ठरल्याप्रमाणे राजे बादशाहाच्या दरबारात गेले. त्यांच्या समोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. बादशाहा ने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. शिवरायांना वाटले,आपण महाराष्ट्राचे राजे आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा,पण बादशाहाने आपल्याला मागील रांगेत उभे करावे म्हणजे काय हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने महाराज महालाबाहेर पडले. ते तडक आपल्या मुक्कामावर गेले. भेटीचा बेत असा बिनसला. औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणी शिपायांचा पहारा बसवला. 


शिवराय आणि संभाजीराजे बादशाहाच्या कैदेत पडले. शिवरायांनी बादशाहाकडे अर्ज केला मला महाराष्ट्रात जाऊ द्या. त्यांनी खूप खटपट केली पण बादशहाने ऐकले नाही. शिवरायांनी मनाशी निर्धार केला कि काहीही करून बादशाहाच्या कैदेतून सुटून जायचेच. शिवरायांच्या बरोबर संभाजी राजे आणि हिरोजी फर्जद व मदारी मेहतर हे सेवक होते. शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. पोटात भयंकर कळा येऊ लागल्या आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू मौलवी याना मिठाईचे पेटारे पाठवण्यास सुरुवात केली. पहारेकरी मिठाईचे पेटारे उघडून पाहत,पण नंतर ते कंटाळले व पेटारे उघडून पाहीनासे झाले. रोज रोज काय पाहायचे. असे त्यांना वाटले. एके दिवशी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले, मदारीस त्याचे पाय चेपत बसवले. 


शिवराय व संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. पेटारे घेऊन पुढे ते ठरलेल्या ठिकाणी सुखरूप पोहोचले. तेथे शिवरायांचे सेवक घोडे घेऊन तयार होते. हिरोजी आणि मदारी औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले. दुसऱ्या दिवशी हि बातमी बादशाहाला कळली. शिवाजी आपल्या तावडीतून निसटला बादशाहा रागाने भडकला. त्याचे सरदार हादरले. बादशाहाच्या कैदेतून शिवाजी निसटला तो हि कायमचा. वेषांतर करून शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले. त्यांनी संभाजीला एका सुरक्षित ठिकाणी ठेवले. शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाहाच्या हातावर तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली.








सुरतेची लूट




औरंगजेब बादशाहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या, तेव्हा बादशाहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा घातला. महाराजांचे स्वराज्य वाढत होते. स्वराज्याच्या गरजा हि वाढत होत्या. स्वराज्याला पैसा हवा होता. सुलतान लोकांनी महाराष्ट्राची तीनशे वर्षांपासून लूट चालवली होती. त्यांच्या तिजोऱ्या भरलेल्या होत्या. स्वराज्याचा पैसा स्वराज्यात आला पाहिजे. ह्या उद्देशाने महाराजांनी सुरतेवर धाडी टाकल्या. महाराज प्रचंड संपत्ती महाराष्ट्रात घेऊन आले.


सुरत म्हणजे त्या वेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ. शिवरायांनी सुरतेवर छापा घालून लक्षावधी रुपयांची लूट मिळवली. सुरतेच्या लुटीत शिवरायांनी नीती सोडली नाही. चर्च अथवा मशिदी ह्यांना हात लावला नाही. स्रियांना त्रास दिला नाही. सुरतेवरील या आक्रमणामुळे बादशाहा भयंकर चिडला. याने मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा निश्चय केला. मिर्झाराजे जयसिंग या बलाढ्य सेनापतीला त्याने शिवरायांवर धाडले. अलोट खजिना आणि अफाट दारूगोळाही दिला. स्वराज्यावर फार मोठे संकट आले.








कोकण मोहीम आणि आरमार निर्मिती







आरमार म्हणजे युद्धनौकांचे तांडे. मुघल व विजापूरकर हे शिवरायांचे जमिनीवरील शत्रू. समुद्रावर सिद्दी,पोर्तूगिरीज,व इंग्रज हे शत्रू होते. शिवरायांनी त्यांच्या बंदोबस्तासाठीच दूरदृष्टीने आरमारदल उभारले. मध्ययुगीन भारताचे हे पहिले आरमार होते. या अर्थाने शिवाजी राजे हे भारतीय आरमाराचे पहिले जनक मानले जातात. शिवरायांनी युद्धनौकाही बांधल्या. युद्धनौका घेऊन शिवरायांनी अनेक मोहिमा काढल्या. शिवरायांच्या सागरी आरमाराचा शत्रूवर जबर वचक बसला होता. म्हणूनच त्यांनी दूरदृष्टीने आरमारदल उभारले. समुद्रात सिंधुदुर्ग,विजयदुर्ग असे भक्कम सागरी किल्ले बांधले. ते पाहिले कि आज हि आपले मन थक्क होते. स्वराज्यावर किती संकटे आली पण शिवरायांनी मोठ्या शौर्याने आणि मुत्सद्देगिरीने त्यांना तोंड दिले. 








राज्याभिषेक सोहळा




शिवाजी महाराजांनी या स्वराज्याला सर्व राजेरजवाडयांनी मान्यता दयावी, म्हणून राज्यभिषेकाची योजना आखली. ६ जून इ.स. १६७४ रोजीशिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेककरण्यात आला. शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समतेने वागवणारा,प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले आहे हे जगाला कळायला हवे, म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किव्वा वैभवासाठी केले नाही, त्यांनी स्वराज्य भक्कम करण्यासाठी केले. रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. 
स्वराज्यस्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण न डगमगता शिवराय मोठ्या शौर्याने व चातुर्याने पार पडले. तानाजी बाजीप्रभू मुरारबाजी यांनी स्वराज्यासाठी आपले प्राण वेचले. 


स्वराज्य उभे राहिले व शत्रूवर वचक बसला. शिवरायांनी प्रतापगडाच्या भवानीमातेचे दर्शन घेतले तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिहासन तयार करुवून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. विद्वान ब्राह्मण सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली. राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागाभट्ट आले. ते थोर पंडित होते. शिवरायांनी राज्याभिषेकाची तयारी याथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणले. रायगडावर पन्नास हजार माणसे जमली. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वाद्ये वाजू लागली. गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्यांच्यावर छत्रचामरे धरण्यात आली. दही, तूप, मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते. 


गागाभट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा,यमुना,गोदावरी,सिंधू,कृष्णा,नर्मदा,कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरलेले होते. गागाभटांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली. व ते मंत्र म्हणू लागले. घागरीच्या शंभर छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला. नंतर शिवराय जिजामातेच्या पाया पडले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या तीस वर्षाचे चीज झाले. मासाहेबांच्या भेटीनंतर शिवराय सिहासनावर बसले. त्यांच्याजवळ महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूला उभे राहिले. गागाभट्टांनी सोन्यामोत्याच्या झालरीचे छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले. व ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रीयकुलावतंस सिंहासनाधीशवर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. सर्वांनी जयजयकार केला गडावर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्राभर शिवरायांचा जयजयकार झाला. अशा प्रकारे शिवरायांचा राज्याभिषेक झाला.








दक्षिण दिग्विजय 







राज्याभिषेक सोहळा पार पडला. पण राज्याभिषेकानंतर अल्पावधीत मासाहेब मृत्यू पावल्या. शिवरायांचा मोठा आधार गेला. त्यांना अतिशय दुःख झाले. परंतु दुःख करत बसने त्यांना शक्य नव्हते. त्यांना स्वराज्याचा गाडा हाकायचा होता. शिवरायांनी कर्नाटक प्रांतावर स्वारी करण्याचा निश्चय केला. त्यांना आता आदिलशाहाची भीती नव्हती, कारण आदिलशाही मोडकळीस आली होती. परंतु उत्तरेचा मुघल बादशाहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करन्यासाठी टपून बसला होता. मुघलांचे संकट स्वराज्यावर आले तर दक्षिणेतही एखादे मजबूत ठाणे असावे,असा विचार शिवरायांच्या मनात आला, म्हणून त्यांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. कर्नाटकात जाण्यासाठी शिवराय निघाले. गोवळकोंड्याचा अबुलहसन कुतुबशाहा याने त्यांना भेटीचे आमंत्रण दिले होते. 


प्रथम कुतुबशाहाच्या राजधानीला भेट देऊन मग दक्षिण दिग्विजयासाठी पुढे जायचे अशी त्यांनी योजना आखली. कुतुबशहाने महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती. शिवराय राजधानीत येऊन दाखल झाले. त्यांचे दर्शन घेण्यासाठी रस्तोरस्ती लोक उभे होते. त्यांच्या पराक्रमाच्या बातम्या सगळ्या देशात चहूकडे पसरल्या होत्या. अफजलखानाचा वध, शायिस्तेखानाची फजिती, आग्ऱ्याहून सुटका या रोमहर्षक प्रसंगाची हकीकात देशभर पसरली होती. त्यामुळे महाराजांचे प्रचंड स्वागत झाले. महाराज कुतुबशाहाच्या दरबारात आले. त्याने महाराजांच्या सत्कारात कशाचीही कमतरता राहू दिली नाही. स्वागत सत्कार स्वीकारल्यावर महाराज कर्नाटकच्या मोहिमेवर निघाले. 


शिवराय पूर्वकिनाऱ्यावर आले. चेन्नईच्या दक्षिणेस जंजिरा किल्ला आहे. हा किल्ला रायगडाप्रमाणेच प्रचंड आणि मजबूत आहे. त्याला वेढा घालून महाराजांनी तो किल्ला जिंकला. दक्षिणेत स्वराज्याचे एक मजबूत ठाणे तयार झाले. नंतर त्यांनी वेलूरच्या किल्ल्याला वेढा दिला.कित्येक महिना वेढा देऊनही किल्ला ताब्यात येईना. तेव्हा वेलूरजवळच्या डोंगरावरून शिवरायांनी त्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला. त्यांनी कर्नाटकात एकूण विस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे मोठे किल्ले जिंकले. 






















by - Internet


माझ्याबद्दल