मंगळवार, २९ मार्च, २०२२

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही फसवणूक होणार नाही!...

 

Chanakya Niti: आचार्य चाणक्यांच्या या  गोष्टी कायम लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही फसवणूक होणार नाही!

Chanakya Niti: जर तुमची सुद्धा सतत फसवणूक होत असेल किंवा तुम्हाला चांगला माणूस ओळखता येत नसेल तर तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आचार्य चाणक्यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत ज्याचा अबलंब तुम्ही तुमच्या आयुष्यात केला तर कधीही तुमची फसवणूक होणार नाही.




वाईट काळातही संयम आणि आत्मविश्वास गमावू नये. हे दोन गुण कठीण परिस्थितीत तुमचे खरे मित्र ठरतात आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करतात.


पुराणांच्या मते पहिले सुख आणि निरोगी शरीर. आचार्य चाणक्यांच्या मते तुमच्या शरीराची सर्वात जास्त काळजी घ्या, यामुळे तुम्ही कोणतेही काम करू शकता. जर याचा काही उपयोग झाला नाही तर तुम्ही आयुष्यात काहीही करू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहा.


आयुष्यातील तुमची सर्वात मोठी रहस्ये कधीही कोणाला सांगू नका कारण तुमचा आज जो मित्र आहे तो उद्या तुमचा मित्र होईल की नाही हे तुम्हाला माहीत नाही. अशा व्यक्तीशी तुमचे वैर असेल तर तो समाजात तुमची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.



दुष्ट माणसाची प्रवृत्ती धूर्त असते, त्यामुळे अशा लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करू नका. त्यांनी कोणाची सेवा केली तरी त्यात त्यांचा स्वार्थ दडलेला असतो. ते कधीही कोणाचे नातेवाईक असू शकत नाहीत.


तुम्ही जे काही ध्येय ठेवले आहे, ते कोणाला सांगू नका. ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि पूर्ण झोकून देऊन काम करा. त्याची माहिती मिळवा, पण तुमचा हेतू उघड करू नका. तुमचे यश स्वतःच लोकांना तुमच्या ध्येयाबद्दल माहिती देईल. पण जर तुम्ही ते एखाद्यासोबत शेअर केलेत तर तो तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतो किंवा तुमची थट्टा करू शकतो.

by - www.tv9marathi.com

law of attraction | आचार्य चाणक्यांच्या मते, मनातील विचारांचे काहूर बंद करा, जे हवे त्याचाच विचार करा, ती गोष्ट तुमच्याकडे स्वत:हून येईल!

 

law of attraction | आचार्य चाणक्यांच्या मते, मनातील विचारांचे काहूर बंद करा, जे हवे त्याचाच विचार करा, ती गोष्ट तुमच्याकडे स्वत:हून येईल!

आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि अभ्यासक होते. शिक्षणाला त्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते.



मुंबई : आचार्य चाणक्य एक कुशल रणनीतिकार, अर्थशास्त्रज्ञ आणि अभ्यासक होते. शिक्षणाला त्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते. चाणक्य यांनी अगदी लहान वयातच वेद आणि शास्त्रांचे ज्ञान प्राप्त केले होते. चाणक्य यांनी आपल्या मुत्सद्दीपणा आणि रणनीतिने आपल्या सर्वात मोठ्या शत्रू पद्मानंदचा पराभव केला आणि सामान्य चंद्रगुप्त मौर्याला सम्राट बनवले. चाणक्य यांनी आपल्या आयुष्यात अनेक पुस्तके आणि ग्रंथ लिहिले. आचार्य चाणक्यांच्या (Acharya Chanakya) नीती पुस्तकात जीवनाशी संबंधित प्रत्येक पैलूचा उल्लेख केलेला आहे. चाणक्याने सुचवलेल्या गोष्टींचा अवलंब आपण आज केला तर आपल्याला आपले आयुष्य सुरळीतपणे जगण्यसाठी मदत होते. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी स्वतः त्यांच्या जीवनात अनेक समस्यांचा सामना केला होता, परंतु तरीही त्यांनी त्यांच्या धोरणांमध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे ज्या प्रत्येकाने आपल्या जीवनात (Life) आणल्या पाहिजेत. तुमच्या मनातील विचारांचे काहुर बंद करा आणि जे हवे त्याचाच विचार करा, ती गोष्ट तुमच्याकडे स्वत:हून येईल असे आचार्यांनी सांगितले होते. पण स्वत:चा विचार करण्यासाठी पुढील गोष्टींचा अवलंब करा.

आत्मकेंद्रित
अनेक वेळा यश मिळाल्यावर माणूस स्वतःला सर्वोत्कृष्ट समजू लागतो. आचार्य यांच्या मते, अशा व्यक्तीला एका वेळी पराभवाला सामोरे जावे लागते. नाहीतर तो एकाकी पडतो. ते म्हणतात की अहंकार आणि स्वतःला सर्वांपेक्षा श्रेष्ठ समजणे ही मोठी चूक आहे. माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्याने जमिनीशी जोडलेले राहिले पाहिजे.

नकारात्मक लोक
अनेकदा असे दिसून येते की लोक समस्यांमुळे नकारात्मक वागणूक स्वीकारतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आर्थिकच नव्हे तर शारीरिक समस्याही निर्माण होऊ लागतात. चाणक्य म्हणतो की नकारात्मक न होता कठीण प्रसंगांना सामोरे जावे.

वेळेचे महत्त्व
आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्यांना वेळेचे महत्त्व कळत नाही, त्यांना अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते आणि त्यांना नेहमी पराभवाचा सामना करावा लागतो. वास्तविक, एकदा गेलेली वेळ परत येत नाही.त्यामुळे वेळेचा आदर केला पाहीजे

राग
आचार्य सांगतात की जो माणूस रागावर वर्चस्व गाजवू देतो त्याला एकवेळ मोठे नुकसान सहन करावे लागते. हा पराभव केवळ एक प्रकारचा पराभव असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर अपयशही अशा लोकांना त्रास देते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)


*बदक की गरुड ?*

 *बदक की गरुड ?* 

*निर्णय तुमचा आहे.*

 एकदा विमानतळावर असताना माझी एका टॅक्सी चालकाशी गाठ पडली आणि त्याच्या टॅक्सीत सर्वप्रथम माझ्या नजरेस एक गोष्ट पडली ती म्हणजे, एक पाटी जिच्यावर लिहिले होते की 
*बदक की गरुड*
*तुमचे तुम्हीच ठरवा.*
दुसरी गोष्ट जाणवली ती स्वच्छ आणि चकचकीत गाडी, ड्रायव्हर अतिशय टापटीप आणि स्वच्छ आणि इस्त्रीच्या ड्रेस मध्ये होता. स्वच्छ पांढरा इस्त्रीचा शर्ट आणि पँट वर टाई.
ड्रायव्हर स्वतः उतरून गाडीबाहेर आला आणि त्याने माझ्यासाठी गाडीचा दरवाजा उघडला. आणि बोलला, 
" माझे नाव जॉन आहे. आणि मी तुमचा वाहक आहे. जो पर्यंत मी तुमचे समान गाडीच्या डिकीत ठेवतो तोपर्यंत आपण माझे हे मिशन कार्ड वाचावे सर."
त्या कार्ड वर लिहिले होते,
*जॉन चे मिशन*
*माझ्या ग्राहकांना लवकरात लवकर, सुरक्षित* *आणि रास्त दरात त्यांच्या इच्छित स्थळी* *पोहचवणे आणि तेसुद्धा आल्हाददायक आणि* *मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये.*

मी भारावून गेलो होतो.
गाडीतील आतील बाजूही तेवढीच टापटीप आणि स्वच्छ, नीटनेटकी होती. 
जॉन ने मला विचारले. 
"आपल्याला कॉफी घ्यायला आवडेल काय?"
मला त्याची गंमत करायची लहर आली म्हणून मी त्याला म्हणालो. "नाही, मला ज्यूस हवा आहे."
तात्काळ जॉन उत्तरला... 
"काही हरकत नाही सर, माझ्याकडे तीन वेगवेगळ्या थर्मास आहेत. ह्यापैकी एकात ज्यूस, एकात डायट ज्यूस आणि एकात पाणी आहे."
तुम्हाला वाचायचे असेल तर माझ्याकडे आजचे वर्तमानपत्र आणि काही मासिके आहेत. 
जेव्हा आमचा प्रवास चालू झाला तेव्हा जॉन मला म्हणाला की जर मला गाणी किंवा बातम्या ऐकायच्या असतील तर हा रिमोट आहे आणि ह्या वरील नंबर्स प्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे त्याचा आनंद घेऊ शकता. 
मला अजूनही धक्का बसायचा बाकी होता. कारण 
पुढे त्याने अत्यंत मार्दवपूर्ण स्वरात विचारले. "सर, एसी चे तापमान ठीक आहे की आपणास काही वेगळे हवे आहे?" त्यानंतर त्याने मला माझ्या गंतव्य स्थानी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता आहे हे सांगितले आणि पुढे विचारले की, तो माझ्याशी बोललेले चालेल की त्याने शांत राहावे ? 
न राहवून मी त्याला विचारले. 
" तू नेहमी तुझ्या ग्राहकांना अशी सेवा देतोस?" 
त्यावर तो उत्तरला. "नेहमी नाही, दोन वर्षांपासून देतो आहे. माझ्या सुरवातीच्या काळात मीही इतर टॅक्सी चालकांसारखा सतत तक्रार करीत असे. आणि असमाधानी राहत असे. पण एकदा एका डॉक्टर कडून मी व्यक्तिमत्त्व सुधारणांबाबत ऐकले. 
त्यांनी एक पुस्तक लिहिले होते. त्याचे नाव होते. " तुम्ही जे कोणी आहात त्याने फरक पडतो" ज्यात पुढे लिहिले होते. जर तुम्ही सकाळी उठून असा विचार कराल की आज दिवस वाईट जाणार आहे. फक्त अडचणीच आहेत तर खरेच तसेच होईल. तुमचा तो दिवस वाईट आणि अडचणींचा जाईल.
*बदक बनू नका*
*गरुड बना*
बदक फक्त आणि फक्त आवाज करतो. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतो. आणि गरुड सर्व समुदायापासून वेगळा आणि उंच उडतो.
आणि माझ्या लक्षात आले की मी सतत रडतो आहे फक्त तक्रारी करतो आहे. 
म्हणून मी स्वत:ला बदलण्याचे ठरविले. माझ्या दृष्टिकोनात बदल करून गरुड बनण्याचे ठरविले. 

मी इतर टॅक्सी चालकांकडे बघितले. अस्वच्छ, गलिच्छ टॅक्सीज आणि आडमुठे चालक आणि म्हणून असमाधानी ग्राहक. असे चित्र होते ते.

मी काही बदल करायचे ठरवले. आणि माझ्या ग्राहकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे नंतर आणखी काही बदल करीत गेलो. 
आणि गरुड बनण्याचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्याच वर्षी माझा व्यवसाय दुप्पट झाला आणि ह्यावर्षी आत्तापर्यंतच्या चौपट झालेला आहे. 
तुम्ही सुदैवी आहात की आज मी तुम्हाला इथे सापडलो. अन्यथा आजकाल माझे ग्राहक माझ्याकडे आगाऊ रिझर्व्हेशन करून माझी टॅक्सी सेवा घेत असतात. किंवा मला मेसेज करून माझी टॅक्सी बुक करतात. मला शक्य नसेल तेव्हा मी अन्य गरुड बनलेल्या टॅक्सीचालक द्वारे ती सेवा ग्राहकाला पुरवतो. 
जॉन बदलला होता. तो साध्या टॅक्सीतून लुमोझीन कार सर्व्हिस पुरवत आहे. जॉन ने बदका सारखे सतत आवाज करत, सतत तक्रार करणे सोडून दिले आहे. आणि गरुडासारखी भरारी मारायला सूरूवात केली आहे.
*तुम्ही कुठे आणि काय काम करता याने काहीही फरक पडत नाही तर तुम्ही ते कसे आणि कोणत्या मनोभूमिकेतून करता याने नक्की फरक पडतो.*
 
*तुम्ही काय ठरवले आहे ?* 
*बदकासारखे सतत आवाज करत(रडत) तक्रार* *करत राहणे की गरुडासारखे सगळ्यांपेक्षा वर* *उडण्याचे ?*
*लक्षात ठेवा....*
*निर्णय तुमचा आहे*
*हे कुलूप फक्त आतून उघडते....*

रविवार, ३० जानेवारी, २०२२

THE LAW OF ATTRACTION (सकारात्मक ,नकारात्मक प्रभाव)...

 

THE LAW OF ATTRACTION (सकारात्मक ,नकारात्मक प्रभाव)

                                                                                                                                            संग्रहित 
THE LAW OF ATTRACTION (सकारात्मक ,नकारात्मक प्रभाव)

                   असं का होतं की ज्या गोष्टीची भीती असते, तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते.
एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्या विषयात नापासचं होतो,
पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी चिंता करणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल होतो? 
आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी फटका बसतोचं बसतो,
कष्ट नकोत, कष्ट नकोत, घोकणार्‍याच्या नशिबात श्रम आणि राबणंचं असतं,
का बरं एखादीला नको असलेलं गावच ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?
का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतायतं?
तर ह्या सगळ्यांना एक कारण आहे,
आणि ते कारण आहे आकर्षणाचा नियम, द लॉ ऑफ अट्रॅक्शन..
    तुम्हाला माहीतीय?...जगातील फक्त एक टक्का लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे. हा योगायोग नाही, हा आकर्षणाचा नियम आहे. काय सांगतो हा नियम? तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट ही कळत नकळत तुम्हीच आकर्षित केलेली आहे, जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…
    जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल, तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थीती वास्तव बनुन समोर येते.
     उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस कर्जावर जातो तर कर्ज वाढतं.
माझं वजन वाढतयं, म्हटलं की वजन अजुन वाढतं, 
माझे केस गळतायत म्हटलं की अजुनच केस गळतात,
माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,
कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून अडचणी निर्माण होतात,
वगैरे वगैरे...ज्या गोष्टीवर मन, लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट घडते.  म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं ते आपल्याला मिळालयं अशी कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.
फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं.
        मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली. 
विश्वातील सर्वच थोर माणसांनी हे आकर्षणाचं रहस्य जाणलं होतं आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.
      तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान हवं असल्यास, रोज सकाळी मस्त तयार होवुन आरशासमोर उभे राहुन, चेहर्‍यावर स्मितहास्य ठेवुन, मोठमोठ्याने अशी वाक्ये जोरजोरात म्हणा!..
1) मी हवा तेवढा पैसा आकर्षित करु शकतो, मी शक्तीशाली आहे.
2) माझ्यात जग बदलण्याची शक्ती आहे.
3) माझ्या भावना नियंत्रित करण्याचा अधिकार मलाच अहे, आणि आज मी आनंदात रहायचे ठरवले आहे.
4) माझ्या आई-वडीलांना, माझ्या परीवाराला माझ्यावर, गर्व आणि अभिमान वाटेल, असे एक काम मी आज करणार आहे. 
5) मी प्रचंड आत्मविश्वासाने भरलेला असुन, प्रचंड संपत्तीवान आहे.
6) मी एका प्रसन्न व्यक्तीमत्वाचा मालक असुन, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला मी भरभरुन आनंद वाटतो. खळखळुन हसवतो.
7) परिस्थीतीला हरवण्याची माझ्यात हिंमत आहे. मी परीस्थीतीवर सहज मात करु शकतो.
8) माझ्या जिद्दीला भिऊन संकटे दुर पळुन जातात.
9) मी आयुष्याच्या प्रत्येक लढाईचा यशस्वी सामना केला आहे, आणि ती जिंकली आहे.
10) माझ्या आजुबाजूचे, अवतीभवती वावरणारे, सर्व लोक माझ्यावर खुप प्रेम करतात, आणि मी ही त्यांच्यावर खूप खूप प्रेम करतो.
11) मी आतापर्यत माझी बरीचशी स्वप्ने पुर्ण केली आहे, आणि माझी उरलेली स्वप्ने लवकरचं पुर्ण होणार आहेत.
12) मी सतत आनंदी असतो. मला रोज नवनव्या कल्पना सुचतात, आणि मी तात्काळ त्यांना अंमलात आणतो. 
13) मी निरोगीआहे, 
14) आयुष्यात प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी मी आभारी आहे.
15) मी निसर्गाची अद्वितीय कलाकृती आहे.
याला पॉझीटीव्ह अफैर्मेशन्स म्हणा, सकारात्मक स्वयंसुचना म्हणा, यामुळे दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल
तुम्ही हे जर मनापासुन, फील करुन बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत पोहोचलं, तर तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍या करुन दाखवेल. आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची दणदणीत सुरुवात असेल!..
ही आणि अशी प्रत्येक वाक्ये तुम्हाला अधिकाधिक शक्तीशाली आणि आनंदी बनवो,हि जर पाच सुत्रे जर पाळली, तर आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम्स, चुटकीसरशी ‘छुमंतर’ म्हटल्याबरोबर पळुन जातील! 
१) कितीही गंभीर समस्या असो, त्याकडे आश्चर्याने बघा – 
- आज दुकानात नोकर नाही आला, “अरे वा!, बघु आज, काय काय अडतयं त्याच्यावाचुन!”, 
- आज घरी कामवाली नाही आली, “असं का? मज्जा आहे मग आज!”
- पंचवीस तारीख आहे, पैसे संपत आलेत, “छान, मस्त काटकसर करु आता पाचसहा दिवस!”
- तो माझ्यावर निष्कारण चिडला, “अरे, तो असंपणं करतो का? असु दे! असु दे!” 
- तिने माझ्याशी उगीचचं भांडण केले, “हो का? किती मज्जा, आता रुसवा काढायची संधी मिळणार!” 
बघा, कसलीही, कितीही भयानक समस्या आणा, ह्या फॉर्मॅटमध्ये ठेवुन बघा, आश्चर्य व्यक्त केल्यास, समस्येची तीव्रता अचानक नाहीशी होते, 
“ओह! हे असं आहे का?, 
अरे! हे असं पण असतं का? 
ओके!” आहे त्याचा स्विकार केल्यास नव्याणव टक्के चिंता पळुन जातात. 
समजा, एखादा दात तीव्रपणे ठणकतोय, आता इथे कसा काय मार्ग काढणार? एक उपाय आहे. डोळे बंद करुन, त्या दुखणार्‍या दाताकडे संपुर्ण लक्ष द्या, त्या त्रासदायक संवेदना अनुभवा, त्या ठिकाणी शंभर टक्के मन एकाग्र करा. बघा वेदनांची तीव्रता कमी होईल, 
गंमत अशी आहे, की प्रत्यक्ष वेदना तितकं दुःख देत नाहीत, जितकं वेदनांमुळे मनात येणारे विचार त्रास देतात, वेदनांना विचारांपासून तोडलं की चिंता पळुन जाते! 
२) भुतकाळात घुटमळणे बंद करा – 
बसल्या बसल्या ना, आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, 
- “दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मीही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो.” 
- “सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली.” 
- “त्यावेळी मी त्यांच्याशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!” 
- “मी खुप कमी पगारावर काम करायला तयार झालो, मी असे नव्हते करायला पाहीजे.”
 “त्या कार्यक्रमाच्या दिवशी, ती मला अशी म्हणाली!”
अरे! व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा फालतुमध्ये खर्च होणार, त्यापेक्षा भुतकाळातल्या, ह्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन गेलेलं बरं!
३) इथे प्रत्येक जण अद्वितीय आहे! – 
बहुतांश दुःखांच मुळ हे तुलनेत असतं,
- त्यांचं पॅकेज बारा लाखाचं आहे, मी कधी पोहचणार त्या ठिकाणी?
- त्यांच्याकडे इनोव्हा आहे, आपल्याकडे खटारा गाडी!
- ते मेट्रो सिटीत राहतात, किती ऐश करतात, नाहीतर आपण?
- ती किती सुंदर दिसते. स्लीमट्रीम! माझं वजन थोडं जास्तच आहे.
- हिला सासुचा ‘जाच’ नाही, किती ‘सुखी’ आहे ही!
- तीचा नवरा तिचा प्रत्येक शब्द झेलतो, माहीतेय!    वगैरे  वगैरे ......
ह्या जगात प्रत्येक गोष्ट एकमेवाद्वितीय आहे, 
गुलाब दिसायला सुंदर असतो, पण म्हणुन मोगर्‍याचं महत्व कमी होत नाही, त्याचा सुगंध ही त्याची ओळख! 
त्या दोघात डावं-उजवं अशी तुलना करता होईल का?
प्रत्येक फुल अद्वितीय आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक फळाचा स्वतःचा एक गोडवा आहे, एक चव आहे, 
आंबा रसाळ, चवदार म्हणून चिक्कु, अननस खराब म्हणावेत का? 
संत्रा-मोसंबीने ईर्ष्या करावी का? 
केळीने माझे नशीबच फुटकं म्हणुन रडत बसावे का? 
सफरचंद-डाळींबाने आत्महत्या कराव्यात का?
कोणतं फळ चवदार आहे, 
कुणात औषधी गुणधर्म आहेत, 
कोणी पाणीदार आहेत, 
कोणी कोरडी. 
ज्याचं त्याचं एक वैशिष्ट्य आहे, जसं फळांचं, तसंच, माणसांचं!,
कोणी शार्प बिजनेसमन आहे, 
कोणी प्रचंड मेहनती आहे,
कोणी कलाकार आहे, 
कोणी बोलुन मनं जिंकण्यात तरबेज, कोणी प्रेमळ आहे, 
कोणी शिस्तप्रिय,
कोणी यशासाठी भुकेला आहे,
कोणी प्रेमासाठी आतुर!
आता यात डावं उजवं करुन, कशाला दुःखी व्हायचं!
तुम्हाला माहीतेय, ह्या जगात साडेसहा अब्ज लोक राहतात, आणि प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे आहेत, प्रत्येकाचा चेहरा एक दुसर्‍यापासून वेगळा आहे,
म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती एकमेव अद्वितीय आहे, तुम्हीपण!..
४) ‘आयुष्य कशासाठी’ याचं उत्तर शोधा. – 
- आयुष्य भगवंताने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, 
- आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे,
- आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, 
- आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, 
- आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे!
जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या. मोकळे आणि रिते व्हा. प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे सामोरे जा!
माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, 
अ) अपेक्षा
ब) अपुर्ण स्वप्ने,
क) ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!
बहूदा आपण 'भला ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी?' या विचारात असतो. तो कसा सुखी आहे, ती कशी मस्त जगते, त्याच आयुष्य आरामशीर आहे, माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दुःखी होत तर नाही ना? 
बघा! किती गंमतीशीर आहे हे, समजा, एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. 
स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन!
आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, (प्रत्येकाचे होतच असते) मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु.
जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो, 
आयुष्य कशासाठी? 
जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत! 
५) सेवा करण्यार्‍याला आत्मिक समाधान मिळते. - 
बघा! किती मजेशीर आहे हे,
- अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,
- दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.
- झाड तप्त सुर्याच्या उन्हाचा मारा सहन करतो, आणि वाटसरुला सावली देतो,
- ज्यात कसलंही पौष्टीक तत्व नाही असे गवत, गाय खाते, आणि सकस, चविष्ट दुध देते.
- सुर्य जिथं भरपुर पाणी आहे, त्याची वाफ करतो, ढग बनवुन, जिथं पुरेसं पाणी नाही, अशा दुष्काळी प्रदेशात पाऊस पाडतो.
आणि म्हणुनच की काय, ह्या सर्वांना आपल्या संस्कृत्तीत पुजनीय मानलं गेलयं. 
काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे ?
इतरांसाठी निस्वार्थपणे काहीतरी करण्यामध्ये एक वेगळे समाधान आहे, आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झालं, असं म्हणता येईल.
याच पाच सुत्रांचा मिळुन बनतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन! 
मनाच्या तळाशी जाऊन सुखाचा शोध घेऊ पाहणाऱ्या, सगळ्यांचे आयुष्य, सुखी, समाधानी आणि समृद्ध होवो, या प्रार्थनेसह शुभेच्छा आणि धन्यवाद!

Depends on relevant  reference books..............

*असं का होतं* ...

 *असं का होतं* 



असं का होतं की ज्या गोष्टीची भीती वाटत असते,
नेमकी तीच गोष्ट आयुष्यात दत्त म्हणुन हजर होते."
 
एखाद्या विषयाची सतत भीती बाळगणारा विद्यार्थी, त्याच विषयात का बरं नापास होतो?

पैसे नाहीत, पैसे नाहीत, अशी घोकणारा का दिवसेंदिवस अधिकाधिक कंगाल का बरं होतो?

आर्थिक नुकसान होईल, अशी सतत भीती बाळगणार्‍याला कसलातरी आर्थिक फटका बसतोचं बसतो,

कष्ट नकोत, कष्ट नकोत, असं घोकणार्‍याच्या नशिबातंच श्रम आणि राबणं असतं का बरं असत?

 का बरं एखादीला नको असलेलं गावचं ‘सासर’ म्हणुन पदरात पडतं?

का श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिकाधिक गरीब होतातं?

 तर ह्या सगळ्यासाठी एकचं कारण आहे,
आणि ते कारण आहे आकर्षणाचा सिद्धांत

लॉ ऑफ अट्रॅक्शन..

 
 तुम्हाला माहीतीय का ?...जगातील फक्त चार टक्के लोकांकडे एकुण संपत्तीच्या शहाण्णव टक्के संपत्तीचा हिस्सा आहे.
हा केवळ योगायोग नाही मित्रांनो,
हा आकर्षणाचा नियम आहे.
काय सांगतो हा नियम?

"तुमच्या आयुष्यात असलेली प्रत्येक गोष्ट,घटना ही कळत नकळत तुमच्या विचारांनीचं आकर्षित केलेली असते. जसं की तुमचं दिसणं, तुमचे कपडे, तुमचा जोडीदार, तुमची मुलं, तुमचे मित्र, तुमचं घर, तुमचा व्यवसाय, तुमची सांपत्तीक स्थिती, तुमचं गाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे नातेसंबंध, अगदी सगळं…सगळं…

          जसं की समजा एखाद्याला निळा रंग आवडतो, आणि त्याच्याकडे निळ्या रंगाचे खुप कपडे आहेत, तर तो बाहेर जाताना निळाच शर्ट घालुन जाईल ना,

 अगदी तसंच, आपल्या मनाच्या कपाटात ज्या रंगाचे विचार असतात, तीच परिस्थिती वास्तव बनुन तुमच्या जीवनात समोर येते.

  उदा. माझं कर्ज कसं फिटेल याची सतत चिंता असेल तर मनाचा फोकस केवळ आणि केवळ कर्जावर जातो तर त्यामुळे कर्ज वाढतं.

माझं वजन वाढतयं, वजन वाढतयं म्हटलं की वजन अजुनंच वाढतं,

माझे केस गळतायंत म्हटलं की अजुनंच जास्त केस गळतात,

माझं लग्न जमत नाही म्हणलं की लग्न जमायला अजूनच उशीर होतो,

कर्ज माझा जीव घेणार म्हणलं की अजून आर्थिक अडचणी निर्माण होतात,
वगैरे वगैरे...

ज्या गोष्टीवर मन अधिक लक्ष केंद्रित करतं, ती गोष्ट आपल्या Subconscious Mind म्हणजेच सुप्त मनाद्वारे अंमलात आणली जाते.

 म्हणजे जर आपण आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळालयं अशी त्याच्या रंग,चव आकार,गंध याच्यासह कल्पना करुन, मनाला उत्तेजित अवस्थेत नेलं आणि त्यावर दृढ विश्वास ठेवला, की हवं ते आपल्याला मिळतचं मिळतं.

फक्त आपल्याला ते मिळालयं, हे मनाला पटवुन देता यायला हवं म्हणजेच त्याप्रकारच्या संवेदना तयार करुन त्यात रंग भरुन कल्पना करावी यालाच Creative Visualization अशी संज्ञा आहे.

अगदी मरणाच्या दारात पोहचलेली, डॉक्टरांनी आशा सोडून दिलेली पण हे रहस्य जाणणारी, अनेक माणसं फक्त ह्या शक्तीचा वापर करुन आणि सकारात्मक कल्पना करुन आणि त्यावर दृढ विश्वास ठेऊन पुन्हा ठणठणीत बरी झाली आहेत.

विश्वातील सर्वचं थोर माणसांनी हा आकर्षणाचा सिद्धांत जाणला होता. आणि त्याची अंमलबजावणी केली, म्हणुन तर ते इतरांपेक्षा वेगळे ठरले.

      तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान हवं असल्यास, दररोज ठराविक वेळी,ठराविकचं स्थळी शांतचित्ताने प्राणायाम करुन चेहर्‍यावर समाधानाचे भाव ठेवुन मनात ही वाक्ये पुर्ण संवेदना आणि भावनेसह म्हणा!..

1) स्वस्थ आणि आरोग्यपुर्ण जीवन मी जगत आहे.
- ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.

2) मी सुंदर आहे,तेजस्वी आहे, मी चिरतरूण आहे.
 - ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.

3) मी धैर्यवान, बलवान,सुज्ञ आणि विवेकी आहे.
- ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.

4) समृद्ध, समाधानी आणि आनंदी जीवन मी जगत आहे.
 - ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.

5) माझ्या मनात प्रेम आणि परोपकार उत्पन्न होतं आहे.
- ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.

6) मला सर्वत्र अनुकूल परिस्थिती प्राप्त होतं आहे.
- ईश्वरा मी तुझा खुप आभारी आहे.
7) तुझी माझ्यावर अखंड कृपा आहे. तुझ्या प्रेमाचा माझ्यावर अखंड वर्षांव होतो आहे.
- ईश्वरा मी तुझा खुप खुप आभारी आहे.

 
याला पॉझीटीव्ह अफर्मेशन्स म्हणजेच सकारात्मक स्वयंसुचना Auto Suggestions असे म्हणतात. यामुळे तुमच्या मानसिकतेत बदल होवुन दिवसभर एक आगळीवेगळी उर्जा तुमच्यामध्ये संचार करेल

तुम्ही हे जर मनापासुन, आणि तशाच संवेदना निर्माण करुन वारंवार बोललात, आणि ते तुमच्या सुप्त मनापर्यंत म्हणजेच Subconscious Mind पर्यंत पोहोचलं, तर मित्रांनो तुमच्या नकळत ते तुमच्या सार्‍या आज्ञा पाळेल आणि खर्‍याही करुन दाखवेल.

 यात अट एकचं असेल ती म्हणजे तुम्ही घेत असलेल्या स्वयंसुचना या तुमच्या किंवा जगाच्या कल्याणासाठी असाव्या.इतरांना नुकसान पोहोचविणारी स्वयंसुचना बुमरॅग सारखी तुमचेच अपरिमित नुकसान करणारी ठरते.

 म्हणुनचं आपल्या मनात उत्पन्न होणा-या प्रत्येक विचारांविषयी सजग रहा. कधीकधी वर वर सकारात्मक वाटणारा विचार नकारात्मक अर्थ निघणारा असतो. त्यामुळे विचारांची काळजी घेणं फार महत्त्वाचे असते.

उदाहरणार्थ "मी कधीच आजारी पडणार नाही." हे वाक्य वरकरणी सकारात्मक वाटत असले तरी त्या वाक्यात आजार हा नकारात्मक शब्द आहे.त्याच्या वारंवार उच्चाराने तशीच भावना मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याऐवजी "मी आरोग्यपुर्ण जीवन जगत आहे" हे वाक्य अधिक सकारात्मक आहे.

इतक्या सूक्ष्म स्तरावर आपण आपल्या मनात निर्माण होणा-या विचारांची छाननी करणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे आपण आपल्या विचारांची छाननी केली की आपल्या मनात निर्माण होणारा प्रत्येक नकारात्मक शब्द आणि विचार हळूहळू कमी होतील आणि नव्यानेच आयुष्याचा अर्थ उमजेल.अनुभव येईल.

आपणही आपल्या आयुष्यात ही शुभसुरुवात करावी.आणि आपलं आयुष्य समृद्ध करावं ही शुभेच्छा!!

आणि हीच एका दृष्टीने “लॉ ऑफ अट्रॅक्शन” ची खरीखुरी सुरुवात असेल!..




by- internt

शुक्रवार, १० डिसेंबर, २०२१

*कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा.....?*...

 

*कास्याच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा.....?*

*आपल्याकडे आयुर्वेदावरील ग्रंथामध्ये "पादाभ्यंग" सांगितलेले आहे* त्यात कास्याच्या वाटीने पायाला गायीचे तूप किंवा खोबरेल तेल चोळणे हा प्रमुख उपचार सांगितला आहे त्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

◆ शरीरातील वाताचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆ शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी
◆डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी
◆शरिरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी
◆मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या संवेदना कमी होण्यासाठी
◆निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी
◆पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी
◆गुढघेदुखी, टाच दुःखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆पायावरची सूज कमी करण्यासाठी
◆तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे या समस्या कमी करण्यासाठी
◆व्हेरिकोज व्हेन्स वर उपयुक्त
◆डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी
◆चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी

*भावप्रकाश या ग्रँथात म्हटले आहे "कांस्यम बुद्धीवर्धकम"*
आपल्या मराठीत एक म्हण आहे *" तळपायाची आग मस्तकात जाणे"* आणि ती अक्षरशः खरी आहे तळपायाला कास्याच्या थाळीने मसाज केल्याने डोके शांत का होते याचे उत्तर या म्हणीत सापडते
वात जे अनेक रोगांचे मूळ आहे त्याचे शमन करून मर्यादित ठेवण्यासाठी हा उपचार अतिशय परिणामकारक असल्याचे अनुभवास आले आहे, युरोप व अमेरिकेमध्ये तर भरपूर पैसे मोजून लोक ही ट्रीटमेंट घेत असतात.
संस्कृतमध्ये 1 श्लोक आहे ज्यात म्हटलं आहे
जो मनुष्य झोपण्यापूर्वी पायांना मसाज करतो त्याच्यापासून रोग असे दूर राहतात जसे गरूडपासून साप
*आपल्या शरीरात 72000 नाड्या आहेत त्यातल्या बऱ्याच नाड्यांचा शेवट हात आणि पायाच्या तळाव्यात होतो त्यामुळे तळव्याचा मसाज हा अनेक दुखण्यावरचा एक गुणकारी व कमी खर्चाचा उपाय आहे*

ऐतिहासिक वारसा

कांस्य हा धातू आपल्याला फक्त सुवर्ण आणि रोप्य पदकांसोबत कांस्य पदक देतात म्हणून माहिती आहे. भारतात बहुतेक प्रांतामध्ये लग्नामध्ये मुलीला कास्याची वाटी देण्याची प्रथा दिसून येते पण तिचा उपयोग मात्र कमीच केला जातो. कासे हा तांबे आणि जस्त यांचा संमिश्र धातू असून *आयुर्वेदाने त्याचा उपयोग शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी म्हणून 5000 वर्षांपूर्वीपासून सांगितलेला आहे*.
गुजरातमध्ये जेवणासाठी कास्याच्या थाळ्याच वापरतात, पूजेसाठी कास्याचे तबक वापरले जाते, मंजुळ आवाजासाठी मंदिरातल्या घंटासाठीही कासेच वापरले जाते, तसेच काठिण्य व ऑक्सिडेशन न होण्याच्या गुणधर्मामुळे तोफा बनविण्यासाठी हा धातू वापरला जात असे, पूर्वी रशियामध्ये चर्चघंटा, तर स्पेन आणि पुर्तुगालमध्ये तोफा या धातूच्या बनवीत असत.

*वातव्यधीहरम कफप्रशनम कांतीप्रसादावहम त्वगवेवर्ण्य विनाशनम रुचिकरमम सर्वांग दाढर्याप्रदम आग्नेरदीप्तीकर्मम बलोपजननं प्रस्वेद मेदोप महं पदभ्याम मर्दनमुदिशनती मूनया: श्रेष्ठम सदा प्राणायाम*

म्हणजे ऋषि मुनी सांगतात की पायाला तेल किंवा तुपाने मसाज करणे कफनाशक आहे
सुवर्णासमान कांती प्रदान करणारे, त्वचेचा वर्ण गौर करणारे, अग्नी प्रदीप्त करणारे, बलकारक, मेद-स्वेद कमी करणारे,आणि रुचिकारक आहे.

*आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!* 

*आपण प्रथम स्वतःची व आपल्या कुटुंबातील परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्या, आपल्यामुळे कोणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घ्या. तसे त्याप्रमाणे वागा, एकमेकांना धीर द्या, त्यांना आधार द्या, त्यांना साथ द्या. सरकारी कायद्यानचे, नियमांचे व सुचनांचे सर्वानी प्रामाणीकपणे व काटेकोर पालन करा, सरकारला सहकार्य करा. स्वार्थी व खोट्या राजकारणी लोकांच्या भुलथापाना बळी पडु नका, खोट्या अफवापासून दूर व सावध राहा, प्रत्येकाने प्रथम स्वतःच व परिवाराच्या जीवांचे रक्षण करा, जीव वाचवा...!!!*

*जागृत राहा, सतर्क रहा, सुरक्षित रहा*. 

🌹🙏🌹 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹






by - internet

गुरुवार, ९ डिसेंबर, २०२१

*नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर शहादा तालुख्यातील घटना*

 


*नदी नांगरून जलस्तर आला 500 फुटावरून 90 फुटावर शहादा तालुख्यातील घटना*

अवश्य वाचा व आपल्या गावातही अंमलात आणा.

शेत नांगरावे लागते ही गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे , पण नदी नांगरणे हे ऐकायला कसेसेच वाटते ना ? सतरा वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ,पण तिचे समकालीन मूल्य मात्र आजही तितकेच आहे.

*शहादा तालुक्यातील गोमाई या नदीच्या काठावरचे डांबरखेडा हे गाव गोमाई मध्यप्रदेशातून वाहत सातपुड्याच्या डोंगररांगातून महाराष्ट्रातल्या प्रकाशा या गावी तापीला येऊन मिळते. संगमावर असल्याने प्रकाशा दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे.

२००० ची गोष्ट आहे. डांबरखेडा परिसरात अचानक असे लक्षात आले की , परिसरातील बऱ्याच विहिरी , बोअरवेलना पाणी येत नव्हते. चारसहा महिने जिवंत असणाऱ्या गोमाई नदीच्या काठावर असून देखील डांबरखेड्याच्या विहीरी, बोअर मृत. पाचशे ते सातशेफुटापर्यंत जलस्तर खोल गेला . लोक बोअरची खोली तेवढी वाढवत होते. पण पाणी वरती येत नव्हते. असे का ? शेतकरी हैराण. कुणाकडे नीट उत्तर नव्हते.

मोतीलाल पाटील ( पटेल ) तात्या. नांदरखेडा त्यांचे गाव. शहाद्याला त्यांना डांबरखेड्यावरून जावे लागते . त्यामुळे डांबरखेड्याची पाणी समस्या मोतीलाल तात्यांच्याही चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाली होती. तात्या पुणे विद्यापीठाचे १९७० चे एम एस्सी ऍग्री . डांबरखेड्याची ही समस्या सार्वजनिक होती. गावात नदी असून विहरी, बोअर कोरड्या होत्या. सर्वचजण विचारात पडले होते , पण उत्तर सर्वांकडे नव्हते.

तात्यांनी एकेदिवशी डांबरखेड गावाच्या सरपंचांना मनातल्या चार गोष्टी सांगितल्या . खूप दिवसानंतरच्या आपल्या चिंतनाचा परिपाक लोकांपुढे ठेवला. समस्येचा मुळापर्यंत जाऊनच उत्तर सापडतात. आणि ती चिरस्थायी असतात. 

जलस्तर खोल गेला या समस्येवर तात्यांनी सांगितलेला उपाय अगदीच वेगळा होता. काहीसा वेडेपणाचा , पण त्यामागे अभ्यास , संशोधन आणि चिंतन होते. लोकांनी तात्यांचे ऐकले आणि पाचशे ते सातशे फुटावर गेलेला जलस्तर चक्क नव्वद फुटावर आला.

डांबरखेडच्या लोकांसाठी तात्यांनी स्वतः डिझल पुरवले, ट्रॅक्टर, लाकडी नांगर, लोखंडी नांगर अशा साधनांनी गोमाई नदी उन्हाळ्यात नांगरायला सुरुवात केली. लोखंडी फाळ वाकले. चार किमी. नदी आडवी नांगरायचा हा अजब प्रयोग काहीसा चेष्ठेचा विषय झाला.

गावकऱ्यांनी फक्त फक्त एक किलोमीटर इतकीच नदी नांगरली. जून कोरडा गेला , जुलैत पहिला पाऊसपूर आला . मात्र गोमाईचा हा पूर तापीला भेटायला गेला नाही. नांगरलेल्या नदीने रात्रीच सर्व पूरपाणी पिऊन टाकले. अवघ्या चोवीस तासात पाचशे फुटावरचे पाणी नव्वद फुटावर आले.लोक आनंदले.

सकाळी परिसरातील मोटारींनी फोर्सने पाणी फेकले.

तत्कालीन जिल्हाधिकारी असीमकुमार गुप्ता यांनी नदी नांगरण्याच्या या अभिनव प्रयोगाचे शिल्पकार म्हणून मोतीलाल तात्यांना *वॉटर मॅन ऑफ शहादा* असे संबोधून तात्यांचे तोंडभरून कौतुक केले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव अजित निंबाळकर यांनी मोतीलाल तात्यांच्या या जगावेगळ्या प्रयोगाची पाहणी करून कौतुक केले.
नदी नांगरण्याची ही अभिनव कल्पना कशी सुचली ? 

या विषयी सांगताना तात्या बोलले , " दरवर्षी येणाऱ्या गढूळ पूरपाण्यातले 'फाईन पार्टीकल' वाळूत साचून साचून दोन-तीन फुटावर हे पार्टीकल सेटल होतात , थरावर थर साचून त्याचे खडकीकरण होत जाते. अर्थातच पाणी खाली न झिरपता वाहून जाते. माझ्या अनेक वर्षांच्या अभ्यास आणि चिंतनातून मला समस्येचे हे कारण लक्षात आले. "

खेतीया या मध्यप्रदेशातील शहारापर्यंतच्या अनेक गावातील लोकांनी नंतर सातत्याने गोमाई नदी नांगरली आहे , आणि वाहून जाणारे पाणी आपल्याच गावात जिरवले आहे. हे तात्यांच्या कल्पक प्रयोगाचे फलित आहे. निराश न होता , आत्महत्येचा पर्याय न अवलंबता शेतकऱ्यांनी आपल्या समृद्धीचा जलस्तर जिवंत करण्यासाठी काय करता येईल याचा शोध घेतल्यास उत्तर नक्की सापडेल. मोतीलाल तात्या पटेल या वेड्या माणसासारखा परिपक्व विचार शेतकऱ्याने करावा बस.

माझी सर्वाना विनंती आहे की हा प्रयोग प्रत्येक गावाने केला तर आपले गाव पण पाण्याच्या समस्येतून मुक्त होईल.

आपल्या मित्रांना बाकीचे मेसेज पाठविण्यापेक्षा हा मेसेज फॅारवर्ड करून पाणी चळवळ जागृत करा.






















by- internet

माझ्याबद्दल