रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

Top 10 Forts of maharashtra - स्वराज्यातील दहा महत्वाचे किल्ले.


Top 10 Forts of maharashtra - स्वराज्यातील दहा महत्वाचे किल्ले.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील दहा महत्वाचे किल्ले


(प्रचंडगड ) तोरणा






पुण्यापासून ७० कि. मी. आणि भोरपासून ३५ कि. मी. उत्तरेला प्रचंडगड किल्ला आहे. पूर्वी याचे तोरणा नाव होते. शिवाजी महाराजांनी अनेक जुन्या किल्ल्यांची नवीन नावे ठेवली. १६५६ मध्ये त्यांनी तोरणा किल्ल्याचे नाव प्रचंडपणामुळे प्रचंडगड ठेवले. काही इतिहासकार प्रचंडगडाच्या इतिहासापासून हिंदवी स्वराज्याचा श्रीगणेशा समजतात. किल्ल्यात विजापूरच्या आदिलशाही सैनिकांची तुकडी राहात असे. पावसाळ्यात जोरदार पावसामुळे हि तुकडी काढून घेतली जात असे. याच वेळी शिवाजी महाराजांनी किल्ला काबीज केला. त्यांनी याची नवीन किल्लेबंदी केली. याच्या खोदकामात त्यांना प्रचंड संपत्ती मिळाली. त्याचा वापर त्यांनी राजगडच्या बांधकामात केला.
राजगडाच्या पश्चिमेला सरळ रेषेत १६ कि. मी. वर नैऋत्य ईशान्य असा तोरणा पसरलेला आहे. हे अरुंदडोंगर,पठार मुरुंब देवाच्या समकालीन असावे. मुरुंबदेव हे ब्रम्हादेवाचं अपभ्रंश. पूर्वेची झुंजारमल माची हा यागडाचा सर्वात अरुंद आणि अवघड भाग. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची उभारणी करताना प्रथमतः तोरणाताब्यात घेतला. तोरण्याच नाव बदलून त्याच्या आकाराला साजेस असं प्रचंडगड नाव ठेवण्यात आले. तोरणागडावर सोन्याच्या मोहोरांनी भरलेले बावीस हंडे सापडले. ते धन स्वराज्यस्थापनेसाठी शुभशकुन होत हेनककी. ते धन वापरून त्याच जागी अष्टभुजा महिषासुरमर्दिनी श्री तोरणजाईचं मंदिर बांधण्यात आलं आणिसमोरच्या मुरुंबदेवाच्या डोंगरावर राजगडाची बांधणीही करण्यात आली.


सिहंगड (कोंढाणा )






शिवरायांनी जयसिंगास दिलेले तेवीस किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एकदिवस जिजामाता शिवरायांना म्हणाल्या,शिवबा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरेनाही. तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायहि तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा हि बाब जिजामाता आणि शिवराय यांच्या मनात सलत होती. शिवरायांनीकोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करूलागले,या कामगिरीसाठी निवडावे कुणाला कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती.


तानाजी मालुसरे आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उमरठे गाव आहे, तिथला तोराहणारा. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई,दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरीसांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हारी तयार मोठा हिमतीचा गडी तो अंगाने धिप्पाड होता. बुद्धीनेचलाख होता. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती.


तानाजीचा पराक्रम इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांसह कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाटपाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. उदेभानला खबर लागली. नगारा वाजला. उदेभानचे सैन्य मावळ्यांवरचाल करून आले. हातघाईची लढाई सुरु झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढालीखनानू लागल्या. मशालींचा नाच सुरु झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिहासारखा लढतहोता. उदेभानाने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरु झाली. दोघेही शूर वीर कोणीही हटेना. इतक्याततानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला. शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेहीएकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले. आणि धारातीर्थी कोसळले.


तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळेकल्याण दरवाजातून आत येऊन पोहोचले. आपला भाउ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले,पण ती वेळ दुःखकरण्याची न्हवती,लढायची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवागेला. आणि म्हणाला,आरे तुमचा बाप इथे मारून पडला आहे. तुम्ही असे भागुबाईसारखे का पळता मागेफिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा नाहीतर शत्रूवर तुटून पडा.मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला,पण गड सर करताना तानाजीसारखा शूरमोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना हि बातमी कळली. त्यांना. खूप दुःख झाले. गड ताब्यातआला,पण सिहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि आणि म्हणाले गड आला पण सिहगेला. कोंढाण्याचे सिहंगड हे नाव सार्थ झाले. 


रायगड (Raigad Fort)






महाडच्या साधारण उत्तरेला चांभारगड, सोनगड, लिंगाणा अशा गडाच्या कोंदण्यात बाजूच्या डोंगरापासूनदुरावलेला सर्वदूर समान उंचीच्या काड्यांनी रेखलेला रायगड आहे. शिवकालापूर्वी रासीवटा किंवा तनस डोंगरम्हणून ओळखला जाई. महाराजांची तटबंदी व इमारती बांधून राजधानीचे ठिकाण म्हणून राजगडावरून याठिकाणी रायगडावर हलवले.पूर्वपश्चिम पसरलेल्या गडाच्या दक्षिण आणि उत्तरेच्या खाड्यांमद्ये वाघदरवाजा आणि महादरवाजा आहे. सर्वोच ठिकाणी बालेकिल्ल्यार महाराजांचा राहता वाडा,सदर इत्यादी वास्तूआहेत. पूर्वेला दूरवर जगदीश्वर मंदिर आहे.
गडावरील सर्वसाधारण दर्शनीवास्तू म्हणजे मनोरे,सदर,वाडा,बाजारपेठ,जगदीश्वर,शिवसमाधी, महादरवाजा हि आहेत. सध्या गडाच्यापश्चिम कड्यातून रोपवे झाल्यामुळे गडावर कमी श्रमात आणि लवकर पोहोचता येते. पायवाटेने सुद्धा गडावरजाता येते. मोठ्या पायवाटेन दरवाजा गाठायचा तिथे जोत्यांचे अवशेष व तोफा आहेत. आणि उजव्या हातालासरळ गेला कि आपण खडकात खोदलेल्या गुहेपाशी पोहोचतो. हि गुहा सातवाहन काळात खोदली गेली असमानल जात. गुहेपासून पुढे जाऊन वळसा घातल्यावर समोरच्या झाडीतून वर चढत गेलेल्या पायऱ्यांनी सरळगेल्यावर गडाचे महाद्वार आहे. १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला.


प्रतापगड (Pratapgad Fort)




महाबळेशवरच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या ऐन धारेवर भोरण्याचा डोंगर नावाची एक टेकडी होती. या ठिकाणाचमहत्व ओळखून शिवाजी महाराजांनी यावर तट बांधले. वाडा कुंभरेशी इथून गडाचा चढ सुरु होतो. सद्यादरवाजाच्या खाली अंदाजे पन्नास फुटापर्यंत डांबरी रास्ता झाला आहे. पन्नास फुटतील पायऱ्या चढूनपूर्वाभिमुख महादरवाजातून गडात प्रवेश होतो. इथूनच पूर्वेकडे दोन बाजू बांधून काढलेली धार आहे. धारेच्याटोकाला बुरुज आहे. गडाचे सर्व साधारण किल्ल्यांप्रमाणेच माची आणि बालेकिल्ला असे दोन भाग आहेत.
गडावर महाराजांनी बांधलेलं भवानीमातेचं मंदिर आहे. हि अष्टभुजा भवानीमाता सिहारुढ महिषासुर मर्दिनीआहे. मंदिरात महाराजांच्या पूजेतील शिवलिंग आहे. गडाला एक प्रमुख दरवाजा आनि दोन चोरवाटा आहेत. त्यापैकी पाल दरवाजा ऐन कड्यावर असल्याने बुजवला आहे.










राजगड




साह्याद्रीच्या दक्षिण उत्तर पर्वतराजाला कोदापूरपासून छेदणाऱ्या पूर्व पश्चिम फाट्यावर पश्चिमेकडून पूर्वेकडेतोरणा व राजगड असे दोन गिरीदुर्ग आहेत. राजगडाची पंधराव्या शतकापासून वेगळी नावे आढळतात.मुरुंबदेवाचा डोंगर आणि शहामृग (शाहमुर्ग) हे हि नाव आढळते. पंख पसरलेल्या गरुडासारखा गडाचा आकारआहे. बालेकिल्ल्याचा मध्य धरून उत्तरेला गडाची पदमावती माची आहे.तर पश्चिमेला संजीवनी माची आहे. संरक्षणाच्या दृष्टीने याचे बांदकाम अतुलनीय आहे. गडावरील सध्याच्या प्रचलित वाटा पद्मावती माची आणिसुवेळा माचीवर येतात. बालेकिल्ला पद्मावती माचीपासून अंदाजे ६५० फूट उंचावर आहे. राजगडाच मूळ नाव 
मुरुंबदेव १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी या गडाची अव्दितीय रचना पाहिली आणि तोरणा किल्ल्यावरसापडलेल्या धनाचा उपयोग करून गड आपल्या मनासासारखा बांधून घेतला.


१६५० ते १६६९ पर्यंत शिवाजी महाराजांच वास्तव्य या गडावर होते. १६फेब्रुवारी १७०४ रोजी औरंगजेबाने हाकिल्ला जिंकला. नंतर मराठ्यांनी पुन्हा तो हस्तगत केला. संजीवनीच्या टोकाला एक डोंगरसोंड खालीउतरलेली दिसते. या सोंडेवरून घसरकूंडी करत,तोल सांभाळत खालच्या खिंडीत उतरायच. खिंडीतून पालीभुतोंडे रस्ता आडवा पार होतो. अळू दरवाजातून इथवर यायला एक तास लागतो. खिंडीतील रास्ता ओलांडलाकि समोर वर चढणारी वाट लागते. त्या वाटेवर चढू लागल कि आपण डोंगररांगेवर येतो. हि डोंगररांग थेटतोरण्याला जोडलेली आहे. त्यामुळे डोंगररांगेवरून तोरण्याकडे चालत जाता येते. 








लोहगड




मळवली रेल्वे स्टेशनच्या दक्षिणेला विसापूर आणि लोहगड या जोड किल्ल्यांच्या मधील खिंडीतूनमळ्वलीपासून ६११ कि,मी, अंतरावर हा किल्ला आहे. तळातील लोहगडवाडी गावातून वैशिष्ट्यपूर्ण रचनेचे ६दरवाजे पार करूंन माथ्यावर दर्शनीच झेबुन्निसा आणि झिनतुन्निसा या औरंगजेबाच्या दोन मुलींच्या कबरीआहेत. त्यानंतर एक शिवमंदिर,विस्तीर्ण तलाव,लोमश ऋषींची गुहा आणि येक लेन इतक्याच ऐतिहासिकवास्तू गडावर आहेत. गडाचा आकार त्रिकोणी असून एक कोण पश्चिमेला आहे. इथेच थोड खाली विंचवाच्यानांगीप्रमाणे बाकदार उत्तरेकडे वळलेली माची आहे.


विंचूकाटा टोक अस त्या माचीला आकारावरून पडलेल नाव आहे. गडाच्या तळात उत्तरेला भाजे लेणी आहेत.लेणी पाहून भाजे गावात उतरून लोहगडाकडे जाता येत. गावातून बाहेर पडल्यावर विंचुकाटा दिसतो. डावीकडेविसापूर दिसतो. आणि या दोन किल्ल्यांच्या मध्ये गायखिंड दिसते. प्रशस्त पायवाटेनं अर्ध्या तासात खिंडीतपोहोचता येत. तिथून डावी वाट विसापूर व बेडसा लेण्याच्या बाजूला जाते. गडाच्या पायथ्याशी लोहगडवाडीआहे. लोहगडाची रचना सातवाहन काळातील किंवा त्याही आधीची असावी १६५७ मध्ये शिवाजीराजांनीलोहगड जिंकला पण १६६५ मध्ये मोगलांशी केलेल्या तहात त्यांना तो द्यावा लागला. नंतर संधी साधून १६७०मध्ये हा गड पुन्हा मराठी राज्यात सामील केला.










सिंधुदुर्ग






महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधून मजबूत केली पाहिजे या उद्देशाने शिवाजीमहाराजांनी हा सिंधुदुर्ग बांधण्याचे निश्चित केले. १६६४ साली बंदरावरील एका खडकापाशीगणपती,सूर्य,चंद्र,शिवलिंग,समुद्रदेवता आदी देवतांचे पूजन करून कामाला प्रारंभ केला. जवळ जवळ तीन वर्षेअहोरात्र काम चालू होते. तटाचा पाया भरताना शिस्याचा रस पायात ओतला. आणि त्यात पायाचे दगडबसवले किल्ल्याचे क्षेत्र सुमारे ४८ एकर असून भोवतीची तटबंदी दोन मैल भरेल इतका मजबूत तट बांधला. तट सर्पाकृती असून तीस फूट उंच आहे. रुंदी दोन बैलगाड्या जाऊ शकतील इतकी आहे. तटाला एकूण ५२बुरुज आहेत.
किल्ल्याच्या वळणावळणाच्या प्रदेशद्वाराशी हनुमंताची प्रतिमा आहे. किल्ल्यात राजाराम महाराजांनीबांधलेले श्री. शिवराजेश्व्रराचे मंदिर आहे. त्याशिवाय भावानी,जरीमरी,महादेव,महापुरुष अशी देवळे असूनमहाराजांचा वाडा आहे. शेजारी साखरबाव,दूधबाव,दहीबाव इत्यादी विहीर ध्वजस्तभ,कामगारांचे वाडे इत्यादीबांधकाम केले. या सर्वांसाठी त्याकाळी एक कोटी होन इतका खर्च झाला. शिवाजी महाराजांनी सुरतेहूनआणलेली लूट या कामी उपयोगी पडली. 










शिवनेरी




शिवाजीमहाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये त्याच्या उत्तरेला पसरलेल्या सह्याद्रीच्या जागेतील ज्या दुर्गमकिल्ल्यावर झाला त्याचे नाव शिवनेरी हा किल्ला दुर्गांनी वेढलेला आहे. पूर्वेस नारायणगड,उत्तरेसहरिश्चंद्रगड,पश्चिमेस चावंड,हडसर,जीवधन आणि दक्षिणेस राजमाची ढाक याप्रमाणे चारी बाजूनी पटावरसोंगट्या मांडाव्यात तसे हे दुर्ग आहेत. शिवनेरीची निर्मिती सातवाहनांनी केली. गडाचे एकूण सात दरवाजेनिरनिराळ्या काळी बांधले,पाच दरवाजे चढून गेले की उजव्या हाताला कड्यात कोरलेल्या श्री. शिवाईच्यादेवळात आपण पोहोचतो. हे भारतीयांसाठी अतिशय पवित्र स्थान मानले जाते. आणखी दोन दरवाजे ओलांडूनगेले कि किल्ल्यात प्रवेश होतो. 


डाव्या हाताला आंबरखाना नावाचे धान्याचे कोठार आणि उत्तरेकडे उत्तम पाणी असलेली गंगाजमुना नामकजोडटाकी आहे. पुढे गेल्यानंतर श्री.शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेली दगडी इमारत आहे. छत्रपतीच्याप्रेरणेने ह्या इमारतीचा जीर्णोद्धार झाला आहे. तिच्या अलीकडे महाराष्ट्र शासनाने उभारलेली शिवकुंज नामकइमारत असून जिजाऊबाई आणि शिवाजीमहाराजांचे पंचरसी धातूंचे पुतळे आहेत. शिवछत्रपतींच्या जन्मामुळेहा किल्ला महाराष्ट्राचे पुण्यतीर्थ झाला आहे. 












मुरुड जंजिरा




मुरुड हे तालुक्याचे ठिकाण असून गावाच्या उत्तरेला एक खाडी आहे. किल्ल्यावर जाण्यापूर्वी ती ओलांडावीलागते. पुढे एक लहानशी टेकडी असून ती उतरून पलीकडे गेले कि सावित्री नदीची प्रचंड खाडी आणि तिच्यातएखाद्या प्रचंड कासवासारखा जंजिरा किल्ला दिसतो. किल्ला खाडीत असल्यामुळे किल्ल्यावर बोटीत बसूनजावे लागते. किल्ल्याच्या माहाद्वारातून आत शिरले कि तीन पेठा दिसतात. महार, कोळी,चांभार इ.बलुतेदारांची आणि मुसलमानांच्या दोन, किल्ल्याच्या मध्यभागी दारुगोळ्याचे कोठार आहे. त्याच्यापश्चिमेकडे खजिन्याचे कोठार,दक्षिण दिशेला आणि वायव्येला पाण्याची दोन तळी आहेत.


बालेकिल्ल्यामध्ये किल्लेदाराचा चौखणी वाडा अंदाजे दीड दोनशे फूट उंचीवर आहे. याच्या दक्षिणेलाकोळीवाडा आणि हिंदू शिल्पांचे अवशेष आहेत. सगळ्या किल्ल्याभोवती अतिशय मजबूत पक्कया बांधणीचातट आहे. १०० फूट अंतर सोडून या तटास १९ बुरुज बांधले आहेत. प्रत्येक बुरुज कमानदार असून बुरुजाच्यामधून बाहेरच्या दिशेस तोंड करून प्रचंड तोफा मांडल्या आहेत. हा जंजिरा खाडीच्या मध्यभागी असल्यामुळेखारा वारा सतत वाहत असतो. महाराष्ट्रामध्ये मराठयांचे स्वराज्य झाल्यावर शिवाजी महाराजांनी तीन वेळाहा किल्ला जिंकण्याचे कसोशीने प्रयत्न केले.






सज्जनगड






सातारा जिल्ह्यात उरमोडी नदीच्या तीरावर असलेले परळी गाव सज्जनगडाच्या पायथ्याशी आहे. सातारागावापासून अवघे ६ मैल अंतरावर आहे. गावाच्या पलीकडे किल्ल्यावर जाण्याची वाट आहे. समर्थ भक्तांनीवरपर्यंत पायऱ्या बांधल्या आहेत. चढाच्या मध्यभागी डाव्या हातच्या देवळीत काल्याणस्वामींची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडील कोपऱ्यात किल्ल्याचे दोन मुख्य दरवाजे आहेत. पायऱ्या ओलांडून आत गेले किगडाचा आटोपशीर माथा दिसतो. मुख्य इमारत श्रीराम मंदिर ओलांडून आणि त्यांच्या शेजारी असलेली श्रीसमर्थांची समाधी,राममंदिराच्या उत्तरेकडे पाण्याचे एक तळे आहे.


सज्जनगड अर्थात परळीचा किल्ला हा भोज शिलाहारानेच बांधला आसावा. स. १६६३ मध्ये हा शिवाजीराजांनी जिंकून घेतला. त्यानंतर आपले गुरु श्री रामदास स्वामी यांस मोठ्या आदराने आणून त्यांची स्थापनाराजांनी या किल्ल्यावर केली. समर्थांच्या काळात महाराष्ट्रातील कित्येक संत महंतांचा राबता या किल्ल्यावरहोता. १६८० साली शिवाजीमहाराजांचे निधन झाल्यावर श्री समर्थ उदास झाले आणि इथेच किल्ल्यावर त्यांनी१६८१ मध्ये समाधी घेतली. अस्वलगड,परडीचा किल्ला,नवरस तारा या इतर काही नावांनी सुद्धा सज्जनगडओळखला जात असे.



















BY - Internet

बहुरूपी हेर बहिर्जी नाईक...


बहुरूपी हेर बहिर्जी नाईक

बहिर्जी नाईक



महाराजांचा असाच एक विस्वासू बहुरुपिया चोख बातमीदार म्हणजे बहिर्जी नाईक बहिर्जी नाईक हा शिवाजी

महाराजांचा अत्यंत विस्वासू नजरबाज होता. आणि बहुरूपी हि होता. महाराजांनी त्याला हेरखात्याचा प्रमुखपदीनेमले होते. बहिर्जी शत्रूंमध्ये शिरून महत्वाची बातमी घेऊन येत असे. बहिर्जी हा महाराजांचा अत्यंत विश्वासू

नजरबाज होता. तरबेज बहुरूपी होता. महाराजांनी ह्याला हेरखात्याच्या प्रमुखपदी नेमले होते. बहिर्जी शत्रूगोटात जाऊन महत्वाची बातमी घेऊन येत असे. सुरत हि औरंगजेबाची सोन्याची लंका होती. या लंकेची खडानखडा माहिती बहिर्जीने महाराजांस कळवली. त्याने दिलेल्या अचूक माहितीच्या आधारानेच महाराजांनी सुरतेवर

आक्रमण केले. आणि स्वराज्यास अमाप संपत्ती मिळाली.सुरत हि औरंगजेबाची सोन्याची लंका होती. या लंकेची सर्व अचूक माहिती बहिर्जीने महाराजाना कळवली. सुरत शहरावर हल्ला करायचा,तिथली बाजारपेठ

लुटायची. शत्रूच्या कैदेतुन आपल्या श्रमलक्ष्मीला आणायचे त्यासाठी तेथील शहराची आणि सुरक्षिततेची

माहिती काढणे महत्वाचे होते. शत्रूच्या गोटात जाऊन त्याच्याच विरुद्ध माहिती गोळा करायची हे काम काही

सोपे नव्हते. आणि म्हणूनच या जोखमीच्या कामगिरीवर महाराजांनी बहिर्जी नाईक याला पाठवले.










बहिर्जी नाईक यांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारानेच महाराजांनी सुरतेवर आक्रमण केले होते. स्वराज्यास अमाप संपत्ती मिळाली. बहिर्जी नाईक तेज दिमाखाचा, नाटकी, आणि शिवाजी महाराजांचा सच्चा इमानी सेवक,बहिर्जींचे घराणे जाधवांचे, त्याच्या अशाच खास गुणांमुळेच महाराजांनी त्याची निवड केली होती. पंतांचा सल्लामानून महाराजांनी लगेच बहिर्जी नायकाकडे एक सांगावा पाठवला. तो निरोप मिळताच मोठया आनंदाने

घोड्यावर टांग मारली. वाऱ्याच्या वेगाने येऊन तो शिवरायांपुढे उभा राहिला. महाराजांना मानाचा मुजरा करीत म्हणाला,राजे आज या सेवकाची खास याद काढली. काही विशेष कामगिरी,''होय बहिर्जी कामगिरी खरंच विशेष आहे,आम्हाला त्या कामी तुमची गरज आहे. आमचा मनसुबा आहे कि,राज्याचा रिता होणारा खजिना भरण्यासाठी सुरतेची लूट करायची. महाराज तुम्ही निश्चित राहा हि हेरगिरीची कामगिरी फत्ते झालीच म्हणून

समजा. फक्त थोडी मोहोलत असावी. बहिर्जी म्हणाला. कामगिरी कळली. महत्व समजले. पंत आणि

महाराजांना वंदन करून,त्यांचे आशीर्वाद घेऊन बहिर्जी नाईकाने आपल्या दोन साथीदारांसह सुरतेकडे तातडीने प्रयाण केले. राजगडापासून ते तापी तीरावरील त्या सोन्याच्या लंकेचा सुरतचे अंतर दीडशे कोसाचे.

शहराभोवती भली मोठी वेस. त्या गावात प्रवेश करायचा तर बऱ्हाणपूरच्या भव्य पोलादी दरवाजातून करावा

लागे. प्रवेशद्वारावर पहारेकऱ्यांचा सक्त खडा पहारा. गावाजवळ इंग्रज आणि आणि त्यांच्या वखारी सुरतेची

बाजारपेठ म्हणजे सोने, चांदी, जड जवाहीर, उंची रेशमी कपडे, दागदागिने, ऐषोआरामाच्या आणि चैनीच्या

वस्तू. शहराच्या मध्यवर्ती भागात एक भुईकोट किल्ला. किल्ल्याच्या रक्षणाची पूर्ण जबाबदारी किल्लेदार इनायतखान याची. किल्ल्याबरोबर त्या श्रीमंतांच्या निवासस्थानाची,भव्य दिव्य बाजारपेठेची,सगळ्या वैभवाची रक्षणाची जबाबदारी इनायत खान याची. त्याच्या इशाऱ्यावर शत्रुवरती तुटून तुटून पडण्यास सज्ज पाच हजार सैन्य. अशा या सुरतेत बहिर्जी नाईक आणि त्याचे दोन साथीदार ह्यांनी मोठ्या चतुराईने शहरी वेषांतर करून प्रवेश मिळवला. आपल्या शोधक नजरेनं बहिर्जी आपल्या साथीदाराच्या मदतीने टेहाळणी करत असताना चौकीवरील पहारेकऱ्याच्या ते नजरेस आले.त्याने तिघांनाही हटकले त्यांची चौकशी केली. मात्र बहिर्जीने गोड मिठास भाषा वापरली आम्ही शाहीर मंडळी कामधंद्याच्या इराद्याने नगरीत आश्रयाला आलो


आहोत. अशी खात्री पटून दिली. पहारेकऱ्यांनी त्या तिघांना किल्लेदारासमोर पेश केले. सुरतसारख्या शहरात मराठी माणसांना पाहून इनायातखानला आश्चर्य वाटले. पण बहिर्जींचे भाषाचातुर्य आणि इनायातखानाच्या

नगराची तोंडभरून केलेली स्तुती ऐकून इनायतखान खुश झाला.


बेहद खुश झालेल्या इनायतखानाने बहिर्जी नाईक आणि त्याचे साथीदार यांची खास मेहमान म्हणून विशेष व्यवस्था केली. इनायतखानाचा पाहुणचार घेतअसताना बहिर्जीला एक संधीच मिळाली. त्याने किल्ल्याची सुरक्षा,चोरवाटा,आतला दारुगोळा,फौज याची बातमी गोळा केली. आणि एक दिवस बाजारपेठ फिरून येतो अस म्हणूनबहिर्जी आला तो राजगडावरच. महाराजांची भेट घेऊन बहिर्जीने महाराजांना खूप माहिती पुरवली. राजांनी बहिर्जीच्या चातुर्याच कौतुक केलं. माय भवानीचा आशीर्वाद घेऊन महाराज, नेताजी पालकर,बहिर्जी नाईक आणि भली मोठी फौज घेऊन सुरतेच्या मोहिमेवर निघाले. बहिर्जींनी बरोबर मार्ग दाखवला आणि शिवरायांची फौज सुरतजवळच्या उधना या गावी येऊन धडकली. नेमकी हि बातमी इनायत खानाच्या हेरांना लागली. त्यांनी खानालासावध करण्याचा प्रयत्न केला. पण खानाने त्या वार्तेची गंभीर दखल घेतली नाही. शिवाजी सुरतेवर हल्ला करायला आला आहे,या वार्तेनेसुरतमधली मालदार मंडळी हवालदिल झाली. काहींनी तर गावच सोडले डच, इंग्रज ह्यांनी आपापल्या वखारी वाचवण्यासाठी संरक्षणफळी उभी केली. सारं सुरत शिवाजी येतोय ता वार्तेने भयभीत झाले.

जिवा महाले (Jiva Mahale History in Marathi)


जिवा महाले (Jiva Mahale History in Marathi)
जिवा महाले हा महाराजांचा अत्यंत विश्वासूमहाराजांचा अंगरक्षकजिवा महाले तालवार बाजीमध्ये अत्यंत पटाईत होतामहाराजांनी अफजलखानाच्या पोटात बिचवा सारलाखान दगा दगा म्हणून ओरडू लागलाते ऐकून खानाचा रक्षक सय्यद बंडा धावून आलातो महाराजांवर वार करणार तोच जिवा महालाने मोठ्या 
चपळाईने सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवलाबंडाला त्याने ठार केलेआणि महाराज बचावलेहोता जिवा 
म्हणून वाचला शिवाअसे मोठ्या कौतुकाने महाराज त्याला म्हणालेमराठेशाहीची भिस्त जिवासारख्या 
विश्वासूनिधड्या छातीच्या वीरांवरच अवलंबून होतीशिवरायांनी मराठ्यांच्या मदतीने दक्षिणेत स्वतःचे 
राज्य उभे केलेरयतेने त्यांना राजा मानलेआपल्या राजाच्या शब्दासाठी प्राण पणाला लावून लढणारी माणसेही शिवरायांकडे होतीराजांनी आता अनेक गडकिल्लेही काबीज केले होतेकिल्लेमुलुख सर्वत्र भगवा झेंडा फडकतो आहेया बातम्यांनी विजापूरच्या दरबारातील प्रत्येकाचीच झोप उडाली होतीतमाम आदिलशाहीलाच 




आता या शिवरायाला कुठे अन कसे थांबवायचे हा गहण प्रश्न पडला होतादक्षिणेस जायचं आणि शिवाजीचा 
बंदोबस्त करायचाबोला हे काम कोण करेलहा पैजेचा विडा कोण उचलणार,दरबारातले सारे वातावरण गंभीर आणि चिंताग्रस्त झालेले असताना विजापूरच्या दरबारातील एक भव्य भव्यदिव्यतुफानी ताकदीचंपोलादी  मनगटाच व्यक्तिमत्व उठून उभ राहीलतो होता अफजलखानअफजलखानाने हे धाडस दाखवले.
त्याला आणखी एक कारण होतेत्याच्याकडे प्रचंड ताकद होतीअफाट सैन्य होतंदारुगोळा आणि शस्त्रास्त्रे होतीबारा वर्षे तो वाईचा सुभेदार होतात्यामुळेच त्याला सारा मराठी मुलुखमराठी माणसंत्यांचं सामर्थ्य 
आणि काही मंडळींच्या कमजोऱ्या माहित होत्याप्रचंड मोठया फौजेनिशी पैजेचा विडा उचलून अफजलखान 
जेव्हा महाराष्ट्राच्या मोहिमेवर आलात्यावेळी शिवराय राजगडावर होतेखान येतोय हि वार्ता मिळताच 
राजांनी मासाहेबांच्या परवानगीने राजगड सोडला आणि प्रतापगडावर प्रस्थान केले.

Jiva Mahale History in Marathi जिवा महाले यांची स्वराज्य सेवा 

अफजलखानाच्या भेटीला जाताना राजांनी माता जिजाऊ ह्यांना वंदन केलेभवानीमातेचे दर्शन घेतलेअंगात चिलखतवर जरीचा अंगरखाडोई जिरेटोपत्यावर मंदिल बांधलाडाव्या हाताच्या बोटात वाघनखे चढवली
अस्तिनात बिचवा लपवलाआणि सर्व तयारी करून शामियान्याच्या दाराशी हजर झालेखान तर आधीच 
येऊन शामियान्यात बसला होतात्याच्या मनात माझ्या शक्तीला घाबरून शिवाजी फक्त शरणार्थीसारखा 
मला भेटायला येतोयहा जणू माझा विजयच आहेअशा थाटात आणि काहीसा रमलेल्या स्तिथीत तो होता.
त्यावेळी खानाजवळ सय्यद बंडा नावाचा हत्यारबंद गडी उभा होतामहाराजांच्या वकिलाने प्रथम सय्यद बंडासदूर करावे अशी विनंती केलीखानाने आपल्या दाढीवर हात फिरवत सय्यद बंडास दूर केलेआणि दुसऱ्याच 
क्षणी शिवरायांनी खानाच्या दिशेने  आपली पावले उचललीया राजे या भेटा आम्हाला .. असे म्हणून आपले 
दोन्ही बलदंड बाहू पसरून अफजल खान पुढे आलाखान उंच धिप्पाड होतातर शिवाजी महाराज वामनमूर्तीच.खानाने भेटीचे नाटक करून महाराजांना आपल्या कवेत घेतलेत्यांची मान आपल्या कवेत दाबली आणि आणिमहाराजांच्या अंगावर कट्यारीचा वार केलाअंगावरचा अंगरखा फाटला पण चिलखताने आपले काम चोख 
केले. घाव पडला पण लागला नाहीत्याच वेळी आई भवानिचं स्मरण करून महाराजांनी खानाच्या पोटात 
वाघनखे घुसवलीबिचवा काढला आणि तो खानाच्या पोटात घुसवलाखान दगा दगा म्हणून मोठ्याने 
ओरडलाखानाचा आवाज ऐकून सय्यद बंडा शामियान्यात घुसलात्याने महाराजांवर घाव घालण्यासाठी पट्टा 
हातात उचललापण तेवढ्यात तो घाव महाराजांवर पडण्यापूर्वीच महाराजांचा  सच्चा सेवक जिवा महाला हा 
धावून पुढे आलात्याने एका घावातच सय्यद बंडाला यमसदनास पाठवले  राजांच्या जीवचे रक्षण केलेआणिसेवक धर्माचे पालन केलेया पराक्रमाचा जेव्हा जेव्हा उल्लेख केला गेला त्या वेळी सर्वांच्या तोंडून जे शब्द 
निघाले ते शब्द होते होता जिवा म्हणून वाचला शिवा.....





BY - INTERNET

जिवा महाला यांच्या कुटुंबीयांना हक्काचे घर...


जिवा महाला यांच्या कुटुंबीयांना हक्काचे घर




म. टा. वृत्तसेवा, ठाणे

शिवाजी महाराजांच्या जीवाला जिवा देणाऱ्या जिवा महाला या शूरवीरांच्या तेराव्या वंशजांवर आर्थिक आपत्ती ओढवली असल्याची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने २९ मेच्या अंकात सर्व प्रथम प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत राज्यातील अनेक दानशुरांची पावले या कुटुंबाच्या मदतीसाठी सरसावली होती. यामध्ये टिटवाळ्याच्या विजय देसेकर यांच्या समवेत समाज कल्याण न्यासचे संस्थापक डॉ. सोन्या पाटील यांनी तात्पुरत्या स्वरूपात मदतीचा हात पुढे केला होता. मात्र नऊ ऑक्टोबर रोजी महाला यांच्या जयंती निमित्ताने या मंडळींनी महाला कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या नवीन घराचे भूमिपूजन केल्याने महाले कुटुंबाना आता सुरक्षित हक्काचा निवारा मिळणार आहे.

ठाण्यातील शारदा एज्युकेशन सोसायटी महाला यांचे पंधरावे वंशज प्रतिक महाला याच्या शिक्षणाची पुढील जबाबदारी घेणार असल्याने आनंद विश्व गुरुकुल कॉलेजमध्ये महाला कुटुंबीय २८ मे रोजी आले होते. त्यावेळी राजश्री महाला यांनी आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले होते. महाले कुटुंबीय सातारा जिल्ह्यातील कोंढवली या ठिकाणी लहानश्या झोपडीवजा मातीच्या घरात राहत होते. कुटुंबातील प्रकाश महाले यांना पाच वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने सध्या ते घरातच असतात. त्यामुळे या कुटुंबावर आर्थिक अंधार दाटला आहे. परिणामी कुटुंब सावरण्यासाठी हिरकणीसारख्या प्रकाश यांच्या पत्नी जयश्री सध्या कुटुंबाची जबाबदारी पेलत आहेत. दोन मुलांसह अर्धांगवायूमुळे अंथरूणाला खिळलेल्या पतीचा त्या सांभाळ करत आहेत.

समाजसेवक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी नवीन घर बांधून देण्याची उस्फूर्तपणे जबाबदारी स्वीकारली आणि त्या दृष्टीने पावलेही उचलली आहेत. त्यामुळे या कुटुंबीयांना हक्काचा सुरक्षित निवारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


कायमस्वरूपी मदत केव्हा?
या कुटुंबाची परिस्थिती तेथील स्थानिक राज्यकर्ते, तसेच प्रशासकीय मंडळींना माहित आहे. मात्र तरीही या कुटुंबाकडे कानाडोळा केला जात आहे. कुटुंबाला तुटपुंजी मदत मिळत आहेच. पण कायमस्वरूपी मदत सरकारने केली तर कुटुंबाचा 'उदय' होईल, असा विश्वास जयश्री सपकाळ (महाल) यांना वाटतो.






BY - Maharashtra Times | Updated:Oct 13, 2017 

माझ्याबद्दल