शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९

गणपती बाप्पाकडून शिका हे बिझनेस स्किल्स...

गणपती बाप्पाकडून शिका हे बिझनेस स्किल्स

सगळ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे.. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात झाले आहे.. जिकडे तिकडे बाप्पाच्या छोट्या व उंचच उंच मूर्ती, पूजा, आरत्या, डेकोरेशन, प्रसाद, लायटिंग या सर्वांची धूम आहे. बाप्पा येणार म्हणून सगळीकडे आपसूकच प्रसन्नतेचे वातावरण निर्माण झालेले असते. बाप्पाची आरती म्हणताना आपण त्यांच्या अनेक नावांचे स्मरण करतो.. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची अनेक नावे आहेत, पण सर्वात जास्त त्यांना 'विघ्नहर्ता' म्हणून ओळखले जाते. आयुष्यात येणाऱ्या विघ्नांचे हरण करतात म्हणून त्यांचे हे नाव पडले. कौटुंबिक जीवनात व व्यवसायात उत्तम कामगिरी करण्यासाठी लागणाऱ्या गुणांचे बाप्पा हे प्रतीक आहेत. कोणत्याही गोष्टीची नवी सुरुवात करताना गणपती बाप्पाची पूजा केली जाते. त्यांच्या चतुराईच्या व हुशारीच्या अनेक कथा लोकप्रिय आहेत. असे हे आपले आवडते बाप्पा आपल्याला बिझनेस सुरु करण्यासाठी सुद्धा अनेक प्रकारे प्रोत्साहन देतात तसेच विविध प्रकारे कौशल्ये शिकवून जातात.. 

१. मोठे मस्तक: व्यापक विचार, विवेकबुद्धी व शहाणपण - 
गणपतीचे मोठे मस्तक हे मोठे विचार, विवेकबुद्धी, ज्ञान व सकारात्मक विचारांनी भरलेल्या मनाचे प्रतीक आहे. त्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला शिकवतात की एखाद्या लीडरने ब्रॉडमाईंडेड असायला हवे, त्याचे सकारात्मक विचार करणारे मन असायला हवे. बिझनेससाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा त्याने व्यापक विचार करायला हवा. कोणत्याही मोठी स्वप्ने मिळविण्याकरिता त्याने जजमेंटल असू नये.

२. लहान डोळे: केंद्रित दृष्टी 
गणपती बाप्पाचे लहान डोळे आपल्याला आपल्या हातातील काम पूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित करावयास सांगतात. त्याचप्रमाणे बाप्पा सूक्ष्मदर्शी दृष्टीचे प्रतिनिधित्व करतात ज्यामुळे तुमची निरीक्षण करण्याची क्षमता वाढते. लक्ष केंद्रित करण्याची सवय आणि दृढनिश्चयी दृष्टिकोन हे यशाचे महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. 

३. मोठे कान: उत्तम श्रोता -
मोठे कान एक उत्तम श्रोत्यांचे गुण निर्धारित करतात. एका मॅनेजर किंवा लीडरने उत्तम वक्त्यासोबतच एक उत्तम श्रोता असणे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याने त्याच्या टीममेट्स आणि कलिग्सचे सर्व म्हणणे ऐकून घ्यावे. एका उत्तम बिझनेसमन साठी प्रभावी आणि अत्यावश्यक नेतृत्वगुण म्हणजे त्याचे उत्तम श्रोता होणे. 

४. सोंड: सावधानता व सतर्कता -
लांब नाक किंवा सोंड हे नेहमी सभोवताली नेहमी लक्ष देणे व सावधानता बाळगणे हे सूचित करते. आपल्या बिझनेस मध्ये काम कसे चालू आहे किंवा आपल्या सभोवताली स्पर्धक बिझनेस कसे काम करत आहेत यावर बारकाईने लक्ष द्यावे हे आपल्याला बाप्पाची सोंड शिकवते. त्याचप्रमाणे एक चांगला बिझनेसमन फार पूर्वीच भविष्यात येणाऱ्या धोक्याचा अंदाज लावतो आणि त्यासाठी आधीपासूनच तयारी करतो. 

५. मोठे पोट: सर्व गोष्टी पचवून त्यांना समायोजित करणे  
मोठे पोट हे कोणतीही गोष्ट पचवण्याची व पुढे जाताना कोणतीही गोष्ट लगेच शिकण्याची क्षमता दर्शविते. यामध्ये चांगल्या व वाईट दोन्हीही गोष्टी येतात. म्हणजेच एक उत्तम बिझनेसमन किंवा लीडर हा अपयशाने खचून जात नाही तर या अपयशातून वर येऊन अधिक मेहनत करून यशस्वी होतो. तो कृती करतो व प्रतिक्रिया देत नाही. हेच बाप्पाचे मोठे पोट आपल्याला सांगते. 

६. तुटलेला दात: त्याग - 
बाप्पाचा तुटलेला दात हा त्यागाच्या शक्तीचे प्रतीक आहे. अनेकदा मॅनेजर किंवा बिझनेसमनला त्याच्या भावनांमधून बाहेर निघून आपल्या बिझनेस, कामगारांसाठी पुन्हा आपले काम सुरु करावे लागते. याशिवाय त्यांना कोणत्याही स्वार्थी हेतू किंवा आवडीशिवाय इतरांसाठी कार्य करावे लागते. यामध्येच बिझनेसचे यश समाविष्ट आहे. 

अशा प्रकारे गणपती बाप्पा आपल्यासाठी अनेक गोष्टींचे प्रतीक आहे. या सर्व महत्वाच्या बिझनेस स्किल्स आपल्याला गणपती बाप्पाकडून शिकता येतात. बिझनेस वाढवण्यासाठी या सर्व स्किल्स तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तेव्हा यावर नक्की विचार करा. 
गणेशोत्सवाच्या आपण सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 

आपली खरी आर्थिक समस्या *"पैसा" कमवणे नसून खर्च करने आहे,*...

आपली खरी आर्थिक समस्या
*"पैसा" कमवणे नसून खर्च करने आहे,*
कारण पैसा येतो एकाच वाटेने,
पण... जातो किमान दहा वाटांनी,
त्यामूळॆ *पैसा कमवण्यापेक्षा तो टिकवणे आणि त्याचा उपभोग घेणे हे जास्त कठीण काम आहे.*
पैशाचे एक मजेशीर गणित आहे जेंव्हा तूम्ही काही पैसे खर्च करता, तेंव्हाच तूम्ही काही पैसे कमवू शकता,
मात्र किती खर्च करायचे?
आणि
किती कमवायचे? हे प्रश्न पडतात
याचे उत्तर आहे का ?
हो ! आहे.

मला श्रीमंत व्हायचंय ! या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक￰,उद्योजक,कोच डॉ.संतोष कामेरकर (मुंबई)
आपणास MIND, MONEY, SUCCESS या एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
पैशाचे रहस्य , पैशाचे महत्व
🔍पैसा मिळविण्याचा मार्ग व
📖 यश शास्त्र...
*श्रीमंत लोक श्रीमंत कसे होतात ?*
जगातील 95%पैसा हा फक्त 5% लोकांकडेच कसा काय असतो?
ते 5%लोक असे काय करतात ?
ते कसे असतात ?
त्यांनाच यश कसे मिळते ?
त्यांच्या यशाचे रहस्य ?
यशस्वी होण्यासाठी *MIND, MONEY, SUCCESS* प्रेरणादायी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे.
मोटिव्हेशनच्या क्षेत्रातील व्यवसायिक प्रशिक्षकांचे गुरू, लेखक,संचालक व
गाडी धुण्यापासून, पेपर-दूध लाईन टाकत,आंबे-फणस विकून "करोडपती उद्योगपती" म्हणून नावारुपाला आलेले माननीय डॉ. संतोष कामेरकर यांच्याशी थेट-भेट घेऊन संवाद🎤 साधण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे.

*आपला व्यवसाय अनेक पटीने वाढवावा.📈💰*
अधिक माहितीसाठी 

📞....956084591
*🏆यशस्वी होण्यासाठी हा मेसेज आपल्या मित्रांना पाठवा.*

पैशावर बोलू काही...

पैशावर बोलू काही..

पैसा मिळवण्यासाठी आपण अपार मेहनत घेत असतो.

|| वीरेंद्र तळेगावकर
आर्थिक नियोजन तर करायचे आहे; पण दिशा माहीत नाही, व्यवस्थापनाचं अंग नाही, बहुविध पर्यायांच्या जाळ्यात गुंतणं होतं.. अशा साऱ्यांना ‘गोष्टी सांगे युक्तीच्या चार’ अशा पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल..
पैसा मिळवण्यासाठी आपण अपार मेहनत घेत असतो. परंतु प्रत्यक्षात आपण किती मिळवतो आणि मिळवलेला पैसा वाया जाऊ  नये म्हणून आपण किती सजग असतो? वीज-भ्रमणध्वनीसारखी विविध देयके, भाडे, मासिक कर्जहप्ता, वैद्यकीय खर्च, पर्यटन, सण-समारंभ, मुलांचे शिक्षण आणि पुढे निवृत्तीनंतरचे आयुष्य जगण्यासाठीची आपली तयारी असते काय? आपण कष्टाने पैसा कमावतो, तो खऱ्या अर्थाने आपल्या उपयोगी पडण्यासारखा दुसरा निर्मळ आनंद नाही; परंतु त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? आजच्या पैशाची भविष्यातली किंमत वाढवण्यासाठी आपण काही आराखडा आखतो का? आणि अर्थातच त्या माध्यमातून आपण अधिक सुखकारक जीवन जगू शकू काय?
या साऱ्या शंकांचं निरसन मोनिका हलन यांच्या ‘लेट्स टॉक मनी : यू हॅव वक्र्ड हार्ड फॉर इट, नाऊ मेक इट वर्क फॉर यू’ या पुस्तकातून होतं. पत्रकार आणि आर्थिक नियोजनातील तज्ज्ञ असलेल्या मोनिका हलन यांचं हे पुस्तक म्हणजे व्यक्तिगत गुंतवणुकीबाबतची मार्गदर्शिकाच आहे, असं म्हणण्यास हरकत नाही. आर्थिक साक्षरतेबरोबरच वित्तीय सुरक्षिततेवर भर देणाऱ्या या पुस्तकात श्रीमंतीचा मार्ग नाही, पण पैसा राखण्याच्या योग्य वाटा सांगितल्या आहेत.
इंग्रजी वित्तविषयक नियतकालिकांत स्तंभलेखन करणाऱ्या मोनिका हलन या वित्तीय नियोजनातील गुरू मानल्या जातात. व्यक्तिगत गुंतवणुकीचे मर्म सुलभतेने उलगडवून दाखवण्यात त्यांचा हातखंडा. लिखाण असो वा दृक्-श्राव्य माध्यममंचावरील कार्यक्रम असोत, आर्थिक नियोजनाचे किचकट गणित त्या सहज सोडवतात. वित्तीय नियोजनातील शास्त्रोक्त शिक्षण (‘सेबी’च्या नव्या दंडकानुसार पैशाविषयी सल्ला देणाऱ्या प्रत्येकाला ते आवश्यक आहे.) घेतलेल्या मोनिका हलन सेबीच्या म्युच्युअल फंड सल्लागार समितीच्याही सदस्य आहेत. अनेक इंग्रजी वित्तविषयक दैनिकांत त्यांनी पत्रकारिता केली आहे. यावरून त्यांचा या विषयातील अधिकार ध्यानात यावा.
पैशाविषयी भविष्यातील चिंता, परताव्याबाबतची जोखीम, मुदलाबाबतचा अतिआत्मविश्वास.. गुंतवणूकदारांच्या मानसिकतेतील अशा मुद्दय़ांचा अंदाज घेत त्यासंबंधी पुस्तकातील १४ प्रकरणांतून मांडणी केली आहे. ही मांडणी गुंतवणूकदाराला एक विश्वासार्ह पाऊल उचलण्यासाठी प्रेरित करते. प्रत्येक प्रकरणाला उपशीर्षकाची जोड देत विविध गुंतवणूक पर्याय, त्यांची ओळख, त्यांची रचना यांची माहिती दिली आहे. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी सावधगिरीच्या चौकटीत बसवण्यात आलेला टिप्सवजा दिलासाही दिला आहे. त्यातून वित्त विषयातील जाणकार म्हणून लेखिकेचे वेगळेपण अधोरेखित होते. मात्र, असे असले तरी- गोंधळात टाकणारे गुंतवणुकीचे बहुविध पर्याय, योजनांचा परतावा, त्यावरील करमात्रा अशा डोळे फिरवणाऱ्या कोणत्याही आकडेवारीत, आलेखात न अडकता अगदी लहानग्याला एखादी गोष्ट सांगावी तसा हा काहीसा क्लिष्ट विषय समजावून देण्याचा प्रयत्न लेखिका करते.
‘गुंतवणुकीवरील आकर्षक परतावा’ या एकाच उद्दिष्टाप्रति केंद्रस्थानी असलेली चिंता फलदायी गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करत असते. तसे होऊ  न देण्यासाठी गुंतवणुकीतील एक साचेबद्धता, त्याबाबतचे आखीवरेखीव धोरण महत्त्वाचे ठरत असते. हे सारे या पुस्तकात बिंबवण्यात आले आहे. पुस्तकातील गुंतवणुकीबाबतची काही उदाहरणं ही लेखिका आणि तिच्या सहकाऱ्यांनी अनुभवलेली आहेत. ही उदाहरणं वाचकांना काही निर्णय समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील. त्यामुळे कोणत्याही कमावत्या वयोगटातील व्यक्तीकरिता वित्तीय नियोजनाचा पाठ या पुस्तकाद्वारे सहजरीत्या गिरविता येऊ शकतो.
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, पुस्तकात गुंतवणुकीच्या विविध पर्यायांवर स्वतंत्र प्रकरणे आहेत. पैकी काही दोन-चार पानांतच सामावली आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणूकदारांचा कल वाढलेल्या भांडवली बाजार आणि म्युच्युअल फंडांवरील प्रकरण मात्र विस्तृत आहे. त्याचबरोबर कमी कालावधीत अधिक परतावा मिळवण्यासाठी अग्रक्रमावर असणाऱ्या स्थावर मालमत्ता, सोने या गुंतवणूक प्रकारांवरही स्वतंत्र प्रकरणात प्रकाश टाकण्यात आला आहे. स्थिर उत्पन्न देणाऱ्या पारंपरिक गुंतवणूक पर्यायांबरोबरच विमा, निवृत्ती निधी, आपत्कालीन तजवीज यांकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला गुंतवणुकीविषयी दिलेला सुविचार ते प्रकरण वाचण्याकरिता तसेच गुंतवणुकीसाठी त्या दिशेने पावले टाकण्यास प्रेरित करतो. आर्थिक नियोजनावरील लेखिकेचे साप्ताहिक स्तंभलेखन वाचण्याची सवय असणाऱ्यांचीही वित्तीय गुंतवणुकीच्या मार्गदर्शनाबाबतची उत्सुकता अधिक ताणली जाईल एवढे सामथ्र्य या पुस्तकात नक्कीच आहे.
पैसा झटपट मिळत नसतो आणि त्यावरील परतावा तर कदाचितच. तेव्हा मिळणाऱ्या पैशाचं योग्य सुनियोजन आवश्यक ठरतं. नेहमीच मुदलावरील अधिक परताव्यापेक्षा तो आपली जीवनशैली जपून महागाईवर मात करणारा ठरतो का, हे पाहणारी दृष्टी हे पुस्तक देते. बचतीचा रामबाण उपाय म्हणून न बघता अनेकदा गुंतवणुकीकडे ती गुंतवणूक, संबंधित योजना तुमची समस्या सोडवण्यास सक्षम आहे का, हे पाहणे हितावह ठरते. नेमका हाच मंत्र हे पुस्तक देते. झटपट आणि सहज मार्गाने मिळवलेला पैसा दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करतो का, हा प्रश्न स्वत:लाच विचारण्याची संधी हे पुस्तक देते.
गुंतवणूकदारांचा एक वर्ग छोटय़ा छोटय़ा चुका करत असतो. त्याची पुनरावृत्तीही अनेकदा होते. ते सर्व कसे टाळता येईल, हे पुस्तकात सोदाहरण दिले गेले आहे. जेवढे ते कमावत्या वयात उपयुक्त ठरते, तेवढेच निवृत्तीनंतरच्या कालावधीतही! पुस्तकातील भाषा सोपी आहे. त्यामुळे त्यातील मांडणी आव्हानात्मक अशा गुंतवणूक नियोजनात वेळोवेळी निर्णय घेण्यासाठी सहज लक्षात राहते. आर्थिक नियोजन तर करायचे आहे; पण दिशा नाही, व्यवस्थापनाचं अंग नाही, बहुविध पर्यायांच्या जाळ्यात गुंतणं होतं.. अशा साऱ्यांना ‘गोष्टी सांगे युक्तीच्या चार’ अशा पद्धतीने लिहिलेले हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
असंख्य आकडे, पानभर आलेख यांचा मोह पुस्तकाच्या वाचनीयतेच्या दृष्टीने लेखिकेने टाळला असला, तरी काही उदाहरणं ही संबंधित व्यक्ती, कुटुंब, कमावते, करदाते यांच्या तक्त्यासह देणे सहज शक्य होतं. ते एक सामाईक उदाहरण म्हणून अनेकांना आपल्या विद्यमान निर्णय व भविष्यातील तरतुदींबरोबर पडताळून पाहायला उपयुक्त ठरलं असतं.
पोस्टाच्या अथवा बँकांच्या मुदत ठेवी, रोखे या स्थिर उत्पन्न देणाऱ्या गुंतवणूक पर्यायांबरोबरच भांडवली बाजारातील ‘न्यू फंड ऑफर’ (एनएफओ), ‘एक्स्चेंज-ट्रेडेड फंड’ (ईटीएफ),  ‘नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स’ (एनसीडी), कंपनी समभाग आदी नवपर्यायांबाबतही आणि आकर्षक परताव्याच्या आमिषसागरात गटांगळ्या खाणाऱ्या गुंतवणूकदारांना पॉन्झी स्कीमबद्दल थोडेसे जागरूक करून आधार देण्याचा प्रयत्न करण्यास हरकत नव्हती. त्याविषयी पुस्तकात फारसे काही हाती लागत नाही. समभाग आणि फंड यातील गुंतवणुकीबाबत सविस्तर केलेलं भाष्य विमा आणि निवृत्तिवेतनाबाबतही पूरक ठरतं.
लेखिका स्वत: तरुण असूनही वाध्र्यक्यातील अर्थचिंता तिच्या पुरेशी लक्षात आली आहे, ते या क्षेत्रातील तिच्या वावरामुळे आणि अस्थिर अशा उत्पन्नदेयी वातावरणामुळे! तेव्हा वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात, तसेच मध्यात अनेकांसाठी उत्तम आर्थिक नियोजनासाठी हे पुस्तक गुरुकिल्ली ठरावे. तीन बँक खाती, पाच विमा (आरोग्य, आयुर्विमा, आजार, अपघात, घर) आणि केवळ तीन गुंतवणूक माध्यमं ही त्रिसूत्री हे पुस्तक देते. गुंतवणुकीच्या जगतातील मुशाफिरी या पुस्तकातील शिदोरीसह केली, तर ती उर्वरित आयुष्यासाठी आणि पर्यायाने कौटुंबिक सुखी जीवनासाठी अधिक आनंददायी होईल, यात शंका नाही.
उत्पन्न, खर्च आणि महागाई हे डोळ्यांसमोर ठेवून उत्तरार्धातील आयुष्य आणि निवृत्तीशी संबंधित योजना यांचा मेळ राखण्यावर पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात भर देण्यात आला आहे. याच प्रकरणात गुंतवणुकीविषयीची गृहीतकं टाळण्याचा बहुमोल सल्ला देण्यासही लेखिका विसरत नाही. त्यापुढील प्रकरणात लेखिकेच्या अर्थसल्ल्याचे लाभधारक, त्यांची भेट, त्यांची उपकारी वर्तणूक हे सारं अतिशयोक्ती अथवा आत्मस्तुतीचा भाग वाटला, तरी पुस्तकाचं सार त्यात आलं आहे.
जुलै, २०१८ मध्ये प्रकाशित या पुस्तकाला ‘आधार’चे शिल्पकार नंदन निलेकणी यांची प्रस्तावना आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर पुस्तक आणि लेखिका यांच्याबद्दलचे कौतुकोद्गार आहेत. यामध्ये भांडवली बाजार, वित्त नियामक नेतृत्वाचा, तसेच वित्त विषयाला वाहून घेतलेल्या पत्रकार सहयोगींचा समावेश आहे. शेवटच्या चार पानांवर पुस्तकात आलेल्या आर्थिक क्षेत्राशी संबंधित काही संज्ञा, वापरात येणाऱ्या लघुरूपांचे विस्तृतीकरण त्यांच्या नोंदपृष्ठ क्रमांकासह देण्यात आले आहे. त्यामुळे या संज्ञांशी फारसे परिचित नसलेल्यांना त्या समजून घेण्यास मदत होईल. एकुणात, भारतीय मानसिकता ध्यानात घेऊन लिहिलेले हे पुस्तक आर्थिक सुरक्षिततेचा वाटाडय़ा ठरणार आहे हे निश्चित!
  • ‘लेट्स टॉक मनी’
  • लेखिका : मोनिका हलन
  • प्रकाशक : हार्पर बिझनेस
  • पृष्ठे : २१२, किंमत : ३९९ रुपये








by- Loksatta 

मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९

या अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता प्रभुदेवा

 या अभिनेत्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होता प्रभुदेवा

प्रभुदेवाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे.

प्रभुदेवा

डान्सर, कोरिओग्राफर, दिग्दर्शक, अभिनेता प्रभुदेवा याचा आज वाढदिवस. ‘भारतीय मायकल जॅक्सन’ म्हणून ओळखला जाणाऱ्या प्रभुदेवाने आजवर शेकडो चित्रपटांच्या गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. तर १३ चित्रपटांचं दिग्दर्शन आणि चार चित्रपटांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रभुदेवाने हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांतही काम केले आहे. प्रभुदेवाचे वडील दाक्षिणात्य चित्रपटांमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक होते. त्यांच्याकडूनच प्रभुदेवाने नृत्याचे धडे घेतले.
प्रभुदेवाच्या नृत्याचे चाहते जगभरात आहेत. पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारच कमी लोकांना माहीत आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्यामुळे प्रभुदेवाचं लग्न मोडलं असं म्हटलं जातं. नयनतारा हिचे प्रभुदेवावर खूप प्रेम होते. या प्रेमापोटी तिने ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला. बरेच वर्ष हे दोघं लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये होते.
प्रभुदेवाचे रामलता यांच्याशी लग्न झाले होते. नयनताराशी असलेले संबंध उघडकीस आल्यानंतर संतापलेल्या रामलता यांनी २०१० कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. त्याचबरोबर नयनतारापासून दूर राहण्यासाठी प्रभुदेवावर दबाव टाकण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी हा वाद विकोपाला गेला आणि रामलता यांनी उपोषणाची धमकी दिली. तर अनेक महिला संघटनांनी नयनताराविरोधात आवाज उठवला.
अखेर २०११ मध्ये प्रभुदेवाने पत्नी रामलता यांना घटस्फोट दिला. मात्र त्यानंतर नयनताराने प्रभुदेवा आणि तिच्यात कोणताही संबंध नसल्याचं प्रसारमाध्यमांमध्ये स्पष्ट केले

‘या’ एका चित्रपटामुळे राजकुमारचे नशीब बदलले!

‘या’ एका चित्रपटामुळे राजकुमारचे नशीब बदलले!

राजकुमार रावसारखा अभिनेता इंडस्ट्रीत निश्चितपणे आपली एक वेगळी जागा निर्माण करताना दिसतोय

राजकुमार राव

प्रेक्षकांच्या बदलत्या दृष्टीकोनानुसार भारतीय चित्रपटांची संकल्पनाही बदलत आहे. स्टार आणि अभिनेता यांच्यामध्ये एक स्पष्ट सीमारेषा असून दोघांचाही स्वतंत्र असा चाहतावर्ग आहे. एकीकडे शाहरुख खान, रणवीर सिंग, सलमान खान, अक्षयकुमार या अभिनेत्यांकडे स्टार म्हणून पाहिलं जातं. तर दुसरीकडे विकी कौशल, आयुषमान खुराणा आणि राजकुमार राव यांच्याकडे अभिनेता म्हणून पाहिलं जातं. त्यातच राजकुमार रावसारखा अभिनेता इंडस्ट्रीत निश्चितपणे आपली एक वेगळी जागा निर्माण करताना दिसतोय. राजकुमारचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्त या अभिनेत्याविषयी काही गोष्टी जाणून घेऊयात…
३१ ऑगस्ट १९८४ रोजी गुरुग्रामच्या अहीरवाल येथे राजकुमार रावचा जन्म झाला. ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (FTII) मधून पदवी घेतल्यानंतर तो मुंबईला आला. लहानपणापासूनच बॉलिवूड अभिनेत्यांची नक्कल करायला त्याला खूप आवडायचं. अभिनेता होण्याचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईला आल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्याला प्रचंड संघर्ष करावा लागला. अनेक ठिकाणी लहान-सहान काम केल्यानंतर एक दिवस त्याला दिवाकर बॅनर्जी यांच्या एका जाहिरातीकडे गेली. यामध्ये त्यांच्या आगामी चित्रपटासाठी त्यांना एक नवा चेहरा हवा होता. ही जाहिरात राजकुमार ऑडिशनसाठी गेला आणि त्याची निवड झाली. त्यानंतर त्याने ‘लव्ह, सेक्स और धोका’ हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटातील त्याचा अभिनय पाहिल्यानंतर त्याच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं.
अभिनयाप्रमाणेच राजकुमारचं वैयक्तिक आयुष्यदेखील तितकंच चर्चिलं गेलं. ‘सिटी लाईट्स’ या चित्रपटातील राजकुमारची सहअभिनेत्री पत्रलेखा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ‘एफटीआयआय’मध्येच दोघांची पहिल्यांदा भेट झालेली आणि एका शॉर्ट फिल्मच्या सेटवर दोघांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
आपल्या प्रत्येक भूमिकेत जिवंतपणा आणणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता राजकुमार सध्या अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाला आहे. काही दिवसापूर्वी त्याचा ‘स्त्री’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूरने स्क्रीन शेअर केली आहे

रतन टाटांबद्दल ‘या’ पाच गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

रतन टाटांबद्दल ‘या’ पाच गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?

रतन टाटांबद्दल समाजात प्रचंड आकर्षण असले तरी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे

रतन टाटा

व्यवसाय करताना समाजहिताचा प्राधान्याने विचार करणाऱ्या उद्योगसमूहांमध्ये टाटा उद्योगसमूहाचे स्थान पहिले असेल. टाटा सन्सचा आज भारतासह जगभरात जो विस्तार झालाय त्यामध्ये रतन नवल टाटा यांचे महत्वाचे योगदान आहे. १९९१ साली रतन टाटा यांनी टाटा सन्सची धुरा सांभाळली तेव्हापासून या उद्योगसमूहाने मागे वळून पाहिलेले नाही. उद्योगविस्ताराबरोबर नैतिकता जपण्याला टाटा समूह पहिले प्राधान्य देतो त्यामुळे रतन टाटा यांचा फक्त उद्योगक्षेत्रातच नव्हे तर सर्वसामान्यही प्रचंड आदर करतात.
रतन टाटा यांच्याबद्दल समाजात प्रचंड आकर्षण असून त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी जणांना काही गोष्टी माहिती असतील. १९६१ साली त्यांना आयबीएममध्ये नोकरीची ऑफर आली होती. पण त्यांनी ही ऑफर नाकारली आणि कौटुंबिक व्यवसायामध्ये स्वत:ला झोकून दिले आणि टाटा सन्सला नव्या उंचीवर घेऊन गेले.
भारताचे यशस्वी उद्योगपती असलेल्या रतन टाटा यांच्याबद्दल आपण आज अशाच पाच गोष्टी जाणून घेणार आहोत.
– रतन टाटा आता टाटा सन्सच्या दैनंदिन काराभारापासून दूर असले तरी त्यांनी अनेक स्टार्ट अप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. मीडिया ते ई-कॉमर्स अशा वेगवेगळया क्षेत्रात त्यांनी गुंतवणूक केली आहे. एखादेच असे क्षेत्र असेल ज्यात टाटा यांनी गुंतवणूक केली नसेल. ३० पेक्षा जास्त स्टार्ट अप कंपन्यांमध्ये रतन टाटा यांनी गुंतवणूक केली आहे. उदयोन्मुख प्रतिभेवर विश्वास ठेवण्याची टाटांची जी परंपरा आहे त्यानुसारच ही गुंतवणूक करण्यात आली आहे.
– रतन टाटा अविवाहित आहेत पण चारवेळा त्यांच्या मनात लग्नाचा विचार आला होता. २०११ साली सीएनएन इंटरनॅशनला या वृत्तवाहिनीला टॉक एशिया कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्वत: ही कबुली दिली होती. चारवेळा मी लग्न करण्याच्या निर्णयाप्रत आलो होतो. पण प्रत्येकवेळी मी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे मनात असलेल्या भितीपोटी माघार घेतली.
– रतन टाटा यांना वेगवेगळया गाडयांचे प्रचंड आकर्षण असून गाडया त्यांच्या आत्मीयतेचा विषय आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच टाटा समूहाने लँड रोव्हर, जॅग्वार आणि रेंज रोव्हर या महागडया गाडयांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या विकत घेतल्या आणि भारताची मान अभिमानाने उंचावली. या ब्राण्डसमुळे आज टाटा मोटर्सची आंतरराष्ट्रीय बाजारात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. सामान्य भारतीयांचा विचार करुन रतन टाटा यांनी टाटा नॅनो कारची निर्मिती केली. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमतीत त्यांनी ही कार बाजारात आणली.
– रतन टाटा यांचा जन्म श्रीमंत, संपन्न पारसी कुटुंबात झाला असला तरी त्यांचे बालपण मात्र त्रासदायक होते. रतन टाटा फक्त सात वर्षांचे असताना त्यांचे वडिल नवल टाटा आणि आई सून्नी टाटा विभक्त झाले. त्यानंतर रतन टाटा यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला.
– व्यापार-उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल रतन टाटा यांनी भारतातील दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. २००० साली रतन टाटा यांना पद्म भूषण या तिसऱ्या क्रमांकाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००८ साली त्यांना पद्म विभूषण पुरस्कार मिळाला.









by - loksatta

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१९

स्मृती- मायकेल फरेरो, फरेरो रोशर व न्यूटेला कंपनीचे मालक


स्मृती- मायकेल फरेरो, फरेरो रोशर व न्यूटेला कंपनीचे मालक
दिव्‍य मराठी टीम |

फरेरो एम्पायरला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे श्रेय मायकेल यांना जाते. मात्र, त्यांचे वडील पेट्रो यांनी १९४० च्या दशकात न्यूट्रेलामध्ये कंपनीची स्थापना केली होती.





श्रीमंत कँडीमॅन, संपत्ती 1385 अब्ज रुपये-

फरेरो एम्पायरला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे श्रेय मायकेल यांना जाते. मात्र, त्यांचे वडील पेट्रो यांनी १९४० च्या दशकात न्यूट्रेलामध्ये कंपनीची स्थापना केली होती. मायकेल यांनी वडिलांचे स्वप्न जगातील सर्वात मोठ्या कॉन्फेक्शनरी एम्पायरमध्ये रूपांतरित केले. १९४६ मध्ये दुस-या महायुद्धादरम्यान पेट्रो यंानी इटलीत एका कॉफी बारमध्ये कामाची सुरुवात केली.

१९४९ मध्ये मायकेल वडिलांच्या कामात मदत करू लागले. सुरुवातीस न्यूटेला तयार करण्यासाठी कोकोचा वापर केला होता. मात्र, जागतिक युद्धानंतर कोको महाग झाले आणि पुरवठा कमी होऊ लागला तेव्हा लोकल नट्सचा वापर करून कोको-हेजलनट बेसद्वारे न्यूटेला तयार केले. चॉकलेट बेसमुळे त्याचा लूक ब्रेडसारखा होता. यानंतर त्यास क्रीम फॉर्म देण्यात आला व फरेरो स्पा कंपनीची स्थापना केली. हेजलनटपासून तयार न्यूटेलाची चव लोकांना आवडू लागली आणि एप्रिल १९६४ मध्ये ११ फरेरो कारखान्यांत जगभरात ३,६५,००० टन न्यूटेला तयार झाले. एक वर्षानंतर मिल्क बेस्ड किंडर चॉकलेट लाइन लाँच करण्यात आले. १९८२ मध्ये फरेरो रोशर चॉकलेट बनवण्यात आले. आजारी असतानाही मायकेल आठवड्यातून एक दिवस अल्बा येथील सर्वात मोठ्या चॉकलेट कारखान्यात नवी रेसिपी टेस्ट करण्यासाठी जात होते. इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जियो मेटारेला यांनी देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते बॉर्न आंत्रप्रेन्योर होते या शब्दांत त्यांनी गौरव केला. ब्लमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत फेब्रुवारी २०१५ मध्ये त्यांची संपत्ती १४.४ अब्ज पाउंड (१३८५ अब्ज रुपये) असल्याचे सांगितले. इटलीतील ही सर्वाधिक संपत्ती आहे. फोर्ब्जने त्यांच्या कुटुंबाला जगातील अब्जाधीशांच्या यादीत ३० वे स्थान दिले आणि त्यांना "द रिचेस्ट कँडीमॅन ऑन द अर्थ'चा किताब दिला.

एकूण मालमत्ता-१३८५ अब्ज रुपये, इटलीत सर्वाधिक
एकूण कंपन्या- ७०
प्रॉडक्शन युनिट- १५
कर्मचारी- २२ हजार

कुटुंब : मारिया फ्रेंका(पत्नी), पेट्रो ज्युनियर फरेरो व जियोवनी फरेरो. थोरल्या मुलाचा हार्ट अॅटॅकने मृत्यू. लहान जियोवनी कंपनीमध्ये सीईअो.

हे सर्व ब्रँड : न्यूटेला, फरेरा रोशर, मॉन चेरी, किंडर चॉकलेट, टिक टॅक (पॉकिट मिंट), िकंडर एग्ज, पॉकिट कॉफी.

माझ्याबद्दल